Tuesday, April 30, 2024

हिरण्यगर्भ, बोसॅान आणि हिग्ज बोसॅान (पूर्वार्ध)

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २३/०४/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     


प्रति, श्री.संपादक,  तरूणभारत , नागपूर आजच्या महत्त्वाच्या विषयाशी संबंधित सोबतचा लेख प्रसिद्ध करण्याचे बाबतीत योग्य तो निर्णय व्हावा, ही विनंती. 

आपला स्नेहाकांक्षी, 

वसंत काणे. शुक्रवार, दिनांक 19/04/2024  

    à¤¹à¤¿à¤°à¤£à¥à¤¯à¤—र्भ, बोसॅान आणि हिग्ज बोसॅान (पूर्वार्ध)

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

  à¤µà¤¿à¤¶à¥à¤µà¤¾à¤šà¥€ निर्मिती कशी झाली हे एक गूढच आहे. हे गूढ उकलण्याचा प्रयत्न प्राचीन काळी वैदिक विद्वानांनी आणि आधुनिक काळात वैज्ञानिक शास्त्रज्ञांनी आपापल्या परीने केलेला आहे. पीटर हिग्ज हे हिग्ज बोसॉन हा विश्व निर्मितीतला एक अतिसूक्ष्म कण आहे, असे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रज्ञांतील एक प्रमुख शास्त्रज्ञ होते. त्यांचे इंग्लंडमधील एडिंबरा येथे 8/9 एप्रिल 2024 ला निधन झाले. ही शास्त्रीय जगतातील एक अपरिमित हानी मानली जाते.

वेदातील हिरण्यगर्भ संकल्पना- ऋग्वेदातील काही सूक्तांमधून तत्त्वज्ञानविषयक  चर्चा केलेली आढळते. उदाहरणार्थ सृष्टीची उत्पत्ती कशी झाली असावी, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचाही प्रयत्न केलेला आहे. हिरण्य म्हणजे सोने. वैदिक तत्त्वज्ञानानुसार हिरण्यगर्भाला सृष्टीच्या आरंभाचा स्रोत मानले आहे. म्हणजे हे विश्वाचे उत्पत्तीस्थान आहे. याबाबतचे उल्लेख ऋग्वेदात आढळतात. हिरण्यगर्भाबाबतची (गोल्डन एमब्रियो) वेदातील संकल्पना काहीशी अशी आहे. वैदिक विद्वानांना विश्व निर्मितीसाठीच्या घटकांचा (बिल्डिंग ब्लॅाक्स किंवा वीटा) शोध 18,000 वर्षांपूर्वीच लागला होता. याला त्यांनी हिरण्यगर्भ असे नाव दिले होते. हा परमाणूच्या गर्भाशयात असतो. सर्व निर्मितीच्या मुळाशी हा कण असतो. उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की, विटांशिवाय जशी इमारत असू शकत नाही, तसेच हिरण्यगर्भाशिवाय कोणत्याही कणाला वस्तुमान असू शकणार नाही. ही माहिती जुजबी आणि अपुरी आहे. हा हिरण्यगर्भावरचा लेख नाही. या संकल्पनेच्या जोडीला असलेल्या दुसऱ्या एका संकल्पनेनुसार भगवान शिवाचा कालाच्या (टाईम) संकल्पनेशी संबंध आहे, असेही मानतात. विश्वाच्या निर्मितीचे (क्रिएशन) आणि लयाचे (डिस्ट्रक्शन) चक्र  हा शिवाच्या तांडव/वैश्विक नृत्याचा (कॅास्मिक डान्स)  परिणाम आहे, असेही मानले गेले आहे. यातील पहिली कल्पना आणि आज मान्यता पावलेली हिग्ज बोसॅान/देवकण या बाबतची माहिती यात विलक्षण साम्य आहे. कसे ते पुढे कळेल.  या विषयावर काही वर्षांपूर्वी एका वाहिनीवर चर्चा आयोजित झाली होती, हे काही जुन्या प्रेक्षकांना आठवत असेलही.

आधुनिक विज्ञान जगत -आधुनिक विज्ञानजगतात पीटर हिग्ज यांचे कार्य समजून घेण्यासाठी, आपल्याला थोडीशी उजळणी करावी लागेल. आपल्या आजूबाजूला जे पदार्थ असतात, ते सर्व लहानलहान कणांचे बनलेले असतात. या कणांचे आणखी तुकडे केले की, आपल्याला अतिशय सूक्ष्म असे कण मिळतात. त्यांना 'अणू' असे म्हणतात. अणू हा पदार्थाचा लहानात लहान कण असून, त्याचे आणखी तुकडे होऊ शकत नाहीत, हा विचार प्रथम भारतीय वैदिक विद्वान  कणाद यांनी मांडला. हीच कल्पना ब्रिटिश शास्त्रज्ञ डॉल्टन यांनी अणू सिद्धांत या रूपात मांडली. पुढे अणू नव्हे तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे तीनच मूलभूत कण असून, संपूर्ण सृष्टी याच तीन कणांनी बनलेली आहे, असेही  वैज्ञानिक बरीच वर्षे मानत  होते. पण पुढे प्रयोगांती हे कण आणखी सूक्ष्म अशा मूलकणांपासून बनलेले असतात, हे वैज्ञानिकांच्या लक्षात आले. अशा कणांचा पद्धतशीर अभ्यास 'कण भौतिकी' (पार्टिकल फिजिक्स) या पदार्थविज्ञानाच्या शाखेत सुरू झाला. या विज्ञान शाखेत भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सत्येंद्रनाथ बोस यांनी लक्ष घातले होते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन हेही असेच कार्यरत होते. बोस यांनी पहिले पत्र 1924 साली म्हणजे 100 वर्षांपूर्वी आईनस्टीन यांना पाठविले होते. दोघांचे संशोधनाचे क्षेत्र एकाच स्वरुपाचे असल्याने, त्यांच्यात सहकार्य होते. या दोघांनी संयुक्तपणे लिहिलेले लेख त्यावेळच्या विज्ञानाला वाहिलेल्या संशोधनविषयक पत्रिकेत प्रसिद्ध होत असत. सत्येंद्रनाथ बोस यांनी काही मूलभूत कणांची कल्पना मांडली. या कणांना 'बोसॉन'  म्हणावे, असे पाल डिराक या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सुचविले आणि विज्ञान जगताने ते मान्य केले. बोस यांनी कल्पना मांडली म्हणून  ‘त्या’ कणांना ‘बोसॅान’ असे संबोधले जाऊ लागले. त्यांच्या कार्यासाठी सत्येंद्रनाथ बोस यांना 'नोबेल' पारितोषिकाने गौरविण्यात यायला पाहिजे होते. परंतु, 'नोबेल समितीला’ बोस यांचे कार्य त्या तोडीचे वाटले नाही. पण बोस यांच्या कल्पनेतील कणांवर संशोधन करून, 7 शास्त्रज्ञांनी नोबेल पारितोषिक मिळविले, हे मात्र खरे आहे. प्राध्यापक पीटर हिग्ज ते त्यापैकीच एक होते.

