कॅनडाची निवडणूक पद्धती व निकाल - एक विश्लेषण
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
कॅनडामध्ये ब्रिटनप्रमाणे सांसदीय शासनपद्धती आहे.1) सर्वोच्च सत्ता गव्हर्नर जनरलच्या हाती आहे. कॅनडाच्या पंतप्रधानाच्या सल्यानुसार ब्रिटनची राणी त्याची नियुक्ती करते. (ब्रिटनमध्ये सत्ता राजाच्या हाती आहे त्याप्रमाणे) 2) सिनेट हे वरिष्ठ सभागृह आहे. पंतप्रधानाच्या शिफारसीनुसार गव्हर्नर जनरल सिनेटच्या 105 सदस्यांची नियुक्ती करतो. (वयोमर्यादा 75 वर्षेपर्यंतच असली पाहिजे) 3) कनिष्ठ सभागृह (हाऊस ॲाफ काॅमन्स) - या सभागृहाचे सदस्य नागरिक निवडणूक पद्धतीने निवडतात. कॅनडाच्या हाऊस ॲाफ काॅमन्समध्ये 338 सदस्य असून बहुमतासाठी 170 जागा मिळण्याची आवश्यकता आहे.
एवढ्यात कॅनडात मतदानाच्या टक्केवारीची घसरण सुरूच असून यावेळी (2019 मध्ये) ती 2015 च्या 68 % वरून 62 %, पर्यंत घसरली आहे. संपूर्ण देशाचे (सध्या) 338 मतदारसंघात घटनेतील तरतुदीनुसार विभाजन केले आहे. दर 4 वर्षांनी ठराविक दिवशी होणाऱ्या निवडणुकीत सर्वातजास्त मते मिळवणारा उमेदवार (फर्स्ट पास्ट दी पोस्ट) संसद सदस्य म्हणून निवडला जातो. सामान्यत: जास्त जागा मिळविणाऱ्या पक्षाला गव्हर्नर जनरल सरकार सरकार तयार करण्यास पाचारण करतात. या पक्षाचा नेता पंतप्रधानपदी विराजमान होतो. दुसऱ्या क्रमांकाची संसदसदस्यसंख्या असलेला पक्ष अधिकृत विरोधी पक्ष होतो.
निवडणुकीतील पडझड, कोण सरसावला, कोण माघारला!
जस्टिन ट्रूडो यांच्या सत्तारूढ उदारमतवादी व काहीशा उजवीकडे झुकलेल्या लिबरल पार्टीला 2015 मध्ये 184 जागा मिळाल्या होत्या. त्या 27 ने कमी होऊन 2019 मध्ये 157 जागा मिळाल्या आहेत. भ्रष्टाचार आणि घोटाळे याबाबत पुरेशी कडक कारवाई केली नाही, असा आरोप असून सुद्धा लिबरल पार्टीला आणखी चार वर्षे कारभार करण्याची संधी जनतेने दिली आहे. 20 नोव्हेंबरला शपथविधी होईल, हे खरे पण पूर्ण बहुमत न देता अल्पमताचे सरकार चालविण्याची शिक्षाही केली आहे.
ॲंड्र्व्यू शीअर यांच्या पुरामतवादी पण आर्थिक उदारमतवादविरोधी काॅनझर्व्हेटिव्ह पार्टीला 2015 मध्ये 99 जागा मिळाल्या होत्या त्या 22 ने वाढून 2019 मध्ये 121 जागा मिळाल्या आहेत. यस फ्रॅंकाॅईस ब्लॅंचेट यांच्या प्रादेशिक स्वायत्ततावादी ब्लाॅक क्युबेकाॅईस पार्टीला 2015 मध्ये 10 जागा मिळाल्या होत्या त्या 22 ने वाढून होऊन 2019 मध्ये 32 जागा मिळाल्या आहेत. मूळ भारतीय वंशाच्या कॅनेडियन अश्वेत वर्णी जगमीत सिंग यांच्या प्रागतिक न्यू डेमोक्रॅटिक पार्टीला 2015 मध्ये 44 जागा मिळाल्या होत्या त्या 20 ने कमी होऊन 2019 मध्ये 24 जागा मिळाल्या आहेत. एलिझाबेथ मे यांच्या पर्यावरणवादी ग्रीन पार्टीला 2015 मध्ये 1 जागा मिळाली होती 2019 मध्ये त्यात 2 ने वाढ होऊन 2019 मध्ये 3 जागा मिळाल्या आहेत. स्वतंत्र उमेदवाराला 2015 साली एकही जागा नव्हती तर 2019 मध्ये 1 जागा मिळाली आहे.
