Showing posts with label USA Trip. Show all posts
Showing posts with label USA Trip. Show all posts

Thursday, February 4, 2016


 ‘वॉलस्ट्रीट जर्नल’च्या नजरेतून भारतातील निवडणुका
वसंत गणेश काणे
(एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ नागपूर -४४० ०२२)
ह्ल्ली  मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया,अमेरिका      
Email – kanewasant@gmail.com
Blog – kasa mee? (07122221689) 9422804430
वॉलस्ट्रीट जर्नल’ हे अमेरिकेतील एक अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त दैनिक आहे. भारतातील निवडणुकीबाबत लिहितांना हे वृत्तपत्र काय लिहिते, हा अर्थातच एक कुतुहलाचा विषय असणार, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. या दैनिकात ‘हिंदू-राष्ट्रवादी (हिंदू–नॅशनॅलिस्ट) आणि उद्योजकांशी अनुकूल भूमिका बाळगून असलेले नरेंद्र मोदी हे आता भारताचे पंतप्रधान होणार आहेत’, अशी एका लेखाची सुरवात आहे. लेखात हिंदू आणि राष्ट्रवादी या दोन शब्दात आडवी रेष टाकून हा जोडशब्द तयार केलेला आहे, याची नोंद घ्यावयास हवी. ‘मी हिंदू आहे’ आणि ‘राष्ट्रवादीही आहे’, म्हणून मी हिंदू राष्ट्रवादी आहे, असे नरेंद्र मोदीही मागे एकदा म्हणाले होते, याची या निमित्ताने आठवण होते.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात कांग्रेसच बहुतेक काळ सत्तेवर होती. काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि निवडणूक प्रचार प्रमुख श्री राहुल गांधी यांनी पराभव मान्य केला असून, ‘आम्हाला बऱ्याच गोष्टी विचारात घेण्याची आवश्यकता आहे’, असे म्हटले आहे.
    या निवडणुकीचे वैशिष्ट्य अधोरेखित करतांना या लेखात अशी नोंद घेण्यात आली आहे की, कोणत्याही एका पक्षाने स्वबळावर पूर्ण बहुमत प्राप्त केल्याची घटना जवळ जवळ गेल्या तीस वर्षानंतर प्रथमच घडली आहे.तर काँग्रेसच्या इतिहासात जेमतेम ४६ जागी आघाडी / विजय  मिळवल्याची घटनाही प्रथमच घडत आहे.
‘भारत विजयी झाला आहे आणि आता चांगले दिवस येणार आहेत’ असा संदेश श्री मोदी यांनी ट्वीटरवर देशवासियांना उद्देशून टाकला आहे, याची नोंद लेखात घेण्यात आली आहे.
मतदारांनी प्राधान्य कशाला दिले
भारतात मतदारांमध्ये काँग्रेस विषयी असंतोषाची लाट होती, अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीमुळे सुद्धा नाराजी होती. प्रगतीची धीमी गती आणि कुप्रशासन यामुळेही लोक त्रासले होते. रोजगाराच्या वाढत्या संधी, उच्च प्रतीचे जीवनमान आणि जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर याबद्दल लोक आता अपेक्षा बाळगून आहेत. काँग्रेसची ‘लोक कल्याणकारी धोरणे’ जनतेने अव्हेरली असून सुप्रशासन आणि उद्योगांना चालना देऊन रोजगाराच्या संधी आणि विकास साधण्याच्या धोरणावर जनतेने पसंतीची मोहर उमटवली आहे.
मोदींना क्लीन चीट
एका चहाविक्याचा मुलगा असलेला नरेंद्र मोदी, गुजराथ राज्याचा मुख्यमंत्री होण्या अगोदर हिंदू राष्ट्रवादी (लेखातील हिंदूराष्ट्रवादी  ऐवजी  हिंदू राष्ट्रवादी  ह्या पाठ्भेदाची  नोंद घेण्याची आवश्यकता आहे) संघटनेचा एक कार्यकर्ता होता. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर २००२ साली झालेल्या दंगलीत हजारावर लोक मारले गेले. यापैकी बहुसंख्य मुस्लिम होते. यासाठी टीकाकार मोदींना जबाबदार मानत असले तरी न्यायालयाने यासाठी अभियोग चालविण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे मत नोंदवले आहे.
निवडणुकीत उपस्थित केलेले मुद्दे
प्रचारादरम्यान मोदींनी धार्मिक राजकारण केले नाही. विकासावरच भर दिला. आर्थिक अधोगतीच्या गर्तेतून देशाला बाहेर काढू शकेल अशी क्षमता  असलेला एकमेव नेता असे मानणारे लक्षावधी समर्थक मोदींकडे आकृष्ठ  झाले असून जातीयवादी राजकारण करणारा नेता अशी मोदींची पूर्वीची प्रतिमा आता जवळजवळ लोप पावली आहे.
भारतातला शेअर बाजार अगोदर पासूनच उसळी मारत होताच पण निकालाच्या दिवशी त्याने उच्चांक गाठला. मोदींनी आपल्या आर्थिक धोरणाचे सगळे तपशील मांडलेले नसले तरी शासनाची कमीतकमी दखल, खाजगी उद्योगांना प्रोत्साहन, नोकरशाहीचा प्रभाव कमी करण्याचे धोरण या गोष्टींचा शेअर बाजारावर अनुकूल परिणाम झालेला दिसतो. मोदींचे धोरण उजवीकडे झुकलेले राहणार हे या धोरणविषयक बाबींवरून स्पष्ट होताना दिसते आहे,असे लेखात म्हटले आहे.
असे असले तरी भाजपचा चिल्लर उद्योगात परदेशी गुंतवणुकीला विरोध असेल. तसेच अन्नपदार्थांच्या बाबतीतल्या सवलती (सबसिडीज) परत घेतल्या जातील, असे वाटत नाही.

नवीन धोरण कसे असेल?
हे असे काहीही असले तरी उद्योगांना चालना, आंतरराष्ट्रीय व्यापाराला उत्तेजन, परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन यांच्या साह्याने भारताचे आर्थिक प्रश्न हाताळण्याचा मोदी प्रयत्न करतील, असे संकेत आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्योजकांना ‘रेड टेपचा’ उपद्रव होणार नाही, त्यांच्यासाठी  ‘रेड कार्पेट’ अंथरलेली असेल, असे मोदी म्हणत असत.
आतापर्यंत सर्वच क्षेत्रात धोरणविषयक लकवा अनुभवाला येत होता. तो आता दूर होईल, असे अर्थविषयक तज्ज्ञांना वाटते आहे.
मोदी केवळ विकासाला चालना देऊनच थांबणार नाहीत, तर ते बेकारी कमी करण्यावर भर देतील, भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढतील, एक प्रभावशाली परराष्ट्रीय धोरणाचा अंगीकार करतील आणि भारताला सुवर्णयुगाच्या दिशेने घेऊन जातील, असा लोकांना विश्वास वाटतो आहे.
पण अनेक अर्थतज्ज्ञ सबुरीचा सल्ला देत आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, भारत देश एका महाकाय जहाजासारखा आहे. त्याला एकदम दिशा बदलता येणार नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागेल.
उदाहरण द्यायचे झाले तर, कारखानदारी बद्दल सांगता येईल. यासाठी कामगारविषयक कायदे बदलावे लागतील, भूसंपादनविषयक कायद्यातही बदल करावा लागेल, करप्रणालीही बदलावी लागेल. संसदेत हे कायदे पारित करून घेणे ही सोपी गोष्ट नाही.
हे सर्व निर्णय कठोर राजकीय निर्णय असतील. यासाठी संसदेत सहमती मिळवावी लागेल. सहमतीचे राजकारण हा मोदी यांचा  गुणविशेष नाही. म्हणून  अशा सहाय्यकाची मोदींना आवश्यकता भासेल
मोदींचे प्रतिपक्षी श्री राहुल गांधी आपल्या भाषणांमधून गरिबांना शासकीय सवलतींचे मोहजाल लोकांसमोर ठेवत होते, पण या आश्वासनांवर लोक भाळले नाहीत.
मोदी कसे?, उदारमतवादी की आग्रही?
मोदींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अंकुश असेल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. राम मंदीर बांधण्याबाबत संघ आग्रही असेल, असा काहींचा अंदाज आहे. यामुळे राजकीय अस्वास्थ्य निर्माण होईल. (हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडविला जाईल, असे भाजप च्या जाहीरनाम्यात म्हटले आहे याकडे लेखात दुर्लक्ष करण्यात आले आहे.)
मोदी हे एक उदारमतवादी नेते सिद्ध होतील. देशातल्या अनेक मतदार संघात मुसलमानांनी टॅक्टीकल व्होटिंग केले. जो उमेदवार भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकेल त्या उमेदवाराला मते दिली, असे प्रतिपादन लेखात करण्यात आले आहे.
या निवडणुकीत ‘जात’ पाहून मतदान करण्याचा प्रकार मोडीत निघाला. मध्यमवर्गच नव्हे तर ग्रामीण गरीब या सर्वांशी टीव्ही स्मार्टफोन यांच्या साह्याने संपर्क साधला.
या निवडणुकीत भाजपने स्वबळावर पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. काँग्रेस आता पुन्हा उभी राहू शकेल किंवा नाही याबद्दल लेखात शंका व्यक्त करण्यात आली आहे. श्री राहुल गांधी नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा वीस वर्षांनी लहान आहेत. पण ते भारताच्या तरूण मतदारांवर प्रभाव टाकू शकले नाहीत, या वास्तवाची लेखात नोंद घेण्यात आली आहे.
काँग्रेसचे निवडणूक प्रचार
काँग्रेसने आपल्या दहा वर्षाच्या सत्ताकाळात अनेक ‘लोककल्याणकारी कायदे’ केले. अननसुरक्षा कायद्यानुसार गरीब लोकांना सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्याची सोय होती. तसेच रोजगार हमी योजना होती. या योजनांचा फायदाही दिसत होता. पण आर्थिक बाबतीत घोटाळ्यावर घोटाळे, आर्थिक कुप्रशासन आणि धरसोडीचे धोरण यामुळे या योजनांचा म्हणावा तसा फायदा झाला नाही.
परराष्ट्रीय धोरण
चीन आणि पाकिस्थान यांच्या बाबतीत स्वीकारलेल्या बोटचेप्या धोरणामुळेही जनमत नाराज झाले होते. मोदी कणखर धोरण स्वीकारतील, असे लोकांना वाटते आहे. अनेक लोक मोदींना चढाईखोर मानतात. पण अनेकांना त्फ्यांचा हा स्वभावच सीमा सुरक्षा आणि दहशतवाद हे विषय हाताळण्यासाठी उपयोगाचे ठरतील, असे वाटते.पाकिस्थान्म्ध्ये काम केलेल्या माजी परराष्ट्र वकील श्री पार्थसारथी यांचेही असेच मत आहे. पाकिस्थानातील मूलतत्त्ववादी(धर्मवेडे) मोदींना उचकवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही देशात असलेले संशयाचे वातावरण आणि दोन्ही देशांजवळ अण्वस्त्रे असणे ह्यामुळे परीस्थीतीला अनिष्ट वळण लागण्याची भीती अनेकांना वाटते आहे. त्यातून आता अफगाणिस्थानातून अमेरिका आपल्या फौजा काढून घेणार आहे. त्यामुळे निर्माण होणारी स्फोटक परिस्थिती हाताळण्यासाठी मोदींना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे.
अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला होता. (पण आता विजयप्राप्तीनंतर ओबामा यांनी मोदींचे स्वागत केले आहे व्हिसाची अडचण आता आड येणार नाही, हेही त्यांनी आणि अमेरिकन प्राशासानाने स्पष्ट केले आहे.)माजी अमेरिकन परराष्ट्रीय वकील श्रीमती नॅन्सी पावेल यापूर्वीच मोदींची भेट घेऊन परस्पर संबंध सुधारण्याबाबतचे   संकेत दिले आहेत.
मोदींनी विकासाच्या मार्गाने आपली वाटचाल चालू  ठेवली तर भारत आणि अमेरिका यांच्यामधील संबंध वृद्धिंगत होतील, असा विश्वास व्यक्त करून हा लेख आटोपता घेण्यात आला आहे.

