Sunday, May 14, 2017



                              आला आला तुर्की पाहुणा!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसिप एर्दोगान नुकतेच भारत भेटीवर आले होते. तसे पाहिले तर अनेक परदेशी पाहुणे भेटटीनिमित्त येतात वभेट देऊन जातात. पण  हा पाहुणा काही वेगळाच म्हणावा, असा आहे/होता. तो कसा काय? 
हाॅरर फिल्मला लाजवणारे भीषण व कावेबाज भयनाट्य - ते समजण्यासाठी थोडे मागे जावे लागेल. दीड किंवा दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तुर्कस्थानमध्ये अचानक बंड झाले व ते ज्या वेगाने झाले, त्याच वेगाने २४ तासातच शमले सुद्धा आणि लोकनियुक्त शासन तुर्कस्थानमध्ये पुन्हा कायम झाले. एखाद्या चित्रपटातच शोभेल अशी ही घटना होती. या निमित्ताने निर्माण झालेले संशय, उघड झालेले हेवेदावे, तापल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याची वृत्ती, वरून शांततेचा व लोकशाहीचा पुरस्कार पण आतून दुसऱ्या देशात आपल्याला सोयीचे होईल असे शासन स्थापन करण्याची वृत्ती या आणि अशाच मनुष्यसुलभ पण अवांछनीय अशा कृत्यांचे दर्शन घडले असून अनेकांचे मायावी स्वरूपही उघडकीला आले. पण त्याच बरोबर एका व्यक्तीमध्ये जणू आमूलाग्र परिवर्तन झाले. कोण होतास तू, काय झालास तू, असे म्हणण्याची वेळ आली.
 बंडखोरांचा उठाव - १५ जुलै २०१६ ची मध्यरात्र. स्थळ तुर्कस्थानची राजधानी अंकारा. बंडखोर सैन्यातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हालचालींना प्रारंभ झाला. रणगाडे, हेलिकाॅप्टर्स आणि एफ-१६ जातीची विमाने यांनी एकाच वेळी मोहीम सुरू केली. जमावावर हल्ले झाले, टी व्ही केंद्रांवर ताबा घेण्यासाठी झटापटी झाल्या आणि तोफा तुर्की पार्लमेंटच्या इमारतीवर आग ओतू लागल्या.
  अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांचा सुरवातीला पत्ताच नव्हता. समुद्र किनाऱ्यावरील मार्मारिस नावाच्या गावी ते सुट्टीचा आस्वाद घेत होते. तिथे बंडखोरांच्या तावडीतून ते कसेबसे अगदी बालबाल व केवळ नशीबाची दोरी बळकट म्हणूनच वाचले आणि त्यांच्या जीवात जीव आला. पण त्यामुळेच पुढे घटनाक्रमाने वेगळे वळण घेतले. रातोरात व १६ तारखेला सकाळी त्यांनी आपले समर्थक गोळा केले व आपण सुरक्षित असून उठाव फसला असल्याची घोषणा केली.
 राजकीय नेत्यांची समयसूचकता -  बंडाचे वृत्त कळताच राजधानीतील संसद सदस्यांनी पार्लमेंटच्या इमारतीकडे धाव घेतली. पार्लमेंटला बंडखोरांनी वेढण्याचा कसून प्रयत्न केला. सगळे सदस्य बंडखोरांच्या हाती पडतील आणि तुर्कस्थानमधील लोकशाहीचा अंत होईल अशी शक्यता दिसू लागली. विरोधी पक्षनेते महमूद तनाल यांनी प्रसंगावधान राखून प्रथम तुर्कस्थानच्या राज्यघटनेची प्रत  बगलेत मारली आणि मगच त्यांनी पार्लमेंटच्या इमारतीकडे इतर सामानासह धाव घेतली. त्या रात्री ते अंकारा येथील बार असोसिएशनच्या आॅफिसमध्ये होते. जेट विमानांच्या घिरट्या पाहताच त्यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क केला. पण तेवढ्यात त्यांना रस्त्यावर दाणदाण पाय आपटीत मार्चिंग करीत जाणारे सैनिक दिसले. राजधानीपासून काही मैल अंतरावर असलेल्या इस्तंबूल या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरामधील सर्व पुलांचा ताबा सैन्याने घेतला होता आणि वाहतूक रोखली होती. अंकारामधील गुप्तहेर खात्याचे मुख्य कार्यालय असलेल्या इमारतीवर सैन्याने हल्ला चढवला होता. पार्लमेंटची इमारतच त्यातल्या त्यात सुरक्षित असणार असा महमूद तनाल यांनी विचार केला. अटक टळण्याची शक्यता तिथे जाण्यातच होती. इतर खासदारही तिथेच असणार होते. पण तरीही त्यांनी तुरुंगात कोणकोणत्या वस्तू लागतील याचा थंड डोक्याने विचार करून त्याही सोबत घेतल्या त्यातली सर्वात शेवटची वस्तू होती, राज्यघटनेची प्रत. ही प्रत मी सोबत का घेतली, ते त्यांनी नंतर आता स्पष्ट केले आहे. ते म्हणाले होते, ‘मी व्यवसायाने वकील, त्यातून संसदेच्या मानवाधिकार समितीचा सदस्य. त्यामुळे तुरुंगात ही प्रत लागणारच, हे मी जाणून होतो.’ भीषण परिस्थितीतही अतिशय थंड डोक्याने घेतलेला हा निर्णय होता.
 एक वेगळा प्रतिसाद -  या उलट आॅर्हन अटले हे सत्ताधारी जस्टीस ॲंड डेव्हलपमेंट पार्टीचे एक नेते. ते घरीच होते. त्यांनी स्फोटांचे आवाज ऐकले, ठिकठिकणी फोन केले. सैन्याने उठाव केला आहे, हे कळताच अगोदर पिस्तुल उचलले व पार्लमेंटचा विचार न करता पोलिस मुख्यालयाकडे जाण्याचे ठरविले. पण कारमध्ये बसतात न बसतात तोच पोलिस मुख्यालयाजवळ स्फोट झालेला त्यांनी ऐकला व लगेच ज्वालांचा लोळ उठलेला पाहिला. हे बघताच त्यांनीही आपला विचार बदलून पार्लमेंटच्या इमारतीकडे तातडीने कूच केले.  
 राजकीय नेत्यांमधील अभूतपूर्व एकवाक्यता - लवकरच तीन प्रमुख पक्षांचे संसद सदस्य पार्लमेंटच्या हाॅलमध्ये एकत्रित झाले. तर चौथा पक्ष जो कुर्दिश पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, त्याने आपले पाठिंब्याचे पत्र पाठविले. तुर्कस्थानच्या इतिहासातील हा अभूतपूर्व प्रसंग होता. सर्व राजकीय पक्षात एकजूट झाली होती. स्पीकर कर्हामन यांनाही धीर आला, त्यांनी संसद चालू आहे, असे जाहीर करून जनतेला धीर व दिलासा दिला आणि बंडखोरांविरुद्ध लढण्याचा निर्धार कळवला व जनतेची साथ मागितली. तेवढ्यात लागोपाठ दोन स्फोट ऐकायला आले. एक तर संसदेच्या आवारातच झाला आहे, असे वाटत होते.
अध्यक्षांची जनतेला चॅट करून साद - खुद्द अध्यक्ष रेसिप एर्दोगान मार्मारिस येथेच अडकून पडले होते. यांचा संदेश तिथूनच प्रसारित झाला. ‘बंडखोरांवर ताबा मिळविण्यात यश मिळाले आहे. बंड फसले आहे’. अध्यक्षांनी संपर्कासाठी टी व्ही नाही, शासकीय कार्यालयही नाही तर चक्क व्हिडिओ चॅट केले होते. बंडखोरांचा नि:पात करण्यासाठी जनतेने बाहेर पडावे, असे त्यांनी आवाहन केले. ‘मीही पाठोपाठ निघतच असून लवकरच तुम्हाला येऊन मिळेन’, असे त्यांनी जनतेला आश्वासन दिले.
जनतेनेच थोपवले बंडखोरांना - अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता रस्त्यावर उतरली. राजधानी अंकारामध्ये तिने पार्लमेंटच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सुमारे तीनशे मैलावरील इस्तंबूल शहरात बंडखोरांनी दोन पुलांवर कब्जा करून वाहतुक थांबविली होती आणि शहरातील युरोपियन व एशियन विभाग अशाप्रकारे पाचर ठोकून वेगळे केले होते. तकसीम चौकात बंडखोर सैनिक कडे करून सज्ज होते. इकडे जनतेतून निषेधाच्या आरोळ्यांसोबत ‘गाॅड इज ग्रेट! ग्रेटेस्ट’ अशा गर्जना उठत होत्या.
मी अध्यक्षपदी कायम आहे - हे पाहून अध्यक्ष रेसिप एर्दोगान अंकारा या राजधानीकडे न जाता इस्तंबूलला गेले. या शहराचा त्यांना वर्षानुवर्ष नि:संदिग्ध पाठिंबा मिळत आलेला होता. ते येथील जनतेच्या गळ्यातले ताईत होते. भल्या पहाटे म्हणजे सकाळी ४ वाजता त्यांचे विमान इस्तंबूल शहरातील अटाटर्क विमानतळावर उतरले. ‘बंडखोरांची कृती देशद्रोहाची असून तिला क्षमा नाही, आपण अध्यक्षपदावर कायम आहोत’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. ‘ही इष्टापत्तीच आहे. आता सैन्यदलाचे शुद्धिकरण करणे शक्य होणार आहे’, असा मनोदयही त्यांनी याचवेळी व्यक्त केला.
करूनसवरून नामानिराळी राहणारी अमेरिका - अमेरिकेचे सेक्रेटरी आॅफ स्टेट जाॅन केरी यांची प्रतिक्रिया सावध होती. त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी वाॅशिंगटनहून तुर्कस्थानमधील सर्व पक्षांनी लोकनियुक्त शासनाच्या पाठीशी उभे रहावे; दंगल, गोंधळ, हिंसा वा रक्तपात टाळावा, असे आवाहन केले. पण अमेरिकेच्या भूमिकेबद्दल तुर्कस्थानमध्ये व खुद्द अध्यक्षांच्या मनातही अगोदर पासूनच संशयाचे वातावरण होते. अंकारा व वाॅशिंगटन यांच्यात मतभेद आहेत, अशी वदंता जगात अगोदरपासूनच होती. तुर्कस्थानमध्ये लोकशाही नावालाच आहे. लोकशाहीत अपेक्षित असलेल्या सुधारणा करण्यास अध्यक्ष रेसिप एर्दोगान तयार नाहीत, असे अमेरिकेत व अमेरिकेबाहेरही बोलले जायचे. तसेच तुर्कस्थानच्या सरहद्दी पलीकडे इराक व सीरिया मध्ये इसीस विरुद्ध जी लढाई सुरू होती, त्याबाबत तुर्कस्थान उचलत असलेली पावले अमेरिकेला समाधानकारक वाटत नव्हती, हेही लपून राहिलेले नव्हते. बंडाची चाहूल लागताच तुर्कस्थानमधील ज्या विमानतळावर अमेरिका व तुर्कस्थान या दोन्ही राष्ट्रांच्या फौजा तैनात आहेत/होत्या (तुर्कस्थान नाटोचा - नाॅर्थ अटलांटिक ट्रिटी आॅर्गनायझेशनचा- सदस्य असल्यामुळे ही व्यवस्था होती) त्या ठिकाणी अमेरिकन फौजांनी बंडखोरांना छुपी साथ दिली होती, असे अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांना वाटले. हे वाटणे विनाकारण नव्हते. 
