Monday, June 25, 2018

चि श्री प्रथमेश व चि सौ कां राधिका यासी,

श्री
चि श्री  प्रथमेश व चि सौ कां राधिका यासी,
अनेक शुभाशीर्वाद. आपल्या विवाह समारंभाचे निमंत्रण मिळाले. आपणाउभयतांचे वैवाहिक जीवन सुख, संमृद्धी आणि वैभवाचे जावो. विवाहसोहळा मौजेचा आणि आनंदाचा होवो. या आनंद्प्रसंगी काही विचार आपणासमोर ठेवण्याची अनुमती घेतो. हे विचार तसे आमचे नाहीत, ही गोष्ट प्रथमच सांगून टाकतो. आपल्या पूर्वजांनी/ ऋषीमुनींनी हे विचार संस्कृत मंत्रांच्या स्वरूपात पद्यात मांडले आहेत. कालमानानुसार हेच विचार आता गद्य स्वरूपात आणि मराठीत मांडले तर ते सहज आणि लवकर समजतील, असे वाटते. म्हणून नुसते ‘नांदा सौख्य भरे’, असे म्हणून आणि ‘वाजवा रे वाजवा’, अशी वाजन्त्रीवाल्याला सूचना देऊन मोकळे होताहोता, सवडीने हे विचार आपण उभयतांनी एकत्र बसून वाचावेत आणि त्यावर विचार करावा, अशी विनंतीवजा सूचना करीत आहोत. हे वाचून आपणाउभयतांना काय वाटले ते कळविण्याइतकी सवड काढणे शक्य झाले, तर आम्ही आपले विशेष आभारी होऊ.
विवाह समारंभ वैदिक पद्धतीने होणार नसणाऱ्याचे बाबतीतही हे विचार सार रूपाने लागू पडतील, असे त्यांचे स्वरूप आहे.
आता प्रत्यक्ष विवाह समारंभाकडे वळू या. 
साखरपुड्याचे वेळी म्हणतात, तुमचा हेतू एक असो, तुमची मते एक असोत, तुमची हृदये एकरूप असोत. तुमच्या सर्व संघटनास सामर्थ्य येईल, असे वागा.
‘तदेव लग्नं सुदिनं तदेव...’ ला सुरवात होताच एकच तारांबळ उडते. कारण मुहूर्त साधायचा असतो. या मंत्राचा अर्थ असा आहे. ‘हे लक्ष्मीपते, तुझ्या चरणांचे मी स्मरण करतो. हे स्मरण हीच उत्तम लग्नवेळ. हाच उत्तम दिवस. नक्षत्रे, चंद्र, विद्या आणि दैव यांची हीच अनुकुलता होय.
विवाहप्रसंगी वर म्हणतो, मी आकाश आहे, तू पृथ्वी आहेस. मी सामवेद आहे, तू ऋग्वेद आहेस. आपण एकमेकांवर प्रेम करू, एकमेकास शोभवू, एकमेकास आवडती होऊ, एकमेकांशी निष्कपटपणे वागून शतायुषी होऊ.
सप्तपदीचे वेळी वर म्हणतो, हे वधू, तू सासुसासऱ्यावर, नणदा, दीर, जावांवर प्रेमाची सत्ता चालवणारी हो.
गृह्प्रवेशाचेवेळी म्हणतात, हे वधू, तू या कुळात येत आहेस. येथे संतातीयुक्त होऊन तुला आनंद मिळो. या घरात खऱ्या गृहिणीची कर्तव्ये तू दक्षतेने पार पाड. येथे पतीसहवर्तमान आनंदाने रहा. तुम्ही या घरात बहूतकाळ राहून झालात, असे लोक म्हणू देत.
चाळणीने धान्य शुद्ध करून घेतात, त्याप्रमाणे या घरात शुद्ध, संयमपूर्वक वाणीचा उपयोग केला जातो. म्हणून थोरामोठ्यांची या घरात मैत्री जमते. अशी गोड भाषा बोलणाऱ्याचे जिभेवर लक्ष्मी वास करते. 
लग्न म्हणजे दोन हृदयांचे मीलन, मनांचे मीलन, एकमेकांची निर्मळ हृदयपुष्पे एकमेकास समर्पित करणे. अग्निभोवतीची सात पावले म्हणजे, जन्मोजन्मीच्या सहकाराची ग्वाही. पतिपत्नी सुखात वा दु:खात सदैव बरोबर असतील. बरोबर चढतील, बरोबर पडतील. 
भोवती सूत गुंडाळले म्हणजे काय? आता पतिपत्नींचा जीवनपट एकत्र विणला जाणार. ताणाबाणा एकत्र येणार. आता पृथक, अलग, वेगळे असे काहीही राहणार नाही. 
देहावर प्रेम असण्याने खरे प्रेम जडत नाही. आपण प्रारंभ देहापासून करू, पण देहातीत होऊ. माणूस अंगणातून ओसरीवर येतो, माजघरात येतो, मग देवघरात जातो. तसेच वधूवरांनी परस्परांच्या  हृदयातील देवघरात शिरले पाहिजे. पतीला पाहताच पतीतील दिव्यता पत्नीला जाणवावी, पत्नीला पाहताच ती पतीला देवता वाटावी.
माझ्या कुळात कोणी खोटे बोलणार नाही. माझ्या कुळात कोणी अपमान सहन करणार नाही, माझ्या कुळात अतिथीला नकार मिळणार नाही. अशा रीतीने कुळाची परंपरा आता पुढे चालवायची आहे.
विवाहाचे वेळी टाळी वाजवताच अंतरपाट दूर केला जातो. वधूवरात आता अंतर नको. आता जीवन एकरूप झाले. आता परस्परास शोभवू, संतोषवू. माझे ते तुझे आणि तुझे ते माझे.
वरातीचे वेळी सोळा दिव्यांनी ओवाळले जाते. झाल प्रत्येकाच्या माथ्याला लावली जाते. हे सोळा दिवे म्हणजे चंद्राच्या सोळा कला. चंद्राला मनाची देवता मानले आहे. चंद्राच्या मागे सदैव कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाचे शुक्लकाष्ठ लागलेले असते. चंद्र कधी अर्धा, कधी पाव तर कधी मुळीच नाही. आपल्या मनाचेही तसेच आहे. कधी अत्यंत उत्साही तर कधी अगदी निराश. कधी सात्विक वृत्तीने उचंबळलेले, तर कधी द्वेषमत्सराने बरबटलेले. तुम्हा वधूवरांच्या संबंधात मात्र या चंचल मनाचा पूर्णरीत्या विकास होवो. झालीतील झळाळणाऱ्या ज्योतीप्रमाणे तुमच्या आत्मचंद्राचा प्रकाश पडो. 
अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. पुरुष कठोर असतो. स्त्री मृदू असते. पुरुषाने स्त्रीपासून मृदुता शिकायची. स्त्रीने पतीपासून कठोर व्हावयास शिकायचे. प्रसंगी मेणाहून मऊ तर जरूर तेव्हा वज्राहून कठोर होता आले पाहिजे. केवळ पुरुष अपूर्ण आहे. केवळ स्त्रीही अपूर्ण आहे. दोघांच्या गुणांच्या मीलनात पूर्णता आहे. गृहस्थाश्रम म्हणजे पतीपत्नींनी पूर्ण व्हायची शाळा. 
आपल्या विवाह संस्काराच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचा अर्थ हा असा आहे. विवाह समारंभ नेहमीच घाईगर्दीत पार पडतो. त्यावेळी मंत्रांचा अर्थ कुणी सांगत नाही आणि सांगितला तरी तिकडे कुणाचे फारसे लक्षही नसते. अगोदर त्यांचा किंवा त्यातील प्रतिकांचा अर्थ कळला तर त्या सोहळ्याची गोडी अधिक वाढेल. नंतरही कळला तरी तो संपूर्ण सोहळा आपल्या डोळ्यासमोर पुन्हा उभा राहील आणि एक वेगळाच आनंद आपल्याला अनुभवाला येईल. पुन:प्रत्ययाचा आनंदही खूप सुखऊन जातो, असे म्हणतात.
आपल्या विवाहाचे निमंत्रण मिळाले. साधे शुभेच्छा पत्र पाठविण्याऐवजी हे लांबलचक पत्र पाठवीत आहे. कारण आपल्याकडील अगत्यपूर्वक पाठविलेले निमंत्रण मिळाले, त्याचवेळी एक सुखी दाम्पत्य भेटीला आले होते, त्यांना विवाह संस्काराचा अर्थ उमगला होता तसाच तो आपल्यालाही उमगावा म्हणून हा आपल्या परीने केलेला एक अल्पसा प्रयत्न आहे.
पुन्हा एकदा शुभेच्छा.
आपला स्नेहाकांक्षी 
वसंत काणे (वसंत काणे परिवाराच्या वतीने )
blog – kasa mee? asa mee? my experiences, observations and inferences
(0712)22216899422804430                                                               

इफ्तार पार्टी त्यांची व यांची!

 इफ्तार पार्टी त्यांची व यांची!
वसंत गणेश काणे,     बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
मुस्लिमांमध्ये इफ्तार म्हणजे रमझानच्या महिन्यात उपास सोडण्यासाठी केलेले भोजन.  हे त्यांचे त्या दिवशीचे दुसरे भोजन असते. पहिले भोजन म्हणजे सुहूर सूर्योदयापूर्वी केलेले असते. यानंतर पाणीही न पिता सूर्यास्तानंतर लगेच इफ्तार असते. ह्याची वेळ ठरलेली असून तिला मघ्रिब ( सूर्यास्तानंतर लगेच) असे नाव आहे.  हे सूचित करण्यासाठी अधान म्हटले जाते. अधान ही प्रार्थनासाठीची व पूर्वीची हाक आहे, असे म्हणता येईल अर्थातच हा मघ्रिब काळ अतिशय अल्प असतो. याला धार्मिक महत्त्व अाहे. यानंतर लगेच प्रार्थना म्हणायची असते. हे परमेश्वरा(अल्ला) तुझ्यासाठी मी हा उपास ठेवला असून तुझ्याच आशीर्वादाने मी तो सोडतो आहे, असे काहीसे या प्रार्थनेचे स्वरूप असते. ही प्रार्थना मध्रिब संपायच्या आत पूर्ण करायची (म्हणायची) असते.  हे समूह स्वरूपात एकत्रित येऊन करावयाचे असते. यावेळी तीन खजूर खायची प्रथा आहे. पण तसे बंधन मात्र नसते. पैगंबरसाहेब याप्रकारे उपास सोडत असत, असे म्हटले जाते. इफ्तार हे धर्माचे /धर्मादाय स्वरुपाचे (चॅरिटी/पुण्याचे?) काम अाहे, असे मानतात. पार्टी या शब्दाचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. तिला धार्मिक महत्त्व नाही.
 इफ्तारला मुस्लिम धर्मात महत्त्वाचे स्थान असले तरी इफ्तार पार्टीला तसे धार्मिक महत्त्व नाही. त्यांना जे महत्त्व आहे, ते राजकीय आहे. म्हणूनच राजकीय पुढारी, सेलेब्रिटीज, उद्योजक, म्हणूनच रमझानच्या दिवसात जंगी इफ्तार पार्टीचे आयोजन करीत असतात. विशिष्ट प्रकारच्या (कधिकधि महागड्याही) टोप्या मुस्लिम बांधव घालून आलेले असतात.
काॅंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी इफ्तार पार्टीचे नुकतेच आयोजन केले होते. यावेळी एका मुस्लिम कार्यकर्त्याने मोठ्या प्रेमाने व भक्तिभावाने त्यांना घातलेली टोपी त्यांनी मोजून पाच सेकंदच डोक्यावर ठेऊन नंतरलगेच काढली. हे चॅनलवालेही कसे बेरकी असतात पहा. त्यांनी अगदी घड्याळाचे ठोके मोजून हे वृत्त सचित्र स्वरुपात दिले आहे. यामुळे तो मुस्लिम कार्यकर्ता चांगलाच नाराज झाला व म्हणाला की, आपल्या हिंदू व्होट बॅंकेला धक्का लागेल, म्हणून राहूलजींनी असे केले. राहूलजी करायला गेले काय आणि झाले भलतेच. याचवेळी शर्टावरून जानवे घालून ते आले असते, तर डोक्यावर टोपी व खांद्यावरून जानवे असा समतोल त्यांना साधता नसता का आला? हरकत नाही रमझानचा महिना पुढच्याही वर्षी येईलच की.

