लघुग्रह क्रमांक ३४८८ नव्हे आंद्रे ब्राहिक!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड हल्ली मुक्काम २७२१, प्राईम रोज लेन,उत्तर याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
‘मरावे परि किर्तीरूपे उरावे’, हे वचन आपल्या परिचयाचे आहे. आंद्रे ब्राहिक हा फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ कीर्तीरूपे तर आपल्यात असणारच आहे पण त्याच बरोबर ३४८८ क्रमांकाच्या लघुग्रहाच्या रूपातही अंतराळात प्रदक्षिणा घालत आपली सोबत करणार आहे. कारण १९९० साली खगोलशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी या लघुग्रहाला त्याचे नाव देण्यात आले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी १५ मे २०१६ ला त्याने आपला निरोप घेतला. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रॅंकाॅईस होलांडे यांनी त्याला श्रद्धांजली वाहतांना म्हटले आहे की, अंतराळातील चमत्कार सर्वसामान्यांनाही कळतील अशा शब्दात सांगावेत आंद्रे ब्राहिक यांनीच.१९८४ साली त्याने शनीप्रमाणे नेपच्यून या ग्रहाला तीन वलये असून त्यातले सर्वात बाहेरचे कडे सलग नाही तर त्रिभाजित आहे , हे दाखवून दिले. या तीन कड्यांना त्याने स्वातंत्र्य(लिबर्टी), समता (इक्वॅलिटी) आणि बंधुता (फ्रॅटर्निटी) ही नावे दिली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या निमित्ताने फ्रांन्समध्ये जे मंथन झाले त्यातून नवनीत स्वरूपात बाहेर पडलेली ही तत्त्वत्रयी हा शास्त्रज्ञ विसरला नव्हता, याची नोंद घ्यावयास हवी.
३० नोव्हेंबर १९४२ रोजी वंशपरंपरेने कोळशाच्या खाणकाम व्यवसायात असलेल्या कुटुंबात आंद्रेचा जन्म झाला. त्याच्या वडलांना सिलीकाॅसिस नावाचा रोग झाला आणि म्हणून त्यांनी ती नोकरी सोडून रेल्वेतील नोकरी धरली. कोळशाच्या खाणीत कधीकधी हिरेही सापडतात, असे म्हणतात. या खाणीत हिरा सापडल्याची माहिती नाही पण ब्राहिक कुटुंबात आंद्रे नावाचा हिरा पॅरिस येथे जन्माला आला हे मात्र खरे आहे. जन्माचे वेळी १९४२ साली पॅरिस जर्मनांच्या ताब्यात होते.
फ्रान्समधील शाटझमन नावाच्या खगोलशास्त्रज्ञाचा आदर्श समोर ठेवून आंद्रेने सौरमालेच्या अभ्यासाला सुरवात केली. सौरमालेत अनेक रहस्ये दडलेली आहेत.शास्त्रज्ञांना ही गुपिते महत्प्रयासाने कळत. पण ती जनसामान्यानाही कळतील, अशा शब्दात सांगणे अनेकांना जमत नसे. आंद्रेला मात्र ही रहस्ये सोपी करून जनसामान्यांनाही कळतील, अशाप्रकारे सांगण्याची कला अवगत होती.
आंद्रेने खगोलशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. ही पुस्तके वाचून सामान्य लोक सुद्धा आकाशातील सहलीचा आनंद घेऊ शकातात, अशा शब्दात फ्रान्सच्या अध्यक्षांनी आंद्रेचा गौरव केला आहे. 'वर्ल्ड्स एल्सव्हेअर-आर वुई अलोन’ हे त्याचे शेवटचे पुस्तक. आपला निरोप घेताघेता आपण या विश्वात एकटे नाही, हे सांगून मगच त्याने आपला निरोप घेतला आहे. तो 'त्या' विश्वात तर गेला नसेल ना.
शनीभोवती असलेल्या कड्यांवरून आंद्रेचे कुतुहल जागृत झाले. ग्रहमालेतील आठवा ग्रह नेपच्यून याच्या अभ्यासाला त्याने सुरवात केली .नेपच्यून ग्रहाचा शोध तसा बराच जुना म्हणजे २३ सप्टेंबर १८४६ चा आहे. मात्र आंद्रे आणि त्याच्या चमूने नेपच्यून भोवतीच्या कड्यांचा शोध लावला. भोवती कडे असलेला शनी हा एकच ग्रह नाही, हे जगाला कळले. लहानपणापासूनचं ग्रहताऱ्यांचे कुतुहल असे फळाला आले.
खगोलविज्ञानाच्या प्रसारात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते त्या कार्ल सॅगान यांच्या नावाचे पदक त्यांना २००१ मध्ये मिळाले होते. अवकाशाची गुपितं त्यांनी त्यांच्या संशोधनातून उकलली. अखेपर्यंत त्यांच्यात संशोधकाला लागणारे कुतूहल कायम होते. नासा व युरोपीय स्पेस एजन्सीच्या अनेक मोहिमांत त्यांनी सहकार्य केले होते. विज्ञानातील गोष्टींनी लहान मुलांचे डोळेही कुतूहलाने चमकून उठतात, असे तो म्हणायचा. आंद्रे ब्राहिक आता देहाने आपल्यात नसला तरी तो उरला आहे, एका लघुग्रहाच्या रूपात, निरभ्र रात्रीच्या ग्रहगोलात. लघुग्रह क्रमांक ३४८८ म्हणजेच ब्राहिक आपल्याला सतत खुणवत राहणार आहे, 'छोटे छोटे रहस्यभेद काय करता? असेल हिंमत तर माझा मागोवा घ्या'.

No comments:
Post a Comment