Friday, November 25, 2016


निवडणुकीनंतरची अमेरिका - वसंत गणेश काणे 
आपल्या देशात विविध खात्यांचे मंत्री असतात तर अमेरिकेत सेक्रेटरी असतात. अमेरिकन राष्ट्रपती निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना निरनिराळ्या विभागांचे सेक्रेटरी म्हणून नेमत असतो. कोणत्या पदावर कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली आहे, हे पाहून त्या विभागाचा भावी कारभार कसा चालणार याची कल्पना करता येते. अमेरिकेत आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर सत्ताबदल झाला आहे. ‘नवी विटी, नवे राज्य’, अस्तित्त्वात येत आहे. दोन्ही सभागृहे व व खुद्द राष्ट्राध्यक्ष असा तिहेरी बदल एका पक्षाच्या - रिपब्लिकन पक्षाच्या-  बाजूने झाला आहे. त्यावरून बदलणाऱ्या भावी धोरणांची चाहूल लागू शकते, निदानपक्षी अंदाज तरी नक्कीच बांधता येतो.
सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी- अल्बामातील सिनेटर माईक पाॅंपिओ यांची स्थलांतरांबद्दल कठोर भूमिका असून त्यांच्यावर ते वर्णद्वेशी असल्याचा आक्षेप आहे. त्यांनी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. इराण हा दहशवादाला पाठिंबा देणारा देश असून इराण बरोबर झालेल्या करार रद्द करावा, असे त्यांचे मत आहे. अमेरिकेत ३० लाख लोक बेकायदा प्रवेश करून राहत आहेत. त्यांना शोधून त्या त्या देशात पाठविण्याची भूमिका निदान जाहीर तरी झाली आहे. ही शोधमोहीम अभूतपूर्व अशी राहील. या त अनधिकृत रीत्या वास्तव्य करणारे गोरे शोधणे कठीण आहे तर रीतसर स्थायिक झालेल्या अश्वेतवर्णीयांनाही त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आफ्रिकन अमेरिकन तर विनाकारणच भरडले जातील. ते तर अमेरिकेचे रीतसर नागरिक आहेत.
सेक्रेटरी आॅफ डिफेन्स- सेवानिवृत्त नाविक जनरल जोम्स मॅटिस यांना सेक्रेटरी आॅफ डिफेन्सपदावर नेमून अनेक दशकांपासून सुरू असलेली प्रथा डोनाल्ड ट्रंप यांनी मोडीत काढली आहे. एक कडवा सेनानी अशी त्यांची ख्याती आहे. याचा परिणाम म्हणून परदेशात लढणाऱ्या अमेरिकन फौजा अधिक कडक धोरण स्वीकारू शकतात.
ब्रिटनचा अमेरिकेतील वकील - एका विशिष्ट व्यक्तीची ब्रिटनने अमेरिकेत आपला वकील म्हणून नेमणूक करावी, अशी अजब व शिष्टाचाराला व आंतरराष्ट्रीय संकेताना सोडून असलेली सूचना डोनाल्ड ट्रंप यांनी करावी, याबद्दल जगभर आश्चर्य व्यक्त होत आहे.
अटर्नी जनरल- अल्बामातील सिनेटर  जेफ सेशन्स यांची मुस्लिमांबद्दल कठोर भूमिका असून त्यांच्यावर ते अमेरिकेत मुस्लिमांच्या स्थलांतराबाबत टोकाची भूमिका बाळगून आहेत. आता क्लिंटन फाऊंडेशनला वाईट दिवस येणार असे बोलले जाऊ लागले आहे. पण इमेल्सचे प्रकरण फार ताणले जाणार नाही, तसेच क्लिंटन फाऊंडेशनबाबतही असेच संकेत आहेत. दरम्यान ईमेल्सबाबत व क्लिंटन फाऊंडेशनच्या व्यवहारातील अनियमितता संबंधितांनी मान्य केली आहे.
अर्थात सर्व नियुक्त्या जेव्हा जाहीर होतील तेव्हाच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नीतीबद्दल सगळे अंदाज बांधता येतील.
आंतरराष्ट्रीय राजकारण - 
जपानचे पंतप्रधान अबे व डोनाल्ड ट्रंप यांची भेट- जपानचे पंतप्रधान पेरू देशाच्या दौऱ्यावर असतांना ‘ब्रेक जर्नी’ करून न्यू याॅर्कला उतरतात आणि नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची अनौपचारिक भेट घेणारे जागतिक कीर्तीचे पहिले राजकारणी ठरतात, याला महत्त्व आहे. डोनाल्ड ट्रंप हे राज्यशकट हाकण्यासाठी आपल्या चमूची जमवाजमव करीत असतांनाच ही भेट घडून आली आहे. त्यामुळे ही भेट तशी अनौपचारिकच असणार हे उघड आहे. जपानने स्वत: अण्वस्त्रासकट सर्वच बाबतीत शस्त्रसज्ज होऊन आपल्या सुरक्षेची तजवीज करावी, असे डोनाल्ड ट्रंप हे आपल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हणत होते. प्रचारादरम्यान केलेली विधाने फारशी गंभीरपणे घ्यायची नसतात, हे आता अमेरिकेतही गृहीतच धरले जाते. ही भेट अनौपचारिक असली तरी मैत्रीपूर्ण स्वरूापासह ती परस्पर विश्वास वाढवणारी ठरली, हे जपानच्या अध्यक्षांचे विधान खरेच मानावयाला हवे. जपानने शस्त्रे (अण्वस्त्रासकट) तयार करू नयेत व बाळगू नयेत, ही अट दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जपानची शरणागती मान्य करतांना इंग्लंड अमेरिकादी देशांनी जपानवर लादली होती. जपानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली होती. या साठी जी शिबंदी तैनात करावी लागेल, तिच्या खर्चापोटी  जी रकम लागेल, तो खर्च जपाननेच सोसला पाहिजे, असे काहीसे या. कराराचे स्वरूप होते. सर्व अटींचे पालन करीत जपानने आपले लक्ष युद्धाच्या जखमा भरून काढण्यावर व अन्य प्रगतीपर बाबींवर केंद्रित करून प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. आता डोनाल्ड ट्रंप यांना जपान व दक्षिण कोरिया यांनी संरक्षणविषयक सर्व जबाबदारी स्वत: शस्त्रसज्ज होऊन उचलावी किंवा त्यासाठी होणऱ्या खर्चाचा भार उचलावावा, असे म्हणण्याचे तसे पाहिले तर कारण नव्हते. खर्चापोटी होणारी रकम जपान व दक्षिण कोरिया सुरवातीपासूनच ठल्याप्रमाणे अमेरिकेला देत आहेत. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे हे जपानने शस्त्रसज्ज व्हावे, या मताचे आहेत. जपानचे सम्राट अकिहिटो हे वयोनिवृत्ती घेण्याचा विचार करीत असले असे वृत्त असले तरी जपानने शस्त्रसज्ज व्हावे हे मत त्यांना मान्य नाही, असे म्हणतात.
मर्केल ओबामा भेट - अध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रंप यांच्या स्वाधीन करून पायउतार होण्यापूर्वी अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी युरोपचा दौरा करून अमेरिकेतील नवीन राजवट व युरोपीय देश यातील मैत्रीचे संबंध तसेच कायम रहावेत, यासाठी प्रयत्न केलेला दिसतो. बर्लिनला उतरल्यावर लगेच बराक ओबामा यांनी जर्मन चान्सेलर ॲंजेला मर्केल यांच्यासोबत तीन तास स्नेहभोजनाचा (थ्री अवर कोसी डिनर) आस्वाद घेतला तर ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांना बराक ओबामा यांनी ओझरतीच भेट घेऊन कटवले. ओबामा राजवटीत ब्रिटन अमेरिका संबंध बेतासबेतच (स्क्रॅची) होते. ब्रिटनने युरोपियन युनीयन मधून बाहेर पडावे किंवा कसे याबाबत ब्रिटनमध्ये सार्वमत घेतले जात असतांना  आंतरराष्ट्रीय संकेतानुसार बराक ओबामा यांनी याविषयी न बोलणे अपेक्षित असतांना बराक ओबामा यांनी, असा विचार करताच कसा, असे म्हणत ब्रिटनला खडसावले होते. युरोपियन युनीयनमधून बाहेर पडाल तर ब्रिटन अमेरिकन व्यापार संबंधांचे बाबतीतही ब्रिटन पार मागे फेकले जाईल, असा अनाहुत इशाराही त्यांनी ब्रिटनला दिला होता. या सल्ल्याचा नेमका उलट परिणाम झाला व ५२ टक्के ब्रिटिश जनतेने  युरोपियन युनीयनमधून बाहेर पडण्याचा कौल दिला. आता या निर्णयाला ब्रिटिश पार्लमेंटचीही संमती पाहिजे, असे ब्रिटिश न्यायालयाने खडसावले असले तरी ती एक औपचारिकताच आहे, असेच मानले जाते. त्यामुळे युरोपियन युनीयनमधून बाहेरची वाट धरलेल्या ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांचेशी तोंडदेखले बोलणेच ओबामा यांना पुरेसे वाटले असावे. ही ओझरती भेट व नंतर जर्मन आतिथ्याचा बर्लिन येथील ॲडलाॅन होटेल मधील भोजनाचा मात्र पुरेपूर आस्वाद घेतल्यानंतर लगेचच ओबामांची युरोपियन देशांच्या निवडक राष्ट्रप्रमुखांसोबतची लघुशिखर परिषद (मिनी समिट) संपन्न  झाली. ब्रिटनच्या बाहेर पडण्याचे परिणाम, युरोपियन युनीयनची मंद आर्थिक चाल, अमेरिकेतील अति उजव्याचा ( फार-राईट) राजवटीचा डोनाल्ड ट्रंप यांच्या विजयामुळे झालेला उदय यावर परिषदेत चर्चा झाली असावी, असे राजकीय भाष्यकारांचे मत आहे.
जुळवून घ्या - स्पेनचे पंतप्रधान मारियानो रॅजाॅय, इटालीचे पंतप्रधान मॅटिओ रेंझी व फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्काॅइस होलंड यांना विनंतीवजा आर्जव करून त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी जुळवून घेण्याचा आग्रह केला. देशहितासाठी पक्षभेद बाजूस सारून प्रतिपक्षी व स्पर्धक डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी रदबदली करण्याचे परिपक्व राजनीतीतच आढळणारे हे एक महत्त्वाचे उदाहरण ठरावे.
गोलमेज परिषद - जर्मन चान्सेलर ॲंजेला मर्केल यांनी आयोजित केलेली ही लघु गोलमेज परिषद वार्ताहरांना मुखदर्शन देऊन झाल्यावर व कॅमेऱ्यांचे क्लिकक्लिकाट आटोपल्यानंतर सुरू झाली. सीरिया व पूर्व युक्रेन यावरच विशेषेकरून चर्चा झाली. सीरियात होत असलेला नरसंहार, त्यातही अलेप्पो शहरातील मानवी हक्कांचे पायदळी तुडविले जाणे बघता सीरिया समर्थक इराण व रशिया यांनी हवाई हल्ले व तोफखान्यातून आग ओकणे ताबडतोब थांबविले जावेत, अशी मागणी एकमुखाने परिषदेने केली. रशियावर घातलेली बंधने तो देश जोपर्यंत संघर्षविरामाला मान्यता देत नाही, तोपर्यंत तशीच कायम रहावीत, यावर परिषदेत एकवाक्यता झाली. अमेरिकेच्या मावळत्या अध्यक्षाने हे घडवून आणण्याला एक वेगळे महत्त्व आहे. कारण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रंप यांनी या प्रकरणात अमेरिकेने पडू नये, अशी भूमिका घेतली होती. जगातील प्रत्येक प्रकरणी नाक खुपसून अमेरिकेने यापुढे लष्करच्या भाकरी भाजू नयेत, अशी डोनाल्ड ट्रंप यांची भूमिका त्यांनी वारंवार बोलून दाखविली होती. आता डोनाल्ड ट्रंप यांना गोलमेल परिषदेतील या वचननाम्याची भीड पडते किंवा कसे, ते काळच दाखवील.
ब्रेक्झिट -  ब्रिनच्या ब्रेक्झिटचेही डोनाल्ड ट्रंप यांनी स्वागत केले होते. हा सर्व प्रकार अमेरिकेच्या युरोपबाबतच्या धोरणात यू टर्न सुचवतात. ‘म्हणूनच जुळवून घ्या’, अशी विनंती त्यांनी गोलमेज परिषदेत केली असावी. सीरिया व युक्रेन हे विषय तर आहेतच. त्याचबरोबर नाटोच्या (नाॅर्थ अटलांटिक ट्रिटी आॅर्गनायझेशन) दृढीकरणाची आवश्यकता, रशियाची नव्याने सुरू झालेली गुरगुर पाहता, वाढली आहे. व्यापार व हवामान बदल याबाबतही चर्चा झाली. या सर्व बाबतीत डोनाल्ड ट्रंप यांची भूमिका अगदी उलट आहे. या दोन परस्परविरोधी भूमिका राजकीय क्षितिजावर फार मोठ्या समस्या निर्माण करू शकतील.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील दाखला - अमेरिकेतील मुस्लिमांची नोंदणी एका स्वतंत्र नोंदवहीत करण्याचा डोनाल्ड ट्रंप यांचा मनोदय आहे. या वार्तेने अमेरिकेत व अमेरिकेबाहेरही वादळे उठली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रेसिडेंट रुझवेल्ट यांनी राष्ट्रहितासाठी जवळजवळ दीड लाख जपानी वंशाच्या लोकांना स्थानबद्ध केले होतेच ना? त्यापैकी ६२ टक्के लोक तर अमेरिकेचे नागरिक होते ना?  असा प्रश्न डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या योजनेचे समर्थन करतांना समोर मांडला आहे. या छावण्या १९४६ पर्यंत म्हणजे दुसरे महायुद्ध संपेपर्यंत अस्तित्वात होत्या. पण अध्यक्षांना मिळालेला हा सल्ला चुकीचा होता, असे आज मानले जाते. नागरी हक्कांच्या हननाचे हे अमेरिकेच्या इतिहासातील फार मोठे उदाहरण मानले जाते. तसेच पर्ल हार्बरवर जपानने बेसावध अमेरिकेवर केलेल्या धोकेबाज व गनिमी हल्ल्यामुळे अमेरिकेत उसळलेल्या जनक्षोभाची पार्श्वभूमी या अटकेला होती. पण मग ट्वीन टाॅवरच्या विध्वंसाची पार्श्वभूमी व अन्य छुपे हल्ले यावेळी पुरेसे नाहीत का? असा प्रतिप्रश्न निर्माण होतो. ते काहीही असो, पण त्यातल्यात्यात समाधानाची बाब ही की आजवर तरी मुस्लिमांबाबत डोनाल्ड ट्रंप यांनी एकही शब्द उच्चारलेला दिसत नाही.
अमेरिका  व चीन- हिलरी क्लिंटन या चीनच्या कठोर टीकाकार होत्या. ही टीका मुख्यत: दोन मुद्याबाबत असे. पहिला मुद्दा हा होता की, चीनमध्ये मानवी हक्कांचे हनन होत आहे. दुसरा मुद्दा असा की, दक्षिण चिनी समुद्रातील अमेरिकेच्या हितसंबंधांना चीनमुळे बाधा पोचते आहे. या दोन कारणास्तव हिलरी क्लिंटन यांच्याबाबत चिनी राज्यकर्त्यांचे मत प्रतिकूल होते. 
चिनी मालाने अमेरिकेचीही बाजारपेठ काबीज केली आहे. या मालावर आपण जबरदस्त कर लावू अशी घोषणा डोनाल्ड ट्रंप यांनी केली होती. याबाबत चिनी प्रतिक्रिया अशी आहे की, दोन्ही राष्ट्रांचे हितसंबंध परस्परात गुंतलेले आहेत. त्यामुळे ह्या संबंधासाठी डोनाल्ड ट्रंप यांच्यासारखा उद्योजक व व्यवहारी नेता अमेरिकेचा प्रमुख असणे आम्हाला अधिक सोयीचे आहे. टोकाची भूमिका उभयपक्षी सारखीच त्रासदायक ठरेल, असा चीनचा अमेरिकेला इशारा आहे.
रिचर्ड निक्सन हे रिपब्लिकन पक्षाचे नेते अमेरिकेचे अध्यक्ष असतांनाच अमेरिका व चीन यात जवळीक निर्माण झाली होती. डोनाल्ड ट्रंप हे सुद्धा रिपब्लिकन पक्षाचेच अध्यक्षीय उमेदवार होते, याची आठवण चिनी नेत्यांनी करून दिली आहे.
भारत व अमेरिका -  सागर चोरडिया, अतुल चोरडिया व कमलेश मेहता हे उद्योजक व डोनाल्ड ट्रंप यांच्यात औद्योगिक संबंध आहेत. त्यांच्या मते डोनाल्ड ट्रंप हे नरेंद्र मोदींचे चाहते आहेत.
