पसंतीक्रमानुसार होणारी निवडणूक
वसंत गणेश काणे,
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
पसंतीक्रमानुसार होणारी निवडणूक
वसंत गणेश काणे
शिक्षक व पदवीधर मतदारसंघात निवडणूक होऊ घातली असून तिचे स्वरूप विधानसभा व लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीपेक्षा कसे वेगळे असते, ते समजून घेणे उपयोगाचे ठरणार आहे. हे वेगळेपण लक्षात येण्यासाठी (बहुदा) १९५२ साली झालेल्या एक उदाहरण उपयोगी ठरणार आहे. या निवडणुकीत एका मतदारसंघात बरेच उमेदवार उभे होते. त्यातला एक उमेदवार निवडून आला पण त्याची अनामत रकम मात्र जप्त झाली. असे कसे घडले? तो निवडून आला कारण अर्थातच त्याला सर्वात जास्त मते पडली होती आणि तरीही त्याची अनामत रकम जप्त झाली कारण ज्याज्या उमेदवारांना झालेल्या मतदानापैकी १/६ निवडणुकीतील पेक्षा कमी मते मिळतील त्यांची अनामत रकम जप्त होईल, असा नियम होता. याचा अर्थ असा होतो की त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या उमेदवाराला सर्वात जास्त मते मिळाली असली तरी एकूण मतदानाच्या १/६ पेक्षाही कमी मते मिळाली होती. मग निवडणूक आयोगाने नियमात दुरुस्ती करून ठरविले की अनामत रकम जप्त होण्याची अट विजयी उमेदवाराला लागू असणार नाही. निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदानापैकी पन्नास टक्यापेक्षा निदान एक मत तरी जास्त असाले पाहिजे ही अपेक्षा लोकशाही मूल्यांचा विचार करता रास्त मानली पाहिजे. पण ही अपेक्षा विधानसभा, लोकसभा, नगरपालिका यांच्या निवडणुकीत पूर्ण होत नाही. पक्षनिहाय व देशपातळीवर विचार केला तर काॅंग्रेस पक्षाने ५० पेक्षा जास्त वर्षे राज्य केले आहे.
१९८४ साली मतांची देशपातळीवरची टक्केवारी ४९.१० असतांना सुद्धा काॅंग्रेसला लोकसभेत जागा मात्र ५४३ पैकी ४०४ मिळाल्या. श्रीमती इंदिरा गांधींच्या खुनानंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेवर आरूढ झालेल्या राजीव गांधी यांच्या वाट्याला आलेले हे असे अपूर्व यश त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू किंवा त्यांची कर्तृत्त्वशाली कन्या व राजीव गांधी यांची आई इंदिरा गांधी यांच्याही वाट्याला कधीही आले नव्हते. पण मते जेमतेम ५० टक्के व जागा मात्र पन्नास टक्यापेक्षा कितीतरी जास्त (म्हणजे २७२ ऐवजी ४०४) असा हा प्रकार झाला होता. याउलट २०१४ साली मतांची देशपातळीवर टक्केवारी १९.३० असतांना काॅंग्रेसला लोकसभेत जागा मात्र ५४३ पैकी फक्त ४४ मिळाल्या. मते जवळजवळ १९.३० टक्के असून सुद्धा जागा मात्र टक्यापेक्षा कितीतरी कमी (म्हणजे १०९ ऐवजी ४४) असा हा प्रकार झाला होता. हा प्रकार लोकशाहीच्या मूलभूत संकल्पनेशी कितपत मिळता जुळता आहे?
यावर उपाय काय? राज्यघटनेत सुद्धा पसंतीक्रमानुसार निवडणुका व्हाव्यात, असे सुचविले आहे. पण त्यावेळी (१९५२ साली) भारतीय मतदार या दृष्टीने पुरेसे प्रगल्भ नाहीत, म्हणून ते प्रगल्भ होईपर्यंतच्या काळात सध्याची निवडणूक पद्धत चालू रहावी, असे नमूद केले आहे. मतदारांना पुरेसे प्रगल्भ न मानणे अनेकांना मान्य नाही. त्यांच्यामते लोकजीवनातील बहुतेक व्यवहार पसंतीक्रमानुसारच होत असतात. त्यामुळे सर्व निवडणुका पसंतीक्रमावरच आधारित असाव्यात असे त्यांते मत असते.