मूलकण म्हणजे काय? -पीटर हिग्ज यांची मूलकणाबद्दलची संकल्पना आपल्या सारख्या सामान्यांच्या डोक्यावरून जाणारी वाटली तरी शास्त्रीय जगतात तिचे अभूतपूर्व स्वागत झाले आहे. ज्यांना विज्ञानाचे जुजबी ज्ञान आहे, अशा आपल्यासारख्यांनाही पीटर हिग्ज यांची मूलकणाबद्दलची संकल्पना समजावी, यासाठी या लेखाचे प्रयोजन आहे. सुरवात अशी करू या. कोणत्या कणाला मूलकण म्हणावे? तर ज्याचे त्याच्यापेक्षा लहान कणात तुकडे किंवा भाग करता येत नाहीत, त्याला मूलकण म्हणावे, हे ओघानेच येते. आपण अणूला (ॲटम) मूलकण म्हणत होतो, हे विज्ञान शिकतांना शिकलेले बहुतेकांना आठवत असेल. पण आज त्याचेही भाग करता येतात, हे सिद्ध झाले आहे. म्हणजे आजच्या ज्ञानानुसार अणूला मूलकण म्हणता येणार नाही. अणूच्या केंद्रात (पोटात) धनप्रभार असलेले प्रोटॅान आणि कोणताही प्रभार नसलेले न्यूट्रॅान असतात आणि त्यांच्या भोवती ऋणप्रभार असलेले इलेक्ट्रॅान फिरत असतात. म्हणजे हे मूलकण झाले, नाही का? पण असेही नाही. प्रोटॅान आणि न्यूट्रॅान  आणखी लहान कणांचे बनलेले असतात, म्हणजे यांच्याही पोटात कण असतात तर! हे दोन प्रकारचे असतात. एकाला म्हणतात, क्वार्क आणि दुसऱ्याला लेप्टॅान असे नाव आहे. त्यांचे मात्र आणखी लहान कणात विभाजन करता येत नाही. मग यांना मूलकण म्हणायला हरकत नाहीना? सद्ध्यातरी याचे उत्तर होय असे आहे. उद्याचे कोणी सांगावे? पीटर हिग्ज यांच्या कल्पनेतील हे कण  आजतरी ते अविभाज्य आहेत. इलेक्टॅान बाबतही असेच म्हणता येईल. तोही मूलकण आहे. लहान मुलांच्या बाबतीत जसे वागण्या वावरण्याचे नियम असतात. तसेच जणू क्वार्कच्या आणि लेप्टॅानच्या बाबतीत आहेत. हे नियम चार आहेत. ते गणिताच्या आधारे/साह्याने तयार झाले आहेत, असे दिसते. या नियमांनुसार चार मूलभूत बले आहेत. शंकराला नंदी हवाच ना? तसे या बलांना वाहन लागते. फोटॅान किंवा प्रकाश कण हे या बलांचे वाहक आहेत. चार बलांपैकी 1) विद्युतचुंबकीय बल (इलेक्ट्रॅोमॅगनेटिक फोर्स) हे पहिले बल आहे. सगळी विद्युत साधने या बलामुळे चालतात. 2) दुसरे बल आहे, गुरुत्वाकर्षण. हे दुसरे बल आपल्याला चांगलेच माहीत आहे. 3) तिसरे तीव्र आण्विक/न्युक्लिअर बल  आणि 4) चौथे क्षीण आण्विक/न्युक्लिअर  बल ही उरलेली दोन बले आहेत. अशी ही चार बलांची ओळख आहे. यातले तीव्र आण्विक बल हे प्रोटॅान आणि न्यूट्रॅान मधल्या तीन क्वार्कना घट्ट पकडून ठेवते. क्षीण आण्विक/न्युक्लिअर  बल हे आण्विक प्रक्रियात कामी येते. याचे वाहक, डब्ल्यू बोसॉन व झेड बोसॉन नावाचे मूलकण असतात. हे सूर्य व इतर ताऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्याला सुचलेली एकमेव चांगली गोष्ट म्हणजे ‘हिग्ज बोसॅान’ असे पीटर हिग्ज विनोदाने म्हणत असत. 


Monday, April 29, 2024

 हिरण्यगर्भ, बोसॅान आणि (हिग्ज बोसॅान) देवकण. ( (उत्तरार्ध))

हिरण्यगर्भ, बोसॅान आणि (हिग्ज बोसॅान) देवकण. 

( (उत्तरार्ध))

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ३०/०४/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

हिरण्यगर्भ, बोसॅान आणि (हिग्ज बोसॅान) देवकण. ( (उत्तरार्ध))

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

  हिरण्यगर्भ याचा अर्थ सोन्याच्या अंड्यात राहणारा असा आहे. विश्वाच्या निर्मितीचा स्रोत हिरण्यगर्भात आहे, असे वैदिक तत्त्वज्ञान सांगते. याने  पृथ्वी, सूर्य तारे यांची निर्मिती केली. ऋग्वेदातील हिरण्यगर्भ सूक्तात असे उल्लेख आहेत. 

हिरण्यगर्भ: समवर्तताग्रे भूतस्य जात: पतिरेक आसीत् ।

स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधेम॥ सूक्त ऋग्वेद-10-121-1  

तेजस्वी, सर्व प्राणीमात्रांच्या अगोदर निर्माण झालेला, एकमेवाद्वितीय, जगाचा पालनकर्ता असलेला, त्यानेच‌ पृथ्वी आणि अवकाश धारण केले आहे अश्या देवाला कोणती बरे आहुती द्यावी?

  विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यासाठी आज मांडल्या गेलेल्या सिद्धान्तांपैकी महास्फोटाच्या (बिगबँग) सिद्धान्ताला सर्वाधिक मान्यता आहे. पण महास्फोटानंतर पदार्थ/जडवस्तू (मॅटर) कशा तयार झाल्या, हे शास्त्रज्ञांच्या लक्षात येत नव्हते. जे जागा व्यापते आणि ज्याचे वजन करता येते, त्याला मॅटर किंवा पदार्थ/जडवस्तू असे म्हणतात. पण या जडवस्तू निर्माण कशा झाल्या हा प्रश्न मात्र अनेक वर्षे सुटत नव्हता.

    परमाणूपेक्षाही लहान असलेला एक कण (सबअॅटॅामिक) इतर कणांना वस्तुमान (मास) देतो अशी पीटर हिग्ज यांची संकल्पना होती. भारतीय वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांचेही या संदर्भांतील संशोधन असेच मोलाचे ठरले आहे.  त्यांच्या संकल्पनेतील उपअणुकणाला त्यांच्या सन्मानार्थ 'बोसॉन' असे नावही देण्यात आले होते. पण या कणाचे अस्तित्व मात्र सिद्ध करता आले नव्हते.