Wednesday, February 3, 2016

अमेरिकेतील ओसाडवाडी - सेंट्रालिया.

    अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील कोलंबिया काउंटी ( जिल्हा)मधले लोकसभेत प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार असलेले गाव(मतदार संघ) सिंट्रालिया. १९६२ पर्यंत या गावी जवळपास १ हजार १०० लोक रहात असत. २००९ साली या ठिकाणाला आम्ही भेट दिली तेव्हा जेमतेम ८/१० लोक येथे रहात होते. त्यांनी हे गाव सोडण्यास नकार देऊन इथेच ठिय्या मांडला होता.  आज या गावाची ओसाडवाडी झाली आहे. याला न आहे झिपकोड ( पिनकोड) क्रमांक न इथे आहे टपाल सेवा. घरे इमारती जमीनदोस्त करण्यात आली आहेत. रस्ते नावाला
 आहेत पण ते कुठेही 'जात' नाहीत. पूर्वी सारखी दुकाने नाहीत, शाळा नाहीत. भुतांशिवाय इथे आणखीही कुणी राहत तर नाहीना, हे जाणून घेण्याच्या इच्छेपोटी या गावाला आम्ही भेट देण्याचे ठरविले. २००९ साली वाट चुकलो होतो. थोडी वळणे व वळसे घ्यावी लागली होती. पण या वेळी तसे झाले नाही. आमची गाडी मुक्काम पोस्ट ( चुकलो ना मुक्काम ना पोस्ट असलेल्या) ओसाडवाडीच्या- सेंट्रालियाच्या - बाह्य परिधीवर येऊन थडकली.
 सेंट्रालिया हे एकेकाळी कोळशाची खाण असलेले गाव होते. हे गाव १९६२ साली खाणीत भडका उडून आगीच्या भक्षस्थानी पडले. गावाचा फार मोठा भाग जून बेचिराख झाला. बहुदा कचरा जाळण्यासाठी पेटवलेली आग तशीच धुमसत राहिली असावी. ती पुरतेपणी न बुजवलेल्या खाणीच्या मुखापर्यंत पोचली असावी आणि एकच भडका उडाला. आग विझवण्याचे अटोकाट प्रयत्न झाले पण व्यर्थ! अजूनही येथे धुराचे लोट जमिनीतून वर येतांना दिसतात. असा भूभाग चारशे एकर पसरला आहे आणि आजच्या अंदाजानुसार आणखी २५० वर्षेतरी असाच धुमसत राहणार आहे. या घटनेवर सायलेंट हिल या नावाची व्हिडिओ गेम मालिका आणि चित्रपट बेतलेले आहेत.
१९६२ साली या गावावर हे अरिष्ट ओढवले पण लोकांनी गाव सोडले नाही. ते चिवटपणे टिकून राहिले. पण १९७९ मध्ये धोक्याचा पहिला इशारा मिळाला .पेट्रोल साठवायच्या टाकीतील पेट्रोलचे उष्णतामान ५५ डिग्री फॅरेनहाईट असले पाहिजे ते १७२ अंशापर्यंत वर गेलेले दिसले. एक लहान मुलगा खेळत होता. त्याच्या पायाखालची जमीन खचली.किती म्हणून विचाराल तर १४७ फूट! हे पुरेसे नव्हते म्हणून की काय सेंट्रालिया गावातून जाणारा  हाय वे ६१ जागोजागी उखडू लागला, खचू लागला. दुरुस्त केला की लगेच खचायचा? आता भूपृष्ठाखालून कार्बन माॅनो ॲाक्साईड हा विषारी वायू बाहेर पडू लागला. लोकांचे घसे खवखवू लागले. लोकांनी शासकीय मदत स्वीकारून  गाव सोडण्याचा निर्णय घेतला. शेजारची गावे चांगली सुस्थितीत होती केवळ काही अंतरावर जे घडत होते, त्याचा मागमूसही जाणवत नव्हता. हळूहळू रस्ते सारखे सारखे उखडू लागले. दुरुस्तीचा खर्च परवडेना. पुन्हा धोका काही कमी होत नव्हता.शेवटी १९९४ मध्ये हाय वे चा तेवढा हिस्सा राडा रोडा टाकून कायमचा बंद करण्यात आला. आता हा रस्ता सेंट्रालियाला वगळून( बायपास करून) जातो.      
           अर्थात उखडलेल्या व उंच सखल खडबडीत रस्यावरून थोडे फार चालण्याचा तयारी असेल मूळ गावापर्यंत पोचता येते. या मार्गाला 'ग्रॅफिटी हाय वे' म्हणतात. कारण जागोजागी बालगोपालांनी केलेल्या रंगीत  चित्रकृतीच्या खुणा दिसत असतात. जागोजागी भेगा पडलेल्या आहेत. त्यातून सतत धूर येत असतो. वासाने मळमळायला होते. सर्वत्र पडझड दिसत होती पण दफनभूमी मात्र अगदी जशीच्या तशी आहे, असे ऐकले. निसर्गालाही तिची आवश्यकता जाणवली असावी, म्हणूनच बहुदा एवढा प्रकोप होऊनही तो तिच्या वाटेला गेला नसावा. एरवी कुठेही न जाणारे रस्ते आणि ओसाड माळरान याशिवाय फारसे काही दिसत नाही. २००८ मध्ये याच ठिकाणी वीज वाहून नेणारा खांब, रेल्वे यार्ड, रेल्वे वॅगन्स तशीच सोडून दिलेली घरे दिसत होत. यावेळी ती दिसली नाहीत. कदाचित यावेळी आम्ही त्या नेमक्या जागी आलो नसू. त्यावेळी काही लोक हट्टाने तिथेच रहात होते.यावेळी २०१५ मध्ये ते दिसले नाहीत. असे म्हणतात की एक महिला पोलीस आपल्या व्हॅन मधून अधूनमधून फेरफटका मारते आणि कुणी फोटो काढतांना दिसला तर त्यालाते फोटो डिलिट करायला लावते. आम्हाला अशी महिला दिसली नाही. त्यामुळे २००८ मध्ये काढलेले धुराचे फोटो आमच्याजवळ आहेत. यावेळी धूर निघतांना दिसत नव्हता. नुकताच पाऊस पडलेला असेल तर असा धूर येतो, असे म्हणतात. धुराचा फोटो घेता आला नाही म्हणून आम्ही खट्टू झालो. पण लगेच मनात विचार आला, की काय गंमत आहे पहा, इथे एक अख्खे गाव बेचिराख झाले होते, होत्याचे नव्हते झाले होते आणि आम्ही त्या अग्निकांडाच्या धुमसत्या खुणा नोंदवता आल्या नाहीत, म्हणून नाराज झालो होतो. यालाच का जीवन ऐसे नाव आहे?