पसंतीक्रमानुसार निवडणूक
एकल संक्रामक मत (सिंगल ट्रांस्फरेबल व्होट) याचा अर्थ असा की, प्रत्येक मतदाराला एकच मत असते पण तो उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रम देऊ शकतो. दुसरा विशेष असा की, सर्व पसंतीक्रम नोंदविणाऱ्या मतदाराची मतपत्रिका निवडणूक शेवटाला जाईपर्यंत ( कोणत्या ना कोणत्या उमेदवाराला पन्नास टक्के + १ इतकी मते मिळेपर्यंत) मतगणनेत कायम राहते. मात्र यासाठी सर्व मतदारांनी सर्व पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. अशी सक्ती मात्र नसते. पहिला पसंतीक्रम मात्र दिलाच पाहिजे. कारण कोरी मतपत्रिका विचारात घेता येत नाही, कारण त्या मतदाराची पसंती कोणत्या उमेदवाराला आहे, ते कळायला मार्ग नसतो.
पसंती हा मनुष्य स्वभाव आहे. आपण बाजारात जातो, दहा दुकाने पालथी घालतो आणि सर्वात जास्त पसंतीची वस्तू विकत घेतो. इतर वस्तू अगदीच टाकावू असतात असे नसते. त्यांना आपला पहिला पसंतीक्रम नसतो इतकेच. हेच तत्त्व या पद्धतीत उपयोगात आणले आहे. *
मतपत्रिकेचे स्वरूप
मतपत्रिकेत सर्व उमेदवारांची नावे दिलेली असतात. त्यांच्या नावासमोर मतदाराला आपला पसंतीक्रम नोंदवायचा असतो. पसंतीक्रम नोंदविलेली एक मतपत्रिका उदाहरणादाखल घेऊ.
मतपत्रिकेचा नमुना
क्र
|
उमेदवाराचे नाव
|
पसंतीक्रम
|
१
|
अ
|
5
|
२
|
ब
|
2
|
३
|
क
|
3
|
४
|
ड
|
1
|
५
|
इ
|
4
|
या मतदाराने आपला पहिला पसंतीक्रम ‘ड’ ला; दुसरा पसंतीक्रम ‘ब’ ला; तिसरा पसंतीक्रम ‘क’ ला; चौथा पसंतीक्रम ‘इ’ ला व पाचवा पसंतीक्रम ‘अ’ ला देऊन आपले सर्व पसंतीक्रम नोंदविले आहेत. या मतदाराची पहिली पसंती ‘ड’ ला, दुसरी ‘ब’ ला, तिसरी ‘क’ ला, चौथी ‘इ’ला आणि पाचवी ‘अ’ ला आहे, असे लक्षात येईल.
मतगणना कशी होते?
समजा एका मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या १५०००( पंधरा हजार) आहे आणि त्यापैकी ११०० (अकरा हजार) मतदारांनी मतदान केले आहे. सुरवातीला अवैध मतपत्रिका वेगळ्या काढून त्या बाद केल्या जातात.
मत अवैध कसे ठरते?
१. मतपत्रिका कोरी असेल किंवा दोन उमेदवारांच्या नावासमोर पहिला पसंतीक्रम दिलेला असेल (१ हा अंक लिहिला असेल) तर
२. मतपत्रिकेवर पहिला पसंतीक्रम कोणालाच दिलेला नसेल तर
३. पसंतीक्रम अक्षरात नोंदवला असेल तर
४. नेमून दिलेल्या पेनने पसंतीक्रम नोंदवला नसेल तर
५. मतपत्रिकेवर बरोबरची किंवा चुकीची ( X) खूण केली असेल तर ( शिक्षक/ प्राध्यापकांकडून पेपर तपासण्याच्या सवयीनुसार ‘आदतसे लाचार’ या न्यायाने असा प्रकार अनेकदा घडतो.