  पीटर हिग्ज  यांचे एडिंबरा येथे निधन झाले. विज्ञानातील बोजड संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजावून देण्यात त्यांचा हातखंडा होता. ब्रह्मांडाचे नियंत्रण करणाऱ्या मूलभूत शक्तिसंदर्भातील मानवाचे ज्ञान आणि समज यांना पीटर हिग्ज यांनी नवी दिशा दिली आहे. 

   हिग्ज यांनी 1954 साली एडिनबरो विद्यापीठातून डॅाक्टरेटची  पदवी संपादन केली. ज्याला आकारमान आहे त्याला वस्तूमान असलेच पाहिजे. असे आहे तर मग सूक्ष्मातिसूक्ष्म कणांना त्यांचे वस्तूमान कसे प्राप्त होते हा प्रश्न  त्यांना बेचैन करत होता. त्यांनी कणांना (पार्टिकल) वस्तुमान मिळण्यासाठी मदत करणारा सूक्ष्मातिसूक्ष्म मूलकण अस्तित्वात असला पाहिजे हे मात्र 1964 मध्येच वर्तवले होते. पुढे 2012 मध्ये ते कण प्रत्यक्षात सापडल्यानंतर 2013 मध्ये त्यांना नोबेल पारितोषकाने गौरवण्यात आले.

 हिग्ज फील्ड आणि हिग्ज बोसॉन- पीटर हिग्ज यांनी एका वेगळ्या क्षेत्राची (हिग्ज फिल्ड) कल्पना सुचविली आहे. माशांसाठी जसे पाणी, तसे आपल्यासाठी हिग्ज फील्ड आवश्यक आहे, असे पीटर हिग्ज सुचवितात. तसेच त्यांनी वेगळ्या कणाचीही कल्पना मांडली आहे. हे वस्तुमानविरहित कण हिग्ज फिल्डच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची फिल्डशी प्रक्रिया होते आणि फील्डमधील कणांना वस्तुमान प्राप्त होते. हिग्ज बोसॉन कणांना देखील याच क्षेत्रातून वस्तुमान मिळते आणि  हे कण इतर कणांना वस्तुमान मिळण्यासाठी कारणीभूत ठरतात. 2012 साली स्वित्झर्लंडमधील एका संशोधन संस्थेने दोन अणूंची टक्कर घडवून आणली आणि या अणूंना वस्तुमान बहाल करणाऱ्या कणाचा शोध लावला. या प्रयोगात जे कण निर्माण झाले, त्यात बोस आणि हिग्ज यांनी कल्पिलेले कण होते. म्हणून ‘हिग्ज बोसॉन’ असे नाव पीटर हिग्ज आणि बोस यांच्या सन्मानार्थ  या कणाला देण्यात आले आहे. 50 वर्षांपूर्वी गणिताच्या मदतीने या कणाच्या अस्तित्वाचा सिद्धान्त पीटर हिग्ज यांनी मांडला होता. भारतीय वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांचेही या संदर्भांतील संशोधन याच मोलाचे होते. याच कणांना ‘देव कण’ (गॉड पार्टिकल) असे नाव मिळाले आहे. 

लार्ज हॅड्रॉन कोलायडर- विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पीटर हिग्ज यांनी वर्तवलेल्या हिग्स बोसॉन कणांचा शोध घेण्याची  मोहीम कणविषयक भौतिकशास्त्रज्ञांनी हाती घेतली. हा हेतू समोर ठेवून स्वित्झर्लंडमधील ‘युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रीसर्च’ (सर्न) या संस्थेने कणांना प्रचंड गती देणारे एक अजस्त्र यंत्र तयार केले. ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ (एलएचसी) नावाची प्रयोगशाळा म्हणजे जमिनीखाली असलेली भल्यामोठ्या व्यासाची एक लांब  नळी आहे. ही नळी सेमीकंडक्टर पदार्थांच्या कंकणाकृती चुंबकांची बनलेली असते. 'सर्न' ही एक अद्ययावत प्रयोगशाळा आहे. जिनेव्हा शहराजवळ जमिनीखाली अनेक किलोमीटर पसरलेल्या या प्रयोगशाळेत आण्विक कणांना प्रचंड वेग देऊन, त्यांच्या टकरी घडवून आणण्याची व्यवस्था आहे.  यामध्ये चुंबकीय बलाच्या मदतीने कण जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने फिरविले जातात व त्यांची टक्कर घडवून आणली जाते. 2012 साली या अणूंच्या टकरीनंतर ‘हिग्ज बोसॉन’ सापडला. अणूच्या मूलभूत संरचनेत त्याला वस्तुमान देणारा ‘हिग्ज बोसॉन’ नसता, तर हे विश्वच निर्माण होऊ शकले नसते, असे पीटर हिग्ज म्हणत असत. बोसॅानसह एकूण 17 कण सापडले आहेत. या गटाला आणि बलाला ‘स्टॅंडर्ड मॅाडेल’, असे म्हणतात. हे 17 कण दोन गटात विभागता  येतात. फर्मिॲान्स आणि बोसॅान्स. फर्मिॲान्स म्हणजे विटा. फर्मिॲान्स 12 असून याचेही दोन गट पडतात. 6 फर्मिॲान्सचा एक गट आणि 6 लेप्टॅान्सचा दुसरा गट. थोडक्यात फर्मिॲान्स + लेप्टॅान्स = भौतिक वस्तूचा अणू. बोसॅान्स 5 आहेत. प्रत्येक बोसान 3 पैकी एक बल वाहून नेतो. चौथे बल गुरुत्वाकर्षण आहे. याची पातळी अतिशय कमी असल्यामुळे त्याचा स्टॅंडर्ड मॅाडेलमध्ये समावेश केला जात नाही.

  गॉडडॅम  पार्टिकल- आज जग  हिग्ज बोसॅानला देव कण / 'गॉड पार्टिकल' म्हणत असले तरी, विज्ञान मात्र हे नाव मान्य करत नाही. लिऑन लेडरमन या शास्त्रज्ञाने या कणांवर 'गॉडडॅम  पार्टिकल' या नावाचे पुस्तक लिहिले. पण हे नाव  प्रकाशकाने  बदलून 'गॉड पार्टिकल' असे केले. ‘गॅाडडॅम’ हा शब्दप्रयोग लेखकाने ‘सहजासहजी हाती न लागणारा’ (चकमा देणारा) या अर्थी केला होता. पण प्रकाशकाला गॅाड आणि डॅम हे दोन शब्द जवळजवळ मांडलेले आवडत नव्हते. म्हणून त्याने डॅम हा शब्द वगळून ‘गॅाड पार्टिकल’ या शीर्षकानुसार ते पुस्तक प्रसिद्ध केले. तेच नाव आज रूढ झाले आहे. विश्वाच्या उत्पत्तीनंतर ग्रह-तारे, सजीव अथवा निर्जीव यांना प्राप्त झालेले वस्तुमान हे अणूमध्ये असलेल्या या अतिसूक्ष्म कणामुळे मिळाले आहे, असे गृहीतक पीटर हिग्ज यांनी गणिताच्या साहाय्याने मांडले होते.

