अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेत सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे स्वरूप आपल्या येथील निवडणुकीपेक्षा वेगळे आहे. तिचे स्वरूप ढोबळमानाने असे सांगता येईल. प्रथम पक्ष स्तरावर गावपातळी पासून देश पातळीपर्यंत प्रतिनिधींची निवड पक्ष सदस्य तसेच पक्षाचे चाहते असलेले मतदारही करतात. पण यासाठी चाहत्यांना नोंदणी(रजिस्ट्रेशन) करावी लागते. जो मतदार रिपब्लिकन पक्षाचा चाहता म्हणून नोंदणी करील, त्याला डेमोक्रॅट पक्षाचा चाहता म्हणून नोंदणी करता येत नाही. गाव, काउंटी(जिल्हा) व प्रांत पातळीवर अशा प्रकारे प्रतिनिधींची निवड होते. हे प्रतिनिधी उमेदवारी मागणाऱ्यांमधून इच्छुक उमेदवारांना क्रमवारी देतात. सध्या प्रांतस्तरावर अशा निवडणुकी घेतल्या जात असून त्यात रिपब्लिकन पक्षात डोनाल्ड ट्रंप तर डेमोक्रॅट पक्षात हिलरी क्लिंटन आघाडीवर आहेत. थोडक्यात असे की, पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी या निवडणुकी होत आहेत. आपल्यासाठी हा प्रकार नवीन आहे. आपल्या येथे पक्षाचे सांसदीय मंडळ किंवा पक्षश्रेष्ठी इच्छुकांपैकी एकाची निवड करतात.
मग देश पातळीवर पक्षाचे अधिवेशन होते. त्या ठिकाणी निवडणुकीने अध्यक्षपदाचा प्रत्येक पक्षाचा उमेदवार ठरतो. पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याची ही अशी काहीशी पद्धत आहे. यात अनेक बारीक तपशील आहेत.
रिपब्लिकन पक्षात आज डझनभर संभाव्य उमेदवार आहेत. सामान्यत: यांच्यात आपापसात लढत होऊन शेवटी देशपातळीवरच्या अध्यक्षपदासाठी ( बहुदा दोनच) दोन इच्छुक उरतील. यातून पक्ष अध्यक्षपदाचा आपला उमेदवार निश्चित करील. गाव पातळीपासून क्रमाने पुढे जात देश पातळीवरचे प्रतिनिधी निवडण्यासाठी प्रत्येक पक्षात पक्षांर्गत निवडणुकी सुरू झाल्या आहेत. आपल्याच पक्षातील आपल्या प्रतिस्पर्ध्याचा 'पत्ता कट करण्यासाठी' हालचाली व डावपेच सुरू झाले आहेत. त्यांचेच वृत्त सध्या कानावर येत असते.
डेमोक्रॅट पक्षातही अशीच पद्धत असणार. पण त्या पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरल्यातच जमा आहे. माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी असलेल्या पण कर्तृत्वाने तेवढ्याच किंवा काकणभर सरस असलेल्या हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार असतील.
जोडगोळीला मत द्यावे लागते.
पक्ष फक्त अध्यक्षपदाचाच उमेदवार निश्चित करीत नाही तर उपाध्यक्षपदाचा उमेदवारही निश्चित करतो. निवडणुकीत मतदार या जोडीला मतदान करतात. एका जोडीतला अध्यक्षपदाचा उमेदवार आणि दुसय्रा जोडीतला उपाध्यक्षपदाचा उमेदवार असे मतदान करण्याची मुभा मतदारांना नसते.
अध्यक्षपदाच्या मतपत्रिकेत प्रत्येक पक्षाची जोडगोळीची (अध्यक्षपदाचा उमेदवार आणि उपाध्यक्षपदाचा उमेदवार) नावे असतात. रिपब्लिकन व डेमोक्रॅट असे दोनच मुख्य पक्ष असले तरी दोनचार चिल्लर पक्षही असतात. यातील एकही जोडी पसंत नसेल तर मतदार आपल्या पसंतीची जोडी मतपत्रिकेत आपल्या हस्ताक्षरात नोंदवू शकतो. अर्थात ही किंवा अशी जोडी निवडून येण्याची शक्यता नसते. पण मतदाराला हे स्वातंत्र्य आहे.