कुणाचा पाठिंबा व कुणाचा विरोध
जस्टिन ट्रूडो यांची सत्तारूढ उदारमतवादी लिबरल पार्टीला बहुमतासाठी 13 मतांची आवश्यकता असून हा पक्ष अल्पमताचे सरकार स्थापन करण्याच्या विचारात आहे. या पक्षाला मूळ भारतीय वंशाच्या कॅनेडियन अश्वेत वर्णाच्या जगमीत सिंग यांची प्रागतिक व काहीसा डावीकडे झुकलेला न्यू डेमोक्रॅटिक पार्टी हा पक्ष पाठिंबा देण्याच्या विचारात आहे. या निवडणुकीत 50 टक्के जागांचे नुकसान होऊनही (44 ऐवजी 24) तसेच मुळात शून्यातून उभा झालेला 47 वर्षांचा पहिला नेता या नात्याने जगमीत सिंग यांचा पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत असेल. ‘कॅनडावासियांचे जीवन अधिक सुखकर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तळागाळातल्यांच्या हिताचे रक्षण, हवामानबदल व श्रीमंतांनी आपल्या श्रीमतीला साजेसा खर्चाचा वाटा उचलावा यावरही आमचा भर असेल. हाऊसमध्ये आमची भूमिका सकारात्मक असेल’, अशी भूमिका घेणारे सिंग हे डाव्या विचारसरणीचे फौजदारी वकील आहेत.
एलिझाबेथ मे यांच्या पर्यावरणवादी ग्रीन पार्टीचा विरोधात बसण्याचा निर्धार आहे. यस फ्रॅंकाॅईस ब्लॅंचेट यांच्या प्रादेशिक स्वायत्ततावादी ब्लाॅक क्युबेकाॅईस पार्टीचाही असाच निर्णय आहे. स्थापन होणारे सरकार अस्थायी असेल व लवकरच मध्यावधी निवडणुकांना सामोरा जाण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
कॅनडामधील ही 43 वी निवडणूक उजवीकडे झुकणाऱ्या जस्टिन ट्रूडो यांच्यासाठी तशी कठीणच गेली पण त्यांच्या अतिउजव्या प्रतिस्पर्ध्यांचे तर खूपच नुकसान झाले. सुरवातीच्या कलांवरून तर वाटत होते की त्यांचेही पार पानिपत होणार पण तेवढे नुकसान झाले नाही. अल्पमताचे का होईना पण सरकार स्थापन करता येणार, हे कळताच त्यांच्या पाठिराख्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि कॅनडाचे राजकारण पुढील चार वर्षे आणखी काहीसे डावीकडेच झुकलेले राहणार, हेही स्पष्ट झाले. न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने त्यांना पाठिंबा देण्याचे ठरविले याचे कारणही हेच आहे. कारण तो पक्षही डावीकडे झुकलेलाच पक्ष आहे. अशाप्रकारे ही समविचारी पक्षाची एकजूट होत नसूनही कॅनडाला पुढील चार वर्षे स्थिर सरकार लाभेल/लाभो, अशी जनतेची अपेक्षा आहे.
दुसरीही एक जमेची बाजू आहे ती अशी की, विभाजनवादी घटकांना मतदारांनी सर्वत्र झिडकारले आहे. त्यामुळे स्वस्थता लाभेल आणि हवामानबदल व लोककल्याण विषयक कामे निर्वेधपणे हाती घेता येतील. जस्टिन ट्रूडो हे स्वतः प्रगती व सुधारणावादाचे खंदे समर्थक मानले जातात.
प्रस्थापितांना विरोध का झाला?
डावे आणि उजवे यांना एकाचवेळी खूश करतांना दोघेही नाराज होण्याची भीती असते. कर्बोत्सर्जनाला कारणीभूत असलेल्या खनीज तेलावर कार्बन टॅक्स लावून जस्टिन ट्रूडो यांनी पर्यावरणवाद्यांना खूश करण्याचचा प्रयत्न केला होता. पण त्यामुळे खनीजतेलाच्या किमती वाढल्यामुळे वाहनचालक बिथरले. तसेच देशातील खनीज तेलाचे व नैसर्गिक वायूचे उत्पादन तिपटीने वाढविण्याची क्षमता असलेली व पर्वतराशी भेदत जाणारी पाईप लाईनही देशाच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत टाकण्याचा घाट त्यांनी घातला. त्यामुळे पर्यावरणवादीही भडकले. पर्यावरणपूरक पर्यायी उपाय न अंगिकारता व्यावसायिकांना खूश करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. भरीसभर ही की, त्यांनी घोटाळ्यात गुंतलेल्या राजकारण्यांबाबत नरमाईचे धोरण स्वीकारले. त्यामुळे दोन्ही बाजूनी थपडा खाणाऱ्या मृदंगासारखी त्यांची स्थिती झाली. त्यातून हेही घडले ते पूर्वेकडील भल्यामोठ्या फ्रेंच भाषाबहुल (+77 %) क्यूबेक प्रांतात! या प्रांतात एकेकाळी फ्रेंच भाषिकांचा विभक्ततावाद फोफावला होता. जस्टिन त्रुदेव यांनी जनतेची वारंवार क्षमा मागितली. पण व्यर्थ ! उलट त्यांची दोन्ही डगरींवर हात ठेवणारा, उथळ व दांभिक (हिपोक्राईट) म्हणून संभावना करण्यात आली होती. स्वदेशात हे असे तर तिकडे अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप हे तर सुरवातीपासूनच नाराज आहेत.