देवमाशाच्या(व्हेल) नगरी जाऊन

     बोस्टन या गावी व्हेल (देवमासा) वॅाचिंगसाठी प्रत्येकी चाळीस डॅालर याप्रमाणे तिकिटे काढून आम्ही आलो तेव्हा 'बोस्टन टी पार्टी' साठी प्रसिद्ध असलेले हेच ते गाव हे गावीही नव्हते. याच ठिकाणी अमेरिकन लोकांनी इंग्लंडहून जहाजातून आलेली चहाची खोकी समुद्रात फेकून अवाजवी कराबद्दल वाटत असलेला संताप व्यक्त केला होता. १६ डिसेंबर १७७३ ची ही घटना आहे. पाण्याला अजूनही चहाचा रंग आहे का हे डोकावून पाहिले पण पाणी काळसर गढूळ दिसले आणि माझे मलाच हसू आले. मग लक्ष गेले बोटीकडे. कॅटॅमॅरन प्रकारची आमची बोट होती. इतर बोटींच्या आणि काही जहाजांपेक्षाही ही जास्त वेगाने पाणी कापते, असे ऐकले होते. बोस्टन बंदराजवळचे पाणी काळसर होते. पण तरीही घन आणि द्रव कचरा पाण्यात टाकण्यास सक्त मनाई असल्यामुळे पाणी बरेच स्वच्छ होते. अनेक जेली फिशेस तरंगतांना दिसत होते. यांच्या  शरीरातील द्रव  बय्राच प्रमाणात रंगहीन आणि जवळजवळ पाण्याइतकाच घनतेचा असल्यामुळे तसेच पाणी गढूळ असल्यामुळे हे प्राणी चटकन दिसत नाहीत. समोर पहावे तर विमाने हवेत भरारी घेतांना किंवा विमानतळावर उतरतांना दिसत होती. कारण पलीकडेच विमानतळ होता. बरोबर दहा वाजता बोटीचा परंपरागत भोंगा वाजला आणि आमचा जलप्रवास सुरू झाला. हवा गार होती, त्यामुळे वारा झोंबत होता. लाटा जसजशा मोठ्या होत गेल्या तशी बोट वरखाली होत गेली आणि डोलूही लागली. बोटीत चालणे कठीण होऊन बसले. एवढ्यात एका कर्मचार्याने लहानग्या अनुषासमोर एक प्लॅस्टिकचा डबा आणून ठेवला त्यात एक जाडजूड वही आणि व्हेलचे चित्र काढण्यासाठी रंगाच्या कांड्या होत्या. डब्यावर सूचना होती, 'प्रोटेक्ट दी सी'.
       व्हेल दिसणार की नाही?
        बोटीच्या कप्तानाने आमचे सगळ्यांचे स्वागत केल्यानंतर निवेदकाने माहिती दे ण्यास सुरवात केली. आज हवामान चांगले आहे. त्यामुळे आपल्याला व्हेलचे दर्शन घडेलच. पण दुर्दैवाने ते न धडल्यास आपण याच तिकिटावर उद्या, परवा, आठवड्याने एवढेच नव्हे तर येत्या दहा वर्षात केव्हाही व्हेल पाहण्यासाठी येऊ शकता! अशी हमी तो देत होता कारण व्हेल दिसणारच, अशी त्याला खात्री होती. पाण्यात राहणारा तो मासा असा आपला सर्वसाधारण समज असतो. म्हणून व्हेल या सस्तन प्राण्याला मासा समजणे समजू शकते पण देवमासा हे नाव का पडले असावे, हा विचार मनात येत होता. ब्ल्यू व्हेल हा आजवर होऊन गेलेल्या सर्वात मोठ्या डायनोसार  प्राण्यापेक्षाही मोठा असू शकतो. म्हणून कदाचित याला देवमासा असे नाव पडले असावे, असे वाटले.
व्हेल पहायचा कसा?
   'व्हेल दिसण्यापूर्वी तीन गोष्टी दिसतात', निवेदक सांगत होतात. 'श्वास  बाहेर टाकतांना हवेबरोबर व्हेल पाण्याचा फवारा उडवतो. तो पाच मैल दूर अंतरावरून दिसू शकतो. एकदा श्वास घेतल्यानंतर तो २० मिनीटे पाण्याखाली राहू शकतो. दम लागला की मात्र दर पाच मिनिटांनी त्याला श्वास घेण्यासाठी  पृष्ठभागावर यावे लागते. म्हणून शिकारी त्याला अगोदर थकवतात. त्यामुळे   शिकार करणे सोपे होते. दुसरे म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावरून पक्षी उडतांना दिसू लागतात. कारण व्हेल आणि हे पक्षी यांच्या भक्षाची जातकुळी सारखीच असते. तिसरे असे की, आपल्या बोटीसारख्या बोटी दिसायला लागतात. कारण त्या याच कामासाठी आपल्या थोड्या अगोदर आलेल्या असतात.
   व्हेल बोटीच्या जवळ येत नाहीत. पण आईसोबत येणारे बच्छडे कधीकधी कुतुहल म्हणून बोटीजवळ येऊ लागले तर त्याची आई बोट आणि बच्छडे यांच्यामध्ये येऊन पोहू लागते. पण कुणी एखादे अगाऊपणा करून बोटीकडे येऊ लागले तर अडवते तरीही हेका कायम ठेवल्यास फटका सुद्धा मारते. 'खुटी उपाडपणा करणारं कारटं' आणि वैतागलेली आई यांच्यात जसा संवाद घडतो तसेच काहीसे यावेळी घडत असावे.
प्रत्येक व्हेलचे वेगळेपण
  प्रत्येक व्हेल वेगळा असतो/दिसतो. हा वेगळेपणा लहानपणी शत्रूंनी तोडलेल्या लचक्यांमुळे, इतर जलचरांशी झालेल्या संघर्षात झालेल्या जखमांमुळे येत असतो तर काहींची जहाजांशी टक्कर होते आणि खरचटल्याच्या खुणा कायम असतात आणि ओढवलेल्या प्रसंगाची साक्ष पटवण्याबरोबरच ओळखही पटवतात. एकदा तर एका व्हेलच्या मागच्या शेपटाचा अर्धा भागच तुटला होता, अशी एका निरीक्षकांची नोंद आहे. म्हणजे  राणा संगाच्या शरीरावर लढाईत झालेल्या एेंशी जखमा होत्या, असे जसे म्हणतात, तसेच हे झाले. राणा संग काय फक्त माणसातच असावा? तो व्हेल मध्येही असणारच. तसे पाहिले तर 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग', ही काव्यपंक्ती सर्वच प्राणीमात्रांना लागू पडते. अर्थात संत तुकाराम महाराजांना जाणवणारे युद्ध वेगळे होते.
     हंप बॅक व्हेल
   व्हेलच्या अनेक जाती आहेत. ब्ल्यू व्हेल हा सर्वात मोठा तर आहेच पण  अगोदर म्हटल्याप्रमाणे तो एकेकाळच्या सर्वात मोठ्या डायनोसारपेक्षाही तो मोठा असू शकतो. आम्ही अटलांटिक महासागरातील 'हंप बॅक' व्हेलची भेट घेण्यासाठी निघालो होतो. याच्या पाठीवर कुबड असल्यासारखे दिसते. हे चरबीमुळे आलेले असते. बुडी मारताने जी कमान दिसते ती यामुळेच.  यांचे संपूर्ण जीवनचक्र पाण्यातच पूर्ण होत असते. सील हा प्राणी प्रजोत्पादनासाठी जमिनीवर येतो. व्हेलचे असे नाही.
     व्हेलमधील बालसंगोपन
    यांचे प्रजोत्पादन समुद्रातच होते. गर्भारपण १२ महिन्यांचे असते. एका वेळी एकच बछडे जन्मते. ते १८ महिनेपर्यंत अंगावरच पीत असते. बच्छडे आईच्या पोटातून बाहेर येताच आईच्या स्तनाचा शोध घेते. तो गवसताच त्याचे तोंड आईच्या स्तनाग्रावर बाटलीच्या बुचाप्रमाणे घट्ट बसते. त्याला या नंतर दूध ओढून पिण्याचे कष्ट घ्यावे लागत नाही. इंजक्शन देताना जसा त्या लहानशा  पिचकारीतून औषधी द्रव आपल्या शरीरात जातो तशासारख्या प्रकारे आई बच्छड्याच्या मुखात दुधासारख्या पदार्थाची धार सोडते. हे दूध घट्ट म्हणजे म्हणजे टूथपेस्ट इतके धट्ट असते. दूध पिऊन तृप्त झाली की बच्छडे आई पासून दूर होते. बछड्याची वाढ हळूहळू होते. ते आईच्या सोबतीने पोहू लागते. तसेच ते वयातही उशीरा येत असल्यामुळे यांची प्रजाही धीम्या गतीने वाढते.
व्हेल आवाज काढू शकतात. निरनिराळे संदेश देण्यासाठीच्या आवाजाची तह्रा वेगवेगळी असते. अभ्यासकांना एक घायाळ बच्छडे आढळल्याची नोंद आहे. मानव आणि जलचर शत्रूंमुळे त्याला जखमा झाल्या होत्या. त्याच्या फासळ्या उघड्या पडल्या होत्या. या अवस्थेत आई त्याची शुश्रुषा करीत होती. त्याची सोबत करीत होती. माय लेकरात संवाद सतत सुरू असतो. प्रियाराधनातही संवाद असतोच. दृष्टी, श्रवण आणि स्पर्श यांचे ज्ञान व्हेलला नक्कीच आहे. व्हेलना बाह्यकर्ण नाहीत पण तरीही त्यांचे कान चांगलेच तिखट असतात. काही बोटी अतिशय कमी आवाज करणाय्रा असतात, त्यामुळे मात्र त्यांचा गोंधळ उडतो. सामान्यत: व्हेल बोटींच्या वाय्रालाही उभे राहत नाहीत. ते लांब पोहत जातात. चव आणि वासाच्या ज्ञानाबद्दल अजून सर्वमान्य मत तयार झालेले नाही. त्यांची स्मरणशक्ती बय्रापैकी असते. ओळख पाळख ठेवणे, अनुभवातून शहाणे  होणे या क्षमता त्यांच्यात आहेत.
व्हेलच्या शिकारीवर बंदी
     १८९३ मध्ये व्हेलच्या हत्येवर बंदी घालण्यात आली.पण काही राष्ट्रे ही बंदी मानायला तयार नाहीत. यांच्या कातड्याच्या ढाली व बूट तयार केल्या जात. पण भरपूर मांस देणारा म्हणूनच याची प्रामुख्याने शिकार केली जायची. लाकडात कोरलेली डोंगी वापरून शिकारी लालूच दाखवत त्याच्या जवळ जाऊन त्याला दचकवीत आणि अणकुचीदार व लांब दांडू त्याच्या डोक्यात खूपसत असत. यावेळी धडपड करतांना तो अनेकदा उताणा व्हायचा. शिकाय्राला आता त्याची शिकार करणे सोपे व्हायचे. कोलंबसाच्या रोजनिशीत या विषयीची नोंद सापडते. मोठ्या जहाजांची धडक लागून अनेकदा व्हेलचे दोन तुकडे झाल्याची उदाहरणे आहेत. शिकाय्रांच्या आघातांमुळे विद्रुप झालेले व्हेलही काही कमी नाहीत. काही अंशी खुद्द व्हेलही यासाठी कारणीभूत आहे. तो सामान्यत: मंद गतीने ( ताशी ३/४ मैल)पोहतो. पण प्रसंगी ताशी ३० मैलापर्यंत धावू ( नव्हे पोहू ) शकतो.  तसेच त्याचे कुतुहलही त्याला जहाजे, मानव, समुद्रातील तारा, तरंणारे तसेच अर्धवट बुडालेल्या वस्तू यांच्याजवळ जाण्यास प्रवृत्त करते. यामुळे एकतर शिकार तरी होते नाहीतर अपघात तरी होतात. अति उष्णता, अतिशय थंडी आणि रोगप्रादुर्भाव हेही शत्रूच म्हटले पाहिजेत.


     व्हेलचे अन्नभक्षण
      बोटीवर माहिती देण्यासाठी प्रतिनिधी नेमले होते. एकाने व्हेलचा दात आणून दाखविला. एका बाजूला दाते असलेला दात होता. फणीला दाते असावेत तसे पण नरम दाते दाताला असतात. व्हेल समूहाने किंवा एकेकटे शिकार करतात. श्वसन करतांना जो फवारा निर्माण होतो त्यानंतर हवेचे बुडबुडे तयार होत असतात. सगळे व्हेल मिळून अशा बुडुबड्यांचे सुमारे ५० मीटर व्यासाचे वर्तुळ तयार करतात. या वर्तुळात अडकलेले जलचर अर्थातच भांबावलेले असतात. आता 'आ' वासून ते पाणी तोंडात घेतात. नंतर जबडा बंद करून पाणी बाहेर टाकतात. दात पाणी गाळण्याचे व भक्ष थोपवण्याचे काम करतात. फक्त पाणी बाहेर जाते. पाण्यासोबत आलेले जलचर प्राणी  व वनस्पती मात्र तोंडात अडकून पडतात. आता ते गिळंकृत होतात. पाण्याचा एक थेंबही पोटात जात नाही. व्हेल एक थेंबही पाणी पीत नाही. त्याची निर्जळी जन्मभर सुरू असते. त्याच्या भक्षातूनच त्याची अन्नाबरोबर  पाण्याची गरजही पूर्ण होत असते. व्हेलवर अनेक लोककाव्ये रचली आहेत. दमा आणि कानाच्या दुखण्यावर अमेरिकेतील मूळ रहिवासी व्हेलच्या भुकटीचा उपचार करीत. आफ्रिकेचे प्राचीन रहिवासी मानत की, व्हेल हे एकेकाळी मानवच होते. यांची हत्या हे पापकृत्य मानले जायचे. अशी हत्या झाली प्रायश्चित्त घ्यावे लागायचे.
      व्हेलच्या जबड्यात दातांच्या चार ओळी असतात. दात सारखे झिजत तुटत असतात आणि त्यांची जागा नवीन दात घेत असतात. ही प्रक्रिया आयुष्यभर सुरू असते. हत्ती आणि कांगारू या सस्तन प्राण्यातच असा प्रकार आढळतो.
  बंदिस्त अवस्थेत जन्मलेल्या एकमेव व्हेलचे नाव स्नूटी असे आहे. फ्लोरिडामधील प्राणीसंग्रहातून ह्याला आता समुद्रात सोडणे योग्य होणार नाही. मानवाला याच्याशी संपर्क करता येतो. संशोधन आणि शिक्षण या दृष्टीने हा व्हेल खूप मोलाचा आहे.
    ६० दशलक्ष वर्षांपूर्वी चार पायांचे सस्तन प्राणी असलेले यांचे पूर्वज जलवासी झाले असे मानतात. डॅालफिन, वॅालरस या सारखे एकेकाळी भूतलावर वावरणारे प्राणी का बरे जलवासी झाले असतील. माणसांपेक्षा जलवासी प्राण्यांचाच सहवास बरा असे तर त्यांना वाटले नसेल ना?

