‘बिहाइंड एनिमी लाईन्स’, - एक वेगळाच युद्धपट
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
‘बिहाइंड एनिमी लाईन्स’, हा जाॅन मूरने 2001 साली दिग्दर्शित केलेला त्याचा पहिला चित्रपट आहे. ओवेन विल्सन व जीन हॅकमन यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. लेफ्टनंट क्रिस ब्रुनेट या अमेरिकेच्या नाविक दलातील वैमानिकाची ही कथा आहे. क्रिसचे विमान बाॅस्नियात पाडण्यात आले होते. बोसनियन युद्धात वंशविच्छेद करण्यात आल्याचे त्याच्या लक्षात आलेले असते. त्याचा अधिकारी यांची सुटका करण्यासाठी तुकडी पाठवून शोध मोहीम करण्याची अनुमती मिळावी, म्हणून धडपडत असतो. हे कथानक बोस्नियन युद्धातील एका सत्यकथेवर आधारित आहे.
या चित्रपटाची विशेषता ही आहे की, समीक्षकांनी या चित्रपटावर टीका केली होती. या चित्रपटातील समर दृश्ये ढिसाळ आहेत. कथानकात टोकाचे देशप्रेम दाखवले आहे, हे टीकेचे दोन प्रमुख मुद्दे होते. पण बाॅक्स आॅफिसवर हा चांगला चालला आणि त्याने खर्चाच्या दुप्पट कमाई केली. समीक्षकांनी दिलेली प्रतवारी व सजनसामान्यांची आवड यात अनेकदा विरोधाभास असतो. तो या चित्रपटाचे निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटाच्या तीन आवृत्या तीन वेगवेगळ्या कंपन्यांनी काढल्या हा मात्र या चित्रपटाचा एक खास विशेष आहे. तसेच मूळच्या चित्रपटातील एकही पात्र यापैकी एकातही नाही, हेही नवलच म्हटले पाहिजे.
युगोस्लाव्हियाचे तुकडे झाल्यानंतर बाॅस्नियामध्ये गृहयद्धाला प्रारंभ झाला होता. अमेरिकेच्या नाविक दलाचा एक अधिकारी पायलट ख्रिस बुर्नेट आणि जेरी स्टॅकहाऊस यांची विमानवाहक जहाज एसएस कार्ल व्हिन्सनवर तैनात झालेली असते. अॅडमिरल रीगार्ट या त्यांच्या वरिष्ठाने त्या दोघांना टेहेळणीच्या कामावर नेमलेले असते. टेहेळणी चालू असतांना सैन्य काढून घेतलेल्या एका भागात चालू असलेल्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटतात. या प्रदेशात दोन्ही लढाऊ गटांना प्रवेश निषिद्ध होता. तरीही या भागावरून उड्डाण करण्यासाठी बुर्नेट स्टॅकहाऊस या आपल्या सहकाऱ्याचे मन वळवतो व खाली जमिनीवर नक्की काय चालू आहे, हे पाहण्यासाठी विमान कमी उंचीवर नेतो व खालच्या भागाचे फोटो घेतो. आपण एका सामूहिक दफनस्थळाचे चित्रण करीत आहोत, याची त्यांना कल्पना नसते. सर्ब लोकांच्या नजरेला त्यांचे जेट विमान पडते. तेथील अर्धसैनिक दलाचा कमांडर मिरोस्लावह लोकार गुप्तपणे सामूहिक हत्याकांड घडवून आणित असतो. स्थानिक बोसनिक लोकांचे शिरकाण सुरू असते. हा वंशविच्छेदाचाच प्रकार सुरू होता. ही सामूहिक कबर उघडकीला येऊ नये म्हणून तो छायाचित्रे घेणारे विमान पाडण्याचा हुकुम देतो.
विमानावर डागलेली क्षेपणास्त्रे चुकविण्याचा अटाकोटीचा प्रयत्न बुर्नेट व स्टॅकहाऊस हे दोघे पायलट करतात. पण व्यर्थ! ती दोघे नाइलाजाने इजेक्शन सीट वापरून विमानाबाहेर पडतात व त्या सीटसह एका पुतळ्याजवळ पडतात. सर्ब लोकांच्या एका टेहळणी पथकाला जखमी झालेला स्टॅकहाऊस सापडतो. त्याची सुनावणी होते. लोकरचा सहाय्यक साशा त्याला ठार मारण्याची शिक्षा देतो. बुर्नेट दुरून टेकडीवरून हे सर्व पहात असतो. तो तिथून पळ काढतो पण हे सर्ब लोकांच्या लक्षात येते.
