कर्नाटक आणि २०२३ ची विधानसभेची विनडणूक
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
कर्नाटक हे भारताच्या दक्षिणेकडील चार राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी म्हैसूर राज्य म्हणून झाली व १९७३ मध्ये या राज्याचे नाव कर्नाटक असे बदलण्यात आले. कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ सुमारे 2 लक्ष चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 6 % पेक्षा किंचित कमी आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले ८ वे मोठे राज्य आहे. करनाटकाची आजची लोकसंख्या 7 कोटी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा भारतात ९ वा क्रमांक आहे. कर्नाटक राज्यात २९ जिल्हे आहेत. कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू व तामिळ ह्याही भाषा बोलल्या जातात. कर्नाटक या नावाचे अनेक अर्थ आहेत. करु= उच्च अथवा उत्कर्षित अथवा महान नाडू = भूमी. म्हणजेच उत्कर्षित राज्य. हा त्यांपैकी एकअर्थ. तसेच दुसरा अर्थ: करु= काळा रंग + नाडू= भूमी. म्हणजे काळ्या रंगाच्या मातीचा प्रदेश. तिसरा अर्थ हा आहे की महान भूमी काळी माती महाराष्ट्र व कर्नाटकातील मोठ्या भूभागावर आढळते. कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील भागाला ब्रिटिश कारनॅटिक असे म्हणत. कर्नाटक राज्याचा इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन कर्नाटकात अनेक शक्तिशाली साम्राज्ये होऊन गेली. कर्नाटकाकडून शिल्पकला, संगीत, नृत्य, तत्त्वज्ञान, साहित्य यांची अनमोल परंपरा भारताला मिळाली आहे.
कर्नाटकातील जनतेची धर्मनिहाय विभागणी अशी आहे. हिंदू -84%, मुस्लीम- 13%, ख्रिश्चन-0.8%, जैन- 0.2 %, अन्य - 2%.कर्नाटकात काहा जनजाती आहे, त्या अशा नायक, सोलिगा, येरावा. कर्नाटकात एक भले मोठे कुटुंब आहे. नरसिंगानवर्स हे एकत्र कुटुंब धारवाडमध्ये राहते. ते जगातले सर्वात मोठे एकत्र कुटुंब आहे.
जातीनिहाय विभाजन असेआहे. ओबीसी - 54%, दलित - 17.%, जनजाती(एसटी) - 7%, अन्य सामान्य -8%, अन्य -1% मुस्लीम 13%
उप जातीगट - व्होकलिंग 8%, कुरुबा -5%, नाईकडा - 4%, आदि कर्नाटका 5%,लिंगायत - 5%, ब्राह्मण -4%, मराठा - 3% , बिदर - 3%, गंगाकुला 2%,बंजारा - 2%, उरलेल्या 15 उपजाती प्रत्येकी 1% आहेत. याचा अर्थ असा होतो की, इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकात सोशल इंजिनिअरिंगला कर्नाटकात भरपूर वाव आहे.
2011 सालची 6 कोटी लोकसंख्या गृहीत धरून कर्नाटकातील लोकसंख्येचे विभाजन पुढीलप्रमाणे आहे.
1.अनुसूचित जातीत 108 उपजाती असून संख्या एक कोटी व टक्केवारी 18 आहे.
2. मुस्लिमांमध्ये 84 उपजाती असून संख्या 75 लक्ष व टक्केवारी 12.5 आहे.
3. लिंगायतांमध्ये 10 उपजाती असून संख्या 59 लक्ष व टक्केवारी 9.8 आहे.
4. व्होक्कलिंगांमध्ये 90 उपजाती असून संख्या 49 लक्ष व टक्केवारी 8.16 आहे.
5. कुरुबांमध्ये 0 उपजाती असून संख्या 43 लक्ष व टक्केवारी 7.1 आहे.