Saturday, June 21, 2014

अमेरिकन गवळी -लोकशाही वार्ता - २१.०६.२०१४ रविवार


यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया
अमेरिकेत पाश्‍चराइज्ड दूध मिळते. गॅलनभर दूध सोयीनुसार मॉलमधून घेऊन यायचे आणि ते फ्र ीजमध्ये ठेवून लागेल तसे वापरायचे, अशी पद्धत इथे रूढ आहे. हे दूध पाश्‍चराइज्ड तसेच होमोजीनाइज्ड असते. हे दूध फ्रीजमध्ये ठेवायचे आणि लागेल तसे वापरायचे. ते न तापवता वापरले तरी चालते. तसेच हे दूध कितीही तापवले तरी साय येत नाही किंवा यातील स्निग्ध पदार्थ वेगळे करता येत नाहीत. सौ नीलमने 'रॉ' (निरसं दूध) मिल्क म्हणजे कोणतीही प्रRिया न केलेले दूध मिळू शकेल का, याचा शोध घेण्यास सुरवात केली. इथल्या 'मंडईमध्ये' असं निरसं दूध ती शेतकर्‍याकडून बाजारात जाऊन घेत असे. आणि काय आश्‍चर्य? एक दिवस तिला फेसबुकवर एक जाहिरात दिसली. त्यात दुधाचे सगळे प्रकार (यात 'रॉ' मिल्कही - निरसं दूध - समाविष्ट होतं) घरपोच देण्याचा उल्लेख होता. डिलिव्हरी चार्जेस फक्त चार डॉलर इतकेच(!) होते. एका गॅलनला (साडे चार लिटर) दहा डॉलर असा दर होता. त्यामुळे दर आठवड्याला दूध न घेता दर दोन आठवड्यांनी घेण्याचे ठरविले. हे दूध तापविले की चांगली जाड साय येते. तूप वेगळे खरेदी करण्याची गरज पडत नाही.
पण गवळ्याला एक अभिवचन (डिक्लरेशन ) द्यावे लागते. गाईचे पोषण कशाप्रकारे झाले आहे, त्याबद्दल आश्‍वासन द्यावे लागते.
१. अ) दूध वाढावे, म्हणून गाईला हार्मोनचे इंजेक्शन दिलेले नाही. ब)तिला अँटीबायॉटिक औषधे/ इंजेक्शने दिलेली नाहीत. क) तिने जे गवत किंवा वनस्पती किंवा अन्य प्रकारचे अन्न खाल्ले आहे त्यावर कीटकनाशके फवारलेली नाहीत ड) रासायनिक खाते दिलेल्या गवतावर तिचे पोषण झालेले नाही.
२. तिचे पोषण पूर्णपणे नैसर्गिक अन्नावर झालेले आहे.
३. ती जी एमओ (जेनेटिकली मॉडिफाइड ऑरागॅनिझम) या प्रकारात मोडत नाही.
अशा प्रकारची गाय असेल तर दुधाचा भाव दहा डॉलरला एक गॅलन, असा असतो एरवी तो तीन डॉलरला एक गॅलन असा भाव असतो.
मुद्दा वेगळाच आहे. अमेरिकेतही घरपोच दूध पोचवणारे गवळी आहेत. हे गवळी ट्रकमध्ये कॅन भरभरून दूध आणतात आणि चार डॉलर डिलिव्हरी चार्जेस घेऊन घरोघर दूध पोचवतात ही माझ्यासाठी आश्‍चर्याची गोष्ट होती. म्हणून या 'घरपोच दूध' प्रश्नाकडे साहजिकच माझे लक्ष गेले.
अमेरिकेतील गोपालन आणि गोसंवर्धन
या प्रदेशात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे इथले 'गोठे' वातानुकुलित असतात. इथल्या गाईंना कृत्रिम रीत्या फळवतात. वासरू जन्माला येताच त्याला वेगळे करून बाटलीने दूध पाजून वाढवतात. त्यांना वातानुकुलित खोल्यात वाढवतात. ज्या कालवडी असतात, त्यांना गाई म्हणून वाढवतात. जे खोंड असतात, ते पुरेसे वाढले ही, त्यांची कत्तलखान्यात नेऊन हत्या करतात आणि त्यांच्या मासाचे पावाच्या आकाराचे तुकडे करून ते पॅक करून वातानुकुलित मॉलमध्ये विRीला ठेवतात.
याबाबत एक कथा कानावर आली. एक माणूस गायी पाळत आहे. जन्मलेले वासरू खोंड असेल तर त्याला पुरेसे वाढवून तो त्याला कत्तलखान्यात घेऊन जातो. त्याच्या मासाचे घनाकार तुकडे करून घरी घेऊन येतो. ते भल्यामोठय़ा फ्र ीज मध्ये रचून ठेवतो. रोज एक तुकडा काढून तो ओव्हनमध्ये शिजवतो आणि मिरे मीठ लावून खातो. हा साठा संपतो तोपर्यंत दुसरा खोंड मोठा झालेला असतो. आपल्या सारख्या गोपूजकांच्या आणि गोभक्तांच्या अंगावर शहारे आणणारा हा सर्व प्रकार आहे.
गोपूजक हिंदुस्थान म्हशीचे दूध पितो
एक मात्र नक्की आहे. इथे गोसंवर्धन आणि गोपालन मात्र उत्तम रीत्या होते. पण त्याचे कारण अगदी वेगळे आहे. खोंड कापून भरपूर मांस मिळते. ते चविष्टही असते, असे म्हणतात. या साठीच येथे गायींची निगा राखली जाते. येथे गोपूजन ही संकल्पनाच नाही. गोपूजाकांच्या आपल्या देशात गायींची काय अवस्था आहे, ते आपण पाहतोच आहोत. आपल्या येथे गोपूजन आहे. पण गोपालन आणि गोसंवर्धन याबद्दल न बोललेच बरे. याउलट अमेरिकेत किंवा पाश्‍चात्य देशात गोपालन आणि गोसंवर्धन उत्तम आहे पण गाई विषयी उत्तम दूध आणि भरपूर मांस देणारा प्राणी या व्यतिरिक्त दुसरा भाव नाही. आणखीही एक विरोधाभास आहे. गोपूजन करणारा हिंदुस्थान म्हशीचे दूध पितो. गोभक्षण करणारा अमेरिकन गायीचेच दूध पितो.
गायींना भरपूर दूध असते. सर्व दूध यंत्राने काढून घेतात. अगदी थेंब न थेंब काढून घेतात. आपल्या येथे दूध काढल्यानंतर वासरांसाठी दूध राखून ठेवतात. इथे वासरांना बाटलीने दूध पाजून वाढवतात. त्यामुळे वासरांसाठी दूध राखून ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच वासरांना वातानुकुलीत गोठय़ांमध्ये वाढवतात. कारण निदान सहा महिने तरी इथे भरपूर बर्फ पडत असतो. ही थंडी गाईंना किंवा वासरांना मानवत नाही. म्हणून ही व्यवस्था करावी लागते.
नॉनव्हेज,व्हेज आणि विगन
अमेरिकेत विविध प्रकारचे, प्रथा परंपरा जपणारे लोक आढळतात. नॉनव्हेज म्हणजे मांसाहारी हे आपल्याला माहीत आहे. यातही दोन प्रकार आहेत. काहींना बीफ(गोमांस ) चालत नाही. इतर सर्व मांसाहार त्यांना चालतो. काहींना हॅम (डुकराचे मांस) चालत नाही. बाकी सर्व प्रकार चालतात. व्हेजिटेरियन (शाकाहारी) यांना मांसाहार चालत नाही, हे आपल्याला माहीत आहे. पण दूध, दही चालते. आहार पद्धतीनुसार माणसांचा आणखी एक प्रकार इथे आहे. त्यांना 'विगन' असे म्हणतात. यांना दूध सुद्धा चालत नाही. दुधालाही ते मांसाहारच मानतात. प्राण्यापासून मिळालेला कोणताही पदार्थ त्यांच्या दृष्टीने नॉनव्हेजच असतो. अपवाद असतो तो फक्त आईच्या दुधाचा! ही मंडळी वनस्पतीपासून दुधासारखा पदार्थ तयार करून ते दूध म्हणून वापरतात. आपल्या इथे तर आजीबाईच्या उपासाला सुद्धा दूध, दही, ताक, तूप हे प्रकार चालतात. दुधाला मांसाहार समजायचे की शाकाहार हा वादाचा मुद्दा आहे, हा विषय तर्काच्या कसोटीवर न्यायचा म्हटले तर दूध हा मांसाहारच ठरणार नाही का? मात्र तर्काचा आधार आपण अनेकदा घेतच नाही. म्हणून शाकाहारी मंडळींनी श्रीखंड, बासुंदी, रसगुल्ले यावर ताव मारायला हरकत नाही.
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४0 0२२