मोदीप्रणित सागर विश्वासाचा

मोदीप्रणित सागर विश्वासाचा
वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee?  


 इंटरनॅशनल इंस्टिट्यूट फाॅर स्ट्रॅटेजिक स्टडीज (आयआयएसएस) ही जगातील एक स्वायत्त संस्था मानली जाते. स्वायत्त हे विशेषण लावणाऱ्या अनेक संस्था जगात आहेत पण ही मात्र खरीखुरी स्वायत्त संस्था आहे. शांग्रि-ला डायलाॅग (एसएलडी) हा संवाद सुद्धा याच जातकुळीचा आहे. याला इंडिपेंडंट थिंक टॅंक म्हणून गौरविले जाते. हा ट्रॅक वन प्रकारचा आहे. म्हणजे देशोदेशींच्या सरकारांचे संरक्षण मंत्री, सैन्यदल प्रमुख आणि आशियातील 28 देशांचे प्रमुख या व्यासपीठावर आपले विचार मांडत असतात, तसेच श्रोते म्हणून हेही सहभागी होत असतात. 2002 पासून हा उपक्रम सुरू आहे. सिंगापूरमधील शांग्रि-ला अतिभव्य हाॅटेलमध्ये हा उपक्रम सुरू असल्यामुळे शांग्रिला डायलाॅग असे नाव या संवाद प्रकाराला प्राप्त झाले आहे.
 मुक्त व नियमाधिष्ठित व्यवस्था
   इंडो पॅसिफिक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विभागातील एक प्रमुख राष्ट्रनेता या नात्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या व्यासपीठावरून जगाला उद्देशून जे प्रमुख बीजभाषण झाले त्यातून त्यांची दूरदृष्टी तर दिसून आलीच पण या बीजभाषणातून व्यक्त झालेल्या विचारांना एक शीर्षक (टेम्प्लेट) प्राप्त झाले आहे. ते आहे, ‘मुक्त व नियमाधिष्ठित व्यवस्था’ (ओपन ॲंड रूलबेस्ड आॅर्डर). या व्यासपीठावरून विचार मांडणारे  व भारताची भूमिका मांडणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. या भाषणाच्या द्वारे त्यांनी स्वत:बरोबरच या विभागाला जगाच्या केंद्रस्थानी आणून ठेवले आहे.
 परस्परसंबंधात जोडीदाराचे नाते हवे.
  आशियात सहकार्याचे वातावरण निर्माण व्हावे, चीन बरोबरचा सीमाप्रश्नावरून निर्माण झालेला तणाव कमी व्हावा, ही भारताची भूमिका आहे. या भाषणाच्या निमित्ताने मोदींनी उद्दिष्टपूर्तीचा एक मार्गच (रोडमॅपच) सादर केला आहे. इंडो-पॅसिफिक रीजन म्हणून जो प्रदेश ओळखला जातो, त्याचे अंत: सामर्थ्य (पोटेंशियल) खूप आहे. पण चीनच्या कारवायांमुळे सध्या त्याला ग्रहण लागले आहे. भारताचे चीनशी असलेले संबंध बहुस्तरीय आहेत, हे स्पष्ट करतांना मोदी म्हणाले की, व्यापारिकदृष्ट्या विचार करता चीन व भारत एकमेकांचे महत्त्वाचे जोडीदार आहेत. पण आपल्या व्यापाराच्या कक्षा वाढविण्याच्या व पायाभूत रचना उभारण्याच्या चीनच्या आपमतलबी व जबरदस्तीच्या प्रयत्नांमुळे संघर्षाची स्थिती निर्माण होत असते. दोन बरोबरीचे जोडीदार म्हणून चीन व भारत यात संबंध निर्माण व्हावयास हवेत. आपलाच फायदा करून घेण्याचे प्रयत्न या दृष्टीने बाधक आहेत. भारताचे चीनशी जे व्यापारी संबंध आहेत, त्यानुसार चीनला निर्यात होणाऱ्या मालावर जकातेतर बंधने (नाॅन-टेरिफ बॅरियर्स) घातल्यामुळे ही कृती मुक्त व्यापाराच्या संकल्पनेला बाधक ठरते आहे. आपल्या देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आयातीचा कोटा निश्चित करणे, देशांत निर्माण झालेल्या मालाला सबसिडी देणे या चीनच्या धोरणामुळे भारताच्या चीनला निर्यात करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होत आहेत. 
   मृदू कर्ज योजना (साॅफ्ट लोन प्लॅन)
  चीनच्या बेल्ट रोड प्रकल्पामुळे इतर छोट्या सहकारी देशांवर खर्चाचा व म्हणून कर्जाचा इतका बोजा पडणार आहे की, त्याची भरपाई ते देश करूच शकणार नाहीत. त्यामुळे आपली स्वायत्तताच गमावून बसण्याची पाळी त्यांच्यावर येऊन ते ीनचे आर्थिक गुलाम होणार आहेत. वास्तवीक पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीतून विश्वासाचे वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. संबंधित अन्य देश समृद्ध व्हायला पाहिजेत. पण इथे नेमके उलट घडते आहे. म्हणून मोदींनी सुचविलेला इंडो-पॅसिफिक रीजनचा पर्याय यावरचा उत्तम उतारा ठरतो आहे. 
  भारत, आॅस्ट्रेलिया, जपान व अमेरिका हे लोकशाहीप्रधान चार देशही एकत्र येण्याचा विचार करीत आहेत. भारत व जपान यांनी चीनच्या बेल्ट ॲंड रोड इनिशिएटिव्हला पर्याय म्हणून थाललंड व म्यानमार यांच्या सीमेवर दवेई येथे बंदर विकसित करण्याचे ठरविले आहे. बांग्लादेशात प्यारा व मतरबारी येथेही बंदराचा विकास करण्याचे घाटत आहे. तसेच श्रीलंकेत त्रिंकोमाली येथे व्यापारी बंदराचा विकास केला जाणार आहे.  हे सर्व मृदू कर्ज (साॅफ्ट लोन) तत्त्वावरील प्रकल्प असणार आहेत. त्यामुळे हे देश कर्जाच्या ओझ्याखाली पिचले जाणार नाहीत. याउलट वन बेल्ट वन रोड या चिनी प्रकल्पात मात्र संबंधित देश कर्जाच्या बोजाखाली  चीनचे आर्थिक गुलाम होतील.
पॅसिफिकसोबत भारताचा उल्लेख 
   लोकांना इंडिया माहीत आहे, पॅसिफिक महासागरही माहीत आहे. आफ्रिकेपासून सुरू होऊन अमेरिकेला जाऊन भिडणाऱ्या  व युरेशिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्तीर्ण भूमीला सागरस्पर्श करणाऱ्या या प्रदेशाची पूर्वी नुसती पॅसिफिक रीजन ही ओळख होती. हे जणू पृथ्वीवरील मानवनिर्मित नव्हे तर निसर्गनिर्मित शिल्पच आहे. त्याला अमेरिकेने इंडो-पॅसिफिक रीजन हे नाव नव्याने देऊ केले आहे. भारत व अमेरिका यातील स्थायी मैत्रीचा हा पाया ठरू शकेल, या जाणिवेनेच अमेरिकेने भारताविषयीची ही आस्था दाखविली आहे. तसेच या प्रदेशावर दिवसागणिक वाढत चाललेल्या चिनी वर्चस्वाला आळा घालण्याची ताकद जर कुणात असेल तर ती भारतात आहे, ही जाणीव झाल्याने अमेरिकेने भारताचे नाव या पॅसिफिक रीजनला देऊन वस्तुस्थिताची जाणीव स्वत:सोबत इतर देशांनाही करून दिली आहे. ही काही भारताची मागणी नव्हती की तसा भारताचा आग्रह किंवा प्रस्ताव नव्हता. पण मोदींच्या द्रष्टेपणातून भारताला जे महत्त्व प्राप्त झाले आहे त्याची पावती अमेरिकेने इंडो-पॅसिफिक रीजन हे नामाभिदान करून दिली आहे. हा प्रदेश नजीकच्या भविष्यकाळात केवळ आर्थिकच नव्हे तर सांस्कृतिक जनित्र म्हणूम ओळखला जावा, इतपत अंत:सामर्थ्य या प्रदेशात आहे. जर हे भाकीत प्रत्यक्षात उतरायचे असेल तर व्यवहारात पारदर्शिता, सर्व संबंधितांमध्ये तशी प्रबळ इच्छाशक्ती, आचरणात स्वामित्त्वाऐवजी आकार व सामर्थ्यनिरपेक्ष समतेचा भाव व परस्पर विश्वास वाटावा अशी आश्वासकता निर्माण होण्याची व अनुभवाला येण्याची नितांत आवश्कता आहे. हे म्हणतांना मोदींनी ब्रुनाई, मलेशिया, फिलिपीन्स, तायवान आणि व्हिएटनाम या तुलनेने चीनपेक्षा आकारात व सामर्थ्यात लहान असलेल्या देशांच्या मनातल्या भावनाच व्यक्त केल्या आहेत. कब्जा/ताबा मिळविण्याच्या रणनीतीवर आधारलेले करारमदार हा याऐवजीचा पर्याय असू शकत नाही. पॅसिफिक महासागर हा विश्वासाचा सागर झाला पाहिजे. मुक्त हवाई व समुद्र मार्ग, परस्पर सहजसंपर्कव्यवस्था (कनेक्टिव्हिटी), आंतरराष्ट्रीय नियम व संकेत यांचा पुरस्कार व त्यानुसार शांततापूर्ण मार्गाने समस्यांची सोडवणूक करण्याची वृत्ती सर्व संबंधितात असणे आवश्यक आहे. या प्रदेशातील जनतेच्या स्थायी, सुरक्षित व संमृद्ध जीवनाच्या आकांक्षांना खतपणी पुरविण्याचा यापेक्षा दुसरा/वेगळा मार्ग असू शकत नाही, हे मोदींनी आपल्या इंडोनेशिया, मलेशिया व सिंगापूर या तीन देशांच्या भेटीदरम्यान केलेल्या भाषणांमधून अधोरेखित केले आहे. या निमित्ताने डोकलाम व अन्य प्रश्नी भारत व चीन यांनी वैचारिक परिपक्वता व शहाणपणाचा मार्ग कसा अनुसरला याचा उल्लेख करण्यासही मोदी चुकले नाहीत. मोदींच्या या भूमिकेबद्दल कदाचित वरकरणी असेल, पण स्वागत करण्यावाचून चीनलाही पर्याय उरला नाही व शांघाय परिषदेच्या निमित्ताने झालेल्या भेटीत सुद्धा परस्परसहकार्याची महती गावी लागली,  यातील मर्म लक्षात घेतले पाहिजे.

नक्षलवादी, दुहेरी, तिहेरी व दुटप्पीही!

