तुर्कस्थानमधील फसलेले बंड, उघडी पडलेली लक्तरे व आशेचे किरण
वसंत गणेश काणे
तुर्कस्थानमध्ये सैन्याने १५ जुलैच्या मध्यरात्री केलेला उठाव १६ जुलैलाच सकाळी सकाळी शमला आणि लोकनियुक्त शासन कायम राहिले, ही वार्ता लोकशाहीप्रेमीजनांना समाधान देणारी वाटत असली तरी त्या निमित्ताने निर्माण झालेले संशय, उघड झालेले हेवेदावे, तापल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याची वृत्ती, वरून शांततेचा व लोकशाहीचा पुरस्कार पण आतून दुसऱ्या देशात आपल्याला सोयीचे होईल असे शासन स्थापन करण्याची वृत्ती या आणि अशाच मनुष्यसुलभ पण अवांछनीय अशा कृत्त्यांचे दर्शन आता हळूहळू समोर येत असून अनेकांचे मायावी स्वरूपही उघडकीला येत आहे. या सर्व बाबींचे नीट आकलन होण्यासाठी एखाद्या चित्रमय युद्ध कथेशी स्पर्धा करणाऱ्या मूळ घटनापटाचा सुरवातीपासूनच व ती दृश्ये नजरेखाली घालूनच विचार करणे योग्य ठरेल.
दृश्य पहिले - १५ जुलै २०१६ ची मध्यरात्र. स्थळ तुर्कस्थानची राजधानी अंकारा. बंडखोर सैन्यातील अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली हालचालींना प्रारंभ झाला. रणगाडे, हेलिकाॅप्टर्स आणि एफ-१६ जातीची विमाने यांनी एकाच वेळी मोहीम सुरू केली. जमावावर हल्ले झाले, टी व्ही केंद्रांवर ताबा घेण्यासाठी झटापटी झाल्या आणि तोफा पार्लमेंटच्या इमारतीवर आग ओतू लागल्या.
दृश्य दुसरे - अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांचा सुरवातीला पत्ताच नव्हता. समुद्र किनाऱ्यावरील मार्मारिस नावाच्या गावी ते सुट्टीचा आस्वाद घेत होते. तिथे बंडखोरांच्या तावडीतून ते बालबाल वाचले आणि त्यांच्या जीवात जीव आला. ते कसेबसेच बचावले. पण त्यामुळेच पुढे घटनाक्रमाने वेगळे वळण घेतले. रातोरात व १६ तारखेला सकाळी त्यांनी आपले समर्थक गोळा केले व आपण सुरक्षित असून उठाव फसला असल्याची घोषणा केली.
दृश्य तिसरे - बंडाचे वृत्त कळताच राजधानीतील संसद सदस्यांनी पार्लमेंटच्या इमारतीकडे धाव घेतली. पार्लमेंटला बंडखोरांनी वेढण्याचा कसून प्रयत्न केला. सगळे सदस्य बंडखोरांच्या हाती पडतील आणि तुर्कस्थानमधील लोकशाहीचा अंत होईल अशी शक्यता दिसू लागली. विरोधी पक्षनेते महमूद तनाल यांनी प्रसंगावधान राखून प्रथम तुर्कस्थानच्या राज्यघटनेची प्रत बगलेत मारली आणि मगच पार्लमेंटच्या इमारतीकडे इतर सामानासह धाव घेतली. त्या रात्री ते अंकारा येथील बार असोसिएशनच्या आॅफिसमध्ये होते. जेट विमानांच्या घिरट्या पाहताच त्यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क केला. पण तेवढ्यात त्यांना रस्त्यावर दाणदाण पाय आपटीत मार्चिंग करीत जाणारे सैनिक दिसले. राजधानीपासून काही मैल अंतरावर असलेल्या इस्तंबूल या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरामधील सर्व पुलांचा ताबा सैन्याने घेतला होता आणि वाहतूक रोखली होती. अंकारामधील गुप्तहेर खात्याचे मुख्य कार्यालय असलेल्या इमारतीवर सैन्याने हल्ला चढवला होता. पार्लमेंटची इमारतच त्यातल्यात्यात सुरक्षित असणार असा महमूद तनाल यांनी विचार केला. अटक टळण्याची शक्यता तिथे जाण्यातच होती. इतर खासदारही तिथेच असणार होते. पण तरीही त्यांनी तुरुंगात कोणकोणत्या वस्तू लागतील याचा थंड डोक्याने विचार करून त्या सोबत घेतल्या त्यातली सर्वात शेवटची वस्तू होती, राज्यघटनेची प्रत. ही प्रत मी सोबत का घेतली, ते त्यांनी नंतर आता स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, ‘मी व्यवसायाने वकील, त्यातून संसदेच्या मानवाधिकार समितीचा सदस्य. त्यामुळे तुरुंगात ही प्रत लागणारच, हे मी जाणून होतो.
