Monday, June 12, 2023

 मतमोजणी आज तर अधिकृत निकाल 60 दिवसांनी! 


तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक१३/०६/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

मतमोजणी आज तर अधिकृत निकाल 60 दिवसांनी! 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

    थायलंड हा आग्नेय आशियातील अनेक सुंदर किनारे, अनेक राजवाडे, अनेक भग्नावशेष आणि अनेक बुद्धमंदिरे यांचाही देश आहे. थायलंडची राजधानी बँकॉक हे अत्याधुनिक शहर असून त्याच्या बाजूला कोळीसमूहबहुल प्रदेश असून तिथे अन्य धर्माची मंदिरेसुद्धा आहेत.     युनायटेड नॅशनल पार्टीचे प्रयुत चान- ओचा हे थायलंडचे मावळते पंतप्रधान आहेत.     थायलंडमध्ये 94 टक्के लोक बुध्दधर्मीय आहेत. धार्मिक मंदिरे आणि सुसंकृत सांस्कृतिक वारसा असलेली  स्थळे थायलंडला येणाऱ्या पर्यटकांची अतिशय आवडीची आहेत.

    थायलंड म्हणजे पूर्वीचा सयाम. 1945 मध्ये थायलंडचे नाव पुन्हा सयाम झाले. 1949 मध्ये सयामचा पुन्हा थायलंड झाला. थायलंडचे वैशिष्ट्य असे की युरेपियनांना त्या देशात वसाहत स्थापन करता आली नाही. 1932 नंतरच्या थायलंडच्या घटनेनुसार राजपदाला मान्यता आहे. थाय जनता राजनिष्ठ म्हणून प्रसिद्ध आहे. 

महत्त्वाचे नेते, पक्ष व मिळालेली मते 

निवडणुकीत 75 च्या वर पक्षांनी आपले नशीब आजमावून पाहिले असल्यामुळे त्यातल्या प्रमुखाांचीच नोंद घेतली आहे.

1) पिटा लिमजारोएनराल यांच्या   मूव्ह फॅारवर्ड पार्टीला   151जागा

2) पिटोंगटार्न शिनावाट्रा यांच्या फिऊ थाई पार्टीला 141 जागा

3) प्रयुत चान- ओचा यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीला 36 जागा

4) अनुतिन चार्न विराकूल यांच्या भूमजाईथाई पार्टीला 71 जागा 

5) ज्यूरिन लकसानाविसिट यांच्या डेमोक्रॅट पक्षला 25 जागा

6) वन महंमद नूर यांच्या प्रचाचार्ट पार्टीला 9 जागा

7) प्रवीट वॅांगसुवॅांग यांच्या पलांग प्रचारत पार्टीला 40 जागा

असा 750 जागापैकी बहुसंख्य जागांचा हिशोब आहे.

निवडणूक पद्धती 

  थायलंडच्या संसदेची 500 सदस्यांची प्रतिनिधीसभा आणि 250 सदस्यांची सीनेट अशी दोन सभागृहे आहेत. सीनेटरांची निवड सैन्यदलाकडून केली जाते. अशी पद्धत क्वचितच दुसरीकडे कुठे असेल. यावेळी 2023 मध्ये थायलंडमध्ये विरोधी पक्षांनी दमदार विजय मिळवला आहे. 2014 नंतर पहिल्यांदाच प्रयुत यांना हा जबरदस्त धक्का बसला आहे. मूव्ह फॉरवर्ड पार्टीने फेयुथाई पार्टीवर निसटता विजय प्राप्त केला आहे पण तरीही संपूर्ण चित्र एवढ्यात स्पष्ट होणार नाही. जुलैमध्ये प्रतिनिधीसभा आणि सीनेट यांची संयुक्त सभा आमंत्रित आहे. 