नक्षलवादी, दुहेरी, तिहेरी व दुटप्पीही!
वसंत गणेश काणे,  बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee?
   कोरेगाव-भीमा दंगल प्रकरण अजूनही गाजतेच आहे. या संबंधात एल्गार परिषदेचे आयोजक मानली जाणारी एक व्यक्ती, नागपूर येथील दोन वकील आणि दिल्लीस्थित एक कार्यकर्ता यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.  तसेच  नागपूर विद्यापीठाच्या एका प्राध्यापिकेचीही  चौकशी सुरू असून तिच्या घराची झडती घेण्यात आली आहे. यासोबतच दलित संघटनांमध्ये हिंसक माओवादी विचार पेरण्याची जी मोहीम माओवाद्यांकडून सुरू आहे, तिचा पर्दाफाश यानिमित्ताने झाला असून पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या थिंक टँकलाही मोठा धक्का बसला असल्याची चर्चा आहे. दिल्लीला अटक झालेला कार्यकर्ता मूळचा केरळचा आहे. नक्षली थिंक टँकचा प्रमुख असलेल्या साईबाबाला अटक झाल्यानंतर या कार्यकर्त्याकडे त्याच्याकडची जबाबदारी सोपविण्यात आली होती. नक्षली चळवळीत जंगलातील माओवादी व शहरातील माओवादी यांच्यातील निरोपांची देवाणघेवाण करणाऱ्या नागपुरातील एका कार्यकर्त्याचाही या निमित्ताने पोलिस तपास करीत आहेत. नक्षलवाद्यांचे निरनिराळे चेहरे, मुखवटे, स्लीपर सेल,थिंक टॅंक याबद्द्ल सतत निरनिराळ्या धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. एखादा वरकरणी साधा वाटणारा प्रश्न जेव्हा अचानक व प्रमाणाबाहेर ऊग्र रूप धारण करतो, तेव्हा त्यामागे नक्षलवाद्यांची थिंक टॅंक असते, असे यापूर्वीही अनेकदा लक्षात आले आहे. अशी प्रकरणे न्यायलयांच्या कसोटीवर अनेकदा उतरत नाहीत व ही मंडळी पुन्हा उजळ माथ्याने समाजात प्रागतिक विचाराचे म्हणून वावरू लागतात. त्यामुळे या सगळ्यांची माहिती सामान्य नागरिकांपर्यत पोचणेही आवश्यक झाले आहे.
नक्षलवादाचा उगम 
   नक्षलवादी हे नाव पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी सबडिव्हिजनमधील नक्षलबारी या नावाच्या खेड्यावरून आले आहे. नक्षलवादी/माओवादी यांच्या उठावानंतर हे खेडे प्रसिद्धीला आले. हे खेडे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या तराई प्रदेशाला लागून आहे. नक्षलबारी व नेपाळ यांना वेगळे करणारी मेची नदी मात्र नेपाळच्या हद्दीतून वाहते.
  नक्षलवाद्यांचे अध्वर्यू 
  1967 साली गरीब शेतकऱ्यांनी नक्षलबारीला उठाव केला व कसेल त्याची जमीन हा नारा दिला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 11 जण मृत्युमुखी पडले. कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (माओवादी) या गटाने इथे नक्षलबारीला लेनिन, स्टॅलिन व माओ यांचे पुतळे उभारले आहेत. गोळीबारत मरण पावलेल्यांची नावे कोरलेला एक स्तंभही इथेच आहे. चारू मुजुमदार, कानू सन्याल व जंगल संथाल हे नक्षलवादी चळवळीचे प्रणेते मानले जातात. हा नक्षलवाद्यांचा मूळ व पहिला गट म्हणता येईल.
  दंडकारण्य नक्षलवाद्यांचे प्रभाव स्थान 
 आज नक्षलवादी चळवळ पूर्वी ज्या भूभागाला दंडकारण्य म्हणून संबोधले जायचे त्या भागातच मुख्यत: प्रभावी आहे. या पूर्वीच्या दंडकारण्याचा आजचा उरला सुरला भाग चार राज्यात म्हणजे मध्यप्रदेश, ओडिशा, आंध्र व तेलंगणा या त विभागला गेलेला आढळतो. मध्यप्रदेशातील बस्तर, ओडिशाचा तुलनेने एक मोठा भाग, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा व आसपासचा थोडासा भूभाग आणि पूर्वीच्या आंध्रप्रदेशातील व आजच्या तेलंगणातील बराचसा भाग म्हणजे प्राचीन दंडकारण्याचे आधुनिक काळातील अवशिष्ट रूप आहे, असे म्हणावयास हवे. तसा हा भूभाग सलग आहे. पण आज चार राज्यात विभागला गेल्यामुळे ही चार राज्ये आपापल्या परीने येथील सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण हाताळत आहेत. प्राचीन दंडकारण्य हे एक निबिड अरण्य होते. आजचे उर्वरित दंडकारण्य त्या निबिडपणाची आठवण करून देण्याइतपत निबिड निश्चितच आहे. त्यामुळे या भागात सैनिकी कारनाई करतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. हा नक्षलवाद्यांचा दुसरा गट म्हणावा लागेल.
  शोषित, पीडित, वंचितांना मदत केलीच पाहिजे
   भारतात शोषित, वंचित, पीडित लोक भांडवलदारी व्यवस्थेकडून सतत भरडले, चिरडले जात असतात, त्यांचे रक्षण करण्याची, त्यांना न्याय देण्याची जबाबदारी आपल्याच शिरावर आहे, असे नक्षलवादी मानतात/ मानत आले आहेत. हा हेतू साध्य करण्यासाठी नक्षलवाद्यांना सर्व प्रकारचे मार्ग मान्य आहेत. यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा, हिंसेचा मार्ग योग्य मानायचा किंवा नाही, हा वादाचा मुद्दा असू शकेल. पण शोषित, पीडित, वंचितांना मदत करण्याच्या बाबतीत कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही.
  साध्यानुसार मार्ग नाही 
  हे साध्य करायचे असेल तर सध्याची भांडवलशाही व्यवस्थाच बदलावी लागेल, असे नक्षलवादी मानतात. पण भारतात त्यांनी जी चळवळ उभारली आहे, त्याचा परिणाम म्हणून प्रत्यक्षात असे झालेले नाही. जी व्यवस्था बदलण्याचा चंग बांधून नक्षलवादी पुढे सरसावले होते, त्या व्यवस्थेचाच एक भाग म्हणून त्यापैकी काही नक्षलवादी राहू लागले आहेत, असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो. हा आक्षेप कितपत खरा आहे आणि जर खरा असेल तर असे का व्हावे/झाले हा प्रश्न सहाजीकच निर्माण होतो.
 ध्येयप्राप्तीचे एकापेक्षा अधिक मार्ग असू शकतात
 उद्दिष्ट/उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर एकमार्गी, एकसुरीच असले पाहिजे, असे म्हणता यायचे नाही. बहुदा याच भूमिकेतून नक्षलवादी चळवळीने दुहेरी /तिहेरी स्वरूप धारण केले असावे. त्यातही काही गैर नाही. सोप्या शब्दात मांडायचे तर नक्षलवाद्यांचा एक गट आदीवासी/ वनवासी क्षेत्रात काम करू लागला तर आणखी एक गट शहरात दैनंदिन कामाबरोबरच विचारही प्रसृत करू लागला आहे. परस्परसंपर्क यंत्रणा राबवू लागला आहे. वनवासी क्षेत्रातील चळवळीसाठी संपत्ती, सामग्री बरोबरच वैचारिक व कायदेशीर दबावगटही निर्माण करू लागला आहे. चळवळीचे हे तिहेरी स्वरूप झाले. 
  पण पुढे हा तिसरा गट नावापुरताच नक्षलवादी राहिला व प्रत्यक्षात स्वत:च आज खंडणीखोर झाला आहे, असा आक्षेप आहे. मूळ ध्येय/उद्दिष्ट एकच असावे, वेगवेगळे मार्ग असायला हरकत नाही पण ते परस्परपोषक असावेत हा प्रयत्न होता व ते योग्यच होते. पण पुढे चळवळीचे स्वरूप दुहेरी/तिहेरी न राहता दुटप्पी झाले असे म्हटले जाऊ लागले व तसे ते झाले असेल तर ते या चळवळीचे दुर्दैव व अपयश म्हणावे लागेल व देशासाठी अहितकारी म्हणावे लागेल.
 पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न नाही
  व्यवस्थेत बदल करायचा असेल तर तो व्यवस्थेच्या बाहेर राहून करता येईल का? त्यासाठी व्यवस्थेतच राहण्याची आवश्यकता असते का? व्यवस्था मोडून गरिबांचे कल्याण साधता येईल का? हा पुनरुत्थानाचा मार्ग आहे का? असू शकेल का? आजची व्यवस्था श्रीमंतांना संरक्षण देते. केवळ ती मोडून चालणार/भागणार नाही. तिची जागा घेणारी दुसरी व्यवस्था उभी करावी लागेल. असे काहीही न करता प्रस्थापित व्यवस्थेवर फक्त हल्ला करून काय घडते/घडले, ते आता अधिकाधिक उघडपणे दिसू लागले आहे. विध्वंस हा विद्यमान व्यवस्थेला पर्याय असू शकत नाही. जुनी व्यवस्था केवळ मोडून तोडून टाकून नवीन व्यवस्था आपोआप निर्माण होत नसते.
 साम्यवादी व नक्षलवादी 
   साम्यवादी पक्ष निवडणूक लढवून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करताना  दिसतात. भलेही त्यांचा निवडणुकीच्या मार्गाने सत्ता मिळविण्यावर विश्वास नसला तरीही. लोकशाही व्यवस्थेत सहभागी होऊन तिला सुरुंग लावण्याचा हा प्रकार आहे. 
    नक्षलवाद्यांचे एक बरे आहे. त्यांना हा लोकशाही मार्ग साफ नामंजूर आहे. क्रांती व मतपेटी यांचा संबंधच त्यांना मान्य नाही. त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला आहे. व्यवस्था बदलण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आदीवासींच्या मुलांनी शासनमान्य शिक्षणसंस्थेत शिकू नये, असा त्यांचा कटाक्ष असतो. त्या शाळा/ संस्था त्यांना नष्ट करायच्या असतात. सरकारला कोणत्याही प्रकारे सहकार्य करू नये यावर त्यांचा भर असतो. निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे त्यांचे आवाहन असते. सरकारी कार्यालये ते नष्ट करतात. सरकारी अधिकाऱ्यांना विशेषत: पोलिसांना ते ठार मारतात. अशाप्रकारे आजवर किती लोकांना मृत्यू पत्करावा लागला असेल याची गणती न केलेलीच बरी. नक्षलवाद्यांच्या एका गटाची ही तऱ्हा लोकांनाही चांगलीच माहीत झाली आहे. पण यातून काही साध्य झाले आहे काय? हा प्रश्न जरी बाजूला सारला तरी याबाबत नक्षलवादी प्रामाणिक आहेत, हे मात्र खरे आहे. हिंसेचा पुरस्कार करतांना ते किंचितही संकोचत नाहीत. साम्यवाद्यांसारखे त्यांचे आत एक व बाहेर दुसरे असे नाही.
  नक्षलवाद्यांचा आणखी एक गट 
  नक्षलवाद्यांच्या या गटाच्या कारवाया वेगळ्याप्रकारे सुरू आहेत. हा गट  शहरात वास्तव्याला असतो. ते शहरात राहून नक्षलवादी चळवळ अप्रत्यक्षपणे चालवीत असतात. ते हातात बंदूक घेत नाहीत. हिंसा करीत नाहीत. पण नक्षलवाद्यांचे समर्थन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नक्षल चळवळीला मदत करण्याच्या आरोपावरून यापैकी ज्यांना ज्यांना अटक झाली आहे, त्यांच्या विरुद्धची प्रकरणे न्यायालयात टिकली नाहीत. 13 गुन्ह्यांची नोंद असलेली बस्तरची सोनी सोरी 11 गुन्ह्यात निर्दोष सुटली. विनायक सेनही निर्दोष सुटले. हे प्रकरण तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजले होते. सुधीर ढवळे व अरूण फरोरा यांची कथाही वेगळी नाही. पुण्याच्या कबीर मंचच्या काही सदस्यांवरचे खटले अजून सुरूच आहेत. दिल्लीच्या साईबाबाला मात्र जन्मठेप झाली व तो तुरुंगात आहे. पण 90 टक्के प्रकरणी आरोपी निर्दोष का सुटतात? याचे कारण असे की, जंगलात बंदुका घेऊन लढणारे सशस्त्र तरुण नक्षलवादी याबाबत शंका नसते/नाही. याबाबतचा कायदा पुरेसा स्पष्ट आहे. पण पण जे स्वत: बंदूक हाती घेत नाहीत, शहरात राहतात, छुपी मदत करतात, ते कोण? नक्षलवादी की नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार? त्यांचे वर्तन गुन्हा या सदरात मोडते का? याबाबतचा कायदा पुरेसा स्पष्ट नाही व त्यामुळे त्यांच्या विरुद्धचे खटले न्यायालयात टिकत नाहीत. 
   नुकतेच गडचिरोली जिल्ह्यात फार मोठ्या संख्येत नक्षलवादी मारले गेले. लगेच यांचा एक गट सक्रिय झाला. त्याने प्रत्यक्ष जागी जाऊन पाहणी केल्याचा आव आणला. त्यांनी निष्कर्ष काढले ते असे. चकमकीत काही नागरिकही मारले गेले, त्याचे काय? काही शरण येऊ इच्छित होते पण त्यांना तशी संधी मिळाली नाही, म्हणून त्यांनी जीव वाचविण्यासाठी वाहत्या नदीत उड्या मारल्या व ते बुडून मेले, ही हिंसा नाही काय? काही नक्षलवादी शरण येणार होते, ते उगीचच मारले गेले नाहीत का? नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडावा, शरण यावे, त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, अशी संधी शासन वारंवार देत असते. पण त्यावेळी हा अभ्यास गट त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी, त्यांना शरण येण्यास प्रवृत्त करण्यासाठी कधी समोर आला आहे का? कायद्याचे पालन करून जीवन जगणाऱ्या आदीवासींना हे नक्षलवादी ठार करतात, तेव्हा हा गट त्याची निंदा/निषेध करायला पुढे येतो काय? पण हे प्रश्न या मानवतावाद्यांना विचारयचे नसतात. नागपूर व अन्यत्र सध्या जे अटकसत्र सुरू झाले आहे, त्यातून काय काय समोर येईल, त्याची सध्याती वाटच पहायला हवी.
 नक्षलवाद्यांची हीही कार्यपद्धी
  नक्षलवाद्यांचा तिसरा गट काय करीत असतो, हे पाहणे मात्र चांगलेच बोधप्रद आहे. हा गट राजकारणात, समाजव्यवस्थेत सामील झाला आहे. हे लोक शहरी सुखसोयींचा लाभ घेत उच्चभ्रू होत गेले आहेत.  ते जेव्हा राजकारणात सत्ताधीश झाले, तेव्हा तेही इतरांसारखेच पथभ्रष्ट झाले आहेत. चैनीत राहू लागले आहेत, मोटारी उडवू लागले आहेत, त्यांची वेशभूषाही पार बदलून गेली. पण नक्षलवाद्यांचे गुणगान मात्र ते मुक्त कंठाने करीत असतात. ही मंडळी मुख्यत: केंद्रीय विद्यापीठे व महाविद्यालये, वृत्तसृष्टी व वकील मंडळी यात प्रतिष्ठावंत आहेत. हा बदल असा वरवरचा व एवढाच असता तरी चालले असते.  पण त्यांची मुलेही त्याच शिक्षणसंस्थांमध्ये शिकू लागली की ज्या शिक्षणसंस्थाना नक्षलवाद्यांनी आदीवासी क्षेत्रात नष्ट करण्याचा चंग बांधला होता. याप्रकाराचे व प्रवृत्तीचे स्पष्टीकरण करण्यासाठी नवीन शब्दच शोधावा लागेल किंवा तयार करावा लागेल.  
 हा दुटप्पीपणा नाही का? 
    यांनी व इतर काहींनी हे काहीही न करता वेगळाच मार्ग अवलंबिलेला आहे. जंगलातील संपत्तीचा अपहार अनेक भांडवलदार, कंत्राटदार करीत असतात, हे उघड गुपित आहे. यात तेंदूपत्ता गोळा करणारे आहेत, रेतीचा अवैध उपसा करणारे आहेत, तसेच आणखी इतरही असेच  अनेक प्रकार करणारे आहेत. यांच्याकडून पैसे उकळायचे व त्या मोबदल्यात त्यांना सशस्त्र नक्षलवाद्यांपासून अभय द्यायचे, असा प्रकार सर्रास सुरू झाला आहे. या अवैध कारवाया करणाऱ्यांना शासकीय यंत्रणेचे फारसे भय नसते. कारण  ती विकत घेता येते. नक्षलवाद्यांचे बाबतीत मात्र असे नसते. तिथे जिवाशीच गाठ असते. पण त्यांच्याकडून पैशाच्या मोबदल्यात अभय मिळत असेल, तर या भांडवलदारांना/ कंत्राटदारांना यापेक्षा चांगला सौदा कोणता असणार आहे? अशाप्रकारेही पैशाची सोय नक्षलवादी करू लागले आहेत. इथे दुहेरी/तिहेरी पणा संपतो व दुटप्पीपणा सुरू होतो.
  नक्षलवादी चळवळीने हे नेते ज्यांची कड घेऊन लढा देत आहेत, त्यांचे कल्याण झालेले तर मुळीच दिसत नाही. पण स्वत:ला नक्षलवादी म्हणवणारे हे नेते मात्र चैनीत व ऐषआरामात राहतांना दिसत आहेत, हे नक्षलवाद्यांचे दुटप्पी रूप नाही काय? 

