जर्मनीतील ट्रंपोदयाचे वेगळेपण
वसंत गणेश काणे
जगातील राजकीय सारीपटावर अनेक कर्तृत्त्वशाली महिलांचा उदय निरनिराळ्या कालखंडात झालेला आढळून येतो. याबाबत निरनिराळ्या शोधसंस्थांची निदाने वेगवेगळी आहेत. त्यापैकी आपण भारतीयांनी ज्यांची नावे ऐकलेली असण्याची शक्यता जास्त आहे व ज्या जागतिक सारीपटावर विद्यमान आहेत अशांचा विचार करण्याचे ठरवून यादी केली तर ती बहुदा अशी असेल. बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना, ब्राझीलच्या दिल्मा वना रौझेफ, जर्मनीच्या चान्सेलर व चेअरवूमन ॲंजेला डोरोथिया मर्केल व दक्षिण कोरियाच्या नुकत्याच पदच्युत झालेल्या पार्क ग्वेन या महिला या ना त्या कारणांमुळे विशेष चर्चेत आहेत.
त्यापैकी एक ॲंजेला मर्केल या जगात निदान युरोपात सध्या अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात. युरोपातील २७ लहानमोठ्या राष्ट्रांची मोट बांधून एकसंध युरोप उभारण्याच्या प्रयत्नात त्यांचा सिंहाचा (सिंहिणीचा?) वाटा आहे, यात दुमत नाही. यांचा वर्तमानकाळ राजकारणात व्यतीत होत असला तरी त्यांचा मूळ पिंड संशोधकाचा होता. जर्मनीतील ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्वर्यू म्हणून त्या २००० साली राजकीय सारीपटावर अवतरल्या. २००५ साली त्या जर्मनीच्या चान्सेलर म्हणून विजयी झाल्या. पक्षनेतृत्त्व व राजकीय प्रमुखपद भूषवीत असतांनाचे त्यांचे सव्यसाचित्त्व अनेकदा काळाच्या कसोटीला उतरले आहे. फोर्ब्ज मासिकाने तर २०१२ साली जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या राजकारणी व्यक्ती म्हणून (केवळ महिलांमधून नव्हे तर महिला व पुरुष या दोघांमधूनही) गौरविले होते. हा मान पटकवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
ॲंजेला मर्केल व्यक्ती व व्यक्तिमत्त्व - ही सर्व बिरुदे धारण करणाऱ्या ॲंजेला मर्केल मवाळ वळणाच्या, सहिष्णू वृत्तीच्या, खुल्या दिलाच्या म्हणून जगभर ओळखल्या जातात. पण जागतिक कीर्ती खेचून आणणारे त्यांचे हेच गुण त्यांच्या भावी घसरगुंडीला कारणीभूत ठरणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिकीकरणाच्या विरोधात सध्या जगभर विरोधी सूर उमटू लागले असून त्याचा प्रत्यय अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांचा विजय होऊन आला आहे. लष्करच्या भाकऱ्या भाजायचे बाजूला सारून प्रथम देशांतर्गत स्थितीवर लक्ष द्या, असे म्हणत अनेक देशातील जनमत अमेरिकेप्रमाणेच राष्ट्रवादाकडे वळतांना दिसते आहे. अमेरिकेनंतर फ्रान्स व आता जर्मनीतील जनमतही हीच वाट धरते आहे, असे दिसते.
स्थलांतरितांचा मुद्दा - जगात सध्या स्थलांतरितांचा प्रश्न ऐरणीवर आला असून याचे श्रेय इसीस या सुन्नी या जहाल मुस्लिमगटाच्या भूमिकेकडे जाते. या गटाच्या अतिरेकी, क्रूर व अमानवी कृत्यांमुळे सध्या सीरिया व अफगाणिस्थानातून लाखोंच्या संख्येत निर्वासित होऊन लोक युरोपात स्थलांतर करीत आहेत. ॲंजेला मर्केल यांनी या स्थलांतरितांचे जर्मनीत खुल्या दिलाने स्वागत केले आहे, ही बाब त्यांच्या उदारमतवादी भूमिकेला अनुसरून असली तरी स्थानिक जर्मन जनमताला हे रुचलेले नाही व ते ॲंजेला मर्केल यांच्या विरोधात वेगाने वळले आहे. आजघडीला तरी उदारमतवादी म्हणून त्यांचा झालेला गौरव निदान जर्मनीत तरी झाकोळला गेला असून त्यांच्यावर प्रखर टीकेचा सामना करण्याची वेळ आली आहे.
