अमेरिकेतील राजकीय भूकंप - डोनाल्ड ट्रंप
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
हल्ली मुक्काम २७२१, प्राईम रोज लेन, उत्तर याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेतील दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष उजवीकडे झुकलेले आहेत, हे सर्वमान्य आहे. त्यातही रिपब्लिकन पक्ष अधिक उजवा मानला जातो. या उजव्यातही काही कट्टर उजवे मानले जातात. डोनाल्ड ट्रंप यांना अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळालेली पाहून यांना सुद्धा धक्का बसला आहे, हा राजकीय क्षितिजावरील एक चमत्कारच म्हटला पाहिजे. खुद्द पक्ष श्रेष्ठींना सुद्धा ही बाब रुचलेली नाही. पक्षश्रेष्ठी एखाद्याचा पत्ता काटू शकतात, किंवा एखाद्या अपरिचित किंवा अप्रसिद्ध व्यक्तीला गादीवर बसवू शकतात, हा आपल्या येथील राजकारणाचा भाग आहे व तोच आपल्याला माहीत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी अनुकूल नसूनही अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप हे गृहीत उमेदवार ( प्रिझंप्टिव्ह कॅंनडिडेट) ठरतात हे असे कसे घडू शकते, ही बाब आपल्या आकलन क्षमतेच्या बाहेरचीच आहे. (प्रिझंप्टिव्ह म्हणायचे ते अशासाठी की, पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात शिक्कामोर्तब व्हायचे आहे.ते होईल, असे गृहीत धरले आहे. प्रत्यक्षात तिथे काहीही होऊ शकेल) हे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर अमेरिकेतील अध्यक्षपदाचा उमेदवार निवडीची प्रक्रिया अगोदर समजून घेतली पाहिजे.
अमेरिकेत अध्यक्षपदाचा उमेदवार कसा ठरतो? - अमेरिकेत राजकीय पक्षाचा कारभार कायद्याने निर्धारित असतो. वर्षानुवर्षे पक्षांतर्गत निवडणुकीच न होणे, हा प्रकार तिथे चालत नाही. पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया कायद्यानुसार निर्धारित वेळापत्रकानुसारच होत असते. यांना प्रायमरीज व काॅकस असे नाव आहे. या दोन प्रक्रियेतील फरक सध्या लक्षात न घेतला तरी चालेल. ही प्रक्रिया गावपातळीपासून सुरू होते. यात पक्षसदस्य डेलिगेट्सची निवड करतात व डेलिगेट्स अध्यक्षपदासाठी मतदार असतात. या अगोदर देशातील काही मुखंड आपण अमुक पक्षाच्या वतीने अध्यक्षपदाची निवडणूक लढवू इच्छितो, असे जाहीर करतात. डेलिगेट म्हणून निवडणूक लढवणारे आपण यापैकी कोणत्या उमेदवाराचे पाठीराखे आहोत, हे अगोदर जाहीर करतात. सदस्य यातून हवे ते डेलिगेट्स निवडतात. हे डेलिगेट्स बांधील (कमीटेड) असतात. यांना दुसऱ्या उमेदवाराला मत देता येत नाही.
प्रायमरीतले मतदार कोण? - प्रायमरीत केवळ पक्षसदस्यच मतदान करू शकतात असे नाही. पक्षाचे चाहते असलेले मतदार सुद्धा आपली नोंदणी करून प्रायमरीत भाग घेऊ शकतात. पण मग हे मतदार दुसऱ्या पक्षाकडे नोंदणी करू शकत नाहीत. अमेरिकेत पन्नास राज्ये आहेत. प्रत्येकाचा या विषयीचा वेगळा असू शकतो व आहे सुद्धा. त्यानुसार काही राज्यात एकच मतदार दोन्ही पक्षात नोंदणी करतो व आपल्या पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा, हे जसे ठरवतो तसेच विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असावा, याबाबतही मतदान करतो. अशापद्धीने राज्यस्तरावर प्रत्येक पक्षाचे बांधील डेलिगेट्स निवडले जातात. याशिवाय पक्षश्रेष्ठी सुद्धा काही डेलिगेट्स निवडतात. हे विशिष्ट उमेदवारासाठी बांधील(वचनबद्ध) नसतात. ते कुणालाही मतदान करू शकतात. आजवर आपण राज्यनिहाय प्रतिनिधींच्या(डेलिगेट्सच्या) निवडीच्या बातम्या ऐकत होतो व कोण कुणाच्या किती पुढे किंवा मागे आहे ते आपल्याला कळत होते, ते किती डेलिगेट्स कुणाच्या बाजूने आहेत, यावरून.