हे काय? प्रणवदा, तुम्हीसुद्धा?

हे काय? प्रणवदा, तुम्हीसुद्धा? 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 
नागपूर ४४० ०२२ 
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  माजी राष्ट्रपती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला येणीर हे कळताच वृत्तसृष्टीत अनेकांच्या प्रतिभेला घुमारे फुटू लागले आहेत. मुळात प्रश्न उपस्थित होतो तो हाही हा वार्तेचा विषय का व्हावा? ते एकेकाळी राष्ट्रपती होते म्हणून? ते एकेकाळचे काॅंग्रेस कार्यकर्ते होते, म्हणून? माजी राष्ट्रपतींनी देखील काही औपचारिक पथ्ये पाळावीत, अशी अपेक्षा असते, त्यांचे उल्लंघन झाले आहे का? 
 प्रणव मुखर्जींची सहा दशकांची राजकीय कारकीर्द कशी होती? भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून 2012 ते 2017 पर्यंत राष्ट्रपतीपदी विराजमान असलेल्या प्रणवदांचा जन्म 11डिसेंबर 1935 ला झाला होता. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारत सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे सांभाळणारे कार्यक्षम मंत्री म्हणून ते 2009 पर्यंत काॅंग्रेसचे समस्यानिवारक (ट्रबलशूटर) मानले जायचे. ते डाॅ मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.
 असे म्हणतात की, इंदिरा गांधी व नंतर राजीव गांधी  यांच्या हत्येनंतर त्यांना पंतप्रधानपद पक्ष देईल, अशी लोकांची अपेक्षा होती व खुद्द प्रणवदांनाही तसे वाटत होते, पण तसे झाले नाही. त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काॅंग्रेसही स्थापन केली होती पण राजीव गांधींनी त्यांची समजूत काढल्यानंतर 1989 मध्ये त्यांनी आपला पक्ष कांग्रेसमध्ये विलीन केला होता. पी व्ही नरसिंव्हराव यांनी त्यांना योजना आयोगाचे प्रमुख म्हणून 1991 मध्ये व परराष्ट्रमंत्रिपदाचा मान 1995 मध्ये दिला होता. 1998 मध्ये सोनिया गांधीचे अध्यक्षपदी आरोहण होतांना प्रणवदांची भूमिका प्रमुख होती, नव्हे हे घडवून आणण्याच्या कल्पनेचे व योजनेचेही ते प्रमुख शिल्पकार होते, असे मानले जाते.  2004 ते 2012 पर्यंत ते लोकसभेचे सदस्य व मंत्रिमंडळात क्रमांक 2 चे मंत्री होते. पण पंतप्रधानपदाची माळ डाॅ मनमोहनसिंग यांच्या गळ्यात पडली. यामुळे ते नाराज झाले पण तरीही पक्षनिष्ठेला जागून ते पक्षातच राहिले. न जाणो उद्या काही दगा फटका झाला तर काळजी घेतलेली बरी, या शहाणापोटी त्यांना राष्ट्रपतीपदी पिंजऱ्यात बंदिस्त करण्याचे कारस्थान शिजले, अशा वावड्याही त्यानंतर उठत होत्या आणि व्यवहारी प्रणवदांनी पळत्या पंतप्रधानपदाच्या नादी न लागता चालून आलेले राष्ट्रपतीपद स्वीकारले, असेही म्हटले जाऊ लागले.
  आता संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रणवदांनी उपस्थित राहण्याचे ठरवताच काहींची प्रतिक्रिया तर ‘ब्रूटस, यू टू!!’, अशी होती. सीझर विरुद्ध त्याचे सरदार बंड करून उठले होते. त्याबद्दल त्याला वाईट वाटले नव्हते पण ब्रूटस हा निष्ठावंत सहकारी व मित्रही त्यांना सामील झालेला पाहून सीझर उद्गरला होता, ‘ब्रूटस, यू टू?, ब्रूटस तू सुद्धा? देन फेल सीझर’. पण सध्या रिमोट, रिमोटदेशी असल्यामुळे त्यांनी स्वत:ला आवरले/सावरले असावे.
   त्यामुळेच वाटणारे आश्चर्य चेहऱ्यावरून पुसून त्यांनी, सिटिझन मुखर्जींना (ते ट्विटरवर आपला उल्लेख सिटिझन मुखर्जी असा करतात) चार शहाणपणाच्या गोष्टी ऐकवल्या असाव्यात. दीपराज तर म्हणाले, ‘काय ? लक्षात आहेना, संघ काय भयंकर चीज आहे ते? कायते त्यांचे संकुचित तत्त्वज्ञान! कायती जन्मजात असहिष्णुता!! कायती सेक्युलॅरिझमविरोधी भूमिका!!! प्रणवदा, तुम्ही त्यांना संकुचितता सोडून विशालता स्वीकारण्याचे, असहिष्णुता टाकून सहिष्णुता अंगी बाणवण्याचे, हिंदूंना वगळून इतर सर्वांना उरी कवटाळण्याचे कडू डोज पाजाच. हा काही संघाचा दसऱ्याचा मेळावा नाही. त्यात सामान्य स्वयंसेवक असतात. ही 600 मंडळी वेगळी आहेत. हेच संघाचे उद्याचे कर्ते धर्ते असणार! यात किती चहावाले असतील याचा काही नेम आहेका? एकानंच किती उच्छाद मांडलाय पहाता आहात ना?’
 प्रणवदांचे एकेकाळचे मंत्रिमंडळातील सहकारी पी चिदंबरम, त्यांची कन्या व दिल्ली काॅंग्रेस पक्षाची प्रवक्ती शर्मिष्ठा मुखर्जी व खाजगी सचिव यांच्या प्रतिक्रियाही लक्षात घेण्यासारख्या आहेत. चिदंबरम म्हणतात, ‘प्रणवदा तुम्ही तिथे जा, पण त्यांना त्यांचे तत्त्वज्ञान कसे चुकीचे आहे, ते समजावून सांगा, बरं का.’ शर्मिष्ठाबाई तर प्रश्न ऐकून भडकल्याच, ‘हा काय काॅंग्रेसच्या प्रवक्त्याला विचारायचा प्रश्न झाला? तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा ना.’ प्रणवदांना, खाजगी सचिवांसारखे दुसरे कोण ओळखत असणार? ते म्हणाले, तुम्हाला वाटतं तसं ते काहीच बोलणार नाहीत. बघालच तुम्ही?.’
 एक वयाने व अनुभवाने ज्येष्ठ नेते बेरकीपणाने म्हणाले, ‘प्रणवदांची तब्येत ठणठणीत आहे. ते काय नागपूरच्या 50 डिग्री तापमानाची पर्वा करतात?’.
 एकाने आपली विषण्णता व्यक्त करीत म्हटले काय दैवगती आहे पहा. जो आता आता पर्यंत काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून  सेक्युलॅरिझमचे धडे गिरवून घेत होता, तो आता जातीयवाद्यांच्या जमावासमोर बोलणार आहे!’
 एक पत्रमित्राने परदेशात असलेल्या राहूलजींनाच आपलेपणाचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात, ‘संघाकडे पाहण्याचा साम्यवाद्यांचा चष्मा टाकून द्या. त्यापायीच आज 44 वर आला आहात, हे विसरू का’.
  सर्वात जास्त खकाणा उडाला आहे तो साम्यवादी क्षेत्रात! संघ काय चीज आहे, ते माहीत असणाऱ्यांनी संघाच्या वाऱ्यालाही उभे राहू नये, असे त्यांना वाटत असते. कारण त्यांच्यावर इतरांच्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नाही, असे त्यांचे ठाम मत आहे. पालथ्या घागरीवर पाणी घालण्यासारखे आहे ते. त्यातून तुमच्यानंतर सरसंघचालक बोलणार. याचा अर्थ काय? यदाकदाचित काही परिणाम झाला असेलच, तर तो साफ धुतला जाणार. जुने दाखले आहेत तसे.
 एकूण काय? प्रणवदा येणार आहेत. भाषण देणार आहेत. ते काय बोलणार, हे खुद्द त्यांच्याशिवाय दुसऱ्याकुणाला कसे माहीत असणार? पण तोपर्यंत वावड्या उडवायलाच हव्यात. रोजी रोटीका सवाल है भाई!