बुर्नेटला मृत किंवा जिवंत शोधून काढा अशी आज्ञा लोकार साशा व बाझदा या दोघांना देतो. बुर्नेट विमानवाहू जहाजावरील प्रमुखाशी -रीगार्टशी- संपर्क साधतो. बुर्नेटला एका वेगळ्या जागी येण्यास सांगण्यात येते. तिथून त्याची सुटका करणे सोयीचे असते. तो त्याप्रमाणे त्या दिशेने जाण्यास निघतो. इकडे नाटोचा कमांडर मात्र रीगार्टला आपली योजना गुंडाळण्यास सांगतो. सैनिकविरहित भागात ही मोहीम राबवली तर शांतता वाटाघाटी फिसकटण्याची भीती आहे, असे त्याची भूमिका असते. बुर्नेट नेमून दिलेल्या जागी पोचतो पण रीगर्ट त्याला सैनिकविरहित क्षेत्राच्या पलीकडील जागी येण्यास सांगतो.
याचवेळी बुर्नेटला बाझदा एक तुकडी घेऊन त्याच्या शोधात आलेला दिसतो. त्यांना पाहून तो पळत सुटतो आणि एका सामूहिक कबरीत पडतो. हिचेच चित्रण त्याने व स्टॅकहाऊसने केलेले असते. तो एका प्रेताखाली दडून बसतो. शोध तुकडी दूर गेलेली पाहून तो पुन्हा धावायला सुरवात करतो. त्याच्या सुटकेसाठी ठरलेल्या स्थळाकडे जात असतांना त्याची गाठ बाॅस्निक गनिमी तुकडीशी पडते. ही तुकडी युद्धक्षेत्रात अडकून पडलेल्यांना सुरक्षित स्थळी ट्रकने घेऊन जात असते. ते लोक बुर्नेटला बरोबर घेतात. ते हॅक नावाच्या सुरक्षित ठिकाणी जात असल्याचे त्याला सांगतात. पण प्रत्यक्षात तहीे युद्धक्षेत्रच असते. झटापट सुरू असतांना सर्ब सैनिकांना बुर्नेटचे शव सापडले आहे, असे वाटते. पण साशाच्या लक्षात येते की बुर्नेटने एका मृत सैनिकाचा पोषाख व आपला पोषाख यांची अदलाबदल केली आहे आणि तो निसटला आहे.
पण या परिस्थितीचा सर्ब लोक आपल्या फायद्यासाठी करून घेतात. ते या प्रेताचे बुर्नेटच्या गणवेशातील छायाचित्र प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित करतात व आपण बुर्नेटचा खातमा केला आहे, हे जाहीर करतात. याचा परिणाम असा होतो की बुर्नेटला मुक्त करण्याची मोहीम थांबविली जाते. बुर्नेटची भटकंती सुरूच असते. त्याची नजर योगायोगाने त्याची इजेक्शन सीट ज्या पुतळ्याजवळ पडली होती, तिकडे जाते. तो सीटजवळ जातो व खुणेसाठीची कळ वापरून जाळ निर्माण करतो. तो संदेश विमानवाहू जहाजावर ओळखला जातो. पण याच निमित्ताने बुर्नेटचा ठावठिकाणा सर्ब लोकांनाही कळतो.
मुख्याधिकारी पिक्वेट याने मोहीम थांबवला असतांना सुद्धा या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेत विमानवाहू जहाजावरील कमांडर रीगार्ट बुर्नेटच्या सुटकेसाठी, एका कार्यदलाची उभारणी करतो. याचा परिणाम म्हणून आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन आपल्याला कार्यमुक्त करण्यात येईल, याची त्याला कल्पना असते. या दरम्यान बुर्नेट जिवंत असून त्याचा ठावठिकाणाही कळलेला असल्यामुळे लोकार बाझदा व साशावर बु्र्नेटला शोधून ठार करण्याची जबाबदारी सोपवितो. या मोहिमेवर असतांना वाटेत बाझदाचा पाय एका सुरुंगावर पडतो व तो जखमी होतो. त्याला तसाच सोडून साशा पुढे निघतो. पण सुरुंगाच्या स्फोटाचा आवाज ऐकून बुर्नेटही सावध होतो. आपला पाठलाग होतो आहे, हे त्याला कळते. साशाला बुर्नेटची इजेक्शन सीट सापडते. तेवढ्यात बाजूलाच दडून बसलेला बुर्नेट त्याच्यावर अचानक हल्ला करतो. दोघात झटापट होते. झटापटीत साशा ठार होतो. पण त्याचवेळी लोकार स्वत: रणगाड्यांसह घटनास्थळी पोचतो. बुर्नेटवर गोळ्यांचा वर्षाव सुरू होतो. पण सामूहिक कबरीच्या छायाचित्रांची हार्ड ड्राईव्ह मिळवत बुर्नेट कार्यबलासह तिथून निसटतो.
वंशविच्छेदाचा सबळ पुरावा मिळताच लोकारला शिक्षा होते. रीगार्टवर त्याच्या अपेक्षेप्रमाणे कारवाई होऊन त्याला कार्यमुक्त केले जाते व बुर्नेट याची नौदलातील कारकीर्द मात्र पुढे सुरू राहते.

No comments:
Post a Comment