लेखनस्वातंत्र्य असावे पण कसे आणि किती?
वसंत गणेश काणे
साहित्य निर्माण व्हायला केव्हा प्रारंभ झाला, हे सांगता येणार नाही. बहुदा मानव अर्थपूर्ण भावभावना व्यक्त करायला लागला तेव्हापासून एका अर्थाने साहित्य निर्माण व्हायला सुरवात झाली, असे म्हणता येईल. हे जेव्हा केव्हा झाले असेल ते असो पण तेव्हापासूनच काय लिहावे, काय लिहू नये, या बद्दलचा विचार मानव समाजात सुरु झाला असावा.हा मुद्दा केवळ लिखाणापुरताच मर्यादित राहिला नसणार. चित्रकला, शिल्पकला यांचे बाबतीत सुद्धा हा विचार पुढे आला असणार. श्लील अश्लील वाद, योग्य की अयोग्य हा विचार ,चांगले कोणते वाईट कोणते हा विचार, या सर्वांची जातकुळी एकाच प्रकारची म्हटली पाहिजे. ‘पूर्ण स्वातंत्र्यवादी’ आणि मर्यादित स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे असे दोन मतप्रवाह तेव्हापासून जे सुरु झाले आहेत,ते आजतागायत कायम आहेत आणि भविष्यातही कायम राहतील असे दिसते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ब्रिटिश शासनाने बंदी घातलेले ‘माझी जन्मठेप’ हे आत्मचरित्र आपल्याला चटकन आठवते. शिवचरित्राचे विकृत वर्णन करणाऱ्या पुस्तकावर टाकलेल्या बंदीची आठवण तर ताजीच आहे. पहिली बंदी परकीय सत्तेने स्वातंत्र्याची भावना दडपून टाकण्याच्या हेतूने टाकली होती, म्हणून आपण अयोग्य ठरवतो.तर दुसरी बंदी एका युगपुरुषाचे प्रतिमाभंजनाचा प्रयत्न हाणून पाडणारी म्हणून योग्य ठरवतो. थोडक्यात असे म्हणता येईल की,लेखकाला लिहिण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे हे जसे खरे आहे, तसेच ‘अनिर्बंध स्वातंत्र्य’ या नावाची गोष्ट असू शकत नाही. लेखकाने या बाबतीतली ‘lलक्ष्मण रेषा’पालीच पाहिजे. मात्र ही लक्ष्मण रेषा पाळणाऱ्या लेखकावर बंधने असू नयेत.
‘कवी किंवा लेखकावर कोणताही अंकुश
नसतो/नसावा’, असे एक संस्कृत वचन आहे. ‘निरंकुश: कवया:’,असे एक वचन आपल्याकडे
प्राचीन काळापासून रूढ झाले आहे. हे वचन वर नमूद केलेल्या मर्यादेत राहणाऱ्यांचे
बाबतीत मात्र मान्य केले पाहिजे. हि मर्यादा पाळली जात असेल तर मग मात्र लेखकाने
असेच आणि अमुक प्रकारेच लिहिले पाहिजे, असे म्हणता येणार नाही, तसे म्हणणे योग्य
नाही.
‘हॅरी पॉटर’च्या जन्मदात्री चतुराई
या वचनाची आठवण व्हावी, असे एक वृत्त
कानावर येत आहे.या निमित्ताने लेखकांनी योजलेल्या युक्त्या, केलेला चतुरपणा, या
गोष्टी लक्षवेधक तशाच मनोरंजकही आहेत. ‘हॅरी
पॉटर’ या जगविख्यात कादंबरीच्या लेखिकेनेच –
जे जे राउलिंग हिनेच एका नवीन चर्चेला सुरवात करून दिली आहे. ‘हॅरी व रॉन’
हे दोन युवक आणि ‘हरमॉइनी’ ही युवती असा त्रिकोण या कादंबरीत दाखविला आहे. असे म्हटले जाते
की, ‘हॅरी आणि हरमॉइनी’ यांची जोडी झालेली वाचकांना आवडली
असती, ‘हॅरी आणि हरमॉइनी’ यांच्यातील सात्विक प्रेम (प्लँटाँनिक लव्ह) पाहता त्या दोघांची जोडी
जमवायला हवी होती, असे अनेक वाचकांचे मत होते. पण prtyx prtyप्रत्यक्ष कादंबरीत
लेखिकेने x हरमॉइनी आणि रॉन यांची जोडी जमवली. असे केले नसते तर बरे झाले असते, असे
काहीसे विधान खुद्द लेखिकेनेच केले आहे, ‘हॅरी
पॉटर’ या कादंबरीचे सर्व सात भाग प्रकाशित
होऊन आता सात/आठ वर्षे होत आली आहेत. आता असे विधान करून एक ‘नवीनच पिल्लू’
सोडण्यामागे लेखिकेचा काय उद्देश असावा, याबाबत आता तर्कवितर्क सुरु आहेत. ही
कादंबरी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात
यावी ,असा लेखिकेचा एक उद्देश असू शकतो.या कादंबरीने जे के राऊलिंग या लेखिकेला जगातील
पहिल्या अडीचशे श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवून दिले आहे., असे असले तरीही
आता पुन्हा एकदा ही कादंबरी प्रसिद्धी पावली तर पहावे, असा तिचा उद्देश असेल त्यात
आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. कदाचित तिला या कादंबरीचा विस्तारही करायचा असेल.
