दी नन (तंत्राने तारलेला चित्रपट)
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
दी नन हा 2018 सालचा गोथिक लोकांशी संबंधित एक अद्भुत थरारपट आहे. काॅरिन हार्डीने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा पटकथा लेखक गॅरी डाॅबरमन आहे. मूळ कथा राॅबरमन व जेम्स वॅन यांनी संयुक्त रीत्या लिहिलेली आहे. अमेरिकन अद्भुत थरारपट या व्यापक योजनेचा हा एक भाग आहे. यात डेमियन बिशिर, तैसा फार्मिगा व ज्योना बाॅक्वेट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गोथिक ही जर्मन जमात असून तिला रोमन लोक रानटी मानत असत. एक रोमन कॅथोलिक धर्मगुरु आणि एक नवशिकी नन यांना 1952 साली रोमानियात एक अपवित्र गुपित उलगडते आणि चित्रपटाची कथा उलगडायला सुरवात होते.
या चित्रपटाचे चित्रिकरण होत असतांना सेटला रोमन कॅथोलिक चर्चच्या धर्मगुरूंनी पावन केले होते. आपल्याकडील नारळ फोडण्यासारखाच हा प्रकार म्हटला पाहिजे. 2018 मध्ये हा चित्रपट अमेरिकेत दाखवायला सुरवात झाली यावरून तो किती ताजा आहे हे लक्षात येईल. बक्कळ कमाई करणाऱ्या या चित्रपटाची समीक्षा मात्र मिश्र स्वरुपाची आहे. सादरीकरण, दिग्दर्शन, चलचित्रनिर्मिती, दृश्ये, वातावरण या बाबी वाखाणल्या गेल्या तर तकलादू कथावस्तू व धक्कातंत्र वापरून भयनिर्मितीच्या दृश्यांचा अतिरेक ह्या बाबी टीकेस पात्र ठरल्या आहेत. थरारपटांचा डोलारा भिववणाऱ्या दृश्यांच्या विटांवर उभा असतो, असे म्हटले जाते. भयनिर्मितीसाठी अचानक एखादी घटना किंवा दृश्य उभे करायचे व जोडीला साजेसे ध्वनिसंयोजन भरीस वापरायचे, हे तंत्र अतिवापराने आता तेवढे परिणामकारक व अपरिचित राहिलेले नाही पण हे बाळबोध व सोपे तंत्रच या चित्रपटात वापरल्याचे दिसते.
कथावस्तू
कथेचा प्रारंभ आहे, 1952 चा. दोन नन (ईश्वरी कार्याला वाहून घेतलेली स्त्री)
कार्टा माॅनेस्ट्रीत (भिक्षुकांचे निवासस्थान) नेहमीप्रमाणे वावरत असतांना त्यांच्यावर एका अज्ञात शक्तीचा हल्ला होतो. त्या एका बोगद्यातील काही जुने अवशेष गोळा करण्यासाठी गेलेल्या असतात. त्यांच्यापैकी एक सिस्टर व्हिक्टोरिया हल्यातून सुटका करून घेते. हल्ला करणारे भूत एका ननच्याच रूपात असते. ती स्वत:ला फास लावून घेते. तिचे प्रेत फ्रेंची नावाच्या माॅनेस्ट्रीला माल पुरवणाऱ्या वाहतुकदार खेडुताला सापडते.
ही माहिती व्हेटिकनला (ख्रिश्चनांचे मुख्यालय) कळते. ते फादर बर्कला रोमला येण्याची अाज्ञा करतात. सर्व परिस्थितीचा शोध घेण्यासाठी एका नवशिक्या सिस्टर सोबत (सिस्टर आयरिनसोबत) ते त्याला येण्यास सांगतात. सिस्टर आयरिन त्यावेळी एका शाळेत धर्म व विज्ञान यातील संबंध मुलांना समजावून देत असते. मदर तिला मध्येच थांबवते व फादर बर्क तिला सोबत नेण्यासाठी आला असल्याचे सांगते.
रोमानिया नावाच्या युरोपातील देशात फादर बर्क व सिस्टर आयरिन जातात. तिथे त्यांची फ्रेंची या वाहतुकदाराशी भेट होते. तो त्यांना पाद्र्यांच्या निवासस्थानी घेऊन जातो. त्यांना व्हिक्टोरियाचे प्रेत सापडते. त्या प्रेताजवळची किल्ली हस्तगत करतात. त्या निवासस्थानी त्यांची गाठ मठस्वामिनीशी पडते.ती त्यांना सांगते की त्यांनी रात्रभर मौन पाळले आहे. दुसऱ्या दिवशी त्यांना परत यायचे असेल तर ती त्यांना शेजारच्या काॅनव्हेंटमध्ये मक्काम करण्याचे निमंत्रण देते. फ्रेंची आपल्या घरी परत येत असतांना त्याच्यावर भूत हल्ला करते पण तो निसटतो. बर्क आयरिनला सांगतो की, डॅनियन नावाच्या मुलावरचे भूत त्याने उतरवले होते. या प्रक्रियेत तो अतिशय गंभीरपणे जखमी होऊन दगावला होता. तेव्हापासून तो सतत दु:खी असतो. आयरिन त्याला सांगते की, एक स्त्री म्हणून तिला ननची दृष्टी आहे. यामुळेच चर्चला तिच्यात विशेष आस्था आहे. भूत बर्कला जिंवत गाडते, तेव्हा आयरिन त्याला बाहेर काढते.