पीटर हिग्ज जवळ मोबाईल नव्हता-पीटर हिग्स यांना 2013 मध्ये नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले. नोबेल समितीने त्यांना पारितोषिकाबद्दल कळवण्यासाठी फोन केला तेव्हा ते  भोजनासाठी हॅाटेलमध्ये गेले होते. तिथून परतत असताना एका परिचित व्यक्तीने त्यांना थांबवून नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तोपर्यंत त्यांना या गोष्टीचा पत्ताच नव्हता! त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी त्यांचे नाव घोषित करण्यापूर्वी त्यांच्यापर्यंत पोचू शकली नव्हती, म्हणून नोबेल पारितोषिक जाहीर झाल्याची बातमी सर्व जगाला त्यांच्या अगोदर कळली. ही बातमी कळणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये स्वत: पीटर हिग्ज यांचा क्रमांक बहुदा सर्वात शेवटचा असावा!!

Monday, April 15, 2024

    

‘न धरी शस्त्र करी मी’

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक १६/०४/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

‘न धरी शस्त्र करी मी’

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 


   १९४५ साली दुसरे महायुद्ध संपले. हिरोशिमा व नागासाकीवर अमेरिकेने अणुबॅाम्ब टाकल्यामुळे जपान दाती तृण धरून शरण आला. अणुबॅाम्ब टाकला नसता तर कट्टर जपानी सैनिकांनी इंच इंच लढवून अमेरिकेचे असंख्य सैनिक यमसदनी पाठविले असते व महायुद्ध अनेक वर्षे रेंगाळले असते. पण म्हणून अणु हल्ला? अणुहल्याला काळी असली तरी एक नैतिक बाजू आहे व ती अतिशय महत्त्वाची आहे, या हल्याचे नैतिकतेच्या दृष्टीने समर्थन करता येत नाही, हे नक्की. पण व्यावहारिक दृष्ट्या या हल्याची परिणिती जपानने विनाअट आणि तात्काळ सपशेल शरणागती पत्करण्यात झाला, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या सम्राटांना कायम ठेवा, त्यांना शिक्षा नको, एवढीच विनंतीवजा अट जपानने घातली व अमेरिकादी राष्ट्रांनी ती मान्य केली व जपानने सेल्फ-डिफेन्स फोर्स या नावाची नाममात्र स्वसंरक्षण व्यवस्था, एक अट म्हणून नामुष्की पत्करत स्वीकारली व तशी घटनेत दुरुस्ती केली.

1951 च्या करारानुसार जपानने युद्धसमाप्तीनंतरही  अमेरिकेला जपानमध्ये सैनिकी तळ कायमस्वरुपी ठेवण्याची अपमानास्पद अट स्वीकारली. अमेरिकेच्या संमतीशिवाय इतर कोणत्याही राष्ट्राला जपानमध्ये असे तळ उभारण्यास जपान अनुमती देणार नाही, हेही मान्य केले.

 शाप अभिशाप ठरला 

  जपान नि:शस्त्र झाला. लढण्याची त्याची क्षमता संपली. दर वर्षी संरक्षणासाठी पैशाचा मोबदला घेऊन अमेरिकेने जपानच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. एकप्रकारे हे जपानचे लष्करी खच्चीकरणच झाले. पण जपानने या अपमानास्पद अटीचेही सोने केले व संरक्षणावर होणारा अवाढव्य खर्च वाचवला आणि तो विकासावर खर्च केला आणि अभूतपूर्व आर्थिक प्रगती संपादन करून जपान एक आर्थिक कर्जदाता बनला. शस्त्रसंन्यासाची अपमानास्पद अट मान्य करून जपानने या शापाचे आर्थिक वरदानात रुपांतर केले, ते असे.  

   २०१७ मध्ये ट्रंप राजवटीत अमेरिकेला संरक्षणाच्या जबाबदारीच्या मोबदल्यात जपानकडून मिळणारी रक्कम कमी वाटू लागली. ती वाढवून मिळावी, अशी भूमिका अमेरिकेने घेतली.  खरेतर ट्रंप सरकारला असे वाटत होते की, यापुढे ज्याने त्याने आपल्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी. अमेरिकेच्यामागे हे लचांड नको. संरक्षणासाठी वाढीव पैसा नको आणि ती जबाबदारीही नको, असे शस्त्रकारण अमेरिकेत लोकप्रिय झाले. पण अल्पावधित शस्त्रसज्ज होणे ही सोपी गोष्ट नाही. शिवाय शस्त्रसज्ज व्हायचे म्हणजे नुसत्या बंदुका, तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रे तयार करणे नव्हे. तर अण्वस्त्रधारीच झाले पाहिजे. उत्तर कोरिया, चीन व रशिया हे जपानचे परंपरागत हाडवैरी अण्वस्त्रधारी तर आहेतच, शिवाय आर्थिकक्षेत्रातही जपानचा वरचढपणा  त्यांना नको होता/आहे. 

  अण्वस्त्रधारी व्हायचेच आणि जपानचे लष्करी नष्टचर्य संपवावयाचे हा विचार जपानी राजकारणी करू लागले. पण संसदेत एकाच पक्षाला बहुमत नसणे, ही प्रमुख अडचण होती.  अण्वस्त्रे न करण्याची तरतूद तर खुद्द राज्यघटनेतच होती. तसेच जपानच्या सम्राटांचाही जपानने अण्वस्त्रधारी होण्यास विरोध होता. 2014 मध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे जपान सरकारला खऱ्या अर्थाने  निर्णय स्वातंत्र्य मिळाले. शस्त्रे निर्यात करायची नाहीत, ही अट जपानने सैल करून घेतली. यानुसार साम्यवादी राष्ट्रे, युनोने बंदी घातलेली राष्ट्रे आणि युद्धात गुंतलेली राष्ट्रे   यांना जपान शस्त्रे पुरविणार नाही अशी बंधने होती.

चीनची लष्करी तयारी जपानला चिंता वाटावी अशी आहे. चीनच्या वर्चस्ववादाचा उपद्रव जपानलाही होतो आहे. सद्ध्या चीन आणि रशिया यातील जवळीक वाढली असून त्यांच्यात संचुक्त लष्करी सरावही सुरू झाले आहेत.  जपानसाठी ही धोक्याची घंटाच आहे. 

