‘आमची आई निर्दोष होती'
वसंत गणेश काणे
एथेल व ज्युलियस रोझेनबर्ग पतीपत्नींना रशियासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून विद्युतखुर्चीच्या साह्याने १९ जून १९५३ ला मृत्युदंड देण्यात आला होता. मायकेल व राॅबर्ट ही त्यांचीअनुक्रमे १० व ६ वर्षांची दोन मुले आपल्या आजीसह - सोफी रोझेनबर्गसह - व्हाईटहाऊससमोर आपल्या मात्यापित्याला दिल्या जात असलेल्या शिक्षेविरुद्ध निदर्शने करीत उभी होती. आज ही दोघे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांना विनंती करीत आहेत की, त्यांची आई एथेल ही हेरगिरी करीत नव्हती, असे आता उघड झाले असल्यामुळे तिला हेरगिरीच्या आरोपातून सन्मानपूर्वक मुक्त करावे. शिक्षेच्या दिवशी म्हणजे १९ जून १९५३ ला त्या दोघा भावंडांना मित्राच्या घरी बेसबाॅल खेळण्यासाठी पाठविले हेते. चांगले अंधार होईतो खेळा, अशी त्यांना सूट देण्यात आली होती. संध्याकाळी उशिरा त्यांना घरी नेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना थोरल्या मायकेलने विचारले होते, ‘ आईबाबांना सोडले का हो?’ कुणीही काहीही बोलेना. मायकेलला त्यांच्या गप्प राहण्याचा अर्थ समजला. राॅबर्ट मात्र काहीही बोलत नव्हता. त्याला काय वाटत होते, कुणास ठावूक? पण काहीतरी विपरित घडल्याचा भाव त्याच्याही चेहऱ्यावर दिसत होता हे मात्र नक्की.
व्हाईटहाऊससमोरील ठिय्या क्र १ - काही दिवसांपूर्वीचीच तर गोष्ट होती. ही दोघे भावंडे व्हाईट हाऊससमोर आपल्या आईवडलांना दिल्या गेलेल्या शिक्षेला हरकत घेत ठिय्या देत आपल्या आजीच्या सोबतीने उभी होती. त्यांच्या हाती अध्यक्ष ड्वाईट आयसेन हाॅवर यांना देण्यासाठीचे पत्र होते. आपल्या आईवडलांना दया (क्लेमंसी) दाखवावी, अशा आशयाचे ते पत्र होते. पण त्यांची विनंती अव्हेरण्यात आली. रोझेनबर्ग दांपत्य मृत्यूला सामोरे गेले.
व्हाईटहाऊससमोरील ठिय्या क्र २ - पुढे मायकेल रोझेनबर्ग व राॅबर्ट रोझेनबर्ग या दोघा भावंडांचा मीरोपोल कुटुंबाने सांभाळ केला. त्यामुळे मीरोपोल हेच आडनाव ते आता लावतात. मायकेल मीरोपोल व राॅबर्ट मीरोपोल त्यांची आजची वये अनुक्रमे ७३ व ६९ वर्षे इतकी आहेत. ही दोघे मंगळवारी २९ नोव्हेंबर २०१६ ला पुन्हा व्हाईटहाऊससमोर उभी होती. याही वेळी त्यांच्या हाती एक पत्र होते. मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांना उद्देशून लिहिलेले हे पत्र होते. या पत्रातला मजकूर मात्र १९५३ सालच्या ‘त्या’ पत्रापेक्षा वेगळा आहे. आपली आई एथेल रोझेनबर्ग ही रशियासाठी हेरगिरी करीत नव्हती. तिला चुकीने दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा देण्यत आली होती, हे निदान आजतरी नक्कीच स्पष्ट झाले आहे. एकदा गेलेला जीव काही परत येणार नाही. पण तिला आज दोषमुक्त (एक्सआॅनरेट) जाहीर करावे व अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळापूर्वी झालेल्या चुकीच्या शिक्षेचे, अंशत: का होईना, पण परिमार्जन व्हावे, अशी विनंती या पत्रात केलेली आहे. अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीला दोषमुक्त करण्याचे अंतीम व अनिर्बंध अधिकार अमेरिकन घटनेने अध्यक्षाला बहाल केले आहे.
न्यायाची बूज राखणार काय? - भोवताली गोळा झालेल्या नागरिकांना उद्देशून राॅबर्ट मिरोपोल (रोझेंनबर्ग) म्हणत होता, अमेरिकन शासनाला आपली चूक दुरुस्त करण्याची संधी या निमित्ताने आम्ही देत आहोत. आपली चूक दुरुस्त करण्याचे धैर्य व वचनबद्धता/प्रतिबद्धता (कमीटमेंट) या शासनात आहे का हे आम्हाला बघायचे आहे. आमची आई व आम्ही दोघे तिची मुले यांच्याबाबत घडलेला घोर प्रमाद दूर करून पुन्हा एकदा न्यायाची बूज राखण्यास हे शासन तयार आहे काय, हे जगाला कळेल.
चाळीस वर्षे चाललेली शोध मोहीम - या दोन सुपुत्रांनी गेली चाळीस वर्षे या प्रकरणाचा पिच्छा पुरविला आहे. शोध घेत व संघर्ष करीत प्राप्त केलेली माहिती ते आता मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हाती सोपवीत आहेत. अमेरिकेच्या सर्वशक्तिमान अध्यक्षाला १९५३ नंतर पुन्हा एकदा साकडे घालीत आहेत. ही केवळ आमच्या कुटुंबासाठीची वकिली नाही तर ती अमेरिका या देशासाठीची वकिली आहे. चुकीनंतर शहाणे होणे, ही बाब कितीही उशीर झाला तरी ‘आता खूप उशीर झाला’, अशा स्वरुपाची नसते.
