Monday, December 30, 2024

 चीनच्या  चतुरतेला भारताचे उत्तर

(पूर्वार्ध)

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ३१/१२/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

चीनच्या  चतुरतेला भारताचे उत्तर

(पूर्वार्ध)

 वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

चीनच्या  चतुरतेला भारताचे उत्तर

(पूर्वार्ध)

 वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 


    आशियातील जनतेचा पाश्चात्यांवर विश्वास नाही याबाबत आश्चर्य वाटायला नको. जवळजवळ पूर्ण आशियाला पाश्चात्यांनी गुलामासारखे वागवून आशियातील जनतेचे शोषण केले आहे, ही बाब विसरण्यासारखी नक्कीच नाही. याचा स्वाभाविक परिणाम असा झाला की, आता स्वतंत्र झाल्यानंतर पाश्चात्य देशांशी फटकून वागण्याची मानसिकता आशियन जनतेत निर्माण झाली, हेही समजण्यासारखेच आहे. आशियन देशांचाच एक गट तयार करावा आणि त्यांनीच आपापसात संबंध ठेवावेत, अशी मानसिकता निर्माण होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. ‘आशियन सगळे एक, इतर सगळे परके’, हा भावही  यामुळेच निर्माण झाला.  या भावनेने भारावून गेलेल्या आशियनांच्या मानसिकतेला आणखी खतपाणी घालण्याचा चतुर डाव चलाख चीनने आखला. चीनची भूमिका अशी होती की, आशियात आपल्याला आव्हान देण्याचे सामर्थ्य कुणातही नाही. त्यात भारतही आला. चीनचे आशियातील बहुतेक देशांशी सीमावाद आहेत. हे वाद आम्ही आपापसात सोडवू ‘इतरांनी’ त्यात पडू नये, अशी भूमिका चीनने घेतली. एकटा भारत सोडला तर इतर देशांचे सामर्थ्य आपल्या तुलनेत टिकणारे नाही, हे चीन जाणून आहे. चीनच्या तुलनेत भारताचे सामर्थ्यही फारशी चिंता करावी, असे नाही आणि नजीकच्या भविष्यात भारतही चीनची बरोबरी करू शकणार नाही, अशीच चीनची समजूत होती आणि आहे. भारताबद्दल बोलायचे तर एकेकाळी पंचशीलच्या गारुडाने भारतही भारावून गेला होता. त्यातून भारताला बाहेर यायला 1962 साल उजाडावे लागले. 

  एप्रिल 1954 मध्ये, भारत आणि चीनने पंचशील करारावर स्वाक्षरी केली होती. यालाच शांततापूर्ण सहअस्तित्वाची पाच तत्त्वे म्हणूनही ओळखले जाते. परस्परांच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान करणे, परस्परांवर  आक्रमण न करणे, एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे, समानतेवर आधारित व्यवहार करणे, परस्पर लाभ होईल असा व्यवहार करणे, आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाचा पुरस्कार करणे अशा आशयाची या पंचशील कराराची पाच तत्त्वे आहेत. मुळात  बौद्ध धर्मानुसार सदाचाराची पाच तत्त्वे सांगितली आहेत. प्रत्येक धार्मिक व्यक्तीने त्यांचे पालन करावे, अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे.  (1) अस्तेय म्हणजे चोरी न करणे; (2) अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, (3) ब्रह्मचर्य म्हणजे व्यभिचार न करणे, (4) सत्य म्हणजे खोटे न बोलणे आणि  (5) मादक द्रव्यांचे सेवन न करणे अशा आशयाची ही पाच तत्त्वे आहेत. भारत आणि चीन यांनी करार करतांना पंचशील हेच प्राचीन शीर्षक वापरून करार केला होता. हा करार करून भारताला बेसावध ठेवून चीनने सीमेवर कुरापती करायला सुरवात केली आणि 1962 मध्ये तर सरळसरळ आक्रमणच केले. भारत आपल्या तुलनेत कसा कमकुवत आहे, याची  भारताबरोबरच जगालाही जाणीव करून देण्यासाठी केलेला हा चीनचा प्रयत्न होता. चीन फक्त भारताशीच असा वागतो, असे नाही. इतर बहुतेक देशांशीही चीनची वागणूक अशीच आहे.

