डेमोक्रॅट पक्षाचे दर्जेदार संमेलन
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
पाईम रोजलेन, याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया
९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
डेमोक्रॅट पक्षाचे दर्जेदार संमेलन - ग्रँड ओल्ड पार्टी (जीओपी) म्हणजेच रिपब्लिकन पार्टीच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅट पक्षाचे संमेलन उठून दिसते. बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचे भाषण हे या संमेलनाच एक प्रमुख वैशिष्ट्य ठराव,असे झाले. हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बराक ओबामा यांनी समाधान व्यक्त केले तेव्हा ‘ह्यांचं मत तेच माझं मत’, अशी त्रोटक प्रतिक्रिया होती मिशेल ओबामा यांची. अमेरिकेच्या प्रथम मानांकित महिला (फर्स्ट लेडी) मिशेल बराक ओबामा यांची. पण हे असं सांगून पुरता अर्थबोध होणार नाही. सगळं सुरवातीपासूनच सांगितलं पाहिजे. हिलरी क्लिंटन यांना डेमोक्रॅट पक्षाकडून अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळाल्याचे निश्चित झालं आणि विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी या निर्णयाचं अतिशय उत्साहानं, आनंदानं स्वागत केलं. वृत्तसृष्टीनं या वृत्ताला साजेसं महत्त्वही दिलं. पण अमेरिकेच्या प्रथम मानांकित महिला (फर्स्ट लेडी) मिशेल बराक ओबामा यांच्या कार्यालयाकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली की, त्याचं मतही ‘ह्यांच्या’ मतासारखंच आहे. एखाद्या अस्सल भारतीय पतिव्रतेकडून कौतुकाची थाप मिळावी, असं हे मत आहे.
जिवाभावाच्या मैत्रिणी - विनोद बाजूला ठेवूया. मिशेल आणि हिलरी या दोघी एकमेकींच्या सध्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मिशेल यांच्या खास क्लबच्या हिलरीही सदस्या आहेत. हिलरी सेक्रेटरी आॅफ स्टेट या पदावर कार्यरत असतांना या दोघी अनेकदा एकाच व्यासपीठावर आढळून आल्या आहेत.
अराजकीय भूमिका - पण मिशेल यांची भूमिका प्रामुख्याने अराजकीय स्वरूपाचीच राहिली आहे. बराक ओबामा दोनदा अध्यक्षपदाचे उमेदवार होते. मिशेल याही त्यांच्यासाठीच्या प्रचार मोहिमेत सहभागी असत. पण त्यांनी स्वत:ला प्रचारकार्यात झोकून दिले नव्हते. त्या म्हणत , ‘राजकारण महत्त्वाचे आहे, यात शंका नाही. पण मी राजकारणी नाही. राजकारण हे माझे ध्येय कधीच नव्हते’. घराबाहेर किती वेळ घालवायचा याबद्दलचे त्यांचे नियम कडक आहेत. याबाबत एका निश्चित व पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार त्याचे काम सुरू असते/असायचे. त्यांचा प्रचारकार्याचा कार्यक्रम आखणाऱ्या चमूला त्यांच्या स्पष्ट व नेमक्या सूचना असत. ‘प्रचारासाठी इतका इतका वेळ मी काढून ठेवला आहे. त्यात काय काय करायचे ते तुम्ही ठरवा. तो आटोपला की मला कुणी भेटायचे सुद्धा नाही. अगदी फोन सुद्धा करायचा नाही’. डेमोक्रॅट पक्षाच्या संमेलनात त्या उपस्थित राहत असत एवढेच. त्यांची भूमिका एखाद्या राजकारण्याची कधीच नसे.
अराजकीय भूमिका हेच शक्तिस्थान -आश्चर्याची गोष्ट ही की त्यांच्या या भूमिके व वृत्तीमुळेच त्यांना भरपूर राजकीय बळ मिळाले आहे. याचा प्रत्यय फिलाडेल्फिया येथील डेमोक्रॅट पक्षाच्या संमेलन प्रसंगी, त्यांनी हिलरींना पाठिंबा देणारे जे भाषण केले, त्या निमित्ताने आला. २६ जुलैची सकाळ. मिशेल यांनी भाषणाला प्रारंभ केला आणि काही क्षणातच त्यांनी सभागृहाचा ताबा घेतला. सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन एकचित्ताने त्यांचे भाषण ऐकत होते. प्रतिसाद देत होते.
१. आठ वर्षांपूर्वी हिलरींना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली नाही, तेव्हा त्या रागावल्या नाहीत किंवा निराश झाल्या नाहीत. गाशा गुंडाळून त्या घरीही गेल्या नाहीत. कारण एक सार्वजनिक कार्यकर्ता या नात्याने व्यक्तिगत निराशेपेक्षा कितीतरी काम आपल्या पुढ्यात आहे, याची त्यांना जाणीव होती.
२. आयुष्यातील कोणत्याही प्रसंगी त्यांनी पाठ फिरवलेली नाही. प्रत्येक प्रसंगाला त्यांनी धैर्याने तोंड दिल आहे.
३. आपले प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रंप यांच्याजवळ रोजगार देण्यासाठीच्या कोणत्याही योजना नाहीत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नाहीत की ज्येष्ठ नागरिकांसाठीही नाहीत. त्यांच्या सर्व योजना त्यांच्यासारख्या श्रीमंतांसाठीच आहेत.
४. हिलरींचा स्वभाव असा आहे की, त्या प्रतिकूलतेसमोर कधीही झुकत नाहीत, की तडजोड करीत नाहीत.