अमेरिकेला फटकारले - अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांनी तसे बोलूनही दाखविले. अर्थातच अमेरिकेने याचा तात्काळ इन्कार केला. अशावेळी असेच करायचे असते/केले जाते, पण हे न समजण्याइतके अध्यक्ष रेसिप एर्दोगानही दूधखुळे नक्कीच नव्हते. त्यांनी अंकारा विमानतळावरून अमेरिकेच्या बाॅम्बफेकी अमेरिकी विमानांना इसीस विरुद्धच्या कारवाईसाठी उड्डाण करण्यास मनाई केली. इतर तळांबाबतही तुर्कस्थानने अशीच भूमिका घेतली तर काय करायचे? यापैकी काही ठिकाणी तर नाटो फौजांची अण्वस्त्रे तैनात होती. अमेरिकेने तुर्कस्थानची कशीबशी समजूत काढली. तुर्कस्थाननेही फार ताणून धरले नाही. एक जागतिक महासत्ता, सामर्थ्यात पासंगालाही न पुरणाऱ्या तुर्कस्थानची, परोपरीने समजूत घालते आहे, यात समाधान मानावे, फार ताणून धरू नये, असा शहाणपणाचा विचार अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांनी केला व आपल्या राजकीय शहाणपणाचा परिचय दिला.
अंतर्गत साफसफाईत चूक झाली/केली -  बंडानंतरची अंतर्गत साफसफाई जोरात सुरू झाली. बंडखोरांचा पुरता बीमोड करण्याचे प्रयत्न योग्य व समर्थनीयच ठरतात. हजारो सैनिकांना संशयावरून बडतर्फ करण्यात आले. सैनिकांसोबतच पोलिस, न्यायाधीश व बंडाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केल्याचा संशय असलेले सनदी अधिकारी यांचीही हकालपट्टी करण्यात आली. हेही एकवेळ योग्यच ठरविता येईल पण शिक्षण खात्यातील २० हजार अधिकाऱ्यांना घरी पाठविले गेले आणि विद्यापीठातील १५०० पेक्षा जास्त शिक्षक, प्राध्यापक, विभाग प्रमुख यांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले. हे मात्र अतीच झाले. तेव्हापासून संशयितांना परदेश प्रवासाची अनुमती मिळत नाही. अध्यक्षांनी प्रथम तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली व नंतर सार्वमत घेतल्याचा देखावा करून स्वत:कडे अमर्याद अधिकार घेतले. अशाप्रकारे लोकशाही पद्धतीने निवडून आलेला नेता पक्का हुकुमशहा झाला. तेव्हापासून रेसिप  एर्दोगान कोणत्याही हुकुमशहाला मागे टाकतील, अशाप्रकारे वागू लागले. परिस्थिती एखाद्या व्यक्तीच्या स्भावात एवढा आमूलाग्र बदल घडवून आणू शकते? विश्वास नाहीना बसत? 
माझ्या विरोधकाला आश्रय का देता? - रेसिप  एर्दोगान अमेरिकेवर नाराज असण्याचे आणखीही एक कारण आहे. फेतुल्ला गुलेन या कट्टर व प्रभावशाली धार्मिक तुर्की नेत्याच्या आदेशानुसार हा बंडाचा बनाव रचला गेला असा  रेसिप एर्दोगान यांचा साधार दावा आहे. फेतुल्ला गुलेन १९९९ पासून अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतात विजनवासात राहतो आहे. फेतुल्ला गुलेन व तुर्कस्थानचे विद्यमान अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांच्यामधून विस्तव जात नाही. फेतुल्ला गुलेन अमेरिकेत राहून तुर्कस्थानमधील सर्व प्रशासकीय यंत्रणेत आपले अनुयायी घुसवीत आला आहे, असा अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांचा दावा आहे. अस्तनीतील निखाऱ्या सारख्या असलेल्या या घुसखोरांना काहीही झाले तरी आपण निखंदून काढूच असा त्यांचा निर्धार आहे. हजारो शिक्षक/प्राध्यापकांना  घरी बसविण्यामागे हाच विचार आहे/होता. अमेरिकेने फेतुल्ला गुलेन यांना देशातून हकलून द्यावे व तुर्कस्थानच्या स्वाधीन करावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. फेतुल्ला गुलेन यांनी या बंडाशी आपला काहीही संबंध नाही, असे जाहीर केले असून अमेरिकेलाही त्यांना विनाकारणच जबाबदार धरले जाते आहे, असे वाटते आहे. अमेरिकेने मध्यपूर्वेत आजवर केलेल्या उचापती पाहता अमेरिकेवर तुर्कस्थानच नव्हे तर इतरही विश्वास ठेवायला तयार नाहीत.
रेसिप एर्दोगान हे काही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नाहीत. तसे ते कधीच नव्हते. क्वचितच कोणताही राजकारणी तसा असेल/असतो. पण ते लोकशाही मार्गाने सत्तेवर आले होते व आता या बंडानंतर शंभर टक्के क्रूर हुकुमशहा झाले आहेत, असे दुसरे उदाहरण सहसा मिळणार नाही  
मूळ घटनापट समजणे का आवश्यक? - तुर्कस्थानमध्ये सैन्याने १५ जुलैच्या मध्यरात्री केलेला उठाव १६ जुलैलाच सकाळी सकाळी शमला आणि लोकनियुक्त शासन कायम राहिले, ही वार्ता लोकशाहीप्रेमीजनांना समाधान देणारी वाटत असली तरी त्या निमित्ताने निर्माण झालेले संशय, उघड झालेले हेवेदावे, तापल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याची वृत्ती, वरून शांततेचा व लोकशाहीचा पुरस्कार पण आतून दुसऱ्या देशात आपल्याला सोयीचे होईल असे शासन स्थापन करण्याची वृत्ती या आणि अशाच मनुष्यसुलभ पण अवांछनीय अशा कृत्त्यांचे दर्शन आता हळूहळू समोर येत असून अनेकांचे मायावी स्वरूपही उघडकीला येत आहे. या सर्व बाबींचे नीट आकलन होण्यासाठी एखाद्या चित्रमय युद्ध कथेशी स्पर्धा करणाऱ्या मूळ घटनापटाचा सुरवातीपासूनच व ती दृश्ये नजरेखाली घालूनच विस्ताने विचार करणे योग्य ठरेल.
तुर्कस्थान एक रमणीय देश -  तुर्कस्थान हा देश एकापेक्षा अधिक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. अगदी भौगोलिक स्थानाचा विचार केला तरीही. युरोप आणि आशिया या दोन खंडांच्या सीमेवर तो वसलेला आहे. त्याचा फार मोठा भाग पश्चिम आशियात तर छोटासा भाग नैरुत्य युरोपमध्ये मोडतो. म्हणजे तो युरेशियात आहे. निसर्गाचे स्वत:चे असे सौंदर्य असते. निसर्गाने आपले सगळे सौंदर्य तुर्कस्थानवर अक्षरशहा उधळले आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या देशातील समाजावरही या सौंदर्याचा प्रभाव पडलेला असावा असे वाटून जाते. पण ऐतिहासिक काळात हे समाजभान हरवलेले हुकुमशहा इथे राज्य करीत होते. शेवटची कडी होती वहिदुद्दिन या नावाच्या सुलतानाची. तो खलिफा (धर्मगुरू) सुद्धा होता. मुस्तफा कमाल पाशा नावाच्या पराक्रमी व थोर पुरुषाने ही परिस्थिती बदलली. त्यामुळे इस्लामधर्मी असूनही या देशातील  नैसर्गिक सौंदर्याच्या कोंदणात धार्मिक व सामाजिक सौंदर्य खुलून दिसू लागले. पण कशी काय दृष्ट लागली कोण जाणे? पण एकेकाळचा बऱ्यापैकी चांगला लोकनेता असलेला  रेसिप एर्दोगान पार बगलून आता एक क्रूर, कपटी, कारस्थानी व कावेबाज राजकारणी झाला आहे.
तुर्कस्थानचा कायापालट करणारा मुस्तफा कमाल पाशा -  तुर्कस्थान हा मुस्लिम देश असला तरी मुस्तफा कमाल पाशा नावाच्या पुरुषाच्या नेतृत्वाखाली तो एक आधुनिक देश झाला होता. या पुरुषाचा जन्म १८९१ मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला होता. वडील एक शासकीय कर्मचारी होते. वडलांचे छत्र लहानपणीच हरपले. पण अशा परिस्थितीतही मुस्तफा कमाल पाशा कुशाग्र बुद्धिमत्तेच्या भरवशावर एक क्रांतिकारी, शूरवीर तरूण नेता म्हणून  म्हणून नावारूपाला आला. त्याला आधुनिक तुर्कस्थानचा जन्मदाता मानले जाते. त्याच्यावर रूसो व वाॅल्टेअर यांच्या विचारांचा पगडा होता. तुर्कस्थानची प्रगती व्हायची असेल तर त्या देशाने आधुनिकतेची कास धरली पाहिजे, असे त्याच्या मनाने घेतले. त्याच्या या भूमिकेमुळे त्याच्यावर तत्कालीन तुर्कस्थानच्या राजवटीची वक्रदृष्टी फिरली व त्याला तुरुंगात टाकण्यात आले.
मुस्तफा कमाल पाशाची कमाल - १९१२/१९१३ मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली. त्याने लगेच सैन्यात प्रवेश केला व लवकरच तो एक कुशल सैनिकी अधिकारी म्हणून ओळखला जाऊ लागला. पहिल्या जागतिक महायुद्धात त्याने मर्दुमकी गाजविली. गॅलिपोलीची लढाई म्हणून गाजलेल्या लढाईत त्याने अतुलनीय पराक्रम गाजवून ब्रिटिशांना खडे चारले. या वीरश्रीयुक्त कृत्यामुळे तो जनतेच्या गळ्यातला ताईत बनला. 
त्या काळी तुर्कस्थानमध्ये एका जुलमी व धर्मांध सुलतानाची राजवट सुरू होती. त्याचे नाव होते वहिदुद्दिन. हा जसा सुलतान होता तसाच तो खलिफाही होता. खलिफा म्हणजे सर्वोच्च धर्मगुरू. अशाप्रकारे राजसत्ता व धर्मसत्ता एकाच व्यक्तीचे ठायी एकवटली होती. मुस्तफा कमाल पाशाने सुलतानावर देशद्रोहाचा आरोप ठेवून पदच्युत केले व तुर्कस्थानला आधुनिकतेच्या मार्गावर व प्रगतीपथावर आणले व नव्या आणि आधुनिक तुर्कस्थानचा पाया रचला. इजिप्तसारख्या देशातील सनातनी व कडवे इस्लामधर्मी पेटून उठले. त्यांनी सुलतानाची व खलिफाची (सुलतानच खलिफाही होता) बाजू उचलून धरली. पण हे सर्व वाया गेले.
भाबडे आपण - या सर्वावर कडी म्हणजे उत्तर भारतातील कडव्या मुसलमानांनी सुद्धा सुलतानाला पाठिंबा देणारी खिलापत चळवळ उभारली. कुठे तुर्कस्थान व कुठे हिंदुस्थान? धर्मवेड्यांना देशकालाचे बंधन नसते हेच खरे. सर्वावर कडी म्हणजे काॅंग्रेसने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. अशा पाठिंब्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य घडून येईल, अशी आपली भाबडी आशा होती. पण प्रत्यक्षात तसे होणे नव्हते. खिलापत चळवळीला दिलेला पाठिंबा आपल्यासाठी ‘अखिल आफतच’ ठरला. भारतीय मुस्लिमांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी खिलापत चळवळ उपयुक्त ठरेल, असा गांधीजींचा अंदाज होता. परंतु, त्याद्वारे मूलतत्त्ववादी व पॅन इस्लामवादी शक्तींनाच बळ मिळाले. आजही उत्तर भारतात कट्टरवादी मुस्लिंमांचा जो वरचष्मा निर्माण झाला आहे, त्याची पाळेमुळे अशी भूतकाळात रुजलेली असल्याचे अनेकांचे मत आहे. 