Saturday, June 2, 2018

सिलसिला प्रत्यक्ष गाठीभेटींचा

सिलसिला प्रत्यक्ष गाठीभेटींचा
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
 
   पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याच चीन मधील वुहान या इतिहासप्रसिद्ध शहरात झालेल्या वाटाघाटींची माहिती तशी आता काहीशी जुनी झाली आहे.
  दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी व उत्तर कोरियाचे तानाशहा किम जोंग ऊन यांचीही एप्रिल 2018 च्या शेवटी शेवटी पाॅनमूनजाॅनला(दोन्ही देशातील निर्लष्करी टापूतील शहरात)  भेट झाली. ही भेट अमेरिका व चीनच्या सूचनावजा आदेशाने झाली असल्यामुळे यावेळी या दोन राष्ट्रात शिमग्याऐवजी संक्रांत साजरी झालेली दिसली.
  जर्मनीच्या चान्सेलर ॲंजेला मर्केल व पुतिन यांचीही लवकरच अशीच भेट होते आहे.
 कोरियाचे तानाशहा किम जोंग ऊन व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेटही सिंगापूरला बहुदा जूनमध्ये होणार आहे. या व अशा शिखरभेटींचा सिलसिलाच सुरू झालेला दिसतो आहे. कोणत्याही मदतनिसाशिवाय किंवा सहाय्यकाशिवाय या भेटी होत आहेत. आवश्यकतेनुसार व काही काळासाठी सहाय्यक/मदतनीस सहभागी होतांना दिसत असले तरी ते तेवढ्यापुरतेच असते.
भेटींचे वेगळेपण
अशा भेटीचे उभयपक्षी वेगळे व विशेष महत्त्व असते. भेटीदरम्यान विषय सूची नसते, म्हणजे कोणताही विषय हाताळण्याची सोय उभयपक्षी उपलब्ध असते. काय बोलणे झाले ते दोघापुरतेच माहीत असल्यामुळे बित्तमबातमीला (स्कूप) फारसा वाव नसतो. सर्व प्रकारच्या शक्यता उभयपक्षी विचारात घेता येतात. एकमत झाले तर ठीक न झाले तर मुद्दा गुंडाळून ठेवता येतो. ‘संबंधित मुद्याबाबत आपल्यात अहसहमती आहे, यावर सहमत होऊ या’, अशी भूमिका स्वीकारून तो विषय बाजूला सारता येतो किंवा थंड्या बस्त्यात टाकता येतो. किंवा असे मुद्दे कोणते आहेत, हे सहाय्यकांच्या माध्यमातून अगोदरच माहीत करू घेतले जातात व त्या मुद्याला/ मुद्यांना कुणीही हात घालत नाही.
प्रत्यक्ष भेटीचे महत्त्व
एका राजनीतिज्ञाने अशा भेटींचे एक वेगळेही महत्त्व सांगितले आहे, ते असे. समोरच्याशी हस्तांदोलन होतांनाही एकमेकांना जोखता/ पारखता येते. हे दोघे धुरंदर एकमेकांच्या डोळ्यांना डोळे भिडवून बोलत असतात, तेव्हा समोरच्याच्या अंतर्मनाचा ठाव घेता येणेही शक्य असते. ओठातले व पोटातले यात किती साम्य आहे, याचा अंदाज बांधता येतो. बेधडकपणे प्रस्ताव ठेवता/ परत घेता येतात. इशारे/ आमिषे यांची देवाणघेवाण होऊ शकते, समजुतीच्या चार गोष्टी सांगता येतात.
मोदी व पुतिन यांची सोची भेट
सोची हे काळ्यासमुद्रावरील रशियातील शहर आहे. येथील समुद्रकिनारा हे पर्यटतांसाठीचे एक आवडते ठिकाण आहे. 2014 चे शीतकालीन आॅलिंपिक सामने या शहरात झाले होते. या शहराची दुसरीही एक विशेषता आहे, ती ही की इथे पामवृक्षांची वनस्पती वाटिका (आर्बोरेटम) आहे. वनस्पती वाटिका म्हणजे वनस्पतीशास्त्राचे दृष्टीने संमृद्ध वृक्षांचा बगीचा. एक प्रशस्त नॅशनल पार्कही या शहराची शोभा वाढवतो. हा पार्क म्हणजे एक अरण्यच आहे. काॅकेशस पर्वत चारी बाजूंनी या अरण्याला वेढतो व त्याचे जतन करतो आहे. एकाच छापाच्या नसलेल्या टोलेजंग इमारती हे या शहराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या अरण्यात 70 किलोमीटर आत गेल्यावर मधोमध क्रॅसनाया पाॅलियाना नावाचे एक स्किईंगची सोय असलेले  रिसाॅर्ट आढळते.
रशियन अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचसोबत करावयाच्या चर्चेसाठी कोणते नयनरम्य, निसर्गरम्य पण आधुनिक सोयीसुविधांनी संमृद्ध ठिकाण निवडले आहे, हे लक्षात यावे म्हणून हा तपशील नोंदविला आहे. वातावरण प्रसन्न असेल तर चित्तवृत्तीही प्रसन्न राहण्यास मदत होते, असे म्हणतात. आजकाल चर्चेसाठी अशी ठिकाणे निवडण्याकडे नेत्यांचा कल असतो,असे जाणवू लागले आहे. सोचीतील एका दाच्याची (खेड्यामधले घर कौलारू) निवड चर्चेसाठी केली आहे. हे कौलारू घर लाख मोलाचे आहे. जर्मन चान्स्लर ॲंजेला मर्केलशी याच झोपडीत वाटाघाटी झाल्या होत्या. शाह भोजनाचा बेत असला तरी भेट अनौपचारिक असल्यामुळे मानाची सलामी (गार्ड आॅफ आॅनर) नाही. अशाप्रकारे चीनमधील वुहान परिषदेसारखी सोची परिषद सुद्धा अनौपचारिकच आहे. आवश्यक वाटतील तेव्हाच सहाय्यक चर्चेच्या वेळी सोबत असतील. एकाच दिवसाचा कार्यक्रम आखलेला असून त्याच रात्री मोदी भारतात परतही येणार आहेत.
  ही भेट अचानक ठरलेली नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार गेल्या दोन महिन्यात दोनदा रशियाला जाऊन आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे जनरल सेक्रेटरी राममाधव तर मास्को बरोबर सोचीलाही जाऊन व वरिष्ठ स्तरावर चर्चा करून आले आहेत.
भुवया का उंचावल्या?
मोदी व शी जिनपिंग यांच्या भेटीबाबत कुणालाही फारसे आश्चर्य वाटलेले नाही. चीनशी संबंध सुधारले तर स्वागतच आहे पण ऐनवेळी मदत करणारा (बांग्लादेश मुक्ती संग्राम)  खराखुरा मित्र रशियाच आहे. पण पुतिन व मोदी यांच्या सोची भेटीचे वृत्त ऐकून मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचे कारण असे आहे की, येत्या आॅक्टोबरमध्येच पुतिन भारत भेटीवर येणारच आहेत. त्या अगोदरही दोन निमित्ताने हे दोन नेते परस्परांना भेटणार आहेतच. त्यावेळी थोडीफार फुरसत मिळेलच तेव्हा दोघांमध्ये बोलणी होऊ शकणार आहेतच. मग ही तातडी कशासाठी?
एक कारण असे असू शकते की, भारत आपले स्वतंत्र परराष्ट्रीय धोरण व रशियाशी असलेले व पूर्वापार चालत असलेले संबंध ह्या दोन्ही बाबी कायम ठेवून  व या दोन्ही बाबतीत कोणतीही तडजोड न करता, भारत रशियाशी आपले संबंध कायम राखू इच्छितो, हे रशियाला जाणवून व पटवून देण्याची आवश्यकता भारताला वाटत असावी. तसे पाहिले तर  संयुक्त राष्ट्र संघ, शांघाय संघटना व ब्रिक्स परिषद या व्यासपीठांवर भारत व रशिया यांची भूमिका परस्परपूरक व सहाय्यक राहिली आहे. तरीही रशियाला आश्वस्त करण्याची गरज भारताला वाटत असावी, असे काहीतरी घडते आहे, असे दिसते.
 दुसरे असे की, ही भेट रशियाची प्रतिष्ठा वाढविण्यासही साह्यभूत होणार आहे. सध्या युरोप व अमेरिकेच्या हिशोबी रशियाची प्रतिष्ठा पार घसरलेली आहे. याचे कारण रशियाने मध्यपूर्वेत सीरियाला रासायनिक शस्त्रांचा वापर करू दिला हे होय. एक ज्येष्ठ साथीदार या नात्याने सीरियाला आवर घालण्याची जबाबदारी रशियाची होती, अशी अमेरिकेची भूमिका आहे. कारण सीरियाची पाठराखण करणारे रशिया हे एकच बडे राष्ट्र आहे. त्यामुळे त्याच्या मूक संमतीशिवाय किंवा कानाडोळ्याशिवाय सीरियाने रासायनिक शस्त्रे वापरण्याचे पाऊल उचलणे शक्यच नाही, असे अमेरिकेला व युरोपियन राष्ट्रांना वाटते. सीरियाची भूमिका मात्र आपण रासायनिक शस्त्रे वापरलीच नाहीत, अशी आहे. व रशियाने त्याची पुष्टी केली आहे. तरीही हे साफ नाकारून ‘आॅर्गनायझेशन फाॅर दी प्रोहिबिशन आॅफ केमिकल वेपन्स’, च्या सभेत रशियाचा निषेध करण्यात आला होता. यावेळी भारताने रशियाचा निषेध न करता तटस्थता स्वीकारल्यामुळे रशिया खूष आहे. सोची भेटीनंतर रशियाचे खाली गेलेले पारडे आणखी काहीसे वर येणार आहे.
 काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरीज थ्रू सॅंक्शन्स ॲक्ट (सीएएटीएसए)
तिसरे कारण आणखीनच वेगळे व जास्तच गंभीर आहे. याची पार्श्वभूमी अशी आहे. 2 आॅगस्ट 2017 ला अमेरिकेच्या सिनेटने 98  विरुद्ध  2 अशा बहुमताने एक कायदा पारित केला आहे. काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरीज थ्रू सॅंक्शन्स ॲक्ट (सीएएटीएसए) या नावाच्या कायद्याचा रोख  इराण, उत्तर कोरिया व रशिया यांच्याकडे आहे. या कायद्यानुसार ट्रंप प्रशासन जे देश या तीन देशांशी व्यापारी संबंध ठेवतील त्यांच्याविरुद्ध बंधने घालणार आहे. ही मुळातली भूमिका होती. पण इराण हा भारताचा तिसरा मोठा खनिज तेल पुरवठादार देश आहे. तसेच इराणमधील चाबहार बंदरात भारताने मोठी गुंतवणूक केली आहे.
भारत रशियाकडून फार पूर्वीपासून संरक्षण विषयक सामग्री खरेदी करीत आलेला आहे. ही सामग्री रशियाकडून खरेदी न करता अमेरिकेकडून खरेदी करावी, असा अमेरिकेचा आग्रह आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, भारताने कोणत्या देशाकडून काय खरेदी करावे, याबाबत तिसऱ्या देशाचा आदेश भारत मानणार नाही., हे स्पष्ट आहे. तसेच या विषयाला एक व्यावहारिक पैलूही आहे. तो असा की, गेली अनेक वर्षे भारत रशियाकडून जी सामग्री विकत घेत आलेला आहे, त्यातील बदलावयाची व अन्य पूरक सामग्री भारत रशियाकडूनच घेऊ शकतो, दुसऱ्या कुणाकडून घेऊच शकत नाही. तिसरे असे की, भारत रशियाकडून टी-400 या हवाई संरक्षण व्यवस्थेचे पाच संच साडे चार अब्ज डाॅलरला विकत घेणार असून त्याबाबत पुतिन यांचेशी चर्चा होणे अपेक्षित आहे. हे घडू नये, अशी अमेरिकेची आंतरिक इच्छा आहे. अमेरिकन प्रशासनची भूमिका वरवर समजुतदारपणाची दिसत असली तरी आमचे हात काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरीज थ्रू सॅंक्शन्स  ॲक्टने( सीएएटीएसए) बांधलेले आहेत, त्यामुळे नाइलाज आहे हो, अशी साळसूद व सोयीस्कर भूमिका घेत आहे.
