निवडणुकीचा काळ एक सर्कस
वसंत गणेश काणे
एका अमेरिकन नागरिकांने वाचकांच्या पत्रव्यवहार या सदरात लिहितांना मजकुरासाठी हे शीर्षक वापरले आहे.
या काळात भल्याभल्यांचे वस्तुस्थितीबाबतचे भान हरपते. याच काळात शासन शस्त्रास्त्रे, गर्भपात, समलिंगी, स्थलांतरित या सारख्या प्रश्नांबाबत कोणती भूमिका स्वीकारणार ते नागरिकांना कळते. मात्र सभागृहात भरपूर मताधिक्य असतांना त्या त्या पक्षांनी या प्रश्नांबद्दल तेव्हा प्रत्यक्ष असे काहीही का केले नाही, ते आपल्याला जाणून घ्यायची आवश्कता वाटत नाही. निवडणूक आली की या विषयांना घुमारे फुटू लागतात. स्वतंत्र व बलिष्ठ अमेरिका उभारण्याचा विषय याचवेळी ऐरणीवर येतो. एखादी गोष्ट टी व्हीवर पाहिली म्हणजे ती खरीच असली पाहिजे, हे मानण्याचा हाच काळ असतो. बेकारीबद्दल ऊर बडविण्याचा हाच काळ असतो. पण या अगोदर एखाद्या उद्योगपतीने (ट्रंप?) देशाबाहेरचे आपले उद्योग देशात आणून बेकारी दूर करण्याचा प्रयत्न का केला नाही, हे विचारण्याची आवश्यकता कुणालाही वाटत नाही. मेलानिया ट्रंपने मिशेल ओबामा यांच्या भाषणाची सहीसही नक्कल केली हे प्रकरण याचवेळी गाजते. पण हा प्रकार आजच घडला असे नाही, यापूर्वीही घडला आहे व उभयपक्षी (तेव्हा रोनाल्ड रीगन यांनी अशीत नक्कल केली होती) घडला आहे, याची नोंद घ्यावीशी वाटत नाही. हिलरी क्लिंटन यांनी शासकीय कामांसाठी खाजगी ईमेल वापरल्यामुळे त्यांची नाचक्की होणार असेल तर रशियाने केलेले ‘हॅकिंग’ आपल्याला सोयीचे वाटते. अध्यक्ष ओबामा यांनी केलेल्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्त्यांची समीक्षा करण्याची ज्यांची जबाबदारी होती, त्यांनी आपली नोकरी कायम रहावी म्हणून ब्रही काढला नव्हता व आपली जबाबदारी पार पाडली नव्हती आणि या नियुक्त्यांच्या योग्यायोग्यतेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली नव्हती, याचा आपल्याला विसर पडतो. अहो, बरोबरच आहे ना. आजकाल नोकऱ्या मिळताहेत कुठे? मग हातची घालवून बसण्यात काय अर्थ? या सर्व प्रकाराला ‘निवडणुकीचा काळ म्हणजे एक सर्कस’ असे विधान करून मी सर्कशीचा अपमान तर करत नाही ना?
लोकनेते व प्रशासन यांच्यावरील विश्वास सर्व जगभरच उडत चाललेला दिसतो. लोकशाहीबाबच आस्था बाळगणाऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे. हा प्रकार फक्त अमेरिकेतच घडतो आहे, असे नाही. यावर काय उपाय करता आहे का? काही उपाय करता येईल का?

No comments:
Post a Comment