विनर गेट्स आॅल - कोणत्या राज्याला किती डेलिगेट्स निवडता येतील, याविषयीचे नियम राज्यनिहाय व पक्षनिहाय वेगवेगळे असतात. समजा एका राज्याला दहा डेलिगेट्स निवडण्याचा अधिकार आहे. त्या राज्यात अ, ब व क अशा तीन उमेदवारांचे डेलिगेट्स निवडण्यासाठी निवडणूक झाली. अच्या वाट्याला पन्नास टक्के मते पडली तर त्याला पाच डेलिगेट्स मिळतील, ब च्या वाट्याला तीस टक्के मते पडली तर त्याला तीन डेलिगेट्स मिळतील आणि क च्या वाट्याला वीस टक्के मते मिळाली तर त्याला दोन डेलिगेट्स मिळतील. काही राज्यात प्रत्येक उमेदवाराच्या वाट्याला आलेली ही डेलिगेट्सची संख्या अशीच कायम राहते तर काही राज्यात अच्या सर्वात जास्त म्हणजे पन्नास टक्के मते असल्यामुळे त्याला दहाचे दहा डेलिगेट्स मिळतात. या नियमाला ‘विनर गेट्स आॅल’ (जो जिता वही सिकंदर) असे नाव आहे. राज्य व पक्षनिहाय प्रत्येक राज्यात हा नियम असतो किंवा नसतो देखील.
गृहीत उमेदवार ( प्रिझंप्टिव्ह कॅंनडिडेट) - डोनाल्ड ट्रंप यांनी अशा प्रमाणे दरकोस दरमजल मारीत अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली आहे. अगदीच काही अघटित घडले तरच यात बदल होईल. ही उमेदवारी ९९ टक्के निश्चित समजायला हवी.पण तरीही डोनाल्ड ट्रंप हे गृहीत उमेदवारच( प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेटच) ठरतात. कारण पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात त्यांना विरोध करीत एखादी व्यक्ती उभी राहू शकते व निवडूनही येऊ शकते. यावेळी मात्र डेलिगेट्सची बांधिलकी संपलेली असते. डोनाल्ड ट्रंप, टेड क्रुझ व जाॅन कसीच हे तिघे रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत होते. त्यांना मतदानाच्या एका टप्यावर प्रत्येकाच्या वाट्याला अनुक्रमे ७५५, ५१७ व १४४ अशी डेलिगेट्सची संख्या होती. टेड क्रुझ कदाचित ट्रंप यांचा सामना करू शकतील, अशी अंधुकशी आशा होती. पण त्यांनी एकदम माघारच घेतली. त्याची दोन कारणे सांगितली जातात. एक असे की, टेडचे वडील क्युबामधून आलेले आहेत. क्युबा आणि अमेरिकेचे विळ्याभोपळ्याइतके सख्य आहे. ओबामांच्या मध्यस्तीने एक मैत्री करार दोन राष्ट्रात झाला आहे खरा पण दिलजमाई झालेली नाही. त्यामुळे हा रहस्यभेद टेड क्रुझला चांगलाच जड गेला.दुसरे असे की, केनडीचा खुनी ली हार्वे ओस्वाडचे आणि टेडच्या वडिलांचे संबंध होते, हे उघड झाले आहे. त्यामुळे ते सर्वांच्या नजरेतून पारच उतरले. यामुळे टेड क्रुझ यांना माघार घेण्यावाचून गत्यंतरच उरले नव्हते. क्युबा आणि ओस्वाल्ड ही दोन्ही नावांशी दूरान्वयाने असलेला संबंध सुद्धा अमेरिकन जनतेला अपशेल अमान्य असणार यात शंका नाही.