ॲंजेला मर्केल यांची चलाख चाल - ॲंजला मर्केल या चाणाक्षही आहेत, पण हे आजवर कुणालाही फारसे जाणवले नव्हते. वास्तवीक पाहता चाणाक्षपणा हाच राजकीय यश मिळविण्यासाठीचा प्रथम क्रमांकाचा गुण असतो. ॲंजेला मर्केल यांनी जनमताची नाडी ओळखून एक असा निर्णय घेतला आहे की एका झटक्यात जनमताचा कौल पुन्हा त्यांच्याकडे वळला आहे. कोणता आहे हा निर्णय? युरोपात बुरखाबंदीचा विषय गेली दोन/तीन वर्षे विशेष प्रमाणात गाजतो आहे.
बुरखा बंदीची कालबाह्य प्रथा - बुरखा हा मुस्लिमांच्या विशेष आस्थेचा विषय आहे. स्त्रिच्या पावित्र्याचे रक्षण व तिच्या सुरक्षेची तजवीज करणारा म्हणून बुरखा इस्लामी जगतात विशेष मान्य आहे. याला काही धार्मिक व ऐतिहासिक कारणे असतीलही, नव्हे तशी ती आहेतही. पण हे किंवा यासारखे विषय कालसापेक्ष असतात. कालमानानुसार त्यात बदल व्हावयास हवा. पण कर्मकांडाप्रमाणेच या प्रथा व परंपराच खऱ्या धर्माची जागा घेत असतात. या बाबी अनुसरण्यास व समजण्यास त्यांच्या बाळबोधपणामुळे सोप्या असतात. प्रत्येक धर्मात एखादा लोकोत्तर पुरुष जन्माला येतो व तो खऱ्या धर्ममताची पुन्हा नव्याने प्राणप्रतिष्ठा करून प्रथा परंपरांची व रुढींची जळमटे काढून टाकतो व त्या धर्ममताला पुन्हा झळाळी प्राप्त करून देत असतो. आजमितीला इस्लामी जगत अशा लोकोत्तर पुरुषाच्या प्रतीक्षेत आहे. बुरख्याच्या संबंधातील धर्ममार्तंडाचे मत आजवर तरी बहुसंख्य मुस्लिम शिरसावंद्य मानत आले आहेत.
या बुरख्याचेही अनेक प्रकार आढळतात. -
१. संपूर्ण देह झाकतो त्याला बुरखा म्हणतात;
२. फक्त डोळे उघडे ठेवणारा, तो नकाब;
३. मान व खांदे झाकतो, तो खिमार;
४. डोईचे केस व मान झाकणारा, तो हिजाब
व
५.पोहतांना मुस्लिम महिलांनी घालायचा तो बुर्किनी. शेवटचा बुर्किनी वगळता बुरख्याचे उरलेले प्रकार, बुरख्याचे उत्तरोत्तर उत्क्रांत होणारे व कालोचित व प्रसंगोचित प्रकार आहेत असे मानले तरी बुर्किनी मात्र सनातनी मुस्लिम धर्ममार्तंडाना मान्य होतांना दिसत नाही. ॲंजेला मर्केल यांनी या प्रकार व उपप्रकारांच्या भानगडीत न पडता बुरख्यावर सरळ सरळ बंदी घातली आहे. त्यामुळे जर्मनीतील सनातनी मुस्लीम जनमत व जगातील धर्ममार्तंड खवळले असले तरी जर्मन जनमत मात्र समाधान पावले आहे. बुरखा ही महिलांची इज्जत जपणारी आणि सुरक्षा करणारी व्यवस्था असल्याचे मुस्लीम धर्मगुरू कितीही सांगत असले, तरी हे पुरुषी वर्चस्ववादाचे आणि महिलांच्या गुलामगिरीचे प्रतीकच आहे, असे इतर मानतात. बुरखा ही बरखा बहार नसून ती आज कालबाह्य झालेली प्रथा आहे, असे प्रगत मुस्लीम महिला जगत मानते. इतरांनाही हे मत योग्य व कालोचित वाटत असले तरी धर्ममार्तडांना मात्र तो आपल्या धर्मातील हस्तक्षेप वाटतो. फ्रान्स, बेल्जियम व नेदरलंड या सारख्या देशांनी अंशत: किंवा पूर्णत : बुरखाबंदीचे आदेश दिले आहेत.
