पोपटाच्या मदतीमुळे खुनाचे रहस्य उलगडले
वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
एका पोपटाने खुन्याला पकडून देण्यात मदत केल्याची
घटना एखाद्या रहस्यकथेतली नाही तर प्रत्यक्ष जीवनात घडलेली आहे,हे ऐकून बहुतेकांना
आश्चर्य वाटेल.त्याचे असे घडले की, ४५ वर्षाची नीलम शर्मा आणि तिच्या पाळीव कुत्र्याला
कुणीतरी मारले होते. खुनी पसार झाला होता.
खुन्याचा तपास लागत नव्हता. पोलीस शोध घेत होते पण त्यांच्या प्रयत्नांना यश येत
नव्हते.
विजय शर्मा नावाच्या एका पत्रकाराची नीलम ही
पत्नी होती. त्याचा पुतण्या घरी आला की,घरातला पोपट अतिशय अस्वस्थ होऊन विचित्र
अआवाजात ओरडू लागायचा. एवढेच नव्हे तर बोलताबोलता आशुतोषचे – पुतण्याचे नाव जरी
निघाले तरी पोपट ओरडायला लागायचा. हे पाहून विजय श्रमाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
आणि त्याने ही बाब पोलिसांच्या निदर्शनाला आणली.
पोलीस चौकशीत आशुतोषने आपल्या गुन्ह्याची कबुली
दिली. आपल्या एका साथीदारासह तो चोरी करण्याच्या इराद्याने घरात घुसला होता.
त्याने मागे ओळख राहू नये म्हणून आपल्या चुलतीचा – नीलमचा - खून केला. कुत्रा
भुंकू लागला म्हणून त्याने कुत्र्यालाही तीच वाट दाखविली. पोपट या सर्व घटनेचा मूक
साक्षीदार होता. तो बहुदा भेदरून गेला असावा. पण त्याने आपल्या मनात सर्व घटनांची
कायम स्वरूपी नोंद घेतली असली पाहिजे. म्हणूनच आशुतोष दिसला किंवा त्याच्या नावाचा
उल्लेख जरी झाला तरी तो अस्वस्थ होऊन ओरडायला लागायचा.
अशीच आणखी एक कथा सांगतात. खून झाला तेव्हा
घरातले पाळीव कुत्रे भुंकले नव्हते. य घटनेच्या आधाराने पोलिसांनी खुनी माणसाला
शोधून काढले होते. कुत्रा खुन्याला ओळखत असला पाहिजे. हा धागा पकडून पोलीस खुन्यापर्यंत
पोचले होते.
No comments:
Post a Comment