 आज घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरले आहेत - आज तुर्कस्थानात घड्याळाचे काटे उलटे फिरले आहेत. एक सनातनी माथेफिरू तुर्कस्थानवर राज्य करतो आहे. प्रगत विचाराची जनता व धर्मांध क्रूरकर्मा रेसिप एर्दोगान यांच्या जुलमी राजवटीत पिचली जात आहे. खरेतर तिच्या पाठिंब्यामुळेच तुर्कस्थानमध्ये अध्यक्ष आज जिवंत आहेत. त्यांची बरीचशी स्थिरपद झालेली ही जुलमी राजवट लोकशाही मार्गाने या अवस्थेप्रत पोचली आहे, हा या देशाचा केवढा दैवदुर्विलास?
तुर्कस्थानचे पदमहात्म्य -   अशा  या तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसिप एर्दोगान हे नुकतेच भारतभेटीवर येऊन गेले. आजचा तुर्कस्थान हा ओआयसी (आॅर्गनायझेशन आॅफ इस्लामिक कोआॅपरेशन) या ५७ मुस्लिम देशांच्या संघटनेचा एक सदस्य आहे. इस्लामिक जगताचा आवाज बुलंद करून इस्लामी जनतेच्या हितसंबंधांची जपणूक करतांना जागतिक शांतता व सुव्यवस्थेलाही हातभार लावण्याचे लिखित उद्दिष्ट समोर ठेवून ही संघटना १९६९ पासून कार्यरत आहे. या संघटनेतील अनेक देशांशी भारताचे बऱ्यापैकी स्नेहाचे संबंध आहेत. पण तुर्कस्थानची चाल भारताच्या संबंधात नेहमी तिरपीच राहिलेली आहे. तुर्कस्थान नाटोचाही (नाॅर्थ अटलांटिक ट्रिटी आॅर्गनायझेशन) सदस्य आहे. तसेच तो एनएसजीचाही (न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप) ही सदस्य आहे. ही आण्विक उपकरणांच्या निर्यातदार देशांची संघटना आहे. अण्वस्त्रे निर्माण करता येतील अशी खनिजे, यंत्रसामग्री व तंत्रज्ञान यांच्या निर्यातीवर या संघटनेचे नियंत्रण असते. भारताने १९७४ साली पहिला अणुस्फोट केला व १९७५ साली ही संघटना स्थापन झाली. अण्वस्त्रांचा आणखी प्रसार होऊ नये, असा या संघटनेचा एक प्रमुख उद्देश आहे. आजमितीला या संघटनेचे ४८ सदस्य आहेत. यापैकी प्रामुख्याने चीन, न्यूझिलंड, आयर्लंड, तुर्कस्थान व आॅस्ट्रिया या राष्ट्रांचा भारताला या संघटनेचा सदस्य करून घेण्यास विरोध आहे. चीन वगळता बाकीच्या देशांचे जागतिक संदर्भात फारसे महत्व नाही. पण प्रवेशाच्या चाव्या त्यांच्याही हाती आहेत ना! त्यामुळे त्यांना प्रवेशासाठी अनुकूल करून घेण्याचा भारताचा प्रयत्न असतो. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, रशिया या बड्या मंडळींची भारताला सदस्यत्व देण्यास अनकूलता आहे. पण चीन, न्यूझिलंड, आयर्लंड,  तुर्कस्थान व आॅस्ट्रिया यांच्या विरोधामुळे भारताचा प्रवेश अडला आहे. सगळ्यांचीच संमती हवी अशी मानभावीपणाची भूमिका घेऊन व भारत पुरेसा जबाबदार देश नाही, असे म्हणत चीनचा भारताच्या प्रवेशाला विरोध आहे. तुर्कस्थानची भूमिका तर आजवर भारताविरुद्ध पाकिस्थानला सर्वच बाबतीत पाठिंबा देण्याची राहिलेली आहे. भारताला जर सदस्यत्व द्यायचे झाले तर पाकिस्थानला का नको? तुर्कस्थानची ही भूमिका इतर अनेकांना (त्यात भारतही आला) मान्य नाही. कारण जग पाकिस्थानला जबाबदार देश मानत नाही. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे इतर सर्व देश भारताच्या प्रवेशाला अनुकूल झाले आहेत. पंतप्रधान मोदींचा दौरा जगातील विविध देशांमध्ये असतो त्या निमित्ताने या देशांना प्रवेशासाठी अनुकूल करून घेण्याच्या प्रयत्नांना चांगले यश प्राप्त झाले आहे. हे राजकीय बारकावे लक्षात न घेता काही राजकारणी मोदींना प्रवासी पंतप्रधान म्हणून संबोधतात, तेव्हा त्यांच्या अकलेची व प्रामाणिक हेतूचीही कीव करावी तेवढी थोडीच आहे.
वारांगनेलाही मागे टाकणारी राजनीती - या निमित्ताने अमेरिकेची भूमिकाही आपल्या डोळ्यात अंजन घालणारी ठरावी. पाकिस्थानला नाखूष न करण्याकडे अमेरिकेचा कल असतो. आजवर अमेरिकेने पाकिस्थानचे खूप कोडकौतुक केले आहे. त्याचे अपराध पोटात घातले आहेत. कारण एकच. अमेरिकेला चीन व रशियाला वेसण घालण्यासाठी आशियात भरवशाचा साथीदार हवा आहे. पाकिस्थान हे जाणून आहे. त्याने अमेरिकेला साथ देताना चीन व रशियाशीही दोस्ती केली आहे. अमेरिकेला हे सर्व खपवून घ्यावे लागते. कारण यावर उपाय नाही.  
जसा पाकिस्थान तसाच तुर्कस्थान - तोंड पोळल्यानंतर अमेरिकेने अशीच भूमिका युरोपात तुर्कस्थानबाबत स्वीकारली आहे. रेसिप एर्दोगान यांना आता चेव चढला असून ते इस्लामी देशांचे नेतृत्व करण्याची आकांक्षा उराशी बाळगून कामाला लागले आहेत. युरोपात पाकिस्थानचा  फारसा उपयोग नाही. सौदी अरेबियाही तसा काहीसा दूरच पडतो. मग तुर्कस्थान  करेनाका नेतृत्व, अशी अमेरिकेची भूमिका आहे.  रेसिप एर्दोगान  हे पुरतेपणी जाणून आहेत. अमेरिकेला युरोपात साथ देण्याच्या मोबदल्यात तुर्कस्थान काय काय करतो आहे, हे पाहिले म्हणजे राजनीतीची वारांगनेसारखी चाल लक्षात आल्या वाचून रहात नाही. 
कुर्दांची करूण कहाणी - काश्‍मीरबाबत भारताला संवादाचा मानभावी सल्ला देण्याचे धारिट्य तुर्कस्थानने केले आहे खरे, पण तुर्कस्थानमधील वीस टक्के कुर्द लोकांना तो अक्षरशहा झोडपून काढतो आहे. खरेतर बंड झाले तेव्हा कुर्द जमात बंडखोरांच्या विरोधात होती. मोठ्यांच्या लढाईत लहानांची कशी गोची होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुर्द जमातीच्या लोकांची सध्या होत असलेली ससेहोलपट होय. पहिल्या महायुद्धानंतर आॅटोमन साम्राज्याचे तुकडे तुकडे झाले. नव्हे विजयी ब्रिटन व फ्रेंचादिकांनी ते केले आणि आपापसात वाटून घेतले. आॅटोमन साम्राज्यात कुर्द जमात एका सलग भूप्रदेशात राहत होती. हा सलग भाग कुणीतरी एकाने घ्यायचा ना, तर तसे झाले/केले नाही. या भूभागाचे व त्याच्याबरोबर कुर्द जमतीचेही तुकडे तुर्कस्थान, सीरिया इराकादी देशात समाविष्ट झाले/केले. या लोकांना आपले एक राष्ट्र असावे, असे सहाजीकच वाटते. पण त्या त्या देशांना ते मान्य नाही. 
शंभर खून माफ का म्हणून ? - कुर्द जमातीचे लोक बंड करतात व तुर्कस्थान, सीरिया इराकादी देश त्यांना बुकलून काढतात. मानवतावादी अमेरिका याकडे दुर्लक्ष करते आहे कारण तुर्कस्थानजवळ सहा लाख खडे व तरबेज सैन्य आहे. अमेरिकेला त्या सैन्याची गरज लागणार आहे आणि तुर्कस्थान काही मोबदल्यात अमेरिकेची ही गरज पूर्ण करण्यास तयार आहे. हा मोबदला कोणता? त्याला अमेरिकेने सर्व गुन्हे माफ करावेत हा. तुर्कस्थानने इसीसला शस्त्रे व पैसे दिले व खनिज तेल मिळवले. अमेरिकेने माफ केले. इसीसने इराकमधील मोसुल व सीरियातील अलेप्पो शहरांवर चढाई केली असता तुर्कस्थानने इसीसलाच मदत केली.  ती कशी ? तर बाॅम्बफेक इसीसच्या फौजांवर न करता कुर्दांच्या वस्त्यांवरच केली. खरेतर हे कुर्द इसीसच्या विरोधात लढत होते. म्हणजे बाॅम्बफेक ही प्रत्यक्षात इसीसलाच मदत करणारी झाली की. अमेरिकेने हेही माफ केले. सीरिया व इराक मधील लाखो निर्वासितांना आश्रय देण्याचे कबूल केले पण प्रत्यक्षात त्यांना युरोपात घुसवले.अमेरिकेने इकडेही कानाडोळा केला. युरोपियन युनियनचा यामुळे तिळपापड झाला. पण तुर्कस्थानला त्याची चिंता नाही. कारण तुर्कस्थान नाटोचा (नाॅर्थ अटलांटिक ट्रिटी आॅरगनायझेशनचा) सदस्य आहे ना. 
नवी विटी पण जुनेच राज्य - या सर्व प्रकाराकडे पूर्वी बराक ओबामांनी दुर्लक्ष केले आज डोनाल्ड ट्रंप दुर्लक्ष करीत आहेत. कारण तुर्कस्थानच्या लाखो खड्या व तरबेज सैनिकांची मदत अमेरिकेला भविष्यात लागणार आहे. यावेळी अमेरिकन रक्त सांडलेले अमेरिकन जनतेला व म्हणूनच अमेरिकन सरकारला चालणार नाही. अशा पृष्ठभूमीवर एवंगुणविशिष्ट  रेसिप एर्दोगान यांची ही भारतभेट होती.
यजमान देशात प्रवेश करण्यापूर्वीच आक्षेपार्ह विधान -   या पार्श्वभूमीवर तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांच्या भारतभेटीकडे म्हणूनच बारकाईने पहायला हवे आहे. भारतात प्रवेश करण्यापूर्वीच रेसिप एर्दोगान यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन काश्मीरबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले ते असे की, काश्मीर प्रश्नी बहुराष्ट्रीय चर्चा व्हावी. सिमला करारानुसार काश्मीरचा प्रश्न फक्त भारत व पाकिस्थान यांनीच आपापसात चर्चा करून सोडवावा, असे ठरले असून सर्व बड्या राष्ट्रांना ही भूमिका मान्य आहे. पण बहुपक्षीय चर्चेचे पिल्लू सोडून रेसिप एर्दोगान यांनी पाकिस्थानला अनुकूल भूमिका भारतात प्रवेश करण्यापूर्वीच जाहीर केली आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाकिस्थानचे पंतप्रधान नबाब शरीफ यांच्याशी असलेली आपली दोस्ती रेसिप एर्दोगान यांनी अशाप्रकारे निभावली आहे.