ग्लोबल कॉम्बॅट एअर प्रोग्राम

   आता जपान  निरनिराळ्या  प्रकारची शस्त्रे आणि उपकरणे परदेशांना विकू शकतो. अमेरिका युक्रेनला ज्याप्रमाणे शस्त्रे पाठवीत असते त्याचप्रमाणे  जपानही लवकरच युक्रेनला तसेच  अमेरिकेलाही क्षेपणास्त्रे विकू शकेल. ब्रिटन आणि इटली यांची अनेक प्रकारची लढाऊ विमाने आज जुनी आणि कालबाह्य झाली आहेत. पण नवी तयार करावीत तर पैशाची कमतरता आहे. या देशांशी एकत्र किंवा वेगवेगळे करार करून भागीदारीत जपान आधुनिक लढाऊ विमाने तयार करून विकू शकेल. या किंवा अशा प्रकल्पांना  ‘ग्लोबल कॉम्बॅट एअर प्रोग्राम’ असे नाव असेल. जपानचे विद्यमान पंतप्रधान फुमियो किशिदा हे मंत्रिमंडळाची या नवीन धोरणाला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण 2014 प्रमाणे आज जपानमध्ये एकाच पक्षाचे सरकार नाही आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे थोडाफार विलंब लागू शकतो. फेब्रुवारी 2024मध्ये या प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी मंत्रिमंडळाची मंजुरी अपेक्षित होती. मात्र सहकारी पक्ष असलेल्या कोमेटो पक्षाच्या विरोधामुळे त्याला विलंब होतो आहे. अशाप्रकारे निर्मित शस्त्रे विकण्याचा प्रश्नही सोपा नाही. म्हणून ग्राहक मिळविण्याच्या प्रयत्नात जपान आहे. शस्त्रास्त्रनिर्मितीउद्योग जपानमध्ये लवकरच भरभराटीला आलेला दिसेल. शस्त्रनिर्माता आणि शस्त्रास्त्रविक्रेता म्हणून जागतिक शस्त्रास्त्र बाजारातले एक प्रभावी राष्ट्र म्हणून जपान आज ना उद्या पुढे येणार हे नक्की झाले आहे. 

पण विरोध देशातूनच

 पण जपान शस्त्रांची निर्मिती केवळ स्वसंरक्षणापुरतीच मर्यादित ठेवेल अशी अट जपानने राज्यघटनेत समाविष्ट केली होती. आजचा जपान या आणि अशा प्रकारच्या सर्व बंधनातून स्वत:ची सुटका करून घेतो आहे. याला अमेरिका ब्रिटन आणि इटली आदी राष्ट्रांनी मान्यता दिली खरी पण आता जपानला देशांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागते आहे. शस्त्रास्त्रनिर्मितीविषयक नवीन धोरणाला मान्यता द्यायला विरोधी पक्ष तयार नाही. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या वाताहातीनंतर खुद्द जपानमध्येच  शांततावाद्यांचा एक जबरदस्त गट निर्माण झाला आहे. या दोन्ही घटकांनी सरकारच्या विरोधात जपानमध्ये चळवळ उभी केली आहे. शिवाय पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी विरोधकांना विश्वासात न घेता धोरणात बदल करण्यास सुरवात केल्यामुळे तर परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. या प्रश्नावर जनमताचा कौल घेण्यात आला असता सरकारला अपेक्षित होता तसा आणि तेवढा जनमताचा भरघोस पाठिंबा मिळाला नाही. हे पाहून पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. विकसित विध्वंसकारी शस्त्रे सरसकट न विकता फक्त जेट विमानेच विकू अशी मर्यादा तात्पुरती स्वीकारली. ज्या दोन राष्ट्रात युद्ध सुरू असेल त्यांच्यापैकी कुणालाही जपान शस्त्रे विकणार नाही, अशी ग्वाहीही सरकारने जनतेला दिली. तरीही सहमती होत नाही हे पाहून ज्यांना शस्त्रे विकली त्यांनी ती युद्धात वापरायला सुरवात केली तर त्यांना सुटे भाग जपान विकणार नाही, हा सर्व तपशील पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी संरक्षणमंत्री मिनोरू किहारा यांचेकरवी जनतेसमोर मांडला. हिरोशीमा आणि नागासाकी या शहरांवर अणुहल्ला झाल्यानंतर जो महाप्रचंड उत्पात घडून आला त्याचा  जपानी जनमतावर खोलवर झालेला परिणाम आज 75 वर्षे उलटून गेल्यानंतरही कायम आहे, हे यावरून दिसून येते. पण उत्तर कोरिया, चीन आणि रशिया यांच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जपानला जनतेला स्वसंरक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी आज ना उद्या तयार करावेच लागेल. यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय चातुर्याचा परिचय जपानने अगोदरच दिला असता तर विरोधाची धार नक्कीच बोथट झाली असती. ते काहीही असले तरी ‘न धरी शस्त्र करी मी’, ही प्रतिज्ञा पाळणे जसे श्रीकृष्णाला शक्य झाले नाही, तसेच असेच नाइलाजाने स्वीकारलेले बंधन जपानही फारकाळ पत्करू शकलेला नाही, हेच या निमित्ताने खरे ठरले आहे. 


Monday, April 8, 2024

आनंदी भूतानचा आनंद द्विगुणित होवो!

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ०९/०४/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.    

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?  


    आनंदी भूतानचा आनंद द्विगुणित होवो!


  भूतान उर्फ ड्रुग युल हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित (जमिनीने वेढलेला) जगातला सर्वात आनंदी देश आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या भूतानच्या तीन दिशांना भारत देश असणे ही भूतानच्या सुरक्षेची हमी म्हटली पाहिजे. पण भूतानची उत्तर सीमा तेवढीच असुरक्षित आहे. कारण  चौथ्या दिशेला विस्तारवादी चीन आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट म्हणजेच प्रत्यक्षात चीन आहे. उंच सखलतेत जगातील कोणताही देश भूतानची बरोबरी करू शकणार नाही. असा हा  या भूतलावरचा चिमुकला देश आजवर स्वतंत्र राहिला आहे, याला कारण योगायोग, एकेकाचे नशीब, दुर्लक्षणीय प्रदेश किंवा तटस्थतेचा स्वाभाविक परिणाम यापैकी काय असावे, हे सांगणे कठीण आहे.

    भारत व भूतान मैत्री करार

  ही भौगोलिक स्थिती पाहता भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी नैतिकदृष्ट्या भारतावर येऊन पडते. तिला कायद्याचेही समर्थन असावे म्हणून भूतानच्या संरक्षणाची कायदेशीर जबाबदारी तर भारताने स्वीकारली आहेच तसेच  भूतानमध्ये काही बंडखोरी, कलह, उपद्रव किंवा अशी कोणतीही गडबड झाली तर तिचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी भारताने एका द्विपक्षीय करारानुसार उचलली आहे. तसा कायदेशीर अधिकारही भारताला प्राप्त झाला आहे. 9 ऑगस्ट1949 ला भारत आणि भूतान यात मैत्री करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन देशात शांतता असावी आणि परस्परांच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे बाबतीतला हा करार आहे. तथापि परराष्ट्र धोरणाचे बाबतीत भारताला भूतानला ‘मार्गदर्शन’(गाईड) करण्याचा  अधिकार असेल तसेच परराष्ट्र धोरण आणि संरक्षणविषयक बाबतीत दोन्ही देश एकमेकांशी सल्लामसत (कन्सल्ट) करतीलयावरही सहमती झाली आहे.