तसे पाहिले तर या कादंबरीचा ‘कॅनव्हास’(विस्तार)
खूपच मोठा आहे. तिचे सात खंड प्रकाशित झाले आहेत. तरीही तिचा आणखी विस्तार करावा,
असे लेखिकेच्या मनात आले असेल तर हेही स्वातंत्र्य तिला आहे. एखादी नवी कादंबरी
प्रकाशात आणण्यापूर्वी या निमित्ताने आपले नाव पुन्हा नव्याने चर्चेत यावे, हाही
उद्देश असू शकतो. असे काहीही असले तरीही या लेखिकेविरुद्ध कोणतीही तक्रार करता
यायची नाही.
शेरलॉक होम्सच्या जन्मदात्याची वाचकांनी केलीली
पंचाईत
कल्पित कथा / कादंबऱ्यातील काही पात्रे वाचकांच्या प्रेमाला/
आवडीला पत्र ठरत असतात. सर आर्थर काँनन डॉईल या कादंबरीकाराचा डिटेक्टिव मानसपुत्र
‘शेरलॉक होम्स’हा लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाला होता.केव्हातरी थांबलेच
पाहिजे, असा विचार करून कादंबरीकाराने या नायकाचा एका झटापटीत अंत
झाल्याचे दाखविले. पण वाचकांना हे सहन झाले नाही. ते खवळून उठले. त्यांनी फार मोठे
आंदोलन उभारले. शेवटी लोकांना त्याला जिवंत करावे लागले आणि त्याच्या चातुर्याच्या
अनेक नवीन कथा लिहाव्या लागल्या. काँनन डॉईलने वाचकांचा हा अंकुश मान्य केला आणि
वाचकांच्या म्हणण्याला प्रतिसाद दिला. तसेच त्याला वाचकांचे म्हणणे पटले, असेही
म्हणता येईल. तसेच त्याला वाचकांचे म्हणणे पटले, असेही म्हणता येईल.
राऊलिंगबाईची काँनन डॉईलवर मात
काँनन डॉईलला आपल्या मानसपुत्राचे
पुनरुज्जीवन करण्यास वाचकांनी भाग पाडले. तसाच प्रकार ‘हॅरी पॉटरच्या बाबतीत झाला तर?’ पण अशी पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून लेखिकेने एक युक्ती योजली आणि काँनन डॉईलवर मात केली. तिने आपल्या
कादंबरीच्या सातव्या भागाचा शेवट अतिशय खुबीदारपणे केला आहे, कादंबरीचे शेवटचे
प्रकरण सुरु होते, तेच मुळी मधल्या काळात पंचेवीस वर्षे गेल्यानंतर. या मधल्या कालखंडात कथेचा
नायक - हॅरी पॉटर- मोठा आणि गृहस्थाश्रमी झालेला असतो. तो ज्या शाळेत शिकत होता त्या
शाळेतल्या सगळ्या दुष्ट शक्तींचा नाश झालेला असतो. स्वत: हॅरी पॉटरने या कमी फार महत्वाची भूमिका बजावली
होती. तो आता मोठा झाला होता त्याचे लग्न झाले होते त्याला दोन मुलेही झाली होती,
आता त्याची शाळा पूर्णपणे शापमुक्त झाली होती. म्हणून त्याने आपल्या दोन्ही
मुलांना याच शाळेत घालायचे ठरविले होते. तो रेल्वे स्टेशनवर मुलांना घेऊन आला
होता. लवकरच गाडी येणार होती आणि मुले आपल्या वडिलांच्याच शाळेत शिकायला
जाण्यासाठी प्रस्थान करणार होती. इथे लेखिकेने कादंबरीचा शेवट केला आहे.
एका वस्ताद कादंबरीकाराची आणखी एक युक्ती
पण काही लेखक वाचकांच्या आंदोलनावर
वेगळ्याच प्रकारे मात करणारेही असतात.
अशीच एक कथा (खरी/खोटी) स्मरणात आहे, ती अशी. एका कादंबरीचे एका वृत्तपत्रात दर
आठवड्यातून एकदा असे क्रमश: लेखन सुरु होते. कादंबरी वाचकांमध्ये खूपच लोकप्रिय
झाली होती. एका प्रकरणाचा शेवट करतांना कादंबरीकाराने नायक आणि नायिकेतील एका
उत्तन प्रेमप्रसंगाला सुरवात होत असल्याचे सुयोवाच करून ते प्रकरण तिथेच संपवले.
अर्थातच पुढील प्रकरण केव्हा प्रकाशित होते, याची आंबटशौकीन वाचक (खरं सांगायचं तर
सर्वच वाचक) अति उत्सुकतेने वाट पाहत होते. पण पुढच्या प्रकरणात वाचकांना अपेक्षित
होते, तसे काहीही घडले नाही. या प्रकरणाची सुरवात करतांना कादंबरीकाराने नायक
नायिका दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चहा पीत बसलेले दाखवून
त्या प्रकरणाचा प्रारंभ केला. त्यामुळे नाराज होऊन वाचकांनी ‘दोन प्रकरणांच्या
दरम्यान घडलेला कथाभाग’ न सांगितल्याबद्दल लेखकावर खूप टीका केली. ती कादंबरी क्रमश: छापणाऱ्या वृत्तपत्राच्या संपादकाच्या
टेबलावर निषेधपर पत्रांचा खच जमा झाला. यथावकाश कादंबरीकाराने खुलासा केला तो असा
की,’आमची पत्रे दोन प्रकरणांच्या
दरम्यान काय आणि कायकाय करतात ते आम्हाला माहित असलेच पाहिजे असे नाही आणि समका ते
आम्हाला माहित असले पाहिजे असे गृहीत धरले तरी, तो कथाभाग सांगितलाच पाहिजे, असे
लेखकावर बंधन नसते’.
No comments:
Post a Comment