उशिराने सुचलेले शहाणपण की बदललेली रणनीती
वसंत गणेश काणे ,
२७२१, प्राईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क,
पेन्सिलव्हॅनिया
फ्लोरिडा हे अमेरिकेतील महत्त्वाचे राज्य आहे ते या दृष्टीने की निकालाला कलाटणी देणयाचे सामर्थ्य ज्या मोजक्या राज्यांमध्ये आहे, त्यात या राज्याचा समावेश होतो. या राज्याच्या वाट्याला २९ इलेक्टर्स आहेत. २००८ व २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाने या राज्यात ५० टक्यांपेक्षा जास्त मते घेतली होती म्हणून ‘विनर टेक्स अॉल’ या नियमानुसार डेमोक्रॅट पक्षाचे सर्व म्हणजे २९ इलेक्टर्स निवडून आले होते. २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाला जेमतेम एक टक्याची बढत मिळाली होती. हे राज्य २०१६ साली ५० टक्यापेक्षा जास्त मते मिळवून डोनाल्ड ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षकडे खेचून आणायचे आहे.
तुष्टिकरणाची राजनीती - मेक्सिकोची सरहद्द ओलांडून बेकायदा प्रवेश करता येऊ नये म्हणून भिंत बांधण्याचा अट्टाहास जरी त्यांनी कायम ठेवला तरी मेक्सिकन मतदारांना खूष करण्याचा भरपूर प्रयत्न त्यांनी केला.
तुम्हाला सुख व समृद्धीचे जीवन जगता आले पाहिजे. रस्त्यावर चालतांना बंदुकीच्या गोळीला बळी पडू की काय अशी धास्ती वाटू नये. तुमच्या मुलांचा चांगल्या शिक्षणावर अधिकार असला पाहिजे. स्वत:च्या मालकीचे चांगले घर व चांगले जीवन जगायला तशीच चांगली नोकरी मिळायला हवी. अध्यक्षपदी निवडून आल्यावर मी हे घडवून आणीन. अशाच प्रकारचे आश्वासन त्यांनी आपल्या आफ्रिकन-अमेरिकन मतदांना दिले आहे.
तुष्टीकरण हे दुधारी शस्त्र असते, हे या राज्यात दिसून आले. भिंत घालून बेकायदेशीर रीत्या घुसणाऱ्या मेक्सिकन लोकांना थोपवण्याचा मुद्दा गोऱ्या अमेरिकन लोकांची (त्यातही सनातनी गोऱ्यांची) मते मिळवून देईल पण अशा प्रकारे आजवर येऊन नागरिक व मतदार झालेल्यांना दुखावेल. डोनाल्ड ट्रंप यांनी ही तारेवरची कसरत साधायचा प्रयत्न केलाय खरा पण दोन्ही डगरीवर हात ठेवण्याचा प्रयत्न किती फलदायी ठरला, हे ८ नोव्हेंबरलाच कळेल.
याचवेळी ट्रंप यांनी डेमोक्रॅट पक्षावरही हल्ला चढवला. ते तुम्हाला गृहीत धरतात. माझ्या धोरणावुसार तुम्हाला तुमचा व्पारउदीम करता येईल, गाठी पैसा साठवता येईल.
अमेरिकेत प्रचारसभा मैदानात न होता वातानुकूलित विशाल सभागृहात होत असतात. यावेळी तर बाहेर वीज वारावादळाचे थैमान सुरू होते आणि आत ट्रंप गर्जत होते. एवीतेवी त्यांनी आजवर तुमची उपेक्षाच केली आहे. मग मला मत देऊन का बघत नाही. तुमची सगळी दुखणी मी दूर करीन. अहो, हे माझे दुसरे घरच आहे. माझी अनेक रिझाॅर्ट्स फ्लोरिडामध्ये आहेत.
बेकायदेशीर रीत्या घुसलेल्यांना बळजबरीने हद्दपार करीन, अशी ट्रंप यांची घोषणा होती पण तिचा उल्लेखही त्यांनी केला नाही. कारण त्यांचेच बरेच भाईबंद अशाच बेकायदेशीरपणे घुसून आता फ्लोरिडात मतदार झाले आहेत. हा धोरणातील नरमपणा समजायचा की कुठे काय बोलावे किंवा बोलू नये, याबाबतचे शहाणपण समजायचे?
स्विंग स्टेट्स २०१२ - या नंतर ट्रंप यांचे पाय वळणार आहेत ओहायओ (१८ इलेक्टोरल व्होट्स), नाॅर्थ कॅरोलिना, (१५ इलेक्टोरल व्होट्स), पेन्सिलव्हॅनिया ( २० इलेक्टोरल व्होट्स) या स्विंग स्टेट्सकडे.