  तिबेट व भारतीय उपखंड  यांच्या मधून जाणाऱ्या प्राचीन रेशमी रस्त्यामुळे  (सिल्क रूट) भूतानला भौगोलिक व राजकीय विलगता प्राप्त झाली आहे. हा रस्ता नावापुरताच  सिल्क रूट आहे. प्रत्यक्षात हा रस्ता काटेरी तारांसारखा अनेक देशांवर ओरखडे काढणारा आहे. भूतान बहुतांशी बौद्धधर्मी आहे. 19 व्या शतकात वांगचुक घराण्याने भूतानला राजकीय एकछत्र प्राप्त करून दिले. ब्रिटिश राजवटीने भूतानशी स्नेहाचे संबंध राखले. खरेतर भूतानला चिरडणे ब्रिटिशांना मुळीच अशक्य नव्हते. मग ब्रिटिश असे का वागले? भारत आणि तिबेट यात एक बफर स्टेट असावे, असा तर ब्रिटिशांचा हेतू नसेल ना? ते काहीही असले तरी यामुळेच आज चीन- भूतान मधील 470 किलोमीटर सीमेबाबतचा वाद  निर्माण झाला आहे. नाहीतर तोही आज भारत - चीन सीमावाद झाला असता. कारण भूतान ब्रिटिशांनी व्यापला असता तर तो आज इतर प्रांतांप्रमाणे भारताचाच एक हिस्सा झाला असता. पण इतिहासाला हे मंजूर नसावे. 

              सीमावाद

  आशिया खंडातील बहुतेक देशात आज सीमावाद आढळतात. याच्या मुळाशी ब्रिटन आहे. या सर्व देशांवर ब्रिटिशांचे साम्राज्य होते. त्यावेळी ब्रिटिशांनी ज्या सीमा आखल्या त्यात एकसूत्रता नव्हती. कोणताही एक निकष नव्हता. सत्तेच्या जोरावर ब्रिटिशांनी त्या सीमा मान्य करून घेतल्या. याची ठळक उदाहरणे म्हणजे  त्यांनी ब्रह्मदेश भारतापासून वेगळा केला. बंगालची फाळणीही केली होती. 

सिक्कीम (तेव्हा सिकीम स्वतंत्र होता), भूतान, नेपाळ, तिबेट, श्रीलंका, ब्रह्मदेश, अफगाणिस्तान,  या साऱ्या भूभागात आज जे सीमावाद आढळतात, त्याच्या मुळाशी तेव्हाची ब्रिटिश राजवट आहे. भारताने मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या सर्व शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवले. याला अपवाद आहे पाकिस्तान. भारताशी स्पर्धा आणि वैर जोपासतच आजवर पाकिस्तान वावरत आला आहे. 

  राजीव गांधी यांच्या कार्यकाळात साऊथ एशियन असोसिएशन फॅार रीजनल कोॲापरेशन (सार्क)  या आर्थिक आणि भूराजकीय संघटनेची स्थापना झाली. 8 डिसेंबर 1985 ला भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि  मालदीव हे सार्कचे सदस्य होते अफगाणिस्तानचा सदस्य म्हणून प्रवेश 2007 मध्ये झाला. बरीच वर्षे या देशांची ‘सार्क’ ही संघटनाही चांगली चालली.  शीतयुद्धात अगोदर सोव्हिएत युनियन प्रमुख देश होता.  त्याची जागा पुढे  चीनकडे आली.  चीनने तर आपल्या कपटजालात भारताच्या एकेका शेजाऱ्याला घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. भूतानच नव्हे तर इतरही देशांनी भारतावर अवलंबून राहू नये, असे चीनला वाटते. चीनने या सर्व देशांवर सवलतींचा आणि कर्जाचा मारा केला. मात्र, चिनी कर्जाचा विळखा कसा घट्ट असतो, याचा अनुभव श्रीलंकेने तर घेतला आहेच, पण आता उरलेल्या इतर देशांनाही ते माहीत झाले आहे. भूतानवरही चीनने डाव टाकण्यास  केव्हाच सुरवात केली आहे. शक्तिशाली चीनच्या दबावामुळे भूतानची अनेकदा अडचण झालेली आहे. त्याला चीनची मनमानी खपवून घ्यावी लागली आहे.

           चीनची चाल 

   भारत जेवढी मदत करतो किंवा प्रकल्प उभारून देतो; त्याच्या दुप्पट पैसा आम्ही उपलब्ध करून देऊ हा चीनचा दावा एक कावामात्र आहे.  अनेक छोटे देश अशाप्रकारच्या आमिषाला बळी पडले आहेत.  त्यात नेपाळ, श्रीलंका यांची नावे आघाडीवर आहेत. आता कर्जावरचे व्याज फेडण्यासाठीही कर्ज उभारण्याची वेळ त्यांच्यावर येते आहे. अशावेळी काही महत्त्वाच्या सवलती मिळणे किंवा काही भूभागावर कायमस्वरुपी अधिकार स्थापित करून घेणे  अशा अटी चीनकडून पुढे येत असतात. श्री लंकेला हंबनटोला  बंदर आणि भोवतालची 1500 एकर जागा 99 वर्षांच्या लीजवर चीनच्या स्वाधीन करावी लागली.  मात्र भारताचे या देशांशी प्राचीन काळापासून सांस्कृतिक, सामाजिक आणि  राजकीय संबंध आहेत. पण त्यांना सतत उजाळा मिळत असायला हवा. यातील सर्वात मोठा  समान दुवा समान संस्कृती हा आहे. भूतानमध्ये ८३ टक्के नागरिक बौद्ध आहेत. उरलेले हिंदू आहेत. यावर मोदी आजवर भर देत आले आहेत. मोदी टच म्हणतात, तो हाच.   पण भौतिक बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ही व्यावहारिकताही मोदींमध्ये आहे. भूतानच्या बाबतीत आणखीही एक तपशील  महत्त्वाचा आहे. त्याला आधुनिकतेचे खास आकर्षण नाही.  भारत आणि  चीन या दोन बड्या राष्ट्रांच्या मधोमध  आपल्याला रहायचे आहे, या दडपणाखाली आजचा भूतान वावरतो आहे. त्याची दोन्ही राष्ट्रांशी जुळवून घेण्याची भूमिका भारताने समजून घेऊन वागले पाहिजे. चीनचा भूतानशीही सीमाविवाद आहे. भूतानचा काही भाग चीनला हवा आहे. मात्र, गेले काही दिवस हा विवाद चीनने काहीसा मागे ठेवला आहे.  अर्थात, चीनने तिबेटचे काय केले किंवा उद्या चीन तैवानचे काय करण्याच्या बेतात आहे, याबद्दलचे विचार  भूतानच्या मनात असणारच.  चीनची चतूर चाल लक्षात घेऊनच मोदींनी आपल्या नुकत्याच पार पडलेल्या भेटीत दोन्ही देशांमधील परस्पर विश्वासाची भावना  वाढीस नेण्यावरच संपूर्ण भाषणात भर दिला होता.  भूतान आणि भारत यांच्यात  मैत्रीबरोबरच परस्पर विश्वासाचे संबंधही सतत कसे वाढत राहतील, दृढ होत जातील  हे सूत्र समोर ठेवूनच मोदी भूतानमध्ये वावरत होते. येत्या काळात भूतानला भारत तब्बल दहा हजार कोटी रुपयांची मदत नाममात्रही अपेक्षा न ठेवता का देतो आहे, यामागचे कारण सांगण्याची आवश्यकता नसावी. ही मदत सकारात्मक स्वरुपाची आहे. ती मुख्यत: भूतानमधील माता आणि बालकांसाठीच्या मोठ्या रुग्णालयाचा विकास व्हावा यासाठीही आहे. अशाप्रकारे मुळातच आनंदी असलेल्या भूतानवासीयांचे जीवन अधिक सुकरही व्हावे हाही उद्देश या मदतीमागे आहे, याचीही नोंद घ्यावयास हवी आहे.

