राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्यसभेतही बहुमताच्या उंबरठ्यावर
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
सध्या राज्यसभेत रालोआचे 111 सदस्य आहेत. यांची पक्षनिहाय विभागणी अशी आहे. भाजप - 75, अण्णद्रमुक -13, जेडियु - 6, शिवसेना 3, शिरोमणी अकाली दल 3, अन्य - 11 (या 11 मध्ये स्वतंत्र व नामनिर्देशित सदस्य आहेत.)
युपीएचे 64 सदस्य असून त्यात काॅंग्रेसचे 48, आरजेडी - चे 5, राष्ट्रवादीचे 4, द्रमुकचे 3, जेडिएसचा1, अन्य-3 असे पक्षांचे बलाबल आहे. अन्य - 3 मध्ये स्वतंत्र व नामनिर्देशित सदस्य आहेत.
बिगर युपीए पण भाजप विरोधी सदस्य 44 असून समाजवादी 13 , तृणमूल 13, सीपीएम (कम्युनिस्ट - मार्क्सवादी) -5, बसपा (मायावती) - 4, आप -3, सीपीआय (कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया) - 2, टीडीपी (तेलगू देसम) -2 व पीडीपी (मेहबुबा मुफ्ती)- 2 असे पक्षांचे बलाबल आहे.
याशिवाय अन्य विरोधी पक्षांची संख्या 16 असून त्यात बिजेडी (बिजू जनता दल) - 6, टीआरएस (तेलंगणा राष्ट्र समिती) - 6, वायएसआरसीपी (आंध्रची युवाजन श्रमिक रिथु काॅंग्रेस पार्टी) - 2, एनपीएफ (नागा पीपल्स फ्रंट) -1 आणि स्वतंत्र 2 अशी पक्षनिहाय विभागणी आहे.
5 जुलै नंतरची रालोआची स्थिती
राज्यसभेत 245 पैकी 10 जागा रिक्त असल्यामुळे प्रत्यक्ष सदस्य संख्या 235 इतकीच असून रालोआचे सदस्य 111आहेत. ही संख्या 5 जुलैला 115 होणार असून आता स्पष्ट बहुमतासाठी केवळ आणखी फक्त 6 मतांची बेगमी रालोआला करावी लागणार आहे. कधी ना कधी राज्यसभेची सदस्यसंख्या 245 होईलच. तेव्हा मात्र रालोआला आठ सदस्य कमी पडणार आहेत.
टीडीपीचे (चंद्राबाबूंची तेलगू देसम पार्टी) 4 सदस्य आणि आयएनएलडीचा (हरियाणाचे इंडियन नॅशनल लोक दल) - 1 सदस्य भाजप मध्ये सामील झाल्यामुळे रालोआ बहुमताच्या दिशेने हळूहळू पण निश्चितपणे एकेक पाऊल टाकतांना दिसते आहे. गेल्यावेळी (2014 ते2019) विरोधकांनी बिले अडवून रालोआची अडचण केली होती. तो प्रकार आता लवकरच बंद होईल.
दुसरे असे की, युपीएचे घटक नसलेले तेलंगणा राष्ट्र समितीचे 6 सदस्य (टीआरएस), ओडिशातील बिजू जनता दलाचे 5 सदस्य (बीजेडी), आंध्रातील वायएसआरसीपीचे 2सदस्य (युवाजन श्रमिक रिथु काॅंग्रेस पार्टी) आणि नागा पीपल्स फ्रंटचा 1सदस्य (एनपीएफ) अशा एकूण14 सदस्यांचा प्रत्यक्ष पाठिंबा रालोआ मिळवू शकेल किंवा मतदानाचे वेळी हे पक्ष अनुपस्थित राहून अप्रत्यक्ष पाठिंबा देऊ शकतील. तिहेरी तलाक बिलाचे बाबतीत असा अनुपस्थित राहून हे दल पाठिंबा देऊ शकतात कारण प्रत्यक्ष पाठिंबा देणे त्यांना प्रादेशिक वा प्रांतीय राजकारणांमुळे शक्य न होण्याची शक्यता आहे.
तिसरे असे की, 5 जुलै पर्यंत बिहारमधून लोक जन शक्तीचे रामविलास पासवान निवडून येतील. ओडिशातील 1 जागा भाजपला मिळेल तर दोन बिजू जनता दलाला मिळेल.
चौथे असे की, गुजराथेतील अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यामुळे दोन जागा रिकाम्या होणार आहेत. या दोन्ही जागा भाजपला मिळतील. कारण प्रत्येक जागेसाठी वेगवेगळी निवडणूक होणार आहे. भाजपला गुजराथेत साधे बहुमत आहे. त्यामुळे एकेका जागेसाठी निवडणूक झाल्यामुळे भाजपचे उमेदवार सहज निवडून येतील. या जागा एकाच वेळी निवडावयाच्या झाल्या असता तर दोन्ही जागी भाजपचे उमेदवार निवडून येणे कठीण होते. पण याबाबतचा नियम असा आहे की राज्यससभेच्या जागा राजीनामा किंवा तत्सम कारणास्तव रिकाम्या झाल्या तर त्यांची प्रत्येक जागेसाठी वेगवेगळी निवडणूक घ्यावी. पण दर दोन वर्षानंतर निवृत्तीमुळे जर जागा रिकाम्या होत असतील तर त्यांचा एकत्रित विचार करून निवडणूक घ्यावी. गुजराथमधील जागा निवृत्तीमुळे नव्हे तर राजीनामा दिल्यामुळे निर्माण होत आहेत. या प्रश्नी काॅंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला आहे.
पाचवे असे की, जुलै 18 ला तमिलनाडूतून निवृत्तीमुळे 6 जागी निवडणूक होऊ घातली आहे. यापैकी सध्या 4 जागा अण्णा द्रमुकच्या तर प्रत्येकी एकेक जागा द्रमुकच्या आणि सीपीआयच्या वाट्याला अशी विभागणी आहे. तमिलनाडूतील पक्षीय बलाबल पाहता अण्णद्रमुकची एक जागा कमी होऊ शकते व द्रमुकच्या दोन जागा वाढून त्यांची सदस्य संख्या 3 होऊ शकेल. याचा अर्थ असा की तमिलनाडूतील निवडणुकीचा रालोआवर प्रतिकूल परिणाम होणार नाही.
सहावे असे की, 12 नामनिर्देशित सदस्यांपैकी 8 सदस्य भाजपमध्ये सामील आहेत. उरलेल्या 4 पैकी 3 भाजपला तर 1 युपीएसाठी मतदान करील, अशी स्थिती आहे.

No comments:
Post a Comment