इराकमधून इसीसच्या माघारीला प्रारंभ, पण...
वसंत गणेश काणे
इराकची राजधानी असलेल्या बगदादहून आलेल्या वार्तेवर सुरवातीला कोणाचाही विश्वास बसत नव्हता. इसीसच्या फौजा केवळ माघारच घेतांना दिसत नाहीत, तर त्यांचे पलायन सुरू झाले आहे, हे ते वृत्त होते. फालूजा हे इराकमधल एक सैनिकी महत्त्वाचे केंद्र होते. या ठिकाणी इसीसच्या फौजा ठिय्या देऊन बसल्या होत्या. त्यांची आगेकूच थांबवण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी इराकच्या मित्रांच्या (नाटोच्या) फौजा निकराचे प्रयत्न करीत होत्या. रशियाही स्वतंत्रपणे व आपल्यापरीने याच प्रयत्नात होता. पण त्या जशा पुढे सरकत नव्हत्या तशाच त्या मागेही हटत नव्हत्या. शेवटी एक वृत्त आले. त्या फौजा आपल्या वाहनांच्या ताफ्यासह केवळ मागेच हटतांना दिसत नाहीत, तर त्यांचे पलायन सुरू झाले आहे.
अमेरिकेने मानवरहित ड्रोन हे टेहळणी विमान पाठवून खात्री करून घेतली. वाॅर रूममध्ये हे एक भला मोठा पडदा टांगलेला होता. लष्कराचे महत्त्वाचे अधिकारी समोर उभे राहून पडद्यावरील निरीक्षणे व नोंदी यांची बारिक तपासणी करीत होते. पडद्यावरील हालचालींवरून एकच निष्कर्ष निघत होता. सर्व चिन्हे माघारी नव्हे तर पलायन सुचवीत होती. वाहने एकत्र येत होती, त्यांची गर्दी वाढत होती. पण लक्षणे पलायनाची दिसत होती.
पण हा क्षण समाधान मानून स्वस्थ बसण्याचा नव्हता तर निर्णायक आघात करण्याचा होता. आजवरचा अनुभव लक्षात घेऊन इसीसने आपला वाहनांचा ताफा सतत विखुरलेला ठेवण्याचे धोरण अवलंबिले होते. हवाई हल्यात सर्व वाहने एकदम नष्ट होऊ नयेत, म्हणून ही काळजी घेतली जात असे. पण आतातर इतकी गडबड धांदल दिसत होती की, वाहतुक थांबली होती ‘ट्रॅफिक जाम’ झाला होता.
फालुजा शहर बगदादपासून केवळ ३५ मैल अंतरावर होते. येथपर्यंत इसीसच्या फौजा पोचल्या होत्या. यानंतर एकच चढाई करताच बगदाद पडले असते. इराकच्या राजधानीवरच कबजा होताच पुढचे काम सोपे होते. बाकीचा इराक पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला असता. पण इराक सरकारच्या फौजांनी इराकच्या मित्रांच्या(नाटोच्या) फौजांच्या मदतीने, अमेरिकेच्या ड्रोन या मानवरहित विमानंच्या हल्याच्या साह्याने व रशियाच्या स्वतंत्र पण पूरक बाॅंब वर्षावाच्या मदतीने इसीसची आगेकूच थांबवली होती. आता तर चक्क माघारच नाही तर पलायन सुरू झालेले दिसत होते.
जूनच्या शेवटच्या एकाच प्रभावी व सर्वंकष हल्यात ४०० अतिरेकी व त्यांच्या सोबत असलेला २०० वाहनांचा ताफा नष्ट झाल्याच्या वार्ता कानावर येत होत्या पण पुष्टी होत नव्हती. विश्वासही बसत नव्हता. विश्वास तरी कसा बसावा? गेली दोन वर्षे इसीसच्या फौजांची आगेकूच अव्याहत सुरू होती. इसीसच्या फौजा सतत पुढेपुढेच सरकत होत्या. पण आता लढाईचे पारडे पलटले होते.
असे का वकाय घडले होते? गुप्तहेरांचे दाखले व आघाडीवरून परत आलेल्यांच्या मुलाखती यावरून एक बाब उघड झाली. इराकच्या फौजा, मित्रराष्ट्रांच्या(नाटोच्या) फौजा, ड्रोनचे हल्ले व रशियाची नेमकी व अचुक बाॅंबफेक एकसमयावच्छेदेकरून जुळून येईल, असे अतिरेक्यांना वाटले नव्हते. त्यांना तरी हे सगळे असे जुळून येईल, असे का वाटावे? रशिया व नाटोचे पार बिनसले होते. पण रशियालाही इसीसचा धोका पटला होता. त्यामुळे नाटोसह जरी नव्हे तरी वेगळ्या रीतीने पण नेमका, वेळेवर व योग्यत्या क्षेत्रावर रशियानेही तुफान बाॅंबफेक केली होती.