Tuesday, April 2, 2024

 


मालदीव (उत्तरार्ध)

तरूणभारत, नागपूर/मुंबई मंगळवार / रविवार दिनांक 00. 00. 2024 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॉगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?  मुंबई 

म्यानमारमध्ये झालेली चूक 

  मुळात मुईझ्झू यांच्या अगोदरच्या अध्यक्षांनी म्हणजे अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम  यांनी  भारताचा विरोध आणि द्वेश म्हणून चीनशी जवळीक साधायला सुरवात केली होती. एवढेच नव्हे तर त्यांना पाकिस्तानविषयी विशेष प्रेम आहे. 18 सप्टेंबर 2016 च्या पाकिस्तानप्रणित भारतातील उरी हल्ल्ल्यानंतर भारताने सार्क या संघटनेच्या पाकिस्तानमधील संमेलनावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले असता यामीन यांनी खूप खळखळ केली होती. चीनधार्जिण्या अब्दुल्ला यामीन यांची मालदीवमधील  कारकीर्द 2013 ते 2018 पर्यंत होती. या काळात त्यांच्या प्रोत्साहनाने मालदीव मधून अनेक तरूण प्रशिक्षण घेऊन अतिरेकी बनून सिरीयात इसीसमध्ये सामील होण्यासाठी  गेले होते. मुस्लीम मूलतत्त्वादाला आवर न घालता उलट यामीन यांनी त्याचा पुरस्कारच केला होता. मुईझ्झू यांनी यामीन यांची री ओढत चीनशी करार केला आहे. पण भारत आणि  अन्य लोकशाही देशांनी म्यानमारचे बाबतीत जे केले ते मालदीवबाबत करून चालणार नाही. मालदीवमधील निदान निम्मी  जनता आजही भारताच्या बाजूची आहे. म्यानमारचे बाबतीत एक मोठी चूक लोकशाही देशांनी केली होती.  रीतसर निवडणूक लढवून म्यानमारमध्ये सत्तेवर आलेल्या सरकारला तेथील लष्कराने पदच्युत केले. याचा निषेध म्हणून अन्य राष्ट्रांनी म्यानमारशी असलेले व्यापारी संबंध तोडून टाकले. लष्करी राजवटीने ही कोंडी फोडण्यासाठी चीनला मदत मागितली. चीनसाठी तर  ही आयतीच चालून आलेली पर्वणी होती. आज म्यानमार फार मोठ्या प्रमाणात चीनच्या कह्यात गेला आहे. त्यामुळे जी चूक म्यानमारचे बाबतीत झाली ती मालदीवच्या बाबतीत व्हायला नको, हे लोकशाही राष्ट्रांना कळले आहे.  मुईझ्झू यांनी मालदीवमध्ये भारताविरुद्ध जे द्वेशाचे वातावरण निर्माण करण्यास सुरवात केली आहे, त्यावर उपाय तर करायलाच हवा पण त्याचवेळी मालदीव चीनच्या कच्छपी लागणार नाही, याचीही काळजी भारताला घ्यावी लागणार आहे. राजकारणात अनुकूल संधी हेरता आली पाहिजे, तोपर्यंत दमाने घेण्यातच शहाणपणा असतो.

     उपद्रव थांबले पाहिजेत.

  भारताचे शत्रू  मालदीवचा वापर आपल्या विध्वंसक कारवायांसाठी करू शकतात. इसीस सारख्या दहशतवादी संघटनेने तर मालदीव हे आपले केंद्र म्हणूनच मानले आहे. केरळपासून मालदीव जवळ असल्यामुळे मालदीववर वर्चस्व वाढवणाच्या प्रयत्नात असलेली पाकिस्तान व चीन सारखी राष्ट्रे जशी भारतासाठी धोकादायक ठरली आहेत, तशीच इसीससारखी दहशतवादी संघटनाही उपद्रवी ठरू शकते.       

   मालदीवच्या काही राजकारण्यांनी तर आताच लक्षद्वीपच्या दक्षिण भागावर म्हणजेच मिनीकॉय बेटांवर दावा सांगण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत मात्र मालदीवला त्याची जागा दाखवून देण्याची गरज आहे.  तरीही भारतासारखा प्रचंड आणि सामर्थ्यशाली देश ‘चिलटासारख्या चिमुकल्या बिचाऱ्या मालदीवला धमकावतो आहे’, असे चित्रही निर्माण होणे भारताच्या हिताचे नाही.  1988 साली मालदीवमध्ये बंडाची परिस्थिती उद्भवली होती. भारताने मालदीव सरकारच्या विनंतीनुसार सेनादले पाठवून बंड मोडून काढले होते  पण आजची स्थिती वेगळी आहे. लोकशाही मार्गाने मालदीवमधील सत्तारूढ झालेल्या पक्षानेच भारतविरोधी भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे 1988 सारखी कारवाई भारत करू शकणार नाही.

   भारतसमर्थक मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीचे मोहम्मद सोली यांचे समर्थक 46% आहेत. जवळच्या आणि मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या भारताची जागा दूर अंतरावरचा आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेला चीन घेऊ शकणार नाही, हे मालदीवच्या ऱ्हस्वदृष्टीच्या काही नेत्यांना जरी नाही तरी जनतेला  आणि जुन्या जाणत्या राज्यकर्त्यांना कळू लागले आहे. शिक्षण, औषधोपचार, व्यापार आदी बाबतीत भारताचा मालदीवला मोठा आधार आहे. ‘शेजारी प्रथम’ ही भूमिका बाळगून भारताचे मालदीवशी वर्तन राहत आले आहे. त्यामुळे आज ना उद्या मालदीवच्या नेत्यांची भारताबद्दलची आक्रस्तळेपणाची भूमिका नक्की बदलेल, असे राजकीय निरीक्षकांना वाटते आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका यांनाही भारताचा मालदीवसोबतचा सहभाग त्यांच्याही हिताचाच  आहे, याची जाणीव आहे. अध्यक्ष राष्ट्रपती मोहम्मद नाशीद (2008-12) यांच्या कार्यकाळात 10 वर्षांच्या ‘अॅक्विझिशन अॅंड क्रॅास-सर्व्हिसिंग अॅग्रिमेंटवर’ (एसीएसए)  स्वाक्षरी केली. पुढे या कराराचा विस्तार ‘स्टेटस ऑफ फोर्सेस ऍग्रिमेंट’(सोफा) व्हावयाचा होता. या निमित्ताने त्यावेळी मालदीवने अमेरिकेला लष्करी तळ देण्याचीही ऑफर दिल्याची समोर आले होते.  परंतु हा प्रस्ताव पुढे सरकला नाही.