दृश्य चौथे - या उलट आॅर्हन अटले हे सत्ताधारी जस्टीस ॲंड डेव्हलपमेंट पार्टीचे एक नेते. ते घरीच होते. त्यांनी स्फोटांचे आवाज ऐकले, ठिकठिकणी फोन केले. सैन्याने उठाव केला आहे, हे कळताच अगोदर पिस्तुल उचलले व पोलिस मुख्यालयाकडे जाण्याचे ठरविले. पण कारमध्ये बसतात न बसतात तोच पोलिस मुख्यालयाजवळ स्फोट झालेला त्यांनी ऐकला व लगेच ज्वालांचा लोळ उठलेला पाहिला. हे बघताच त्यांनी पार्लमेंटच्या इमारतीकडे तातडीने कूच केले. अशा या दोघांच्या दोन तऱ्हा.
दृश्य पाचवे - तीन प्रमुख पक्षांचे संसद पार्लमेंटच्या हाॅलमध्ये एकत्रित झाले. चौथा पक्ष कुर्दिश पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने आपले पाठिंब्याचे पत्र पाठविले. तुर्कस्थानच्या इतिहासातील हा अभूतपूर्व प्रसंग होता. सर्व राजकीय पक्षात एकजूट झाली होती. स्पीकर कर्हामन यांनाही धीर आला, त्यांनी संसद चालू आहे असे जाहीर करून जनतेला धीर व दिलासा दिला आणि बंडखोरांविरुद्ध लढण्याचा निर्धार कळवला व जनतेची साथ मागितली. तेवढ्यात लागोपाठ दोन स्फोट ऐकायला आले. एक तर संसदेच्या आवारातच झाला आहे, असे वाटत होते.
दृश्य सहावे - मार्मारिस येथूनच अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांचा संदेश प्रसारित झाला. बंडखोरांवर ताबा मिळविण्यात यश मिळाले होते. अध्यक्षांनी संपर्कासाठी टी व्ही नाही, शासकीय कार्यालयही नाही तर चक्क व्हिडिओ चॅट केले होते. बंडखोरांचा नि:पात करण्यासाठी जनतेने बाहेर पडावे, असे त्यांनी आवाहन केले. ‘मीही पाठोपाठ निघतच असून लवकरच तुम्हाला येऊन मिळेन’, असे त्यांनी जनतेला आश्वासन दिले.
दृश्य सहावे -अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता रस्त्यावर उतरली. राजधानी अंकारामध्ये तिने पार्लमेंटच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सुमारे तीनशे मैलावरील इस्तंबूल शहरात बंडखोरांनी दोन पुलांवर कब्जाकरून वाहतुक थांबविली होती. शहरातील युरोपियन व एशियन विभाग अशाप्रकारे पाचर ठोकून वेगळे केले होते. तकसीम चौकात बंडखोर सैनिक कडे करून सज्ज होते. इकडे जनतेतून निषेधाच्या आरोळ्यांसोबत ‘गाॅड इज ग्रेट! ग्रेटेस्ट’ अशा गर्जना उठत होत्या.
दृश्य सातवे - अध्यक्ष तय्यीप एर्डोगन अंकारा या राधानीकडे न जाता इस्तंबूलला गेले. या शहराचा त्यांना वर्षानुवर्ष नि:संदिग्ध पाठिंबा मिळत आलेला होता. ते येथील जनतेच्या गळ्यातले ताईत होते. भल्या पहाटे म्हणजे सकाळी ४ वाजता त्यांचे विमान इस्तंबूल शहरातील अटाटर्क विमानतळावर उतरले. ‘बंडखोरांची कृती देशद्रोहाची असून तिला क्षमा नाही, आपण अध्यक्षपदावर कायम आहोत’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. ‘ही इष्टापत्तीच आहे. आता सैन्यदलाचे शुद्धिकरण करणे शक्य होणार आहे’, असा मनोदयही त्यांनी याचवेळी व्यक्त केला.
