ट्रंप म्हणजे इटालीच्या पंतप्रधानाची अमेरिकन आवृत्ती?
वसंत गणेश काणे
डोनाल्ड ट्रंप यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यापूर्वी आमचे अनुभव लक्षात घ्या, असे इशारा इटालीमधील राजकीय समीक्षक जियान फ्रॅंको गॅलो; जनमत चाचणी प्रमुख मारिया रोझी; व्यवसायाने पत्रकार असलेला त्याचा अमेरिकन चरित्र लेखक फ्रीडमन; प्रमुख व आघाडीचे दैनिक इल फतो कोडियानो व एकेकाळची त्याची चाहती असलेली एक सामान्य नागरिक बारबारा काॅंटी यांनी केले आहे.
इटालीतील माध्यम सम्राट, कोट्यधीश, स्त्रीलंपट व स्थलांतर करू इच्छिणाऱ्यांचा प्रखर विरोधक असे चरित्र, वृत्ती व स्वभावगत साम्य असलेले इटालीचे सतत चारवेळा म्हणजे १९९४ ते २०११ या कालखंडात पंतप्रधान राहिलेले सिल्व्हिओ बर्लूस्कोनी व अमेरिकेतील अध्यक्षपदाचे गृहीत उमेदवार (प्रिझंप्टिव्ह कॅनडिडेट) डोनाल्ड ट्रंप यातील साम्यांचे मुद्दे आहेत. कपाळाने डोक्यावर केलेले आक्रमण लपवण्यासाठी ट्रंप केसांच्या झुपक्यांना खुबीदारपणे वळवतात तर इटालीचा माजी पंतप्रधान सिल्व्हिओ बर्लूस्कोनी दोनदा केशरोपण करून घेतो, एवढाच कायतो फरक आहे.
आज जेव्हा अमेरिकन मतदार आमचे अनुकरण करून ट्रंप यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसवतात की काय, अशी शंका येते तेव्हा कृपा करून आमच्या पावलावर पाऊल ठेवून जाऊ नका, असे कळकळीचे आवाहन केल्यावाचून राहवत नाही, असे वर उल्लेखलेली सर्व मंडळी करतांना आढळतात.
याला कारणही तसेच आहे. आपल्या इटालीच्या पंतप्रधानपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात (१९९४ ते २०११) सिल्व्हिओ बर्लूस्कोनी यांने इटालीला आर्थिक दिवाळखोरी, पराकोटीचा राजकीय भ्रष्टाचार, लैंगिक लफडी, कज्जेदलाली आणि करचुकवेगिरी ते लालचलुचपतखोरी याशिवाय दुसरे काहीही दिले नाही. नकतीच त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली असून २०१९ पर्यंत कोणतेही पद स्वीकारण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
जनमत चाचणी प्रमुख मारिया रोझी म्हणते की, आज दर सात मतदारांपैकी फारतर एक मतदार सिल्व्हिओ बर्लूस्कोनीला मत देईल.
व्यवसायाने पत्रकार असलेला त्याचा अमेरिकन चरित्र लेखक फ्रीडमन म्हणतो की, मुसोलिनीनंतर शंभर वर्षांनी तितकाच प्रभावशाली नेता इटालीच्या नशिबी आला होता. त्याच्या कारकिर्दीत इटालीला काहीच मिळाले नाही, असे नाही पण लफडीच लक्षात रहावीत, अशी अवस्था आहे.
आपल्या लैंगिक लफड्यांचा उल्लेख करण्यासाठी ‘बुंगा बुंगा’ हा शब्दप्रयोग त्याने स्वत:च तयार करून योजला होता. आज इटालीत हा एक चेष्टेचा शब्द / विषय झाला आहे. विज्ञापन तंत्र व बाजारपेठ काबीज करण्याचे/ जिंकण्याचे तंत्र ( स्लफ मार्केटिंग टेक्निक) क्वचितच कुणी त्याचा हात धरू शकेल.
इटालीतील महिलांना डोनाल्ड ट्रंप यांचीही भुरळ पडतांना दिसते आहे, असे मत नोंदवून सिल्व्हिओ बर्लूस्कोनीची एकेकाळी चाहती असलेली बारबारा काॅंटी ही महिला म्हणते की, त्याचे खरे स्वरूप कळताच आम्ही त्याच्यापासून शंभर योजने दूर गेलो.

No comments:
Post a Comment