 सोची भेटीत भारत व रशिया यातील संबंध अधिक दृढ करण्यावर  व नागरी कर्यांसाठी अण्विक उर्जेचा उपयोग भर असेल अशा आशयाचे सडेतोड ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. सीरिया, अफगाणिस्तान व इराणशी झालेल्या अणु करारातून अमेरिका बाहेर पडल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही यावेळी चर्चा होणे अपेक्षित आहे. इसीसबाबत भारत व रशिया यांच्या भूमिकेत फरक नसला तरी तालिबान्यांशी चर्चा करावी, असे रशियाला वाटते, असे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. हा भारत व रशियातील महत्त्वाचा मतभेदाचा मुद्दा असू शकतो. तालिबान्यांच्या भीषण क्रौर्याचा अनुभव अफगाणिस्तानमध्ये रशियाच्याही वाट्याला पूरेपूर  आलेला  असतांना रशियाने ही  अशी भूमिका कां घ्यावी? राजकारणात वर्तमानातील बेरजेला महत्त्व असते. भूतकाळातील वजाबाक्या व भागाकार गौण ठरतात, हेच खरे.
 सध्या ट्रॅप प्रशासनाची हडेलहप्पी सुरू आहे. उत्तर कोरियाला नमविल्यानंतर, अमेरिकेने चीनलाही व्यापारी युद्धात पडते घ्यावयास लावले आहे. आता चीन अमेरिकेकडून भरपूर आयात करणार असून आर्थिक व्यवहारातील असमतोल कमी करण्यासाठी मान्यता देता झाला आहे. भारतालाही नमविण्याचा ट्रंप प्रशासनाचा मनसुबा आहे.
पर्सनलाईड डिप्लोमसीचा जनक भारत
आपल्या समपदस्थाशी प्रत्यक्ष भेट घेऊन आमनेसामने चर्चा करण्याचा एक नवीन प्रकार पंतप्रधान मोदींनी नव्याने व मोठ्या प्रमाणावर भर देत सुरू केला असून राजकीयक्षेत्राने त्याचे बारसेही केले आहे. या भेटीगाठींचे वर्गीकरण ते ‘पर्सनलाईज्ड डिप्लोमसी’ या शब्दप्रयोगाने करतात. यावेळी राजकीय शिष्टाचारांना फाटा दिला जातो. विषय सूचि नसते,  कधीकधी उभय नेते एखाद्या निर्णयाप्रत येतात देखील, पण तरीही संयुक्त पत्रक नसते, द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार नाही, एकूण राजकीय परिस्थितीवरच चर्चा होईल, असे जाहीर करूनही प्रत्यक्षात मात्र द्विपक्षीय विषयांवरही चर्चा होत आलेली आहे, असे सांगितले जाते व तशी चर्चा होणे सहाजीकही आहे.
नुकतीच मोदी व जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी वुहान शिखर परिषद मुख्य विषयाच्या स्वरुपात होती. कोरियन द्विपकल्प आणि ट्रंप व किम भेट याबाबतही विचारांचे आदानप्रदान झाले.
परस्पर विश्वास निर्माण करण्यासाठी मोदी-शी जिनपिंग भेट
 मोदी व शी जिनपिंग या उभयतात झालेल्या भेटीने अविश्वासाचे वातावरण कमी होण्यास मदत झाली, याचे एक कारण सांगितले जाते, ते असे. आजपर्यंत चीनमध्ये आंतरिक सत्ता संघर्ष सुरू होता. विरोधकांना टीका करण्यास वाव मिळू नये, म्हणून शीजिनपिंग यांना वरकरणी का होईना पण कठोर भूमिका घ्यावी लागायची. भारतात जसा चीन संवेदनशील विषय आहे, तसाच चीनमध्ये भारत हा संवेदनशील विषय आहे. धोरणात जरा नरमाई येते आहे असे वाटले तर दोन्ही देशात विरोधक टीका करायची संधी सोडत नसत. चीनमध्ये सध्या राजकीय पातळीवरची लढाई जिंकून शी जिनपिंग यांनी आपले राजकीय स्थान पुरतेपणी बळकट केले आहे. त्यामुळे आता अधिक मोकळेपणाने ते वागू बोलू शकतात, असे म्हटले जाते.
 मोदी व पुतिन यांच्या चार लागोपाठ भेटी कशासाठी?
भारत व रशिया यातील संबंधात आजवर असे अविश्वासाचे वातावरण निर्माण झालेले नव्हते. कारण परस्परसंबंधावर प्रत्येक देशांतर्गत झालेल्या बदलाचा परिणाम होत नव्हता. त्यामुळे उभय देशातील चर्चेला विश्वासनिर्मितीपासून सुरवात होत नसे/ करावी लागत नसे.
 सोची भेटीनंतर मोदी व पुतिन आजच्या वेळापत्रकानुसार तीनदा म्हणजे सोची धरून चारदा भेटणार आहेत. जूनमध्ये शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनची (एससीओ) शिखर परिषद चीनमध्ये होत आहे. एससीओचे आळीपाळीने येणारे अध्यक्षपद सध्या चीनकडे असून सदस्य स्वरुपात पाकिस्तान, चीन, रशिया, कझखस्थान, ताजिकिस्तान, किरगिस्तान, उझबेकिस्तान व भारत आहेत. निरीक्षक म्हणून अफगाणिस्तान, बेलारस, इराण व मंगोलिया आहेत. आजवर चीनचा कल पाकिस्तानकडे राहत आलेला असून त्यात सध्या मात्र ताणतणाव निर्माण झाले आहेत. रशियाच्या आग्रहाने, मध्यस्थीमुळे व प्रभावामुळे भारताला एससीओची सदस्यता देणे चीनला भाग पडले पण राजकीय समतोल साधण्यासाठी तेव्हा चीनने पाकिस्तानलाही एससीओचे सदस्य करून घेतले होते. या पार्श्वभूमीवर मोदी व पुतिन यांची सोची भेट अगोदर होत आहे, याला राजकीय महत्त्व आहे. अर्थात सोची भेटीत हा एकच विषय नसणार आहे.
 चीनमधील एससीओची परिषद आटोपते न आटोपते तोच जुलैमध्ये दक्षिण आफ्रिकेत दरबान येथे ब्रिक्सची दहावी शिखर परिषद होते आहे. ब्रिक्सचे ब्राझील, रशिया भारत, चीन व दक्षिण आफ्रिका हे सदस्य देश आहेत. सध्या आळीपाळीने येणारे अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेकडे आहे. ब्राझील चे अध्यक्ष मायकेल टेमर व ब्रिक्सचे यजमानपद असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या सोबत पुतिन, मोदी व शी जिनपिंग यावेळी उपस्थित असतील. आजवर चीन भारतावर कुरघोडी करण्याचाच प्रयत्न करीत आलेला आहे. वुहान येथील मोदी च शी जिनपिंग यांची अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात भेट झाल्यानंतर हे दोन नेते पुन्हा एकदा एकत्र भेणार आहेत. त्यामुळे यावेळी असे काही घडणार नाही, अशी अपेक्षा करूया. यावेळी पुतिन, शी जिनपिंग व मोदी यांच्यातील सामंजस्य ब्रिक्स बैठकीत आर्थिक बाबतीत विशेष काही घडवू शकेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
मोदी व पुतिन यांची चवथी भेट होणार आहे, आॅक्टोबर 2018 मध्ये. यावेळी पुतिन स्वत: भारत भेटीवर येत आहेत. ही भेट सोची भेटीप्रमाणे या दोघातच होणार आहे. यावेळी महत्त्वाचे विषय चर्चिले जातील. त्यात सामरिक प्रश्न असू शकतील. अमेरिकेने रशियावर बंधने टाकली आहेत. अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी त्यांना अनुसरून वागलेच पाहिजे, अशी डोनाल्ड ट्रंप यांची दंडेली असते. पण भारत-रशिया संरक्षण करार तर कितीतरी जुना आहे. हा करार टिकलाच पाहिजे व तिकडे अमेरिकेचाही पापड मोडता कामा नये, अशी खबरदारी भारताला घ्यायची आहे. भारत व अमेरिका यातील जवळीक वाढत चालली असून ही बाब रशियाला आवडलेली नाही. कदाचित म्हणूनच रशियाने पाकिस्तानशी संबंध वाढविले असावेत, असे मानण्यास भरपूर जागा आहे. अमेरिका इराण अणु करारातून बाहेर पडली आहे, हा मुद्दा चर्चेत आल्यावाचून राहील का? तसेच दहशतवादहा विषयच असा आहे की तो ठरवले तरी वगळता येणार नाही.  अमेरिकेसोबतच्या मैत्रीत वाढ म्हणजे रशियापासून दूर जाणे नव्हे, हे रशियाला समजावून देण्यात भारताच्या परराष्ट्र व्यवहार नीतीला तारेवरची करसरत करावी लागणार आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी कारवाया वाढत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रशिया तालिबान्यांना चुचकारतो आहे, या बाबीचे गांभीर्य भारताला रशियाच्या जाणवून द्यावे लागेल. भारत- रशिया संबंध अबाधित राहण्यासाठीचा उत्तम मार्ग हा असणार आहे की, भारत व रशिया यातील संबंधांना संरक्षण करारासोबतच आणखी नवीन आयाम जोडले जावेत. आजवर भारत व रशिया यात शस्त्रास्त्र व संरक्षण हा विषयच दुवा स्वरुपात प्रामुख्याने होता. याला उर्जाक्षेत्राची जोड देण्याचा भारताचा विचार आहे. भारताने रशियात उर्जाक्षेत्रात कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक केली आहे. आता हे दोन देश संयुक्तपणे अन्य गरीब व होतकरू देशांना नागरीक्षेत्रात अणुउर्जा पुरवणार आहेत. अशाप्रकारचे हे सहकार्य या दोन देशातील स्नेह वाढविण्याचे बाबतीत महत्त्वाची भूमिका पार पाडील. इंटर नॅशनल नाॅर्थ साऊथ कोरिडाॅर (आयएनएसटीसी) प्रकलपात भारत व रशिया यांना सारखीच आस्था आहे, निदान असायला हवी. कोरियात नव्याने व वेगाने उभवू पाहणारे सहकार्याचे युगही उभय देशांचे लक्ष वेधल्याशिवाय राहणार नाही. सोची शिखर परिषदेत यापैकी कोणते विषय चर्चिले जातील? कदाचित ही बाब भेट ठरली तेव्हा दोन्ही नेत्यांना माहीत नसेल पण हे व असे विषय सोची व अन्य दोन परिषदेचे वेळी फावल्या वेळात चर्चिले जाणार हे क्रमप्राप्तच  आहे. कारण चौथ्या आॅक्टोबर भेटीपूर्वी  मोदी व पुतिन यांची निदान तीन वेळा भेट होते आहे. त्यातून भारत व रशियातील संबंधांना नव्याने उजाळा मिळेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत दिसत नाही. विक्षिप्तवीर्य डोनाल्ड ट्रंप यांच्या नेतृत्त्वाखालील अमेरिकेला भारताने रशियाशी संरक्षणविषयक संबंध ठेवू नयेत, असे वाटते आहे, हे खरे पण सध्याचे वातावरण संबंध दृढ करण्यासाठी अनुकूल आहे व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील हवाही त्याच दिशेने वाहत आहे