पाक्यांनी जवानांचे शिर का कापून नेले? - नेमकी हीच वेळ साधून पाकिस्थानच्या सैनिकांनी दोन भारतीय जवानांची शिरे कापून नेली आहेत, हा योगायोग तर नक्कीच नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तसेच  पाकिस्थानचे नवीन लष्कर प्रमुख जनरल बाज्वा यांनी याच काळात सीमेवरील बंदोबस्ताची पाहणी केली व आपण सर्वप्रकारे सिद्ध आहोत, अशी दर्पोक्ती केली, तीही उगीच नाही, हेही विसरून चालणार नाही. पाकिस्थानचे चिथावणीखोर कृत्य व लष्करप्रमुखांची दर्पोक्ती या  पृष्ठभूमीवर  रेसिप एर्दोगान व नरेंद्र मोदी यांची भेट व चर्चा झाली आहे. चर्चेतले सगळे मुद्दे बाहेर आलेले नाहीत, तसे ते कधीच बाहेर येतही नसतात. पण बाहेर आलेले मुद्दे कोणते आहेत? रेसिप एर्दोगान यांनी काश्मीरचा प्रशन सामोपचाराने सुटावा, अशी कळकळ (?) व्यक्त केली. पर्यटनाबाबत उभय देशातील सहकार्य वाढण्यास भरपूर वाव आहे, असेही जाहीर झाले आहे.
चर्चेत बिब्बा घालण्याची लष्कराची जुनीच सवय - लवकरच शांघायला एक परस्पर सहकार परिषद आयोजित असून या परिषदेला नरेंद्र मोदी व नबाब शरीफ हे दोघेही एवीतेवी उपस्थित राहणारच आहेत. या संधीचा लाभ घेऊन या दोघांची भेट घडून यावी व चर्चाही व्हावी यासाठी या दोघांशीही मित्रत्वाचे संबंध असलेले पोलाद क्षेत्रातील उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी गेल्या आठवड्यात इस्लामाबादेत शरीफ यांची भेट घेतली होती. ही भेट नक्की कोणत्या हेतूने झाली, हे बहुदा कधीच बाहेर येणार नाही पण ती हवापाण्याची चर्चा करण्यासाठी झाली नसणार, हे नक्की. शिरे कापून नेण्याचे पाकिस्थानचे चिथावणीखोर कृत्य पाकिस्थानचे नवीन लष्करप्रमुख जनरल बाज्वा यांच्या संमतीशिवाय झाले नसणार, हेही स्पष्टच आहे. आता एकतर नरेंद्र मोदी व नबाब शरीफ यांची शांघाय भेटीदरम्यान एकतर चर्चा होणारच नाही व झालीच तर भेटीचे वेळी योग्य वातावरण असणार नाही, याची तजवीज पाकिस्थानी लष्करशहा जनरल बाज्वा यांनी उत्तमपणे करून ठेवलेली दिसते. पाकिस्थानचे लष्करप्रमुख दरवेळी असे काहीतरी करून वाटाघाटीत बिब्बा घालीत असतात. पाकिस्थानच्या राजकीय नेत्यांशी चर्चा करण्यात अर्थ नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. चर्चेच्या चाव्या लष्कराच्या हाती असतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
संयुक्त घोषणापत्र -  नरेंद्र मोदी व रेसिप एर्दोगान यांच्या भेटीनंतर संयुक्त घोषणा पत्र जाहीर झाले आहे. त्यात दोन/तीन प्रमुख मुद्दे आहेत. दहशतवादाच्या मुद्यावर तुर्कस्थाने भारताला पाठिंबा दिला आहे. पण त्यात काश्मीरातील दहशतवादी कृत्यांचा मात्र उल्लेख नाही. तसेच उभय देशातील व्यापार ६५० कोटीवरून १ हजार कोटीवर नेण्याचा संकल्पही दोन्ही देशांनी सोडला आहे. आज तरी एवढेच फलित या भेटीचे दिसते आहे. रेसिप एर्दोगान यांचे सोबत तुर्कस्थानमधील उद्योजकही होते. यावरून राजकीय मतभेद कायम असतांनाही उभय देशात व्यापार वाढावा ही तुर्कस्थानची इच्छा व गरज आहे, हे मात्र दिसते आहे. तसेच पर्यटनही उभयपक्षी फायदेशीर मुद्दा असू शकतो. ही लहानशी असली तरी जमेची बाजू आहे. चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवायलाच हवे. कारण हुकुमशहा जसे धुमकेतूसारखे अचानक उगवतात, तसेच ते अचानक लुप्त सुद्धा होत असतात.
रेसिप एर्दोगान यांची आजची खरी ओळख कोणती? - रेसिप एर्दोगान यांनी गेल्याच महिन्यात तुर्कस्थानमध्ये थातूरमातूर सार्वमत घेऊन सर्व अधिकार आपल्याकडे घेतले. वर्षभरापूर्वी तुर्कस्थानमध्ये उठाव झाला होता. यात लष्कर, पोलिस, शासकीय अधिकारी व न्यायधीश हे सर्व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील झाले होते. प्रसार माध्यमेही विरोधातच होती. हा उठाव फसला. रेसिप एर्दोगान यांनी नंतर अनेक विरोधकांना ठार मारले व सहस्रावधींना तुरुंगात डांबले. आता तुर्कस्थानमध्ये हुकुमशाही राजवट आहे. पण हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत आपल्याला फारसे बोलता येणार नाही, हे मान्यच केले पाहिजे. तसेच या कारणास्तव रेसिप एर्दोगान यांच्याशी चर्चाच करू नये, अशी भूमिकाही आपल्याला घेता येणार नाही, हेही आपण समजून घेतले पाहिजे. निमंत्रण दिलेच कशाला, ही टीका म्हणूनच योग्य नाही.
आपल्यातल्या काहींची खरी ओळख कोणती? - पण भारतातल्या जामिया मिलीया या स्वायत्त विद्यापीठाने रेसिप एर्दोगान यांना मानद डाॅक्टरेट प्रदान करण्याची काय आवश्यकता होती? विद्यापीठांना स्वायत्तता असली पाहिजे, हे मान्य. पण हा स्वायत्ततेचा दुरुपयोग नाही काय?  हा रेसिप एर्दोगान एक हुकुमशहा, क्रूरकर्मा, पॅन इस्लामवादी म्हणजे जगाला इस्लामच्या दावणीला बांधण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा, सनातनी वृत्तीचा, निर्वासितांचे लोंढे युरोपमध्ये घुसविणारा, निर्दय धटिंगण आहे. पाकिस्थानची साथ देण्याची एकही संधी सोडत नाही. त्याच्या कशाकशाचा गौरव करायचा होता जामिया मिलियाला? राजकीय शिष्टाचाराचे पालन करणे, हे देशाला पालन करणे भाग आहे.  स्वायत्ततेसोबत विवेकही असायला हवा असतो, हे विसरून चालणार नाही. आपल्याला हे कळत नाही, असे नाही पण वळत नाही, हेही तेवढेच खरे आहे.

Friday, May 5, 2017

अमेरिकेतील निकालाची फ्रान्समध्ये पुनरावृत्ती ?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांचा फ्रान्सवर विशेष रोष आहे. कारण फ्रान्स हे खरोखर धर्मातीत (सेक्युलर) राष्ट्र आहे. आपल्यासारखे भंपक नाही. धर्मातीततेची वीण जपण्यासाठी हे राष्ट्र वेळप्रसंगी कठोरातील कठोर भूमिका घेतांना मागेपुढे पहात नाही. आपल्या येथे धर्मातीततेच्या नावाखाली हिंदुत्ववाद्यांचीच अवहेलना करण्यात हे निधर्मवादी कृतकर्तव्यता मानीत असतात. चार्ली हेब्दो हे विडंबनपर लिखाणाला वाहिलेले नियतकालिक येशू ख्रिस्त व प्रेषित महंमद पैगंबर या दोघांचीही टिंगल उडवीत असे. येशू ख्रिस्ताची टिंगळटवाळी जगभर खपली. पण प्रेषितांच्या चेष्टेबाबत इस्लामी जगतांने वेगळाच पवित्रा स्वीकारला. चार्ली हेब्दोला इस्लामी अतिरेक्यांच्या रोषाला पात्र व्हावे लागले. असे म्हणतात की, इसीसच्या आत्मघातकी पथकात निदान एक हजार तरी फ्रेंच मुस्लिम आहेत. पण फ्रान्स या कशाचीही पर्वा न करता आवश्यक ते कठोर निर्णय घेतो. मुलींच्या वस्त्रप्रावरणाबाबतचा निर्णय याच जातकुळीचा होता/आहे. सीरियातही इसीसचा पाडाव करण्यासाठीच्या प्रयत्नात फ्रान्स आघाडीवर आहे. त्यामुळे इसीसचीही फ्रान्सवर विशेष मेहेरनजर (?) आहे. हमरस्त्यातील रहदारीत ट्रक घालून शेकडो निर्दोष नागरिकांना चिरडणारा ट्रक एक अतिरेकी चालवीत होता, हे फ्रान्समधील वृत्तजगताने ठामेठोकपणे मांडले. आपल्या येथील एका बड्या वृत्तपत्रात मात्र मथळा होता, ‘ट्रकने नागरिकांना चिरडले’. जणू चिरडण्याचे कर्तेपण ट्रकचेच होते. तो चालविणारा कोण हे विचारात घेण्याचे कारणच काय?
 हल्ल्याचे वेळापत्रक - फ्रान्समधील पॅरिस येथील दुतर्फा वृक्ष असलेल्या एका प्रसिद्ध रुंद हमरस्त्यावर एका अतिरेक्याने स्वत: मारला जाण्याअगोदर हल्ला करून एका पोलिस अधिकाऱ्याला यमसदनी पाठविले तर त्याच्या दोन सहकाऱ्यांना जबर जायबंदी केले, ही बाब केवळ संख्यात्मक दृष्टीने एक छोटीशी घटना ठरू शकली असती. पण तसे झाले नाही. का?
टायमिंग - फ्रान्समधील अध्यक्षपदाच्या निवडणुकी अगोदर जेमतेम तीन दिवस आधी ही घटना घडली आहे. इसीसने या हल्याची जबाबदारी स्वीकारून आपण किती सक्रीय आहोत, हे केवळ फ्रान्सलाच नव्हे तर अवघ्या जगाला आपल्या अमाक या वृत्तसंस्थेकरवी जाणवून दिले आहे. घटना घडताच लोक भेदरून सैरावैरा धावत मुख्य रस्त्याला मिळणाऱ्या छोट्याछोट्या रस्यांवर गेले व त्यामुळे आसपासच्या संपूर्ण परिसरातील जनजीवन प्रभावित झाले. अशाप्रकारे फक्त एकच मोहरा गमावून इसीसने संपूर्ण परिसर प्रभावित केला होता.