उमेदवार निवडीचे वेगळेपण- यावरून एक लक्षात घ्यायला हवे की, अमेरिकेत कोणत्याही पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार केवळ पक्षश्रेष्ठींच्याच नव्हे तर पक्ष कार्यकर्ते व पक्षानुकूल मतदार यांच्या मतालाही मोठी किंमत असते. अर्थात अजूनही या नाट्यातला शेवटचा पडदा पडलेला नाही.अंतिम अधिकार पक्षालाच आहे. पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात वेगळा निर्णयही होऊ शकेल. तोपर्यंत हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून शहाण्याने गप्प रहावे, हे चांगले. पण डोनाल्ड यांची उमेदवारी पक्की झाली तर पक्षश्रेष्ठीच अध्यक्षीय निवडणुकीत त्यांचा पराभव करतील, अशा वावड्या उठत आहेत. यावरून या उमेदवारीकडे पक्ष किती गांभीर्याने पाहतो आहे, हे लक्षात यावे. ट्रंप सुद्धा चतुर आहेत. मुसलमानांबद्दल किंवा अशाच अन्य बाबतीत आपण जे बोललो ती आपली मते होती, त्या सूचना होत्या, ते निर्णय नव्हते, अशी सारवासारव करायला त्यांनी सुरवात केली आहे.
पराक्रमी(?) ट्रंप - हा अचाट पराक्रम करणारे ट्रंप आहेत तरी कोण? त्यांचा पूर्वेतिहास काय आहे? वय वर्ष ६९ असलेले, जगमान्य पेन्सिलव्हॅनिया विद्यापीठाची अर्थशास्त्राची पदवी पदवी संपादन केलेले, दोनदा घटस्फोट घेणारे, तीन मुले व दोन मुलींचे पिता असलेले डोनाल्ड ट्रंप यांना पूर्वी राजकारणात कुणी फारसे ओळखतही नव्हते तरी त्यांना आज भरघोस पाठिंबा मिळाला आहे..
ट्रंप यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुरवातीली कुणीही हा विषय गंभीरपणे घेतला नव्हता त्यामुळे त्यांना विरोध व्हायला बऱ्याच उशिराने सुरवात झाली. ते बिल्डर आहेत. ते अमेरिकन टेलिव्हिजन उद्योगातही आघाडीवर आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत/होती. त्यांची माफियांशी साठगाठ आहे, अशी बोलवा आहे. शोध पत्रकार त्यांचा पिच्छा पुरवीत आहेत. पण अजून तरी महत्त्वाचे असे फारसे काही कोणाच्याही हाती लागलेले नाही. ट्रंप यांचा वारू बेफाम घोडदौड करीत धावतच राहिला. शेवटी तर त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उमेदवार अक्षरश: गलितगात्र झाले.
हे महाशय कुठून कसे उपटले ते कोणालाच कळत नाही. यापूर्वी राजकारणाचा मुळीच अनुभव नसलेले, वडलांचाच बांधकाम व्यवसाय चढउतारावर मात करीत सांभाळणारे एक उद्योगपती, मध्यपूर्वेतील मुस्लिमबहुल भागात व्यवसाय करतांना मुस्लिमांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करणारे पक्के ‘व्यवहारी’ म्हणून ओळख असलेले, केवळ विवेकशून्य व भडकावू भाषणामुळेच उदंड लोकप्रियता संपादन करणारे, अतिशय मर्यादित राजकीय समज व ज्ञान असलेले, नको तेवढा स्पष्टपणा, मनमोकळेपणा, बेदरकारपणा हेच भांडवल असलेले डोनाल्ड ट्रंप आज अमेरिकेचे अध्यक्ष होण्यासाठी सरसावले आहेत. यांची बेफाम विधाने गाजली व त्यांची लोकप्रियता दिवसेदिवस वाढतच गेली. राजकीयदृष्ट्या जी किंवा ज्या प्रकारची विधाने करू नयेत, असे मानले जाते, त्या विधानांमुळेच ट्रंप लोकप्रिय होत चाललेले पाहून राजकीय विश्लेषक व पंडित नव्याने डोके खाजवू लागले आहेत.लोकप्रियतेसाठीची नवीन सूत्रे व नवीन गणिते मांडू लागले आहेत.