कुठून कसे उगवले ट्रंप?
वय वर्ष ६९ असलेले, जगमान्य पेन्सिलव्हॅनिया विद्यापीठाची अर्थशास्त्राची पदवी पदवी संपादन केलेले, दोनदा घटस्फोट घेणारे, तीन मुले व दोन मुलींचे पिता असलेले डोनाल्ड ट्रंप हे रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत.त्यांना भरघोस पाठिंबाही मिळतो आहे.
आता काहीशा उशिराने ट्रंप यांना विरोध व्हायला सुरवात झाली आहे. ते बिल्डर आहेत. ते अमेरिकन टेलिव्हिजन उद्योगातही आघाडीवर आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. त्यांची माफियांशी साठगाठ आहे, अशी बोलवा आहे. शोध पत्रकार त्यांचा पिच्छा पुरवीत आहेत. पण अजून तरी महत्त्वाचे असे फारसे काही कोणाच्याही हाती लागलेले नाही. ट्रंप यांचा वारू बेफाम घोडदौड करीत चालला आहे. पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उमेदवार गलितगात्र होत आहेत.
हे महाशय कुठून कसे उगवले ते कोणालाच कळत नाही. यापूर्वी राजकारणाचा मुळीच अनुभव नसलेले, वडलांचाच बांधकाम व्यवसाय चढउतारावर मात करीत सांभाळणारेब एक उद्योगपती, मध्यपूर्वेतील मुस्लिमबहुल भागत भागात व्यवसाय करतांना मुस्लिमांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करणार, पक्के ‘व्यवहारी’ म्हणून ओळख असलेले, केवळ विवेकशून्य व भडकावू भाषणामुळेच उदंड लोकप्रियता संपादन करणारे, अतिशय मर्यादित राजकीय समज व ज्ञान असलेले, नको तेवढा स्पष्टपणा, मनमोकळेपणा, बेदरकारपणा हेच भांडवल असलेले डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष होण्यासाठी सरसावले आहेत. यांची बेफाम विधाने गाजत आहेत, त्यांची लोकप्रियता दिवसेदिवस वाढतच आहे. राजकीयदृष्ट्या जी किंवा ज्या प्रकारची विधाने करू नयेत, असे मानले जाते, त्या विधानांमुळेच ट्रंप लोकप्रिय होत चाललेले पाहून राजकीय विश्लेषकांनी व पंडितांनी आपल्या मतांचा पुन्हा नव्याने विचार करायला सुरवात केली आहे.
बेफाम व बेछुट विधाने
१. ओबामा आणि हिलरी क्लिंटन हे दोघेच मुस्लिम दहशतवादी संघटना आय एस च्या निर्मितीसाठी जबाबदार आहेत,
२. केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांनाही ठार केले पाहिजे.
३. इंटरनेटमुळे दहशतवाद फोफावला म्हणून इंटरनेटवरच नियंत्रण आणले पाहिजे.
४. बिगर अमेरिकनांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये. आजवर घुसलेल्या सव्वा कोट लोकांना अमेरिकेतून हकलून लावले पाहिजे.
५. मेक्सिको हा अमेरिकेला लागून असलेला देश आहे. या देशातून अमेरिकेत अनेक लोक बेकायदा अमेरिकेत प्रवेश करीत असतात. म्हणून या दोन देशात चीनप्रमाणे मेक्सिकोच्या खर्चाने एक अजस्त्र भिंत बांधली पाहिजे. (मेक्सिको देशाने ह्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला आहे.)
६. मुस्लिमांवर तर अमेरिकेत प्रवेशबंदीच घातली पाहिजे.
७. ट्रंप स्त्रीविरोधी आहेत. कार्ली फिओरिना ही त्यांची प्रतिस्पर्धी स्त्रीउमेदवार आहे. ती दिसायला सुंदर आहे. तिच्या दिसण्यावरून ट्रंप यांनी अश्लील शब्दात टीका केली आहे.
