कथा, बोध आणि शोध व्हॅक्सिनचा!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
लस (व्हॅक्सिन) शोधून काढण्याचे श्रेय एडवर्ड जेन्नर या डॅक्टरला आहे. त्याकाळी देवी (स्मॅालपॅाक्स) या रोगावर औषध नव्हते. गाईंची धार काढणाऱ्या गवळ्यांना सौम्य स्वरुपाचा देवीसारखा आजार व्हायचा याला काऊपॅाक्स (गोस्तन देवी) म्हटले जायचे. हा आजार व्हायचा आणि रोगी बरा व्हायचा. या व्यक्तीला एकतर देवी होत नसत किंवा झाल्याच तर त्याचा आजार बरा व्हायचा. यावरून एडवर्ड जेन्नरच्या वाटले की, गोस्तन देवी झालेल्या व्यक्तीच्या शरीरात देवी या रोगाचा सामना करण्याची प्रतिकार शक्ती उत्पन्न होत असली पाहिजे. म्हणजेच काऊपॅाक्स (गोस्तन देवी) हा आजार, ही मानवातील देवी या आजारावरची नैसर्गिक लस असली पाहिजे.
पहिली चाचणी
यासाठीची चाचणी घेण्यासाठी जेन्नरने आपल्या बागवानबाईच्या 8 वर्षाच्या जेम्स फिप्स नावाच्या मुलाची निवड केली. त्याच्या घरी काम करणाऱ्या या गवळणीला (सारा नेल्म्सला) काऊपॅाक्स झाला होता. तिच्या अंगावर उठलेल्या पुरळातील पस (पू) त्याने गोळा करून तो जेम्सला टोचला. जेम्सला तापाची कणकण जाणवली इतकेच. लगेचच तो बरा झाला. त्याला काऊपॅाक्स तर झालाच नाही! त्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झाली होती!! या सगळ्यांच्या नावांची दखल इतिहासाने घेतली आहे. अरे हो! एक नाव राहिलेच की? ते कोणते? तर त्या गाईचे नाव होते ब्लॅासम!
सखोल अभ्यास आवश्यक
आज जगभरातले वैज्ञानिक कोविड-19 या विषाणूची सूक्ष्म रचना कशी आहे, तो टिकून राहतो कसा, रुपांतर (म्युटेशन) करतो कसा, पसरतो कसा, मानवावर हल्ला करतो कसा, याचा शोध घेण्यातच बराच काळ गुंतून राहिले आहेत. पण यात खर्ची पडलेला वेळ वाया गेला असे म्हणता यायचे नाही. कारण सर्व तपशील समजल्याशिवाय या विषाणूचा प्रतिबंध कसा करावा आणि त्याचा हल्ला परतून कसा लावावा हे कळणार नव्हते आणि ते कळल्याशिवाय लसही तयार करता येणे अशक्य असते.
काट्याने काटा काढायचा
लस हा एक जैविक पदार्थ आहे. यामुळे मानवात एखाद्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण करता येते. अर्धमृत किंवा पूर्ण मृत विषाणू निरोगी माणसाच्या शरीरात टोचून प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची ही एक पद्धती आहे. काट्याने काटा काढतात, त्यातलाच हा प्रकार. हे शोधून काढायला अर्थातच वेळ लागतो. सामान्य माणसांसाठी हा काळ बिकट असतो. या काळात टिकून राहणे एवढेच आपल्या हाती असते.
दोन निकष - सुरक्षित व परिणामकारक
या काळात आरोग्य जपणाऱ्या कंपन्या, संशोधन संस्था आणि तज्ञ व्यक्ती रात्रीचा दिवस करीत लस शोधून काढण्यासाठी धडपडत असतात. ही लस सुरक्षित (सेफ) व परिणामकारक (इफेक्टिव्ह) असावी लागते. तिने रोग्याला अपाय होता कामा नये, म्हणजे ती सुरक्षित असली पाहिजे, पण त्याचबरोबर रोग मात्र तिच्यासमोर टिकता कामा नये, म्हणजे ती परिणामकारकही असली पाहिजे.
सगळे एका व्यासपीठावर
लस तयार करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी आज जगातील ठिकठिकाणच्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या चमू तयार केल्या असून प्रत्येक चमूला वेगवेगळी कामे वाटून दिलेली आहेत. प्रत्येक चमूने मिळविलेल्या माहितीची देवाणघेवाण इतर चमूंसोबत नित्य सुरू असते. यासाठी एक व्यासपीठ (प्लॅटफॅार्म) तयार केले जाते. हे व्यासपीठ उद्योगक्षेत्र, शासन आणि संशोधक व अभ्यासक यांनी मिळून आकाराला आणले जाते. या सर्वात अभूतपूर्व सहकार्य असेल आणि जोडीला अपरिमित संसाधने उपलब्ध असतील तरच संशोधन कार्य लवकर यशस्वी रीतीने पार पडू शकेल आणि सुरक्षित व परिणामकारक लस तयार करता येईल. पण एवढ्याने भागणार नाही, नंतर कोट्यवधी डोझेस तयार करावे लागतील. हेही काम सोपे नाही.