निकाल जाहीर होताच टेक्सास राज्यातील विद्यापीठातील गोऱ्यांनी सर्व परदेशी विद्यार्थ्यांना देश सोडून जावे, अशा घोषणा दिल्या. या राज्यात परदेशातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यातील  ३० टक्के विद्यार्थी  भारतीय आहेत. ही लाट थोड्याफार प्रमाणात देशभर आहे. पण यातील महत्त्वाचा भाग हा आहे की, असे प्रत्यक्षात झाले तर यामुळे अमेरिकन विद्यापीठांचे फार मोठे आर्थिक नुकसान होईल. ही गरज एकतर्फी नाही. अमेरिकेला शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून बराच पैसा स्थानिक स्तरावरील लहानमोठ्या उद्योजकांनाही मिळतो. अमेरिकन विद्यापीठांच्या अंदाजपत्रकातील जमेची बाजू हे विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात सावरून धरीत असतात, याचा विचार नवीन राजवटीला करावाच लागेल.
आऊटसोर्सिंग -  अमेरिकेतील संगणकीय कामे बाहेर देशातून कमी पैशात करून घेतल्यामुळे स्थानिक मनुष्यबळावर अन्याय होतो, म्हणून हा प्रकार बंद करणार, अशी निवडणूक प्रचारादरम्यानची डोनाल्ड ट्रंप यांची भूमिका होती. हा प्रश्नही वाटतो तितका साधा व सोपा नाही. एक असे की, यामुळे अमेरिकन उद्योजकांचा पैसा वाचत असल्यामुळे ते आऊट सोर्सिंग बंद करण्याच्या बाजूचे नाही. दुसरे असे की, अमेरिकेत जेव्हा दिवस असतो, ते व्हा भारतासारख्या देशात रात्र असते. यामुळे मेडिकल ट्रान्सक्रिप्शन सारखी कामे या बाहेरच्या देशातून करून घेणेच सोयीचे आहे. उदाहरणार्थ डाॅक्टर रोग्याला तपासतो तेव्हा रोगाचे निदान व ओषधोपचार याबाबत लघु व सांकेतिक भाषेत उपचार नोंदवतो. हा रिपोर्ट रातोरात भारतासारख्या देशात पाठविला जातो. येथील संगणकीय तंत्रकुशल मनुष्य बळ त्याचे विस्तृत स्वरूपात व वैद्यकीय परिभाषेत रुपांतर करून ते अमेरिकेत दुसऱ्या दिवशी उजेडी परत पाठवते. दुसऱ्या दिवशी डाॅक्टर व अन्य लोकांसमोर विस्तृत स्वरूपात हा रिपोर्ट ठेवला जातो, असे काहीसे या प्रकाराचे वर्णन करता येईल. हे आऊट सोर्सिंग निदान आजतरी उभयपक्षी सोयीचे आहे. तसेच हा किंवा यासारखे अन्य विषय स्थानिक पातळीवर याच दराने एवढ्याच कालमर्यादेत साध्य करून घेता आले, तर त्याला अमेरिका आता प्राधान्य देणार, हे उघड आहे. त्यासाठी इतरांनीही तयार असले पाहिजे, हे ओघानेच आले. पण त्याचबरोबर जे मनुष्यबळ (भारतीय किंवा अन्य) अमेरिकेत रोजगार निर्माण करीत आहे, त्याची मायदेशी रवानगी करणे अमेरिकेतील कोणत्याही राजवटीला परवडण्यासारखे नाही.
ग्लोबल वाॅर्मिंग - जागतिक उष्णतामान सतत वाढत आहे. डोनाल्ड ट्रंप यांना ही  बाब सर्व चुकीची वा खोटी हाकाटी आहे, असे वाटते आहे. हा चीनचा डाव किंवा बनाव आहे, असाही त्यांना संशय आहे. सी पी पी (क्लीन पाॅवर प्लॅन) ही योजना रद्द करण्याची डोनाल्ड ट्रंप यांची घोषणा होती. इंटरनॅशनल पॅरिस क्लायमेट ॲग्रीमेंट मधून अंग काढून घेऊ असेही ते म्हणत होते. ही निवडणूक प्रचारदरम्यानची भूमिका होती. आता याबाबत काय होते ते यथावकाश दिसेल. या ॲग्रीमेंटमधून बाहेर पडण्याची भूमिका डोनाल्ड ट्रंप घेत आहेत, असे वृत्त आहे. हा निर्णय अमेरिकेसाठी तात्पुरता सोयीचा पण जगासाठी हानीकारक व दुर्दैवी ठरेल.
पण एक बाब इतरांनीही समजून घेतली पाहिजे. डेमोक्रॅट पक्ष व रिपब्लिकन पक्ष हे दोन वेगळे राजकीय पक्ष आहेत. काही बाबतीत त्यांची मते सारखी असली तरी याच किंवा इतर बाबतीत कधी किरकोळ स्तरावर तर काही बाबतीत आमूलाग्र स्वरूपाची व वेगळी भूमिका या दोन पक्षांची असणारच. विशेषत: स्थलांतर, व्यापार, कायदा व सुव्यवस्था, दहशतवाद या सारख्या विषयांबाबतची अमेरिकेची धोरणे डोनाल्ड ट्रंप यांच्या राजवटीत देशहिताला प्राधान्य देऊनच आखली जातील. तशी ती आखली जावीत, हेही तर्काला धरूनच आहे. ग्लोबल व्हिलेजच्या दिशेने मानवाचा प्रवास सुरू असला तरी राष्ट्रवादाची ओढ सहजासहजी कमी व्हायची नाही. या दिशेने जगाचा सुरू असलेला प्रवास दोन पावले पुढे व एक पाऊल मागे या पंढरपुरी वारी पद्धतीनेच येती काही वर्षेतरी चालेल, असे दिसते.
इस्लामिक बॅंक व इस्लामिक विंडो
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
 इस्लामिक बॅंकिंगमध्ये दोन महत्त्वाची तत्त्वे आहेत. पहिले तत्त्व नफा व तोट्याच्या वाटपाशी संबंधित असून दुसरे तत्त्व व्याज देण्याघेण्याच्या बंदी संबंधातले आहे. रुणकोने व्याज देणे व धनकोने व्याज घेणे इस्लामला मान्य नाही.
 रिझर्व्ह बॅंकेचा प्रस्ताव - रिझर्व्ह बॅंकेने देशातील प्रत्येक बॅंकेत एक इस्लामिक खिडकी असावी, व मुस्लिमांना त्या बॅंकेत पैसे ठेवता यावेत व हा आर्थिक व्यवहार मुस्लिम परसनल लाॅ नुसार चालावा, अशा आशयाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आपल्या अनुकूल शिफारसीसह पाठवला आहे. याबद्द्ल अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी ही संकल्पना काय आहे व प्रेषित महंमद पैगंबर साहेबांनी याबाबत काय म्हटले आहे, हे समजून घेणे उपयोगाचे ठरणार आहे. 
 दोन प्रमुख बंधने - यात दोन महत्त्वाची तत्त्वे आहेत. पहिले नफा व तोट्याच्या वाटपाशी संबंधित असून दुसरे व्याज देण्याघेण्याच्या बंदी संबंधातले आहे. रुणकोने व्याज देणे व धनकोने व्याज घेणे इस्लामला मान्य नाही. तसेच दारू, जुगार व डुकराचे मास याबाबतीतले आर्थिक व्यवहार व गुंतवणुकी इस्लामला मान्य नाहीत. त्यावर बंदी आहे.
 शरीयत हा आधार -  इस्लामिक बॅंक शरीयत कायद्यानुसार चालते. हा कायदा कुराण व हदिद वर आधारित आहे. एखादा नवीन मुद्दा उपस्थित झाला किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता निर्माण झाली तर एकतर विद्वान मंडळींचा सल्ला तरी घेतला जातो किंवा कुराणातील तत्त्वांना किंवा रीतीरिवाजांना अनुसरून स्वतंत्र तर्क करून तो निकालात काढला जातो.
पूर्वेतिहास - इस्लामिक बॅंकिंगचा प्रारंभ सातव्या शतकात म्हणजे इस्लामच्या जन्माबरोबरच झाला आहे. प्रेषित महंमद पैगंबर साहेबांची पहिली पत्नी खादिजा ही व्यापारी होती आणि प्रेषित महंमद पैगंबर साहेब तिचे एजंट म्हणून काम पाहत असत. या व्यवहारात जी तत्त्वे अनुसरली जात ती  बहुतेक सर्व इस्लामिक बॅंकिंगची तत्त्वे  आहेत.
 तत्त्वांचे अनुसरण -  मध्यंतरीच्या काळात मुस्लिम जगतातील व्यापार व व्यवसाय करतांना इस्लामिक तत्वे अनुसरली जात. या संकल्पना पुढे हळूहळू स्पेन,भूमध्य समुद्राशी संलग्न प्रदेशात तसेच बाल्टिक राज्यात प्रसारित झाली. १९६० व १९७० या कालखंडाच्या दरम्यान इस्लामिक बॅंकिंगची कल्पना आधुनिक जगतात पुन्हा उदयाला आली. आजचे बॅंकिंग पाश्चात्यांच्या बॅंकिंगच्या तत्त्वांनुसार असून त्याला इस्लामिक बॅंकिंगचाच आधार आहे, असे मानतात.
 बॅंक चालते कशी? -  व्याज न आकारता या बॅंका पैसा कसा मिळवतात? या तत्त्वाला ‘इक्विटी पार्टिसिपेशन सिस्टीम्स’, असे नाव आहे. समजा या बॅंकेने एखाद्या उद्योगाला कर्ज दिले तर तो उद्योग ते कर्ज व्याज न देता परत करतो, पण असे करत असतांना तो उद्योग बॅंकेला आपल्या नफ्यात भागीदार करतो. म्हणजेच नफ्यातला काही हिस्सा बॅंकेला देतो. जर उद्योगात नफा झाला नाही तर बॅंकेलाही नफ्याचा हिस्सा मिळत नाही. 
 मध्यंतरीच्या काळात मुस्लिम जगतातील व्यापार व व्यवसाय करतांना इस्लामिक तत्वे अनुसरली जात.या संकल्पना पुढे हळूहळू स्पेन, भूमध्य समुद्राशी संलग्न प्रदेशात तसेच बाल्टिक राज्यात प्रसारित झाली. १९६० व १९७० या कालखंडाच्या दरम्यान इस्लामिक बॅंकिंगची कल्पना आधुनिक जगतात पुन्हा उदयाला आली. आजचे बॅंकिंग पाश्चात्यांच्या बॅंकिंगच्या तत्त्वांनुसार असून त्याला इस्लामिक बॅंकिंगचाच आधार आहे, असे मानतात.
इस्लामिक विंडो एक वेगळी कल्पना - इस्लामिक बॅंकेप्रमाणे इस्लामिक विंडो(खिडकी) अशी वेगळी कल्पना आहे. इस्लामिक बॅंक इस्लामिक बॅंकिंग तत्त्वांचे तंतोतंत पालन करते. जेव्हा सर्वसामान्य बॅंका इस्लामिक तत्त्वांना अनुसरून सेवा पुरविते, तेव्हा तिला इस्लामिक विंडोद्वारे पुरविलेली सेवा असे म्हणतात. 
  ओमानमध्ये  निझ्वा बॅंक व अल इझ इस्लामिक बॅंक अशा दोन इस्लामिक बॅंका आहेत. पण सहा व्यापारी बॅंका असून त्या इस्लामिक बॅंकिंग सेवा इस्लामिक विंडोद्वारे देत असतात.
  १९६३ मध्ये इजिप्तमध्ये इस्लामिक बॅंक उभारली गेली. तिने नफ्यातील हिस्सेवारीच्या तत्त्वाला अनुसरून उद्योगांना कर्ज दिले. जोखीम कमी व्हावी म्हणून मागितलेल्या कर्जाच्या ४० टक्के इतकेच कर्ज दिले. बुडिताचे प्रमाण शून्य होते.
भारतात काही आधुनिक मुस्लिम व्यापारी बॅंकेत पैसे ठेवतात हे सोडले तर बाकीचे आपला पैसा स्वत:जवळच ठेवतात, असे मानतात. हा पैसा देशाच्या मुख्य आर्थिक प्रवाहात यावा व अनुदानादी रकमा त्यांच्या खात्यावर जमा करता याव्यात, असा उद्देश समोर ठेवून रिझर्व्ह बॅंकेने ही योजना केंद्र  शासनाकडे शिफारसीसह पाठविली असावी.
प्रतिसाद - अनेक मुस्लिम नेत्यांनी या योजनेचे स्वागत केले असून शिवसेनेच्या खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी स्वागत करता करता मुसलमानांना ‘बेवकूफ’ बनविण्याची ही चाल तर नाहीना, अशी संका व्यक्त केली आहे. इस्लामिक बॅंक व इस्लामिक विंडो यांची सर्वसाधारण माहिती वाचकांना असावी, एवढाच मर्यादित हेतू समोर ठेवून हा लेख लिहिला आहे.

Sunday, November 20, 2016


घड्याळाचे उलटे फिरलेले काटे व अमेरिका
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 




 खाउजाची म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाची लाट जगभर पसरलेली असतांना किंवा पसरत असतांना रशियात राष्ट्रवाद उफाळून यावा हा नियतेने घेतलेला सूडच म्हणावा लागेल. जगातील कामगारांनो, एक व्हा, अशी साद ज्या रशियातून घातली गेली होती त्या सोव्हिएट रशियातील एकेक सोव्हिएट (प्रांत) वेगळा झाला, होऊ दिला गेला किंवा त्याचे वेगळे होणे थांबवले गेले.  शब्द कोणतेही वापरले तरी पोपट मेल्याचे जगाला कळले. राष्ट्रवादाची कास रशियाने स्वीकारली. हे खरेतर  दुसऱ्यांदा घडले आहे. 
  दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने जेव्हा रशियात खोलवर मुसंडी मारली होती, तेव्हा ‘जगातील कामगारांच्या मुक्तीसाठी लढा’, हा नारा उुपयोगी पडणार नाही, हे स्टॅलीनने वेळीच ओळखले व त्याला स्मरण झाले, ‘पिटर दी ग्रेट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रपुरुषाचे! यांचे स्मरण रशियन जनतेला करून देऊन, त्याच्या स्मृती जागवून रशियाने आपल्या नागरिकांना साद घातली व युद्धात अहमहमिकेने लढण्यास प्रवृत्त केले. मास्को येथे ९ जून १६७२ मध्ये जन्मलेल्या या रशियन झारने (रशियात १७ व्या शतकापर्यंत राज्यकर्त्याला झार म्हणत) रशियाला जगातील एका मोठ्या राजसत्तेचा मान मिळवून दिला होता. शस्त्रदले, शिक्षण व प्रशासन यात आमूलाग्र बदल तर या थोर पुरुषाने घडवून आणलेच पण धर्ममार्तंडांच्या कर्मकांडांपासूनही जनतेची सुटका केली.
 ब्रेग्झिट हे आणखी एक उदाहरण समोर आहे. ब्रिटनने युरोपियन युनीयन मधून बाहेर पडण्याचा निर्णय जून २००६ ला सार्वमत घेऊन ५२ टक्यांच्या मताधिक्याने घेतला आहे. ब्रिटिश एक्झिट या शब्दप्रयोगाचे  ब्रेक्झिट हे लघुरूप आहे.
या दोन उदाहरणांचा दाखला आता कशाला? ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेत सत्तांतर घडून आले. हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला, डोनाल्ड ट्रंप निवडून आले. या बदलासाठीची जी अनेक कारणे संभवतात आणि तशी ती आहेतही, त्यातले एक कारण लक्षात घ्यावे, असे आहे. जागतिक राजकारण गेलं चुलीत प्रथम घराकडे पहा, हा डोनाल्ड ट्रंप यांचा नारा त्यांना निवडणुकीत प्रामुख्याने  तारता झाला, असे म्हटले व मानले जाते. ही अमेरिकन राष्ट्रवादाला घातलेली साद होती व तिला अमेरिकन जनतेने प्रतिसाद देऊन त्यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली. पण या निमित्ताने वाद विसंवादही निर्माण झाले आहेत, काही नव्याने उफाळून आले आहेत. त्यावर उतारा शोधण्याची गरज आहे. डोनाल्ड ट्रंप यांना / यांच्या सल्लागार चमूला ही जाणीव आहे, असा निष्कर्ष काढायला जागा आहे.