६. पसंतीक्रमाभोवती चौकोन किंवा वर्तुळ काढले असेल तर
७. या शिवाय अशी कोणतीही खूण किंवा कृती की ज्यामुळे मतदाराची ओळख पटू शकेल
८. मधलाच पसंतीक्रम वगळला असेल तर - समजा, एखाद्या मतपत्रिकेवर पहिले दोन पसंतीक्रम दिलेले आहेत. तिसरा पसंतीक्रम कुणालाच दिलेला नाही व पुढे चौथा पाचवा असे पसंतीक्रम दिलेले आहेत. अशावेळी पहिले दोन पसंतीक्रम मोजतांना ही मतपत्रिका मतगणनेत राहील व नंतर मात्र बाद होईल. पसंतीक्रम जोपर्यंत क्रमवार दिलेले आहेत तोपर्यंतचा क्रम येईपर्यंत ते मत मतगणनेसाठी विचारात घेतले जाते पुढे मात्र बाद होते/अपात्र ठरते किंवा संपुष्टात येते.
समजा, ११००० मतांपैकी ५०० मते यापैकी दिलल्या कोणत्या नाही कोणत्या कारणाने अवैध ठरली व १०५०० मते वैध ठरली तर तशा अर्थाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतात.
कोटा म्हणजे काय? तो कसा ठरवतात?
जर मतदारसंघातून एकच उमेदवार निवडायचा असेल तर दोनने, दोन उमेदवार निवडायचे असतील तर तीनने १०५०० ला भागून येणाऱ्या संख्येत १ मिळवून येणाऱ्या संख्येला कोटा असे म्हणतात. शिक्षक व पदवीधर मतदारसंघात महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार संघातून एकच प्रतिनिधी निवडायचा असतो. त्यामुळे १०५०० ला दोनने भागून त्यात १ मिळविल्यास ( १०५००/२ =५२५०+१ =५२५१) कोटा ५२५१ ( पाच हजार दोनशे एक्कावन) येईल.
वैध मतांची मतगणना
मतमोजणीची पहिली फेरी - प्रत्येक मतपत्रिकेवर पहिला पसंतीक्रम कोणत्या उमेदवाराला आहे ते पाहून मतपत्रिकांची पहिल्या पसंतीक्रमानुसार विभागणी केली जाते. समजा, १०५०० मते उमेदवारांमध्ये पुढीलप्रमाणे विभागली गेली आहेत.
तक्ता क्र - १
सर्व उमेदवारांना पहिल्या पसंतीची मते दाखवणारा तक्ता
क्र
|
उमेदवाराचे नाव
|
पहिल्या पसंतीची मते
|
|
१
|
अ
|
3500
|
|
२
|
ब
|
4000
|
|
३
|
क
|
1100
|
|
४
|
ड
|
1500
|
|
५
|
इ
|
400
|
सर्वात कमी मते म्हणून बाद होणार
|
|
एकूण वैध मते
|
10500
|
|
|
अवैध मते
|
500
|
|
|
संपुष्ट
|
-----
|
|
|
मतदान
|
11000
|
|
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 5251 हा कोटा एकाही उमेदवाराने पूर्ण केला नाही. त्यामुळे पहिल्या फेरीत कोणताही उमेदवार निवडून आला नाही, म्हणून सर्वात कमी मते असलेल्या ‘इ’ या उमेदवाराला बाद (एलिमिनेट) करीत आहोत व याला(‘इ’ला) पहिला पसंतीक्रम देणाऱ्या 400 मतदारांनी दुसरा पसंतीक्रम कोणाला दिला आहे, हे पाहण्यासाठी या 400 मतांपैकी प्रत्येक मत तपासून त्या मतांची उरलेल्या चार उमेदवारात फेरवाटणी करण्यात येत असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतात.
मतमोजणीची दुसरी फेरी - ‘इ’ ला पहिला पसंतीक्रम देणाऱ्या 400 मतदारांनी आपला दुसरा पसंतीक्रम कोणाला दिलेला आहे, हे पाहण्यात आल्यानंतरची स्थिती पुढीलप्रमाणे आहे, असे समजू या.
