अमेरिकेच्या २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीचे वेगळेपण(१)
वसंत गणेश काणे
वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राला आपल्या सव्वीस वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी जागतिक कीर्ती मिळवून देणारा बेंजामिन ब्रॅडली हा वयाच्या ९३ व्या वर्षी २१ ऑक्टोबर २०१४ ला निधन पावला. पण या थोर पत्रकाराचे वैशिट्य असे की त्याच्या पश्चात हे वृत्तपत्र त्याच जिद्दीने व त्याच प्रथा व परंपरा राखत प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे. बेंजामिन ब्रॅडलीचा उत्तराधिकारी म्हणतो, तसा १९९१ मध्ये निवृत्त झाला असला तरी आजही तो आमच्या सोबत न्यूज रूम मध्ये आमची सोबत करीत आहे, असे आम्हाला सतत जाणवत असते, आता अगदी परलोकवासी झाला असला तरी.
वाॅशिंगटन पोसटने २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीविषयी अत्यंत शास्त्रशद्ध पद्धतीने जनमत चाचणी आयोजित केली असून सप्टेंबर २०१५, डिसेंबर २०१५, मार्च २०१६ व जून २०१६ असा दर चार महिन्यात जनमताने घेतलेले हेलकावे स्पष्ट करणारा अहवाल खरेतर मुळातूनच वाचावयास हवा.
या सर्वेक्षणअहवालाचा निष्कर्ष एका वाक्यात सांगायचा तर तो असा आहे की, हिलरी क्लिंटन जून अखेरीस बारा टक्क्यांनी पुढे ( ५१-३९=१२) आहेत. सप्टेंबर २०१५ मध्ये असलेली क्लिंटन यांची केवळ ३ टक्यांची आघाडी डिसेंबर २०१५ मध्ये ६ टक्यावर गेली. मार्च २०१६ मध्ये ती आणखी वाढून ९ टक्यांपर्यंत पोचली मात्र मे२०१६ मध्ये क्लिंटन २ टक्यांनी मागे पडल्या पण लगेच जून २०१६ मध्ये हा फरक त्यांनी भरून काढला व चक्क १२ टक्यांची आघाडी घेतली. मार्च ते मे या काळात क्लिंटन यांची लोकप्रियता एकदम का घसरली ( नोज डाईव्ह) व जून संपतो ना संपतो तोच तिने पुन्हा मुसंडी मारून १२ टक्यांची बढत का घेतली.?
ट्रंप का माघारले?- याला ट्रंप स्वत:च यासाठी जबाबदार आहेत. ट्रंप यांची बेताल व भडकावू वक्तव्ये रिपब्लिकन मतदारांनाही आवडली नाहीत. जज्ज मेक्सिकन असल्यामुळे मेक्सिकन लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत पक्षपती राहू शकेल, ह्या ट्रंप यांच्या वक्तव्यावर तर समीक्षकांनी टीकेची झोड उठवली होती. महिलांबाबतची अनुदार वक्तव्ये, मित्र राष्ट्रे जपान व दक्षिण कोरिया यांनी आपली आपण संरक्षण सज्जता उभी करावी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी येणारा खर्च द्यावा ही त्यांची मागणी, लोकप्रियता कमी करणारी ठरली. ही दोन्ही राष्ट्रे त्यांच्या संरक्षणासाठीचा खर्च वर्षानुवर्षे उचलत आहेत, याचा ट्रंप यांना पत्ताही नाही, याबाबतचे त्यांचे अज्ञान त्याच्या अध्यक्षपदाबाबतच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले. एक व्यावसायिक म्हणूनही त्यांती कीर्ती चांगली नाही, याची उदारणे जगजाहीर झाली. ह्या बाबींमुळे त्यांनी स्वत:च आपले नुकसान करून घेतले आहे. राजकारणात काय बोलावे, यापेक्षाही काय बोलू नये, हे महत्त्वाचे असते, हे या बड्या बिल्डरला कळलेच नसावे. यामुळे नोव्हेंबरची अध्यक्षपदाची निवडणूक ट्रंप यांच्याबाबतचा जनमताचा कौल दाखवणारीच ठरण्याची शक्यता वाढली आहे. दर तीन पैकी दोन मतदारांनी ट्रंप अध्यक्षपदासाठी अपात्र आहेत, असे मत नोंदवले आहे.
हिलरींबद्दलही नाराजी - पण इकडे हिलरी क्लिंटन यांनीही सेक्रेटरीपदावर असतांना खाजगी ईमेल व शासकीय कामासाठीची इमेल यात केलेली गल्लत व सरमिसळ मतदारांनी अयोग्य ठरविली आहे. पन्नास टक्के अमेरिकनांना हे दोन्ही उमेदवार अध्यक्षपदाला न्याय देऊ शकतील, असे वाटत नाही. अशा परिस्थतीत एखादा तिसरा पर्याय मिळाला तर तर तो निवडून येईल किंवा नाही, हे सांगता येणार नाही, पण ही द्विपक्षीय राजकीय पद्धतीच्या शेवटाची सुरवात ठरू शकेल, असा विचार, हा नि:कर्ष समोर आल्यावर अनेकांच्या मनात येतो आहे. अनेकांच्या मनात क्लिंटन यांच्याविषयी इतका रोष आहे की, ट्रंप यांच्याबद्दल चांगले मत नसून सुद्धा केवळ बदल हवा म्हणून ट्रंप यांना मत द्यावे असे त्यांना वाटते आहे. अर्थात असा असंतोष केवळ हिलरींमुळेच आहे असे नाही. त्याला गेल्या आठ वर्षातील डेमोक्रॅट पक्षाची राजवटही कारणीभूत आहे. असे असले तरी मे महिन्यात दोन टक्के मतांनी ट्रंप यांनी मिळविलेली आघाडी भरून काढत क्लिंटन यांनी ट्रंप यांना १२ टक्याच्या फरकाने मागे टाकले आहे. पण याचे श्रेय क्लिंटन यांना द्यायचे की ट्रंप यांना या अपश्रेयाचे धनी मानायचे?
इतर पक्षांकडील कल वाढीला लागला - लिबर्टेरियन पार्टीच्या गॅरी जाॅनसन यांना ७(सात) टक्के मतदार पाठिंबा देत आहेत तर ग्रीन पार्टीच्या श्रीमती जिल स्टीन यांना ३ (तीन) टक्के मते मिळाली आहेत. या दोन उमेदवारांनी १० टक्के मते घेतली आहेत. याचा अर्थ असा की हा ट्रंप व क्लिंटन यांच्या मतांमध्ये पडलेला फरक वा दिसणारी बढत ९० चे दोन भाग होऊन पडलेली आहे. २०१२ च्या अध्यक्षीय निवडणुकीत इतर सर्व उमेदवारांना मिळालेली मते जेमतेम २(दोन) टक्के होती. २०१६ मध्ये हे दोनच उमेदवार एकूण १० टक्के मते घेतांना आजच दिसत आहेत. यात आणखी वाढ झाली तर काय? ही बाब या दोन्ही पक्षांना विचार करावयास लावणारी आहे.

No comments:
Post a Comment