अमेरिकन राष्ट्रवादाला साद : निवडून आल्यावर आता मतभेद, वाद, उखाळ्या पाखाळ्या संपल्या, आता मी सर्व अमेरिकनांचा अध्यक्ष आहे, आपण सर्व मिळून अमेरिकेला पुन्हा वैभव प्राप्त करून देऊया, अशी जी  साद डोनाल्ड ट्रंप यांनी सर्व जनतेला घातली आहे ती पाहता वरील निष्कर्षाला दुजोरा मिळेल. या भूमिकेप्रमाणे ते वागले तर देशात एकोपा निर्माण होऊ शकेल व अडचणीच्या वेळेला राष्ट्रवादच अमेरिकेच्याही मदतीला आला, असे म्हणता येईल.ब्रिटनप्रमाणे अमेरिकाही अशीच राष्ट्रवादाची कास धरून कालक्रमण करू शकेल. पण हा आर्थिक उत्थानाच्या बंधांनी साधलेला राष्ट्रवाद असेल. नियतीच्या उदरात काय साठवले आहे, हे सांगणे कठीण असले तरी ही भावी अमेरिकेच्या प्रगतीची एक नवीन दिशा आहे, हे मात्र नक्की. या संदरभात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमेरिकेत जे जे घडले, त्याचा मागोवा, घेणे उपयोगाचे ठरणार आहे.    
डोनाल्ड ट्रंप यांची बाळबोध  प्रचार यंत्रणा : अमेरिकेतील राजकीय स्थितीचा विचार केला तर हिलरी क्लिंटन किंवा डेमोक्रॅट पक्ष यांची प्रचार यंत्रणा कशी होती व डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रचार यंत्रणेपासून ती कशी व किती वेगळी होती, हे बघितले पाहिजे . हिलरी क्लिंटन यांच्या  यंत्रणेच्या द्वारे मुख्यत: तीन मुद्दे मांडले गेले. पहिला मुद्दा हा की, डोनाल्ड ट्रंप हे अध्यक्षपदासाठी अयोग्य उमेदवार आहेत. ते करबुडवे, दिवाळखोर, महिलांना क्षुद्र मानणारे, अनैतिक वर्तन करणारे आहेत. दुसरे असे की, ते अपात्रही आहेत. त्यांना राजकीय समज नाही. युरोप, दक्षिण कोरिया व जपान बाबतची त्याची मते अज्ञानजन्य व असमंजसपणाची परिचायक आहेत. तिसरे म्हणजे त्यांच्या योजना केवळ चुकीच्याच नाहीत तर विक्षिप्त आहेत. (मेक्सिको व अमेरिका यात भिंत बांधण्याचा त्यांचा हट्ट, हा  भारताची राजधानी दिल्लीहून  दक्षिणेत आणणाऱ्या व इतिहासाने वेड्या ठरवलेलंया महंमदाला  मागे टाकणारा आहे, हे खरेच आहे).   त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली देश सुरक्षित राहणार नाही. या हिलरी क्लिंटन यांच्या  प्रचाराचा परिणाम मतदारांवर झाला नाही असे नाही. पण तो ३0 ते ३५ टक्के मतदारांवरच झाला. याउलट डोनाल्ड ट्रंप यांचा प्रचार बाळबोध पण लोकमनाला थेट जाऊन भिडणारा झाला. गेल्या आठ वर्षात आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे, बेकारी वाढली आहे, नोकर्‍या परक्यांना मिळत आहेत, सर्व जगाची काळजी अमेरिकेलाच वहावी लागते आहे. मी हे बदलीन. असा कोणताही बाळबोध मुद्दा हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारात नव्हता.
डेमोक्रॅट पक्षाचे अमेरिकेतील मुस्लीम मतदारांना  आवाहन : अमेरिकेत मुस्लीम गट बर्‍यापैकी मोठा आहे. यांचे दोन/तीन भाग करावे लागतील. यातले काही लोक आफ्रिकन अमेरिकन आहेत. हा कृष्णवर्णी गट डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात होताच.  दुसरा गट आहे मध्यपूर्व व आशियातून स्थलांतर करून आलेल्या मुस्लिमांचा. आजमितीला यांच्या अनेक जुन्या पिढ्यांचे वंशज अमेरिकेत राहत आहेत. ते अमेरिकन जनजीवनाशी एकरूप झाले आहेत. खीज व गझाला खान हे असेच अमेरिकेत स्थायिक झालेले दांपत्य आहे.यांचा पुत्र कॅप्टन हुमायून खान हा अमेरिकेचा एक सैनिकी अधिकारी म्हणून लढत असताना मध्यपूर्वेत धारातीर्थी पडला. त्याला शौर्यपदक देऊन गौरवण्यात आले होते. खान दांपत्याला डेमोक्रॅट पक्षाने पक्षाच्या अधिवेशनात बोलवून त्यांचाही गौरव केला होता. डेमोक्रॅट पक्षाने मुस्लिमांची मते मिळविण्यासाठी हे नाटक रचले, अशी टीका डोनाल्ड ट्रंप यांनी केले होते. मुस्लीम मतांचे धृवीकरण होऊन त्यांनी डेमोक्रॅट पक्षाला एक गठ्टा मते दिली, असे मानतात.
तिसरा गट आहे गेल्या काही वर्षात अमेरिकेत आश्रयाला आलेल्या लोकांचा. यात सौदी अरेबिया व तत्सम देशातून आलेले धनवंत आहेत. हे ख्रिश्‍चनांचे धर्मांतर करून गरीब ख्रिश्‍चन मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करतात. प्रत्येक कारखान्यात हजारात चार/पाच उदाहरणे तरी आढळतात. याचा फारसा बोभाटा होत नाही. अगोदर काही दिवस निरनिराळी भेट वस्तू स्वीकारणारी मुलगी एक दिवस अचानक हिजाब बांधून आली की तिचे धर्मांतर झाल्याचे कळते. दुसरे असे की, 
आश्रयाला येणार्‍या मध्यपूर्वेतील निर्वासितांमध्ये अतिरेकीही असतात. डोनाल्ड ट्रंप यांचा आक्षेप खरेतर या लोकांवर आहे निदान असायला पाहिजे. सर्व मुस्लिमांना एकाच तराजूने तोलणे चुकीचे आहे, हे त्यांना बहुदा यथावकाश कळेल. निवडून आल्यानंतर आजपर्यत तरी मुस्लिमांबद्दल कोणतीही अनुकूल/ प्रतिकूल प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलेली नाही. पण या दिशेने त्यांना सकारात्मक पावले उचलावी लागतील, हे उघड आहे.
गोऱ्या मेक्सिकन लोकांनी निर्माण केलेल्या समस्या : अमेरिकेतील मेक्सिकन लोकांचा गटही मोठा आहे. मेक्सिको व अमेरिकेतील शेकडो मैल लांबीची सीमा ही पर्वत वा सागर यांनी र्मयादित केलेली नाही. साधी जमीन, वाळवंट, अमेरिकेतून मेक्सिकोत वाहत जाणार्‍या महाकाय नद्यांची विस्तीर्ण पात्रे यामुळे यामुळे ती सच्छिद्र आहे. ही भोके बुजवण्यासाठी थोडीथोडकी नव्हेत तर तीनशे/ साडे तीनशे चौक्या असूनसुद्धा रोज फार मोठय़ा संख्येत अनेक मेक्सिकन लोक अक्षरश: चालत अमेरिकेत येत असतात. काही सोबत अफू आणतात, काही अगदी अशिक्षित व अकुशल असतात. काही सशस्त्र अट्टल गुन्हेगारही असतात. यामुळे खून मारमार्‍या यातही काहींचा सहभाग असतो. यांच्यामुळे सर्व सोयी सुविधांवर निदान ताण तर नक्कीच पडतो. एकदा का अमेरिकेत यांनी प्रवेश केला की त्यांना ओळखणे कठीण, कारण सगळेच गोरे, ख्रिश्‍चन व स्पॅनिश बरोबर सफाईने इंग्रजीही बोलणारे. यांना ओळखायचे कसे? म्हणून डोनाल्ड ट्रंप यांना भिंत घालून ही सीमा सील करायची आहे. पण हा विचार, अव्यवहार्य व खर्चिक आहे. चीनच्या भिंतीनंतर या भिंतीचा दुसरा नंबर लागेल. पण जनसामान्यांना भिंतीची कल्पना भावली आहे. सीमेलगतच्या राज्यात मेक्सिकन लोक भरपूर आहेत. सुरुवातीला डोनाल्ड ट्रंप सर्वच मेक्सिकन लोकांना शिव्या घालीत. पण त्यातले जे आता अमेरिकन नागरिक व मतदार आहेत, त्यांना नाराज करून चालणार नाही, हे या राजकारणातील अननुभवी पण चतुर व्यावसायिकाला पुरेसे लवकर उमजले. त्यांनी टीकेचा रोख बेकायदा प्रवेश करणार्‍या मेक्सिकनांकडे वळवला.
स्थायिक झालेल्या मेक्सिकन मतदारांमध्ये आपल्या घुसखोर बांधवांबद्दल सहानुभूती निर्माण होईल व ट्रंप विरोधात लाट उत्पन्न होईल, असे निरीक्षकांचे भाकीत होते. पण स्थायिक झालेल्या मेक्सिकन अमेरिकन नागरिकांनी आपल्या घुसखोर बांधवांची बाजू घेतली नाही, असे दिसते व अशी लाट आली नाही.
असे वळवले मेक्सिकन मतदार: : अमेरिकेत ११ टक्के (मूळचे स्पेनचे असलेले) मेक्सिकन मतदार आहेत. आता मेक्सिकोतून यांची घुसखोरी इतकी वाढली आहे की, गेल्या चार वर्षात त्यांची संख्या एक टक्याने वाढली आहे. आश्‍चर्याची बाब ही आहे की, २0१२ मध्ये मेक्सिकन मतदारांनी रिपब्लिकन पक्षाला जेवढी मते दिली होती, त्यापेक्षा जास्त मते ट्रंप यांना दिली आहेत. मेक्सिकन मतदार दुखावले जाऊ नयेत म्हणून हिलरी क्लिंटन यांनी सौम्य भूमिका घेऊन हा मुद्दा थंड्या बस्त्यात टाकला होता तर डोनाल्ड ट्रंप यांनी अव्यवहार्य पण रोखठोक भूमिका घेत हा घुसखोरांचा मुद्दा खूप तापवला होता पण  कसा? त्यांनी अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्या मेक्सिकन नागरिकांना चुचकारले व घुसखोरांनाच फटकारले. तुम्ही स्थायिक झालेले मेक्सिकन कष्टाळू आहात, तुमच्या मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय झाली पाहिजे; अहो, तसा मी मेक्सिकन लोकांशी जवळीक ठेवूनच आहे. याच भागात माझी रेस्टॉरंट्स आहेत, मला मेक्सिकन अन्नपदार्थही आवडतात. अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्यांबद्दल माझी तक्रार नाही. येणार्‍या घुसखोर गुन्हेगार व बलात्कारींना थोपविण्याची माझी भूमिका आहे. हे म्हणणे अनेक स्थायिकांना पटले कारण या घुसखोरांचा स्थायिक झालेल्या मेक्सिकन लोकांनाही त्रास व उपद्रव होत होताच. हिलरी क्लिंटन दोन्ही मेक्सिकन गटांना चुचकारत राहिल्या. घुसखोर खूष झाले पण ते मतदार नव्हते. स्थायिक मेक्सिकन लोकांना घुसखोरांसोबत मानले, तोलले व गणले जाणे मान्य व सोयीचे नव्हते. हा अंतर्प्रवाह जाणण्यात डोनाल्ड ट्रंप यशस्वी झाले.


गाफील डेमोक्रॅट पक्ष :   डेमोक्रॅट पक्षाचा फार मोठा अपेक्षाभंग हे २0१६ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. जेमतेम काही दिवस अगोदर ज्येष्ठांना बदललेल्या वातावरणाची चाहूल लागली होती. माजी अध्यक्ष बराक ओबामा सहकुटुंब प्रचारात उडी घेते झाले, ते ही जाणीव झाली म्हणूनच. पण ऐनवेळी केलेली उपाययोजना यशस्वी झाली नाही. ते शक्यच नव्हते. पक्षाची धाकटी पाती आपण जिंकणार, असे मानून चालली होती. जुने जाणते हादरले होते पण सर्मथक आणि सहानुभूतीदार आपल्याच विश्वात मशगूल होते. एरवी बोलघेवडा म्हणून प्रसिद्ध असलेला श्वेतवर्णी अमेरिकन हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून ८ नोव्हेंबरची वाट पाहत होता. त्याने अनपेक्षित असा अभूतपूर्व धक्का दिला. हिलरी क्लिंटन यांनी औपचारिक शुभेच्छा दिल्या व त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले.  
निकालाची त्सुनामी : डोनाल्ड ट्रंप यांचा विजय जागतिक, अमेरिकन व अमेरिकेतील गावपातळीवर त्सुनामी सारखा परिणाम करता झाला.  देश पातळीवर पेप्सीकोच्या भारतीय वंशाच्या इंद्रा नुयींना तर रडू आवरेना. सर्व अश्‍वेतवणीर्यांच्या (काळे, सावळे व पिवळे -चिनी जपानी) जिवालाच धोका आहे, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. गाव पातळीवर ताणतणाव निर्माण झाले आहेत. ७ तारखेचा सलोखा, मैत्री, अगत्य एकदम तकलादू वस्तूप्रमाणे भंगले. परकीयांची ही अवस्था समजण्यासारखी आहे. पण रीतसर नागरिकत्त्व धारण करणार्‍यांना कृष्णवर्णीयांना तर अतिशय बिकट प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे.
शिक्षणसंस्था : एका गावात एकूण सात मोठय़ा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. अमेरिकेत या शाळांमधील विद्यार्थी देखील आपल्या शालेय विश्‍वात देशासोबत निवडणुका मॉक इलेक्शन्स घेत असतात. सातपैकी सहा शाळात डोनाल्ड ट्रंप विजयी झाले. या शाळात श्‍वेतवर्णीय विद्यार्थी बहुसंख्येने आहेत. सातवी शाळा संमिर्श स्वरूपाची आहे. या शाळेत झालेल्या मतदानात मात्र हिलरी क्लिंटन जिंकल्या. प्राथमिक शाळातही असेच मतदान झाले. तिथेही हाच अनुभव थोड्याफार प्रमाणात आला. विद्यार्थ्यात लोकशाही संस्कार रुजावेत म्हणून अशा लटुपटूच्या निवडणुका अमेरिकेत आयोजित करतात. माध्यमिक स्तरावर एका शाळेत श्‍वेतवर्णी व अश्‍वेतवर्णी विद्यार्थिनीत झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर अश्‍वेतवर्णी मुलीच्या झिंज्या उपटण्यापयर्ंत गेले. कर्णभूषणे ओरबाडून काढल्यामुळे तिच्या कानांच्या पाळीतून रक्त ठिपकू लागले. शाळेतील विद्यार्थ्यात भांडणे अमेरिकेतही होत असतात. पण ८ नोव्हेंबरपयर्ंतची भांडणे व ९ नोव्हेंबर २0१६ नंतरची भांडणे यात गुणात्मक फरक पडला आहे. आता तुम्ही आपल्या देशात केव्हा परत जाणार, असा प्रश्न श्‍वेतवर्णी विद्यार्थी अश्‍वेतवर्णी विद्यार्थ्यांना विचारू लागले आहेत. त्यांचे पालक एच१बी या व्हिसानुसार अमेरिकेत नोकरीसाठी आलेले आहेत.
स्थानिक कृष्णवर्णीय : पेट्रोल पंपावर एक आफ्रिकन अमेरिकन नागरिक पेट्रोल भरत असतांना चार श्‍वेतवर्णींयांचे टोळके कुठूनसे आले. त्या अश्‍वेतवर्णी व्यक्तीच्या अंगावर थुंकले. त्याला पायदळी तुडवून निघून गेले. सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या महिला डॉक्टरला तिच्यासोबत अनेक वर्षे काम करणार्‍या व गुण्यागोविंदाने राहणार्‍या श्‍वेतवर्णी मैत्रिणीने विचारले, तू केव्हा परत जाणार आहेस गं? विचारणारी महिला श्‍वेतवर्णी होती एवढेच. पण आपल्या देशातून परागंदा होऊन अमेरिकेत आर्शयाला आलेल्यांपैकी एक होती. या भारतीय महिला डॉक्टरने तिला म्हटले, बाई गं, उद्या तशीच वेळ आली तर कुठे जायचे हे मला माहीत आहे. मी भारतात परत जाईन. पण तुझं काय गं? तू कुठे परत जाणार? तू वर्णाने गोरी आहेस, पण परागंदा होऊन इथे आली आहेस. परत गेलीस तर तुझ्या देशात तुझ्यासाठी काय वाढून ठेवलं आहे, ते मला देखील माहीत आहे मग तुला तर ते माहीत असेलच.
एच१ बी धारकांचे अनुभव : नोकरीसाठीचा व्हिसा घेऊन येणार्‍यांचा हा अनुभव पुरेसा बोलका आहे. अमेरिकेतील एका विख्यात भारतीय डॉक्टर पतिपत्नींकडे पाहण्याची स्थानिकांची भूमिका ८ नोव्हेंबर २0१६ नंतर अवघी चोवीस तासात बदलेली दिसली. एरवी वरवर गोड बोलणारी माणसं एकदम वेगळीच भाषा बोलू लागली.
