जागतिक राजकारणाला कलाटणी देणारी अमेरिकन निवडणूक
वसंत गणेश काणे,
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
अमेरिकेतील अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी २००५ मध्ये महिलांच्या संदर्भात अत्यंत ग्राम्य पद्धतीने जी मुक्ताफळे उधळली त्यामुळे त्यांना बॅकफूटवर यावे लागलेआहे. याबद्दल त्यांनी क्षमायाचना केली असून ही बाब २००५ ची म्हणजे एका दशकापूर्वीची व एका वेगळ्या प्रसंगातील अाहे, असे म्हटले आहे. विरोधक मूळ व महत्त्वाच्या मुद्यावरून लक्ष विचलित करण्याच्या हेतूने हे प्रकरण उकरून काढीत आहेत, असा पवित्रा डोनाल्ड ट्रंप घेत आहेत. पण तरीही एकापाठोपाठ एक अशाप्रकारे अनेक महिलांनी आपल्यावर डोनाल्ड ट्रंप यांनी केलेल्या अतिप्रसंगांचे दाखले दिले आहेत. खुद्द रिपब्लिकन पक्षांतही या प्रश्नावरून दोन तट पडले आहेत. डोनाल्ड ट्रंप यांनी रिंगणातून माघार घ्यावी, अशी सूचनावजा मागणी आतापर्यंत डेमोक्रॅट पक्षच करीत होता. आता रिपब्लिकन पक्षातही असे सूर उमटू लागले आहेत. लक्षावधी दर्शकासमोर टी व्ही ॲंकर व हिलरी क्लिंटन हा मुद्दा उपस्थित करतात व भविष्यातही उपस्थित करतील. या मुळे होणारी नामुष्की व नाचक्की ही ज्या प्रेक्षकांसमोर होते/होणार आहे, त्यातील अनेक अनिश्चित मतदार (अनडिसायडेड व्होटर्स) असणार आहेत. त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्ता भरपूर आहे. हा प्रश्न डोनाल्ड ट्रंप सहजासहजी झटकू शकणार नाहीत. वाॅशिंगटन पोस्टने फोडलेली बित्तंबातमी डोनाल्ड ट्रंप यांची पाठ सोडण्याची चिन्हे नाहीत. यावर उतारा म्हणून पलटवार करीत बिल क्लिंटन ( हिलरी क्लिंटन यांचे पती) यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात अनेक महिलांचे बाबतीत अतिप्रसंग केले होते व पीडित महिलांनी गप्प बसावे म्हणून हिलरी क्लिंटन त्यांच्यावर दबाव आणित असत आणि गप्प न बसणाऱ्यांना त्रास देत असत, ( शी बुलीड, अटॅक्ड, शेम्ड ॲंड इनटिमिडेटेड हिज व्हिक्टिम्स) असा आरोप डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे. नवऱ्याने लफडी करायची व बायकोने ती निस्तरण्यासाठी कोणत्याही टोकाला जायचे, असा नवराबायकोचा धिंगाणा असे, असा डोनाल्ड ट्रंप यांचा या जोडप्यावर आरोप आहे. याच्याही साक्षीदार महिला उभ्या झाल्या आहेत/ उभ्या होत आहेत. अध्यक्षपदाच्या दोन उमेदवारांचा परस्पर परिचयाचा हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करील की दोन्ही उमेदवारांबद्दल मतदारांना उबग येऊन ते वेगळ्या पर्यायाचा म्हणजे लिबर्टेरियम पक्षाचे तिसरे उमेदवार गॅरी जाॅनसन किंवा ग्रीन पार्टीच्या चौथ्या महिला उमेदवार जिल स्टीन यांचेकडे वळतात हे बघायचे. पण हे दोन्ही उमेदवार मिळून १५ टक्याच्यापेक्षा जास्त मते घेऊ शकतील, असे सध्यातरी दिसत नाही. पण दोन उमेदवारातच आतापर्यंत शंभर मतांची विभागणी होत असे, आता तशी होणार नाही १५ टक्के मते हे दोन उमेदवार घेतील व उरलेली ८५ टक्के मते डोनाल्ड ट्रंप व हिलरी क्लिंटन यात वाटली जातील. असे घडल्यास सर्व पत्रपंडितांचे अंदाज धुळीस मिळण्याची शक्यता पुढे येते आहे.