इसीसची नवीन रणनीती? - हा नवीन रणनीतीचा भाग आहे की, हे इसीसच्या मनुष्यबळाला लागलेल्या ओहोटीचे निदर्शक आहे, यावर आता जगभर चर्चा होत आहे. सगळी मेट्रो स्टेशन्स तात्काळ बंद करण्यात आली आणि सर्व परदेशी प्रवाशांची रवानगी त्यांच्या त्यांच्या हाॅटेलमध्ये करण्यात आली. मूळचा बेल्जियमचा नागरिक असलेल्या या अतिरेक्याने अबू युसूफ अल बल्जिकी हे टोपणनाव धारण केले होते.  पण त्याचे खरे नाव  करीम चेउर्फी असे होते. अतिरेकी कारवाया व लूटमारविषयक अनेक गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावे होती व त्याने दीर्घ मुदतीचा कारावासही भोगलेला होता. इसीसचा दावा फ्रान्सने लगेच मान्य केला नाही. पण पोलिसांना अतिरेक्याने मुद्दामच लक्ष्य केले असावे प्रतिक्रिया मात्र दिली आहे व या दृष्टीने पुढील तपास सुरू केला आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या राजकारणावर परिणाम - अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीला दोन/तीनच दिवस उरले असतांना हा हल्ला व्हावा, याला फ्रान्स महत्त्व देत आहे. फ्रॅंको होलॅंड या विद्यमान अध्यक्षाला पराभूत करण्यासाठी अनेक इच्छुक सध्या अहमहमिकेने  रिंगणात उतरले आहेत.
द गाॅल निर्मित फ्रान्स व आजचा फ्रान्स - आजच्या फ्रान्सच्या निर्मितीचे श्रेय चार्ल्स द गाॅलला जाते. दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सवर झालेला आघात फार मोठा व वेगळा होता. नाझी फौजांना फ्रान्स पादाक्रांत केला होता व अत्याचार, बलात्कार आणि छळ यांना ऊत आला होता. देशभक्त फ्रेंच नागरिक भूमीगत होऊन आक्रमक जर्मन फौजांना शक्यत्या सर्व प्रकारे विरोध करीत होते. मनाचे  काही दुबळे फितुरहीझाले होते. ब्रिटिश, फ्रेंच व अमेरिकन फौजांचे संयुक्त दल अमेरिकेच्या जनरल आयसेनहाॅवर यांच्या नेतृत्त्वाखाली नाॅर्मंडीच्या समुद्र किनाऱ्यावर उतरल्यानंतर जर्मन फौजांना मागे रेटू लागल्या होत्या. या संयुक्त फौजात फ्रेंचांचे उरलेसुरले दलही सामील होते. पण त्याला फारसा मान मिळत नव्हता. मोहिमेची सगळी सूत्रे जनरल आयसेनहाॅवर हलवीत होती. त्यांचे नेतृत्त्व मुकाटपणे स्वीकारण्यावाचून फ्रेंच सेनापती जनरल चार्ल्स द गाॅल यांच्यासमोर पर्याय नव्हता. तेही जनरल असले तरी एका पराभूत फौजेचे सेनापती होते. अमेरिकन जनरल आयसेन हाॅवर हे जणू मुक्तिदात्याच्या भूमिकेत होते. त्यांचाच वरचष्मा प्रत्यक्षात राहणार यात काय आश्चर्य?
  चार्ल्स द गाॅल स्वभीमानी वृत्तीचे व रूक्ष प्रकृतीचे गृहस्थ होते. सामान्यत: फ्रेंच नागरिक, चैन वख्याली खुशालीत जीवन व्यतीत करणारा रंगेल गडी मानला जातो. पण द गाॅल गंभीर प्रकृतीचे एकलकोंडे असे अगदी वेगळे होते. युद्ध संपले. सामान्यरीतीने विचार करतात, त्याप्रमाणे सैन्य बराकीत गेले. मुलकी राजवट सुरू झाली. पण अस्थिरता, अराजक, भ्रष्टाचर यामुळे फ्रेंच जनता पुरती वैतागली. यातून जनरल द गाॅलने फ्रान्सला बाहेर काढले  व १९५८ साली पाचव्या फ्रेंच रिपब्लिकची स्थापना केली. नंतर २०१७ पर्यंत फ्रान्सला बऱ्याच प्रमाणात स्थिरता प्राप्त झाली. कारण यानंतर जे फ्रान्सच्या राजकारणात आघाडीवर येत गेले, त्या राज्यकर्त्यांमध्ये न होती द गाॅलची धीरोदात्त वृत्ती न कर्तव्यपरायणता.
आजची परिस्थिती - रविवारी २३ एप्रिलला फ्रान्समध्ये अध्यक्षीय  निवडणुकीची पहिली फेरी पार पडली. या अगोदर फ्रेंच अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी झालेल्या रिपब्लिकन पक्षांतर्गत स्पर्धेतून माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे व निकोलस सार्कोझी यांचे उजवे हात मानले जाणारे माजी पंतप्रधान फ्रान्स्वॉं फिलॉन हे सौम्य प्रकृतीचे नेते दुसऱ्या स्थानावर यावेत, हेही आश्चर्यच आहे. सार्कोझी हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. जहाल उजवी मते, भ्रष्टाचाराचे आरोप, भंपक वक्तव्ये अशा गोष्टींमुळे ते आजवर नेहमीच वादात राहिले आहेत. तरीही त्यांच्या रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांचेच पारडे जड होते. येत्या मे महिन्यात फ्रान्समध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.  निकोलस सार्कोझी यांच्याकडे भावी अध्यक्ष म्हणून पाहिले जात असे. पण ते पक्षांतर्गत निवडणुकीतच पराभूत झाले आहेत. व फ्रान्स्वॉं फिलॉन हे अध्यक्षपदाचे उमेदवार ठरले आहेत. इतर बड्या पक्षांना बाजूला सारून आपण एका अगदी लहान पक्षाचाच विचार करू. यामागे तसेच कारण आहे.
नॅशनल फ्रंट - हा राष्ट्रवादी, पुराणमतवादी, कायदा व सुरक्षेचा खंदा पुरस्कर्ता, स्थलांतराचा अतिकडवा विरोधक व अतिरेकीउजवा म्हणून ओळखला जाणाऱा व २०१२ च्या निवडणुकीत फक्त साडे तेरा टक्के मते व केवळ दोनच जागा मिळवणाऱा  पक्ष आहे. या पक्षातर्फे जहाल नेत्या मेरीन ले पेन यांची  उमेदवारी जाहीर होताच त्यांनी धडाकेबाज प्रचाराला प्रारंभ केला आहे. या ले पेन म्हणजे फ्रान्समधील लेडी डोनाल्ड ट्रम्पच आहेत, असे म्हणता येईल.  ‘फ्रान्समधील मशिदी बंद करा. दुही माजवणाऱ्यांना देशाबाहेर काढा. सीमा सील करा. कट्टरवाद्यांचे नागरिकत्त्व रद्द करा, युरोपियन युनियनमधून बाहेर पडा, नाटोसारखे आंतरराष्ट्रीय गट हवेतच कशाला?’, हे त्यांचे प्रचारातले मुद्दे बघितले म्हणजे आणखी काहीही सांगण्याची आवश्यकता नसावी. त्यांच्याशी दोन हात करण्याची क्षमता  निकोलस सार्कोझी यांच्यातच होती/आहे, असे मानले व म्हटले जाते. पण त्यांचा रिपब्लिकन पक्षांतर्गत निवडणुकीत पराभव होऊन तुलनेने सर्वच बाबतीत उणे असलेल्या फ्रान्स्वॉं फिलॉन हेच आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. पण त्यांचा मेरीन ले पेन  यांच्यासमोर निभाव लागेल, अशी सुतराम शक्यता नाही. रिपब्लिकन पक्षाच्या निकोलस सार्कोझी यांनी मात्र समजुतदारपणे आपली हार मान्य केली आहे व फ्रान्स्वॉं फिलॉन यांना आपला पाठिंबा, सल्ला व सहकार्य देऊ केले आहे.
आजचे गणराज्य पाचवे - सध्या फ्रान्समध्ये पाचवे गणराज्य कार्यवाहीत आहे. फ्रान्सच्या पार्लमेंटची दोन सभागृहे असून सिनेट हे वरिष्ठ सभागृह आहे, तर नॅशनल असेम्ब्ली हे ५७७ सदस्यांचे (डेप्युटी) कनिष्ठ सभागृह आहे. हे डेप्युटी दुहेरी मतदान फेरीने (टू राऊंड व्होटिंग सिस्टीम) निवडले जातात.
२०१२ साली झालेल्या निवडणुकीत मिळालेले विविध पक्षांचे बलाबल पुढील प्रमाणे आहे. सोशॅलिस्ट -२९२, रिपब्लिकन - १९९, यूडीआय - ३०, ग्रीन - १७, सोशल लिबरल - १६, लेफ्ट - १५, अपक्ष- ८.
सोशॅलिस्ट पार्टी हा १९०५ साली स्थापन झालेला एक प्रमुख पक्ष असून त्याने २९२ जागा जिंकून सत्ता संपादन केली आहे. उद्योगांवर व अर्थकारणावर शासनाचे नियंत्रण असावे, लोकशाही व गणराज्य संकल्पनांचा समर्थक, राष्ट्रीयीकरण, लोककल्याणकारी राज्य, नियोजनबद्ध आर्थिक विकास, शासनाद्वारे निवास व्यवस्था, औद्योगीकरण, नागरी स्वातंत्र्य, स्थानिक स्वराज्य यांचा पाठीराखा असलेला, नागरी साधनसुविधा यांचा पुरस्कार करणारा, नाटो व युरोपियन युनीयनची सदस्यता यास अनुकूल असलेला व उत्तम पक्षबांधणी ही विशेषता असलेला हा पक्ष असून फ्रॅंको आॅलंड हे सध्याचे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत.
रिपब्लिकन पक्ष १९९ जागा जिंकून क्रमांक दोनचा पक्ष असलेला , १९२४ साली स्थापन झालेला, काहीसा उदारमतवादी तसेच व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असलेला , टोकाची भांडवलशाही व साम्यवाद या दोन्हीचा विरोध करणारा, ख्रिश्चन आदर्श व शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कर्ता असलेला, देशपातळी व प्रांतपातळी पर्यंत बऱ्यापैकी पक्षबांधणी करण्यात यशस्वी झालेला हा पक्ष आहे.
युडीआय  ३० जागा जिंकून युनायटेड डेमोक्रॅट वॲंड इनडिव्हिज्युअल्स  हा उजवीकडे झुकलेला हा एक वेगळाच पक्ष असून यातील घटक पक्ष आपापले पक्ष कायम ठेवून असलेली ही आघाडी आहे, असेही म्हणता येईल. उदारमतवादी, ख्रिश्चन धर्माचे अधिष्ठान मानणारा तसेच युरोपीयन संघराज्याचा समर्थक असलेला हा पक्ष आहे.
ग्रीन पार्टी १७ जागा जिंकून १९७४ साली स्थापन झालेला हा पक्ष २०१० मध्ये युरोप इकाॅलाॅजी पक्षात विलीन झाला. प्रागतिक,  पर्यावरणवादी व डावीकडे झुकलेला पक्ष आहे.
सोशल लिबरल १६ जागा जिंकणारा व्यक्तिस्वातंत्र्य व सामाजिक न्यायावर भर देणारा पक्ष आहे.
लेफ्ट पार्टी (डावा पक्ष) १५ जागा जिंकून लोकशाहीवादी व समाजवादी असे या पक्षाचे स्वरूप आहे.
  याशिवाय काही छोटे पक्षही आहेत. पण सध्या त्यांचा विचार न केला तरी चालण्यासारखे आहे.