6. अनुसूचित जमातींमध्ये 105 उपजाती असून संख्या 42 लक्ष व टक्केवारी 7 आहे.
7. ब्राह्मणांमध्ये 0 उपजाती असून संख्या 13 लक्ष व टक्केवारी 2.1 आहे.
कर्नाटकांतील विविध पक्षातील नेतृत्त्व.
अहिंदची तीनपेडी व्यूव्हरचना- हा (डावपेच) ही सिद्धरामय्या यांची खास खोज मानली जाते. या व्युव्हरचनेमुळेच त्यांना 2013 च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवून दिले होते असे मानतात. 2018 मध्ये सुद्धा हेच तारू काॅंग्रेसला तारेल, असे मानले जाते. पण अहिंद म्हणजे काय? (अ) म्हणजे अल्पसंख्यांक; (हिं) म्हणजे हिंदलीडवारू किंवा मागासवर्गीय; (द) म्हणजे दलित किंवा दलितारू.
अशाप्रकारे कर्नाटकात लिंगायत, व्होकलिंग व अहिंद असे तीन गट मानले जातात. यापैकी कर्नाटकात अहिंद या नावाचा गट नव्याने प्रयत्न करून निर्माण केलेला गट आहे, असे मानतात. याचे श्रेय आज सिद्धरामय्या घेत असले तरी ही मोट मुळात आणीबाणीत श्रीमती इंदिरा गांधींनी बांधली असे मानतात.
करनाटकातील जाती आणि नेते
व्होकलिंग जमीनदार(सेतकरी) जात, एचडी देवेगौडा, डी के शिवकुमार जदसे, कुमारस्वामी
लिंगायत - येदियुरप्पा बसवराज बोम्मई - धोबी, व्यापारी, शेतकरी
कुरबा - सिद्धरामय्या, मेंढपाळ,
अनुसूचित जाती -मल्लिकार्जून खर्गे
मुख्यमंत्री - 20 व्या शतकात एक प्रभावी मुख्यमंत्री आणि त्याच्या नेतृत्वाखाली एकत्र होण्याची मनोवृत्ती बंगाल, ओडिशा, दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तिसगड, आंध्र, उत्तर प्रदेश या सारख्या राज्यात दिसून आली.
कर्नाटक याला अपवाद ठरला आहे. गेल्या 30 वर्षात कर्नाटकात16 मुख्यमंत्री झालेले आपण पाहतो, ते या अपवादामुळेच! गटातटांच्या राजकारणांमुळे ही अस्थिरता कर्नाटकाच्या वाट्याला आली आहे. तरी बरे की, लढत भाजप, काँग्रेस आणि जदसेक्युलर अशी मुख्यत: त्रिकोणी होत असते.राजकीय पक्षांची सगळी कसरत जातीय हितसंबंध जपण्यात आणि एकाला खूश करतांना दुसरा नाराज होणार नाही हे पाहण्यात खर्च होत असते. कुणाचा पापड केव्हा आणि कशाने मोडेल ते सांगता येत नाही,अशी स्थिती असते. जातीय हितसंबंधाचे पारडे विचारधारेवरील निष्ठेपेक्षा नेहमीच जड असते, हा अनुभव कर्नाटक गेली 30 वर्षे घेत आहे.
प्रमुख राजकीय पक्ष - काँग्रेस, जदयु (जनता दल युनायटेड), जदसे (जनता दल सेक्युलर), भाजप (भारतीय जनता पक्ष)
कर्नाटकात लोकसभेच्या 28, राज्यसभेच्या 12, विधानसभेच्या 224, विधान परिषदेच्या 75 जागा आहेत विधानसभेच्या 224 जागंची भौगोलिक विभागवार फोड अशी आहे. एकूण मतदार 5.25 कोटी आहेत.