तक्ता क्र - २
‘इ’ बाद झाल्यानंतर त्याच्या मतांची वाटप
क्र
|
उमेदवाराचे नाव
|
पहिल्या पसंतीची मते
|
E1-‘इ’ 400 च्या मतांचे वाटप
|
पहिल्या फेरी अखेरीनंतर उरलेल्या ४ उमेदवारांची मते
|
१
|
अ
|
3500
|
200
|
3700
|
२
|
ब
|
4000
|
50
|
4050
|
३
|
क
|
1100
|
100
|
1200
|
४
|
ड
|
1500
|
15
|
1515
|
५
|
इ
|
400 E1
|
‘इ’ 400 च्या मतांचे वाटप
|
बाद
|
|
एकूण वैध मते
|
10500
|
365
|
10465
|
|
अवैध मते
|
500
|
----
|
----
|
|
संपुष्ट
|
-----
|
35
|
35
|
|
मतदान
|
11000
|
|
10500
|
या तक्त्याचा अर्थ असा आहे. ‘इ’ ला ४०० मते देणाऱ्यांचा दुसरा पसंतीक्रम कसा आहे हे वरील तक्त्यावरून कळते ते असे.
१. ३५ मतदारांनी सिंगल व्होटिंग केले व पहिलाच पसंतीक्रम नोंदवला. या मतदारांनी आपला दुसरा पसंतीक्रम नोंदवलाच नाही. त्यामुळे ती संपुष्टात आली/ बाद झाली.
२. १५(पंधरा) मतदारांनी आपला दुसरा पसंतीक्रम ‘ड’ साठी नोंदविला आहे, त्यामुळे ती मते ‘ड’ कडे संक्रमित झाली/ ‘ड’ ला देण्यात आली. त्यामुळे आता ‘ड’ ची एकूण मते १५००+१५= १५१५ ( पंधराशे पंधरा) झाली.
३. १००(शंभर) मतदारांनी आपला दुसरा पसंतीक्रम ‘ड’ नोंदविला आहे, त्यामुळे ती मते ‘ड’ कडे संक्रमित झाली/ ‘क’ ला देण्यात आली. त्यामुळे आता ‘क’ ची एकूण मते ११००+१००=१२०० (बाराशे ) झाली.
४. ५०(पन्नास) मतदारांनी आपला दुसरा पसंतीक्रम ‘ब’ साठी नोंदविला आहे, त्यामुळे ती मते ‘ब’ कडे संक्रमित झाली/ ‘ब’ ला देण्यात आली. त्यामुळे आता ‘ब’ ची एकूण मते ४०००+५० =४०५० (चार हजार पन्नास ) झाली.
४. २०० (दोनशे ) मतदारांनी आपला दुसरा पसंतीक्रम ‘अ’ साठी नोंदविला आहे, त्यामुळे ती मते ‘अ’ कडे संक्रमित झाली/ ‘अ’ ला देण्यात आली. त्यामुळे आता ‘अ’ ची एकूण मते ३५००+२००= ३७००(सदतीसशे) झाली.
मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीतही 5251 हा कोटा एकाही उमेदवाराने पूर्ण केला नाही. त्यामुळे दुसऱ्या फेरीनंतरही कोणताही उमेदवार निवडून आला नाही, म्हणून सर्वात कमी मते असलेल्या ‘क’ या उमेदवाराला बाद (एलिमिनेट) करीत आहोत व याला(‘क’ला) पहिला पसंतीक्रम देणाऱ्या 1100 मतदारांनी दुसरा पसंतीक्रम कोणाला दिला आहे, हे पाहण्यासाठी या 1100 मतांपैकी प्रत्येक मत तपासून त्या मतांची उरलेल्या चार उमेदवारात फेरवाटणी करण्यात येत असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतात. तसेच ‘क’ ला दुसरा पसंताक्रम देणाऱ्या मतदारांनी आपला तिसरा पसंतीक्रम कोणाला दिलेला आहे, हे पाहून ही मते तिसऱा पसंतीक्रम लक्षात घेऊन त्यात्या उमेदवारांना संक्रमित करण्यात येतील, अशी घोषणा निवडणूक अधिकारी करतात.*
मतमोजणीची तिसरी फेरी
5251 हा कोटा (म्हणजे ५० टक्के +१)कोणीही पूर्ण केलेला नाही. म्हणून या फेरीत आता सर्वात कमी मते मिळविणारा उमेदवार ‘क’ आहे. त्याला पहिल्या पसंतीक्रमाची ११०० व ‘इ’पहिला पसंतीक्रम देणाऱ्यांची १०० अशी १२०० मते मिळाली आहेत. ११००मतपत्रिकेवर दुसरा पसंतीक्रम कुणाला आहे तसेच ‘इ’ कडून आलेल्या १०० मतपत्रिकेवर तिसरा पसंतीक्रम कोणाला आहे, ते पाहिले जाते आणि त्यानुसार ती मते त्यात्या उमेदवाराकडे संक्रमित होतात/ त्यात्या उमेदवाराच्या गठ्यात स्वतंत्र ठेवून मोजली जातात. हे दाखवणारा तक्ता खाली दिला आहे.