अमेरिकेची प्रतिक्रिया - अमेरिकेचे सेक्रेटरी आॅफ स्टेट जाॅन केरी यांची प्रतिक्रिया सावध होती. अध्यक्ष बराक ओबामा यांनी वाॅशिंगटनहून तुर्कस्थानमधील सर्व पक्षांनी लोकनियुक्त शासनाच्या पाठीशी उभे रहावे; दंगल, गोंधळ, हिंसा वा रक्तपात टाळावा, असे आवाहन केले. अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे की, आम्हाला आमची भूमिका तात्काळ देण्यात कोणतीच अडचण गेली नाही, आम्ही लोकनियुक्त शासन, कायद्याचे राज्य यांच्या बाजूचेच असणार, सत्ताप्राप्तीसाठी बळाचा वापर करण्याला आमचा विरोधच असणार, हे उघड होते.
अमेरिकेच्या भूमिकेबद्दल संशयाचे वातावरण - अगोदरपासूनच अंकारा व वाॅशिंगटन यांच्यात मतभेद आहेत. तुर्कस्थानमध्ये लोकशाहीत अपेक्षित असलेल्या सुधारणांबाबत या दोन राष्ट्रात मतभेद आहेत. तसेच तुर्कस्थानच्या सरहद्दी पलीकडे इराक व सीरिया मध्ये इसीस विरुद्ध जी लढाई सुरू आहे, त्याबाबत तुर्कस्थान उचलत असलेली पावले अमेरिकेला समाधानकारक वाटत नाहीत. बंडाची चाहूल लागताच तुर्कस्थानमधील ज्या विमानतळावर अमेरिका व तुर्कस्थान या दोन्ही राष्ट्रांच्या फौजा तैनात आहेत (तुर्कस्थान नाटो-नाॅर्थ अटलांटिक ट्रिटी आॅर्गनायझेशनचा- सदस्य असल्यामुळे ही व्यवस्था होती) त्या ठिकाणी अमेरिकन फौजांनी बंडखोरांना छुपी साथ दिली, असा तुर्कस्थानला संशय वाटतो आहे. अमेरिकेने याचा तात्काळ इन्कार केला असला तरी तुर्कस्थानचे समाधान झालेले नाही. आता या विमानतळावरून बाॅंबफेकी अमेरिकी विमाने इसीस विरुद्धच्या कारवाईसाठी उड्डाण करू शकत नाहीत. इतर तळांबाबतही तुर्कस्थानने अशीच भूमिका घेतली तर काय करायचे, ही चिंता अमेरिकेला सतावत आहे. यापैकी काही ठिकाणी तर नाटो फौजांची अण्वस्त्रे तैनात आहेत.
अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांची भूमिका अशीच ताठर होत गेली तर? भविष्यात तुर्कस्थानमध्ये लोकशाही टिकेल का? हा प्रश्न अमेरिकेला सतावत आहे(?). तर हे नक्राश्रू आहेत, असे तुर्कस्थानला वाटते आहे.
बंडानंतरची अंतर्गत साफसफाई - बंडखोरांचा पुरता बीमोड करण्याचे प्रयत्न योग्यच ठरतात. हजारो सैनिकांना संशयावरून बडतर्फ करण्यात आले आहे. सैनिकांसोबतच पोलिस, न्यायाधीश व बंडाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केल्याचा संशय असलेले सनदी अधिकारी यांचीही हकालपट्टी झाली आहे. हेही एकवेळ योग्य ठरविता येईल पण शिक्षण खात्यातील २० हजार अधिकाऱ्यांना घरी पाठविले जात आहे आणि विद्यापीठातील १५०० पेक्षा जास्त शिक्षक, प्राध्यापक, विभाग प्रमुख यांना राजीनामे देण्यास सांगितले जात आहे, याला काय म्हणावे? संशयितांना परदेश प्रवासाची अनुमती मिळत नाही. तसेच तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर झाली आहे. हे म्हणजे अतीच झाले.
