शोध व बोध अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकींच्या निकालांचा
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
6 नोव्हेंबर 2018 ला अमेरिकेत मध्यावधी निवडणुका पार पडल्या. या काळपर्यंत अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची निम्मी कारकीर्द पार पडलेली असल्यामुळे यांना मध्यावधी निवडणुका म्हणावयाचे. या निमित्ताने अमेरिकेत जनमत चाचणीच पार पडली असे म्हटले जाते. ही निवडणूक हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या किंवा प्रतिनिधी सभेच्या सर्व म्हणजे 435 जागांसाठी, सिनेटच्या 100 पैकी 35 जागांसाठी व 39 राज्ये व टेरिटोरियल गव्हर्नरांच्या पदांसाठी पार पडली. आपल्या राज्यसभेप्रमाणे अमेरिकेतही सिनेटचे 1/3 सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात.
तीन मुख्य सभागृहांचे निकाल
1. हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या किंवा प्रतिनिधी सभा - 435 प्रतिनिधींच्या हाऊसमध्ये किंवा प्रतिनिधी सभेत प्रत्येक राज्याला त्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात (1911 सालची लोकसंख्याप्रमाण मानून) प्रतिनिधित्व असते. जसे कॅलिफोर्निया हे सर्वात मोठे राज्य आहे. त्याला हाऊसमध्ये 53 प्रतिनिधी असतात. पण राज्य कितीही लहान असले तरी त्याला किमान एक तरी प्रतिनिधी हाऊसमध्ये मिळतोच. जसे हवाई.
अशी आहे अमेरिका !
अमेरिकेची लोकसंख्या जवळजवळ 32 कोट असून क्षेत्रफळ ठोकळमानाने 1 कोटी चौरस मीटर व लोकांचे सरासरी वैयक्तिक वार्षिक उत्पन्न 55,000 डाॅलर आहे. देशात एकूण 50 राज्ये आहेत. यापैकी 48 राज्ये सलग आहेत तर रशियाकडून विकत घेतलेले अलास्का आणि जपानजवळचे हवाई बेट ही राज्ये भौगोलिक दृष्ट्या सलग नाहीत. याशिवाय 16 प्रांत असून त्यापैकी 11 प्रांतात तर मानवाची वसतीच नाही.
मोठ्या राज्यांना प्रतिनिधित्व जास्त
कॅलिफोर्नियात 12 टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटव्हज मध्ये 53 प्रतिनिधी आहेत. टेक्सासमध्ये 8.5 टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये ३६ प्रतिनिधी आहेत. फ्लोरिडा व न्यूयाॅर्क मध्ये प्रत्येकी 6 टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये 27 प्रतिनिधी आहेत. इलिनाॅइस व पेन्सिलव्हॅनियात प्रत्येकी 4 टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये प्रत्येकी 18 प्रतिनिधी आहेत.
इतर 8 राज्यात 21 टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये एकूण 90 प्रतिनिधी आहेत.
उरलेल्या 36 राज्यात उरलेली लोकसंख्या राहते व त्यांचे हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये उरलेले प्रतिनिधी आहेत.
या प्रतिनिधीसभेत निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे बहुमत होते. त्यांचे आता मात्र फक्त198 सदस्यच निवडून आले असून डेमोक्रॅट पक्षाचे मात्र 227 प्रतिनिधी निवडून आले आहेत. काही निकाल यायचे असले तरी डेमोक्रॅट पक्षाला प्रतिनिधीसभेत बहुमत प्राप्त होणार हे नक्की झाले असून त्यांना कायदे करण्याचा व डोनाल्ड ट्रंप यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
2. सिनेट - सिनेटमध्ये मात्र सब घोडे 12 टक्के, असा प्रकार असतो. म्हणजेच सिनेटमध्ये प्रत्येक राज्याला दोनच सिनेटर्स मिळतात. मग ते राज्य हवाईसारखे लहानसे असो वा कॅलिफोर्नियासारखे सर्वात मोठे असो. अमेरिकेत आजमितीला 50 राज्ये आहेत. त्यामुळे 50 ला दोनने गुणून येणारी संख्या 100 ही सिनेट मधील सिनेटर्सची कायम संख्या असते. अशाप्रकारे जोपर्यंत राज्यांची संख्या 50 आहे तोपर्यंत सिनेटर्सची संख्या 100 च राहील.