Saturday, June 14, 2014

YORK - PENNSYLVANIA 16.06.2014 lOKSHAHIVARTA


            अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील यॉर्क काउंटी मध्ये(काउंटी म्हणजे जिल्हा) वसलेले हे त्याच नावाचे एक टुमदार शहर आहे. हे शहर 'व्हाईट रोज सिटी' या नावाने प्रसिद्ध आहे. हाऊस(सभागृह) ऑफ यॉर्क वर पांढर्‍या गुलाबाचे चिन्ह आहे. त्यावरून'व्हाईट रोज सिटी' हे नाव पडले, असे ऐकले. संमिर्श लोकसंख्या असलेले यॉर्क हे शहर मुख्यत: र्जमन लोकांनी वसवलेले आहे. मुख्य शहर आणि उपनगरे यांची मिळून या शहराची लोकसंख्या दहा लक्षापेक्षा जास्त आहे. ही अमेरिकेची पहिली राजधानी आहे. अमेरिकेच्या आजच्या राज्यघटनेचे लेखन या शहरात झाले आहे, असे या शहराचे ऐतिहासिक महत्त्व आहे पण, अनेकांचा पहिल्या राजधानीचा मान या शहराला द्यायला विरोध आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, ज्यावेळेला हे घडले त्यावेळी संयुक्त राज्य (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) अस्तित्वातच आले नव्हते. तर मग यॉर्क ही त्याची राजधानी कशी म्हणायची? आपण या वादात पडूया नको. राज्य घटनेच्या लेखनाची धुरा जेफरसन यांनी सांभाळली होती या कामात बेन्जामिनफ्रँन्क्लीन यांचाही मोलाचा सहभाग होता.
अमेरिका राष्ट्र या नात्याने लहान वयाचे आहे. त्यामुळे येथील प्रत्येक गाव कोणत्या ना कोणत्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच या राष्ट्राच्या उभारणीच्या कामात अनेकांचे महत्त्वाचे योगदान असते तसेच याची बहुतेकांना आदरयुक्त जाणीव असते. पण याची कायमस्वरूपी आठवण असावी म्हणून आपल्याप्रमाणे प्रात:स्मरण असावे, असे वाटते. एका अमेरिकन बुध कौशिक ऋषीने या देशात जन्म घ्यावा आणि त्याने असे प्रात:स्मरण रचावे, असे वाटून गेले. अशी या भूमीची आणि इथल्या व्यक्तींची महती नक्कीच आहे. असो.
यॉर्क शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. यापैकी मला तीन स्थळे विशेष महत्त्वाची वाटली शू हाउस, यार्क सिटी एरिना आणि यॉर्क सेन्ट्रल मार्केट ही तीन मला विशेष महत्त्वाची वाटली. अर्थात व्यक्तिपरत्वे आवडीनिवडी बदलणारच .
                                               'शू हाऊस' एक अफलातून कल्पना
जोड्याच्या आकाराचे 'शू हाऊस' ही एक अजब कमाल आहे. याची रचना करणारा एक अवलियाच म्हटला पाहिजे. याची बांधणी कर्नल मालोन हेन्स याने केली आहे. याचा पादत्राणे तयार करण्याचा व्यवसाय होता. माणूस हाडाचा 'बेपारी' होता. या व्यवसायातला तो बादशहा (विझार्ड) मानला जातो. निरनिराळ्या ठिकाणी त्याची चाळीस दुकानांची मालिका होती. आपली आणि आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी व्हावी म्हणून त्याने चक्क जोड्याच्या आकारचे 'शू हाउस' बांधले आहे. ४८ फूट लांब, १७ फूट रुंद आणि २५ फूट उंचीचे हे पादत्राणगृह हेन्सने १९४८ साली बांधले. बांधकामात लाकडाचा उपयोग मुख्यत: करण्यात आला असून आवश्यक तिथे तारा आणि सिमेंटचा वापर मजबुतीसाठी केला आहे. यात तीन बेड रूम्स, दोन बाथ रूम्स एक किचन आणि लिव्हिंग रूम आहे.
           सुरवातीला हेन्स वयस्कर दाम्पत्याला या 'गेस्ट हाउसमध्ये' रहायला बोलवी. त्यांची राजेशाही बडदास्त ठेवी. जाताना त्यांना कपडेलत्ते देऊन त्यांची बोळवण करी. पुढे तो हे 'गेस्ट हाउस' मधुचंद्राला येणार्‍या जोडप्यांना देऊ लागला. हेन्सच्या आरोग्यविषयक सवयी वाखाणण्यासारख्या होत्या. तो स्वत: निर्व्यसनी तर होताच पण धुम्रपानविरोधी मोहीम सुरू होण्या अगोदारपासूनच त्याचा धुम्रपानाला विरोध होता. रस्त्याने कोणी सिगरेट ओढत जाताना दिसला तर तो त्याच्या तोंडातील सिगरेट काढून घेई. त्याने सिगरेट पिणे सोडल्यास त्याला पैसे देऊ करी. त्याने जसा भरभरून पैसा मिळवला तसाच तो वाटून टाकला. 'मी या जगात निष्कांचन अवस्थेत जन्माला आलो आहे, निष्कांचन अवस्थेतच जगाचा निरोप घेईन', असे तो म्हणत असे. हे ऐकले की, 'मुठ्ठी बांधके आयेहो,(मूल जन्माला येत तेव्हा त्याच्या मुठी आवळलेल्या असतात), हाथ पसारे जाओगे', या (बहुदा) महात्मा कबीराच्या दोह्यातील पंक्तीची आठवण होते. असो. आज हे 'शू हाऊस' एक पर्यटन स्थळ झाले आहे.
                                     यॉर्क सिटी एरिना
यॉर्क शहरातील हे दुसरे एक महत्त्वाचे आणि कल्पकतेने उभारलेले स्थान आहे. इथे वर्षाचा बहुतेक काळ हा सर्व भूभाग बर्फाने झाकलेला असतो. स्केटिंग आणि बर्फावरची हॉकी हे खेळ या निमित्ताने खेळले जातात. निसर्गाच्या प्रतिकूलतेला अनुकूलतेत परिवर्तित करण्याच्या अमेरिकन लोकांच्या गुणाला आणि वृत्तीला दाद दिली पाहिजे, असे वाटते. अर्थात याला पर्यायही नाही, हेही खरे आहे .
                                          यॉर्क सेन्ट्रल मार्केट
यॉर्क सेन्ट्रल मार्केट ही योजना ग्राहकांसाठी तसेच शेतकर्‍यांसाठीही खूपच महत्त्वाची आहे. तशीच ती अनुकरणीयही आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये कोणताही मध्यस्त न ठेवता सरळ आणि प्रत्यक्ष संबंध निर्माण करण्यासाठीची ही योजना आहे. आपल्या नागपुरातील कॉटन मार्केटच्या दसपट आकाराची भलीमोठी आणि भरपूर उंचीची ही इमारत आहे. मधोमध हिंडण्यासाठी जागा असलेली लंबवतरुळाकृती टेबले मांडलेली रचना आपण पाहिलेली आहे. अशी रचना करून साधारणपणे संस्थेच्या कार्यकारिणीच्या सभा घेण्याची पद्धतीही आपल्या परिचयाची आहे. योग्य अंतर ठेवून असे शंभरावर गट मांडलेले असतात. एका गटात दहा ते पंधरा टेबले असतात. आतमध्ये विRेत्या महिला उभ्या असतात. टेबलांवर टोपल्यांमध्ये भाज्या ठेवलेल्या असतात. गिर्‍हाइक बाहेरच्या बाजूने येऊन भाजी निवडतात. भाजी निवडून झाली की ती आतमध्ये उभ्या असलेल्या विRेतीजवळ द्यायची. ती भाजी पिशवीत भरून विRेती तिचे वजन करते आणि किंमत सांगते. तेवढी रक्कम देऊन ती भाजी विकत घ्यायची, अशी विRीची पद्धती असते. सेन्ट्रल यॉर्क मार्केट मध्ये फक्त दर शुRवारी हा बाजार भरतो. आठवड्याच्या प्रत्येक वारी प्रत्येक भागात असा बाजार भरतो. भाजी/धान्य पिकवणारे आणि ग्राहक यांचा प्रत्यक्ष संबंध अशाप्रकारे येत असतो. या पद्धतीत मध्यस्त पूर्णपणे वगळला जातो. अशी पद्धती काही फेरफार करून आपल्या इथे राबवता येऊ शकते. आपल्या येथे भाजांचे भाव जेव्हा वाढतात, तेव्हा फायदा दलालांचाच होत असतो. वाढलेल्या किमतीचा लाभ ग्राहकांना फारसा मिळतच नाही. आमदार/खासदार निधीतून अशा इमारती बांधता येतील आणि शेतमाल विकणार्‍यांची सोय करता येईल. पण कुणीतरी हे मनावर घ्यावयास हवे आहे. आपल्या इथली हीच प्रमुख अडचण आहे.

वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४0 0२२

Thursday, June 5, 2014

My Trip to America - York - First Capital of America

मु.पो.– यॉर्क, अमेरिकेची पहिली राजधानी
माझी अमेरिका वारी
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२ 
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हनिया  
अमेरिकेतील पेन्सिलव्हनिया प्रांतातील यॉर्क काउंटी मध्ये(काउंटी म्हणजे जिल्हा) वसलेले हे त्याच नावाचे  एक टुमदार शहर आहे. हे शहर ‘व्हाईट रोज सिटी’ या नावाने प्रसिद्ध आहे. हाऊस (सभागृह) यॉर्क वर पांढऱ्या गुलाबाचे चिन्ह आहे, त्यावरून ‘व्हाईट रोज सिटी’ हे नाव पडले, असे ऐकले. संमिश्र लोकसंख्या असलेले यॉर्क हे शहर मुख्यत: जर्मन लोकांनी वसवलेले आहे. मुख्य शहर आणि उपनगरे यांची मिळून या शहराची लोकसंख्या दहा लक्षापेक्षा जास्त आहे. ही अमेरिकेची पहिली राजधानी आहे. अमेरिकेच्या आजच्या राज्यघटनेचे लेखन या शहरात झाले आहे,असे या शहराचे ऐतिहासिक महत्व आहे. पण अनेकांचा पहिल्या राजधानीचा मान या शहराला द्यायला विरोध आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, ज्यावेळेला हे घडले त्यावेळी संयुक्त राज्य (युनायटेड स्टेट्स फ अमेरिका) अस्तित्वातच आले नव्हते. तर मग यॉर्क ही त्याची राजधानी कशी म्हणायची? आपण या वादात पडूया नको. राज्य घटनेच्या लेखनाची धुरा जेफरसन यांनी सांभाळली होती या कामात बेन्जामिन फ्रन्क्लीन यांचाही मोलाचा सहभाग होता.
अमेरिका राष्ट्र या नात्याने लहान वयाचे आहे. त्यामुळे येथील प्रत्येक गाव कोणत्या ना कोणत्या दृष्टीने महत्वाचे आहे. तसेच या राष्ट्राच्या उभारणीच्या कामात अनेकांचे महत्वाचे योगदान असते तसेच याची बहुतेकांना आदरयुक्त जाणीव असते. पण याची कायमस्वरूपी आठवण असावी म्हणून आपल्याप्रमाणे प्रात:स्मरण असावे, असे वाटते. एका अमेरिकन बुध कौशिक ऋषीने  या देशात जन्म घ्यावा आणि त्याने असे प्रात:स्मरण रचावे, असे वाटून गेले. अशी या भूमीची आणि इथल्या व्यक्तींची महती नक्कीच आहे.असो.
यॉर्क शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. यापैकी मला तीन स्थळे विशेष महत्वाची वाटली शू हाउस, यार्क सिटी एरिना  आणि यॉर्क सेन्ट्रल मार्केट ही तीन मला विशेष महत्वाची वाटली. अर्थात व्यक्तिपरत्वे आवडीनिवडी बदलणारच .  
‘शू हाउस’ एक अफलातून  कल्पना
जोड्याच्या आकाराचे ‘शू हाउस’ ही एक अजब कमाल आहे. याची रचना करणारा एक अवलियाच म्हटला पाहिजे. याची बांधणी कर्नल मालोन हेन्स याने केली आहे. याचा पादत्राणे तयार करण्याचा व्यवसाय होता. माणूस हाडाचा ‘बेपारी’ होता. या व्यवसायातला तो बादशहा (विझार्ड) मानला जातो. निरनिराळ्या ठिकाणी त्याची चाळीस दुकानांची मालिका होती. आपली आणि आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी व्हावी म्हणून त्याने  चक्क जोड्याच्या आकारचे ‘शू हाउस’ बांधले आहे. ४८ फूट लांब, १७ फूट रुंद आणि २५ फूट उंचीचे हे पादत्राणगृह हेन्सने १९४८ साली बांधले. बांधकामात लाकडाचा उपयोग मुख्यत: करण्यात आला असून आवश्यक तिथे तारा आणि सिमेंटचा वापर मजबुतीसाठी केला आहे. यात तीन बेड रूम्स, दोन बाथ रूम्स एक किचन आणि लिव्हिंग रूम आहे..
सुरवातीला हेन्स वयस्कर दाम्पत्याला या ‘गेस्ट हाउसमध्ये’ रहायला बोलवी. त्यांची राजेशाही बडदास्त ठेवी. जातांना त्यांना कपडेलत्ते देऊन त्यांची बोळवण करी. पुढे तो हे ‘गेस्ट हाउस’ मधुचंद्राला येणाऱ्या जोडप्यांना देऊ लागला. हेन्सच्या आरोग्यविषयक सवयी वाखाणण्यासारख्या होत्या. तो स्वत: निर्व्यसनी तर होताच पण धुम्रपानविरोधी मोहीम सुरु होण्या अगोदारपासूनच त्याचा धुम्रपानाला विरोध होता. रस्त्याने  कोणी सिगरेट ओढत जाताना दिसला तर तो त्याच्या तोंडातील सिगरेट काढून घेई. त्याने सिगरेट पिणे सोडल्यास त्याला पैसे देऊ करी. त्याने जसा भरभरून पैसा मिळवला तसाच तो वाटून टाकला. ‘मी या जगात निष्कांचन अवस्थेत जन्माला आलो आहे, निष्कांचन अवस्थेतच जगाचा निरोप घेईन’, असे तो म्हणत असे. हे ऐकले की, ‘मुठ्ठी बांधके आये हो,(मूल जन्माला येत तेव्हा त्याच्या मुठी आवळलेल्या असतात), हाथ पसारे जावोगे’, या (बहुदा) महात्मा  कबीराच्या दोह्यातील पंक्तीची आठवण होते.असो. आज हे ‘शू हाऊस’ एक पर्यटन स्थळ झाले आहे.
 यॉर्क सिटी एरिना
यॉर्क शहरातील हे दुसरे एक महत्वाचे आणि कल्पकतेने उभारलेले स्थान आहे. इथे वर्षाचा बहुतेक काळ हा सर्व भूभाग बर्फाने झाकलेला  असतो. स्केटिंग आणि बर्फावरची हॉकी हे खेळ या निमित्ताने खेळले जातात. निसर्गाच्या प्रतिकूलतेला अनुकूलतेत परिवर्तित करण्याच्या अमेरिकन लोकांच्या गुणाला आणि वृत्तीला दाद दिली पाहिजे, असे वाटते. अर्थात याला पर्यायही नाही, हेही खरे आहे .
 यॉर्क सेन्ट्रल मार्केट
यॉर्क सेन्ट्रल मार्केट ही योजना ग्राहकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठीही खूपच महत्वाची आहे. तशीच ती  अनुकरणीयही आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये कोणताही मध्यस्त न ठेवता सरळ आणि प्रत्यक्ष संबंध निर्माण करण्यासाठीची ही योजना आहे. आपल्या नागपुरातील टन मार्केटच्या दसपट आकाराची भलीमोठी आणि भरपूर उंचीची ही इमारत आहे. मधोमध हिंडण्यासाठी जागा असलेली लंबवर्तुळाकृती टेबले मांडलेली रचना आपण पाहिलेली आहे. अशी रचना करून साधारणपणे संस्थेच्या कार्यकारिणीच्या सभा घेण्याची पद्धतीही  आपल्या परिचयाची आहे. योग्य अंतर ठेवून अशी शंभरावर  गट मांडलेले असतात. एका गटात दहा  ते पंधरा टेबले असतात. आतमध्ये विक्रेत्या महिला उभ्या असतात. टेबलांवर टोपल्यांमध्ये भाज्या ठेवलेल्या असतात. गिऱ्हाइक बाहेरच्या बाजूने येऊन भाजी निवडतात. भाजी निवडून झाली की ती आतमध्ये उभ्या असलेल्या विक्रेतीजवळ द्यायची. ती भाजी पिशवीत भरून विक्रेती तिचे वजन करते आणि किंमत सांगते. तेवढी रक्कम देऊन ती भाजी विकत घ्यायची, अशी विक्रीची पद्धती असते. सेन्ट्रल यॉर्क मार्केट मध्ये फक्त दर शुक्रवारी हा बाजार भरतो. आठवड्याच्या प्रत्येक वारी प्रत्येक भागात असा बाजार भरतो. भाजी/धान्य  पिकवणारे आणि ग्राहक यांचा प्रत्यक्ष  संबंध अशाप्रकारे येत असतो. या पद्धतीत मध्यस्त पूर्णपणे वगळला जातो. अशी पद्धती काही फेरफार करून आपल्या इथे राबवता येऊ शकते. आपल्या येथे भाज्यांचे भाव जेव्हा वाढतात, तेव्हा फायदा द्लालांचाच होत असतो. वाढलेल्या किमतीचा लाभ ग्राहकांना फारसा मिळतच नाही. आमदार / खासदार निधीतून अशा इमारती बांधता येतील आणि शेतमाल विकणाऱ्यांची सोय करता येईल. पण कुणीतरी हे मनावर घ्यावयास हवे आहे. आपल्या इथली हीच प्रमुख अडचण आहे.








































































