आॅर्लॅंडोचे हत्याकांड
वसंत गणेश काणे
अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील आंर्लॅंडो गावातील शंभरावर लोकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची इजा पोचवणारे व किमान शंभर लोकांचा बळी घेणारे हत्याकांड केवळ अमेरिकेलाच नव्हे तर सर्व जगाला हादरा देणारे ठरले. याबाबत अमेरिकेत विविध माध्यमांमध्ये विविध पातळींवर चर्चा, टीका टिप्पणी होत आहे. जेम्स अॅलन फाॅक्स हे गुन्हेगारीशासत्र (क्रिमिनाॅलाॅजी), कायदा व सार्वजनिक धोरण(पब्लिक पाॅलिसी या विषयांचे नाॅर्थ इस्टर्न विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांनी याबाबतची आपली भूमिका व मते वृत्तपत्रात मांडली आहेत. आपल्या देशातही अनेक हत्याकांडे होत असतात. त्याबाबत आपल्या येथे भारतात उमटणाऱ्या प्रतिक्रिया, दावे, निष्कर्ष कशाप्रकारचे असतात, ते आपण जाणतो. या विषयाचा शास्त्रशुद्ध विचार करणारी अमेरिकेतील एक अधिकारी व्यक्ती कशाप्रकारे विचार करते, ते जाणून घेणे उपयोगाचे ठरू शकेल असे वाटते.
हे हत्याकांड एका नाईट क्लबमध्ये झाले ज्या ठिकाणी एल जी बि टी (गे) लोकांचा वावर असतो. हेच ठिकाण हल्लेखार निवडतो, हा तपशील किती महत्त्वाचा आहे, हा मुद्दा सध्या पोलिस यंत्रणेची परीक्षा पाहणारा आहे. अशाप्रकारे त्या ठिकाणी केवळ योगायोगाने असणाऱ्या निरपराध व अपरिचित व्यक्तींची अंदाधुंद गोळीबार करून हत्या करणारी व्यक्ती मानसिक संतुलन नष्ट झालेली मनोरुग्ण असावी,असे सामान्यत: वाटते. पण सामूहिक हत्या करणारी व्यक्ती आपले सावज निवडण्याचे बाबतीत खूपच चोखंदळ (सिलेक्टिव्ह) व हिशोबी/काटेकोर (मेथाॅडिकल) असतात, असा अनुभव आहे. अशी व्यक्ती अतिशय थंड डोक्याने व पद्धतशीरपणे विशिष्ट व्यक्तींना किंवा विशिष्ट व्यक्तीसमूहांना स्वत:वरील किंवा समाजावरील संकटासाठी जबाबदार धरीत असते व म्हणून त्यांना शासन करीत असते.
आज अतिरेक्यांच्या दहशतीखाली आपण सर्व वावरत आहोत. त्यामुळे हा इस्लामी अतिरेकाचा प्रकार आहे, अशी चर्चा देशभर सुरू व्हायला वेळ लागला नाही. अशी हत्याकांडे या पूर्वी घडली असल्यामुळे हे त्यातलेच एक ताजे हत्याकांड म्हणून स्वीकारले गेले. हत्याकांडाचा पुरता तपशीलही हाती यायचा होता आणि हे कृत्य अतिरेक्यांचे (देशातील किंवा देशाबाहेरील) असल्याची समजूत अधिकारी व्यक्तींनी करून घेतली.
एकदा का हे अतिरेक्यांचे कृत्य आहे, अशी आपली समजूत आपण करून घेतली की, हत्याऱ्याच्या अडनावावरून आपण त्याची जातकुळी ठरवून मोकळे होतो. भरीस भर ही की, स्वत:ला इसीसचा प्रवक्ता म्हणवणारी व्यक्ती, पाप्यांना रमझानच्या काळात शिक्षा करणारी ही व्यक्ती विशेष पारितोषिकाची मानकरी ठरेल, असे जेव्हा जाहीर करते, तेव्हा तर शंकेला वावच उरत नाही.
लगेच वार्ता येऊन थडकते की, हत्याऱ्याने ९११ या क्रमांकावर फोन करून (संकटकाळी पोलीस यंत्रणेशी संपर्क करण्याचा नंबर) आपली इसीसशी बांधिलकी असल्याचे जाहीर केले आणि बोस्टनच्या हत्याकांडाचा हवाला दिला. इस्लामिक दहशतवादापासून प्रेरणा घेऊन दोन भावांनी प्रेशर कुकरचा उपयोग करून स्वतंत्रपणे बोस्टन मॅराथाॅन शर्यत संपतासंपता हे स्फोट १२ सेकंद व १९० मीटर अंतराने १५ एप्रिल २०१३ ला घडवून आणले होते. या हल्ल्यात हल्लेखोर स्वत:, दोन पोलीस अधिकारी व अन्य तीन नागरिक असे सहा जण मृत्युमुखी पडले होते व २८० अन्य नागरिक जखमी झाले होते. त्यावेळी जी चौकशी झाली होती, त्तेव्हा सुद्धा हत्याऱ्याचे अतिरेक्यांशी लागेबांधे आहेत, असा सबळ पुरावा हाती आला नव्हता.