भडकावू व बेफाम घोषणा- लंडन महापालिकेत मेयर म्हणून निवडून अालेले सादिक खान यांचा अपवाद करून ते मुस्लिम असले तरी त्यांना आपण अमेरिकेत येऊ देऊ, असे विधान ट्रंप यांनी करताच सादिक खान यांनी त्याना सडेतोड उत्तर दिले. ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेराॅन यांना त्यांची विधाने फूट पाडणारी, मूर्खपणाची व चुकीची आहेत, असे म्हणताच ट्रंप पार भडकले. मी युती घडवून आणणारा, शहाणा आणि बरोबर चालणारा आहे, असे म्हणत ट्रंप ‘अरेला कारे’ म्हणत उत्तर देते झाले. यावर कॅमेराॅन यांनी उत्तर न देण्याचा पर्याय स्वीकारला. म्हणतात नाही, काही लोकांना परमेश्वरही घाबरतो. त्यातलाच हा प्रकार, दुसरे काय?
काही प्रसिद्ध मुक्ताफळे - १. ओबामा आणि हिलरी क्लिंटन हे दोघेच मुस्लिम दहशतवादी संघटना आय एस च्या निर्मितीसाठी जबाबदार आहेत,
२. केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांनाही ठार केले पाहिजे.
३. इंटरनेटमुळे दहशतवाद फोफावला म्हणून इंटरनेटवरच नियंत्रण आणले पाहिजे.
४. बिगर अमेरिकनांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये. आजवर घुसलेल्या सव्वा कोट लोकांना अमेरिकेतून हकलून लावले पाहिजे.
५. मेक्सिको हा अमेरिकेला लागून असलेला देश आहे. या देशातून अमेरिकेत अनेक लोक बेकायदा अमेरिकेत प्रवेश करीत असतात. म्हणून या दोन देशात चीनप्रमाणे मेक्सिकोच्या खर्चाने एक अजस्त्र भिंत बांधली पाहिजे.
६. मुस्लिमांवर तर अमेरिकेत प्रवेशबंदीच घातली पाहिजे.
७. ट्रंप स्त्रीविरोधी आहेत. कार्ली फिओरिना ही त्यांची प्रतिस्पर्धी स्त्री उमेदवार होती. ती दिसायला सुंदर आहे. तिच्या दिसण्यावरून ट्रंप यांनी अश्लील शब्दात टीका केली आहे.
८. अमेरिकेतील नोकऱ्यांवर चीन व भारतीय लोकांनी कब्जा मिळवला आहे, तो दूर करण्याची ट्रंप यांची भूमिका आहे.
९. अमेरिकेतील वृत्तपत्रांनी या विधानावर टीका करताच, मी निवडून आलो तर अब्रु नुकसानीचा कायदा आणखी कडक करून टीकाकारांना वठणीवर आणीन. भरपाईची रक्कम एवढी असेल की, संबंधिताला आयुष्यभर पैशासाठी काम करण्याची गरजच पडणार नाही.
अमेरिकन जनमानस कसे? समंजस की असमंजस? - आश्चर्याची बाब ही आहे की, प्रत्येक बेछुट विधानानंतर त्यांची लोकप्रियता बेफाम वाढली. अमेरिका महासत्ता आहे, हे खरे; पण म्हणून अमेरिकन जनमानस परिपक्वच असले पाहिजे, असे थोडेच आहे? असे असते तर ट्रंप यांना पक्षात वपक्षाबाहेर अफाट लोकप्रियता मिळाली नसती. महिला, महिलांचा गर्भपाताचा अधिकार, समलिंगींचे प्रश्न, अल्पसंख्याक, स्थलांतरित, तिसऱ्या जगाचे नागरिक, गरीब, कातडीचा रंग काळा वा विटकरी असणारे यांच्या बाबतची त्यांची भूमिका ह्या गोष्टी बघितल्या की,ते जर अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले तर आजवर अमेरिका जी भूमिका घेत आली आहे, ज्या मूल्यांचा पुन्हा पुन्हा उच्चार करीत आली आहे, त्यापासून हा यू टर्न ठरणार आहे.

No comments:
Post a Comment