1) जुन्या मुंबई प्रांताला लागून असलेला कर्नाटकातील भाग - यात 55 जागा येतात. यात लिंगायत समाज बहुसंख्येने आहे. भाजपचे येदियुरप्पा हे लिंगायत समाजाचे एक प्रमुख नेते आहेत. आम्हाला अल्पसंख्यांकांचा दर्जा द्या अशी यांची एक मागणी असते. भारतीय जनता पक्ष 30 ते 35 जागी तर काँग्रेसला 20 ते 25 जागी प्रबळ मानले जातात.
2. तटीय कर्नाटक- तटीय कर्नाटकात 33 जागा आहेत. हा काँग्रेस व भाजपा यापैकी एकाची आळीपाळीने निवड करीत आलेला आहे. बंट हा बहुसंख्य सैनिकी पेशा असलेला समाज आज शेतीकडे वळला आहे.
3. जुन्या हैद्राबाद संस्थानातील कर्नाटकात समाविष्ट झालेला भाग- 45 जागा असलेला हा कॅांग्रेसचा परंपरागत बाले किल्ला आहे. या भागात यावेळी कडवी झुंज पहायला मिळणार आहे. रेड्डी इफेक्ट या भागातच मुख्यत: दिसून येणार आहे. हा धनसंपन्न तेलगू भाषिक समाज भारतीय जनता पक्षच्या बाजूने उभा राहील, अशी चिन्हे आहेत.श्रीरामलू हे शेड्युल्ड कास्ट समाजाचे नेते असून ते वाल्मिकी समाजातील अतिशय लोकप्रिय नेते मानले जातात. भारतीय जनता पक्षने त्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊ केले आहे. या भागात लिंगायत समाजाचे लोकही आहत पण त्यांना अल्पसंख्यांक दर्जाचे आकर्षण वाटत नाही. काही भागात व्होकलिंग समाजाचे लोक बहुसंख्येने असून त्या भागात जेडिएसचे देवेगौडा व त्यांचे चिरंजीव कुमारस्वामी यांचे वर्चस्व दिसते आहे.
4.मध्य कर्नाटक किंवा मालंद विभाग - 28 जागा असलेला चिकमंगलूर, शिमोगा, देवनगिरी, चित्रदुर्ग ही महत्त्वाची जिल्ह्यांची ठाणी असलेला हा भाग तसा कुणाचाच नाही. इथे सरमिसळ आढळते. पण या भागात भारतीय जनता पक्ष आपला जम बसवू लागला आहे, असे त्रयस्थ म्हणू लागले आहेत.
5. बंगलुरु शहर - 28 जागांपैकी दोन जागीच जेडिएसला विजयाची शक्यता दिसत असून भाजपाला 2008 मध्ये 17 व 2013 मध्ये 12 जागी कॅांग्रेसला 10 व 12 जागी विजय मिळाला होता. एस एम कृष्णा हे व्होकलिंग नेते बंगलुरुच्या मोदींच्या सभेत प्रथमच व्यासपीठावर होते. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सिद्धरामय्या यांनी बंगलुरूकडे दुर्लक्ष केलेले आहे. शेवटी शेवटी घाईघाईत त्यांनी रस्त्यांची डागडुजी, मलनिस्सारण व्यवस्था व पाणी पुरवठ्याकडे लक्ष दिले आहे.