अमेरिकेवरील नाराजीचे आणखी एक कारण - फेतुल्ला गुलेन या कट्टर व प्रभावशाली धार्मिक तुर्की नेत्याच्या आदेशानुसार हा बंडाचा बनाव रचला गेला असा तुर्की शासनाचा दावा आहे. फेतुल्ला गुलेन १९९९ पासून अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतात विजनवासात राहतो आहे. फेतुल्ला गुलेन व तुर्कस्थानचे विद्यमान अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांच्यामधून विस्तव जात नाही. फेतुल्ला गुलेन अमेरिकेत राहून तुर्कस्थानमधील सर्व प्रशासकीय यंत्रणेत आपले अनुयायी घुसवीत आले आहेत, असा अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांचा दावा आहे. अस्तनीतील निखाऱ्या सारख्या असलेल्या या घुसखोरांना काहीही झाले तरी आपण निखंदून काढूच असा अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांचा निर्धार आहे. अमेरिकेने फेतुल्ला गुलेन यांना देशातून हकलून द्यावे व तुर्कस्थानच्या स्वाधीन करावे, अशी अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांनी मागणी केली आहे. फेतुल्ला गुलेन यांनी या बंडाशी आपला काहीही संबंध नाही, असे जाहीर केले असून अमेरिकेलाही त्यांना विनाकारणच जबाबदार धरले जाते आहे, असे वाटते आहे. अमेरिकेने मध्यपूर्वेत आजवर केलेल्या उचापती पाहता अमेरिकेवर तुर्कस्थानच नव्हे तर इतरही विश्वास ठेवायला तयार नाहीत.
एकजुटीला तडे - अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांची तीव्र प्रतिक्रिया समजण्यासारखी आहे. त्यांच्या केवळ पदालाच धोका निर्माण झाला होता असे नाही तर त्यांच्या जिवावरच बेतले होते. पण त्यांची सध्याची कारवाई म्हणजे वाजवी अंतर्गत विरोधालाही मूठमाती देण्याचा प्रयत्न आहे, असे विरोधकांना वाटते आहे. यांचा या बंडाशी काडीचाही संबंध नव्हता, ते अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांचे फक्त राजकीय विरोधक आहेत, इतकेच. विरोधी पक्ष नेते महमूद तनाल यांनी अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांची ही कारवाई चुकीची ठरविली आहे. या बंडाला अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांची चुकीची धोरणेही कारणीभूत झाली होती, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
१६ जुलैची स्थिती - १६ जुलैच्या सकाळी अंकारा ही राजधानी शांत झाली होती. बंड शमले होते. पार्लमेंटमध्ये आश्रयाला गेलेले खासदार एकेक करून बाहेर पडायला सुरवात झाली होती. पण रक्षक व खासदारांची ओळख पटत नव्हती. दोघेही एकमेकांकडे संशयाने व धास्तीनेच पाहत होते. विरोधी पक्ष नेते महमूद तनाल यांना काही पोलिस अधिकाऱ्यांनी ओळखले. त्यांनी तनाल यांची त्यांच्या कार पर्यंत सोबत केली. त्या कारवर एक साधा ओरखडा सुद्धा उमटला नव्हता. तोफांचे गोळे अवतीभवतीच पडले होते.
बंडानंतरचे कवित्त्व - सर्व राजकीय पक्षांनी या काळात अभूतपूर्व अशा एकजुटीचा परिचय दिला होता. जनतेने बंडखोरांना केवळ झिडकारलेच नव्हते तर बंडखोरांशी प्रत्यक्ष संघर्षही केला होता. पण बंड शमताच आपापसातील मतभेद पुन्हा डोके वर काढीत आहेत. आता अध्यक्ष तय्यीप एर्डोगन यांच्या नेतृत्त्व गुणांचीच खरी परीक्षा आहे. आपले आसन बळकट करण्याचा मर्यादित हेतू ठेवूनच ते वागले तर, येरे माझ्या मागल्या, हे ठरलेलेच आहे. आता चेंडू शासनाच्या अंगणात आहे. पुढचे पाऊल शासनाकडून कसे टाकले जाते यावर तुर्कस्थानचे भवितव्य अवलंबून असेल. इस्लामला लोकशाही मानवत नाही. त्याला तुर्कस्थानचा काहीसा अपवाद होता. इस्लामचा हा मानवी चेहरा मध्यपूर्वेत बदल घडवून आणण्यात महत्त्वाचा वाटेकरी होऊ शकतो. अमेरिकेतील वार्तांकनक्षेत्रातील दिग्गज न्यूयाॅर्क टाईम्स, वाॅशिंगटन पोस्ट, टाईम मॅगॅझीन या सारख्यांच्या वार्ताहरांनी कणाकणानी, क्षणोक्षणी व टप्याटप्प्याने गोळा केलेल्या वार्तांची ही गोळाबेरीज आज तरी शांततावादी व सुसंस्कृत जगाच्या आशा पल्लवित करणारी आहे.

No comments:
Post a Comment