अमेरिकन मतपत्रिकेचे अगडबंब स्वरूप व एकाचवेळी अनेक निवडणुका
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
२७२१ प्राईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया, अमेरिका
९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत जी मतपत्रिका असेल त्या मतपत्रिकेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी कोणती नावे असतील ते आज आता सांगता येणार नाही, म्हणून अभ्यासासाठी आपण २०१२ सालची मेरी लॅंड प्रांतातील ॲरुंडेल काऊंटीची(जिल्ह्याची) मतपत्रिका उदाहरणादाखल घेऊ. ही मतपत्रिका चांगलीच लांबरुंद अशी चार पानी होती. या मतपत्रिकेवर सर्वात वर दोन सूचना होत्या.
१) तुम्हाला ज्याला मत द्यायचे असेल त्याच्या नावाच्या डाव्या बाजूला एक अंडाकृती वर्तुळ आहे. दिलेल्या पेन्सीलनेच ते वर्तुळ काळे करा. दुसरी एखादी पेन्सील वापरू नका. चूक झाल्यास खोडण्याचा प्रयत्न न करता नवीन मतपत्रिका मागा. आपले नाव लिहिल्यास किंवा स्वाक्षरी केल्यास किंवा गुप्ततेचा भंग होऊ शकेल अशी खूण केल्यास मतपत्रिका बाद होईल.
२) उभ्या असलेल्या उमेदवाराशिवाय दुसरेच एखादे नाव तुमच्या मनात असेल तर ते नाव तुम्ही लिहू शकता.
उदाहरणासाठी निवडलेल्या मेरीलॅंड प्रांतातील ॲरुंडेल काऊंटीच्या (जिल्ह्याच्या) मतपत्रिकेत पुढीलप्रमाणे ७ बाबतीतला तपशील होता.
(१) प्रथम अ) बराक ओबामा व ज्यो बिडन या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या जोडगोळीचे(टिकेट) नाव होते. त्यांच्यासमोर डेमोक्रॅट असे लिहिलेले होते.
याच्या खाली ब) मिट राॅम्नी व पाॅल रायन या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या जोडगोळीचे नाव व त्याच्या समोर रिपब्लिकन पक्ष असा मजकूर होता. यानंतर क) गॅरी जाॅनसन व जेम्स ग्रे ही लिबर्टेरियन पक्षाची जोडगोळी व तिच्या खाली ड) जील स्टीन व चेरी होंकाला ही ग्रीन पक्षाची जोडगोळी होती. सर्वात शेवटी यापैकी कोणतीही जोडगोळी पसंत नसल्यास मतदाराला आपल्याला मतानुसार ई) हव्यात्या जोडगोळीचे नाव लिहिता यावे म्हणून जागा सोडलेली होती.
शेवटची मतदाराच्या पसंतीची जोडगोळी आजवर कधीही निवडून आलेली नाही व भविष्यातही निवडून येण्याची सध्यातरी सुतराम शक्यता दिसत नाही. पण मतदाराला अमेरिकन राज्यघटनेने आपल्या पसंतीच्या जोडगोळीचे नाव नोंदवण्याचा अधिकार दिलेला आहे. याला दाद द्यायलाच हवी.
दुसरे असे की, मतदाराला कोणती ना कोणती जोडगोळीच निवडावी लागते. एका जोडीतील अध्यक्ष व दुसऱ्या जोडीतील उपाध्यक्ष निवडता येत नाही. त्यामुळे अध्यक्षाइतकीच मते घेऊन उपाध्यक्षही निवडून येतो. या चार जोडगोळ्या वा हवी ती जोडगोळी निवडण्यासाठी त्याखाली रिकाम्या दोन जागा हा मजकूर पूर्ण देशभर सर्व मतपत्रिकांवर सारखाच होता.