तक्ता क्र - ३
‘क’ बाद झाल्यानंतर त्याला मिळालेल्या मतांचे वाटप
क्र
|
उमेदवाराचे नाव
|
पहिल्यापसंतीची मते
|
E1-‘इ’ 400 च्यामतांचे वाटप
|
पहिल्या फेरीनंतर ४उमेदवारांची मते
|
E2(1) ’क’च्या
1100 मतांचे वाटप
|
E2(2) ’क’च्या 100 मतांचे वाटप
|
Total
तिसऱ्या फेरीनंतरचीप्रत्येकाची
मते
|
१
|
अ
|
3500
|
200
|
3700
|
600
|
25
|
4325
|
२
|
ब
|
4000
|
50
|
4050
|
300
|
50
|
4400
|
३
|
क
|
1100
|
100
|
1200
|
El2
|
बाद
|
--
|
४
|
ड
|
1500
|
15
|
1515
|
50
|
15
|
1580
|
५
|
इ
|
400 E1
|
‘इ’ 400 च्या मतांचे वाटप
|
बाद
|
---
|
---
|
--
|
|
एकूण वैध मते
|
10500
|
365
|
10465
|
950
|
90
|
10305
|
|
अवैध मते
|
500
|
----
|
----
|
|
|
|
|
संपुष्ट
|
-----
|
35
|
35
|
150
|
10
|
195
|
|
मतदान
|
11000
|
400
|
10500
|
1100
|
100
|
10500
|
वरील तक्ता दाखवतो की,
(१) ‘क’ मिळालेल्या पहिल्या पसंतीक्रमाच्या ११०० मतांवरचा दुसरा पसंतीक्रम पाहून ‘अ’ ला ६००, ‘ब’ ला ३०० व ‘ड’ ला ५० मते संक्रमित झाली आहेत.
(२)‘क’ च्या वाट्याला आणखी १०० मते आली आहेत. ही मूळची ‘इ’ची पहिल्या पसंतीक्रमाची मते होती. या मतांवर दुसरा पसंतीक्रम ‘क’ ला होता, म्हणून ती ‘क’ च्या वाट्याला आली होती पण ‘इ’ प्रमाणे ‘क’ सुद्धा बाद झाला. त्यामुळे या १०० मतपत्रिकांवर तिसरा पसंतीक्रम कोणाला आहेते पाहून ‘अ’ ला२५, ‘ब’ ला ५० व ‘ड’ ला १५ मते संक्रमित झाली आहेत, असे हा तक्ता दाखवतो.