हा हत्यारा एखादा एकांड्या शिलेदार असेलही कदाचित, द्वेशापोटी तो हत्या करण्यास प्रवृत्त झाला असेलही, पण तो द्वेश अमेरिकन समाजाविषयीचा होता की 'गे' किंवा समलिंगींविषयींचा होता, हे अजून स्पष्ट व्हावयाचे आहे. रमजानमध्ये त्याचे कृत्य अधिक प्रशंसनीय मानले जाईलही, पण या लोकांनी कोणत्या स्वच्छालयात जायचे, याबाबतचा काथ्याकूट जवळजवळ जो गेला महिनाभर चालू आहे, त्यामुळेही त्याचे मानसिक संतुलन बिघडलले असू शकते. दोन ‘पुरुषांनी’ सार्वजनिक ठिकाणी जे चुंबनालिंगन दिले, त्यामुळे तो अतिशय संतापला होता, असेही एका वाहिनीचे वृत्त आहे.
समलिंगींच्या द्वेषापोटी अमेरिकेत यापूर्वीही हल्ले झाले आहेत. कधी हल्लेखोर एकटदुकट असायचा तर तर कधी हे संघटित हल्ले असायचे. त्यांचा दशशतवाद्यांशी संबंध नसायचा. या हत्याकांडाच्या दिवशीच लाॅसेंजेलिसमध्ये समलिंगींच्या आनंद मोर्चावरील संकल्पित हल्ला थोपवण्यात आला होता, हे एक पूर्णपणे वेगळे प्रकरण होते.
हल्लेखोराचा नक्की हेतु कोणता होता व त्याची मानसिक स्थिती नक्की कशी होती, हे जोपर्यंत उघड होत नाही, तोपर्यंत नक्की उपाययोजना कोणती करायची हे ठरवता येणार नाही. सर्वच नाईट क्लब्जना सुरक्षा पुरवायची की सर्व क्लब्जनाही ती पुरवायची? की जिथे जिथे म्हणून गे लोक एकत्र येत असतात, त्या सर्व ठिकाणांना पुरवायची? २०१२ मध्ये कोलोराडोमध्ये चित्रपटगृहावर हल्ला झाला होता. त्यावेळी चित्रपटगृहांच्या मालकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन सुरक्षा व्यवस्था बळकट केली होती. लगेच न्यूटनमध्ये शाळेवर हल्ला झाला होता. तेव्हा आम्ही पूर्ण अमेरिकेतील सर्वच लहानमोठ्या शाळांना सुरक्षा देण्याचा आग्रह धरला.
अशी उपाययोजना कितपत परिणामकारक किंवा योग्य ठरेल हा मुद्दा बाजूला ठेवला तरी अशाप्रकारची तटबंदी करून बंदिस्त जीवन जगायला आपण प्रारंभ करणे म्हणजे म्हणजे अतिरेक्यांचे मनसुबे सफल होण्याच्या दृष्टीने दिलेला प्रतिसाद ठरतो, हे आपण विसरतो आहोत. अतिरेक्यांना नेमके हेच हवे आहे/असते. काही लोकांचे जीव घेणे एवढ्यापुरता अतिरेक्यांचा हेतु मर्यादित नसतो. ज्या स्वातंत्र्याचा आपण आनंद घेत आहोत, त्याचा संकोच झालेला त्यांना हवा असतो.
कोणत्याही हल्यात किती लोक हताहत झाले किती यमसदनी गेले यावर त्या हत्येची तीव्रता का अवलंबून असावी? या संख्येचा वारंवार उल्लेख करून आपण अतिरेक्यांची(अप) कीर्ती (?) वाढण्यासच मदत करीत आहोत, हे आपण विसरत नाही का? ओर्लॅंडोचे हत्याकांड ही आजवरच्या सामूहिक हत्याकांडातील सर्वात मोठी घटना आहे, हे सांगण्यापाठीमागचा आपला उद्देश काय आहे? समजा यात हतागत झालेल्यांची संख्या कमी असती तर तिची भीषणता कमी ठरेल का? या बाबीचा वारंवार उल्लेख करून आपण त्याच्या साथीदारांना हे रेकाॅर्ड मोडण्यासाठी प्रेरित तर करीत नाही ना?/ करणार नाही ना? कारण उच्चांक मोडण्यासाठीच तर असतात.

No comments:
Post a Comment