  गेल्या महिन्यात फेब्रुवारी 2024 मध्ये  मॅारिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि पंतप्रधान मोदी यांनी संयुक्तपणे मॅारिशस बेटसमूहावर नवीन विमानतळ आणि शिवाय जेटी यांचे लोकार्पण केले आहे. भारताच्या मोठ्या विमानांना हे विमानतळ उपलब्ध असणार आहे. समुद्रकिनारा असलेल्या अन्य देशांशी (लिटोरल स्टेट्स) आपले संबंध वृद्धिंगत करण्यावरही भारताचा भविष्यात विशेष भर असणार आहे. भारताने मालदीवला आपणही पर्याय शोधू शकतो, हे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले आहे. 

    मालेचा मेयर आणि मोदीची मॅजिक 1

 सप्टेंबर 2023 मध्ये चीनधार्जिण्या पीपल्स नॅशनल कॅांग्रेसच्या मुईझ्झू यांनी  भारतस्नेही मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीच्या मोहम्मद सोली  यांचा पराभव केला. नंतर लगेचच म्हणजे  13 जानेवारी 2024 ला तीनच महिन्यांनी मालदीव मधल्या माले या सर्वात मोठ्या शहरात मेयरपदासाठी निवडणूक झाली. या अगोदर खुद्द मुईझ्झू हेच या शहराचे मेयर होते. अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांनी मालेच्या मेयरपदाचा राजीनामा दिला होता. या निवडणुकीत सोलींच्या मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीच्या अदम अझीम यांनी मुईझ्झू यांच्या पीपल्स नॅशनल कॅांग्रेसच्या ऐशाथ अझीमा यांचा दणदणीत पराभव केला.  या निकालाचे मालदीवमध्ये ‘मोदी मॅजिक’, म्हणून कौतुक केले गेले. भविष्यात जनमताचा रेटा असाच वाढत जातो किंवा कसे, ते बघायला हवे. पण त्यासाठी सद्ध्या मालदीवमध्ये जी अंतर्गत घालमेल सुरू आहे तिचीही नोंद घ्यायला हवी आहे.

     आता मालदीवमध्ये राजकारणात संघर्ष सुरू झाला आहे. प्रथेनुसार मालदीवच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे / मोहम्मद मुइझ्झू यांचे संसदेच्या बैठकीत पहिले अध्यक्षीय भाषण झाले.  तेव्हा देशातील दोन प्रमुख विरोधी पक्ष मोइज्जू यांच्या संसदेतील भाषणाला उपस्थित राहिले नाहीत. एक म्हणजे सोलींचा  विरोधी पक्ष-मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) आणि दुसरा म्हणजे 11 पेब्रुवारीला 2023 ला मोहम्मद नाशीद यांनी स्थापन केलेल्या डेमोक्रॅट्स पार्टी या दोघांनी मुइझ्झू यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला. या दोन्ही पक्षांनी मुइझ्झूंच्या भारतविरोधी भूमिकेवर सडकून टीका केली आहे.  संसदेने निलंबित केलेल्या ‘त्या’तीन मंत्र्यांची पुनर्नियुक्ती झाल्यामुळेही हे पक्ष संतापले आहेत. भारतीय सैनिकांना बाहेर काढण्याच्या मुइझ्झूंच्या निर्णयावरही हे पक्ष अतिशय नाराज आहेत. या दोन्ही विरोधी पक्षांनी भारताला देशाचा 'सर्वात जुना मित्र' म्हणून संबोधले आहे आणि सध्याच्या नवीन प्रशासनाने भारतविरोधी भूमिका स्वीकारल्याबद्दल मुइझ्झू यांची निर्भर्त्सना  केली आहे.

    या दोन्ही पक्षांची भूमिका थोडक्यात काहीशी  अशी आहे, 'एमडीपी आणि डेमोक्रॅट पक्ष  या आम्हा दोन्ही पक्षांचा ठाम विश्वास आहे की, ‘कोणत्याही विकास भागीदारापासून आणि विशेषत: देशाच्या सर्वात जुन्या मित्रापासून (म्हणजे भारतापासून) दूर राहणे देशाच्या दीर्घकालीन विकासासाठी अत्यंत हानिकारक  सिद्ध होईल. मालदीवच्या स्थैर्यासाठी आणि सुरक्षेसाठी हिंदी महासागरातही स्थैर्य आणि सुरक्षा असणे अतिशय आवश्यक आहे.’ 

  पण नवीन धोरणानुसार 'कुणाही एका देशावर (भारतावर?) विसंबून राहू नये', म्हणून मालदीवने तुर्कीकडून  दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेली धान्ये, जसे तांदूळ, गहू आदी, आयात  करीत भारताला डावलण्यास सुरवात केली आहे, ही बाबही विरोधकांना मुळीच मान्य नाही. 

मोदी मॅजिक 2 ची पुनरावृत्ती ?   

 21 एप्रिल 2024 रोजी मालदीवमध्ये संसदीय निवडणुका होणार आहेत,  मालदीवमध्ये एकूण 93 संसदीय जागांसाठी एकूण 389 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सर्वाधिक उमेदवार हे भारत समर्थक विरोधी पक्ष मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे (एमडीपी) आहेत,  ते 90   जागा लढवत आहेत, त्यानंतर प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (PPM) आणि पीपल्स नॅशनल कॅांग्रेस (पीएनसी) यांची मुख्य सत्ताधारी आघाडी आहे. ते 89  जागांवर निवडणूक लढवत आहेत. मालदीवचे चीन समर्थक कडवे सुन्नी मुस्लीम आणि मालदीवचे विद्यमान अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू पीएनसीचे नेते आहेत, ते गेल्या वर्षी भारतविरोधी भूमिका घेऊन सत्तेवर आले होते. आता संसदीय निवडणुकीत भारत समर्थक आणि चीन समर्थक यातील कोणता पक्ष जास्त जागा जिंकतो, यावर बरेच काही अवलंबून असेल. मोदी मॅजिक 2 याहीवेळी कमाल करते किंवा कसे ते 22/23 एप्रिल 2024 ला संसदीय निवडणुकीचे  निकाल लागल्यावरच  केल. तोपर्यंत प्रतीक्षा करणे आले.