एच१ बी हा नोकरीनिमित्त अमेरिकेत जाणार्‍या परदेशी नागरिकांचा परवाना असतो. हे लोक अमेरिकन नागरिक नसतात, त्यांना नागरिकांसारखा सिक्युरिटी नंबरही नसतो पण ते अमेरिकेत घर विकत घेऊन राहू शकतात. यांनी अमेरिकेत रहावे, हे अमेरिकेच्या हिताचे असते. कारण यांच्या भरवशावर चालणार्‍या उद्योगात हजारो अमेरिकनांना रोजगार मिळाला आहे. ओबामा राजवटीत एच१बी व्हिसाबाबत भारतीय नागरिक खूपच मागे ढकलले गेले होते. मुस्लीम व चिन्यांची चलती होती. डोनाल्ड ट्रंप यांच्या राजवटीत हे धोरण बदलेल, अशी अपेक्षा बाळगण्यास जागा आहे. परकीय व अमेरिकन असा विचार केला तर अमेरिकन जनमानसात भारतीयाबाबत त्यातल्यात्यात कमी राग आहे. डोनाल्ड ट्रंप यांची निवडणुकीपूर्वीची भाषणे व अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या भारतीय मानवी संसाधनाची गुणवत्ता पाहता ओबामा राजवटीत मिळालेल्या वागणुकीपेक्षा बरी वागणूक डोनाल्ड ट्रंप यांच्या राजवटीत मिळेल, अशी अपेक्षा आहे.
विसंवाद दूर करण्याचे डोनाल्ड ट्रंप यांचे प्रयत्न : स्थानिक पातळींवरचे हे विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न खुद्द डोनाल्ड ट्रंप यांनी करावा, ही समाधानाची बाब असून याचे दोन अर्थ लागतात. एक अर्थ असा की, निवडणुकीच्या ज्वरातील राणा भीमदेवी थाटाची भाषणे व राज्यशकट हाकताना स्वीकारावयाची धोरणे यात फरक केला पाहिजे, ही व्यावहारिकता डोनाल्ड ट्रंप यांच्यात आहे किंवा त्यांनी निवडलेली सल्लागारांची चमू परिपक्व विचारांची व जबाबदारीची जाणीव असलेली आहे. त्यांना योग्य सल्ला देत आहे. 
जुन्या खपल्या मात्र उघडून भळभळ वाहत आहेत: वर उल्लेख केलेली ८ नोव्हेंबर नंतरची ही संघर्षांची उदाहरणे तशी प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. पण प्रत्यक्षात सर्वत्र असेच घडेल, असे नाही. या घटनांचा उल्लेख यासाठी केला की, संबंधांना तडे गेले होतेच. बांगडी पिचली होतीच. तुकडे पडायला सुरुवात ८ नोव्हेंबर नंतर झाली आहे. पण अमेरिकेत तसं पाहिलं तर सगळेच उपरे आहेत. मूळच्या रेड इंडियन लोकांचा वंशविच्छेद झाला आहे. आज एकटदुकट अमेरिकनाच्या डोक्यावरचे लाल केस दिसले की, वंशविच्छेदातून वाचलेल्या रेड इंडियन महिलांवर झालेल्या बलात्कारातून जन्माला आलेली ही प्रजा एकेकाळच्या मूळ निवासी असलेल्या लोकांची आठवण करून देत असते. आफ्रिकन अमेरिकन लोक तर विकत घेऊन आणलेल्या किंवा जिंकून आणलेल्यांची संतती आहे. आपल्या मूळ निवासाच्या खुणा त्यांच्याबाबतीत इतक्या पुसट झाल्या आहेत की, त्यांचा असा देशच ते सांगू शकत नाहीत. त्यांचा देश आता अमेरिकाच आहे. वर्णद्वेशामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेली सल त्यांना अस्वस्थ करीत असते. इतरही घटक अस्वस्थ आहे. त्यात महिला, समलिंगी, कामगार, अश्‍वेतवर्णी (विशेषत: काळे, सावळे) यांचाही समावेश आहे.
खेळाडूची प्रातिनिधिक भूमिका : याचे उदाहरण नुकतेच प्रकाशात आले आहे. कॉलीन किपरनिक नावाचा प्रसिद्ध अमेरिकन खेळाडू आफ्रिकन अमेरिकन आहे. खेळाचा सामना सुरू व्हायच्या अगोदर राष्ट्रगीत गाण्याची प्रथा त्या देशात आहे. या खेळाडूने राष्ट्रगीत गायले जात असताना आपण उभे राहणार नाही, अशी घोषणा केली. वांशिक अल्पसंख्यांकांना अमेरिकेत जी वागणूक मिळते, तिचा निषेध म्हणून आपण हे पाऊल उचलले आहे, असा त्याने खुलासा केला. ही घटना आहे २८ ऑगस्ट २0१६ ची. या निमित्ताने संपूर्ण देशभर एकच गदारोळ उठला. बहुतेकांनी त्याला शेलक्या शिव्या हासडल्या. काहींनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गुलामगिरीची प्रथा एका श्‍वेतवर्णीयानेच - अब्राहम लिंकनने बंद केली व ही त्याची भूमिकाच त्याच्या खुनासाठीचे एक कारण ठरली होती. कॉलीन किपरनिकचे प्रकरण घडले त्यावेळी मी अमेरिकेतच होतो. त्या खेळाडूचा राग एकवेळ समजून घेता येईल. पण त्याचा राग राष्ट्रगीतावर का? कुणी काही बोलत नव्हते. एकाने दबक्या आवाजात विचारले की, तुम्ही राष्ट्रगीतातले तिसरे कडवे वाचले आहे का? मला अमेरिकन राष्ट्रगीताचा पहिला शब्द सुद्धा माहीत नव्हता. शेवटी इंटरनेटला शरण गेलो. अमेरिकेचे राष्ट्रगीत हे ब्रिटिश आक्रमकांविरुद्धची लढाई जिंकल्यांतर एका कवीने रचलेले विजय गीत आहे. कवीचे नाव आहे, फ्रान्सिस स्कॉट की. १८१२ मध्ये बॅटल ऑफ बाल्टीमोर या नावाने प्रसिद्ध असलेली ही लढाई लढली गेली. ही अमेरिकनांची ब्रिटिश आक्रमकांविरुद्धची अमेरिकन फौजांनी लढलेली व जिंकलेली लढाई आहे. या गीतातले तिसरे कडवे वाचले. या कडव्यात कवी असे काहीसे म्हणतो , पळून जाणार्‍या त्या भाडोत्री गुलामांना जीव वाचविण्यासाठी फुरसतच मिळाली नाही. 
आता गुलाम कोण? तर अश्‍वेतवर्णी काळे. म्हणून कॉलीन किपरनिकचा राग होता. उत्तरादाखल व कॉलीन किपरनिकची समजूत काढण्यासाठी जे लेख छापून आले होते, त्यात खुलासा होता की, हे गुलाम होते, हे खरे आहे. पण ते ब्रिटिशांच्या बाजूने लढत होते. त्यांना मारले यात चुकले काय? दुसरे असे की, राष्ट्रगीताचे हे तिसरे कडवे, आजकाल फारसे गायले जातही नाही. राष्ट्रगीताची किती कडवी गावीत याबाबत अमेरिकेत निश्‍चित नियम नाहीत. अशा सगळ्या गोष्टींची माहितीत भर पडली. वर्णभेदाचा मुद्दा अमेरिकेत किती ताणतणाव निर्माण करतो आहे, याचे हे उदाहरण परिचायक आहे.
यावर डोनाल्ड ट्रंप यांना उपाय करावाच लागेल. अमेरिकन  आफ्रिकन हा अमेरिकेतील अल्पसंख्यांकांचा मोठा गट आहे. त्याला असंतुष्ट ठेवून चालणार नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, डोनाल्ड ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षात अनेक अश्‍वेतवर्णी नागरिकही आहेत. ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्तेही आहेत. त्यामुळे सबुरीची भाषा व भूमिका निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाला घ्यावीच लागणार व अर्थकारणाची कास धरत एक अमेरिकन राष्ट्र उभे करण्याचा प्रयत्न कसोशीने करावा लागणार.







Sent from my iPad
अमेरिकेचा आर्थिक राष्ट्रवादाचे बोट धरून प्रवास संभवनीय.

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
डेमोक्रॅट पक्षाचा फार मोठा अपेक्षाभंग होऊन २०१६ सालची अध्यक्षीय निवडणूक पार पडली. काही दिवस अगोदर ज्येष्ठांना याची चाहूल लागली होती. पण ऐनवेळी काही उपाययोजना करणे शक्यनव्हते. पक्षाची धाकटी पाती आपण जिंकणार असे मानून चालले होते. समर्थक आणि सहानुभूतीदारांना मात्र अनपेक्षित धक्का बसला. देश पातळीवर पेप्सीच्या भारतीय वंशाच्या इंद्रा नूयींना तर रडू आवरेना. सर्व अश्वेतवर्णीयांच्या (काळे, सावळे व पिवळे -चिनी जपानी) जीवालाच धोका आहे, असे त्यांनी जाहीरपणे सांगिले. गाव पातळीवर ताणतणाव निर्माण झाले आहेत. ७ तारखेचा सलोखा, मैत्री, अगत्य एकदम तकलादू वस्तूप्रमाणे भंगले. परकीयांची ही अवस्था समजण्यासारखी आहे.  पण रीतसर नागरिकत्त्व धारण करणाऱ्यांना कृष्णवर्णीयांना तर अतिशय बिकट प्रसंगांना तोंड द्यावे लागते आहे.
एच१ बी धारकांचे अनुभव - नोकरीसाठीचा व्हिसा घेऊन येणाऱ्यांचा हा अनुभव - अमेरिकेतील एका विख्यात भारतीय डाॅक्टर पतिपत्नींकडे पाहण्याची स्थानिकांची भूमिका ८ नोव्हेंबर २०१६ नंतर अवघी चोवीस तासात बदलेली दिसली. एरवी वरवर गोड बोलणारी माणसं एकदम वेगळीच भाषा बोलू लागली. 
शिक्षणसंस्था - एका गावात एकूण सात मोठ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. अमेरिकेत या शाळांमधील विद्यार्थी देखील आपल्या शालेयविश्वात देशासोबत निवडणुका माॅक इलेक्शन्स घेत असतात. सातपैकी सहा शाळात डोनाल्ड ट्रंप विजयी झाले. या शाळात श्वेतवर्णीय विद्यार्थी बहुसंख्येने आहेत. सातवी शाळा संमिश्र स्वरूपाची आहे. या शाळेत झालेल्या मतदानात मात्र हिलरी क्लिंटन जिंकल्या. प्राथमिक शाळातही असेच मतदान झाले. तिथेही हाच अनुभव थोड्याफार प्रमाणात आला. विद्यार्थ्यात लोकशाही संस्कार रुजावेत म्हणून अशा लटुपटूच्या निवडणुका अमेरिकेत आयोजित करतात. माध्यमिक स्तरावर एका शाळेत श्वेतवर्णी व अश्वेतवर्णी विद्यार्थिनीत झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर अश्वेतवर्णी मुलीच्या झिंज्या उपटण्यापर्यंत गेले. कर्णभूषणे ओरबाडून काढल्यामुळे तिच्या कानांच्या पाळीतून रक्त ठिपकू लागले. शाळेतील विद्यार्थ्यात भांडणे अमेरिकेतही होत असतात. पण ८ नोव्हेंबरपर्यंतची भांडणे व ९ नोव्हेंबर २०१६ नंतरची भांडणे यात गुणात्मक फरक पडला आहे. आता तुम्ही आपल्या देशात केव्हा परत जाणार, असा प्रश्न श्वेतवर्णी विद्यार्थी अश्वेतवर्णी विद्यार्थ्यांना विचारू लागले आहेत. त्यांचे पालक एच१बी या व्हिसानुसार अमेरिकेत नोकरीसाठी आलेले आहेत.
स्थानिक कृष्णवर्णी-  पेट्रोल पंपावर एक आफ्रिकन अमेरिकन नागरिक पेट्रोल भरत असतांना चार श्वेतवर्णींचे टोळके कुठूनसे आले. त्या अश्वेतवर्णी व्यक्तीच्या अंगावर थुंकले. त्याला पायदळी तुडवून निघून गेले.
सुरवातीलाच उल्लेख केलेल्या महिला डाॅक्टरला तिच्यासोबत अनेक वर्षे काम करणाऱ्या व गुण्यागोविंदाने राहणाऱ्या श्वेतवर्णी मैत्रिणीने विचारले, तू केव्हा परत जाणार आहेस गं? विचारणारी महिला श्वेतवर्णी होती एवढेच. पण आपल्या देशातून परागंदा होऊन अमेरिकेत आश्रयाला आलेल्यांपैकी एक होती. या भारतीय महिला डाॅक्टरने तिला म्हटले, बाईगं, उद्या तशीच वेळ आली तर कुठे जायचे हे मला माहीत आहे. मी भारतात परत जाईन. पण तुझं काय गं? तू कुठे परत जाणार? तू वर्णाने गोरी आहेस, पण परागंदा होऊन इथे आली आहेस. परत गेलीस तर तुझ्या देशात तुझ्यासाठी काय वाढून ठेवलं आहे, ते मला देखील माहीत आहे मग तुला तर ते माहीत असेलच. 
एच१ बी - नोकरीनिमित्त अमेरिकेत जाणाऱ्या परदेशी नागरिकांना एच१बी नावाचा परवाना असतो. हे अमेरिकन नागरिक नसतात, त्यांना नागरिकांसारखा सिक्युरिटी नंबरही नसतो पण ते अमेरिकेत घर विकत घेऊन राहू शकतात. यांनी अमेरिकेत रहावे, हे अमेरिकेच्या हिताचे असते. कारण यांच्या भरवशावर चालणाऱ्या उद्योगात हजारो अमेरिकनांना रोजगार मिळाला आहे. ओबामा राजवटीत एच१बी व्हिसाबाबत भारतीय नागरिक खूपच मागे ढकलले गेले होते. डोनाल्ड ट्रंप यांच्या राजवटीत हे धोरण बदलेल, अशी अपेक्षा बाळगण्यास जागा आहे. अमेरिकन जनमानसात भारतीयाबाबत त्यातल्यात्यात कमी राग आहे. डोनाल्ड ट्रंप यांची निवडणुकीपूर्वीची भाषणे व अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या भारतीय मानवी संसाधनाची गुणवत्ता पाहता ओबामा राजवटीत मिळालेल्या वागणुकीपेक्षा बरी वागणूक डोनाल्ड ट्रंप यांच्या राजवटीत मिळेल, अशी अपेक्षा आहे.
विसंवाद दूर करण्याचे प्रयत्न - स्थानिक पातळींवरचे हे विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न खुद्द डोनाल्ड ट्रंप यांनी करावा, ही समाधानाची बाब असून याचे दोन अर्थ लागतात. एक अर्थ असा की, निवडणुकीच्या ज्वरातील राणा भीमदेवी थाटाची भाषणे व राज्यशकट हाकतांना स्वीकारावयाची धोरणे यात फरक केला पाहिजे, ही व्यावहारिकता डोनाल्ड ट्रंप यांच्यात आहे किंवा त्यांनी निवडलेली सल्लागारांची चमू परिपक्व विचारांची व जबाबदारीची जाणीव असलेली आहे व त्यांना योग्य सल्ला देत आहे. तिसरे असे की, रिपब्लिकन पक्षात अनेक अश्वेतवर्णी नागरिकही आहेत. ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्तेही आहेत. त्यामुळे सबुरीची भाषा व भूमिका निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाला घ्यावीच लागणार.
जुन्या खपल्या -  वर उल्लेख केलेली ८ नोव्हेंबर नंतरची ही संघर्षांची उदाहरणे तशी प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. पण प्रत्यक्षात सर्वत्र असेच घडेल, असे नाही. या घटनांचा उल्लेख यासाठी केला की, संबंधांना तडे गेले होतेच. बांगडी पिचली होतीच. तुकडे पडायला सुरवात ८ नोव्हेंबर नंतर झाली आहे. पण अमेरिकेत तसं पाहिलं तर सगळेच उपरे आहेत. मूळच्या रेड इंडियन लोकांचा वंशविच्छेद झाला आहे. आज एकटदुकट अमेरिकनाच्या डोक्यावरचे लाल केस दिसले की, वंशविच्छेदातून वाचलेल्या रेड इंडियन महिलांवर झालेल्या बलात्कारातून जन्माला आलेली ही प्रजा एकेकाळच्या मूळ निवासी असलेल्या लोकांची आठवण करून देत असते. आफ्रिकन अमेरिकन लोक तर विकत घेऊन आणलेल्या किंवा जिंकून आणलेल्यांची संतती आहे. आपल्या मूळनिवासाच्या खुणा त्यांच्याबाबतीत इतक्या पुसट झाल्या आहेत की, त्यांचा असा देशच ते सांगू शकत नाहीत. त्यांचा देश आता अमेरिकाच आहे. वर्णद्वेशामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेली सल त्यांना अस्वस्थ करीत असते. इतरही घटक अस्वस्थ आहे. त्यात महिला, समलिंगी, कामगार, अश्वेतवर्णी (विशेषत: काळे, सावळे) यांचाही समावेश आहे.