प्रयत्न यशस्वी कसे होतील ?
जगात आजवर अनेक रोगांच्या साथी आल्या आणि गेल्या पण या नवीन साथीचा प्रसार सर्वात जलद गतीने होतो आहे, हे हिचे खास वेगळेपण आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक चमूला कसोशीचे प्रयत्न, बुद्धिमत्ता व कौशल्य पणाला लावून करावे लागणार आहेत. सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी), सहकार्य (कोॲापरेशन) व वचनबद्धता (कमिटमेंट) यांच्या त्रिवेणी संगमाशिवाय यशाचे शिखर अल्पावधीत गाठता येणार नाही/येत नसते.
कोविड-19 हा कोरोनाव्हारसचा एक अगदी नवीन प्रकार आहे, याचे भान असले पाहिजे. म्हणूनच कीकाय कोरोनाचा को, व्हायरसचा व्हि, डिसइजचा डी आणि 2019 मधला 19 मिळून कोविड-19 असे बारसे या व्हायरसचे नव्याने करण्यात आले आहे/करावे लागले आहे, असे म्हणतात.
वर्षाअखेर कोविड-19 ची लस व/वा औषध तयार होऊ शकेल, अशी अपेक्षा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि इतरांनी नुकतीच व्यक्त केली आहे. लसीची निर्मिती, उत्पादन आणि वितरण लवकरात लवकर पार पडावे अशी भूमिका स्वीकारून अमेरिकेत व इतरत्रही, शास्त्रज्ञांचे व औषधनिर्मितीउत्पादकांचे प्रयत्न सुरू आहेत. हे काम लवकर पूर्ण होणारे नाही, तसेच यश केव्हा मिळेल याबाबत नक्की सांगताही येणार नाही.
‘भारत आणि अमेरिका यांचे शास्त्रज्ञही लस तयार करण्याच्या कार्यात गुंतले आहेत. खुद्द अमेरिकेतही भरपूर संख्येत भारतीय असून त्यात अनेक महान शास्त्रज्ञ व संशोधक आहेत’, असे डोनाल्ड ट्रंप यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे. जगभरातील शेकडो शास्त्रज्ञांनी लोकांना धीर देण्याच्या हेतूने आपल्या या प्रयत्नांची माहिती देणारे पत्र प्रसृत केले आहे.
लस उपलब्ध होईपर्यंत काय करायचे?
जेव्हा एखादी साथ नवीन असते तेव्हा लस तयार होईपर्यंत कोणताही उपाय उपलब्ध नसतो. इतर अनेक रोगांसाठी सध्या लस आणि ॲंटिव्हारस उपलब्ध आहे. पण कोविड-19 चे तसे नाही. कोविड-19 ने बाधित रोग्यावर सध्या जे उपचार केले जात आहेत, ते लक्षणे पाहून व त्यांच्या शमनापुरतेच मर्यादित आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. शरीरातील रोगप्रतिकारशक्तीची विषाणूवर मात होईपर्यंत रोग्याला टिकवून ठेवणे व प्रतिकारशक्ती वाढवीत राहणे, एवढ्यापुरतेच सध्याचे प्रयत्न मर्यादित आहेत.
जनसामान्यांचे कर्तव्य कोणते?
या सर्व परिश्रमांना यश येण्यास वेळ लागेल. या काळात आपण सामान्यजनांनी काय केले म्हणजे आपला वाटा आपण उचलला, असे होईल? आपल्याकडून एकच माफक अपेक्षा आहे. आपापल्या घरीच थांबावे. कोविड-19 च्या वाऱ्यालाही उभे राहू नये. अशानेच आपण सुरक्षित राहू. समोर शत्रूच नसेल तर कोरोना हल्ला करील कोणावर? परस्परात सुरक्षित अंतराचे व येताजाता हात सॅनिटायझरने किंवा साबणाने स्वच्छ ठेवायचेच कायते पथ्य पाळायचे आहे. दैनंदिन व्यवहाराबातच्या नव्याने मिळणाऱ्या सवलतींची लक्ष्मणरेषा काहीही झाले तरी ओलांडायची नाही, याची खुणगाठ प्रत्येकाने बांधली पाहिजे. खूप कठीण आहे काहो हे? नाही ना? मग ते आपल्याला जमायलाच हवे. कारण आजतरी याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

No comments:
Post a Comment