सिनेटच्या 100 जागांपैकी 35 जागांसाठीही निवडणूक झाली आहे. आपल्या राज्यसभेप्रमाणे1/3 सदस्यांची सदस्यतेचा कालखंड संपल्यामुळे निवृत्त झाले व या निवडणुका झाल्या. या 35 सदस्यात डेमोक्रॅट पक्षाचे 26 तर रिपब्लिकन पक्षाचे 9 सदस्य निवृत्त झाले होते. आपल्या अगोदरच्या 26 जागा राखून निदान दोन जागा डेमोक्रॅट पक्षाला अधिक मिळवायच्या होत्या पण तसे झाले नाही. सिनेटमध्ये 65 जागी निवडणुका झाल्या नाहीत. यात 65 सदस्यात डेमोक्रॅट पक्षाचे 23 व रिपब्लिकन 42 पक्षाचे सदस्य आहेत.
निवडणुकीपूर्वी सिनेट मध्ये रिपब्लिकन पक्षाचे 51 तर डेमोक्रॅट पक्षाचाचे 49 सदस्य होते. बहुमतासाठी डेमोक्रॅट पक्षाला निदान 2 जागा मिळण्याची आवश्यकता होती. पण तसे झाले नाही. आता रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमधील बहुमत कायमच राहणार नाही तर ते वाढणार आहे. (रिपब्लिकन पक्ष- 51; डेमोक्रॅट पक्ष - 44; अन्य -2). काही निकाल यायचे असले तरी रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये पूर्वीपेक्षा जास्त बहुमत प्राप्त होणार हे नक्की झाले आहे.
3. राज्यांचे गव्हर्नर - राज्ये व केंद्रीय प्रदेश मिळून 36 पदांच्यासाठी निवडणूक झाली. डेमोक्रॅट पक्षाने आपल्या यापूर्वी जिंकलेल्या जागा तर कायम राखल्याच पण त्याच बरोबर आठ राज्यांचे गव्हर्नरपद रिपब्लिकन पक्षाकडून हिसकावून घेतले. अलास्काची पूर्वी स्वतंत्र उमेदवाराकडे असलेली जागा तेवढी रिपब्लिकन पक्षाने जिंकली. राज्यातील सर्व मतदार आपला गव्हर्नर निवडतात. अनेक राज्यात गव्हर्नर एका पक्षाचे तर विधान सभागृहात बहुमत दुसऱ्या पक्षाचे अशी स्थिती निर्माण होते. गव्हर्नरला आपल्या मुख्यमंत्र्यासारखे अधिकार असतात. तोच राज्याचा कारभार हाकतो.