यानंतर (२) सिनेटवर निवडावयाच्या उमेदवारांची नावे होती. सिनेट म्हणजे आपल्या येथील राज्यसभा असे समजून विचार करायला हरकत नाही. दर दोन वर्षांनी सिनेटच्या शंभर सदस्यांपैकी एकतृतियांश म्हणजे ३३ किंवा ३४ सदस्य निवृत्त होत असतात व त्यांच्या जागी नवीन सिनेटर राज्यागणिक जे जे निवृत्त झाले असतील त्यांच्या जागी निवडायचे असतात. मेरीलॅंड प्रांतातील ॲरुंडेल जिल्ह्यातील एक सिनेट सदस्य निवृत्त झाला असल्यामुळे त्याऐवजी डेमोक्रॅट, रिपब्लिकन, लिबर्टेरियन पक्षाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे तीन पक्षीय सदस्यांची नावे व त्यानंतर एका अपक्षाचे नाव होते व सर्वात शेवटी आपल्या पसंतीचे नाव लिहिण्यासाठी जागा सोडलेली होती.
असाच क्रम(३) हाऊस आॅफ रिप्रेसेंटेटिव्हच्या एका प्रतिनिधीच्या निवडीसाठी याच तीन पक्षांच्या उमेदवारांच्या नावासह व पसंतीच्या उमेदवाराच्या नावासाठीच्या एका रिकाम्या जागेसह होता. आपल्या येथील वाचकांसाठी हा सर्व तपशील नवा असल्यामुळे ही सर्व माहिती तपशीलवार नोंदविली आहे. असाच क्रम संपूर्ण मतपत्रिकेवर इतर सदस्यांच्या पक्षनिहाय नावासह, अपक्षांच्या नावासह व पसंतीच्या नावासाठी रिकाम्या जागेसह कायम होता.
पण मतपत्रिका येथेच संपत नाही. (४) या नंतर तीन न्यायाधीश व शिक्षण मंडळाच्या दोन सदस्यांबाबत मुदतवाढीसाठी हो वा नाही हा पर्याय व पसंतीच्या नावासाठी रिकाम्या जागेसह होता. (५) यानंतर घटना दुरुस्तीबाबतच्या दोन प्रस्तावावर जनमताचा कौल घेण्यासाठी हो/नाही, असे पर्याय होते. येथे मतपत्रिकेची एक बाजू संपते.
मतपत्रिकेच्या दुसऱ्या बाजूवर (६) घटना दुरुस्तीबाबतचे सात प्रस्ताव होते व चार प्रश्न विचारले होते. या ठिकाणी मतपत्रिकेच्या पहिल्या पानाची दुसरी बाजू संपते.
(७) मतपत्रिकेच्या तिसऱ्या पानावर मतदारांना वेगवेगळ्याविषयावरचे एकूण अकरा प्रश्न विचारले होते. त्यांची हो/नाही अशी उत्तरे अपेक्षित होती. मतदारांचे नशीबच म्हणायचे की मतपत्रिकेचे चौथे पान कोरे होते. पण हे मेरीलॅंड या प्रांतातील उदाहरण आहे. प्रत्येक प्रांतागणिक त्या त्या जिल्ह्यात यापेक्षा अधिक निवडणुकाही असू किंवा नसूही शकतात. पण हे सर्व प्रकार एकच मतपत्रिका हाताळते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील मतपत्रिकेत काही तपशील गळतात तर काही नव्याने समाविष्ट होतात.
मतपत्रिकेवरील मतदाराला स्वत:च्या पसंतीचे नाव लिहिण्याची तरतूद
अनेकांना केवळ तात्त्विकदृष्ट्याच महत्त्वाची वाटते आहे. अशी नावे सुचविली जाणे व सर्वांकडून याप्रकारे एकच नाव सुचविले जाणे व तो निवडून येणे या अशक्य कोटीतले वाटते आहे. पण हाच तर्क तिसऱ्या पक्षाचे संदर्भातही केला जात असे. पण आज वेगळीच परिस्थिती दिसते आहे. २०१२ साली लिबर्टेरियन पार्टी व ग्रीन पार्टी या दोन पक्षांना मिळून केवळ दोन टक्केच मते मिळाली होती. पण आज २०१६ मध्ये सध्याच झालेल्या जनमत चातणीनुसार हे दोन पक्ष १० टक्के(७.५ + २.५=१०) मते घेत आहेत. येत्या चार महिन्यानंतर यात वाढ झाली तर ही टक्केवारी आणखीही वाढू शकेल. हा प्रकार असाच सुरू राहिला तर याचा परिणाम म्हणून २०२० मध्ये तिसरा पक्ष अमेरिकेच्या राजकीय क्षितिजावर अवतरलेला दिसूही शकेल.