    14 मे ला 4 कोटी मतदारांनी मतदान केले. विरोधात पुरातनमतवादी नेते आणि सैन्यपुरस्कृत पार्टी होती तरीही मूव्ह फॉरवर्ड पार्टी आणि फेयु थाई पार्टी यांनी या निवडणुकीत कमालीचे यश संपादन केले. यानंतर निर्माण होणाऱ्या आघाडीत फेयुथाई पार्टी हा मोठा भाऊ आणि थाई पार्टीचे माजी पंतप्रधान यांची कन्या थाकसिन शिनावात्रा हिला लहान भावाची भूमिका स्वीकारावी लागेल. पण या दोन पक्षाचे आघाडी करण्याबाबत ठरलेले नाही. या सर्व पक्षांना साठ दिवस थांबावे लागणार आहे कारण थायलंडमध्ये अधिकृत निकाल साठ दिवसांनंतर जाहीर होत असतात. मुव्ह फॉरवर्ड पार्टीला जरी सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्या तरी ती सत्तेवर येईलच असे नाही. 

  पंतप्रधान कोण होणार, हे सेनाद्वारा नियुक्त सीनेटच्या हाती

   कनिष्ठ सभागृहासाठी मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराला दोन मतपत्रिका मिळतात. 500 पैकी 400 जागा भरण्याची पद्धती भारतातील निवडणूक पद्धतीप्रमाणे मतदारसंघनिहाय आहे. दुसरे मत वापरून उरलेल्या 100 सदस्यांची निवड ‘पार्टी यादी पद्धतीने’ निवडले जातात. म्हणजे असे की झालेले एकूण मतदान 100 टक्के इतके गृहीत धरले जाते. निरनिराळ्या पक्षांना मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीनुसार त्या त्या पक्षाने सादर केलेल्या उमेदवारांच्या यादीतून तेवढे उमेदवार प्रमाणशीर मतदान पद्धतीने निवडले जातात.

    एकूण 750 सदस्यातून बहुसंख्य मते मिळवणारा उमेदवार पंतप्रधानपदी निवडून येतो. म्हणजे त्याला कमीतकमी 376 मते मिळवावी लागतात. प्रस्थपित पक्षांना या पद्धतीचा फायदा होतो. त्यांना सेनापुरस्कृत 250 सदस्यांची मते मिळाल्यास बहुमतासाठी फक्त 126 मतांची गरज असते. ही लोकशाहीची थट्टाच आहे कारण सिनेटचे 250 सदस्य निवडून आलेले नसतात तर सेनेने नियुक्त केलेले असतात. म्हणजे पंतप्रधान कोण होईल हे सेना ठरवत असते. 2019 साली हे घडून आले होते. प्रयुत यांना फक्त 116 मते मिळली होती तर फेयु यांना 36 मते मिळली होती. पण सेनेने पुरस्कृत केलेल्या आणि इतर काही सदस्यांच्या पाठिंब्यामुळे प्रयुत पंतप्रधान झाले होते.

   यावेळी थायलंडला जुलै 23 पर्यंत तरी पंतप्रधान मिळणार नाही. मतमोजणीनंतर 60 दिवसांच्या आत निवडून आल्याचे प्रमाणपत्र विजयी उमेदवाराला देणे आयोगावर बंधनकारक आहे. निवडणूक आटोपताच मूव्ह फॅारवर्डचे नेते पिटा यांनी सहा पक्षांची आघाडी जाहीर केली. यात फिऊ थाय सह अन्य 4 पक्ष आहेत. यांच्या एकूण सदस्यांची संख्या 310 होते. सैन्याद्वारे नियुक्त सदस्यांपैकी निदान 66 सदस्य आपल्याला पाठिंबा देतील, असा पिटांना विश्वास आहे. म्हणजे हे सर्व मिळून 376 असे बहुमताइतके होतात. पिटा यांनी आघाडीसाठी  न निवडलेल्या पक्षांचाही पाठिंबा मागितला आहे. भूमथाय यथाय पार्टीला पाठिंबा मागणे सर्वात सोपा मार्ग आहे. पण अजूनतरी ते घडलेले दिसत नाही. मूव्ह फौारवर्डचे सुधारणावादी पार्टी आहे. नवीन घटनेत उदारमतवादी भूमिका, सैन्यात सामील होण्याची सक्ती बंद करणे, राजावर केलेली टीका हा फौजदारी गुन्हा ठरविणारे आर्टिकल 112 रद्द करणे या मुद्द्यांवर भूमथाय यथाय पार्टी आणि सीनेट सदस्य हे दोन्ही घटक निदान सद्ध्यातरी सहमत नाहीत. 