दुसरे दिवशी बर्क व आयरिन पाद्र्यांच्या निवासस्थानी जातात. पण तो महिलांसाठीच असल्यामुळे फक्त आयरिनच आत जाते. तिथे तिला इतर नन भेटतात. त्या सांगतात की, संकट दूर व्हावे म्हणून त्या आळीपाळीने सतत प्रार्थना करीत आहेत. सिस्टर ओना तिला त्या वास्तूचा इतिहास सांगते.एका गूढाच्या प्रभावाखाली येऊन एका सरदाराने तो मठ बांधला होता. यात प्रेत पुरण्यासाठी एक तळघर आहे. सरदाराने या तळघराला असलेल्या फटीतून भूताला पाचारण केले. पण ख्रिश्चन सरदारांनी त्याला ठार केले व ती फट एक रसायन वापरून बंद केली. हे रसायन तयार करण्यासाठी त्यांनी येशूचे रक्त उपयोगात आणले होते. पण दुसऱ्या महायुद्धात जे बाॅम्बहल्ले झाले, त्यामुळे ही फट पुन्हा किलकिली झाली व ही पाशवी शक्ती-वॅलक- मुक्त झाली. एक ग्रंथांचा वाचक असलेला बर्क सांगतो की गोथिक ग्रंथामध्ये याचे वेगवेगळे वर्णन आढळते. तसेच ज्या मठस्वामिनीची त्यांची भेट झाली होती, ती तर केव्हाचीच मेलेली आहे, असे त्यांना कळते.
आयरिनवर वॅलक हल्ला करतो. परत गेलेला फ्रेंची तिच्या मदतीसाठी परत फिरतो. ननसोबत तोही वॅलकचे संकट दूर व्हावे, म्हणून प्रार्थना करतो. हे एकत्र येतात आणि आयरिनच्या लक्षात येते की, ज्या अनेक ननशी ती बोलली होती, त्यापैकी एकही खरी नसते. प्रार्थना ती एकटीच करीत असते. तिला कळते की, तिथे आलेली व्हिक्टोरिया ही एकमेव खरी नन असते आणि तिने आपल्या शरीरावर वॅलकला क्रिया करण्यास व पाशवी शक्ती मुक्त करण्यास वाव मिळू नये म्हणून बलिदान दिलेले असते.
बर्क, आयरिन व फ्रेंची या निष्कर्षाप्रत पोचतात की, वॅलकला थोपवण्यासाठी तळघराला पडलेली फट बुजवणे, हाच एकमेव मार्ग आहे आणि त्यासाठी पवित्र पात्रातील ख्रिस्ताचे रक्त हाच एकमेव उपाय आहे. व्हिक्टोरियाजवळच्या किल्लीचा उपयोग करून ते छोटीशी बाटली मिळवतात. आयरिन बर्कला सांगते की, परमेश्वराने तिने नवशिकी नन न राहता स्वघोषित नन व्हावे, असे म्हटले आहे. बर्क याला अनुसरून तिला स्वघोषित ननचा दर्जा देतो.
बर्क, आयरिन व फ्रेंची हे तिघे बोगद्याचे दार उघडतात. वॅलक आयरिनला एका आध्यात्मिक पंचकोनी चिन्हाचा वापर करून मोहित करतो व तिच्यावर ताबा मिळवतो.पण फ्रेंची ख्रिस्ताचे रक्ततिच्या चेहऱ्यावर फासतो व तिला भुताच्या पाशातून मुक्त करतो. भूत आयरिनला पाण्यात बुडविण्याचा प्रयत्न करते व बर्कला जखमी करते. पण आयरिन त्च्या चेहऱ्यावर ख्रिस्ताचे रक्त फेकते व त्याला हाकून लावते.ख्रिस्ताचे रक्त वापरून तळघराची फट ते बुजवतात. आयरिन शुद्धीवर येताच फ्रेंची तिला सांगतो की, त्याचे खरे नाव माॅरिस असे आहे. त्याच्यावरही कुणाच्याही नकळत वॅलकचा अंशत: प्रभाव पडलेला असतो. त्याच्या गळ्यातील उलट्या क्राॅसवरून हे स्पष्ट होते.
आता चित्रपट आपल्याला एकदम वीस वर्षे पुढे नेतो. एका विद्यापीठात सेमिनार सुरू असतो. एडवर्ड वाॅरेन मिने आणि लाॅरेन रिटा वाॅरेन हे शास्त्रीय संशोधनाच्या पलीकडच्या क्षेत्रात (भूत पिशाच्य आदी) संशोधन करणारे संशोधक मंत्रोपचार करून माॅरिसला वॅलकच्या तावडीतून मुक्त करण्यासंबंधीचे चित्रण दाखवीत असतात. माॅरिस लाॅरेनला पकडतो व तिला मरणाच्या वाटेवर असलेल्या एडवर्डची दृष्टी देतो. यातून वाॅरेनच्या संशोधनाला वेगळीच दिशा मिळते. तो पेराॅन व वॅलक यांचा शोध घेण्यास सुरवात करतो. खराखुरा पॅराॅन दहा वर्षांपूर्वी एका फार्महाऊसमध्ये राहत असतो. त्याच्यावर वॅलकने प्रभाव टाकलेला असतो. अशी वॅलकची कुळकथा असते.
चमत्कार, अंधश्रद्धा, अतिंद्रीय शक्ती व कल्पनाविलास यांची रेलचेल असलेला नन हा ढिसाळ कथानक असलेला चित्रपट केवळ उत्तम अभिनय, सादरीकरण, दिग्दर्शनकौशल्य, दृश्ये, चलचित्रनिर्मिती आणि पूरक व पोषक वातावरण यांच्या भरवशावर 21 व्या शतकातही कसा लोकप्रिय व लोकमान्य (तेही अमेरिकेत) होतो, याचे नन हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे

No comments:
Post a Comment