जपानमधील राजसन्यास
वसंत गणेश काणे
जपानचे ८२ वर्ष वयाचे सम्राट अकिहिटो यांनी वृद्धापकाळामुळे व प्रकृतीमानही ठीक राहत नसल्यामुळे राज्यत्याग करण्याची इच्छा टिव्हीवर भाषण करून व्यक्त केल्याला आठवडा उलटून गेला आहे, माझी प्रकृती दिवसेदिवस ढासळते आहे, असे ते म्हणाले. तसे पाहिले तर यात अस्वाभाविक किंवा ज्याला वृत्तमूल्य असावे, असे काहीही नसावे, असाच सर्वसाधारण समज असेल ? पण असे नाही. त्यांच्या भाषणानंतर जपानी विश्वामध्ये निपनिराळे तरंग उमटले आहेत.
घटनेत पदत्यागाची तरतूद नाही - पहिली बाब ही की जपानी राज्यघटनेनुसार सम्राटाने तहाहयात पदावर राहिलेच पाहिजे, असे आहे. त्यांना मध्येच पदत्याग करण्याची अनुमती जपानी राज्यघटना देत नाही. सनातनी लोकांना तर सम्राटांचा हा विचार मुळीच रुचणार नाही की मान्य होणार नाही. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी याबाबत पुढे काय करायचे यावर सरकार गांभीर्याने विचार करील, असे म्हटले आहे.
सम्राटपदी स्त्री असणार नाही - दुसरे असे की,घटना दुरुस्त करण्याच्या विचाराला प्रारंभ होताच एक मुद्दा नव्याने चर्चेला येणार आहे. जपानमध्ये सम्राटपद वारसा हक्काने पुढील पिढीकडे जात असले तरी तो वारस पुरुषच असला पाहिजे, अशी तरतूद घटनेत आहे. राजपुत्र नरुहिटो यांना आयको नावाची मुलगी असल्यामुळे घटनेतील तरतुदीनुसार ती सम्राटपदी विराजमान होऊ शकणार नव्हती. आयकोचा जन्म झाल्यावर घटनेत बदल करून आयकोला - एका स्त्रीला - राजसिंहासनावर बसवण्याची तरतूद करण्याचा विचार पुढे आला. यासाठी २००५ मध्ये शासनाने तज्ञांची एक समिती नेमून तिला शिफारस करण्यास सांगितले. तिने अनुकूल मतही दिले. पण दरम्यानच्या काळात आयकोला भाऊ मिळाला म्हणजे हिसाहिटोचा - सम्राटाच्या नातवाचा - जन्म झाला. आणि घटना दुरुस्तीचा विचार मागे पडला तो पडलाच. पण आता पदत्यागासाठी अनुमती देणारी घटना दुरुस्ती तर करावी लागेलच. ओघाओघाने सम्राटपदी स्त्री असावी की नसावी हा मुद्दाही चर्चेला येईल (आज पुरुष वारस असल्यामुळे हा प्रश्न तातडीचा राहिलेला नाही हा भाग अलाहिदा)
सम्राटांची राजकीय चाल आहे काय ? - तिसरे असे की, सम्राटाने राजकीय निर्णय घेण्यावर प्रतिबंध आहेत. हे बंधन आजवर कसोशीने पाळले गेले होते. पण जपानचे राजकारण आज एका वेगळ्याच वळणावर आले असतांना सम्राटांनी हा मनोदय व्यक्त केला आहे. दुसऱ्याच एका कारणास्तव जपानच्या राज्यघटनेत बदल करण्याचा विचार पंतप्रधान शिंझो अबे यांच्या मनात घोळतो आहे. ते कारण असे की, ‘हिंसाचाराचा व युद्धाचा विरोध’ (पेसिफिझम) या दुसऱ्या महायुद्धानंतर स्वीकारलेल्या भूमिकेला सोडचिठ्टी देण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान शिंझो अबे त्यांना वाटते आहे. त्या दृष्टीने घटनेत बदल करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांचा घटनेत बदल करण्याचा हा मूलगामी विचार आणि सम्राटांनी राजसन्यास घेण्याची व्यक्त केलेली इच्छा यात काही परस्परसंबंध आहे का, याचा शोध राजकीय निरीक्षक घेत आहेत.
