एक बहुगुणखणी व्यक्तिमत्त्व
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
आजच्या टेलिव्हिजनच्या जमान्यात ॲंकर हे नाव बहुतेकांच्या परिचयाचे झाले आहे. टीव्ही वर वार्ता सांगणाऱ्या कार्यक्रमांचे सूत्र संचालन करणाऱ्या व्यक्तींची माहितीही अनेकांना नावानिशी माहीत असेल. अशीच एक महिला वृतनिवेदिका आहे. खरे तर ती तशी केव्हाच म्हणजे 2012 मध्येच सेवानिवृत्त झालेली आहे. आपण सेवानिवृत्त होत आहोत, अशी घोषणा तिने केल्यानंतरही तिला काही विशेष निमित्ताने आग्रहाने व अगत्याने पाचारण केले जाते. ज्या व्यक्तींचा ती परिचय करून देते, त्यांनाच या बाबत धन्यता वाटते, असे म्हणतात. अनेकदा असे आढळते की, एखादा सुमार कार्यक्रम ही ॲंकर आपल्या कौशल्याच्या भरवशावर लोकप्रिय करते.
आवाजाच्या बाबतीत तर नियंत्याची तिच्यावर विशेष मेहेरनजर आहे. भावनिक प्रकटन असो वा झोंबणारे शाब्दिक बोचकारे असोत, तिची बरोबरी क्वचितच कुणी करू शकेल. विकारवशता असो, धडकी भरेल अशी धमकी असो, आक्रमक शाब्दिक हल्ले असोत, ॲंकर म्हणून म्हणा, वार्ता देण्यासाठी म्हणा, मुलाखत घेण्यासाठी म्हणा, देशातील टी व्ही वाहिनी या महिलेचीच निवड करणार, हे ठरलेलेच असते. आपल्या देशाच्या सैनिकी महत्त्वाच्या विकास व घडामोडीबाबतच्या वार्ता देण्यासाठी तिला पुन्हा पुन्हा पाचारण करण्यात आले असलेल्याचे आढळते.
1943 मध्ये ज्या कुटुंबात या महिलेचा जन्म झाला ते अठरा विश्वे दारिद्र्यात पिचत होते. तिच्या शिक्षणाची व पालन पोषणाची जबाबदारी शासनाने उचलली कारण गरिबांबाबतची कणव हे नव्हते, तर अशा व्यक्ती आपल्या उपकारकर्त्याशी जन्मभर एकनिष्ठ राहतात/असतात, हे होते. तिने परफाॅर्मिंग आर्टचा झटून अभ्यास केला आणि स्वराभिनय व नाट्याभिनयाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली.
कोण आहे ही स्वराभिनय व नाट्याभिनयात सारखेच नैपुण्य असलेली सव्यसाची अभिनेत्री? तिचे नाव आहे, ली चुन ही. तिचा जन्म आहे जपानी कोरियामधला. 1943 सालचा. जपानी कोरिया हा काय प्रकार आहे? 1910 ते 1945 या काळात कोरिया हा देश जपानी साम्राज्याचा भाग होता. 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपले व कोरिया स्वतंत्र झाला. पुढे कोरियाचे दोन तुकडे झाले. अमेरिकेच्या प्रभावाखालचा दक्षिण कोरिया व साम्यवाद्यांच्या कब्जातला उत्तर कोरिया. उत्तर कोरियातील संगीत, नाट्य व परफाॅर्मन्स आर्ट शिकवणाऱ्या विद्यापीठात तिचे शिक्षण झाले आहे.
1971 सालीच लीने पडद्यावर काम करायला सुरवात केली होती. कम्युनिस्ट शासित उत्तर कोरियातील कोरियन सेंट्रल टेलिव्हिजनमध्ये वार्ता विभागात तिची नियुक्ती झाल्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. उत्तर कोरियातील साम्यवादी राजवटीतील हा एक विक्रमच म्हटला पाहिजे. तिचे अनेक सहकारी पदावनत झाले, काही पदच्युतही झाले पण तिच्या यशाची कमान मात्र सतत निर्वेध राहिली. ती 2012 मध्ये सेवानिवृत्त झाली पण तरीही विशेष प्रसंगी घोषणा करण्याकरिता तिला आग्रहाने व नेमाने पचारण करण्यात आले आहे. कोणते आहेत हे विशेष प्रसंग व कोणता होता घोषणांचा विषय? जानेवारी 2016 - उत्तर कोरियाची हैड्रोजन बाॅम्ब बाबतची यशस्वी चाचणी. फेब्रुवारी 2016 क्षेपणास्राची यशस्वी चाचणी. सप्टेंबर 2016 व सप्टेंबर 2017 ची यशस्वी अण्वस्त्र चाचणी.
उत्तर कोरियातील शासकीय अधिकारी ली वर जाम खूष आहेत.तिचा आवाज घुमणारा (रेसोनंट) आहे. विषयानुरूप तिच्या आवाजची जात व गती बदलते. योग्य तो भाव आवाजातून निर्माण करण्यात तिचा हातखंडा आहे. तिचे वक्तृत्त्व अमोघ आहे. निवेदनात भावनांचा क्षोभ व्यक्त करणे तिला चांगलेच अवगत आहे. ती जेव्हा एखाद्या नेत्याचे गुणवर्णन करीत असते, तेव्हा स्वरातील चढउतार शब्दागणिक बदलत असतात. तेच ती एखाद्याचा धिक्कार करीत असते, तेव्हा जणू तिच्या मुखातून शापवाणीच बाहेर पडत असते. उत्तर कोरियातील प्रचार तंत्राच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे व नाट्यतंत्राच्या तालीम मास्तरांनी दिलेल्या तालमींचे तिने पुरेपूर चीज केले आहे.
1994 सालची गोष्ट. उत्तर कोरियाचा क्रूर हुकुमशहा किम सुंग (दुसरा) निजधामाला गेला. लीने त्याच्या निधनाची बातमी दिली तेव्हा तिला स्वत:ला तर अश्रू आवरत नव्हतेच, पण तिच्या सोबत अख्खा उत्तर कोरियाही रडत होता. तसेच घडले 2012 मध्ये. तेव्हा ती वार्ता देत होती किम जाॅंगच्या निधनाची. यावेळी मात्र ती मोठ्या कष्टाने अश्रू आवरतांना दिसली. दोन निधन वार्ता दोन वेगळ्या पद्धतीने पण सारख्याच परिणामकारक रीतीने ती देत होती.
आपल्या वस्त्रप्रावरणाबाबतही ती विशेष चोखंदळ आहे. कधी गुलाबी, कधी पाश्चात्य पद्धतीची तर कधी परंपरागत कोरियन पद्धतीची तिची वेषभूषा दरवेळी प्रसंगोचितच असते.
उत्तर कोरियाच्या आजवरच्या साम्यवादी हुकुमशहांचे गुणगान अख्खा देश आंधळ्या भक्तिभावाने करीत असतो. याला कारण साम्यवादी शिकवण तंत्राइतकेच किंवा त्यापेक्षाही काकणभर अधिकच ली चे बहुगुणखणी व्यक्तिमत्त्व कारणीभूत असलेले आढळते

No comments:
Post a Comment