अतिरेकी अगोदर आश्चर्यचकित झाले. पुढे त्यांच्यात मतभेद होऊन त्यांच्यात दोन तट पडले. त्यांना परिस्थतीचा अंदाज घेता आला नाही. जेव्हा अंदाज आला तेव्हा उशीर झाला होता. माघार हाच पर्याय शिल्लक होता. तशी ही काही इसीसची पहिली माघार नव्हती. या अगोदरही ते मागे हटले होते. पण ती धोरण आखून घेतलेली माघार असे. लवकरच त्यांच्या फौजा पुन्हा एकत्रित येत व चढाई सुरू करीत. पण हे सपशेल पलायन होते. आता संपूर्ण इराणमधून अतिरेक्यांची सपशेल माघार फार दूर नाही. तसे अजूनही मोसूल हे महत्त्वाचे ठाणे त्यांच्या ताब्यात आहे, हे खरे आहे. पण आता विजयाने उत्साहित झालेल्या इराकी फौजा नव्या जोमाने मोसूलवर चढाईची योजना आखीत आहेत. अमेरिकेने आणखी ६०० सैनिकांचा ताफा याच कामासाठी पाठविला आहे.
परत फिरणाऱ्या इसीसच्या वाहनात नक्की कोण व काय आहे, याचा शोध घेणे सुरू आहे. अनेकदा या वाहनात, बंदीवान नागरिक, स्त्रिया व मुलेही असतात. त्यांचा नाहाक बळी जायला नको. एकेक वाहन हुडकून व ज्यावर मशीनगन्स तैनात असतील, त्यांच्यावरच हल्ला करण्याचे काम जसे जिकिरीचे आहे तसेच ते जोखमीचेही आहे. काही गल्लत झाली तर एकतर निरपराध लोकांचा बळी जायचा किंवा हल्ला करणाऱ्या विमानालाच धोका पोचायचा.
म्हणून एक वेगळीच रणनीती अवलंबिली जात आहे. परतीच्या वाटेला असलेल्या वाहनांच्या ताफ्याच्या मागेपुढे व भोवती बाॅंब टाकून मोठमोठे खड्डे पाडून रस्त्यावरून होणारी त्यांची वाहतुक थांबवायची व बायपास तयार करणेही अशक्य करायचे. म्हणजे कोणतेही वाहन निसटून जाऊच शकणार नाही. ते जागीच खिळून राहील. मग एकेका वाहनाचा आकाशातून टेहळणी करून अंदाज घ्यायचा .त्यावर शस्त्रे आहेत, असे दिसताच ती नष्ट करायची. एक आणखी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आघाडीवरच्या अधिकाऱ्यानेच यापुढे स्वत: निर्णय घ्यायचे आहेत. या अगोदर तो सेंट्रल कमांडकडे अहवाल पाठवायचा व तिकडून अनुमती मिळाल्यानंतर पुढील कारवाई करायचा. वाहनात मुलकी नागरिक नाहीत, ही खात्री पटताच पुढची कारवाई करण्याचे अधिकार आता आघाडीवरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या निर्णयाचा अनुकूल परिणामही लगेचच दिसून आला. फालुजा जवळच अल्बू बाली हे छोटेसे खेडे आहे. टेहळणी करणाऱ्या ड्रोनने जवळजवळ शंभर वाहने त्या दिशेने कूच करीत आहेत व एकत्रित येत आहेत, अशी दृश्ये टिपली. लगेच इराकी तोफांनी त्यांच्यावर आग ओकायला सुरवात केली व अन्य देशाच्या विमानांनी त्यांच्यावर बाॅंब वर्षाव केला. यात एक आश्चर्यकारक बाब लक्षात आली. विमानातून टाकलेल्या बाॅंबच्या स्फोटानंतर काही वेळाने दुसरा एक स्फोट होत होता. याचा अर्थ असा की, हे कार बाॅंब्जहोते. कार बाॅंब पाठवून लढण्याचे एक वेगळेच युद्धतंत्र इसीसच्या फौजा अंगिकारणार होत्या. ते वेळीच व योगायोगाने लक्षात आले होते.
हळूहळू हा सर्व प्रकार इसीसच्या परत फिरणाऱ्या वाहनात बंदीवान असलेल्या मुलकी नागरिक, स्त्रिया व मुले यांच्याही लक्षात येऊ लागल्याचे दिसत आहेत. हल्यातून वाचलेलेल्या किंवा वगळलेल्या वाहनातून ही मंडळी पळ काढून आसरा शोधतांना दिसत आहेत. यांना चुकूनही हानी पोचू नये म्हणून संबंधित वाहनावर जवळजवळ एक तास नजर ठेवून मागच त्यावर हल्ला करण्या किंवा न करण्याचा निर्णय इराकी फौजा घेत आहेत.
इसीस आता आपले युद्धतंत्र बदलतांना दिसत आहे. एकटदुकट वाहन वापरून केवळ मोक्याच्या ठिकाणीच नव्हे ठिकठिकाणी गनीमी हल्ले करून सतावून सोडण्याचे तंत्र अवलंबिले जात असावे, अशी शंका व्यक्त होते आहे. कारण एकटदुकट ठिकाणी होणाऱ्या हल्यामागचे खरे दुसरे सूत्रधार उघड होत नसतात. जगातील ठिकठिकाणची इसीसची स्लिपिंग सेल्स एकदम क्रियाशील होताना दिसत आहेत. हे हल्ले अचानक होत असतात. त्यांचे प्रसिद्धीमूल्यही खूप असते. हल्याचा हा प्रकार इसीससाठी कमी नुकसानदायक व अधिक परिणामकारक असतो. अशा हल्याच्या वार्ता दिवसेदिवस वाढत्या प्रमाणात येऊ लागतील असे दिसते.

No comments:
Post a Comment