(३) अशी कल्पना करू की, शंभर मतपत्रिकांपैकी १५ मतपत्रिकावर तिसरा पसंतीक्रम ‘इ’ ला होता पण ‘इ’ अगोदरच बाद झाला आहे, आता काय करायचे? या मतपत्रिकेवरचा चौथा पसंतीक्रम कोणाला आहे ते पाहिले जाते. समजा सर्वच्या सर्व म्हणजे १५ मतपत्रिकांवर चौथा पसंतीक्रम ‘ड’ ला आहे. त्यामुळे ही मते ‘ड’ कडे संक्रमित होतील. या सगळ्या १५ मतपत्रिकांवर चौथा क्रमांक फक्त ‘ड’ ला नसता व काही मते ‘अ’ ला व काही मते ‘ब’ला असती तर ती मते त्यांना देण्यात आली असती. या निमित्ताने मतांच्या फेरवाटणीचे तत्त्व लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. हे तत्त्व असे आहे की, जर एखादा पसंतीक्रम वापरला गेला असेल आणि तो उमेदवार अगोदरच बाद झाला असेल तर त्याच्या पुढचा पसंतीक्रम (या उदाहरणात चौथा) विचारात घ्यावा, तोही बाद झाला असेल तर पाचवा पसंतीक्रम विचारात घ्यावा व ते उमेदवार मैदानात असतील ( रनिंग कॅंडिडेट असतील / बाद झाले नसतील) तर ते मत त्यांच्याकडे संक्रमित करावे.
(४) आता ‘अ’ ‘ब’ व ‘ड’ ची मते अनुक्रमे ४३२५, ४४०० व १५८० झाली आहेत. एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा तो हा की ‘अ’ व ‘ब’ मधील मुळात ५०० मतांचा असलेला फरक कमी होतहोत आता फक्त ७५ चा राहिला आहे.
(५) पण अजूनही ५२५१ चा कोटा कोणीही पूर्ण केलेला नाही, त्यामुळे कोणीही निवडून आला नाही अशी घोषणा निवडणूक अधिकारी करतात आणि या तिघात सर्वात कमी मते असलेल्या ‘ड’ ला बाद करतात.
मतगणनेची चौथी फेरी
सर्व पसंतीक्रम का नोंदवायचे ?
समजा एका मतपत्रिकेवर अ, ब, क, ड, इ या पाच उमेदवारांना अनुक्रमे 5, 2, 3, 4, व 1 असे पसंतीक्रम दिलेले आहेत व ‘इ’ हा उमेदवार बाद झाला आहे. या मतपत्रिकेवर दुसरा पसंतीक्रम ‘ब’ ला आहे, त्यामुळे हे मत ‘ब’कडे संक्रमित झाले पाहिजे पण जर तोही बाद झाला असेल तर तिसरा पसंतीक्रम असलेल्या ‘क’ कडे व तोही बाद झाला असेल तर चौथा पसंतीक्रम असलेल्या ‘ड’ कडे संक्रमित होईल व तोही बाद झाला असेल तर शेवटी पाचवा पसंतीक्रम असलेल्या ‘अ’ कडे संक्रमित होईल. अशाप्रकारे सर्व पसंतीक्रम नोंदवणाऱ्या मतदाराचे मत शेवटपर्यंत मतगणनेत कायम राहते.
तक्ता क्र ४
‘ड’ बाद झाल्यानंतर त्याला मिळालेल्या मतांचे वाटप
क्र
|
उमेदवार
|
पहिल्या पसंतीची मते
|
E1इ 400 च्या मतांचे वाटप
|
पहिल्या फेरीनंतर उरल्ल्या ४ उमेदवारांची मते
|
E2(1) ’क’च्या 1100 मतांचे वाटप
|
E2(2) ’क’च्या 100 मतांचे वाटप
|
Totalतिसऱ्या फेरीनंतरची प्रत्येकाची मते
|
‘ड’च्या मूळ 1500 मतांचे वाटप
|
‘इ’च्या 15 मतांचे वाट
|
‘क‘च्या
5 0 मतांचे वाटप
|
15 मतांचे
वाटप
|
चौथ्या फेरीनंतरची प्रत्येकाची मते
|
१
|
अ
|
3500
|
200
|
3700
|
600
|
25
|
4325
|
400
|
4
|
5
|
3
|
4737
|
२
|
ब
|
4000
|
50
|
4050
|
300
|
50
|
4400
|
300
|
6
|
5
|
2
|
4713
|
३
|
क
|
1100
|
100
|
1200
|
El2
|
बाद
|
--
|
--
|
|
|
|
|
४
|
ड
|
1500
|
15
|
1515
|
50
|
15
|
1580
|
El3
|
|
|
|
|
५
|
इ
|
400 E1
|
इची 400
|
बाद
|
---
|
---
|
--
|
|
|
|
|
|
|
एकूण वैध मते
|
10500
|
365
|
10465
|
950
|
90
|
10305
|
700
|
10
|
10
|
5
|
9450
|
|
अवैध मते
|
500
|
----
|
----
|
|
|
|
|
|
|
|
|
|
संपुष्ट
|
-----
|
35
|
35
|
150
|
10
|
195
|
800
|
5
|
40
|
10
|
1050
|
|
मतदान
|
11000
|
400
|
10500
|
1100
|
100
|
10500
|
1500
|
15
|
50
|
15
|
10500
|
‘ड’ च्या १५८० मतांच्या वाटपाचा हिशोब असा आहे.