२०१२ मध्ये फ्रॅंको आॅलंड यांचा विजय कसा झाला?- फ्रान्समध्ये अध्यक्षीय निवडणूक एप्रिल २०१२ मध्ये झाली. मतदानाच्या पहिल्या फेरीत सोशॅलिस्ट पक्षाचे फ्रॅंको आॅलंड व रिपब्लिकन पक्षाचे निकोलस सारकोझी हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर होते. यापैकी कुणालाही बहुमत नसल्यामुळे (५० टक्के किंवा निर्धारित मते) बाकीच्या उमेदवारांना बाद करून या दोघातच मतदानाची दुसरी फेरी पार पडली. त्यात ५१.६४ % मते मिळवून सोशॅलिस्ट पक्षाच्या फ्रॅंको आॅलंड यांनी रिपब्लिक पक्षाच्या निकोलस सारकोझी (मते ४८.३६ %) यांना मात दिली.
आजची परिस्थिती - लवकरच म्हणजे येत्या मे महिन्यात फ्रान्समध्ये अंतिम निवडणूक होऊ घातली आहे. फ्रेंच अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी झालेल्या रिपब्लिकन पक्षांतर्गत स्पर्धेतून माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे व निकोलस सार्कोझी यांचे उजवे हात मानले जाणारे माजी पंतप्रधान फ्रान्स्वॉं फिलॉन सौम्य प्रकृतीचे नेते दुसऱ्या स्थानावर यावेत, हेही आश्चर्यच आहे. सार्कोझी हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. जहाल उजवी मते, भ्रष्टाचाराचे आरोप, भंपक वक्तव्ये अशा गोष्टींमुळे ते नेहमीच वादात राहिलेले. तरीही त्यांच्या रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांचेच पारडे जड होते. येत्या मे महिन्यात फ्रान्समध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. निकोलस सार्कोझी यांच्याकडे भावी अध्यक्ष म्हणून पाहिले जात असे. पण ते पक्षांतर्गत निवडणुकीतच पराभूत झाले आहेत. इतर बड्या पक्षांना बाजूला सारून आपण एका अगदी लहान पक्षाचाच विचार करू. यामागे तसेच कारण आहे..
स्थलंतरितांमुळे धोका - स्थलांतरितांचा प्रश्न सध्या फ्रान्समध्ये ऐरणीवर आला आहे. सीरियामधून परगंदा होऊन युरोपभर पसणाऱ्यांमध्ये इसीसचे कडवे अतिरेकी छुपेपणे प्रवेश करीत असून संधी मिळताच उत्पात घडवून आणीत आहेत. यांच्या स्थलांतराला फ्रान्समध्ये विरोध असण्यामागचे आणखीही एक कारण आहे. ते कारण समजून घेण्यासाठी बरेच मागे जावे लागेल.
फ्रान्समधल लोकसंख्या -  एका पाहणीनुसार फ्रान्समध्ये ५६ टक्के लोक ख्रिश्चन, ३२ टक्के कोणताही धर्म न मानणारे/पाळणारे, ६ टक्के इस्लाम धर्म मानणारे, १ टक्के ज्युडाइझम मानणारे व अन्य ३ टक्के आहेत. थोडक्यात असे की, इस्लाम हा फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. तसेही युरोपातील सर्वात जास्त मुस्लीम फ्रान्समध्येच आहेत. यांची संख्याही वेगाने वाढते आहे. त्यातून हे सर्व मुख्यत: सुन्नी या कट्टर पंथाचे अनुयायी आहेत.
फ्रान्स एक धर्मातीत राष्ट्र- फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्स देशाचा असा कोणताही धर्म असणार नाही, असे ठरले आहे. म्हणजे फ्रान्स हे धर्मातीत (सेक्युलर) राष्ट्र आहे. प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार हव्यात्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य फ्रान्समध्ये आहे. तरीही इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांपासून फ्रेंच लोकांच्या एकतेला धोका निर्माण होत होताच. हा धोका आता सीरियातून येणाऱ्या निर्वासितांमधल छुप्या अतिरेक्यांमुळे खूपच वाढला आहे. फ्रान्समधील इस्लाम धर्म पाळणारे वर्णाने काळे, गोरे व सावळे असे तिन्ही वर्णाचे आहेत. या इस्लाम धर्मीयांच्या कडवपणामुळे वेळोवेळी ताणतणाव निर्माण होत असतात. काही इमाम व धर्मवेडे फ्रान्स  देशाचे कायदे, नियम व रीतिरिवाज यांना सतत विरोध करीत असतात/आले आहेत.
फ्रान्समधील मुस्लिम - फ्रान्समधील मुस्लिमांचे तीन प्रमुख गट पाडता येतील.
 १. बहुसंख्य मूक मुस्लिम (सायलेंट मेजाॅरिटी) - हे धर्मातीत भूमिका स्वीकारून वावरणारे असून त्यांचे प्रमाण मुस्लिमांमध्ये ४६ टक्के आहे. हे देशाचे कायदे पाळणारे आहेत.
२. अभिमानी मुस्लिम (प्राऊड मुस्लिम) - यांची संख्या २५ टक्के असून सुद्धा त्यांनी सुद्धा बुरखा व हिजाब वरील बंदी व धर्मातीत राज्याची अन्य वैशिष्ट्ये  स्वीकारली आहे.
३. कडवे मुस्लिम ( हार्ड लाइनर)-  यांचा संख्या २८ टक्के असून हे नकाब व बहुपत्नित्त्वाचे  पुर्सकर्ते आहेत. आश्चर्याची बाब ही आहे की, हे मुख्यत: वयाने तरूण व अकुशल कामगार असून ते सामान्यत: गावकुसाबाहेर राहणारे, सनातनी वृत्तीने आपली वेगळी व स्वतंत्र ओळख राखणारे व बंडखोर स्वभावाचे आहेत. देशाच्या कायद्यापेक्षा त्यांना शरीयतप्रणित कायदेकानून त्यांना अधिक महत्त्वाचे वाटतात. फ्रान्समध्ये ठळकपणे नजरेस पडणारी धार्मिक प्रतीके (सिम्बाॅल्स) जसे हिजाब (महिलांनी डोक्यावर रुमाल बांधणे) सार्वजनिक ठिकाणी - जसे शाळा- परिधान करण्यावर मनाई आहे. हे या इस्लाम धर्मीयांना मान्य नाही.
सर्व प्रमुख राष्ट्रात नो-गो-झोन्स - मुस्लिमांची संख्या फ्रान्सभर समप्रमाणात विखुरलेली नाही. समुद्र किनाऱ्यानजीकच्या स्थानी मुस्लिमांच्या दाट वस्त्या आहेत. जसे मार्सेलिस बंदर. एकट्या फ्रान्समध्येच नाहीत तर अमेरिका व ब्रिटन या सारख्या देशातही अशा वस्त्या आहेत. त्यांना नो- गो- झोन्स असे नाव आहे. या भागात शरीयत कायदा चालतो. मुस्लिमेतर लोकांना या भागात प्रवेश करण्यास मज्जाव असतो. पोलीसही या भागात प्रवेश करू शकत नाहीत. चेक पोस्टवर तपासणी करूनच आत प्रवेश दिला जातो. काही उपाययोजना करू म्हटले तर संघर्ष उफाळतो, काही करू नये तर काळ सोकावतो, अशा पेचात ही राष्ट्रे वावरत आहेत.
चार्ली हेब्दोला भयंकर शिक्षा - १५ जानेवारी २०१५ ला विडंबनपर लिखाण प्रसिद्ध करणाऱ्या चार्ली हेब्दो या नावाच्या नियतकालिकाच्या कार्यालयावर हल्ला करून अतिरेक्यांनी १२ कर्मचाऱ्यांना यमसदनी पाठविले होते. प्रेषित महंमदसाहेबांच्या अपमानाचा सूड घेण्याचे हेतूने हा हल्ला करण्यात आला होता. या निमित्ताने जी शोध मोहीम हाती घेतली होती, त्यात ही बाब (नो-गो-झोनचे अस्तित्त्व) प्रकर्षाने जाणवली. फ्रान्स, ब्रिटन, स्वीडन, जर्मनी  या देशात अशी नो-गो-झोन्स असून त्या भागात त्या त्या देशांचा अंमल चालत नाही. या भागात पोलीस जाऊ शकत नाहीत. हे भाग त्या त्या देशात असले तरी तसे स्वायत्तच असतात/आहेत.
जनमानसातील खदखद - हा सर्व तपशील विस्ताराने नमूद करण्याचे कारण असे की, या सर्व प्रश्नाचे बाबतीत फ्रान्समधील जनमत विलक्षण संतापले आहे. हाच धागा पुढे चालवत फ्रान्समधील नॅशनल फ्रंट हा राष्ट्रवादी, पुराणमतवादी, कायदा व सुरक्षेचा खंदा पुरस्कर्ता, स्थलांतराचा अतिकडवा विरोधक व अतिरेकीउजवा म्हणून ओळखला जाणाऱा व २०१२ च्या निवडणुकीत फक्त साडे तेरा टक्के मते व केवळ दोनच जागा मिळवणाऱा  पक्ष पुढे सरसावला आहे. या पक्षातर्फे जहाल नेत्या मेरीन ले पेन यांची  उमेदवारी जाहीर झाल्यातच जमा आहे. यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने फ्रान्समध्येही अमेरिकेप्रमाणे  ‘ट्रंपायन’ घडले तर आश्चर्य वाटायला नको.
चुरशीचे मतदान - फ्रान्समध्ये रविवारी दि २२ एप्रिलला अध्यक्षपदासाठी चुरशीने मतदान झाले. काही दशकांमधील ही सर्वांत अटीतटीची निवडणूक असल्याचे मानण्यात येत असून, या निकालाचा थेट परिणाम युरोपीय युनियनच्या भवितव्यावरही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कडव्या उजव्या विचारसरणीच्या मारिन ल पेन आणि मध्यममार्गी एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. पुद्दुचेरीमधील  फ्रेंच नागरिकांनीही रविवारी मतदानाचा हक्क बजावला. ७ मे रोजी रविवारीच होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये याच दोन उमेदवारांमध्ये लढत होईल, असे दिसते.
पहिल्या फेरीतील मतदान- पहिल्या फेरीत इमॅन्युएल मॅक्राॅन यांना सर्वात जास्त म्हणजे २४%  मते मिळाली आहेत.ते ३९ वर्षांचे सर्वात तरूण उमेदवार आहेत. हे मूळचे समाजवादी पण सध्या मध्यममार्गी, प्रगतीवादी, युनियनवादी म्हणून ओळखले जातात. फ्रान्सच्या सीमा सुरक्षित असाव्यात, असे मानणारे (युरोपियन युनीयनमध्ये सामील असल्यामुळे सदस्य देशांच्या सीमा पुष्कळशा सैल झाल्या आहेत), पण मुस्लिंमांवर अन्याय होतो आहे, या मताचे ते आहेत, उद्योगप्रधान धोरण, संरक्षणसिद्धता यावर त्यांचा भर आहे. सीरियातील फ्रान्सचा हस्तक्षेप ते योग्य मानतात., समतोल विचारवादीव आंतरराष्ट्रीयवादी म्हणून जग त्यांना ओळखते.
 ले पेन यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे  २१.३% मते मिळाली आहेत. त्या वयाने  ४८ वर्षांच्या आहेत. नॅशनल फ्रंट हा त्यांचा पक्ष असून त्या अतिउजव्या मताच्या, फ्रान्स फर्स्ट मानणाऱ्या , करारी व कडव्या म्हणून प्रसिद्ध आहेत. ,
फ्रॅंको फिलाॅन यांना  २०%मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर  व म्हणून अंतिम फेरीतून बाद झाले आहेत. अंतिम फेरीसाठी आपल्या समर्थकांनी  इमॅन्युएल मॅक्राॅन यांना  पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यानी केले आहे. या आवाहनाचा त्यांच्या मतदारावर किती परिणाम होईल, याबाबत शंका व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आर्थिक अफरातफरीचा आरोप होता,हे त्यांना मते कमी मिळण्याचे एक कारण असावे, असे मानतात.