आता शक्तिपरीक्षा राज्यसभेच्या उपसभापतीच्या निवडणुकीत

    आता शक्तिपरीक्षा राज्यसभेच्या उपसभापतीच्या निवडणुकीत
वसंत गणेश काणे,     बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 

    राज्यसभेतील पक्षांचे बलाबल 26 मे 2018 ला असे आहे.
  भारतीय जनता पक्ष 69; काॅंग्रेस 51; अण्णाद्रमुक 13; तृणमूल काॅंग्रेस 13; समाजवादी पक्ष-13; बिजू जनता दल 9; स्वतंत्र 6; जेडियु 6; तेलगू देसम 6; तेलंगणा राष्ट्र समिती 6; सीपीएम 5; आरजेडि 5; नामनिर्देशित 5; डीएमके 4; बीएसपी 4; राष्ट्रवादी काँग्रेस 4; आमआदमी 3; अकाली दल 3; शिवसेना 3; वायएसआरसीपी 2; पीडीपी 2; जनतादल(एस) 1; केरळ काॅंग्रेस(एम) 1; लोकदल 1; सीपीआय 1; बोडोलॅंड पीपल फ्रंट 1; सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट 1; आरपीआय(आ) 1; नागा पीपल फ्रंट 1; रिकाम्या 4 = एकूण 245

राज्यसभेचे (उपसभापती) डेप्युटी चेअरपर्सन पीजे कुरियन यांची मुदत 30 जून 2018 ला संपत असून 245 सदस्य असलेल्या राज्यसभेत उपाध्यक्षपदी निवडून येण्यासाठी, सर्व मतदारांनी मतदान केले तर 122 मतांची आवश्यकता विजयी उमेदवाराला असणार आहे. विरोधकांजवळ सध्या 117 मते आहेत. यात तेलगू देसमची 6 मते गृहीत धरली आहेत. विरोधकांची एकजूट बांधण्याच्या सध्याच्या प्रयत्नांवर या निवडणुकीतील यशापयशाचे परिणाम होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
सद्यस्थिती 
  सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षांची हमखास मते जवळजवळ सारखीच असून अलिप्त मते कुणाकडे वळतील यावर या निवडणुकीतील विजयी उमेदवाराचे यश अवलंबून असणार आहे. बिजू जनता दलाची 9 मते तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) ची 6 मते व वायएसआरसीपीची 2 मते निवडणुकीचा निकाल ठरविण्याचे बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा सध्याचा अंदाज आहे.
   महत्त्वाचे भिडू- भारतीय जनता पक्ष (69 सदस्य)
 सध्या भारतीय जनता पक्ष राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष असून त्याचे 69 सदस्य राज्यसभेत आहेत.मित्र पक्ष, स्वतंत्र सदस्य व नामनिर्देशित सदस्य मिळून त्यांची मतसंख्या 115 इतकी आयात अण्णा द्रमुक पक्षाचे 13 सदस्य समाविष्ट आहेत.
महत्त्वाचे भिडू - काॅंग्रेस (51 सदस्य)
काॅंग्रेसचे राज्यसभेत 51 सदस्य असले तरी स्वत:चा उमेदवार उभा करून अवलक्षण पदरात पाडून घेण्यापेक्षा कर्नाटकी कावा या निवडणुकीत वापरता येईल किंवा कसे यावर सध्या पक्षात खलबते सुरू आहेत. असे केल्यास दरवेळीच दुय्यम भूमिका घ्यावी लागण्याची पाळी येऊ शकते, असे म्हणत एक गट या माशी सहमत नाही.
महत्त्वाचे भिडू- अण्णाद्रमुक (13 सदस्य)  
हा पक्ष सामान्यत: भारतीय जनता पक्षाला साह्य व सहकार्य करीत आलेला आहे.
महत्त्वाचे भिडू- तृणमूल काॅंग्रेस (13 सदस्य)
तृणमूल काॅंग्रेसचे राज्यसभेत 13 सदस्य असून या पक्षाचा विचार ही निवडणूक लढविण्याचा आहे. त्यादृष्टीने समविचारी पक्षाशी या पक्षाच्या वाटा घाटी सुरू झाल्या असल्याच्या वार्ता आहेत.
महत्त्वाचे भिडू - समाजवादी पक्ष (13 सदस्य)
हा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेईल. कर्नाटकाच्या विरोधी पक्षांच्या मेळ्यात हा पक्ष सामील होता. बिगर भाजपा व बिगर काॅंग्रेस आघाडीत सामील होण्याची सध्यातरी मुळीच शक्यता नाही.

 हा हिशोब लक्षात घेतला की राज्यसभेच्या उपसभापतीची (डेप्युटी चेअर पर्सनची) निवडणूक अटितटीची होणार, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
रिकाम्या जागा  
 सध्या राज्यसभेत तीन/चार जागा रिकाम्या असून त्या बहुदा जूनच्या शेवटीशेवटी भरल्या जातील. या पैकी तीन जागा केरळ मधल्या असून त्यातील दोन जागा डाव्या आघाडीकडे व एक जागा काॅंग्रेसकडे जाईल.
महत्त्वाचे भिडू- तिसऱ्या आघाडीचे पुरस्कर्ते चंद्रशेखर राव (6 सदस्य)  
  तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आपले पत्ते अजून उघड केले नाहीत, असे वाटते. बिगरभाजपा व बिगरकाॅंग्रेस अशी तिसरी आघाडी उघडण्याचा त्यांचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. ते कर्नाटकातील विरोधकांच्या मेळ्यात सामील झाले नव्हते. कारण काॅंग्रेस बरोबर जायचे नाही, अशी त्यांची भूमिका होती. पण    15 व्या फायनान्स कमीशनच्या बैठकीलाही तेलंगणाचा अर्थमंत्री उपस्थित नव्हता, म्हणजे भारतीय जनता पक्षापासूनही दूर राहण्याचा त्यांचा विचार व्यक्त होताना दिसतो आहे. पण त्यांची मुख्य नाराजी काॅंग्रेस विषयी आहे. उमेदवार जर बिगर काॅंग्रेसी असेल तर ते त्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात.
  महत्त्वाचे भिडू - बिजू जनता दल (9 सदस्य) 
 दुसरा पक्ष आहे बिजू जनता दल. हा पक्ष तर भारतीय जनता पक्ष व काॅंग्रेस पासून आपण सारखेच अंतर राखून आहोत, हे सतत दाखवत आला आहे. कर्नाटकच्या मेळ्यात बिजू जनता दलाचा प्रतिनिधी सामील झाला नव्हता. पण अनेक महत्त्वाच्या प्रसंगी बिजू जनता दलाने भारतीय जनता पक्षाला साथ दिली आहे. अण्णा द्रमुकही भारतीय जनता पक्षाला साथ देत आला आहे.
महत्त्वाचे भिडू- तेलगू देसम (6 सदस्य)
हा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेईल. कर्नाटकाच्या विरोधी पक्षांच्या मेळ्यात हा पक्ष सामील होता. बिगर भाजपा व बिगर काॅंग्रेस आघाडीत सामील होण्याची सध्यातरी मुळीच शक्यता नाही.
महत्त्वाचे भिडू - आंध्रातील  वायएसआरपी (2 सदस्य)
वायएसआरपी ने अजून आपली भूमिका व्यक्त केलेली नाही. पण तेलगू देसम व भारतीय जनता पक्ष यात हा पक्ष यात राज्याला खास दर्जा देण्याच्या प्रश्नाबाबत तो भारतीय जनता पक्षापेक्षा तेलगू देसमला अधिक दोषी मानतो.
राज्यसभा निवडणुकीत सहभागी पक्षांची व त्यांच्या सदस्यांची संख्या बघितली की, आवळ्याची मोट बांधण्यात कोण यशस्वी होतो, यावर निवडणुकीचा निकाल फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहील, हे लक्षात येईल. छोटेछोटे बिनबुडाचे लोटे भरपूर आहेत. उपद्रव मूल्य दाखविण्याची संधी न सोडणारे तर परिचितच आहेत. दोन्ही डगरीवर हात ठेवणारेही आहेत. अशी ही बजबजपुरी राज्यसभेच्या  पूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीत दखल घ्यावी अशी ठरली नव्हती. सत्ताधारी व विरोधक अशा दोघांसाठीही ही मते आपल्या पारड्यात पाडून घेणे हे एक किचकट पण महत्त्वाचे काम ठरेल. तिसऱ्या आघाडीचा उदयही या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पटलावर होऊ शकेल. तसे झाल्यास ही निवडणूक भाजपासाठी तुलनेने सोपी ठरेल, अशी चिन्हे आहेत. असे न झाल्यास मात्र उत्कंठा वाढविणारा  अटितटीचा सामना पाहण्यास मिळणार हे नक्की.

खेळ हा कळसूत्री बाहुल्याचा!