Saturday, May 24, 2014

My Trip To America 2505.2014 Lokshahivarta


दिनांक १३ मी २0१४ ला युनायटेड एअर लाइन्सच्या विमानाने अमेरिकेतील पेन्सिव्हॅनिया प्रांतातल्या यॉर्क (न्यूयॉर्क नव्हे) या गावी जाण्याचे निश्‍चित झाले होते. हा निर्णय तसा एक वेगळाच निर्णय होता. ही फ्लाईट कुठेही न थांबता सतत १५ तास उड्डाण करीत न्यूयॉर्कला पोचणार होती. ब्रेक जर्नीचा पर्याय होता. पण भाषेची अडचण नको, तसेच काही तास मध्येच कुठेतरी खोळंबून राहण्यापेक्षा सलग १५ तास प्रवासाचा पर्याय निवडला. नागपूर ते पुणे बसने सलग प्रवास करण्याचा अनुभव गाठीशी होता, तसेच २00९ मध्ये असा प्रवास केलेलाही होता. एअर इंडियाने नागपूर ते मुंबई असा प्रवास करून दुपारी ११ चे सुमारास मुंबईच्या डोमेस्टिक एअर पोर्टवर पोचल्यावर पवई येथील श्री विनायक लेले यांच्या गेस्ट हाऊसमध्ये संध्याकाळपयर्ंत विश्रांती घेऊन इंटरनॅशनल एअरपोर्टवर टॅक्सीने दाखल झालो. इथपर्यंत शैलेश आणि संगीता साथ व सोबत म्हणून सोडायला आले होते. 
कडक तपासणी
पासपोर्ट व तिकिटाच्या तपासणीचा सोपस्कार आटोपला आणि समान ढकलत आमची स्वारी बोर्डिंग पास मिळविण्यासाठी रांगेत उभी राहिली. सामानावर लावावयाच्या पट्टया हाती मिळाल्यावर तपशील भरण्यास सुरवात करतो न करतो तोच एक तरूण अधिकारी समोर येऊन उभा राहिला. कोण कुठले, कोणाकडे, कशासाठी जाणार यांची चौकशी झाली. सामानात काय काय आहे, हेही विचारले. तुम्हाला आता इथे कुणी भेटले का, असे कुणी भेटल्यास त्याने तुम्हाला काही वस्तू दिल्या का असे विचारून झाल्यानंतर असे झाल्यास कुणाकडूनही कोणतीही वस्तू घेऊ नका, असे त्या अधिकार्‍याने बजावले. अतिरेक्यांचा उपद्रव सुरू झाल्यापासून विमानतळावर अशाप्रकारची तपासणी सुरू झाली आहे. मला या गोष्टीचे अतिशय समाधान वाटले. पण हे समाधान अल्पकाळ टिकले. ही सर्व तपशीलवार चौकशी झाल्यानंतर बोर्डिग पास मिळाला. ७६ क्रमांकाच्या गेट मधून विमानात बसायला जायचे होते. वेळ होता म्हणून इकडे तिकडे भटकायला सुरवात केली.
अनाहूत पाहुणा
एवढय़ात विमानतळावरच्या एका अधिकार्‍याने एका माणसाला हटकले. त्याच्याजवळ कुठलासा पासपोर्ट होता. पण तो तिथे कशासाठी आणि कसा काय आला होता, ते त्याला सांगता येत नव्हते. माणूस ओशाळल्या सारखा वाटत होता. आपण सहजच तिथे आल्याचे तो सांगत होता. अनाहूतपणे कुणीही प्रवेश करू नये म्हणून केलेली भरभक्कम तटबंदी मोडीत काढून ही व्यक्ती तिथपर्यंत पोहोचलीच कशी, यामुळे सगळे हादरले होते. त्याची आणखी चौकशी करण्यासाठी त्याला तिथून नेण्यात आले. मी आपल्या जागी येऊन बसलो. पण पाहिलेल्या प्रसंगामुळे मनात उठलेले काहूर काही केल्या थांबत नव्हते. माझी तीनदा चौकशी व तपासणी झाली होती. ही सर्व प्रकारची व्यवस्था मोडीत काढून ही व्यक्ती आगदी आतपर्यंत पोचावी याचे आश्‍चर्य वाटत होते. शेवटी एक गोष्ट खरी आहे की, सावापेक्षा चोराची बुद्धी श्रेष्ठ प्रतीची असते. पुढे काय झाले ते कळले नाही. कितीही काळजी घेतली तरी असे प्रकार होणारच हे जाणवले. 'सदा सावधानतेला' पर्याय नाही, हे जाणवले. तसेच सुरक्षा व्यवस्थेची नित्य तपासणी करणे आवश्यक असते आणि सुधारणेला वाव असतोच असतो, हेही लक्षात आले.
विमानात बसता बसता पुन्हा एकदा तपासणी झाली पादत्राणेही तपासली गेली. या निमित्ताने त्रास नक्कीच होतो, पण खबरदारीची आवश्यकताही पटते. मात्र त्या अनाहूत पाहुण्याचा विचार काही मनातून जात नव्हता. विशेष काही नसेलही पण त्याचे तिथे येणे व असणे, ही बाब कडेकोट व्यवस्थेसाठी जबाबदार असणार्‍या यंत्रणेसाठी एक आव्हानच असणार यात शंका नाही.