चौथ्या क्रमांकावर जीन ल्युक मेलेंकाॅन १९.६% मते मिळवून व पाचव्या क्रमांकावर बेनाॅट हॅमाॅन ६.४ % मते मिळवून स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. इतरांना खूपच कमी मते आहेत. त्यामुळे त्यांचा विचार केला नाही तरी चालेल.
दुसरी फेरी -  ७ मे २०१७ ला फ्रान्समध्ये मतदानाची दुसरी फेरी पार पडणार आहे. आता रिंगणात पहिले दोन उमेदवारच असणार आहेत. बाकीचे कमी मते मिळविणारे असल्यामुळे रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत. ७ मेला नव्याने पुन्हा मतदान होणार आहे. पहिल्या फेरीत   इमॅन्युएल मॅक्राॅन यांची २४%  मते व ले पेन यांची  २१.३% मते आहेत. ती तशीच त्यांना दुसऱ्या फेरीतही मिळतील असे गृहीत धरले तर उरलेल्या जवळजवळ ५५ %मतदारांची मते या दोघापैकी कुणाला मिळतात, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहील.
आतापर्यंत निर्वासितांचे आश्रयासाठी होणारे स्थलांतर, बेकारी, करवाढ व जागतिकीकरणाचे फायदे तोटे हे विषय या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चिले जात होते. ते सगळे मागे पडले असून रविवारी फ्रेंच नागरिक इसीसप्रणित दहशतवाद हा एकच मुद्दा मनात धरून मतदान करणार आहेत, यात शंका नाही व याचा फायदा ले पेन यांनाच होणार, हेही स्पष्ट झाले आहे.
  इतिहासाचा दाखला - पण इतिहासाचा दाखला मात्र वेगळा आहे. २००२ मध्ये ले पेन यांचे तीर्थरूप अध्यक्षपदाची निवडणूक लढवीत होते. तेव्हा असाच सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण झाला होता. त्याचा परिणाम म्हणून तीर्थरूपांनी मतदानाच्या पहिल्या फेरीत बरीच मते मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला खरा पण ही दुसरी फेरी बऱ्याच दिवसांनी पार पडली. तोपर्यंत लोकक्षोभशांत झाला होता. यावेळी झालेल्या मतदानात ले पेन यांच्या  तीर्थरूपांचा साफ धुव्वा उडाला. तवा गरम असेल तोवरच पोळी शेकता येते, असे जे म्हणतात, ते काही खोटे नाही. पण हेही खरे आहे की फ्रेंच तरुणाईला ले पेन यांच्या आक्रमक प्रतिपादनाची भुरळ पडते आहे व ती शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. मग ७ मे २०१७ ला काय होणार? शहाण्याने भाकित करू नये, हेच खरे.

Wednesday, May 3, 2017


फ्रान्समधील निवडणूक मोहिमेला झाकोळून टाकणारा  अतिरेकी हल्ला
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
 फ्रान्समधील पॅरिस येथील दुतर्फा वृक्ष असलेल्या एका प्रसिद्ध रुंद हमरस्त्यावर एका अतिरेक्याने स्वत: मारला जाण्याअगोदर हल्ला करून एका पोलिस अधिकाऱ्याला यमसदनी पाठविले तर त्याच्या दोन सहकाऱ्यांना जबर जायबंदी केले, ही बाब केवळ संख्यात्मक दृष्टीने एक छोटीशी घटना ठरू शकली असती. पण तसे झाले नाही. का?
टायमिंग - फ्रान्समधील अध्यक्षपदाच्या निवडणुकी अगोदर जेमतेम तीन दिवस आधी ही घटना घडली आहे. इसीसने या हल्याची जबाबदारी स्वीकारून आपण किती सक्रीय आहोत, हे केवळ फ्रान्सलाच नव्हे तर अवघ्या जगाला आपल्या अमाक या वृत्तसंस्थेकरवी जाणवून दिले आहे. घटना घडताच लोक भेदरून सैरावैरा धावत मुख्य रस्त्याला मिळणाऱ्या छोट्याछोट्या रस्यांवर गेले व त्यामुळे आसपासच्या संपूर्ण परिसरातील जनजीवन प्रभावित झाले. अशाप्रकारे फक्त एकच मोहरा गमावून इसीसने संपूर्ण परिसर प्रभावित केला होता.
इसीसची नवीन रणनीती? - हा नवीन रणनीतीचा भाग आहे की, हे इसीसच्या मनुष्यबळाला लागलेल्या ओहोटीचे निदर्शक आहे, यावर आता जगभर चर्चा होत आहे. सगळी मेट्रो स्टेशन्स तात्काळ बंद करण्यात आली आणि सर्व परदेशी प्रवाशांची रवानगी त्यांच्या त्यांच्या हाॅटेलमध्ये करण्यात आली. मूळचा बेल्जियमचा नागरिक असलेल्या या अतिरेक्याने अबू युसूफ अल बल्जिकी हे टोपणनाव धारण केले होते.  पण त्याचे खरे नाव  करीम चेउर्फी असे होते. अतिरेकी कारवाया व लूटमारविषयक अनेक गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावे होती व त्याने दीर्घ मुदतीचा कारावासही भोगलेला होता. इसीसचा दावा फ्रान्सने लगेच मान्य केला नाही. पण पोलिसांना अतिरेक्याने मुद्दामच लक्ष्य केले असावे प्रतिक्रिया मात्र दिली आहे व या दृष्टीने पुढील तपास सुरू केला आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या राजकारणावर परिणाम - अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीला दोन/तीनच दिवस उरले असतांना हा हल्ला व्हावा, याला फ्रान्स महत्व देत आहे. फ्रॅंको होलॅंड या विद्यमान अध्यक्षाला पराभूत करण्यासाठी अनेक इच्छुक सध्या अहमहमिकेने  रिंगणात उतरले आहेत.
 फ्रॅंको फिलाॅन -  फ्रॅंको फिलाॅन या अध्यक्षपदाच्या उमेदवाराने निवडणूक मोहीम ताबतोब थांबवावी अशी मागणी केली असून ही वेळ आपापसात लढण्याची नाही तर एकत्रितपणे अतिरेक्यांचा सामना करण्याची आहे, अशी हाक दिली आहे. आपले संरक्षक असलेले पोलिस व फ्रेंच जनता यांचे मनोबल वाढविण्याची ही वेळ आहे, असे ते पुढे म्हणाले आहेत. जगभर इस्लामी एकाधिकारशाही स्थापन करण्याचा मनसुबा हाणून पाडणे, ही आजची प्रमुख आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.  आपली सौम्य भूमिका सोडून तेही ले पेनसारखी कडवी भाषा बोलू लागले आहेत. ते तसे युरोपियन युनियन विरोधी व रशियाकडे झुकलेले मानले जातात.
मेरी ले पेन -   ले पेन या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या दावेदार एक महिला असून त्या उजवा नॅशनल फ्रंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका अतिकडव्या पक्षाच्या अध्वर्यू आहेत. इस्लामी दहशतवादाच्या विरोधातली लढाई अधिक तीव्र करण्याचे आवाहन करण्यासाठी या हल्याचे निमित्त त्यांनी  साधले आहे.
इमॅन्युएल मॅक्राॅन - इमॅन्युएल मॅक्राॅन हे अध्यक्षपदासाठीचे अपक्ष उमेदवार असले तरी फ्रान्समध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांनी मात्र वेगळाच सूर लावला आहे. नित्याचे व्यवहार चालूच ठेवले पाहिजेत, नाहीतर देशभर भयाचे वातावरण निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दहशतीला शरण जाऊ नका. तोच तर अतिरेक्यांचा डाव आहे, म्हणून तो हाणून पाडला पाहिजे व आपले नित्याचे व्यवहार सुरूच ठेवले पाहिजेत, असे त्यांचे आग्रही प्रतिपादन आहे.
जीन मॅलेंकाॅन  अतिडावे मानले जातात. त्यांनीही हल्याचा निषेध केला आहे. पण अतिरेक्यांचे मनसुबे फोल ठरविण्यासाठी आपण शांतपणे व थंड डोक्याने परिस्थिती  हाताळली पाहिजे, असे त्यांचे मत आहे.
  ते काहीही असले तरी प्रत्येक उमेदवाराचे भाषण या हल्याचा उल्लेख न करता पूर्ण होत नाही, ही बाब बरेच काही सांगून जाते. इसीसला जे हवे होते, ते नेमके घडून आले आहे.
जनमत चाचणीचा कौल -  नुकत्याच आटोपलेल्या जनमत चाचणीनुसार इमॅन्युएल मॅक्राॅन यांनी  ले पेन यांच्यावर, निसटती का होईना, पण आघाडी मिळवलेली दिसते आहे. फ्रॅंको फिलाॅन व ले पेन  या दोघांनीही आपले शक्तिप्रदर्शनाचे कार्यक्रम (इव्हेंट) रद्द केले आहेत. रविवारी मतदान होणार असून शुक्रवार या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हे कार्यक्रम आयोजित होते. हल्ला गुरुवारी झाला होता.
अतिरेक्याची ओळख लागलीच पटू नये, हे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण  हताहत झालेल्या व जखमी झालेल्या पोलिसांची नावेही तात्काळ सांगता येऊ नयेत, ही बाब हल्यामुळे निर्माण होणारा गोंधळ किती मोठा होता, हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.
 गोंधळ निर्माण करण्याची क्लृप्ती - अतिरेक्याच्या हाती कॅलॅशिन्की ॲसाॅल्ट रायफल  होती व पोलिस एका दुकानासमोर उभे होते, एवढेच सध्यातरी समोर आले आहे. जवळच फ्रॅंकलीन रुझवेल्ट नावाचे मेट्रो स्टेशन होते. हा सगळा परिसर गजबजलेला होता. हल्याची बातमी अगोदर अमाक या अतिरेक्याच्या संबंधातल्या वृत्तवाहिनीने प्रथम दिली, हे वेळापत्रकही बरेच काही सांगून जाते. या वृत्तसंस्थेला या नियोजित हल्याची माहिती अगोदरपासूनच होती, असे दिसते.  निर्माण झालेली भगदड कमी होती म्हणूनच की काय पोलिसांनी मागची पुढची दोन मेट्रो स्टेशनेही बंद केली व लोकांना तो परिसर मोकळा करण्यास सांगितले. हा खबरदारीचा उपाय म्हणायचा की गोंधळलेली प्रतिक्रिया म्हणायची?
दुर्लक्ष की बावळटपणा - मारला गेलेला अतिरेकी फ्रेंच गुप्तहेर विभागाच्यारडारवर होता (माहितीतला होता) व त्याचे इतर  कडव्या अतिरेकी गटाशी संबंध होते, त्याला अट्टल गुन्हेगारीची पार्श्वभूमीही होती ही हकीकत नंतर उघडकीला आली आहे. एवढे सर्व जर माहीत होते तर तो बाहेर राहिलाच कसा? लोकशाहीप्रधान देशातले व्यक्तीच्या संचारस्वातंत्र्यविषयीचे कायदे अतिरेक्यांना मुक्तमुभा देणारे असतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. अतिरेकी हा एकांडा शिलेदार होता की त्याचे इतर साथीदार सोबत होते, याचा तपास आता सुरू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या कथनानुसार अतिरेकी एका कार मधून उतरला व त्याने सरळ पोलिसांकडे वळून  गोळ्या झाडण्यास सुरवात केली होती. असे असेल तर तो एकटा नव्हता. कारमध्ये आणखीही अतिरेकी असण्याची शक्यता आहे/होती.