ओहायओ या राज्याच्या वाट्याला १८ इलेक्टोरल व्होट्स म्हणजेच इलेक्टर्स असून २००४, २००८ व २०१२ साली अनुक्रमे रिपब्लिकन पक्ष, डेमोक्रॅट पक्ष व डेमोक्रॅट पक्ष यांना सर्वच्या सर्व म्हणजे १८ इलेक्टोरल व्होट्स म्हणजेच इलेक्टर्स मिळाली होती. २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाला दोन टक्याची बढत मिळाली होती. हे राज्य हे राज्य २०१६ साली ५० टक्यापेक्षा जास्त मते मिळवून डोनाल्ड ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षाकडे खेचून आणायचे आहे.
नाॅर्थ कॅरोलिना या राज्याच्या वाट्याला १५ इलेक्टोरल व्होट्स म्हणजेच इलेक्टर्स असून २००४, २००८ व २०१२ साली अनुक्रमे रिपब्लिकन पक्ष, डेमोक्रॅट पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांना सर्वच्या सर्व म्हणजे १५ इलेक्टोरल व्होट्स म्हणजेच इलेक्टर्स मिळाली होती. २०१२ मध्ये रिपब्लिकन पक्षाला २.२ टक्याची बढत मिळाली होती. ही बढत टिकवून हे राज्य २०१६ साली ५० टक्यापेक्षा जास्त मते मिळवून डोनाल्ड ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षकडेच टिकवून ठेवायचे आहे.
पेन्सिलव्हॅनिया या राज्याच्या वाट्याला २० इलेक्टोरल व्होट्स म्हणजेच इलेक्टर्स असून २००४, २००८ व २०१२ या तिन्ही साली डेमोक्रॅट पक्षाला सर्वच्या सर्व म्हणजे २० इलेक्टोरल व्होट्स म्हणजेच इलेक्टर्स मिळाली होती. २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाला भरपूर म्हणजे ५.२ टक्याची बढत मिळाली होती. हे राज्य २०१६ साली ५० टक्यापेक्षा जास्त मते मिळवून डोनाल्ड ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षाकडे खेचून आणायचे आहे. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच कदाचित सध्या डोनाल्ड ट्रंप यांचा सूर एकदम बदलला आहे. त्यांची भाषा काहीशी मवाळ झाली आहे. डोनाल्ड ट्रंप यांना नरम राजनीतीचा साक्षात्कार होण्यामागचे हे जसे एक कारण असावे तसेच याचे आणखीही एक कारण संभवते. ते आहे पुतळ्यांचे पीक.
पुतळ्यांचे पीक - ट्रंपना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरवात झाली आहे. अमेरिकेत पुतळेच पुतळे उभारण्यास सुरवात झाली आहे. या पूर्वी कधीही पाहिले नसतील असे पुतळे. कुणाचे म्हणाल तर डोनाल्ड ट्रंप यांचे. मग त्यात विशेष काय? अहो, ते पूर्णाकृती पुतळे पूर्णपणे विवस्त्र आहेत. जणू असा आहे हा ट्रंप, असे पुतळे उभारणाऱ्यांना म्हणायचे आहे. अमेरिकेत संपूर्ण देशभर असे पुतळे रात्रीतून उभारले जात आहेत. अमेरिकन लोकांचीही कमाल आहे! काही त्यांच्यासोबत चक्क सेल्फी काढत आहेत!! पार्कांचे/ बगीच्यांचे/ रस्ते व्यवस्थापनाचे अधिकारी मात्र ते पुतळे तत्परतेने काढून/कापून टाकीत आहेत. कारण काय? तर पूर्वअनुमती न घेता पुतळे उभारले म्हणून. नग्न पुतळा उभारला म्हणून नाही? एक पुतळा कापून काढल्यानंतर पाय तसेच उरले तेव्हा एक महिला म्हणाली, ‘तेही घेऊन जा की, ते सुद्धा नकोत’.