सगळे तपशील नोंदवले होते
प्रत्येक प्रवाशाच्या खुर्ची समोरच्या खुर्चीच्या पाठीवर मॉनिटर स्क्रीन होता. त्यावर खेळ खेळता येतात, सर्व प्रकारचे चित्रपट पाहता येतात आणखी खूप काही करता येतं. मला आकर्षण वेगळ्याच गोष्टीचं होतं. विमान प्रवासाचे सगळे तपशील पाहण्याची सोय होती.
मुंबई ते न्यूयॉर्क हे अंतर ८000 मैलांपेक्षा (किलोमीटर नाही) जास्त आहे. म्हणजे १२,000 किलोमीटरपेक्षा जास्त होतं. विमानाने सर्व सोपस्कार आटोपल्यावर आकाशात झेप घेतली. काही वेळातच ३५,000 फुट उंची गाठली. विमानाबाहेरचे उष्णतामान (नव्हे थंडीचे मान) : (उणे) ५0 डिग्री फॅरेनहाईट होते. म्हणजे सुमारे  (उणे) ४ ५   डिग्री सेंटिग्रेड होते. विमानाचा वेग तशी ५00 मैल होता. किती अंतर कापले किती अंतर राहिले, याचा हिशोब मांडला जात होता. आम्ही ओहोटाबादवरून पुढे गेलो. आता पाकिस्तान लागले. मग अफगाणिस्तान, नंतर रशिया दिसू लागला. त्यानंतर नॉर्वे वरून आम्ही उडत चाललो होतो. काळी कुठेतरी डेन्मार्क असावे. दुसर्‍या महायुद्धात याच ठिकाणी हिटलरच्या फौजांनी इंग्लंडच्या आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या फौजांची कोंडी केली होती. सर्व युद्धसामग्री तशीच टाकून सैनिकांना इंग्लंडला परत आणण्यात आले होते. चर्चिलने या माघारीला 'यशस्वी माघार' (सक्सेसफुल रिट्रीट) म्हणून संबोधले होते. शास्त्रे काय पुन्हा तयार करता येतील पण एकेक सैनिक लाखमोलाचा होता. सैन्य वाचले होते. पुन्हा शस्त्रे नव्याने तयार करून काही वर्षांच्या तयारीनंतर जनरल आयसेनहोवरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड आणि मित्र राष्ट्रांच्या फौजा नॉर्मंडी बीचवर उतरल्या आणि युद्धाचे पारडे फिरले. माझी नजर नॉर्मंडी बिचचा शोध घेत होती पण आम्ही त्यापासून खूप दुरून उडत चाललो होतो. एवढय़ात हेलसिंकीची नोंद दिसली. आम्ही निम्मे अंतर पार केले होते. आता बाहेरचे उष्णतामान (थंडीचे मान) उणे एकोणसाठ डिग्री फॅरेनहाईट इतके होते. म्हणजे सुमारे उणे ५ ० डिग्री सेंटिग्रेड होते. आम्ही रात्री अकरा वाजता मुंबईहून निघालो होतो. घड्याळात भारतातले सकाळचे सात वाजले होते. म्हणजे अमेरिकेतले रात्रीचे साडेनऊ वाजले असणार. वेळेचा हिशोब सोपा आहे. आपल्या वेळेत अडीच तास मिळवायचे आणि दिवसाची रात्र करायची किंवा रात्रीचा दिवस करायचा. म्हणजे न्यूयॉर्कमधली वेळ समजते. आता विमान ३६00 फुटावरून उडत चालले होते. आठ तास उडत होतो, आता आणखी सात तास बाकी होते आणि ४000 मैल उड्डाण बाकी होते. कुठल्याही कामाचा निम्मा टप्पा पार पडला की उरलेला टप्पा लवकर पार पडतो आहे, असे वाटू लागते. आमचेही तसेच झाले होते. यावरून एक गोष्ट जाणवली. सर्व जगाने सी जी एस(सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद) सिस्टीम स्वीकारली अमेरिका मात्र अजून एफ पी एस(फुट,पाउंड, सेकंद) सिस्टीमचाच आग्रह धरून आहे.
काय हवे ते सांगा
प्रवासात खाण्यापिण्याची चंगळ होती. याचे पैसे विमान भाड्याबरोबरच घेतलेले होते. बहुतेक प्रवासी शाकाहारी होते. जेवणात बासमती तांदुळाचा भात फुलकोबीची रस्सा भाजी, पालकाची पातळ भाजी, दही, सलाद, बन पाव, असा बेत होता. फ्रु ट ज्यूस, चहा , कॉफी, पेये अधूनमधून विचारली जात होती. मी लिहिण्यसाठी कागद मागितला. तो मात्र नव्हता. मी शेवटी टिशू पेपरवर मुद्दे नोंदविण्यास सुरवात केली. हवाई सुंदर्‍यांना मी बहुदा दुर्वास ऋषी वाटलो असेन. कारण जवळजवळ प्रत्येकाची फर्माईश त्या पूर्ण करीत होत्या. पण मला मात्र त्यांना 'व्हेरी सॉरी' म्हणावे लागले. पण चेहर्‍यावर अपराधी भाव होता. परत वेळेला जाताना त्यांच्या जवळ नक्की एखादी वही किंवा कोरे कागद असतील, याची खात्री वाटते.

पुढची पिढी कशी असेल..
मुंबईलाच एका वृद्ध महिलेशी थोडेसे बोलणे झाले होते. तिचा मुलगा व सून अमेरिकेत एका गावी राहत होते. पण नातवाला सात तासाच्या अंतरावर (विमान सात तासात तशी ५00मैल वेगाने जाईल तेवढय़ा अंतरावर) नोकरी करीत होता. तो आठवड्याचे पाच दिवस नोकरीच्या गावी राहायचा आणि शनिवार रविवारी 'घरी' यायचा. नातसून सासु-सासर्‍यासोबतच राहत होती. मी म्हटले, पुढच्या पिढीत आईबाप पृथ्वीवर, एक मुलगा अमेरिकेत, दुसरा मंगळावर आणि तिसरा चंद्रावर अशी स्थिती असणार बहुतेक! यावर आम्ही दोघेही हसलो. महिलेच्या चेहर्‍यावर विज्ञादाची छटा उमटलेली दिसली. तिला समजावण्याच्या दृष्टीने मी म्हटले, 'आपण आलटून पालटून एकेकाकडे रहावे, म्हणजे झाले.' यावर ती हसली, मीही हसलो. प्रवासात ही गोष्ट अधून मधून आठवत होती. तिने आपल्या सोबत दोन भल्यामोठय़ा पेट्या घेतल्या होत्या. न्यूयॉर्कला उतरल्यावर त्या दिसल्या. 'एवढे काय घेऊन चाललात?', मी विचारले. 'अहो, न्यावे तेवढे हवेच असते, तरी काही जिन्नस वगळून ठेवले आहेत. ते पुढच्या वेळेस नेणार आहे', ती हसत म्हणाली. मीही हसलो. ती पुढे म्हणाली, 'आपल्याला थोडेच वाहून न्यायचे असते?' बाईला उरक खूप होता. तिच्यासाठी 'व्हील चेअरची' आणि 'सामानासाठी पोर्टरची' अशी व्यवस्था करून ठेवलेली होती.
आपल्या सवयी
या प्रवासात एक विचित्र अनुभव आला. विमानातल्या स्वच्छतागृहांमध्ये पाण्याऐवजी कागदाचा उपयोग करायचा असतो. स्वच्छतागृहात गेलो तर सर्वत्र कागदाचे तुकडे पडलेले दिसले. वापर केल्यानंतर ते कुणीतरी ते तिथेच टाकले होते. सर्वत्र दुर्गंध पसरला होता. मी तसाच बाहेर आलो. काय करावे ते कळेना. रागाची जागा उद्विग्नतेने घेतली. मग विचार करीत बसलो. शेवटी महात्मा गांधी आणि गाडगेबाबांचे स्मरण करून पुन्हा स्वच्छतागृहात गेलो. टिश्यू पेपरचा एक लांबलचक तुकडा फाडला आणि सर्व तुकडे काळजीपूर्वक उचलले आणि त्यांची विल्हेवाट लावली. विमानातून उतरायची वेळ झाली तेव्हा पुन्हा स्वच्छ्तागृहात गेलो तो पुन्हा तोच प्रकार दिसला. कुणाला तरी वापर करण्याचे ज्ञान नव्हते हे लक्षात आले. पुन्हा स्वच्छता केली आणि बाहेर आलो. मग विचार मनात आला की, अस्वच्छता कुणालाच आवडत नसते. हे अज्ञानापोटी होत असले पाहिजे. तसेच स्वच्छतेच्या कल्पना वगवेगळ्या असतात. १९७0 सालची गोष्ट आहे. एका कुटुंबात सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी त्रिकाल स्नानाची प्रथा होती. पण घरातल्या लहानग्याला ते दारापुढे बसवत असत. तसलाच काहीसा हा प्रकार असला पाहिजे. असो.

कस्टमवाले खरे पारखी
जसजशी अमेरिका जवळ येऊ लागली तसतसा विमानाचा वेग ताशी ५00 मैलापेक्षा जास्त होऊन तो आता ताशी ६00 मैल इतका झाला होता. याचा परिणाम असा झाला की आमची फ्लाईट 'बिफोर टाईम' न्यूयॉर्कला पोहोचली. सामानाची किंचितही तपासणी न होता कस्टम क्लिअर्न्‍स मिळाले. त्या लोकांना निर्ढावलेले आणि बावळट यांच्यातला फरक कळत असावा, असे कुणीतरी म्हणताना मी ऐकले. ते न ऐकलेसे करून आम्ही घराकडे कारमधून कूच केले.

वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४0 0२२

Friday, May 16, 2014

My Trip to America 14.05.2014

माझी अमेरिका वारी
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२ 
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हनिया  
दिनांक १३ मी २०१४ ला युनायटेड एअर लाइन्सच्या विमानाने अमेरिकेतील पेन्सिव्हनिया प्रांतातल्या यॉर्क (न्यूयॉर्क नव्हे) या गावी जाण्याचे निश्चित झाले होते. हा निर्णय तसा एक वेगळाच निर्णय होता. ही फ्लाईट कुठेही न थांबता सतत १५ तास उड्डाण करीत नेवार्कला पोचणार होती. ब्रेक जर्नीचा पर्याय होता. पण भाषेची अडचण नको, तसेच काही तास मध्येच कुठेतरी खोळंबून राहण्यापेक्षा सलग १५ तास प्रवासाचा पर्याय निवडला. नागपूर ते पुणे बसने सलग प्रवास करण्याचा अनुभव गाठीशी होता, तसेच २००९ मध्ये असा प्रवास केलेलाही होता. एअर इंडियाने नागपूर ते मुंबई असा प्रवास करून दुपारी ११ चे सुमारास मुंबईच्या डोमेस्टिक एअर पोर्टवर पोचल्यावर पवई येथील श्री विनायक लेले यांच्या गेस्ट हाऊसमध्ये संध्याकाळपर्यंत विश्रांती घेऊन इंटरनॅशनल एअरपोर्टवर क्सीने  दाखल झालो. इथपर्यंत शैलेश आणि संगीता साथ व सोबत म्हणून सोडायला आले होते.
कडक तपासणी
पासपोर्ट व तिकीटाच्या तपासणीचा सोपस्कार आटोपला आणि समान ढकलत आमची स्वारी बोर्डिंग पास मिळविण्यासाठी रांगेत उभी राहिली. सामानावर लावावयाच्या पट्ट्या हाती मिळाल्यावर तपशील भरण्यास सुरवात करतो न करतो तोच एक तरूण अधिकारी समोर येऊन उभा राहिला. कोण कुठले, कोणाकडे ,कशासाठी जाणार यांची चौकशी झाली. सामानात काय काय आहे, हेही विचारले. तुम्हाला आता इथे कुणी भेटले का, असे कुणी भेटल्यास त्याने तुम्हाला काही वस्तू दिल्या का असे विचारून झाल्यानंतर असे झाल्यास कुणाकडूनही कोणतीही वस्तू घेऊ नका, असे त्या अधिकारऱ्याने बजावले. अतिरेक्यांचा उपद्रव सुरु झाल्यापासून विमानतळावर अशाप्रकारची तपासणी सुरु झाली आहे. मला या गोष्टीचे अतिशय समाधान वाटले. पण हे समाधान अल्पकाळ टिकले. ही सर्व तपशीलवार चौकशी झाल्यानंतर बोर्डिग पास मिळाला. ७६ क्रमांकाच्या गेट मधून विमानात असायला जायचे होते. वेळ होता म्हणून इकडे तिकडे भटकायला सुरवात केली.
अनाहूत पाहुणा
एवढ्यात विमानतळावरच्या एका अधिकाऱ्याने एका माणसाला हटकले. त्याच्याजवळ कुठलासा पासपोर्ट होता पण तो तिथे कशासाठी आणि कसा काय आला होता, ते त्याला सांगता येत नव्हते. माणूस ओशाळल्या सारखा वाटत होता. आपण सहजच तिथे आल्याचे तो सांगत होता. अनाहूतपणे कुणीही प्रवेश करू नये म्हणून केलेली भरभक्कम तटबंदी मोडीत काढून ही व्यक्ती तिथपर्यंत पोचलीच कशी यामुळे सगळे हादरले होते. त्याची आणखी चौकशी करण्यासाठी त्याला तिथून नेण्यात आले. मी आपल्या जागी येऊन बसलो. पण पाहिलेल्या प्रसंगामुळे मनात उठलेले काहूर काही केल्या थांबत नव्हते. माझी तीनदा चौकशी व तपासणी झाली होती. ही सर्व प्रकारची व्यवस्था मोडीत काढून ही व्यक्ती आगदी आतपर्यंत पोचावी याचे आश्चर्य वाटत होते. शेवटी एक गोष्ट खरी आहे की, सावापेक्षा चोराची बुद्धी श्रेष्ठ प्रतीची असते. पुढे काय झाले ते कळले नाही. कितीही काळजी घेतली तरी असे प्रकार होणारच हे जाणवले. ‘सदा सावधानतेला’ पर्याय नाही, हे जाणवले. तसेच सुरक्षा व्यवस्थेची नित्य तपासणी करणे आवश्यक असते आणि सुधारणेला वाव असतोच असतो, हेही लक्षात आले.
विमानात बसताबसता पुन्हा एकदा तपासणी झाली पादत्राणेही तपासली गेली. या निमित्ताने त्रास नक्कीच होतो, पण खबरदारीची  आवश्यकताही पटते. मात्र त्या अनाहूत पाहुण्याचा विचार काही मनातून जात नव्हता. विशेष काही नसेलही पण त्याचे तिथे येणे व असणे, ही बाब कडेकोट व्यवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्या यंत्रणेसाठी एक आव्हानच असणार यात शंका नाही.
सगळे तपशील नोंदवले होते
प्रत्येक प्रवाशाच्या खुर्ची समोरच्या खुर्चीच्या पाठीवर  मॉनिटर स्क्रीन होता. त्यावर खेळ खेळता येतात, सर्व प्रकारचे चित्रपट पाहता येतात आणखी खूप काही करता येतं. मला आकर्षण वेगळ्याच गोष्टीचं होतं. विमान  प्रवासाचे सगळे तपशील पाहण्याची सोय होती.
मुंबई ते नेवार्क हे अंतर ८००० मैलान्पेक्षा (किलोमीटर नाही) जास्त आहे. म्हणजे १२,००० किलोमीटरपेक्षा जास्त होतं. विमानाने सर्व सोपस्कार आटोपल्यावर आकाशात झेप घेतली. काही वेळातच ३५,००० फुट उंची गाठली. विमानाबाहेरचे उष्णतामान (नव्हे थंडीचे मान) – (उणे) ५० डिग्री  फॅरेनहाईट होते. म्हणजे – (उणे) १० डिग्री सेंटिग्रेड होते.विमानाचा वेग तशी ५०० मैल होता. किती अंतर कापले किती अंतर राहिले, याचा हिशोब मांडला जात होता.  आम्ही अह्म्दाबाद्व्रून पुढे गेलो. आता पाकिस्तान लागले. मग अफगाणिस्तान, नंतर रशिया दिसू लागला. त्यानंतर नॉर्वे वरून आम्ही उडत चाललो होतो. काळी कुठेतरी डंकर्क असावे. दुसऱ्या महायुद्धात याच ठिकाणी हिटलरच्या फौजांनी इंग्लंडच्या आणि त्यांच्या मित्र  राष्ट्रांच्या फौजांची कोंडी केली होती. सर्व युद्धसामग्री तशीच टाकून सैनिकांना इंग्लंडला परत आणण्यात आले होते. चर्चिलने या माघारीला ‘यशस्वी माघार’ (सक्सेसफुल रिट्रीट) म्हणून संबोधले होते. शास्त्रे काय पुन्हा तयार करता येतील पण एकेक सैनिक लाखमोलाचा होता. सैन्य वाचले होते. पुन्हा शस्त्रे नव्याने तयार करून काही वर्षांच्या तयारीनंतर जनरल आयसेनहोवरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड आणि मित्र राष्ट्रांच्या फौजा नॉर्मंडी बीचवर उतरल्या आणि युद्धाचे पारडे फिरले. माझी नजर नॉर्मंडी बिच्च शोध गेट होती पण आम्ही त्यापासून खूप दुरून उडत चाललो होतो. एवढ्यात हेलसिंकीची नोंद दिसली. आम्ही निम्मे अंतर पार केले होते. आता बाहेरचे  उष्णतामान (थंडीचे मान) – (उणे) एकोणसाठ डिग्री फॅरेनहाईट इतके होते. म्हणजे –उणे १०डिग्री सेंटिग्रेड होते. आम्ही रात्री अकरा वाजता मुंबईहून निघालो होतो. घड्याळात भारतातले सकाळचे सात वाजले होते. म्हणजे अमेरिकेतले रात्रीचे साडेनऊ वाजले असणार. वेळेचा हिशोब सोपा आहे. आपल्या वेळेत अडीच तास मिळवायचे आणि दिवसाची रात्र करायची किंवा रात्रीचा दिवस करायचा. म्हणजे यॉर्कमधली वेळ समजते. आता विमान ३६०० फुटावरून उडत चालले होते. आठ तास उडत होतो, आता आणखी सात तास बाकी होते आणि ४,००० मैल उड्डाण बाकी होते. कुठल्याही कामाचा निम्मा टप्पा पार पडला की उरलेला टप्पा लवकर पार पडतो आहे, असे वाटू लागते. आमचेही तसेच झाले होते. यावरून एक गोष्ट जाणवली. सर्व जगाने सी जी एस(सेंटीमीटर ,ग्रम, सेकंद)  सिस्टी म स्वीकारली अमेरिका मात्र अजून एफ पी एस(फूट,पाउंड, सेकंद) सिस्टीमचाच आग्रह धरून आहे.
काय हवे ते सांगा
प्रवासात खाण्यापिण्याची चंगळ होती. याचे पैसे विमान भाड्याबरोबरच घेतलेले होते. बहुतेक प्रवासी शाकाहारी होते. जेवणात बासमती तांदुळाचा भात फुलकोबीची रस्सा भाजी पालकाची पातळ भाजी, दही, सलाद, बन पाव, असा बेत होता. फ्रुट जूस, चहा , फी पेये अधूनमधून विचारली जात होती. मी लिहिण्य्साठी कागद मागितला. तो मात्र नव्हता. मी शेवटी टिशू पेपरवर मुद्दे नोंदविण्यास सुरवात केली. हवाई सुंदऱ्यांना मी बहुदा दुर्वास ऋषी वाटलो असेन. कारण जवळजवळ प्रत्येकाची फरमाईश त्या पूर्ण करीत होत्या. पण मला मात्र त्यांना ‘व्हेरी सॉरी’ म्हणावे लागले. पण चेहऱ्यावर अपराधी भाव  होता. परत वेळेला जाताना त्यांच्या जवळ नक्की एखादी वही किंवा कोरे कागद असतील, याची खात्री वाटते.
पुढची पिढी कशी असेल
   मुंबईलाच एका वृद्ध महिलेशी थोडेसे बोलणे झाले होते. तिचा मुलगा व सून अमेरिकेत एका गावी राहत होते. पण नातवाला सात तासाच्या अंतरावर (विमान सात तासात तशी ५००मैल वेगाने जाईल तेवढ्या अंतरावर) नोकरी करीत होता. तो आठवड्याचे पाच दिवस नोकरीच्या गावी रहायचा आणि शनिवार रविवारी ‘घरी’ यायचा. नातसून सासुसासऱ्यासोबतच राहत होती.मी म्हटले पुढच्या पिढीत आईबाप पृथ्वीवर, एक मुलगा अमेरिकेत, दुसरा मंगळावर आणि तिसरा चंद्रावर अशी स्थिती असणार बहुतेक!  यावर आम्ही दोघेही हसलो. महिलेच्या चेहऱ्यावर विषादाची छटा उमटलेली दिसली. तिला स्म्ज्वण्याच्या दृष्टीने मी म्हटले, ‘आपण आलटून पालटून एकेकाकडे रहावे’, म्हणजे झाले. यावर ती हसली, मीही हसलो. प्रवासात ही गोष्ट अधून मधून आठवत होती. तिने आपल्या सोबत दोन भल्यामोठ्या पेट्या घेतल्या होत्या. नेवार्कला उतरल्यावर त्या दिसल्या. ‘एवढे काय घेऊन चाललात?’, मी विचारले. ‘अहो, न्यावे तेवढे हवेच असते, तरी काही जिन्नस वगळून ठेवले आहेत. ते पुढच्या वेळेस नेणार आहे’, ती हसत म्हणाली. मीही हसलो. ती पुढे म्हणाली ‘आपल्याला थोडेच वाहून न्यायचे असते?’. बाईला उरक खूप होता. तिच्यासाठी ‘व्हील चेअरची’ आणि ‘सामानासाठी पोर्टरची’ अशी व्यवस्था करून ठेवलेली होती.
आपल्या सवयी
या प्रवासात एक विचित्र अनुभव आला. विमानातल्या स्वच्छ्तागृहांमध्ये पाण्याऐवजी कागदाचा उपयोग करायचा असतो. स्वच्छ्तागृहात गेलो तर सर्वत्र कागदाचे तुकडे पडलेले दिसले. वापर केल्यानंतर ते कुणीतरी ते तिथेच टाकले होते. सर्वत्र दुर्गंध पसरला होता. मी तसाच बाहेर आलो. काय करावे ते कळेना. रागाची जागा उद्विग्नतेने घेतली. मग विचार करीत बसलो. शेवटी महात्मा गांधी आणि गाडगेबाबांचे स्मरण करून पुन्हा स्वच्छ्तागृहात गेलो. टिशू पेपरचा एक लांबलचक तुकडा फाडला आणि सर्व तुकडे काळजीपूर्वक उचलले आणि त्यांची विल्हेवाट लावली. विमानातून उतरायची वेळ झाली तेव्हा पुन्हा स्वच्छ्तागृहात गेलो तो पुन्हा तोच प्रकार दिसला. कुणाला तरी वापर करण्याचे ज्ञान नव्हते हे लक्षात आले. पुन्हा स्वच्छता केली आणि बाहेर आलो. मग विचार मनात आला की, अस्वच्छता कुणालाच आवडत नसते. हे अज्ञानापोटी होत असले पाहिजे. तसेच स्वच्छतेच्या कल्पना वगवेगळ्या असतात. १९७० सालची गोष्ट आहे. एका कुटुंबात सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी त्रिकाल स्नानाची प्रथा होती. पण घरातल्या लहानग्याला ते दारापुढे बसवत असत. तसलाच काहीसा हा प्रकार असला पाहिजे. असो.
कस्टमवाले खरे पारखी

जसजशी अमेरिका जवळ येऊ लागली तसतसा विमानाचा वेग ताशी ५०० मैलापेक्षा जास्त होऊन तो आता ताशी ६०० मैल इतका झाला होता. याचा परिणाम असा झाला की आमची फ्लाईट ‘बिफोर टाईम’ नेवार्कला पोचली. सामानाची किंचितही तपासणी न होता कस्टम क्लिअर्न्स मिळाले. त्या लोकांना निर्ढावलेले आणि बावळट यांच्यातला फरक कळत असावा, असे कुणीतरी म्हणतांना मी ऐकले. ते न ऐकलेसे करून आम्ही घराकडे कारमधून कूच केले.