अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक २०१६
वसंत गणेश काणे
या निवडणुकीची सहा प्रमुख वैशिष्टे असणार आहेत.
१. बराक ओबामा २००९ मध्ये अध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हा त्यांचे वय ४७ वर्षांचे होते. तरूणपणात त्यांचा क्रमांक पाचवा लागतो. थिओडोर रुझवेल्ट हे तरूणतम उमेदवार ४२ वर्षे ३२२ दिवसांचे होते. यावेळी डोनाल्ड ट्रंप निवडून आले तर त्यांचे वय ७० च्या पुढे असेल. कारण त्यांचा ७० वा वाढदिवस १४ जूनलाच होता. ते अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध अध्यक्ष ठरतील. यापूर्वी हा मान रेनाॅल्ड रीगन यांना मिळाला होता. ( वय वर्ष ६९). हिलरी क्लिंटन निवडणुकीपूर्वी दोन आठवडे अगोदर ६९ वर्षांच्या होतील. वयोवृद्धतेत त्यांचा दुसरा क्रमांक असेल.
२. डोनाल्ड ट्रंप व हिलरी क्लिंटन यापैकी कुणीही जिंकले तरी १९४४ नंतर प्रथमच एक ‘न्यूयाॅर्कर’ (आपल्या मुंबईकर प्रमाणे) अमेरिकेचा अध्यक्ष होईल. फ्रॅंक्लीन रुझवेल्ट हे पहिले न्यूयाॅर्कर होते.
३. डोनाल्ड ट्रंप जिंकल्यास ते निदान आजच्या दिवसाचा विचार केला तर सर्वात कमी खर्च करणारे उमेदवार ठरतील. एक धन्नासेठ पण कमीतकमी खर्च हा विरोधाभास असला तरी तो आजमितीला झालेला खर्च हिशोबत घेतला तर कमीतकमी खर्च करणारा व जिंकणारा उमेदवार असेल. हिलरी क्लिंटन यांचा आजचा खर्च डोनाल्ड ट्रंप यांच्या खर्चाच्या तिपटीच्या जवळपास आहे. डोनाल्ड ट्रंप पुष्कळ प्रसिद्धी फुकटात मिळवत आहेत.
४. गेल्या साठ वर्षात अमेरिकेचे अध्यक्ष झालेले उमेदवार कोणत्या ना कोणत्या राज्याचे गव्हर्नर असत निदान खासदार तरी असत. राजकीय अनुभव नसलेले ड्वाईट आयसेनहोव्हर १९५३ साली अमेरिकेचे अध्यक्ष झाले खरे पण ते दुसऱ्या महायुद्धातील एक अद्वितीय सरसेनापती होते. पण जुगाराचे अड्डे( कॅसिनो) चालवणारा, हाॅटेल मालिकांचा मालक असलेला, राजकीय किंवा मानवतावादी दृष्टीकोन नसलेला बिल्डर डोनाल्ड ट्रंप प्रथमच अमेरिकेचा अध्यक्ष होईल. यापर्वी अध्यक्ष झालेले हर्बर्ट हूव्हर हे राजकारणी किंवा गव्हर्नर नसले तरी विख्यात अभियंता व मानवतावादी अशी तरी त्यांची ख्याती होती. डोनाल्ड ट्रंप यांचा दावा असा आहे की सौदेबाजीतील त्यांचे प्रभुत्व व प्रशासनाशी जवळीक नसणे हे त्यांचे दोन विशेषच त्यांच्या कारकिर्दीला यशस्वी करण्यास कारणीभूत ठरतील.
५. हिलरी क्लिंटन या गेली अनेक वर्षे वाॅशिंगटन प्रशासनाशी जवळीक साधून आहेत. निवडून आल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील. एका प्रमुख राजकीय पक्षाने अध्यक्षपदासाठीच्या उमेदवार म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला उमेदवार हे मोरपीस त्यांच्या शिरपेचात निवडणुकीपूर्वीच खोवले गेले आहे. यापूर्वी २००८ मध्ये सारा पावेल या रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या व १९८४ साली जेराल्डीन फेरॅरो या डेमोक्रॅट पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. दोघींनीही निवडणुकीत आपटी खाल्ली होती. म्हणूनही हिलरी क्लिंटन यांच्या बाबत काय होणार हा राजकीय वर्तुळातील एक औत्सुक्याचा व महिलांच्या दृष्टीने आस्थेचा विषय झाला आहे.
६. हॅरी ट्रूमन व लिंडन जाॅनसन हे उपाध्यक्ष असतांनाच अध्यक्ष फ्रॅंकलिन रुझवेल्ट हे आजारपणामुळे तर जाॅन एफ केनेडी हे खून झाल्यामुळे मृत्युमुखी पडले होते. व ट्रूमन आणि जाॅनसन अध्यक्ष झाले. नंतर ते पुढच्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आले होते. हिलरी क्लिंटन जर निवडणुकीत विजयी झाल्या तर तर लागोपाठ तिसऱ्यांदा डेमोक्रॅट पक्ष अध्यक्षपदी विराजमान होईल. असे यश डेमोक्रॅट पक्षाला दीडशे पेक्षा जास्त वर्षांपूर्वी मिळाले होते.

No comments:
Post a Comment