6, दक्षिण कर्नाटक किंवा जुने म्हैसूर- यात भरपूर म्हणजे 67 जागा आहेत. हा भाग कॅांग्रेस व जेडिएस चा गड मानला जातो. यावेळी व्होकलिंग समाजाचे लोक काॅंग्रेसवर अतिशय रागावले आहेत. खुद्द सिद्धरामय्यावरही त्यांची तेवढीच नाराजी आहे. त्यामुळे या भागात जेडिएसचा वरचष्मा राहील, असे दिसते. कुरुबास व मुस्लिम मात्र काॅंग्रेसच्या पाठी शी ठामपणे उभे आहेत, असे चित्र आहे. यावेळी शेड्युल्ड कास्टची मते काॅंग्रेस, भाजपा व जेडिएस या तीन पक्षात समप्रमाणात विभागली जातील. सोमनहल्ली मल्लैया (एस एम) कृष्णा हे व्होकलिंग समाजातील व काॅंग्रेस मधीलही ज्येष्ठ नेते 2017 मध्ये भादपामध्ये दाखल झाले आहेत. युपीए 2 मध्ये तरूण रक्ताला वाव देण्याचे निमित्त पुढे करून काॅंग्रेसने त्यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रीपद दिले नाही. त्यांच्याऐवजी सलमान खुर्शिद यांची वर्णी लागली. सलमान हे कृष्णा यांच्यापेक्षा वयाने लहान असले तरी ते तरूण रक्ताचे प्रतिनिधित्त्व करीत नाहीत, हा कृष्णा यांचा आक्षेप होता. कटुता वाढतच गेली व कृष्णा यांनी काॅंग्रेसला रामराम ठोकला व ते भाजपात दाखल झाले. या अगोदरच व्होकलिंग समाजात भारतीय जनता पक्षाने चंचुप्रवेश केल्याच्या वार्ता आल्या आहेत पण अजूनही भाजपाचा प्रभाव आहे, असे मतदारसंघ हातावर मोजता येतील, एवढेच आहेत. असे असले तरी या भागातही मोदींच्या भाषणाला यावेळी अलोट गर्दी पहायला मिळाली. मोदींनी हिंदीतली बोललेली वाक्ये क्रमाने कन्नड भाषेत भाषांतरित करून श्रोत्यांना ऐकविली जात. दोन्ही वेळी मूळ हिंदी वाक्य व लगेचच सादर होणारा कन्नड अनुवाद श्रोते लक्ष देऊन ऐकतांना दिसत होते. हा प्रकार कर्नाटकात अनेक ठिकाणी पहायला मिळाला. सध्याच्या अंदाजानुसार कॅांग्रेसला 25 ते30 जागा, जेडिएसलाही तेवढ्याच जागा मिळतील. भारतीय जनता पक्षाला या भागात 10 ते 12 जागीच विजय संपादन करता येईल, असे दिसते आहे.
2018 व 2013 मध्ये मिळालेल्या व टक्केवारीची तुलना
1. भाजपला 2018 मध्ये 36.35% मते 104 जागा मिळाल्या
2013 च्या तुलनेत मतांमध्ये16.3% वाढ झाली. 64 जागा जास्त मिळाल्या.
2.कॅांग्रेसला 2018 मध्ये 38.14 % मते 80 जागा मिळाल्या.
2013 च्या तुलनेत मतांमध्ये1.4% वाढ झाली. पण 42 जागा कमी मिळाल्या.
3. जदसेला 2018 मध्ये 18.3 % मते 37 जागा मिळाल्या.
2013 च्या तुलनेत मतांमध्ये 1.9 % तूट झाली. 3 जागा कमी मिळाल्या.
4. अपक्षांना 2018 मध्ये 3.9 % मते व 1जागा मिळाली.
2013 च्या तुलनेत मतांमध्ये 3.5 % तूट झाली. 8 जागा कमी मिळाल्या.
5 अन्य पक्षांना 2 जागा मिळाल्या.(बसप1व कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1)
येत्या मार्चमध्ये कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकी आहेत. भाजप २/३ वर्षांच्या नाराजीसह (अॅंटिइन्कम्बन्सी) निवडणुकीला सामोरा जातो आहे. २०१३ व २०१८ च्या निडणुकीतील मतांची टक्केवारी मिळालेल्या, जागा, समाजातील जातीय विभाजन, पक्षांचे नेते यांची माहिती माहीत असेल तर यावेळी निकाल कसे लागू शकतात, या विषयी अंदाज बांधता येतील, या अपेक्षेने केलेला हा लेखनप्रपंच!
No comments:
Post a Comment