असे का व्हावे/झाले? असे म्हणतात की, दोन्ही पक्षांबद्दल जनमानस एकाच वेळी एवढे नाराज झालेले यापूर्वी कधीच दिसले नव्हते. याचे एक कारण असे असावे की हे दोन्ही पक्ष आता वृद्ध झाले आहेत. नवसंजीवन देईल असा नेता दोन्ही पक्षांजवळ नाही. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की, नुकतीच डेमोक्रॅट पक्षाचे बाबतीत एक अनुकूल घटना घडली आहे. बर्नी सॅंडर्स यांनी आपला विरोधी पवित्रा म्यान केला असून हिलरींना पाठिंबा दिला आहे. त्या अगोदर हिलरी यांनी बर्नी सॅंडर्स यांचीच काही धोरणे आपण पुढे चालवू असे म्हटले होते. त्यामुळे म्हणा किंवा आणखी काही कारणांमुळे हा तिळगूळ समारंभ पार पडला असावा. आता डेमोक्रॅट पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात गृहीत उमेदवार(प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) हिलरी क्लिंटन यांचीअधिकृत उमेदवार म्हणून घोषणा ही केवळ एक औपचारिकताच उरलेली असेल. डोनाल्ड ट्रंप यांनाही रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल. त्यामुळे घोड्यामैदानावरील भिडू नक्की झालेले दिसतात. आता मग प्रतीक्षा आहे चर्चेच्या फडांची.
जिल्हास्तरापासून देश पातळीपर्यंतच्या सर्व निवडणुका, घटना व कायद्यातील दुरुस्तीबाबतचा मतदारांचा कौल, विशिष्ट प्रश्नांबाबतची मतदारांची मते (जसे गर्भपात, समलिंगींचे प्रश्न), न्यायाधीश, शेरीफ, शासकीय वकील, नोंदणी अधिकारी यांची निवडणूक वा त्यांना मुदतवाढ हे सर्व विषय एकाच वेळी, एकाच मतपत्रिकेद्वारे जाणून घेण्याचा अमेरिकेतला हा प्रकार बहुदा एकमेव व अद्वितीय असावा.
अ) अशाप्रकारे देशपातळीवर अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड, हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हच्या म्हणजे ४३५ सदस्यांची निवड, इलेक्टोरल काॅलेजच्या ५३८ सदस्यांची निवड व सिनेटच्या दर दोन वर्षांनी निवृत्त होणाऱ्या एकतृतियांश सदस्यांची (म्हणजे ३३/३४ सदस्य) निवड दर चार वर्षांनी होतातच. याशिवाय ब) प्रांतागणिक, क) जिल्ह्यागणिकही काही सभागृहांची/सदस्यांची मुदत संपलेली असू शकते. अशा निवडणुकाही याच वेळी याच मतपत्रिकेद्वारे घेतल्या जातात. यात प्रांतानुसार फरक असू शकतो. कारण अमेरिका हे अनेक प्रांतांचे मिळून बनलेले संघराज्य आहे. त्यामुळे राज्यागणिक अनेक बाबतीत फरकही आहेत. पण सर्वसाधारणपणे व गोळाबेरीज स्वरूपात हा तपशील बरोबर आहे.
असे वेगळेपणाचे अनेक प्रकार इतरही निरनिराळ्या विषयांचे बाबतीत पहायला मिळतात. अमेरिकन संघराज्य निर्माण होऊन आता दोनशे चाळीस वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने या विषयांवरील चर्चा सुरू झाल्या असून या विषयीचा बहुदा पहिला लेख टाईम या मासिकात नुकताच छापून आला असून त्यात आजवरच्या दोनशे चाळीस वर्षातील धवल व कृष्ण कालखंडांची चर्चा ज्या विषयांशी संबंधित आहे त्यात निवडणूक हाही एक विषय असावा याच्या मागचे कारण काय असावे बरे?

No comments:
Post a Comment