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या दोन उमेदवारांना समोरासमोर आणून त्यांच्यात वादविवाद/चर्चा घडवून आणण्याच्या पाच फेऱ्या आयोजित करण्यात येत असतात. यापैकी पहिल्या फेरीत हिलरी क्लिंटन डोनाल्ड ट्रंप यांच्या तुलनेत वरचढ ठरल्या आहेत. दुसऱ्या फेरीतही असाच प्रकार घडू नये यासाठी डोनाल्ड ट्रंप यांना आपला तोल जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. डोनाल्ड ट्रंप यांना पहिल्या फेरीच्या तुलनेत निदान काहीशी तरी बरी कामगिरी दुसऱ्या फेरीत पार पाडायला हवी, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पण आता कटुता इतकी वाढली आहे की, हिलरी क्लिंटन यांनी डोनाल्ड ट्रंप यांचेशी हस्तांदोलन करण्यासही नकार देत आहेत. ही कटुता पुढील फेऱ्यात वाढण्याचीच चिन्हे आहेत, असे जाणकारांचे मत आहे. पण कटुता आणखी वाढणार म्हणजे नक्की काय होणार ? आता आणखी काय व्हायचे बाकी राहिले आहे? हा मुद्दा मात्र कुणीही स्पष्ट करीत नाही. कारण त्याची कल्पनाच करता येण्यासारखी नाही.
हिलरी क्लिंटन यांनी डोनाल्ड ट्रंप यांचे विरुद्ध जनमतात चांगलीच बढत घेतली असून ती संपूर्ण अमेरिकेत आढळते आहे व याला स्विंग स्टेट्सही अपवाद नाहीत. स्विंग स्टेट्स म्हणजे निवडणुकीला कलाटणी देण्याची क्षमता असलेली राज्ये. अमेरिकेत ५० पैकी चाळीस राज्ये अशी आहेत की जी परंपरागत रीतीने डेमोक्रॅट पक्ष व रिपब्लिकन पक्ष यात विभागलेली आहेत. यात डेमोक्रॅट पक्ष रिपब्लिकन पक्षापेक्षा चाळीस ते पन्नास ते साठ मतांनी ( इलेक्टोरल व्होट्सनी) नेहमीच आघाडीवर असतो. असे प्रत्येक पक्षाचे बाले किल्ले आहेत. हे बाले किल्ले यावेळीही तसेच कायम राहतील असे निरीक्षकांचे मत आहे. या राज्यांमध्ये दोन पक्षातील मतांच्या टक्केवरीत जरी थोडाफार फरक पडला ( आणि तो यावेळी हिलरी क्लिंटन यांना अनुकूल असात पडेल असे मानले) तरी जोपर्यंत संबंधित पक्षाची मतांची टक्केवारी दुसऱ्यापेक्षा किंचितही जास्त राहील तो पर्यंत त्या पक्षाला ‘विनर टेक्स आॅल’ या नियमानुसार त्या राज्यातील सर्व इलेक्टोरल व्होट्स मिळणार आहेत. त्यामुळे हा पन्नास ते साठ मतांचा फरक तसाच कायम राहील. मग हिलरी क्लिंटन यांना मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीत भलेही वाढ झालेली असो. मात्र दहा राज्ये स्विंग स्टेट्स मानली जातात. ही कुंपणावरची राज्ये आहेत. याचा अर्थ असा की, या राज्यात डेमोक्रॅट पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांच्यातील मतांच्या टक्केवरीत पाचपेक्षा जास्त टक्यांचा फरक नसतो. या निवडणुकीत ८ नोव्हेंबरला ही राज्ये काय करतात, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. सध्या असे दिसते आहे की, हिलरी क्लिंटन यांचा या राज्यांमधला पाठिंबाही वाढता असून डोनाल्ड ट्रंप तो थोपविण्यात किती यशस्वी होतात, हे पहावे लागेल.
