इफ्तार पार्टी त्यांची व यांची!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
मुस्लिमांमध्ये इफ्तार म्हणजे रमझानच्या महिन्यात उपास सोडण्यासाठी केलेले भोजन. हे त्यांचे त्या दिवशीचे दुसरे भोजन असते. पहिले भोजन म्हणजे सुहूर सूर्योदयापूर्वी केलेले असते. यानंतर पाणीही न पिता सूर्यास्तानंतर लगेच इफ्तार असते. ह्याची वेळ ठरलेली असून तिला मघ्रिब ( सूर्यास्तानंतर लगेच) असे नाव आहे. हे सूचित करण्यासाठी अधान म्हटले जाते. अधान ही प्रार्थनासाठीची व पूर्वीची हाक आहे, असे म्हणता येईल अर्थातच हा मघ्रिब काळ अतिशय अल्प असतो. याला धार्मिक महत्त्व अाहे. यानंतर लगेच प्रार्थना म्हणायची असते. हे परमेश्वरा(अल्ला) तुझ्यासाठी मी हा उपास ठेवला असून तुझ्याच आशीर्वादाने मी तो सोडतो आहे, असे काहीसे या प्रार्थनेचे स्वरूप असते. ही प्रार्थना मध्रिब संपायच्या आत पूर्ण करायची (म्हणायची) असते. हे समूह स्वरूपात एकत्रित येऊन करावयाचे असते. यावेळी तीन खजूर खायची प्रथा आहे. पण तसे बंधन मात्र नसते. पैगंबरसाहेब याप्रकारे उपास सोडत असत, असे म्हटले जाते. इफ्तार हे धर्माचे /धर्मादाय स्वरुपाचे (चॅरिटी/पुण्याचे?) काम अाहे, असे मानतात. पार्टी या शब्दाचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. तिला धार्मिक महत्त्व नाही.
इफ्तारला मुस्लिम धर्मात महत्त्वाचे स्थान असले तरी इफ्तार पार्टीला तसे धार्मिक महत्त्व नाही. त्यांना जे महत्त्व आहे, ते राजकीय आहे. म्हणूनच राजकीय पुढारी, सेलेब्रिटीज, उद्योजक, म्हणूनच रमझानच्या दिवसात जंगी इफ्तार पार्टीचे आयोजन करीत असतात. विशिष्ट प्रकारच्या (कधिकधि महागड्याही) टोप्या मुस्लिम बांधव घालून आलेले असतात.
काॅंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी इफ्तार पार्टीचे नुकतेच आयोजन केले होते. यावेळी एका मुस्लिम कार्यकर्त्याने मोठ्या प्रेमाने व भक्तिभावाने त्यांना घातलेली टोपी त्यांनी मोजून पाच सेकंदच डोक्यावर ठेऊन नंतरलगेच काढली. हे चॅनलवालेही कसे बेरकी असतात पहा. त्यांनी अगदी घड्याळाचे ठोके मोजून हे वृत्त सचित्र स्वरुपात दिले आहे. यामुळे तो मुस्लिम कार्यकर्ता चांगलाच नाराज झाला व म्हणाला की, आपल्या हिंदू व्होट बॅंकेला धक्का लागेल, म्हणून राहूलजींनी असे केले. राहूलजी करायला गेले काय आणि झाले भलतेच. याचवेळी शर्टावरून जानवे घालून ते आले असते, तर डोक्यावर टोपी व खांद्यावरून जानवे असा समतोल त्यांना साधता नसता का आला? हरकत नाही रमझानचा महिना पुढच्याही वर्षी येईलच की.
No comments:
Post a Comment