आमची आई हेर नव्हती. - आमच्या आईला खोट्या साक्षीवर विसंबून राहून ( पर्जुरी) व न्यायालयीन गैरवर्तन (ज्युडिशियल मिस काॅनडक्ट) घडून दोषी ठरविले गेले होते व मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती. गेल्या वर्षीच या बाबतचा सर्व पुरावा उघडकीला आला आहे. त्यानुसार एथेल रोझेनबर्ग वरचा खटला हा न्यायाचा दुरुपयोग ठरतो. एफबीआय च्या कागदपत्रावरून हे आता स्पष्ट होते आहे की, आमच्या आईची अटक ही वडलांविरुद्ध वापर केलेली एक तरफ (लिव्हर) होती.
रोझेनबर्ग दाम्पत्याला १९५० मध्ये अटक करण्यात आली होती. अण्वस्त्रे तयार करण्याबाबतचे तंत्रज्ञान रशियाला पुरविण्याबाबतचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
वस्तुस्थिती काय होती? - त्याचे असे झाले होते की, एथेल रोझेनबर्गचा भाऊ डेव्हिड ग्रीनग्लास याला मुळात प्रथमत: अटक झाली होती. तो न्यू मेक्सिको प्रांतातील लाॅसॲलमाॅस येथील नॅशनल लेबाॅरेटरीमध्ये अतिगुप्त समजल्या जाणाऱ्या प्रकल्पात कामाला होता. आपली कातडी वाचविण्यासाठी त्याने शोधपथकाला सांगितले की, त्याचा मेव्हणा ( ज्युलियस रोझेनबर्ग) हा रशियन हेर असून त्याने आपल्याला गुप्त माहिती चोरण्यासाठी नेमले होते.
मेव्हण्याची खोट्या साक्षीची कबुली - सुरवातीला साक्ष देताना डेव्हिड ग्रीनग्लासने ज्युरीला सांगितले की, आपल्या बहिणीचा (एथेल रोझेनबर्गचा) हेरगिरीशी काहीही संबंध नव्हता. नंतर मात्र त्याने आपली साक्ष बदलली. मी जी माहिती ज्युलियस रोझेनबर्गला पुरवीत होतो, ती माहिती माझी बहीण एथेल रोझेनबर्ग ही नवऱ्यासाठी टाईप करण्याचे काम करीत असे. ही बदलेली साक्षच एथेलच्या ( डेव्हिडच्या बहिणीच्या) विरोधात गेली होती. बरीच वर्षे गेल्यानंतर डेव्हिड ग्रीनग्लासने सांगितले की, त्याने स्वत:ची व आपल्या बायकोची कटाच्या आरोपातून सुटका व्हावी म्हणून बहिणीचा बळी दिला होता.
मान्यवरांची विनंती अव्हेरली - रोझेनबर्ग दांपत्यावरचा खटला ६ मे १९५१ ला सुरू झाला होता. २९ मार्चला १९५३ ला त्यांना दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. (खटला वर्षानुवर्षे रेंगाळण्यासाठी तो काही भारत देश नव्हता.) अलबर्ट आईनस्टीन, पाब्लो पिसाको व पोप १२ वे पायस या सारख्या जागतिक कीर्तीच्या व मान्यतेच्या आपापल्या क्षेत्रातील धुरिणांनी रोझेनबर्ग दाम्पत्याचे प्राण वाचावेत म्हणून अमेरिकन अध्यक्ष ड्वाईट आयसेन हाॅव्हर यांना विनंती केली होती. पण तिचा उपयोग झाला नाही.
संशयाचे मळभ विरावे - मायकेल मीरोपोलला (रोझेनबर्ग) ६३ वर्षांपूर्वीचा व्हाईटहाऊससमोर हातात अध्यक्ष ड्वाईट आयसेनहाॅवर यांना देण्यासाठीचे ‘ते’पत्र घेऊन आपण उभे होतो, हे आठवते. त्यावेळचा १० वर्षांचा तो आज ७३ वर्षांचा आहे. रोझेनबर्ग दांपत्याला १९५३ साली इलेक्ट्रिक चेअरने संपविले पण त्यांच्यावरचे संशयाचे मळभ अजूनही विरलेले नाही.
धाकटा भाऊ राॅबर्ट मायकेलला अनेक दिवसपर्यंत सारखा विचारत असे, ‘आपल्याला आपले आईबाबा कधी भेटतील रे?’
समजायला लागल्यापासून आपल्या आईवडलांवरील किटाळ दूर व्हावे, म्हणून हे दोघे बंधू -आपल्या आईचे सुपुत्र - सतत झगडत राहिले. आपली आई हेर नव्हती, यावर ते ठाम आहेत. अणु शास्त्रज्ञ असलेले आपले वडील हेर होते, हे जरी त्यांना मान्य असले तरी ज्या गुन्ह्यासाठी (अण्वस्त्राबाबतची गुपिते रशियाला पुरविणे) त्यांना शिक्षा झाली होती, तो गुन्हा त्यांनी केला नव्हता, यावरही ते ठाम आहेत. आपल्या आईला दोषी धरणे हा तर मूर्खपणाचा कळस होता, असे ते मानतात. अमेरिकन घटनेनुसार अध्यक्षाला जे अधिकार आहेत, त्यांच्याआधारे अध्यक्ष बराक ओबामा तरी जाताजाता आपल्या आईवरील अन्यायाचे परिमार्जन करून चाळीस वर्षापूर्वी झालेली चूक दुरुस्त करू शकतील, म्हणून त्यांची धडपड चालू आहे

No comments:
Post a Comment