युरोपात अभूतपूर्व संघर्ष - मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांच्या दृष्टीने हा आदेश म्हणजे इस्लामी जीवनपद्धतीवरील हल्ला वाटतो. यातून युरोपात आज संस्कृतीसंघर्ष निर्माण झाला, असून तो येत्या काळात जगभर पसरण्याची चिन्हे आहेत. मात्र युरोपात बुरख्यामुळे इस्लामी स्थलांतरितात बुरखा धारण करून अतिरेकीही शिरत असल्यामुळे या प्रकाराला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. युरेपातील कायदा व सुव्यवस्था या बुरख्यामुळे प्रभावीत झाली आहे. स्थलांतरितांमुळे , त्या त्या भागतील सोयीसुविधांवर ताण पडत होताच पण आजवर नाखुशी व नाराजी पुरताच या स्थलांतरितांचा परिणाम सीमित होता. त्यातच अतिरेक्यांच्या संभाव्य प्रवेशा पुरतेच या प्रश्नाचे स्वरूप मर्यादित राहिले नसून बुरख्यातील अतिरेकी ठिकठिकाणी उच्छाद मांडताना आढळून येत आहेत. यामुळे एकंदर मुस्लिमांविषयी द्वेषाची भावना युरोपभर निर्माण होते आहे. सर्व स्थलांतरित तर अतिरेकी नाहीतच व सर्व बुरखाधारितही छुपे अतिरेकी नसतात, हे वास्तव जनतेच्या पचनी पडत नाही. त्यातच बुरखा आणि इस्लाम यांचा काहीही संबंध नसल्याचे जाहीर करून इजिप्तसारख्या मुस्लीमबहुलच नव्हे तर सुन्नी बहुल देशाने बुरखाबंदीला पाठिंबा दिला आहे, हे या प्रश्नाचे आणखी एक परिमाण आहे. पण सनातनी मुस्लीम ह्या बंदीची तुलना मानवी अधिकाराच्या हननाशी करीत आहेत. ॲंजेला मर्केल यांची सौम्य भूमिका सनातनी मुस्लीमांना चुचकारण्याची न राहता अनपेक्षितपणे एकदम कठोर झालेली पाहून सनातनी मुस्लीम प्रथम बावचळले व नंतर संतापले. पण ॲंजेला मर्केल यांना दुरावत चाललेल्या जनमताची चाहूल वेळीच लागलेली असल्यामुळे त्या वेळीच सावध झाल्या आहेत. जर्मनीत स्थलांतराला विरोधी पक्ष स्थापन झाला असून तो ॲंजेला मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाला पर्यायी पक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभा ठाकतो आहे. २०१७ मध्ये जर्मनीत निवडणुका होऊ घातल्या आहेत. म्हणून सौम्य प्रकृतीच्या, खुल्या दिलाच्या पण चाणाक्ष ॲंजेला मर्केल यांचा हा ‘मास्टर स्ट्रोक’ आहे, असे मानले जात आहे आणि विरोधक हतबल होऊन हताश झाले आहेत. वरकरणी मात्र आपला विरोध सफळ झाल्याचा दावा ते करीत आहेत. यातले राजकारण बाजूला ठेवले तरी या निमित्ताने एक बाब अधोरेखित झाली आहे, ती ही की देशाची राजवट ही धर्मातीतच असली पाहिजे. लांगूलचालनाची किंवा तुष्टीकरणाची नीती काहीकाळ लाभदायक ठरत असली तरी तिची जातकुळी निष्पक्ष दृष्टीकोनाला बाधक ठरणारीच असते.
डोनाल्ड ट्रंप यांच्या ठामेठोक भूमिकेचे पडसाद - अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप मुस्लीम अतिरेक्यांविरुद्ध ठामेठोक भूमिका घेऊन उभे राहिले. यामागची त्यांची भूमिका कोणतीही असो, पण या भूमिकेचे पडसाद प्रथम फ्रान्समधील राजकारणात पडतांना दिसत आहेत. फ्रान्समधील नॅशनल फ्रंट हा राष्ट्रवादी, पुराणमतवादी, कायदा व सुरक्षेचा खंदा पुरस्कर्ता, स्थलांतराचा अतिकडवा विरोधक व अतिरेकीउजवा म्हणून ओळखला जाणाऱा व २०१२ च्या निवडणुकीत फक्त साडे तेरा टक्के मते व केवळ दोनच जागा मिळवणाऱा पक्ष पुढे सरसावला आहे. या पक्षातर्फे जहाल नेत्या मेरीन ले पेन यांची उमेदवारी जाहीर झाल्यातच जमा आहे. यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने फ्रान्समध्येही अमेरिकेप्रमाणे ‘ट्रंपायन’ घडतांना दिसत आहे. जर्मनीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून ॲंजेला मर्केल यांनी वेळीच पाऊल उचलून जर्मनीतील ट्रंपोदयाला वेगळे वळण लावण्याची दक्षता दाखविली आहे. राजकीय चाणाक्षतेचे याहून सरस उदाहरण सहजासहजी सापडणार नाही.

No comments:
Post a Comment