खेळाडूची प्रातिनिधिक भूमिका - याचे उदाहरण नुकतेच प्रकाशात आले आहे. काॅलीन किपरनिक नावाचा प्रसिद्ध अमेरिकन खेळाडू आफ्रिकन अमेरिकन आहे. खेळाचा सामना सुरू व्हायच्या अगोदर राष्ट्रगीत गाण्याची प्रथा त्या देशात आहे. या खेळाडूने राष्ट्रगीत गायले जात असतांना आपण उभे राहणार नाही, अशी घोषणा केली. वांशिक अल्पसंख्यांकांना अमेरिकेत जी  वागणूक मिळते, तिचा निषेध म्हणून आपण हे पाऊल उचलले आहे, असा त्याने खुलासा केला. ही घटना आहे २८ आॅगस्ट २०१६ ची. या निमत्ताने संपूर्ण देशभर एकच गदारोळ उठला. बहुतेकांनी त्याला शेलक्या शिव्या हासडल्या. काहींनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गुलामगिरीची प्रथा एका श्वेतवर्णीयानेच - अब्राहम लिंकनने बंद केली व ही त्याची भूमिकाच त्याच्या खुनासाठीचे एक कारण ठरली होती. काॅलीन किपरनिकचे प्रकरण घडले  त्यावेळी मी अमेरिकेतच होतो. त्या खेळाडूचा राग एकवेळ समजून घेता येईल पण त्याचा राग राष्ट्रगीतावर का? कुणी काही बोलत नव्हते. एकाने दबक्या आवाजात विचारले की, तुम्ही राष्ट्रगीतातले तिसरे कडवे वाचले आहे का? मला अमेरिकन राष्ट्रगीताचा पहिला शब्द सुद्धा माहीत नव्हता. शेवटी इंटरनेटला शरण गेलो. अमेरिकेचे राष्ट्रगीत हे ब्रिटिश आक्रमकांविरुद्धची लढाई जिंकल्यांतर एका कवीने रचलेले विजय गीत आहे. कवीचे नाव आहे, फ्रान्सिस स्काॅट की. १८१२ मध्ये बॅटल आॅफ बाल्टीमोर या नावाने प्रसिद्ध असलेली ही लढाई लढली गेली. ही अमेरिकनांची ब्रिटिश आक्रमकां विरुद्धची अमेरिकन फौजांनी लढलेली व जिंकलेली लढाई आहे. या गीतातले तिसरे कडवे वाचले. या कडव्यात कवी असे काहीसे म्हणतो , ‘पळून जाणाऱ्या त्या भाडोत्री गुलामांना जीव वाचविण्यासाठी फुरसतच मिळाली नाही.’ 
आता गुलाम कोण? तर अश्वेतवर्णी- काळे. म्हणून काॅलीन किपरनिक चा राग होता. उत्तरादाखल व काॅलीन किपरनिकची समजूत काढण्यासाठी जे लेख छापून आले होते, त्यात खुलासा होता की, हे गुलाम होते, हे खरे आहे. पण ते ब्रिटिशांच्या बाजूने लढत होते. त्यांना मारले यात चुकले काय? दुसरे असे की, राष्ट्रगीताचे हे तिसरे कडवे, आजकाल फारसे गायले जातही नाही. राष्ट्रगीताची किती कडवी गावीत याबाबत अमेरिकेत निश्चित नियम नाहीत. अशा सगळ्या गोष्टींची माहितीत भर पडली. वर्णभेदाचा मुद्दा अमेरिकेत किती ताणतणाव निर्माण करतो आहे, याचे हे उदाहरण परिचायक आहे.
 मेक्सिकन तर तसे गोरे पण तरीही- अमेरिकेतील दुसरा मोठा गट आहे मेक्सिकन लोकांचा. मेक्सिको व अमेरिकेतील  २००० मैल लांबीची सीमा ही पर्वत वा सागर यांनी मर्यादित केलेली नाही. साधी जमीन, वाळवंट , अमेरिकेतून मेक्सिकोत वाहत जाणाऱ्या महाकाय नद्यांची विस्तीर्ण पात्रे यामुळे यामुळे ती सच्छिद्र आहे. ही भोके बुजवण्यासाठी थोडीथोडकी नव्हेत तर तीनशे/ साडे तीनशे चौक्या असून सुद्धा रोज फार मोठ्या संख्येत अनेक मेक्सिकन लोक अक्षरश: चालत अमेरिकेत येत असतात. काही सोबत अफू आणतात, काही अगदी अशिक्षित व अकुशल असतात. काही सशस्त्र अट्टल गुन्हेगारही असतात. यामुळे खून मारमाऱ्या यातही काहींचा सहभाग असतो. यांच्यामुळे सर्व सोयीसुविधांवर निदान  ताण तर नक्कीच पडतो. एकदा का अमेरिकेत यांनी प्रवेश केला की त्यांना ओळखणे कठीण, कारण सगळेच गोरे, ख्रिश्चन व स्पॅनिश बरोबर सफाईने इंग्रजीही बोलणारे. यांना ओळखायचे कसे? म्हणून डोनाल्ड ट्रंप यांना भिंत घालून ही सीमा सील करायची आहे. पण हा विचार, अव्यवहार्य व खर्चिक आहे. चीनच्या भिंतीनंतर या भिंतीचा दुसरा नंबर लागेल. पण जनसामान्यांना भिंतीची कल्पना भावली आहे. सीमेलगतच्या राज्यात मेक्सिकन लोक भरपूर आहेत. सुरवातीला डोनाल्ड ट्रंप सर्वच मेक्सिकन लोकांना शिव्या घालीत. पण त्यातले जे आता अमेरिकन नागरिक व मतदार आहेत, त्यांना नाराज करून चालणार नाही, हे  या राजकारणातील अननुभवी पण चतुर व्यावसायिकाला पुरेसे लवकर उमजले. त्यांनी टीकेचा रोख बेकायदा प्रवेश करणाऱ्या मेक्सिकनांकडे वळवला. 
स्थायिक झालेल्या मेक्सिकन मतदारांमध्ये आपल्या घुसखोर बांधवांबद्दल सहानुभूती निर्माण होईल व ट्रप विरोधात लाट उत्पन्न होईल, असे निरीक्षकांचे भाकीत होते पण स्थायिक झालेल्या मेक्सिकन अमेरिकन नागरिकांनी आपल्या घुसखोर बांधवांची बाजू घेतली नाही, असे दिसते. व अशी लाट आली नाही.
डेमोक्रॅट व रिपब्लिकन पक्षांच्या वेगळ्या भूमिका - अमेरिकेत ११ टक्के (मूळचे स्पेनचे असलेले) मेक्सिकन मतदार आहेत. आता मेक्सिकोतून यांची घुसखोरी इतकी वाढली आहे की, गेल्या चार वर्षात त्यांची संख्या एक टक्याने वाढली आहे. आश्चर्याची बाब ही आहे की, २०१२ मध्ये मेक्सिकन मतदारांनी रिपब्लिकन पक्षाला जेवढी मते दिली होती, त्यापेक्षा जास्त मते ट्रंप यांना दिली आहेत. मेक्सिकन मतदार दुखावले जाऊ नयेत म्हणून हिलरी क्लिंटन यांनी सौम्य भूमिका घेऊन हा मुद्दा थंड्या बस्त्यात टाकला होता तर डोनाल्ड ट्रंप यांनी अव्यवहार्य पण रोखठोक भूमिका घेत हा घुसखोरांचा मुद्दा खूप तापवला होता, पण त्यांनी अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्या मेक्सिकन नागरिकांना चुचकारले. तुम्ही कष्टाळू आहात, तुमच्या मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय झाली पाहिजे; अहो, तसा मी मेक्सिकन लोकांशी जवळीक ठेवूनच आहे. याच भागात माझी रेस्टाॅरंट्स आहेत, मला मेक्सिकन अन्नपदार्थही आवडतात. अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्यांबद्दल माझी तक्रार नाही. येणाऱ्या घुसखोर गुन्हेगार व बलात्कारींना थोपविण्याची माझी भूमिका आहे. हे म्हणणे अनेक स्थायिकांना पटलेले दिसते.
अमेरिकेतील मुस्लीम - अमेरिकेत मुस्लिम गटही बऱ्यापैकी मोठा आहे. यांचे दोन/तीन भाग करावे लागतील. यातले काही लोक आफ्रिकन अमेरिकन आहेत.
  दुसरा गट आहे मध्यपूर्व व आशियातून स्थलांतर करून आलेल्या मुस्लिमांचा. आजमितीला यांच्या अनेकजुन्या पिढ्यांचे वंशज अमेरिकेत राहत आहेत. ते अमेरिकन जनजीवनाशी एकरूप झाले आहेत. खीज व गझाला खान हे असेच अमेरिकेत स्थायिक झालेले दांपत्य आहे.यांचा पुत्र कॅप्टन  हुमायून खान हा अमेरिकेचा एक सैनिकी अधिकारी म्हणून लढत असतांना मध्यपूर्वेत धारातीर्थी पडला. त्याला शौर्यपदक देऊन गौरवण्यात आले होते. या दांपत्याला डेमोक्रॅट पक्षाने पक्षाच्या अधिवेशनात बोलवून त्यांचाही गौरव केला होता. डेमोक्रॅट पक्षाने मुस्लिमांची मते मिळविण्यासाठी हे नाटक रचले, अशी टीका डोनाल्ड ट्रंप यांनी केले होते. मुस्लिम मतांचे धृवीकरण होऊन त्यांनी डेमोक्रॅट पक्षाला एक गठ्टा मते दिली, असे मानतात.
   तिसरा गट आहे गेल्या काही वर्षात अमेरिकेत आश्रयाला आलेल्या लोकांचा.यात सौदी अरेबिया व तत्सम देशातून आलेले धनवंत आहेत. हे ख्रिश्चनांचे धर्मांतर करून गरीब ख्रिश्चन मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करतात. प्रत्येक कारखान्यात हजारात चार/पाच उदाहरणे तरी आढळतात. याचा फारसा बोभाटा होत नाही. अगोदर काही दिवस निरनिराळी भेट वस्तू स्वीकारणारी मुलगी एक दिवस अचानक हिजाब बांधून आली की तिचे धर्मांतर झाल्याचे कळते. तसेच आश्रयाला येणाऱ्या मध्यपूर्वेतील निर्वासितांमध्ये अतिरेकीही असतात. डोनाल्ड ट्रंप यांचा आक्षेप खरेतर या लोकांवर आहे निदान असायला पाहिजे. सर्व मुस्लिमांना एकाच तराजूने तोलणे चुकीचे आहे, हे त्यांना बहुदा यथावकाश कळेल. निवडून आल्यानंतर आजपर्यत तरी मुस्लिमांबद्दल कोणतीही अनुकूल/ प्रतिकूल प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलेली नाही.
प्रचार यंत्रणा - अमेरिकेतील राजकीय स्थितीचा विचार केला तर हिलरी क्लिंटन किंवा डेमोक्रॅट पक्ष यांची प्रचार यंत्रणाही कशी होती हेही बघायला हवे आहे. या यंत्रणेच्या द्वारे मुख्यात: तीन मुद्दे मांडले गेले. १. डोनाल्ड ट्रंप हे  अध्यक्षपदासाठी अयोग्य उमेदवार आहेत. ते करबुडवे, दिवाळखोर, महिलांना क्षुद्र मानणारे, अनैतिक वर्तन करणारे आहेत. २. ते अपात्रही आहेत. त्यांना राजकीय समज नाही. भिंत बांधणे, ३. त्यांच्या योजना केवळ चुकीच्याच नाहीत तर विक्षिप्त आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली देश सुरक्षित राहणार नाही. या प्रचाराचा परिणाम झाला, झाला नाही असे नाही. पण तो ३० ते ३५ टक्के मतदारांवरच झाला. 
 याउलट डोनाल्ड ट्रंप यांचा प्रचार बाळबोध पण लोकमनाला थेट जाऊन भिडणारा झाला. गेल्या आठ वर्षात आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे, बेकारी वाढली आहे, नोकऱ्या परक्यांना मिळत आहेत, सर्व जगाची काळजी अमेरिकेलाच वहावी लागते आहे. मी हे बदलीन. असा कोणताही बाळबोध मुद्दा हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारात नव्हता. 
अमेरिकन राष्ट्रवादाला साद - निवडणून आल्यावर आता मतभेद, वाद, उखाळ्या पाखाळ्या संपल्या, आता मी सर्व अमेरिकनांचा अध्यक्ष आहे, आपण सर्व मिळून अमेरिकेला पुन्हा वैभवाप्त नेऊया, अशी साद डोनाल्ड ट्रंप यांनी सर्व जनतेला घातली आहे. या प्रमाणे ते वागले तर देशात एकोपा निरमाण होऊ शकेल. अडचणीच्या वेळेला राष्ट्रवादच अमेरिकेच्या मदतीला आला. ब्रिटनमध्येही याच दिशेने वाटचाल होते आहे. अमेरिकाही अशीच राष्ट्रवादाची कास धरून कालक्रमणा करू शकेल. हा आर्थिक उत्थानाच्या बंधांनी साधलेला राष्ट्रवाद असेल. नियतीच्या उदरात काय साठवले आहे, कुणास ठावूक? पण ही प्रगतीची एक नवीन दिशा आहे, हे नक्की.


Sent from my iPad

Friday, November 11, 2016

अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक - एक वस्तुनिष्ठ विश्लेषण लेखांक १
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
यंदा अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झाली या दिवशी मंगळवार होता. या अगोदर ६ नोव्हेंबर २०१२ ला बराक ओबामा निवडून आले होते. या दिवशीही मंगळवारच होता. त्या अगोदर ४ नोव्हेंबर २००८ ला बराक ओबामा पहिल्यांदा निवडून आले होते. त्या तारखेलाही मंगळवारच होता आणि २०२० साली अमेरिकेत पुन्हा निवडणूक होईल व त्या दिवशीही मंगळवारच असेल. २०२० सालचा नोव्हेंबर महिन्यातला पाहिला सोमवार २ तारखेला येणार आहे. म्हणजे मंगळवार ३ तारखेला असणार आहे. म्हणून ३ नोव्हेंबर २०२० ला अमेरिकेत निवडणूक होईल, हे नक्की आहे.अमेरिकेने हा मंगळवार आजवर कधीही चुकवला नाही. भविष्यातही चुकवणार नाही. हा नोव्हेंबर महिन्यातील नुसता पहिला मंगळवार नाही तर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतरचा मंगळवार आहे. अशी या मंगळवारची महती आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकीय जीवनात एक निश्चितता व निश्चिंतता निर्माण झाली आहे. अध्यक्ष मध्येच मेला ( जसे फ्रॅंकलीन रुझवेल्ट १९४५) किंवा मारला गेला ( जसे जाॅन एफ केनेडी १९६३) तर उपाध्यक्ष (जसे हॅरी ट्रूमन वा लिंडन जाॅनसन) उरलेल्या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळतील अशी तरतूद आहे. यामुळे निवडणुकीची टांगती तलवार वगैरे प्रकार नाही.
मंगळवार ठरला कसा?- १७९२ मध्ये अमेरिकेत एक कायदा पारित करण्यात आला. ज्या वर्षात निवडणूक होणार त्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यातील पहिल्या बुधवार पासून ३४ दिवसांच्या आत प्रत्येक राज्यात अध्यक्षपदासाठीचे मतदान आटोपलेच पाहिजे, असे ठरविण्यात आले. म्हणजे अर्थातच हा नोव्हेंबर महिना असणार. नोव्हेंबर महिनाच का?  याची कारणे दोन आहेत. एक कारण असे की, यावेळी पिकांची कापणी उरकलेली असते. दुसरे कारण असे की, कडाक्याची थंडी पडायला सुरवात व्हायची असते. 
 अठराव्या शतकात दळणवळणाची साधने विकसित झालेली नव्हती. आता आगगाड्या, मोटारी, विमाने आली. पण तेव्हा परस्परसंपर्काची जलद गतीची साधने नव्हती. तसेच आता टेलिफोन, मोबाईल आले आहेत त्यामुळे दुसऱ्याच क्षणी एक दुसऱ्याशी संपर्क साधू शकतो. त्यामुळे महिन्याभराचे अंतरठीक होते. पण मग आता एक महिन्याहून मोठा कालावधी  कशाला हवा? 
