संघ परिवर्तन, माझे यशापयश
ज्ञानमार्गी स्वयंसेवक - दिलीप देवधर
संप स्वयंसेवकांचे तीन मुख्य प्रकार आहेत- भक्तीमार्गी, कर्ममार्गी व ज्ञानमार्गी. संघ संघटनेचे विभाजन असे आहे. -① राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ② राष्ट्र सेविका समिती-संघ परिवारात दोन प्रकारच्या संस्था आहेत-
① क्लास ऑर्गनायझेशनच्या २) मास ऑर्गनायझेशन. मास ऑर्गनायझेशनच्या शेकडो सदस्य संघटना आहेत. संघाचे हजारो प्रकल्प आहेत. संघाच्या लाखो प्रॉपर्टीज आहेत- ① मालकीच्या २) भाड्याच्याः • संघ संघटनेच्या प्रत्येक संस्थेची कार्यकारिणी आणि सदस्य संख्या भिन्न आणि स्वतंत्र आहे. हे करोडो मध्ये मोजता येईल. आरएसएस . भारतात राहणारे 140 कोटी, अधिक 5 कोटी विदेशात राहणाऱ्यांचे संघटन आहे. संघविश्वाची लेखी स्वरूपातील विश्वसनीय माहिती जगाला उपलब्ध असावी असा माझा प्रयत्न 1973 सालापासून प्रारंभ झाला आहे. अधिकृत माहिती संकलीत करून उपलब्ध करावी, अशी माझी सातत्याने विनंती आहे. यश अत्यल्प आहे, अपयश हिमाल्या एवढे आहे.
[हाफ पॅंट, फुल पॅंट आणि मंगलवेश] 1920 साली 1200 स्वयंसेवकांचा जो गणवेश
होता, तो 1940 साली सरकारच्या आदेशाने बदलला. पूर्वी 3/4 लांबीची विजार होती. 1940 साली ती हाफपॅंट झाली. 1971-12 साली मी वर्षभर फुलपॅंट शाखा भरविली होती. वर्धापनदिनी फुलपॅंट शाखेला सरसंघचालक आणि सरकार्यवाह यांनी भेट दिली. पण संघाची हाफपॅंट फुलपॅंट होण्यासाठी प्रचंड काळ लागला. 2016 साल उजाडले. यशप्राप्ती पूर्ण झाली आहे पण गणवेशमुक्त स्वयंसेवक अजूनही शक्य दिसत नाही, हे अपयश आहे.
कुप्प.सी. सुदर्शन ही व्यक्ती सरसंघचालक होताच त्यांनी २००० साली घड्याळाचे काटे उलटे फिरविले. दिल्लीच्या विजयादशमी उत्सवात प्रत्येक जण स्वयंसेवक, प्रेक्षक आणि पत्रकार फक्त गणवेशातच येऊ शकतील अशी आज्ञा त्यांनी दिली. शिस्त पाळण्यासा ठी कार्यक्रम क्लोज स्टेडियममध्ये ठेवला. मा. गो. वैद्य संघ संघ प्रवक्ते होते.
No comments:
Post a Comment