अमेरिकन मतदार सूज्ञ आहे, असा समज आहे व जगातील इतर देशांशी तुलना करता हे बरोबरही आहे. पण अमेरिकेतही ७५ टक्के लोक अंधश्रद्ध आहेत, सनातनी ख्रिश्चन धर्म परायण आहेत, यावर एकदम विश्वास बसणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे. २५ टक्के बोलक्या(व्होकल) मतदारांचाच बोलबाला ऐकू येत असतो. उरलेल्या ७५ टक्के मतदारांची तुलना आपल्या येथील मायावतीच्या मतदारांशी करता येईल. यांचा आपल्या नेत्यावरचा (पक्षावरचा) विश्वास प्रचाराच्या झंझावाताला सहसा दाद देत नाही. तसेच यात मतदानाची टक्केवारीही बोलक्या (व्होकल) मतदारांच्या तुलनेत कितीतरी जास्त असते हे अमेरिकेतही लागू पडते. या मतदारांची नाडी आजही फार मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पक्षाच्या म्हणजे पर्यायाने डोनाल्ड ट्रंप यांच्या हाती आहे. ही तशीच कायम रहावी यासाठी डोनाल्ड ट्रंप यांची धडपड सुरू असून डेमोक्रॅट पक्ष या भरभक्कम भिंतीवर धडका देत असून त्यला काही प्रमाणात यश मिळतांना दिसते आहे. याचे एक उदाहरण म्हणून अनेक रिपब्लिकन पक्ष नेत्यांनी आपल्याच पक्षाच्या - रिपब्लिकन पक्षाच्या - उमेदवारावर टीका करण्यास सुरवात केली आहे.
आश्वासनांची खैरात - या मतदारांवर आपली भिस्त ठेवून डोनाल्ड ट्रंप आपली प्रचार मोहीम राबवत आहेत. मी स्थलांतर रोखीन, मी इसीसला नेस्तनाबूत करीन, मी अमेरिकनांच्या नोकऱ्या इतर देशीयांना हिसकू देणार नाही, मी बेकायदेशीर प्रवेश भिंत बांधून थोपवीन, जगातील नसत्या उठाठेवींवर होणारा खर्च बंद करून ते डाॅलर अमेरिकेत खर्च करीन ह्या त्यांच्या घोषणा जागृत, सुशिक्षित, प्रगल्भ मतदारांना हास्यास्पद, मूर्खपणाच्या, अमलात आणता येऊ न शकणाऱ्या वाटतात, हे खरे आहे. एच१ बी व्हिसा घेऊन इतर देशातील लोक अमेरिकेत नोकऱ्या करतात, तसेच आऊट सोर्सिंग प्रकारे अमेरिकन कंपन्या आपली कामे परदेशातून करवून घेतात. या दोन्हीमुळे अमेरिकन तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत, म्हणून हे दोन्ही प्रकार थांबवण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी डोनाल्ड ट्रंप यांनी नुकतीच घोषणा केली आहे. असे प्रत्यक्षात घडले किवा न घडले तरी नाराज होणाऱ्यात भारतीय मतदार अणार आहेत. म्हणूनच कदाचित भारतीय मतदारांना आकृष्ट करण्यासाठी त्यांनी मोदी व हिंदूंची वारेमाप स्तुतीही न्यू जर्सीतील कार्यक्रमाच्या निमित्ताने केली आहे. अमेरिकन वृत्तसृष्टीने मात्र सरळसरळ व उघडपणे व तसे ठराव करून हिलरी क्लिंटन यांची बाजू उचलून धरण्याची अभूतपूर्व भूमिका घेतली असल्यामुळे हिलरी क्लिंटन यांचा बोलबाला वाढतो आहे. पण प्रत्येक वेळी डोनाल्ड ट्रंप यांना एक कपर्दिकही खर्च न करता तेवढीच प्रसिद्धी मिळत असते.
याच सोबत डोनाल्ड ट्रंप हिलरी क्लिंटन यांच्यावर आरोपांच्या फैरी सतत झाडत असतात. खाजगी कामासाठीचा ईमेल अकाऊंट शासकीय कामासाठी वापरून हिलरी क्लिंटन यांनी गुन्हा केला असून त्यांना मी तुरुंगात पाठवीन, क्लिंटन फाऊंडेशनला देणग्या मिळाव्यात म्हणून श्रीमंत इस्लामी देशांना अवाजवी सवलती हिलरी क्लिंटन यांनी दिल्या, अशा प्रकारची उजळणी ८ नोव्हेंबरपर्यंत होत राहणा
हे सर्व काहीही असले किंवा झाले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने अमेरिकन राजकारण कूस बदलणार हे नक्की. त्याचे जागतिक राजकारणावर काय आणि काय काय परिणाम होतील, हे ज्योतिषीच सांगू शकेल किंवा तोही सांगू शकणार नाही

No comments:
Post a Comment