५. केवळ हिलरींमुळे आता माझ्या मुलींची आणि तुमच्या माझ्या सर्वांच्याच मुलामुलींची ही खात्री झाली आहे की, एक महिला अमेरिकेची अध्यक्ष होऊ शकते.
६. पुढील चार /आठ वर्षात आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याची क्षमता कोणात असेल, हे या निवडणुकीने ठरणार आहे.
७. जेव्हा एखादा क्रूरपणाने किंवा अडदांडपणाने वागतो बोलतो, तेव्हा तुम्ही त्या पातळीला जायचे नसते. कधीच नाही. ते जेवढे खालच्या पातळीवर उतरतील, तेवढाच आपण आपला स्तर उंच ठेवायचा असतो, हे आपले बोधवाक्य आहे.
८. आपल्या मुलांचे भवितव्य कुणाच्या हाती सोपवायचे हेच या आणि प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून ठरवायचे असते. ही जबाबदारी विश्वासाने ज्या व्यक्तीवर सोपवावी अशी माझ्या मते एकच व्यक्ती आहे. तीच व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी योग्य आहे आणि ती व्यक्ती आहे आपली मैत्रीण हिलरी क्लिंटन.
९. आपल्या जबाबदारीकडे गंभीरपणाने पाहील अशीच व्यक्ती मला माझ्या मुलींसाठी आणि मुलांसाठी अध्यक्षपदी हवी आहे. अध्यक्षाला हाताळावे लागणारे विषय काळे किंवा पांढरे असे ठोकळ स्वरूपाचे नसतात. ते मोजक्या शब्दात मांडता येत नाहीत.
१०. हा देश श्रेष्ठ नाही, काहीतरी करून आपल्याला त्याला श्रेष्ठत्त्व प्राप्त करून द्यायचे आहे असे कुणी म्हणत असेल तर त्याचे ऐकू नका. कारण अगदी या क्षणी सुद्धा हा देश या भूतलावरचा सर्वश्रेष्ठ देश आहे.
भाषणाची परिणामकारकता -मिशेल ओबामा यांचे हे भावपूर्ण वक्तव्य ऐकत असतांना श्रोत्यांच्या मनात वेगवेगळे तरंग उठत होते. साशा आणि मालियाची माता या नात्याने त्या बोलत असतांना श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते तर नामनिर्देश न करता त्या जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांना धारेवर धरत होत्या तेव्हा श्रोते त्यांच्या चपखल शब्दयोजनेला मनापासून दाद देत होते. अजूनही ज्या मतदारांची मते संदिग्ध असतील त्यांची मते अनुकूल करण्याचे सामर्थ्य मिशेल यांच्या भाषणात आहे, असा विश्वास संमेलनात उपस्थित असलेले प्रतिनिधी व्यक्त करतांना दिसत होते. बर्नी सॅंडर्स यांचा हिलरींना असलेला कडवा विरोध आता मावळला आहे. पण पक्षात एकवाक्यता निर्माण करण्याचे सकारात्मक सामर्थ्य मिशेल यांच्या भाषणात होते. अशा शब्दात वार्तांकन करणाऱ्यांनी मिशेल यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
शीर्षक बदलले - एका वृत्तपत्रातील संपादकीय कक्षातील घडामोडी रंजक व बोधप्रद ठराव्यात, अशा आहेत. वार्ताहराने संपादकीय कक्षाकडे मिशेल यांच्या भाषणाअगोदर ट्वीट केले होते की, प्रथम पृष्ठावरील हेड लाईन ‘बर्नी सॅंडर्स व हिलरी यातील बेबनावाशी’ संबंधित असेल. तीन तासांनी त्याने पुन्हा ट्वीट केले, ‘हेडलाईन बदलावी लागणार!’ ‘सभा मिशेल यांनी जिंकली’. नंतरचे ट्वीट होते, ‘ २०२० च्या डेमोक्रॅट पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार असणार मिशेल ओबामा! सभागृहातील सर्वांच्या तोंडचा मुद्दा.’ २०२० साली काय व्हायचे होईल. पण निदान या निवडणुकीत तरी हिलरींसाठी मिशेल यांचे हे भाषण नवसंजीवनी स्वरुपाचे ठरणार हे मात्र नक्की.
क्लिंटन- केन ही जोडगोळी - हिलरी क्लिंटन यांनी आपला उपाध्यक्षपदाचा जोडीदार म्हणून व्हर्जिनियाच्या टिम केन या ५८ वर्षाच्या तरूण पण अनुभवी, अभ्यासू पण धडाडीच्या, स्पॅनिश भाषेत अस्खलित बोलू शकणाऱ्या ( स्पॅनिश भाषा बोलणारे बरेच मतदार आहेत) व गर्भपात विरोधी मत असलेल्या (अमेरिकेत गर्भपाताला विरोध करणारे अनेक सनातनी विचाराचे मतदार आहेत) एका चतुर साथीदाराची निवड केली आहे. प्रतिपक्षाचे हल्ले परतवून लावण्याची महत्त्वाची जबाबदारी उपाध्यक्षपदाच्या साथीदाराची असते. हे शिवधनुष्य पेलण्याची क्षमता टिम केन यांच्यात आहे. अशा जोडीदाराची गरज हिलरी क्लिंटन यांना पदोपदी भासणार आहे.
अशाप्रकारे दोन्ही पक्षांनी आपापल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या जोडगोळीची (टिकेट) निवड करीत, निवडणुकीच्या रणांगणात पदार्पण करून पुढील तीन महिन्यातील रणधुमाळीतील पहिले पाऊल टाकले आहे.

No comments:
Post a Comment