निवडणुकीची तारीख निश्चित करण्यामागचे सूत्र - १८४५ साली दुसरा एक कायदा पारित करण्यात आला. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याच्या ‘पहिल्या सोमवारनंतरच्या  मंगळवारी’ संपूर्ण देशात अध्यक्षपदासाठी मतदान व्हावे असे ठरले. यामुळे नोव्हेंबर महिन्यातील ‘पहिल्या सोमवार नंतरचा  मंगळवार’ व  डिसेंबर महिन्यातील पहिला बुधवार यात ३४ दिवसांपेक्षा जास्त अंतर राहणार नाही, हे नक्की झाले. (‘पहिल्या सोमवार नंतरचा मंगळवार’ असा शब्दप्रयोग का म्हणून ? कारण असे की, एखाद्या वर्षी पहिला मंगळवार नोव्हेंबरच्या  १ तारखेलाही येऊ शकेल. अशावेळी सोमवार आॅक्टोबर महिन्यात नाही का येणार?) पण मंगळवारच का? मंगळवारात असे काय आहे? तर सर्वांना रविवारी चर्चमध्ये जायचे असते. त्यामुळे रविवार नको. पण मग सोमवार का नाही? तर मतदान केंद्र दूर असेल तर प्रवासासाठी सोमवार हाताशी असलेला बरा, म्हणून मंगळवार ठरला. यानुसार निवडणुकीची तारीख केव्हाही २ ते ८ यांच्या दरम्यानचीच असेल(या दोन्ही तारखा पकडून) हेही नक्की झाले.
 अमेरिका आहे कशी? - अमेरिकेची लोकसंख्या जवळजवळ ३२ कोट असून क्षेत्रफळ ठोकळमानाने १ कोटी चौरस मीटर व लोकांचे सरासरी वैयक्तिक वार्षिक उत्पन्न ५५,००० डाॅलर आहे. देशात एकूण ५० राज्ये आहेत. यापैकी ४८ राज्ये सलग आहेत तर रशियाकडून विकत घेतलेले अलास्का आणि जपानजवळचे हवाई ही राज्ये भौगोलिक दृष्ट्या सलग नाहीत. याशिवाय १६ प्रांत असून त्यापैकी  ११ प्रांतात मानवाची वसतीच नाही.
बडी राज्ये -  कॅलिफोर्नियात १२ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटव्हज (जणू आपली लोकसभा) मध्ये ५३ प्रतिनिधी आहेत. टेक्सासमध्ये ८.५ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये ३६ प्रतिनिधी आहेत. फ्लोरिडात ६ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये २७ प्रतिनिधी आहेत. न्यू याॅर्कमध्ये ६ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये २७ प्रतिनिधी आहेत. इलिनाॅइस व पेन्सिलव्हॅनियात प्रत्येकी ४ टक्के लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये प्रत्येकी १८ प्रतिनिधी आहेत. 
 इतर ८ राज्यात २१ टक्के  लोकसंख्या व हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज (जणू लोकसभा) मध्ये एकूण ९० प्रतिनिधी आहेत.
उरलेल्या ३६ राज्यात उरलेली लोकसंख्या राहते व त्यांचे हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये उरलेले प्रतिनिधी आहेत.
 हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये प्रतिनिधींची एकूण संख्या ४३५ आहे. थोडक्यात असे की, मोठ्या राज्यात जो बाजी मारेल तोच पक्षांतर्गत निवडणुकीत तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारणार हे उघड आहे. अटीतटीची लढाई झाल्यास गोष्ट वेगळी. हे सर्व आकडे ठोकळमानाचे असून विषय समजून घेण्यासाठी पुरेसे व पुरते आहेत.
अमेरिकेत सगळेच उपरे - बहुभाषिक, बहुवांषिक, बहुधार्मिक, बहुवर्णिक (गोरे, काळे, सावळे, लाल, पीत) लोकांची ही अमेरिका आहे. लालवर्णी(केसांचा रंग लाल असलेले वंशविच्छेद होऊन नामशेष झाले आहेत. किंवा संकरित स्वरुपातच अस्तित्त्वात आहेत. त्यामुळे आज सगळे उपरेच आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून (मुख्यत: युरोपमधून) नशीब आजमावण्यासाठी आलेले किंवा आफ्रिकेतून गुलाम म्हणून एकेकाळी विकत घेतलेले किंवा जिंकून आणलेले. अब्राहम लिंकनने गुलामगिरी कायद्याने नष्ट केली व सर्व सुट्या व वेगळ्या वसाहतींना (राज्यांना) एका संघराज्यात बांधले खरे पण अजूनही काळ्यांच्या मनातील गुलामगिरीची सल पुरत्पणी गेलेली नाही की अनेक गोऱ्यांच्या मनातला स्वामित्त्वाचा तोरा पुरतेपणाने ओसरलेला नाही.  राज्ये एका छत्राखाली आली खरी पण आपली विशेषता व वेगळेपण कायम राखीत.  म्हणून युनायटेड स्टेट्स आॅफ अमेरिका हे संघराज्य (फेडरेशन) आहे. अमेरिकेला ‘मेल्टिंग पाॅट आॅफ आॅल कल्चर्स’ असे म्हटले  जाते खरे पण बिरबलाची ही खिचडी पुरतेपणी अजूनही शिजलेली नाही. पण लवकरच शिजेल, अशी आशा बाळगू या. काळे-गोरे, सनातनी-आधुनिक, उत्तरेकडचे-दक्षिणेकडचे यातला विसंवाद, मनोमालिन्य, मनभेद, संघर्ष अधून मधून डोके वर काढीत असतात. निवडणुकीसारख्या प्रसंगी तर ते अनेकदा उफाळून येत असतात.
कोण कुठे व किती? धर्मनिहाय किती?, वर्णनिहाय किती?- अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन लोकांची राज्यनिहाय टक्केवारी मिसिसीपी (३७), ल्युसियाना (३२), जाॅर्जिया (३१), मेरीलॅंड (३०), साऊथ कॅरोलीना(२८), अल्बामा(२६), नाॅर्थ कॅरोलीना (२१), डेलावेअर(२१) व्हर्जिनिया(२०) असून इतर राज्यात ती २० टक्यापेक्षा कमी आहे. हे लोक मतदानाच्या बाबतीत गोऱ्यांपेक्षा अधिक जागरूक असतात. अटीतटीचा संघर्ष या राज्यात निवडणूक काळात दिसून येतो. काळे गोरे यांचे वेगवेगळे  धृवीकरण होते. व्होट बॅंक्स निर्माण होतात. यातील बहुतेक राज्यात यावेळी डोनाल्ड ट्रंप हा श्वेतवर्चस्ववादी मानला जाणारा जास्त मते घेता झाला आहे. म्हणजे ज्या राज्यात काळे त्यातल्यात्यात जास्त आहेत, अशा बहुसंख्य राज्यात ट्रंप यांना बहुमताचा पाठिंबा मिळाला आहे. अशा परिस्थितीत तिथल्या काळ्यांच्या मनातली अस्वस्थता समजून घेतली पाहिजे. ट्रंप निवडून येताच ठिकठिकाणी जे उद्रेक उफाळले आहेत, त्यामागे ही अस्वस्थता आहे.  
 देशात काळे, गोरे, सावळे किती?- देशपातळीचा विचार केला तर अमेरिकेत ७२ टक्के गोरे, १३ टक्के काळे,  ९ टक्के संमिश्र व ५ टक्के एशियन व बाकी इतर आहेत. बरेच गोरे कट्टर सनतनी व अंधश्रद्ध आहेत. धर्मनिहाय पाहिले तर ख्रिश्चन ७६ टक्के, ख्रिश्चन नसलेले ४ टक्के,  कोणताही धर्म न मानणारे १५ टक्के, तर धर्मविषयक माहिती देण्यास नकार देणारे ५ टक्के लोक आहेत. प्रत्येकात विशेषत: ख्रिश्चनात १०/ १२ पोटभेद आहेत. यातही सनातन्यांची संख्या फार मोठी आहे.०.५ टक्के मुस्लिम, ०.५ टक्के बुद्ध (चिनी व जपानी) आणि हिंदूंसह इतर १.२ टक्के आहेत.
   कोणत्या धर्माचे किती?- संख्यानिहाय विचार केला तर  अमेरिकेत सर्वात जास्त ख्रिश्चन, दुसऱ्या क्रमांकावर ज्युडाइझमला मानणारे (२ टक्के), तिसऱ्या क्रमांकावर मुस्लिम(०.९ टक्के) व चौथ्या क्रमांकावर हिंदू व बौद्ध (प्रत्येकी ०.७ टक्के ) आहेत. बहुतेक हिंदू प्रगत विचाराचे असून हिंदूंची संख्या गेल्या दहा वर्षात ८५ टक्क्यांनी वाढली आहे. ७७ टक्के हिंदू पदवीधर आहेत. ३६ टक्के हिंदूंची गणना श्रीमंत व्यक्तींमध्ये ( वार्षिक उत्पन्न एक लक्ष डाॅलर) होते. इतर धर्मीयात हे प्रमाण १९ टक्के इतके आहे. हे सर्व मुद्दे निवडणुकीत वेळोवेळी आपला प्रभाव पाडतांना नेहमी दिसतात. यावेळीही हे दिसले आहेत. याचे कारण असे आहे की, दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांची बांधिलकी मानणाऱ्यांच्या संख्येत खूप फरक नसतो. त्यामुळे अल्संख्यांकांचे मतदान निवडणुकीचे पारडे फिरवू शकते. म्हणून त्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न होत असतात. याचे ठळक उदाहरण मोदींची स्तुती, हिंदूंची स्तुती, दिवाळीची रोषनाई, आरतीत सहभाग या रूपात पाहता येईल.  
अध्यक्षपदासाठीची पक्षांतर्गत चुरस (डेमोक्रॅट)
 डेमोक्रेटिक पक्षाचे एकूण ४७६३  डेलिगेट्‌स होते. अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी निम्मे म्हणज २३८२ डेलिगेट्‌स उमेदवाराच्या बाजूला वळणे मिळणे गरजेचे होते. हिलरी क्लिंटन यांना १७५६ डेलिगेट्सचा पाठिंबा मिळालेला होता. बर्नी सॅंडर्स यांनी हिलरींशी चांगली टक्कर दिली होती. त्यांना आपल्याकडे वळविण्यात हिलरी क्लिंटन यशस्वी झाल्या. पण समाजवादाकडे झुकलेल्या बर्नी सॅंडर्स यांचा चाहता तरूण व बुद्धिजीवी वर्ग  या तडजोडीमुळे अक्षरश: खवळला. त्याने निदर्शने केली, बर्नी सॅंडर्सचा निषेध केला. हे डेलिगेट्स/समर्थक रिपब्लिकन पक्षाकडे वळणे शक्यच नव्हते. बहुतेक वळले गॅरी जाॅनसन या लिबर्टेरियन उमेदवाराकडे किंवा ग्रीन पार्टीच्या उमेदवाराकडे. अटीतटीच्या लढतीत यांच्या मतांचा परिणाम डोनाल्ड ट्रंप  यांना झाला असणार. बर्नी संडर्स यांचा प्रभाव असलेल्या भागात हिलरी क्लिंटन यांना फायदा न झल्याचे वृत्त आहे. पाच/सहा ज्या अति चुरशीच्या लढती झाल्या आहेत, त्यात हे जाणवले. थोडक्यात काय की नेत्याने टोपी फिरवली की अनुयायी ‘मुकी बिचारी कुणीही हका’, असे अनुयायी व मतदार  आता राहिलेले नाहीत.  सर्व दिग्गज मात्र पाठीशी उभे राहिले पण त्यांचे अनुयायी उदासीन राहिले, 
   अध्यक्षपदासाठीची पक्षांतर्गत चुरस (रिपब्लिकन)
 रिपब्लिकन पक्षाचे एकूण २४७२ डेलिगेट्‌स होते. उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी १२३७ डेलिगेट्‌स मिळणे गरजेचे होते. बेताल वक्तव्ये व अल्पसमज यासाठी प्रसिद्ध असलेल्या  डोनाल्ड ट्रंप  यांनी महिलांबद्दल अशीच बेताल व अपरिपक्वता दाखवणारी विधाने केल्यामुळे जनमतात नाराजी वाढली. विशेषत: महिलावर्ग तर त्यांच्याविरुद्ध खवळून उठला. यावर उतारा म्हणून त्यांच्या पत्नीने पतिपरायणतेचा परिचय देत बरीच सारवासारव केली व पतीचे गोडवेही गायले आहेत. पण त्याचा परिणाम झाला नाही. डोनाल्ड ट्रंप यांच्या विरुद्ध महिलांची निवेदने व आरोप येतच होते. रिपब्लिकन पक्षाचे दुसरे इच्छुक उमेदवार टेड क्रुझ व तिसरे उमेदवार जाॅन कसिच  यांना डोनाल्ड ट्रंप यांना अडसट्यात पकडून माघार घ्यावयास लावली एकाचा केनडींच्या हत्याऱ्याशी ( ओस्वाल्डशी) तर दुसऱ्याचा ज्यूद्वेष्ट्याशी बादरायण संबंध जोडून त्यांना डोनाल्ड ट्रंप  यांनी हतबल केले.  माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश सकट बहुतेक पक्षांतर्गत दिग्गज विरोधात गेले, उदासीन राहिले, पाठ फिरवते झाले. उमेदवारी मागे घ्या, असा धोशा पक्षांतर्गत सुरू झाला. पण सामान्य मतदार व कार्यकर्त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांना साथ दिली. त्यांनी नेत्यांचे ऐकले नाही. शेवटी डोनाल्ड ट्रंप यांना त्यांच्या वादग्रस्त विधाने, बेधडक मते, अफलातून धोरणे मिळत असलेला जनाधार पाहून बहुतेक सगळे दिग्गज  तर तंबूत परतलेच पण याच आधारावर डोनाल्ड ट्रंप यांनी ॲरिझोना(११मते) , नेवाडा (६मते), न्यू हॅम्पशायर (४ मते) पेन्सिलव्हॅनिया(२० मते), ओहायओ (१८ मते), फ्लोरिडा (२९ मते), टेक्सास (३८ मते), उत्तर कॅरोलिना (१५ मते), मिसुरी (१० मते), व्हिस्काॅन्सन (१० मते) या प्रांतात जबरदस्त मुसंडी मारली.
स्वत: सोबत डोनाल्ड ट्रंप यांनी सिनेट व हाऊससाठी उभ्या असलेल्या सदस्यांनाही जबरदस्त टेकू दिला. प्रारंभी ही मंडळी डोनाल्ड ट्रंप यापासून दूर राहणेच पसंत करीत होती, निरनिराळ्या सबबी सांगून एका व्यासपीठावर यायचे टाळत होती. पण हे लोक ट्रंप लाटेत तरले. काळ कधीकधी सूड घेतो तो असा.
Sent from my iPad

Sent from my iPad
डोनाल्ड ट्रंप यांच्या विजयामागचे रहस्य
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

अमेरिकेच्या अध्यक्षीय इतिहासात प्रचंड उलथापालथ घडून दिनांक ८ नोव्हेंबर २०१६ ला डोनाल्ड ट्रंप हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवाराचा २९० विरुद्ध २१८ असा फरक राखून विजयी झाले. ही घटना यथावकाश इतिहासाचा हिस्सा बनेल. पण हा चमत्कार घडला कसा याचा शोध पुढची अनेक वर्षे घेतला जात राहील.फ
एक्झिट पोल (मतदान करून बाहेर पडणारा मतदार कोणाला मत दिले ते सांगतो) हा या शोधाचे बाबतीतला एक विश्वसनीय व तात्काळ माहिती देणारा मार्ग आहे. अमेरिकन लोक स्पष्ट वक्ते, आपण कोण हे सांगणारे, आपली सगळी ओळख देणारे व मोकळेपणाने बोलणारे मानले जातात, त्यामुळे या माहितीची विश्वसनीयता इतर देशवासियांच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे अमेरिकेतील एक्झिट पोलद्वारे मिळणारी माहिती जनमताचा कानोसा घेण्याचे बाबतीत अभ्यासकांना खूप महत्त्वाची वाटते, यात आश्चर्य नाही. अर्थात एकूणएक मतदाराशी बोलता येत नाही, हा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. या मर्यादेत राहूनच निष्कर्षांचा विचार केला पाहिजे.
१. या निवडणुकीत गोऱ्यांची जबरदस्त व्होट बॅंक तयार झाली होती. डोनाल्ड ट्रंप यांनी याबाबतचे सर्व उच्चांक मोडले आहेत. ८४ टक्के गोऱ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही वर्णाधिष्ठित दरी अमेरिकेची पाठ नजीकच्या भविष्यकाळात तरी सोडणार नाही.
२. अपेक्षेप्रमाणे महिला मतदारांची लाट निर्माण झाली नाही. डझनावारी महिलांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या महिलांबाबतच्या कृती व उक्तीबाबत टोकाचा रोष व्यक्त केला होता. यामुळे महिला अभूतपूर्व संख्येत मतदान करतील, असा अंदाज होता. मतदारात महिलांचे प्रमाण ५२ टक्के इतके आहे. २०१२ साली ते ५३ टक्के होते. हिलरी क्लिंटन यांना डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा महिलांची फक्त १२ टक्के जास्त मते मिळाली आहेत. २०१२ साली बराक ओबामा यांना राॅम्नी या रिपब्लिकन पक्षापेक्षा फक्त ११ टक्के जास्त मते मिळाली होती. हिलरी क्लिंटन यांना फक्त एक टक्क्याची बढत मिळणे ही बाब महिलांची महिलेसाठी व स्त्रीलंपटाविरुद्धची लाट मानता यायची नाही.