न धरी शस्त्र करी - दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने जणू शस्त्रसन्यासच घेतला आहे. त्या मोबदल्यात सम्राटपद कायम ठेवण्यास अमेरिका राजी झाली, तसेच तिने जपानच्या संरक्षणाची हमीही घेतली आहे. या व्यवस्थेत बदल करण्याचा विचार हा साधासुधा विचार म्हणता यायचा नाही. सम्राटपद टिकवण्यासाठी दिलेले शस्त्रसन्यासाचे अभिवचन १९४५ पासून आतापर्यंत जपानने प्रामाणिकपणे पाळले आहे. आता जपान नव्याने सैन्य उभारणार असेल व शस्त्रास्त्र निर्मितीला प्रारंभ करणार असेल तर जागतिक सत्तासमतोलावर त्याचे फार मोठे परिणाम होतील. अमेरिका, चीन व रशिया या महाशक्तींची याबाबत भूमिका काय असेल, या विचाराने राजकीय निरीक्षकांची मती गुंग झाली आहे. सम्राटांचा राजीनामा देण्याचा मनोदय ही पंतप्रधान शिंझो अबे यांच्या शस्त्रसज्ज व्हायच्या भूमिकेच्या विरोधातील राजकीय चाल की खऱ्याखुऱ्या आजारपणामुळे ढासळलेल्या प्रकृतीमुळे उचलेले पाऊल हे लवकरच स्पष्ट होईल.
जपानच्या राजसिंहासनाचे वैशिष्ट्य- जपानच्या राजसिंहासनाला क्रायसॅनथेमम सिंहासन असे नाव आहे. राजप्रासादातील हे खास सिंहासन आहे. जपानचे सम्राट निरनिराळ्या वेळी निरनिराळी सिंहासने वापरतात. नॅशनल डाएट(जपानची संसद) ला उद्देशून भाषण करतांना सम्राट वेगळ्याच सिंहासनावर स्थानापन्न झालेले असतात. जपानचे हे राजसिंहासन खूपच जुन्याकाळपासून अस्तित्त्वात आहे. ख्रिस्तपूर्व ६६० ला निर्माण झालेल्या या ‘गादीवर’ सध्याचे सम्राट अकिहिटो हे १२५ वे सम्राट आहेत.
१९२० साली हिरोहिटो हे राजपुत्र कार्यवाहक शासक (रिजंट) म्हणून काम पाहू लागले कारण खुद्द सम्राट योशिहिटो (तायशो हे मरणोत्तर नाव) यांचे प्रकृतीस्वास्थ्य इतके वाईट होते की, प्रत्यक्षात ते काहीही काम करू शकत नव्हते. जपानी सम्राटांची त्यांच्या हयातीतील नावे व मरणोत्तर नावे वेगवेगळी असतात. योशिहिटो यांच्या मृत्यूनंतर १९२६ ते १९८९ पर्यंत हिरोहिटो हे सम्राट होते त्यांचे मरणोत्तर नाव शोवा असे आहे. १९८९ पासून सध्याचे सम्राट अकिहिटो असून त्यांचे मरणोत्तर नाव किंजो असेल. हे सिंहासन टिकावे व सम्राटपद कायम रहावे हे जपानच्या आस्थेचे व निष्ठेचे विषय आहेत. त्यासाठी जपानने शस्त्रसन्यास पत्करला आज राजसन्यासाच्या शक्यतेमुळे शतकानुशतके सुरू असलेली परंपरा काय नवीन रूप घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:
Post a Comment