टोकाचा प्रचार - रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीयपदाच्या अधिकृत उमेदवाराचे नग्न पुतळे देशभरातील मोठमोठ्या शहरात ठिकठिकाणी उभारले जात आहेत. कुणाच्या सुपीक डोक्यातील ही कल्पना आहे? त्या गटाचे नाव आहे इंडेक्लाईन. त्यांना ही कल्पना एका रिॲलिटी शो वरून सुचली. ‘दी ॲप्रेंटिस ‘, नावची ही टी व्ही रिॲलिटी सीरिज होती. ही सीरिज डोनाल्ड ट्रंप यांनी होस्ट केली होती, असे म्हणतात. त्या मालिकेतील एका दृश्यावरून पुतळे उभारण्याची ही कल्पना सुचली असावी, असा काहींचा अंदाज आहे. अमेरिकेतील राजकीय आणि सैनिकी सर्वोच्चपद डोनाल्ड ट्रंप यांना कधीही बळकावता येऊ नये, म्हणून आपली ही मोहीम आहे, असे या गटाचे म्हणणे आहे. यासाठी एका खास मूर्तिकाराची योजना करण्यात आली होती. डोनाल्ड ट्रंप यांचा चेहरा अतिशय उग्र व कडक असून पोट ढेरपोटे दाखविले आहे. डोनाल्ड ट्रंप यांची उमेदवारी अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध व शिवराळ व्यक्तिमत्त्वाची उमेदवारी आहे, असे या विवस्त्र पुतळ्यांच्या निमित्ताने या गटाला जनतेसमोर मांडायचे आहे. अमेरिकेत हे सर्व चालते. खुद्द ओबामा यांना ‘कुत्ता’ म्हणणार ‘ॲंकर्सही’ आहेत.
कधीकाळी ही भूमी आमची होती - डोनाल्ड ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार समितीने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. पुतळा तोडतांनाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. न्यूयार्कच्या डेमोक्रॅट मेयरची प्रतिक्रिया मासलेवाईक आहे. ‘ हे सर्व खूपच भीतिदायक आहे. तसे, कपडे परिधान केलेले डोनाल्ड ट्रंपही मला आवडत नाहीतच, म्हणा.’ पोलिस गोळीबारात ठार झालेल्या आफ्रिकन- अमेरिकन नागरिकांची नावे सुद्धा अन्य काही ठिकाणी विमानांच्या वापरात नसलेल्या धावपट्ट्यांवर लिहिलेली आढळतात. त्यासोबत मजकूर असतो,’कधीकाळी ही भूमी आमची होती’.
ही चाल नक्की कुणाची? - तशीही आफ्रिकन-अमेरिकन व्होट बॅंक डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधातच आहे. यांची टक्केवारी दहा टक्क्याच्या आतच असेल. पण या निमित्ताने गोऱ्यांची व्होट बॅंक आपोआप तयार होत आहे, हे यांना कळत नसेल का? का तसे घडावे म्हणूनच हे प्रकार घडवले जात आहेत. राजकारण्यांचीही लीला अगाध असते, असेच सर्वसामान्यांनी म्हणावे, अशी स्थिती आहे खरी.
टेम्प्टेशन नव्हे ट्रेम्प्टेशन - ते काहीही असले तरी ट्रंप यांच्या प्रचार तंत्राला यश मिळताना दिसत आहे. टेम्पटेशन हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे. जनमानसावर ट्रंप यांची जी मोहिनी पडते आहे तिला उद्देशून ‘ट्रंप्टेशन’ हा नवीन शब्द वृत्तसृष्टीने तयार केला आहे.
सावधगिरीचा उपाय म्हणून म्हणा किंवा उद्या पराभव पदरी आला तर करावयाचे समर्थन म्हणून म्हणा, या निवडणुकीत पक्षपात होईल, असा कांगावखोर संशय ट्रंप वारंवार व्यक्त करीत आहेत. टीका करणाऱ्या पत्रकारांची ओळखपत्रे रद्द करण्याची धमकी तर ते सतत देत असतात. कारस्थानी, कपटी, खोटारडी, भ्रष्टाचारी अशी शेलकी विशेषणे हिलरी क्लिंटन यांच्यासाठी ते वापरतात पण मतदारांबाबत बोलतांनाचा त्यांचा कनवाळूपणा वाखाणण्यासारखा आहे. यात बेकायदा प्रवेश करणारे लक्षावधी स्थलांतरितही आता समाविष्ट आहेत. कारण त्यांचे एकेकाळचे तेवढेच भाईबंद आज अमेरिकेतील नागरिकत्व प्राप्त करून या निवडणुकीत मतदार झाले आहेत. पुतळ्यांचा विषय मात्र त्यांनी स्वत: व रिपब्लिकन पक्षाने सुद्धा अनुल्लेखाने टाळला आहे. त्यामात्र याउलट हिलरी क्लिंटन धापा टाकीत टाकीत नोकऱ्यांबाबत बोलत मध्यमवर्गीयांचा पाठिंबा मिळवण्याच्या खटाटोपात आहेत. ट्रंप यांची आश्वासने पोकळ आहेत अशी अलिप्त व कुंपणावरील रिपब्लिकन मतदारांची खात्री पटावी म्हणून हिलरी क्लिंटन आपली योजना अभ्यासपूर्वक व तपशीलवार मांडीत असतात. पण ही टाळी घेणारी वाक्ये नसतात. ट्रंप यांचे करभरणा विवरणपत्र जाहीर न करणे, श्वेतवर्चस्ववादी भूमिका, रशियाशी संधान या पलीकडे त्यांच्या टीकेची मजल जात नाही. टाळ्या व हशा मिळवत आणि भाषणादरम्यान श्रोत्यांचा प्रतिसाद मिळवत त्यांची करमणूक करण्याची क्षमता जास्त कुणात आहे? लक्ष खेचून घेण्याचे सामर्थ्य जास्त कुणात आहे? यात ट्रंप आघाडीवर आहेत.