नवीन गटांची निर्मिती

   मूव्ह फॅावर्ड पार्टी आणि फिऊ थाय पार्टी यांची युती होऊ  शकते. पण त्यासाठी फिऊ थाय पार्टीला जुने करार मोडावे लागतील आणि भूम जाई थाय पक्ष, सैन्यपुरस्कृत पक्ष आणि सैन्याने नेमलेल्या सदस्यांची सीनेट यांचेशी संबंध जोडावे लागतील. मगच पिटोंगटॅार्न यांना पंतप्रधान करता येईल. दुसरीही एक शक्यता आहे. भूम जाई थाय पक्ष, सैन्यपुरस्कृत पक्ष आणि सैन्याने नेमलेल्या सदस्यांची सीनेट एक वेगळीच चाल खेळू शकतात. मूव्ह फॅावर्ड पार्टी आणि फिऊ थाय पार्टी यांचेकडे दुर्लक्ष करायचे आणि अल्पमतातील सरकार स्थापन करायचे. पण असे सरकार अविश्वास दर्शक ठरावासमोर टिकू शकणार नाही. परिणामी जनतेत असंतोष निर्माण होईल. सेनेला हेच हवे आहे. 

      सरकार पाडण्याचे कायदेबाह्य उपाय

    शिवाय कायदाबाह्य मार्गही आहेतच की. सीनेटमधील सैन्यनियुक्त सदस्य मतदानात तटस्थ राहू शकतील. ते पिटा यांना कायम करण्याचे नाकारू  शकतात. असे झाले तर पुरेशी 376 मते न मिळाल्यामुळे  पेचप्रसंग निर्माण होऊ शकेल. न्यायालये मूव्ह फॅावर्ड पक्ष किंवा फिऊ ताय पक्ष यांचा विजय रद्दबातल करून बहुमताचा आकडा बदलवू शकतील. किंवा या दोन पक्षांनाच अपात्र ठरवू शकतील. 2020 साली फ्युचर फॅारवर्ड पक्षाचे बाबतीत त्यांनी असे केले होते. निवडणुकीचे एक आठवडा अगोदर पलांग प्रचारथ पार्टीच्या सदस्याने पीटा यांच्यावर निवडणूकविषयक नियमांचा भंग केल्याचा आरोप केला होता आणि त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. जर नवीन संसद पंतप्रधान निवडू शकली नाही तर देशात दंगे माजतील. अशा परिस्थितीत सैन्य सत्ता हाती घेईल. सैन्याला हेच हवे आहे.

राजाची भूमिका कशी?

  थायलंडमध्ये राजाची भूमिकाही महत्त्वाची असते.  पूर्वीचे राजे भूमीबोल अदुल्यदेज  बंडखोरांना समजावीत असत, त्यामुळे रक्तपात होत नसे. पण विद्यमान राजे देशांतर्गत राजकारणात फारसा रस घेत नाहीत. त्यामुळे ते मूव्ह फॅार्वर्ड पक्ष किंवा फिऊ ताय पक्ष  किंवा  सैन्याद्वारे नियुक्त सदस्य यांचे सदर्भात नक्की कोणती भूमिका घेतील हे कळण्यास मार्ग नाही.

No comments:

Post a Comment