कुणाला चपराक, कुणावर मेहेर नजर, कुणाला समज?
या सर्व पार्श्वभूमीवर जस्टिन ट्रूडो यांनी पुराणमतवादी काॅनझर्व्हेटिह पार्टीचा पराभव करून, अल्पमतातले सरकार स्थापन करू शकणारे का होईना, पुरेसे संख्याबळ मिळविले, ही बाब दाद द्यावी अशी आहे. याचा परिणाम असा होतो आहे की, काॅनझर्व्हेटिव्ह पक्षाचे पुराणमतवादी नेते ॲंड्र्यू शीअर यांना गर्भपात, समलिंगी विवाह आणि पर्यावरण संवर्धनवाद्यांविरुद्ध उघड भूमिका घेणे कठीण होऊन बसले आहे.
कार्बन टॅक्स रद्द करीन अशी ॲंड्र्यू शीअर यांची घोषणा होती. आपल्याकडे जशी जीएसटी रद्द करू अशी काही पक्षांची भूमिका होती, त्या प्रकारासारखा हा प्रकार होता. पण या घोषणेचा मतदारांवर फारसा परिणाम झाला नाही. उलट खनीज तेलसंपन्न व फ्रेंचबहुल क्युबेक प्रांत असो वा दाट लोकसंख्या असलेला इंग्रजी भाषाबहुल ॲांन्टोरियो प्रांत असो, कुठेही त्यांना जनमताचा पाठिंबा मिळाला नाही. संपूर्ण जगभर राजकीय पक्षांना एक शहाणपण येते आहे ते असे की, पर्यावरणसंवर्धनाकडे दुर्लक्ष करणे दिवसेदिवस कठीण होत जाणार आहे, याची त्यांना जाणीव होते आहे.
या निवडणुकीचा आणखीही एक धडा आहे. उजव्यांना आपले कडवेपण सोडावे लागणार आहे. पीपल्स पार्टी ॲाफ कॅनडाच्या मॅक्झीम बर्निअर यांनी डोनाल्ड ट्रंप यांचे अनुकरण व अनुसरण करीत आपल्या देशापुरतेच पाहण्याची वृत्ती (नेटिव्हिझम), बहुसांस्कृतिकतेचा (मल्टिकल्चरॅलिझम) निषेध, वाजवी स्थलांतरालाही विरोध, पर्यावरण संवर्धनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे मुद्दे समोर ठेवून देशभर उमेदवार उभे केले पण त्यातला एकही निवडून आला नाही.
तसाच एक धडा जस्टिन त्रुदेव यांच्यासाठीही आहे. त्यांना थोडे डावीकडे झुकावे लागणार आहे. कारण जगमीत सिंग यांच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचा पाठिंबा मिळविण्यासाठी गरजवंतांकडे जास्त लक्ष देण्याची त्या पक्षाची अट मान्य करावी लागणार आहे. तसेच खनीज तेलाच्या वाहतुकीसाठीच्या ट्रान्स माऊंटन पाईपलाईनचा आणखी विस्तार करता येणार नाही. पण आजवर सत्ता व संपत्तीची चव कधीही न चाखलेला, न्यू डेमोक्रॅटिक पक्ष व्यावहारिक तडजोडी करणारच नाही, अशी हमीही देता यायची नाही.
मुख्यतः फ्रेंचबहुल क्यूबेक प्रांतातील ब्लाॅक क्यूबेकाॅईस पक्ष आता आपल्या मूळ विभक्ततावादापासून बराच दूर गेला आहे. त्यातून यावेळी मतदारांनी त्या पक्षाला 22 जागांचा बोनस दिला दिला आहे. आता जागांच्या संख्येने 10 वरून 32 पर्यंत हनुमान उडी घेतली आहे. त्यामुळे तो आता विभक्ततेची अतिरेकी मागणी गुंडाळून ठेवील आणि पर्यावरणसंवर्धन, आणि पाईपलाईनला विरोध यावर आपले लक्ष केंद्रित करील व कॅनडाला स्थिर, प्रागतिक व जनहितकारी शासन मिळेल, असे निरीक्षकांचे मत आहे.

No comments:
Post a Comment