असे का घडले असावे? याचे काहीसे विनोदी व काहीसे खरे कारण असे आहे की, एक महिला दुसरीली चांगले म्हणत नाही. दुसरे कारण असे आहे की, सैल, मुक्त व स्वैर स्त्री पुरुष संबंध अमेरिकेत आक्षेपार्ह मानले जात नाहीत. जबरदस्ती मात्र खपवून घेतली जात नाही. त्याबद्दल अनेक वर्षांनी आक्षेप घेतले जाणे व तेही निवडणुकीच्या ऐनवेळी  घेतले जाणे यामुळे त्याची परिणामकारकता कमी होते. ‘दी लेडी इज प्रोटेस्टिंग टू मच’, असेही वाटू शकते. तसेच सैल सुटलेल्या जिभेबद्दल आपल्याला लाज वाटते, ते प्रसंग व ती मैफिलही वेगळी होती हा खुलासा अमेरिकन जनतेने क्षमापनयोग्य मानला असे दिसते. खोटेपणा अमेरिकन जनतेला आवडत नाही. बिल क्लिंटन यांनी आपण लफडे नाकारण्याचा खोटेपणा केला अशी कबुली देऊन जनतेची माफी मागताच जनतेने त्यांना माफ केले होते. शिवाय नवऱ्याने लफडी करायची व हिलरीने ती सावरून घ्यायची व तक्रार करणाऱ्या महिलेला आपले वकिली कौशल्य वापरून सळो की पळो करून सोडायचे याचा महिलांना राग आला होता. काही पत्रकार महिलांनी तर हिलरी क्लिंटन यांना निषेधपर अनावृत पत्रे लिहिली होती. त्यामुळे हा मुद्दा दोन्ही उमेदवारांसाठी सारखाच वाईट ठरला असावा. म्हणून महिलांची गठ्ठा मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली नसावीत.
३. डोनाल्ड ट्रंप यांचा स्पॅनिशबहुल मेक्सिकोच्या सीमेवर अजस्त्र भित बांधून घुसखोरांना अडविण्याचा प्रयत्न बहुतेकांना हास्यकारकच नव्हे तर हास्यास्पद वाटला. या भिंतीचा खर्च मेक्सिको या देशाकडून वसूल करणे, मेक्सिकोतून गुन्हेगार व बलात्कारी अमेरिकेत येत आहेत, असा आक्षेप नोंदवणे, मेक्सिकन जजकडून ट्रंप विद्यापीठाला न्याय मिळणार नाही,असा संशय व्यक्त करणे ह्या बाबी जागृत व बुद्धिमान अमेरिकनांना पटल्या नाहीत. मेक्सिकोतून येणाऱ्या लोंढ्यांमुळे लगतची राज्ये बेजार झाली होती, सेवासुविधांवर ताण पडत होता, निरुपायामुळेच लोक मुकाट्याने हात चोळीत बसले होते. त्यांच्या बुद्धीला ट्रंपचे म्हणणे पटत नवहते, तरी मनाचा कौल वेगळा होता.
स्थायिक झालेल्या मेक्सिकन मतदारांमध्ये आपल्या घुसखोर बांधवांबद्दल सहानुभूती निर्माण होईल व ट्रप विरोधात लाट उत्पन्न होईल, असे निरीक्षकांचे भाकीत होते पण स्थायिक झालेल्या मेक्सिकन अमेरिकन नागरिकांनी आपल्या घुसखोर बांधवांची बाजू घेतली नाही, असे दिसते. व अशी लाट आली नाही.
अमेरिकेत ११ टक्के (मूळचे स्पेनचे असलेले) मेक्सिकन मतदार आहेत. घुसखोरी इतकी आहे की, गेल्या चार वर्षात त्यांची संख्या एक टक्याने वाढली आहे. आश्चर्याची बाब ही आहे की, २०१२ मध्ये मेक्सिकन मतदारांनी रिपब्लिकन पक्षाला जेवढी मते दिली होती, त्यापेक्षा जास्त मते ट्रंप यांना दिली आहेत. मेक्सिकन मतदार दुखावले जाऊ नयेत म्हणून हिलरी क्लिंटन यांनी सौम्य भूमिका घेऊन हा मुद्दा थंड्या बस्त्यात टाकला होता तर डोनाल्ड ट्रंप यांनी अव्यवहार्य पण रोखठोक भूमिका घेत हा मुद्दा खूप तापवला होता, पण त्यांनी अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्या मेक्सिकन नागरिकांना चुचकारले. तुम्ही कष्टाळू आहात, तुमच्या मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय झाली पाहिजे; अहो, तसा मी मेक्सिकन लोकांशी जवळीक ठेवूनच आहे. याच भागात माझी रेस्टाॅरंट्स आहेत, मला मेक्सिकन अन्नपदार्थही आवडतात. अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्यांबद्दल माझी तक्रार नाही. येणाऱ्या घुसखोर गुन्हेगार व बलात्कारींना थोपविण्याची माझी भूमिका आहे. हे म्हणणे अनेक स्थायिकांना पटलेले दिसते.
४. २०१२ मध्ये ओबामा यांना पदवीधर व अपदवीधर अशा दोन्ही गटातील  ५० टक्के मतदारांनी मतेदिली होती. २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन यांना पदवीधर ५२ टक्के पण अपदवीधर गटातील  ४३ टक्के मतदारांनी मते दिली आहेत. म्हणजे पदवीधर मतदार किंचित जास्त प्रमाणात (एक टक्का) हिलरी क्लिंटनकडे वळले पण अपदवीधरांचा पाठिंबा ७ टक्यांनी घसरला. पदवीधरांपेक्षा अपदवीधरांची संख्या नेहमीत जास्त असते, हे लक्षात घेतले म्हणजे या प्रश्नाची गंभीरता जाणवेल. पदवीधरही फार मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पक्षापासून दूर गेले नाहीत, याचीही नोंद घ्यावयास हवी.
५. इव्हॅनजेलिस्ट नावाच्या सनातनी ख्रिश्चन मतदारांची संख्या २६ टक्के आहे. २०१२ मध्ये रिपब्लिकन पक्षाला ७८ टक्के मते मिळाली होती तर यावेळी ८१ टक्के मिळाली. आपली तीन लग्ने, लफडी व गटारी भाषा याची जाणीव असल्यामुळे ट्रंप स्वत:हूनच या मतदारांपासून दूर राहिले होते. पण हिलरी क्लिंटन यांची समलिंगी विवाह व गर्भपाताबद्दलची अनुकूल भूमिका लक्षात ठेवून यांनी स्वत:हून त्यातल्यात्यात बरा समजून डोनाल्ड ट्रंप यांना २०१२ मध्ये रिपब्लिकन पक्षाला दिली होती त्या पेक्षा ३ टक्के जास्त मते दिली आहेत.
६. नवीन मतदारांची मते यावेळी १० टक्के होती.यात हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रंप यांना अनक्पमे ५६ व४० टक्के मते मिळाली.
७. आर्थिक मुद्दा दहशतवादावर भारी पडला. हिलरी क्लिंटन यांचा भर अर्थकारणावर तर डोनाल्ड ट्रंप यांचा भर दहशतवादावर होता. ५२ टक्के हिलरी क्लिंटन यांना अनुकूल राहिले तर डोनाल्ड ट्रंप यांना ४२ टक्केच अनुकूलता होती. अमेरिकनांना दहशतवादापेक्षा आर्थिक उन्नती अधिक महत्त्वाची वाटते, असा काहीसा धक्कादायक निष्कर्ष या आकड्यांरून समोर येतो आहे.
८. ८३ टक्के मतदारांना बदल हवा होता. पण डोनाल्ड ट्रंप योग्य बदल घडवून आणतीलच असा अनेकांना विश्वास नव्हता. पण आठ वर्षांच्या ओबामा राजवटीला जनता विली होती. म्हणून पुरेशी खात्री वाटत नसतांनाही सर्व जरी नव्हे तरी अनेक  मतदारांनी डोनाल्ड ट्रंप यांना मते दिली, असे दिसते. पण डोनाल्ड ट्रंप पेक्षा चांगला उमेदवार मतदारांना अधिक आवडला असता.
९. ओबामाकेअर ही गरिबांना वैद्यकीय मदत मोफत पुरवणारी व तो भार सबल आर्थिक गटावर टाकणारी योजना या सबल गटाने (अर्थातच या गटात गोरे मतदार जास्त होते) कधीही मनापासून स्वीकारली नव्हती. त्यातच यात २५ टक्के भार आणखी वाढणार हे आॅक्टोबरमध्ये जाहीर झाल्यावर तर हा गट खूपच चिडला होता. आपण ओबामाकेअर रद्द करू, अशी डोनाल्ड ट्रंप यांची घोषणा होती. त्यामुळे या गटातले ८३ टक्के मतदार डोनाल्ड ट्रंप यांना अनुकूल झाले. अमेरिकेतील निम्यापेक्षा किचित कमी मतदारांवर ओबामाकेअरचा भार पडतो, हे लक्षात घेतले म्हणजे, या प्रश्नाचे महत्त्व लक्षात येईल.
१०. डोनाल्ड ट्रंप यांचे व्यक्तिमत्त्व कोणालाही आवडावे, असे नाही. त्यांचा विजय त्यांच्यावर असलेल्या विश्वासाचे द्योतक मुळीच नाही. ३० ते ४० टक्के मतदारच त्यांना विश्वसनीय, भरवशाचा व अध्यक्षपदासाठी योग्य मनोभूमिका असलेला मानतात. असे असूनही डोनाल्ड ट्रंप काजिंकून आले.? याचे उत्तर असे की, जनता ओबामा यांच्या ८ वर्षांच्या राजवटीला पार विटली होती. कुणीही चालेल पण पुन्हा डेमोक्रॅट पक्ष नको, ही भावना खूप प्रबळ होती. त्यातून हिलरी क्लिंटन यांची प्रतिमा ईमेल्स व क्लिंटन फाऊंडेशनमुळे डागाळलेली होतीच. याबद्दलचा संशय दूर करणे हिलरी क्लिंटन यांना साधले नाही.त्यांचा फाजील विश्वासही त्यांना नडला. शेवटीशेवटी हिलरी क्लिंटन समर्थकांना जाणील झाली. स्वत: ओबामाही भरपूर फिरले पण तोपर्यंत जनतेचा राजवटबदलण्याचा इरादा पक्का झाला होता, असे दिसते. जास्त चांगला म्हणून नाही तर कमी वाईट म्हणून त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या पारड्यात मते टाकलेली दिसतात.
११. ईमेल्स हिलरी क्लिंटन यांची पाठ सोडत नव्हत्याच. शेवटीशेवटी एक बादरायण संबंध दाखवणारे प्रकरण समोर आले. ते अगोदरच  दूषित असलेले मत आणखी दूषित करण्यास पुरेसे ठरले. ऐनवेळी एफबीआयने या नव्याने बाहेर आलेल्या ईमेल्सची दखल घ्यायची आवश्यकता नाही, असे सांगितले. पण ते पालथ्या घागरीवर टाकलेल्या पाण्याप्रमाणे वाया गेले.
१२. मुळातच दर तीनपैकी एकालाच देशाचा कारभार ठीक चालू आहे, असे वाटत होते. या ‘एकापैकी’ नववद टक्के मतदारांनी हिलरी क्लिंटन यांना मत दिले. पण याचा अर्थ असाही नाही का की दर तीनपैकी दोन मतदारांना देशाचा कारभार समाधानकारक रीत्या चालू नाही, असे वाटत होते. या ‘दोनपैकी’ ६९ टक्के मतदारांनी, नाइलाजाने असेल कदाचित, पण डोनाल्ड ट्रंप यांना मते दिली. ‘सगळे काही तुंबले आहे पण मी ते दुरुस्त करीन’, हाडो ट्रंप यांचा स्ट्रॅटेजिक स्ट्राईक ठरला. त्याने किमया केली.
१३. ज्या डिबेट्सचा खूप गवगवा झाला, हिलरी क्लिंटन यांनी डोनाल्ड ट्रंप यांना चारी मुंड्या चीत केले असे म्हले जाते, त्या डिबेट्स मध्ये डोनाल्ड ट्रंप यांची कामगिरी खूप वाईट नव्हती. कुठे एक विद्वान, अभ्यासू, राजकारणात मुरलेली, चतुर विदुषी आणि कुठे एक धच्चोट, अननुभवी बिल्डर? पण मतदारांनी डोनाल्ड ट्रंप यांचेकडे सहानुभूतीने पाहिले. त्यांच्या अननुभवजन्य बावळटपणा, त्यांचे कधीकधी निरुत्तर होणे, कधी मुद्याला सोडून बोलणे हे सर्व जनता बघत होती. पण तिला भावला त्यांचा बेधडकपणा, बेदरकारपणा, रांगडेपणा, स्पष्टवक्तेपणा. शेवटी एक लहानसा मुद्दा. हे गुण महिलांनाही आवडतात, म्हणे.
डोनाल्ड ट्रंप यांचा विजय कसा? निसटता की दणदणीत?
वसंत गणेश काणे
अमेरिकेतील निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले असून ५३८ इलेक्टोरल काॅलेज व्होट्सपैकी(इसीव्ही) डोनाल्ड ट्रंप यांना ३०६ तर हिलरी क्लिंटन यांना २३२ मते मिळाली आहेत . हा डोनाल्ड ट्रंप यांचा ७४ मते अधिक मिळवून संपादन केलेला दणदणीत विजय म्हटला पाहिजे यात शंका नाही.
पण पाॅप्युलर व्होट्सचा विचार केला तर एकूण जवळजवळ १२ कोटी मतदानापैकी हिलरी क्लिंटन यांना ४७.७ टक्के ( ६०.३ दशलक्ष), डोनाल्ड ट्रंप यांना ४७.४ टक्के (५९.९ दशलक्ष), तर इतरांना ४.८ टक्के मिळाली आहेत. म्हणजे हिलरी क्लिंटन यांना ०.३ टक्के मते (२,८०,०००) डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा जास्त मिळाली असून सुद्धा इलेक्टोरल काॅलेज व्होट्स (इसीव्ही) मध्ये ७४ मतांची आघाडी डोनाल्ड ट्रंप यांना  मिळाली आहे व ते निवडून आले आहेत.
हा चमत्कार स्विंग स्टेट्सनी घडविला आहे, असे म्हणता येत नाही. कारण ही राज्ये तशी स्विंग स्टेट्स गणली जात असली तरी २००४, २००८, २०१२ या वर्षी झालेल्या तीन चतुर्वार्षिक निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाकडे होती. म्हणजे गेल्या तीन निवडणुकीत यांचा ‘स्विंग’ डेमोक्रॅट पक्षाकडेच असे. म्हणजे या राज्यात डेमोक्रॅट पक्षाला रिपब्लिकन पक्षापेक्षा सलग तीन निवडणुकीत जास्त पाॅप्युलर व्होट्स मिळत होती. अशी ही राज्ये चार असून ती मिशिगन(१६ मते), व्हिसकाॅन्सिन (१० मते), पेन्सिलव्हॅनिया (२० मते) आणि फ्लोरिडा (२९ मते) अशी आहेत.
१. मिशिगनमध्ये डोनाल्ड ट्रंप यांना मिळालेल्या मतांपैकी ५९१९ मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली असती तर त्यांना हे राज्य व  १६ इलेक्टोरल काॅलेज व्होट्स मिळाली असती.
२. व्हिसकाॅन्सिनमध्ये  डोनाल्ड ट्रंप यांना मिळालेल्या मतांपैकी १३,६२९ मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली असती तर त्यांना हे राज्य व १० इलेक्टोरल काॅलेज व्होट्स मिळाली असती.
३. पेन्सिलव्हॅनियामध्ये  डोनाल्ड ट्रंप यांना मिळालेल्या मतांपैकी ३४,११९ मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली असती तर त्यांना हे राज्य व  २० इलेक्टोरल काॅलेज व्होट्स मिळाली असती.
४. फ्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रंप यांना मिळालेल्या मतांपैकी ५९,८८६ मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली असती तर त्यांना हे राज्य व  २९ इलेक्टोरल काॅलेज व्होट्स मिळाली असती.
याचा अर्थ असा की, ५९१९+ १३,६२९+३४,११९+५९,८८६ = १,१३,५५३ मते रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या मतांमधून डेमोक्रॅट पक्षाकडे गेली असती तर चित्र वेगळे दिसले असते. या निवडणुकीत जवळजवळ १२  कोटी मतदारांनी मतदान केले.
टक्केवारीने हिशोब केला तर पुढीलप्रमाणे चित्र दिसते.
१. मिशिगन(१६ मते) - या राज्यात डेमोक्रॅट पक्षाला ४७.३ टक्के तर रिपब्लिकन पक्षाला ४७.६ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे डेमोक्रॅट पक्षाला फक्त ०.३ टक्के कमी मिळाल्यामुळे गेल्या तीन निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाकडे असलेले राज्य रिपब्लिकन पक्षाकडे गेले.