ट्रायफेक्टास किंवा तिहेरी यश
या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाला तिहेरी यश मिळाले. याला ट्रायफेक्टास असे संबोधतात. याचा अर्थ असा की राज्यात एकाच पक्षाचा गव्हर्नर, त्याच पक्षाचे राज्याच्या प्रतिनिधी सभेत व त्याच पक्षाचे राज्याच्या सिनेटमध्येही बहुमत असणे होय. अमेरिकेत गव्हर्नर प्रत्यक्ष निवडणुकीने राज्यातील सर्व मतदारांच्या मतदानानुसार निवडला जातो. गव्हर्नरची तुलना आपल्या येथील मुख्यमंत्र्याशी करता येईल. या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाला असे तिहेरी यश पूर्वीच्या तुलनेत भरपूर प्रमाणात मिळाले आहे. आठ राज्ये डेमोक्रॅट पक्षाने रिपब्लिकन पक्षाकडून तिहेरी यश मिळवून खेचून घेतली आहेत. या तिहेरी यशानुसार 14 मोठी राज्ये डेमोक्रॅट पक्षाकडे तर 22 रिपब्लिक पक्षाकडे आली आहेत. 13 राज्यात मिश्र स्वरुपाची स्थिती आहे, म्हणजे असे की, तिहेरी यश कुणालाच मिळालेले नाही. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचा विचार करता ही बाब डेमोक्रॅट पक्षाचा उत्साह वाढवणारी आहे. पण इकडे लोकांचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. दुहेरी यश मिळाले तर राज्याचा कारभार चालविणे गव्हर्नरला कठीण होऊन बसते. दुहेरी यश म्हणजे गव्हर्नर, राज्याची प्रतिनिधी सभा व राज्याची सिनेट यापैकी कोणत्याही दोन बाबतीतच यश मिळणे अशा राज्यात गव्हर्नरची पदोपदी अडवणूक करता येते व केलीही जाते. म्हणजे असे की, गव्हर्नर एका पक्षाचा व प्रतिनिधी सभा व सिनेटमध्ये बहुमत दुसऱ्या पक्षाचे अशी स्थिती असेल तर त्या गव्हर्नराच्या अडचणींना पारावार उरत नाही. कारण गव्हर्नर सत्ताप्रमुख असला व बजेट मांडणे हा त्याचा अधिकार असला तरी ते प्रतिनिधी सभेत व/वा सिनेटमध्ये पारित करून घेताघेता त्याच्या नाकी नऊ येत असतात. बजेट पास न होता टांगून पडल्यास राज्याच्या तिजोरीतून खर्च करण्याचा अधिकार संपतो व कर्मचाऱ्यांचे वेतनासहित अन्य खर्च तीन तीन महिने अडून राहिल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमधील निवडणुकीत आठ जास्तीची व बऱ्यापैकी मोठी राज्ये तिहेरी यश मिळवून आपल्याकडे खेचून घेता येणे ही डेमोक्रॅट पक्षाची फार मोठी उपलब्धी ठरते.
कोण जिंकले, कोण हरले?
एकंदरीने विचार करता काही राजकीय पंडितांच्या मते नोव्हेंबर महिन्यातील मध्यावधी निवडणुकींचे निकाल डेमोक्रॅट पक्षाचा उत्साह वाढवणाऱ्या आहेत, तर काहींच्या मते मध्यावती निवडणुकांचे निकाल सामान्यत: विरोधकांच्या बाजूचेच लागलेले सर्व जगभर आढळत असतात, ही बाब विचारात घेतली तर डेमोक्रॅट पक्षाला आणखी मोठे यश मिळणे अपेक्षित होते, तसे झाले नाही. तसेच डोनाल्ड ट्रंप यांना महाभियोगाची भीती दाखवता येणे, त्यांनी लहरीपणाने मांडलेली बिले अडवून ठेवणे आता डेमोक्रॅट पक्षाला अधिक सोयीचे झाले आहे व याचा अमेरिकेतील तसेच जगाच्या राजकारणावर (जसे इराणची आर्थिक कोंडी) परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, हे मान्य केले तरी, महाभियोग यशस्वी होण्याची शक्यता मात्र दिसत नाही. कारण देशाच्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत कायम आहे, एवढेच नाही, तर ते वाढले आहे. पण फसलेल्या महाभियोगाचेही महत्त्व असतेच की. म्हणून आता वाट पहायची 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीची. डोनाल्ड ट्रंप यांचा बोलतानाचा तोल वारंवर जातो आहे, त्यांची चिडचिड वाढली आहे, आरडाओरड/आदळआपट सुरू आहे, याची नोंद घ्यायलाच हवी. राजकीय वातावरण डेमोक्रॅट पक्षासाठी पूर्वीपेक्षा अनुकूल झाले असले तरी सध्या मात्र 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचीच वाट पहावी लागणार आहे, हेही खरे आहे.

No comments:
Post a Comment