Tuesday, June 11, 2019

पश्चिम बंगाल, नव्हे, अपूर्व बंगाल !

पश्चिम बंगाल, नव्हे,  हा तर अपूर्व बंगाल!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  2019 मध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्व सातही फेऱ्यांमध्ये निवडणूक पार पडली आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यात सर्व सातही फेऱ्या आयोजित करण्यामागचे कारण सांगायला हवे का? निवडणुकी दरम्यान खून, मारामाऱ्या, मतदारांना धमक्या यासाठी ही तीन राज्ये विशेष कुप्रसिद्ध आहेत. त्यातही अग्रक्रम पश्चिम बंगालचा लागतो.
 या निवडणुकीत सर्वात कमी मतदान 69.65 % दक्षिण कोलकत्यात झाले. सर्वात जास्त मतदान 87.36 % बिष्नुपूर मतदार संघात झाले यात अनुक्रमे तृणमूल व भाजप विजयी झाले आहेत. इतर 40 मतदार संघ या दोन टक्केवाऱ्यांच्या दरम्यानचे आहेत.
मतदानाची पक्षनिहाय टक्केवारी, मतदानाच्या टक्केवारीत  वाढ किंवा कमतरता तसेच जिंकलेल्या जागांच्या संख्येत वाढ वा किंवा कमतरता अशी आहे.
1. तृणमूलला 43.28 % मते मिळाली आहेत. यात पूर्वीच्या तुलनेत 3.48 % ची वाढ झाली आहे, पण जागा 22,  म्हणजे पूर्वीच्या तुलनेत 12 ने कमी झाल्या आहेत.
2. भाजपला 40.25 % मते मिळाली आहेत. यात पूर्वीच्या तुलनेत 22.25 % ची वाढ झाली आहे,  तर जागा 18,  म्हणजे पूर्वीच्या तुलनेत 16 ने वाढल्या आहेत.
3. काॅंग्रेसला फक्त 5.61 % मते मिळाली आहेत. यात पूर्वीच्या तुलनेत 4.09 % ची कमतरता आली आहे, तर जागा पूर्वीच्या तुलनेत  2 ने कमी होऊन 2 राहिल्या आहेत.
4. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला काॅंग्रेसला फक्त 6.28 % मते मिळाली आहेत. यात पूर्वीच्या तुलनेत 16.72 % ची जबरदस्त कमतरता आली आहे आणि जागा पूर्वीच्या तुलनेत  2 ने कमी होऊन 0 झाल्या आहेत.
 यावरून ठोकळमानाने पुढीलप्रमाणे निष्कर्ष काढता येतात.
मार्क्सवाद्यांची मते फार मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळली आहेत.
काॅंग्रेसची मतेही काही प्रमाणात भाजपकडे वळली असावीत.
काॅंग्रेसची व मार्क्सवाद्यांची मिळून फारच कमी मते (3.48 %) तृणमूलकडे वळली आहेत.
जिंकलेल्या जागा विचारात घेतल्या मार्क्सवादी पक्षाचा या निवडणुकीत सफाया झाला असून काॅंग्रेसच्या जागा निम्या म्हणजे फक्त 2 राहिल्या आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल व भाजपमध्ये जनमत जवळजवळ समसमान द्विभाजित झाले आहे. (तृणमूल 43.28 - भाजप 40.25 = 3.03 % मते व 22-18 = 4 जागा तृणमूलला जास्त)
      पश्चिम बंगाल वाममार्ग सोडून उजवीकडे वळलेला दिसतो. 1980 मध्ये स्थापन झालेल्या भाजपने 2019 मध्ये जबरदस्त मुसंडी मारून 40 % पेक्षा जास्त मते मिळविण्यात यश संपादन केले आहे. पण या काळात भाजपला आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना मुकावे लागले आहे. या निवडणुकीत केवळ साम्यवादीनाच नाही तर बऱ्याच प्रमाणात काॅंग्रेसलाही भाजपने मागे टाकले आहे. 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. घोडा मैदान जवळच आहे. बघूया पुढे काय आणि काय काय होते ते.


No comments:

Post a Comment