डोनाल्ड ट्रंप यांनी नोंदवला निषेध - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हल्याचा निषेध केला असून असे हल्ले होतच राहणार, त्यांना अंत दिसत नाही. संरक्षणसिद्धता अधिक चोख करण्याशिवाय आपल्या हाती दुसरा मार्ग नाही, असे ट्विट केले आहे. या हल्याचा परिणाम अति उजव्या धोरणांचा पाठपुरावा करणाऱ्या ले पेन यांना येऊ घातलेल्या निवडणुकीत यांना भरघोस मते मिळण्यात होईल, असे भाकितही डोनाल्ड ट्रंप यांनी केले आहे. ले पेन यांच्यावर ट्रंपीझमचा  परिणाम आहे, असे मानले जाते. म्हणजे स्थलांतरितांच्या प्रवेशाला प्रतिबंध, आंतरराष्ट्रीय करारांना विरोध व रशियाबाबत सौम्य भूमिका, अशी त्यांची भूमिका ट्रंप यांच्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे, असे मानले जाते. केवळ पाश्चात्य देशातच नव्हे तर अमेरिका व ब्रिटनमध्येही समाजमनावर राष्ट्रवादाची पकड पक्की होताना दिसते आहे. ले पेन वगळल्यास इतर नेते भयगंड पसरवू नका, असे आवाहन करीत आहेत. सीमांवर कडक निगराणी ठेवा व ज्यांच्याविषयी गुप्तहेर खात्याचे प्रतिकूल अहवाल आहेत, त्यांना देशाबाहेर हकला, असा आग्रह  ले पेन यांनी धरला आहे. फ्रान्स व फ्रेंच गणराज्य सुरक्षित कसे राहील, यावरच आपला भर असेल, असे त्या म्हणाल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अशा दहा हजार संशयित अतिरेक्यांची नोंद सरकार दप्तरी असून ते सुटून आल्यानंतर राजरोसपणे वावरत आहेत/असावेत, याला भोंगळपणा म्हणू नये तर काय म्हणावे, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. आतापर्यंत निर्वासितांचे आश्रयासाठी होणारे स्थलांतर, बेकारी, करवाढ व जागतिकीकरणाचे फायदे/तोटे हे विषय या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चिले जात होते. ते सगळे मागे पडले असून रविवारी फ्रेंच नागरिक इसीसप्रणित दहशतवाद हा एकच मुद्दा मनात धरून मतदान करणार आहेत, यात शंका नाही व याचा फायदा ले पेन यांना होणार, हेही स्पष्ट झाले आहे.
  इतिहासाचा दाखला - पण इतिहासाचा दाखला मात्र वेगळा आहे. २००२ मध्ये ले पेन यांचे तीर्थरूप अध्यक्षपदाची निवडणूक लढवीत होते. तेव्हा असाच सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण झाला होता. त्याचा परिणाम म्हणून तीर्थरूपांनी मतदानाच्या पहिल्या फेरीत बरीच मते मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला खरा पण ही दुसरी फेरी बऱ्याच दिवसांनी पार पडली. तोपर्यंत लोकक्षोभ शांत झाला होता. यावेळी झालेल्या मतदानात ले पेन यांच्या  तीर्थरूपांचा साफ धुव्वा  उडाला. तवा गरम असेल तोवरच पोळी शेकता येते, असे जे म्हणतात, ते काही खोटे नाही. पण हेही खरे आहे की फ्रेंच तरुणाईला ले पेन यांच्या आक्रमक प्रतिपादनाची भुरळ पडते आहे व ती शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.
  विद्यामान फ्रेंच पंतप्रधान बर्नार्ड  कॅझेनेव्ह यांनी लोकशाही प्रक्रिया चालूच राहील व  निवडणुका ठरल्याप्रमाणेच वेळेवर पार पडतील आणि मतदारांना पुरेसे संरक्षण पुरविले जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यांनी फ्रॅंको फिलाॅन व ले पेन यांच्यावर ते हल्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करीत असल्याचा आरोप केला आहे. आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून विचार केला तर असे दिसते की, फ्रान्स आपली परंपरागत उदारमतवादी भूमिका हळूहळू कळत न कळत बदलत आहे. आजघडीला फ्रान्समध्ये जन्म न झालेल्या नागरिकांची टक्केवारी १२ टक्के इतकी आहे. २००० साली ती दहा टक्के होती. याचा अर्थ असा की, परदेशींना नागरिक म्हणून स्वीकारण्याची व सामावून घेण्याची गती मंदावते आहे. काही गोष्टी गाजावाजा न करता करायच्या असतात, हेच खरे.
जगभरातून निषेध - आजवर अतिरेकी हल्यात फ्रान्समधील मोजून २३० लोकांनी प्राण गमावले आहेत. ले पेन यांनी स्थलांतरितांना थारा न देण्याचा आपला मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे रेटला आहे. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी निवडणुकीला उभे असलेल्या अकरा उमेदवारांपैकी प्रत्येकी जण पंधरा मिनिटात आपली भूमिका अहमहमिकेने  मांडण्यात गुंतला होता, ही बाब योगायोगाची मानायची का ? सगळा देश त्यावेळी टीव्ही पहात असणार हे उघड आहे. हल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरण्यासाठी यापेक्षा अधिक चांगली वेळ कोणती असणार होती? अर्थात हा विचार अतिरेक्यांच्या मनात होता किंवा नाही, हे कळायला मार्ग नाही पण हल्ला करण्यासाठी याहून दुसरी चांगली वेळ मिळू शकली नसती, हे मात्र खरे.
अतिरेकी हल्यांचा कहर - फ्रान्समध्ये आजवर अनेक अतिरेकी हल्ले झाले आहेत. त्यांचा तपशील असा आहे. २००३ ते आजवर शूटिंग - २४  ; लेटर बाॅम्ब - १; स्टॅबिंग- १५; झटापट १; गर्दीत वाहन घुसवणे २; शिरच्छेद १; बाॅम्बफेक २ हे प्रकार अतिरेक्यांनी हाताळले आहेत. शूटिंगवर (गोळीबार) व स्टॅबिंगवर (शस्त्राने भोसकणे) अतिरेक्यांचा विशेष भर दिसतो. कमीतकमी मानवी शक्ती व जास्तीत जास्त दहशत पसरवण्यात हे मार्ग विशेष उपयोगी पडतात.
पहिल्या फेरीतील मतदान- पहिल्या फेरीत इमॅन्युएल मॅक्राॅन यांना सर्वात जास्त म्हणजे २४%  मते मिळाली आहेत.ते ३९ वर्षांचे सर्वात तरूण उमेदवार आहेत. हे मूळचे समाजवादी पण सध्या मध्यममार्गी, प्रगतीवादी, युनियनवादी म्हणून ओळखले जातात. फ्रान्सच्या सीमा सुरक्षित असाव्यात, असे मानणारे (युरोपियन युनीयनमध्ये सामील असल्यामुळे सदस्य देशांच्या सीमा पुष्कळशा सैल झाल्या आहेत), पण मुस्लिंमांवर अन्याय होतो आहे, या मताचे ते आहेत, उद्योगप्रधान धोरण, संरक्षणसिद्धता यावर त्यांचा भर आहे. सीरियातील फ्रान्सचा हस्तक्षेप ते योग्य मानतात, समतोल विचारवादी व आंतरराष्ट्रीयवादी म्हणून जग त्यांना ओळखते.
 ले पेन यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे  २१.३% मते मिळाली आहेत. त्या वयाने  ४८ वर्षांच्या आहेत. नॅशनल फ्रंट हा त्यांचा पक्ष असून त्या अतिउजव्या मताच्या, फ्रान्स फर्स्ट मानणाऱ्या , करारी व कडव्या म्हणून प्रसिद्ध आहेत.
फ्रॅंको फिलाॅन यांना  २०%मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर  व म्हणून अंतिम फेरीतून बाद झाले आहेत. अंतिम फेरीसाठी आपल्या समर्थकांनी  इमॅन्युएल मॅक्राॅन यांना  पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्यावर आर्थिक अफरातफरीचा आरोप होता, हे त्यांना मते कमी मिळण्याचे एक कारण असावे.
चौथ्या क्रमांकावर जीन ल्युक मेलेंकाॅन १९.६% मते मिळवून व पाचव्या क्रमांकावर बेनाॅट हॅमाॅन ६.४ % मते मिळवून स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. इतरांना खूपच कमी मते आहेत. त्यामुळे त्यांचा विचार केला नाही तरी चालेल.
दुसरी फेरी -  ७ मे २०१७ ला फ्रान्समध्ये मतदानाची दुसरी फेरी पार पडणार आहे. आता रिंगणात पहिले दोन उमेदवारच असणार आहेत. बाकीचे कमी मते मिळविणारे असल्यामुळे रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत. ७ मेला नव्याने पुन्हा मतदान होणार आहे. पहिल्या फेरीत   इमॅन्युएल मॅक्राॅन यांची २४%  मते व ले पेन यांची  २१.३% मते आहेत. ती तशीच त्यांना दुसऱ्या फेरीतही मिळतील असे गृहीत धरले तर उरलेल्या जवळजवळ ५५ %मतदारांची मते या दोघापैकी कुणाला मिळतात, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहील.
 इसीसला आवरण्यासाठी वेगळ्या रणनीतीची आवश्यकता - एकेकाळी उदारीकरणाच्या व जागतिकीकरणाच्या दिशेने जाणारे इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या सारखे  देश पक्के व फक्त स्वराष्ट्रप्रेमी होत आहेत व आपल्यापुरतेच पाहू लागले आहेत. मंदीमुळे फ्रेंच तरूण बेकार व बेजार आहेत. परकीयांना आपल्या नोकऱ्या हिरावता येता कामा नयेत, असेच त्यांनाही अमेरिकन तरुणांप्रमाणे वाटते आहे. पण अकुशलांना त्यांचा विरोध नाही. हलकीसलकी कामे करायलाही कुणीतरी हवेतच की.
    दुसरीकडे निर्वासितांचे लोंढे युरोपमध्ये घुसवायचे व लोकसंख्येचा असमतोल निर्माण करण्याचा इसीसचा प्रयत्न यशस्वी होतांना दिसतो आहे. तसेच अतिशय कमी मनुष्यबळ वापरून सर्व लोकात दहशत निर्माण करण्याचा इसीसचा डावही यशस्वी होतांना दिसतो आहे. फ्रान्समध्ये युरोपात सर्वात जास्त मुस्लिम असून ते मार्सेलिस सारख्या काही मोजक्या जागीच एकवटले आहेत. या भागात पोलिसांचा नव्हे तर त्यांचाच वट चालतो. लोकशाहीत मिळणारी स्वातंत्र्ये उपभोगायची व लोकशाहीच्याच मुळावर घाव घालायचा हे त्यांचे तंत्र आहे. याचा सामना कसा करायचा, ही लोकशाहीप्रधान राष्ट्रांसमोरची नवीन समस्या आहे. हिची सोडवणूक कशी करायची या चिंतेत अख्खी मानवता बेजार झालेली दिसते आहे, हे मात्र खरे. मानवतेला हवे आहेत सलोख्याचे संबंध, लोकशाही विचारसरणी, सहनशीलता, मुक्त व्यापार आणि या सगळ्यांच्या जोडीला मुक्त वृत्तप्रसार माध्यमे. तिला जसे धर्मांध अतिरेकी नको आहेत, तसेच उजवे किंवा डावे अतिरेकीही नको आहेत. पण या रांगड्यांचा सामना शांततेच्या मार्गाने, समजुतदारपणाने व स्थिरचित्ताने कसा करावा या चिंतेतच ती सध्या चूर आहे