जास्त प्रसिद्धी ट्रंपच्या बाजूला - ट्रंप यांनी नुकतेच एक टोमणा मारणारे विधान केले. रशियाने हिलरी क्लिंटन यांच्या ईमेल्स हॅक कराव्यात असेही म्हटले. हिलरी क्लिंटन यांना राक्षसिणीची उपमा दिली. नाटोला असलेला पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचेशी त्यांचे सूत जुळतांना दिसते आहे. ज्या मुस्लिम- अमेरिकन जोडप्याचा मुलगा इराकमध्ये अमेरिकेच्या बाजूने लढतांना वीरगतीला गेला, त्यांच्याशी ट्रंप यांचे वंशपरंपरागत वैर दिसते. हे जोडपे डेमोक्रॅट पक्षाच्या अधिवेशनात उपस्थित झाले होते. हा ट्रंप यांना हिलरी क्लिंटन यांचा प्रसिद्धी स्टंट वाटला. वर्ल्ड ट्रेड सेंटर उध्वस्त झाल्यापासून अमेरिकन जनमत इस्लामविरोधी झाले आहे. त्यामुळे ट्रंप यांची ही चाल यशस्वी होतांना दिसते आहे. वृत्तसृष्टीही, नापसंती व्यक्त करीत का होईना, त्यांना चालता बोलता प्रसिद्धी देते आहे. त्या मानाने हिलरी क्लिंटन यांची भाषा मवाळ असते. त्यांच्या मुद्देसूद भाषणांचे प्रसिद्धीमूल्य कमीच असणार. या विषम स्थितीमुळे वृत्तसृष्टीत द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे. अध्यक्षीय लढतीचे वृत्तसमालोचन कसे करायचे? एक धरसोड वृत्तीचा, बोलभांड आणि दुसरा व्यवहारवादी, प्रसिद्धीपासून दूर राहण्याची भूमिका घेऊन चालणारा, निरस तपशील मांडणारा असेल तर पत्रकारांनी काय करावे? दोघांनाही न्याय कसा द्यावा? खरे असे आहे की, मतदारांपैकी बहुतेकांचे मत अगोदरच निश्चित झालेले असते. फारच थोडे कुंपणावर असतात, पण तेच निवडणुकीचे भवितव्य ठरविणार आहेत. त्यांचे प्रबोधन कसे करावे? ट्रंप एकतर चुकीचे तरी बोलत असतात, नाहीतर शिव्या तरी देत असतात. सतत गर्जना करीत असतात.
यावर एक उपाय आहे. ‘फेअरनेस डाॅक्ट्रिन’ अमलात आणावयास हवे. १९८७ पर्यंत रेडिओ व टीव्ही वर दोन्ही पक्षांना समसमान वेळ देण्याचे बंधन होते. पण ट्रंप यांची चुकीची व वादनिर्माण करणाऱ्या वक्तव्यांनाही तेवढाच वेळ देता येईल का? न्यूयाॅर्क टाईम्सचे तर म्हणणे असे आहे की ट्रंप यांच्या वाट्याला आलेल्या वार्तांकनाचे डाॅलरमधले मूल्य हिलरी क्लिंटन पेक्षा कितीतरी जास्त आहे. यासाठी त्यांना एक छदामही खर्च करावा लागलेला नाही. एक पक्ष जर सतत चुकीची विधाने वारेमाप करीत असेल तर त्यालाही तेवढाच वेळ मिळावा का, वृत्तपत्रात तेवढीच जागा मिळावी का?

No comments:
Post a Comment