८. अमेरिकेतील नोकऱ्यांवर चीन व भारतीय लोकांनी कब्जा मिळवला आहे, तो दूर करण्याची ट्रंप यांची भूमिका आहे. अमेरिकेतील वृत्तपत्रांनी या विधानावर टीका करताच, मी निवडून आलो तर अब्रुनुकसानीचा कायदा आणखी कडक करून टीकाकारांना वठणीवर आणीन, अशी गर्जना ट्रंप यांनी केली आहे. भरपाईची रक्कम एवढी असेल की, संबंधिताला आयुष्यभर पैशासाठी काम करण्याची गरजच पडणार नाही.
महासत्ता व परिपक्वता हातात हात घालून असतात, असे नाही.
आश्चर्याची बाब ही आहे की, प्रत्येक बेछुट विधानानंतर त्यांची लोकप्रियता बेफाम वाढली. अमेरिका महासत्ता आहे, हे खरे; पण म्हणून अमेरिकन जनमानस परिपक्वच असले पाहिजे, असे थोडेच आहे? असे असते तर ट्रंप यांना अफाट लोकप्रियता मिळाली नसती. त्यांना सध्या पक्षांतर्गत निवडणुकीत ४६ टक्के मते मिळाली आहेत. त्यांचा नजीकचा प्रतिस्पर्धी तब्बल २२ टक्क्यांनी मागे आहे. यामुळे खुद्द रिपब्लिकन पक्षाचे धुरीणही चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांची रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून सुरू असलेली घोडदौड कशी थांबवावी, हे त्यांना कळेनासे झाले आहे. जग उदारमतवादी होत चालले आहे, हा समज खोटा ठरविणारी ही घटना आहे. आपल्याच देशाचा विचार करायचा ही वृत्ती, धार्मिक कट्टरता, वंशश्रेष्ठता ह्या वृत्ती जगात पुन्हा एकदा डोके वर काढतांना दिसत आहेत. ट्रंप यांना खरेच उमेदवारी मिळाली तर काय करायचे यामुळे जसा रिपब्लिकन पक्ष चिंताग्रस्त आहे त्याचप्रमाणे, त्यांना उमेदवारी मिळाली व ते खरंच निवडून आले तर काय होणार, ही चिंता जगाला सतावू लागली आहे.
अमेरिकन जनमत समंजस आहे, असे सर्वसाधारण जनमत आहे. याला च्छेद देणाऱ्या घटनाही काही कमी नाहीत. जाॅर्ज बुश निवडून आले होतेच ना. या महाशयांनी जगावर खोटी युद्धे लादली होती. सद्दाम हुसेन अण्वस्त्रे तयार करतो आहे, असा आळ घेऊन त्याला संपवले होते. पुढे हे विधान खोटे निघाले तेव्हा, आम्हाला चुकीची माहिती मिळाल्यामुळे असे झाले, असे म्हणून किंचितही संकोच न बाळगता ते नामानिराळे झाले होते, हा इतिहास आहे.
करायला गेलो काय अन् .....
असे म्हणतात की, ट्रंप यांनाच रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळावी, अशी डेमोक्रॅट पक्षालाही मनातून वाटत होते. इतर कुणापेक्षा त्यांना मात देणे सोपे जाईल, असा त्या पक्षाचा कयास होता. म्हणून तसे त्यांचे आतून प्रयत्नही होते. अशा क्लृप्ती वापरणे व प्रतिपक्षात कलागती लावणे हेही तिथे नवीन किंवा निषिद्ध नाही. पण आज डेमोक्रॅट पक्षालाही चिंता वाटू लागली आहे. करू गेलो काय आणि झाले काय, असे वाटण्यासारखी त्या पक्षाची स्थिती झाली आहे. अर्थात उद्या ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाली तर ते सर्वस्वी डेमोक्रॅट पक्षाचे श्रेय असणार नाही, याचीही नोंद घेतली पाहिजे.

No comments:
Post a Comment