१. ‘ड’ ची मूळ मते १५०० आहेत. या मतपत्रिकावरचा दुसरा पसंतीक्रम कोणाला आहे ते पाहिले जाते. हा उमेदवार अगोदरच बाद झाला असेल तर त्या पुढचा व तोही बाद झाला असेल तर त्याच्या पुढचा रनिंग कॅंडिडेट कोण आहे, ते पाहून हे मत त्याला संक्रमित करतात. याप्रमाणे ‘अ’ ला 400 ‘ब’ ला 300 मते मिळाली व 800 मते संपुष्टात आली, असे वरील तक्त्यावरून दिसते.
२. ‘इ’ बाद झाल्यानंतर त्याला पहिला पसंतीक्रम देणाऱ्या १५ मतदारांनी दुसरा पसंतीक्रम ‘ड’ ला दिला होता म्हणून ती मते ‘ड’ च्या वाट्याला आली होती. या मतपत्रिकांवरील तिसरा व तो संपुष्टात आला असेल (म्हणजे तो उमेदवार अगोदरच बाद झाला असेल) तर चौथा व तोही संपुष्टात आला असेल तर पाचवा पसंतीक्रम पाहून ते मत संक्रमित केले जाते. याप्रमाणे ‘अ’ ला 4 ‘ब’ ला 6 मते मिळाली व 5 मते संपुष्टात आली, असे वरील तक्त्यावरून दिसते.
३. ‘ड’ च्या वाट्याला ’क’ बाद झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या पसंतीक्रमाची ५० मते पाहून त्यावरचा तिसरा पसंतीक्रम पाहून किंवा तो संपुष्टात आला असेल तर चौथा या न्यायाने रनिंग कॅंडिडेटचा शोध घेऊन ते मत संक्रमित केले जाते. याप्रमाणे ‘अ’ ला 5 ‘ब’ लाही 5मते मिळाली व 40 मते संपुष्टात आली, असे वरील तक्त्यावरून दिसते.
४. ‘ड’ च्या वाट्याला या शिवाय आणखी १५ मते आलेली आहेत.या मतपत्रिकांवर पहिला पसंतीक्रम ‘इ’ ला होता. म्हणून ही मते इ ला मिळाली होती. या मतपत्रिकांवर दुसरा पसंतीक्रम ‘क’ ला होता व तिसरा पसंतीक्रम ‘ड’ ला होता म्हणून ही मते ‘ड’ कडे आली होती. या मतपत्रिकांवरचा चौथा पसंतीक्रम पाहिला जातो. समजा या पाहण्यानुसार ‘ब’ ला २(दोन) मते व ‘अ’ ३(तीन) मते मिळाली. तसेच सगळे पसंतीक्रम नसल्यामुळे १० (दहा) मते संपुष्टात आली.आता अ ची एकूण मते ४७३७ व ‘ब’ ची एकूण मते ४७१३ होतात. पण कोणीही कोटा पूर्ण केला नसल्यामुळे कणीही निवडून आला नाही, अशी घोषणा निवडणूक अधिकारी करतात.
पाचवी फेरी
या दोघात ‘ब’ ला कमी मते असल्यामुळे त्याला बाद करतात. पण मग रिंगणात ‘अ’ हा एकच उमेदवार उरतो.त्यामुळे तो निवडून येणार हे नक्की झाले. पण ‘अ’ कोटा पूर्ण करून निवडून येतो की कोटा पूर्ण न करणारा पण जास्तीत जास्त मते मिळविणारा उमेदवार म्हणून निवडून येतो, हे पाहिले जाते.