खेळ हा कळसूत्री बाहुल्याचा!
वसंत गणेश काणे,  बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  कोरिया हा पूर्व आशियातील इतिहासकालीन देश आहे. 1945 साली दुसरे महायुद्ध संपल्यानंतर कोरियावरील जपानचे स्वामित्त्व संपले खरे पण त्याचे रशियाच्या वर्चस्वाखालील उत्तर कोरिया (डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक आॅफ कोरिया) व अमेरिकेच्या वर्चस्वाखालील दक्षिण कोरिया (रिपब्लिक आॅफ कोरिया) अशा दोन सार्वभौम राष्ट्रात विभाजन करण्यात आले. कोरिया हे एक द्विपकल्प आहे. म्हणजे भारताप्रमाणे याच्याही तिन्ही बाजूंना पाणी व एका बाजूला जमीन आहे. वायव्येला कोरिया व चीनमधील सीमा रेषा खूप मोठी असून इशान्येला रशिया व कोरिया यातील सीमारेषा मात्र अतिशय लहान आहे. 
   उत्तर कोरियात साम्यवादी व दक्षिण कोरियात लोकशाही राजवट
  कोरियाचे 38 व्या अक्षांश रेषेवर उत्तर व दक्षिण कोरिया असे विभाजन करण्यात आले. उत्तरेकडच्या उत्तर कोरियात साम्यवादी राजवट व दक्षिण कोरियात अमेरिकेप्रमाणे लोकशाही राजवट स्थिरपद झाली. या दोन राजवटीत 1950 साली युद्ध झाले. 1953 मध्ये युद्धविराम झाला पण रीतसर शांतता करार मात्र झाला नाही. त्यामुळे या दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली नाही. ही परिस्थिती आजतागायत कायम आहे. या दोन देशातून विस्तव जात नाही. एकमेकावर गुरगुरणे तर सतत चालूच असते. यात कुरापतखोर उत्तर कोरियाच आहे.
  दोन्ही कोरियातील एकूण लोकसंख्या जेमतेम 8 कोटी आहे. उत्तर कोरियात अडीच कोटी तर दक्षिण कोरियात साडे पाच कोटी लोक राहतात. सर्व लोकांचा वांशिक वारसा एकच आहे. सर्व कोरियन भाषा बोलतात. अन्य भाषिक व वांशिक लोक खूपच कमी आहेत.
 धर्माचा विचार करता दक्षिण कोरियातील सुमारे 50 टक्के लोक कोणत्याही धर्माचे पालन करीत नाहीत. ख्रिश्चन 30 टक्के ( प्रोटेस्टंट 18 टक्के व कॅथाॅलिक 12 टक्के) तर बौद्ध 20 टक्के आहेत. उत्तर कोरियात मात्र धर्माचरणावर बंदी आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रप्रमुख हाच प्रतिपरमेश्वर असतो. त्याच्याच आरत्या ओवाळल्या जातात व त्याचीच करुणा भाकली जाते.
 दक्षिण कोरिया  हे पर्वतबहुल अमेरिकेच्या छत्रछायेखालील स्वतंत्र राष्ट्र असून त्याने कोरियन द्विपकल्पाचा दक्षिण भाग व्यापला आहे. सेऊल या जगातील पहिल्या दहा क्रमांकातील व दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या शहरात 2.5 कोटी लोक राहतात. हान ही प्रमुख नदी सेऊल शहरातून वाहते. उत्कृष्ठ व्यवस्थापनासाठी हे शहर वाखाणले जाते.
दक्षिण कोरिया हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत प्रगत असून त्याची आर्थिक प्रगती गेली 30 वर्षे सतत 10 टक्के वेगाने वाढते आहे. हा विक्रमच म्हटला पाहिजे. हा तसा चिमुकला असलेला देश जी (20) राष्ट्रगटातील एक महत्त्वाचा देश असून त्याचे चीन, अमेरिका व युरोपीयन युनीयन या परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या देशांशी एकाचवेळी बऱ्यापैकी व्यापारी संबंध राखण्याची चतुराई त्याने साध्य केली आहे. लोकशाही, पारदर्शी कारभार, प्रथम दर्जाच्या ओरोग्यविषयक सोयी, मूलभूत अधिकारांचे जतन या वैशिष्ट्यांमुळे दक्षिण कोरिया जगातील एक अति संपन्न देशम्हणून मान्यता पावला आहे. तो पॅरिस हवामानविषयक कराराचाही खंदा पुरस्कर्ता आहे.
 उत्तर कोरिया कोरियन द्विपकल्पातील 38 व्या अक्षांश रेषेवरील उत्तर भाग व्यापतो. प्यांगयांग हे त्याच्या राजधानीचे शहर 33 लक्ष लोकसंख्येचे  आहे. त्याची उत्तर सीमा बहुतांशी चीनला व किंचितशी रशियाला लागून आहे. उत्तर कोरियात साम्यवादी हुकुमशाही असून मानवी हक्कांच्या हननात त्याचा हात जगात कुणीही धरू शकणार नाही. जगातील शस्त्रसज्ज जगात त्याचा चौथा क्रमांक लागतो. तो अण्वस्त्रधारी नास्तिक देश आहे. सुसंपन्न दक्षिण कोरिया व भणंद पण युद्धखोर उत्तर कोरियाच्या एकीकरणाच्या वाटाघाटी आजवर यशस्वी का होऊ शकल्या नाहीत, हे यावरून स्पष्ट व्हावे.  
वैऱ्यांची गळाभेट अचानक कशी काय?
  दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी व उत्तर कोरियाचे तानाशहा किम जोंग ऊन यांची 26 व 27 एप्रिल 2018 ला भेट झाली. ही भेट अमेरिका व चीनच्या सूचनावजा आदेशाने झाली आहे. त्यामुळे यावेळी या दोन राष्ट्रात शिमग्याऐवजी संक्रांत साजरी झालेली दिसते आहे. एवढेच नव्हे तर शांतता, उभय देशांची संमृद्धी व एकीकरण यावरही मनमोकळी चर्चा झाल्याचे बाहेर आले आहे. या मनमोकळेपणाच्या मुळाशी चीन व अमेरिकेचा हातभार लागलेला आहे, ते मात्र प्रकटपणे पुढे आलेले नाही व निदान इतक्या लवकर तरी समोर येणारही नाही. तसेच आणखीही एक गुह्यतम गुपित बाहेर झिरपत झिरपत आले आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र व/वा क्षेपणास्त्र चाचणी केंद्रात असाकाही भयंकर स्फोट व अपघात झाला आहे, की ज्यामुळे नव्याने चाचण्या घेणे बऱ्याच काळपर्यंत दुरापास्त झाले आहे. अशावेळी कोणताही शहाणा माणूस शांततेची जपमाळ हाती घेईल, यात आश्चर्य ते काय?
 पाॅनमूनजाॅनच्या पुलावर हे दोन्ही नेते- किम व मून - एकमेकांकडे चालत आले, जवळ येताच त्यांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली व ते एकाच बाकावर बसून 30 मिनिटेपर्यंत एकमेकांचे कुशलमंगल विचारते झाले. कधी हास्याची कारंजी फुललेली तर कधी चेहऱ्यांवर गांभीर्याचे ढग भरून येतांना दुरून दिसत होते. पण विषय मात्र एकच होता, तो म्हणजे संपूर्ण कोरियन द्विपकल्प अण्वस्त्रमुक्त कसे करायचे? येत्या मे/जूनमध्ये किम यांची डोनाल्ड ट्रंप यांचेशी भेट ठरली होतीना. गुरगुरण्या व बोचकारण्यापासून आवरायला कोणीही नसतांना हे दोन नेते एकमेकांशी चर्चा करतील, असे कुणालाही स्वप्नात सुद्धा वाटले नसेल. नंतर हे दोन नेते पीस हाऊसमध्ये गेले. खरेतर शिखर परिषद इथेच भरणार होती. पण गळाभेटी अगोदरच उरकल्या होत्या. मोजून फक्त 15 मिनिटे एकांतात बोलणी झाली व पाॅनमुनजाॅन घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या झाल्या देखील! कारण या दोघांना कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे हलविणारे चीन व अमेरिका पडद्याआडून नव्हे तर रिमोट वापरत लक्ष ठेऊन होते. दक्षिण कोरियाचे युनिफिकेशन मिनिस्टर च्यो म्याॅंग ग्याॅन तर स्वत:शीच उद्गरले सुद्धा की, असे काही घडेल, याची कुणी स्वप्नातही कल्पना केली असेल का? त्यांच्या मते किम सडेतोड वृत्तीचे व सरळ तुकडा पाडणारे वाटले, त्यांच्या वागण्याबोलण्यात व्यावहारिक चातुर्याचा मागमूसही दिसला नाही. चालत येताना अवजड शरीराच्या किमना अवघड चढण चढावी लागली होती. यावेळी किम धूम्रपान करीत होते. तसे ते चेन स्मोकर असले तरी चारचौघात ते धूम्रपान करण्याचे टाळतात. अवघड चढणीचे आरोहण त्यांना जमेल का, याबद्दल उत्तर कोरियाच्या प्रतिनिधींना अंमळ शंका वाटत होती. या विषयीची चर्चा दबक्या आवाजात होत होती. हीही प्रगतीच म्हणायला हवी कारण काही बाबतीत तर उत्तर कोरियाचे लोक स्वत:शी देखील बोलायला धजत नाहीत, असे म्हणतात. बैठकीत ॲश ट्रे ठेवला होता. पण 34 (?) वर्षांच्या पोरसवदा  किमने 65 वर्षांच्या पोक्त व धीरोदात्त मून समोर धूम्रपान करून त्यांचा अधिक्षेप केला नाही.
  यावेळी चढणाऱ्या मद्याचे पेले भरले जात होते व किम एका पाठोपाठ एक पेला रिचवत चालले होते. तब्बल 160 मिनिटाच्या कार्यक्रमात ते एकदाही नाही म्हणाले नाहीत. सहाजीकच म्हटले पाहिजे, यजमानांचा अधिक्षेप झाला असता ना!
  खास मेनू
  योगायोगाची गोष्ट ही की मून यांच्या अर्धांगिनीचे नावही किम (पूर्ण नाव - किम जुंग सूक) हेच आहे. तर किम यांच्या पत्नीचे नाव री सोल ज्यू आहे. या दोन्ही जोडप्यांनी मिलेट व सोरघम पासून तयार केलेले खास 40 टक्के तीव्रतेचे मद्य प्राशन करून आपली मद्यप्राशनाची हौस, बैठकीत सामील झालेल्या इतरेजनांसोबत भागवली. राजकारणी मंडळी बैठकीत मद्यासोबत राजकारणातले मुद्दे चिवडीत असतांना इकडे बाजूलाच त्यांच्या अर्धांगिनी मात्र चवीसाठी कला व संगीत चघळत होत्या.
  बैठकीला रंग चढावा म्हणून किम यांनी येताना सोबत उत्तर कोरियातून नेंगमियाॅन नावाचे खवैय्यांचे खास फर्माइशी नूडल्स व ते तयार करायच्या मशीन्सही भेट देण्यासाठी आणल्या होत्या. दक्षिण कोरियाच्या प्रतिनिधींनी यावर अगोदर येथेच्छ ताव मारला. खाऊन झाल्यावर मात्र हे नूडल्स आजकाल दक्षिण कोरियातही सर्रास मिळतात, असा गौप्यस्फोट त्यांनी केला व एकच हशा पिकला. शेवटी हे नूडल्स उत्तर कोरियातील हाॅटेलात खाण्यातली मजा काही वेगळीच असणार यावर मात्र सर्वांचे एकमत झाले.
 संयुक्त पत्रकार परिषद
 संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी एका पाठोपाठ एक निर्धार घोषित केले. शांतता व सहकार्याला पर्याय नाही, हे दोघांनाही पटले होते. कोरिया द्विपकल्प अण्वस्त्रविरहित करण्यावर दोघांचाही भर होता पण जवळच्या अण्वस्त्रांचे काय करणार यावर मात्र किम यांनी मौन धारण केले होते. तात्पुरत्या युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या होऊन आता 65 वर्षे होत आहेत, याची नोंद घेत आता मात्र याचे कायम स्वरूपी शस्त्रसंधी करारात परिवर्तन करण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले. परस्परविरोधी कारवाया थांबवण्याचे, विभाजित कुटुंबीयांच्या भेटीगाठीस प्रोत्साहन देण्याचे, सीमेवर दळवळणाच्या सोयी विकसित करण्याचे, एकमेकांविरुद्धचा प्रचार थांबवण्याचे निर्णय फटाफट व चुटकीसरशी एकमत होऊन जाहीर करण्यात आले. पुढेही भेटत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हाक मारून तर पहा, ताबडतोब हजर होतो की नाही, ते बघा, असे म्हणत किम यांनी जड अंत:करणाने निरोप घेतला.
 वाटाघाटींचा समोर आलेला तपशील हा असा आहे. आगतस्वागताचे वृत्त नक्कीच खरे आहे. धोरणात्मक मुद्यांचे नक्की काय ते एकतर शी जिनपिंग व डोनाल्ड ट्रंप यांनाच माहिती असणार! कळसूत्री बाहुल्यांकडून यापेक्षा जास्त काही कळेल, ही अपेक्षा बाळगणे मुळातच चूक आहे, नाहीका?
चिमटे राजकारणातले
कोरिया व जपान यात कोरियन सामुद्रधुनी आहे. दोन मोठ्या जलाशयांना (प्रशांत महासागर व जपानचा सागर) जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्यासमान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. जपानचा समुद्र एक बंदिस्त समुद्र असल्यामुळे त्यात लाटा फारशा उसळत नाहीत व त्यात मिठाचे प्रमाणही कमी असते. यामुळे समुद्राचे सर्व फायदे मिळतात पण खवळणाऱ्या समुद्राचा प्रलयकारी प्रत्यय मात्र अनुभवाला येत नाही. अशी ही बहुगुणी सामुद्रधुनी आहे.
 या कोरियन सामुद्रधुनीत लियानकोर्ट राॅक्स, खडक व बेट स्वरुपात आहेत. कोरियन लोक यांना डोकडो किंवा टोकडो बेटे असे म्हणतात, तर जपानी लोक यांना ताकेशीमा म्हणतात. सध्या या बेटांवर दक्षिण कोरियाचा अंमल असून जपानने मात्र ही बेटे आपलीच आहेत, असा दावा केला आहे. दक्षिण व उत्तर कोरियातील शिखर परिषदेत दुपारच्या पंक्तीत भोजनाच्या शेवटी शेवटी ताकभाताऐवजी आमरसयुक्त (हपूस?) पक्वान्न तोंड गोड व्हावे म्हणून योजले होते. इथपर्यंत ठीक होते पण या पक्वान्नाला डोकडो या बेटाचे नाव देऊन, या एकमेकांपासून 65 वर्षे दुरावलेल्या उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या भावाभावांनी एकत्र येतांना, जपानला मात्र डिवचल्यासारखे केले. लगेचच या बेटांवर आपलाच हक्क आहे, अशी जाणीव व तशी तंबी देत, हा खवचटपणा करण्याची काही गरज होती का असे म्हणत व निषेध करीत जपानने आम्ररसयुक्त डोकडोत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. प्रमग्रासे मक्षिकापात झाला नाही पण भोजनोत्तर फलरस प्राशनात पडलेला/पाडलेला हा मिठाचा खडा काय काय नासवणार हे भविष्यकाळच दाखवील, असे दिसते.