२. व्हिसकाॅन्सिन - (१० मते) या राज्यात डेमोक्रॅट पक्षाला ४६.९ टक्के तर रिपब्लिकन पक्षाला ४७.९ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे डेमोक्रॅट पक्षाला फक्त १.० टक्के कमी मिळाल्यामुळे गेल्या तीन निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाकडे असलेले राज्य रिपब्लिकन पक्षाकडे गेले.
३. पेन्सिलव्हॅनिया - (२० मते) या राज्यात डेमोक्रॅट पक्षाला ४७.६ टक्के तर रिपब्लिकन पक्षाला ४८.८ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे डेमोक्रॅट पक्षाला फक्त १.२ टक्के कमी मिळाल्यामुळे गेल्या तीन निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाकडे असलेले राज्य रिपब्लिकन पक्षाकडे गेले.
४. फ्लोरिडा - (२९ मते) या राज्यात डेमोक्रॅट पक्षाला ४७.८ टक्के तर रिपब्लिकन पक्षाला ४९.१ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे डेमोक्रॅट पक्षाला फक्त १.३ टक्के कमी मिळाल्यामुळे गेल्या तीन निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाकडे असलेले राज्य रिपब्लिकन पक्षाकडे गेले.
याचा अर्थ असा की, परंपरेने (२००४; २००८;  २०१२) डेमोक्रॅट पक्षाकडे असलेली ही चारी राज्ये पाॅप्युलर व्होट्समधील  १.५ टक्यापेक्षा कमी मतांच्या फरकामुळे रिपब्लिकन पक्षाकडे गेली व त्यामुळे १६+१०+२०+२९=७५ इलेक्टोरल काॅलेज व्होट्स ची आघाडी घेऊन डोनाल्ड ट्रंप निवडून आले.
याला दणदणीत विजय म्हणायचे की निसटता विजय म्हणायचे?

Thursday, November 10, 2016



असे जिंकले डोनाल्ड ट्रंप ?
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेतील निवडणूक आटोपली, डोनाल्ड ट्रंप विजयी झाले पण संपूर्ण देशातील मते (पाॅप्युलर व्होट्स) मोजली तर हिलरी क्लिंटन यांना डोनाल्ड ट्रंपपेक्षा, थोडीशी का होईना, पण जास्तच मते आहेत. पण हा निवडून येण्याबाबतचा निकष नाही. निकाल कुणाला राज्यनिहाय किती इलेक्टोरल व्होट्स मिळाली यावर अवलंबून असतो. संपूर्ण तपशील अजूनही हाती आलेला नाही पण एक नक्की आहे की, हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रंप यांना मिळालेल्या इलेक्टोरल व्हो्समध्ये बराच मोठा फरक आहे. पाॅ्युलर व्होट्स व इलेक्टोरल व्होट्स यात एवढा फरक कसा काय, हा प्रश्न कुणाला पडला तर आश्चर्य वाटायला नको. शिवाय पाप्युलर व्हो्सच्या आधारे निकाल लागणार नसेल तर हा हिशोब करायचाच कशाला? तर पाॅप्युलर व्होट्सच्या आधारे इलेक्टोरल व्होट्स कुणाला किती हे ठरते, असा खुलासा केला तर, वैचारिक गोंधळ आणखीनच वाढतो. यावर एक उपाय आहे. तो म्हणजे अमेरिकन निवडणूक प्रक्रियेचा सुरवातीपासूनच अभ्यास (हो अभ्यास) करणे हा होय. जिज्ञासूंनी तसाच विचार करावा हे चागले.
   अमेरिकेत अध्यक्षाची निवड कशी  होते, हे समजायला तसे थोडेस कठीणच आहे., म्हणून हा द्राविडी प्राणायम करायचा.
मतदार नोंदणी - अमेरिकेत मतदारांचे एक राष्ट्रीय रजिस्टर असून नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी स्वत:हून (स्वत:हून बरं का) अर्ज करणे अपेक्षित आहे. त्यामुळे अर्ज करतील तेच नागरिक मतदार होतील. पण नागरिकांनी अर्ज करून नोंदणी करावी, यासाठी तिथेही मोहिमा आखल्या जातात, हा भाग वेगळा.
पाॅप्युलर व्होट्स- आठ नोव्हेंबर २०१६ ला सर्व अमेरिकन नागरिकांनी मतदान करणे अपेक्षित होते. आजवर साठ टक्यांच्या जवळपास लोक मतदान करीत आले आहेत. २०१६ मध्येही थोड्याफार फरकाने असेच काहीसे झाले असणार. सगळे तपशील हाती यायला थोडी वाट पहावी लागणार आहे. देशभरातून होणाऱ्या एकूण मतदानाचा विचार केला, तर हिलरी क्लिंटन यांना देशपातळीवर ५० टक्यापेक्षा जास्त मते मिळतील असे मानले जात होते व ते खरे ठरले. हिलरी क्लिंटन यांना डोनाल्ड ट्रंपपेक्षा, अगदी थोडी का असेनात, पण जास्त मे मिळाली आहेत. याला पाॅप्युलर व्होट्स असे म्हणतात. पण पाॅप्युलर व्होट्स जास्त आहेत, म्हणून एवढ्यावरूनच  त्या निवडून येतील असे नाही, हे वर आलेच आहे.
आपल्या संसदेची जशी लोकसभा व राज्यसभा अशी दोन सभागृहे आहेत, तशीच अमेरिकन काॅंग्रेसची (संसदेची) हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज (प्रतिनिधी सभा) व सिनेट अशी दोन सभागृहे आहेत.
१. हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज (प्रतिनिधी सभा)- अमेरिकेत लहान-मोठी एकूण ५० राज्ये (प्रांत) असून त्यांच्या वाट्याला लोकसंख्येच्या प्रमाणात रिप्रेझेंटेटिव्ह ( प्रतिनिधी) असतात. जसे कॅलिफोर्निया या सर्वात मोठ्या राज्याला ५३ प्रतिनिधी मिळाले आहेत. पण राज्य कितीही लहान असले तरी त्याचा निदान एक तरी प्रतिनिधी असतोच.  अशी १९ राज्ये आहेत. सर्व प्रतिनिधींची एकूण संख्या एकूण संख्या ४३५ अाहे.
२. सिनेट - सिनेटमध्ये लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्त्व नाही. प्रत्येक राज्याला दोन सिनेट सदस्य असतात. कॅलिफोर्नियासारख्या भल्या मोठ्या राज्याला व अगदी छोट्या एकोणीस राज्यांनाही प्रत्येकी दोनच सदस्य सिनेटवर असतात. अशा प्रकारे सिनेटवर पन्नासच्या दुप्पट म्हणजे एकूण १०० सदस्य असतात.
३. इलेक्टोरल काॅलेज - हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज (प्रतिनिधी सभा) चे ४३५ व सिनेटचे १०० सदस्य मिळून ५३५ ही संख्या येते. काही राज्यांची विशेष परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना एकूण तीन जास्तीचे सदस्य दिले आहेत. अशी ५३८ ही इलेक्टोरल काॅलेज व्होटर्सची एकूण सदस्य संख्या आहे. यापैकी ज्या उमेदवाराचे २७० इलेक्टर्स निवडून येतील. तो सहाजीकच अध्यक्ष म्हणून निवडून येतो.
४. इलेक्टोरल काॅलेजचे सदस्य (इलेक्टर्स) -. हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रंप यांनी प्रत्येक राज्यातून आपले इलेक्टर्स कोण असतील, त्यांची नावे राज्य निहाय निवडणूक आयोगाला दिलेली असतील. कॅलिफोर्निया सारख्या मोठ्या राज्यात ही नावे ५३+२=५५ असतील (हाऊसमधील सदस्य-५३ व सिनेट मधील सदस्स २= ५५) तर एकोणीस छोट्या राज्यात ही प्र त्येकी ३ असतील  (हाऊसमधील सदस्य प्रत्येकी १ व सिनेट मधील सदस्स २= ३). यांची एकूण बेरीज ५३८ होते, हे आपण पाहिलेच आहे. मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासोबत ही इलेक्टर्सची नावे त्या त्या उमेदवाराच्या नावासोबत काही राज्यात छापतात, तर काही राज्यात छापतही नाहीत.
५. इलेक्टर्स कसे निवडून येतात?- आपण कॅलिफोर्नियाचेच उदाहरण घेऊ. ८ नोव्हेंबरला या राज्यातील मतदारांनी मतदान केले आहे. हिलरी क्लिंटन/ डोनाल्ड ट्रंप  यांच्यापैकी ज्याला ५० ते १०० टक्के यांच्या दरम्यान कितीही मते (पाॅप्युलर व्होट्स) मिळाली तरी हिलरी क्लिंटन/डोनाल्ड ट्रंप यांचे सर्वच्यासर्व म्हणजे ५५ इलेक्र्टर्स निवडून आले असे मानले गेले.. या नियमाला विनर टेक्स आॅल, असे म्हणतात. जो परिणाम १०० टक्के मते मिळाल्याने होईल तोच परिणाम ५० टक्क्यापेक्षा एकही मत जास्त मिळाले तरी होतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. सर्व ५० राज्यात याच नियमानुसार इलेक्टर्स निवडून आले आहेत. मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात  इलेक्टर्सची वाटणी होत नाही. ज्याला पॅाप्युलर व्होट्स जास्त त्याचे सर्व इलेक्टर्स निवडून आले आहेत.
कलाटणी देऊ शकणारी राज्ये (स्विंग स्टेट्स) - अमेरिकेत दोन्ही पक्षांचे परंपरागत बालेकिल्ले म्हणावेत अशी राज्ये आहेत. पण काही राज्ये (१३/१४) अशी आहेत की, ज्या राज्यांत दोन्ही पक्षांचे बलाबल जवळपास समसमान असते. निवडणुकीच्या प्रचार मोहीमेद्वारे जो पक्ष ही राज्ये आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होतो, म्हणजे या राज्यात सर्वात जास्त मते मिळवतो, त्याचे सर्व इलेक्टर्स त्या राज्यातून निवडून आले  असे मानावे, असे विनर टेक्स आॅल या नियमानुसार ठरते. म्हणून या राज्यांना  कलाटणी देऊ शकणारी राज्ये (स्विंग स्टेट्स ) असे म्हणतात.
निवडणुकी पूर्वी झालेल्या जनमत चाचणीनुसार डेमोक्रॅट पक्षाच्या हुकमी इलेक्टोरल मतांची संख्या २१७ इतकी तर रिपब्लिकन पक्षाच्या हुकमी इलेक्टोरल मतांची संख्या १९१ होती. म्हणजे दोन्ही पक्षांची एकूण हुकमी इलेक्टोरल मते २१७+ १९१ = ३०८ इतकी होतात. याचा अर्थ असा की, १३०   इलेक्टर्स चाचणी झाली तेव्हातरी कुंपणावर आहेत. ते कुणाकडे जाणार  ते आज सांगता येत नव्हते. या १३० पैकी डेमोक्रॅट पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी ५३ इतकी तर रिपब्लिकन पक्षाला ७९ इतकी इलेक्टोरल मते हवी होती. ही १३० इलेक्टोरल मते कलाटणी देऊ शकणाऱ्या राज्यातील (स्विंग स्टेट्स) मते होती. अशी जवळपास १३/१४ राज्ये असून त्यात प्रामुख्याने फ्लोरिडा(२९ मते), पेन्सिलव्हॅनिया (२० मते), ओहायो (१८ मते), नाॅर्थ करोलिना (१५ मते), व्हर्जिनिया(१३ मते), व्हिस्काॅन्सिन (१० मते) आणि ४ छोटी राज्ये (उरलेली मते) आहेत. या राज्यात सर्वसामान्य मतदारांची ५० टक्यापेक्षा जास्त मते(पाॅप्युवर व्होट्स) आपल्यायला मिळावीत, यासाठीच शेवटच्या टप्यातील प्रचार युद्ध सुरू होते. कारण ज्या पक्षाला राज्यात पन्नास टक्याच्यावर सर्वसामान्य मते (पाॅप्युलर व्होट्स) मिळतील, त्या राज्याच्या वाट्याचे सर्व इलेक्टर्स निवडून आले असे ठरणार होते. असे २७० इलेक्टर्स ज्या उमेदवाराचे निवडून येतील, तो अमेरिकेचा अध्यक्ष होईल मग त्याला पाॅप्युलर व्होट्स कितीही असोत. या नियमानुसार डोनाल्ड ट्रंप यांचा विजय झाला आहे. त्यांना २७६ पेक्षा जास्त (बहुदा २९०) इलेक्टोरल व्होट्स मिळाली आहेत, असे दिसेल.
कोणत्या राज्याचा स्विंग कोणाकडे राहिला -  यात २९ इलेक्टोरल व्होट्स असलेले   प्रमुख राज्य आहे फ्लोरिडा. या राज्यात ४९ व ४८ टक्के अनुक्रमे डोनाल्ड ट्रंप व हिलरी क्लिंटन अशी काट्याची टक्कर झाली. २०१२ सालच्या निवणुकीत हे राज्य डेमोक्रॅट पक्षाकडे होते. ते डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्याकडे खेचून आणले. दुसरे राज्य मिशीगन(१६ मते) यातील डोनाल्ड ट्रंप यांची आघाडी तर फक्त ०.३ टक्क्यांचीच आहे. मिनेसोटा (१० मते इलेक्टोरल व्होट्स ) राज्यात फक्त १.४ टक्यांचा फरक आहे. नेवाडा (६ मते) २.४ टक्के फरक; न्यू हॅपशायर (४ मते) ०.२ टक्के फरक; पेनसिलव्हॅनिया (२० मते) १.१ टक्के फरक; व्हिस्काॅन्सीन(१० मते) १.० टक्के फरक आहे. ही राज्ये २०१२ मध्ये डेमोक्रॅट पक्षाने जिंकली होती. ओहायओ (१८ मते) हे राज्य तर ९ टक्के मताधिक्याने डोनाल्ड ट्रंप यांनी खेचून आणले आहे. या उलट हिलरी क्लिंटन यांना २०१२ साली रिपब्लिकन पक्षाने जिंकलेले एकही राज्य आपल्याकडे खेचता आलेले दिसले नाही. जी राज्ये हिलरी क्लिंटन यांनी राखली त्या राज्यातही मतांची टक्केवारी २०१२ च्या तुलनेत कमीच होती. कॅलिफोर्निया हे भारतीयांची बरीच संख्या असलेले व ५५ इलेक्टोरल व्होट्स असलेले राज्य हिलरी क्लिंटन यांनी आपल्याकडे राखले. इलुनाय(२० मते); मेरीलॅंड(१० मते); मॅसॅच्युसे्स (११ मते); न्यू जर्सी (१४ मते); न्यूयाॅर्क (२९ मते); हे बालेकिल्ले हिलरी क्लिंटन यांनी राखले खरे पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांची एकूण इलेक्टोरल व्होट्स २१८ पाशीच रेंगाळली आहेत.
निष्कर्ष - हा तपशील व असे अनेक तपशील समोर असतील तरच काही निष्कर्ष काढता येतील.
१. जनतेला बदल हवा होता.
२. डोनाल्ड ट्रंप यांची सूप्त लाट होती. ती शेवटी शेवटी लक्षात आली व ओबामाही हिरिरीने रिंगणात उतरले पण आता उशीर झाला होता.
३. आफ्रिकन अमेरिकन (कृषणवर्णी) व मेक्सिकन या डेमोक्रॅट पक्षाच्या हुकमी मतदारांच्या पचनी सुद्धा, राष्ट्राध्यक्षपदी महिला उमेदवार असावी, हे पडत नव्हते. या मतदारांपैकी २०/२५ टक्के मतदारांनी डोनाल्ड ट्रंप यांना मते दिलेली दिसतात.
४. महिलांनी हिलरी क्लिंटन यांना हिरिरीने मते दिली खरी पण त्यांची टक्केवारी ५० ते ६० टक्के इतकीच होती. सनातनी विचारांच्या महिलांनी ( ७५ टक्के अमेरिकन सनातनी
विचाराचे आहेत, सर्व अमेरिकन म्हणजे आधुनिक विचाराचे ही समजूत चुकीची आहे.)
५. जनतेतील तृणमूल स्तरावरचे घटक (ग्रास रूट लेव्हल) हे आपल्या मायवतींच्या मतदारांसारखे आहेत. ते बोलघेवडे नाहीत. त्यांच्यावर प्रचाराचा फारसा परिणाम होत नाही.
६. अतिरेक्यांना धर्म नसतो, हे सर्वसाधारण अमेरिकनांना पटलेले दिसत नाही. ते ट्विन टाॅवर्सचा विध्वंस विसरले नाहीत.
७. अगोदर देशांचीआर्थिक स्थिती सुधारा, जागतिक राजकारण त्या त्या देशांनी पहावे, ही भूमिका त्यांना पटली.
८. स्थलांतरीत व नोकऱ्या पटकावणाऱ्यांना प्रवेश नको.
असे काही निष्कर्ष काढतां येतील, पण त्यासाठी सर्व डेटा तपशीलवार पाहायला हवा आहे.