पसंतीक्रम पद्धतीची विशेषता
१. अगदी सुरवातीला ‘ब’ ला ‘अ’ पेक्षा पाचशे मते जास्त होती.(४०००-३५००= ५००)
२. नंतरच्या फेरीत हा फरक ३५० इतकाच राहिला.(४०५०- ३७००= ३५०)
३. पुढच्या फेरीत हा फरक आणखी कमी होऊन केवळ ७५ इतकाच राहिला. (४४००- ४३२४= ७५)
४.चौथ्या फेरीअखेर तर हा चोवीस मतांनी पुढे गेला.( ४७३७-४७१३ = २४)
५. आतापर्यंत जसा हिशोब केला तसाच हिशोब पाचव्या फेरीत केला जातो.
खालील तक्त्यात ‘अ’ व ‘ब’ ची पहिल्या पसंतीची मते व चौथ्या फेरीनंतरची मतेच जागेअभावी घेतली आहेत. तसेच ‘क’, ‘ड’ व ‘इ’ हे उमेदवारही दाखविलेले नाहीत.
तक्ता क्र - ५
‘ब’ बाद झाल्यानंतर त्याला मिळालेल्या मतांचे वाटप
|
उमेदवाराचे नाव
|
पहिल्या पसंतीची मते
|
चौथ्या फेरीनंतरची मते
|
E4(1)
|
E4
(2)
|
E4(3)
|
E4(4)
|
E4(5)
|
E4(6)
|
E4(7)
|
E4(8)
|
Total
|
१
|
अ
|
3500
|
4737
|
1000
|
10
|
100
|
5
|
100
|
2
|
3
|
0
|
6057
|
२
|
ब
|
4000
|
4713
|
--
|
--
|
--
|
बाद
|
|
|
|
|
|
|
एकूण वैध मते
|
10500
|
9450
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अवैध मते
|
500
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
संपुष्ट
|
-----
|
1050
|
|
|
|
|
|
|
|
|
1220
|
|
मतदान
|
11000
|
10500
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शेवटी असे चित्र समोर येते की, पहिल्या फेरीत मागे असलेला ‘अ’ पुढच्या प्रत्येक फेरीत प्रतिस्पर्ध्याची बढत हळूहळू कमी करत गेला व शेवटी ६०५७ मते मिळवून व कोटा पूर्ण करून निवडून आला. या फेरीत ‘ब’ च्या ४७१३ मतांची वाटणी होऊन ६०५७ मते ‘अ’ ला मिळाली.
(वरील तक्ता काय दाखवतो)
(१. ‘ब’ च्या ४७१३ मतांपैकी ४००० ही त्याची मूळची पहिल्या पसंतीची मते आहेत. यातील १००० पैकी काही मतांवर दुसरा / काही मतांवर तिसरा / काही मतांवर चौथा / तर काही मतांवर पाचवा क्रमांक ‘अ’ ला होता, असे गृहीत धरू.म्हणून ती ‘अ’ च्या पारड्यात टाकली जातील(‘अ’ कडे संक्रमित होतील.) ज्या मतपत्रिकांवर दुसरा पसंतीक्रम ‘अ’ ला आहे, ती मते ‘अ’ कडे संक्रमित होतील, हे स्पष्ट आहे. यातील काही मतांवर खरेतर ‘अ’ ला तिसरा पसंतीक्रम होता. पण दुसरा पसंतीक्रम असलेला ‘क’ अगोदरच बाद झाल्यामुळे तिसरा पसंतीक्रम असलेल्या ‘अ’ कडे ही मते संक्रमित होतात.ह्याच न्यायाने चौथा व पाचवा पसंतीक्रम असलेली मते सुद्धा ‘अ’ लाच मिळतील, हेही स्पष्ट आहे.
२. ‘ब’ कडे ७१३ मते ‘क’, ‘ड’, ‘इ’ बाद झाल्यानंतर आली आहेत.)