सिरियाला इसीसमुक्त करण्याच्या मोहिमेचा आरंभ
वसंत गणेश काणे
इराकमधून इसीसला माघार घ्यायला भाग पाडल्यानंतर आता सिरियामधून इसीस आणि साथीदारांविरुद्ध मोहीम सुरू झाली असून रशियाची बाॅम्बफेकी विमाने इराणमधील विमानतळांवरून मध्य सिरियाच्या दिशेने झेप घेत आहेत.
परस्परपूरक कारवाई - या निमित्ताने इराक, इराण व रशिया यात निर्माण झालेला सहयोग जसा महत्त्वाचा आहे, तसाच एकमेकावर सतत गुरगुरत असलेल्या अमेरिका व मित्र राष्ट्रे आणि रशिया यांनी वेगवेगळे राहून पण इसीसला मात द्यायचीच या उद्देशाने केलेली पृथक पण परस्परपूरक कारवाई वेग घेईल अशी चिन्हे दिसत आहेत. चीन तटस्थ आहे किंवा नुसती तोंडपाटिलकी करतो आहे. कारण इसीस आज ना उद्या आपल्यालाही जड जाणार आहे, हे चीनलाही कळून चुकले आहे. थोडक्यात असे की, जगातील सर्व महाशक्ती आपापसातले मतभेद विसरून किंवा निदान या विषयापुरतेतरी तात्पुरते बाजूला सारून एकाच उद्देशाने सरसावलेले दिसत आहेत. असे दृश्य जगाच्या इतिहासात फार कमी वेळा पहावयास मिळाले असेल.
वर्षभर चाललेल्या चर्चेच्या गुऱ्हाळाल यश - या कारवाईबाबत रशिया व अमेरिका यात जवळजवळ एक वर्ष चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. रशियाची अचानक समजूत पटली आणि रशियाची बाॅम्बफेकी विमाने सिरियातील अलेपो या शहरातील अतिरेक्यांच्या तळावर आग ओकीत आहेत. भौगोलिक दृष्ट्या सिरिया व रशिया यातील अंतर अमेरिका व सिरिया यातील अंतराच्या मानाने खूपच कमी आहे. त्यामुळे रशियाचा सहभाग या मोहिमेत महत्त्वाचा आहे. सोबतीला सिरिया शासनाची विमानेही आहेत त्यामुळे दोघेही हे यश आपलेच असल्याचा दावा करीत आहेत.
इराणने आजवर आपले तळ वापरण्याची अनुमती अन्य राष्ट्रांना दिल्याची नोंद आढळत नाही. मध्यपूर्वेतील देशांमधले इतर देशांचे तळ वापरून रशियानेही आजवर सिरियावर बाॅम्बहल्ला केल्याची नोंद नाही. सिरियाचे अध्यक्ष बसर असाद यांच्या समर्थनार्थ ही मोहीम सुरू आहे.
शीर्षस्थस्तरावरील एकोप्याचा परिणाम - अतिरेकी हल्यामुळे जायबंदी झालेल्या सिरियाला मदत करण्याचा निर्णय मास्को व तेहेरान (इराणची राजधानी) येथील शीर्षस्थ नेत्यांनी घेतल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सोबतीला आता वाॅशिंगटनही आहे. या तिघांपैकी कुणाकुणांमधून एकेकाळी विस्तव जात नसे, हे पाहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये कसे व कोणते बदल केव्हा होतील, याचे अनुमान करणे किती कठीण आहे, ते जाणवेल. बगदाद (इराकची राजधानी), तेहेरान ( इराणची राजधानी) मास्को व वाॅशिंगटन या ठिकाणच्या शीर्षस्थ नेत्यांचे एकमत होताच तृणमूल पातळीवरही (ग्रासरूट लेव्हल) संक्रांत साजरी होत आहे. आपापली विमाने केव्हा, कुठे व किती उंचीवरून उड्डाण करीत आहेत, हे परस्परांना पुरेसे अगोदर अगोदर कळवून आपापसातल्या टक्करी टाळण्याची खबरदारी मनापासून घेतली जात आहे. इसीस व समविचारी गट यांच्याविरुद्ध कारवाई करणे कसे आवश्यक आहे व त्याशिवाय कसे गत्यंतर नाही, हे या चौघांना मनापासून पटल्याची ही चिन्हे आहेत. इराण, सिरिया व रशिया आणि इसीस विरोधी गट हेही एकत्र आले आहेत. अमेरिकेने इराणवरील बंधने उठवल्यानंतर इराणवरचा गुपचूप अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न सुरू असल्याचा आळ दूर झाल्यामुळेच हे शक्य झाले आहे. इराणचे तळ वापरता येत असल्यामुळे रशियाचा युद्धखर्चही कमी झाला आहे.
पायदळाला कूच करता यावे म्हणून - इसीस आणि मित्रगटांच्या ताब्यात असलेला प्रदेश अजून ताब्यात आलेला नाही. पण त्यांचे शस्त्रास्त्रांचे साठे उध्वस्त झाले आहेत, प्रशिक्षण केंद्रे समूळ नष्ट झाली आहेत, मोहिमेवर नियंत्रण ठेवणारी मुख्यालये बेचिराख झाली आहेत. आता रणगाडे व तोफखाने यांच्या छत्राखाली पायदळाला आगेकूच करतांना फारशी मनुष्यहानी सहन करावी लागणार नाही.
संक्रांतीचे वातावरण कायम राहो - या सर्वाचा परिणाम म्हणून इसीसमध्ये फूट पडली असून त्यातील एक गट एकीकडे रशियाशी तर दुसरीकडे अमेरिकेशी संधान बांधण्याच्या प्रयत्नात आहे. पण या दोघांनीही त्यांना अंगावरील झुरळ झटकून टाकावे तसे झिडकारले आहे. इसीसच्या समान संकटाचा धोका ओळखून छोटीबडी राष्ट्रे आपापसातले वैर विसरून निदान आजतरी एकत्र आली असून संक्रांतीचे वातावरण दिसते आहे. पण संक्रांतीनंतर शिमगा येतो, तसे होऊ नये, अशी शांतताप्रेमी जनतेची ईश्वरचरणी प्रार्थना असणार. त्यांच्या हाती अशी प्रार्थना करण्या शिवाय दुसरे असणार तरी काय?

No comments:
Post a Comment