चूक, निष्काळजीपणा की हेतुपुरस्सर कृती ?
वसंत गणेश काणे
हिलरी क्लिंटन यांनी सेक्रेटरी आॅफ स्टेट या पदावर असतांना शासकीय कामांशी संबंधित माहिती हाताळतांना शासकीय ईमेलऐवजी खाजगी ईमेल वापरून पराकोटीचा निष्काळजीपणा( ग्राॅस केअरलेसनेस) दाखविला आहे, असा ठपका याबाबत चौकशी करणाऱ्या एफबीआय चे प्रमुख जेम्स काॅमी यांनी ठेवला असला तरी त्यांच्यावर गुन्हेगारीचा आरोप मात्र ठेवलेला नाही. पण शिरस्त्याप्रमाणे ही माहिती जस्टीस डिपार्टमेंटकडे न सोपवता त्यांनी सरळ टेलिव्हिजनवर उघड करावी, हा प्रकार असाधारण स्वरूपाचा मानला जातो आहे.
हिलरी क्लिंटन यांच्यावर आता फौजदारी खटला भरला जाण्याची शक्यता उरली नाही. कारण अटर्नी जनरल लाॅरेटा लिंच यांनी अगोदरच जाहीर केले आहे की त्या एफबीआयच्या शिफारसी जशाच्या तशा स्वीकारणार आहेत. दहा हजारावर ईमेल्स तपासून पाहिल्यानंतरही हिलरी यांचा नियमभंग करण्याचा हेतू होता, असा कोणताही पुरावा हाती आलेला नसला तरी महत्त्वाची शासकीय गोपनीय माहिती हाताळतांना त्यांनी पराकोटीचा निष्काळजीपणा दाखविला आहे, हे नमूद करून हिलरी यांची स्पष्टीकरणे काॅमी यांनी खोडून काढली आहेत. हिलरी यांचे म्हणणे असे होते की, खाजगी ईमेलने त्यांनी पाठविलेली कोणतीही माहिती किंवा खाजगी ईमेलवर त्यांना मिळालेली कोणतीही माहिती ‘त्यावेळी’ गोपनीय नव्हती. पण मिळालेल्या किंवा पाठविलेल्या निदान ११३ ईमेल्स ह्या ‘त्यावेळी’ गोपनीय स्वरूपाच्याच होत्या असे एफबीआयचे म्हणणे आहे.
शासकीय कामाशी संबंधित असलेल्या अनेक ईमेल्स आमच्या स्वाधीन केलेल्या ३०,००० ईमेल्स नव्हत्या. यातील माहिती देशविरोधी तत्त्वांना उपलब्ध झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी टिप्पणीही काॅमी यांनी केली आहे. अशी परखड टीका केल्यानंतर काॅमी म्हणतात की, सारासार विचार करणारा कुणीही फिर्यादी पक्ष ह्या माहितीच्या आधारे खटला दाखल करणार नाही. जुने दाखलेही असेच आहेत. क्लिंटन यांची जबानी घेऊन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी काॅमी यांचे हे प्रकटन आले आहे.
हिलरींच्या वतीने या निर्णयाला मान्यता दिलेली असली तरी ‘ खाजगी ईमेलचा शासकीय कामासाठी वापर ही केवळ ‘एक चूक’ होती या आपल्या पूर्वीच्या भूमिकेचाच त्यांनी पुनरुच्चार केला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे गृहीत उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी हिलरी या कशा कपटी, कारस्थानी आहेत, हे उघड झाले आहे, असे म्हणून तोफ डागली आहे. रिपब्लिकन पक्षाचे असलेले हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापती (स्पीकर) पाॅल राॅयन यांनी एफबीआयच्या खटला न भरण्याच्या निर्णयावर नापसंती दाखवत म्हटले आहे की, कायद्यासमोर सर्व समान असले पाहिजेत. हिलरींवर खटला न भरण्याचा निर्णय काॅमी यांनी उघड केलेल्या माहितीशी विसंगत आहे.
या सर्व हकीकतीवरून एक बाब मात्र नक्की झाली आहे की, हे प्रकरण हिलरींची पाठ शेवटपर्यंत सोडणार नाही. त्यांना शेवटपर्यंत बचावात्मक भूमिकाच घ्यावी लागेल. त्यांची विश्वसनीयता आणि निर्णयक्षमता याबाबत सामान्य मतदार कोणती भूमिका घेतात, हे शेवटी निकाल लागेल तेव्हाच कळेल.

No comments:
Post a Comment