चीनने उकरून काढलेले सीमावाद 

1) भारत-चीन सीमावाद-  अक्साईचीनमधला  चीनने 38,000 चौ.किमी. भूभाग बळकावला आहे तर अरुणाचलमधील 90,000 चौ. किमी. भागावर दावा सांगितला आहे. या शिवाय उत्तराखंडची 545 किलोमीटर लांबीची सीमा चीनला (तिबेट) लागून आहे. या भागात निरनिराळ्या ठिकाणी मिळून एकूण 2450 चौ.किमी. भूभाग चीनला हवा आहे.

नेपाळ-चीन सीमावाद - आज नेपाळ चीनच्या ताटाखालचे मांजर असल्यासारखे दिसत असले तरी चीनने नेपाळची घुसखोरी करून  हडपलेली एकूण 64 हेक्टर जागा ढोलाखा, हुमला, सिंधूपालचौक, संखुवासभा, गोरखा आणि रासुवा जिल्ह्यात विखुरलेली आहे. नेपाळ-चीन सीमा 1415 किमी. लांब आहे. या सीमेवर ठिकठिणी पिलर्स लावलेले होते. यापैकी 98 पिलर्स उखडून फेकण्यात आले आहेत तर इतर काही नेपाळच्या सीमेत आत सरकवण्यात आले आहेत. नेपाळी कॅांग्रेसने याबाबत नेपाळच्या संसदेत ठराव मांडून चीनने नेपाळची हडपलेली भूमी परत मिळविण्यास ओली सरकारला सांगितले. पण व्यर्थ.

   मे 2020 मध्ये चीनच्या ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने, माऊंट एव्हरेस्ट चीनच्या हद्दीत आहे, नेपाळच्या नव्हे, असे घोषित केले. नेपाळमध्ये संतापाची लाट उसळताच मात्र हे ट्विट डिलिट करण्यात आले. चीन आणि नेपाळमध्ये 1788 ते 1792 मध्ये युद्ध झाले होते. त्याचा हवाला देत 64 हेक्टर जागेवर चीन आपला अधिकार सांगतो आहे. 

चीन - भूतान सीमावाद 

जुलै 2017 मध्ये भूतानी अधिकाऱ्यांनी चिनी अधिकाऱ्यांना बजावले की, दोन देशादरम्यान झालेल्या सहमतीला अनुसरून वागावे. डोकलाम प्रकरणानंतरही चीन भूतानच्या सीमेच्या आत  निरनिराळ्या ठिकाणी घुसखोरी करीत असतो. भूतानी गुराख्यांना भूतानी प्रदेशातूनच चिनी गस्ती तुकड्यांनी अनेकदा हुसकून लावले आहे. चीनने भूतानच्या साकतेंग अभयारण्यावर दावा करून भारतालाही शह देण्याचा प्रयत्न केला आहे. 

    दक्षिण चीन उपसागर आणि प्रशांत महासागरात चीनने जवळपास सर्व देशांशी सीमावाद उकरून वातावरण तापवले आहे. चीनचे तैवान, ब्रुनाई, इंडोनेशिया, मलायाशिया, फिलिपिन्स, व्हिएटनाम आणि जपानबरोबर सागरविषयक प्रश्नी वाद आणि संघर्ष आहेत. चीन समुद्रातील साधनसंपतीबाबत जुने पुराणे ऐतिहासिक दाखले दाखवत अधिकार गाजवण्याच्या प्रयत्नात असतो. दक्षिण चिनी समुद्र व त्यातील लहानमोठी बेटे, समुद्रात जेमतेम बुडालेली बेटे, किनारे यावर चीन आपला अधिकार गाजवत असतो.

व्हिएटनाम - 1974 मध्ये चीनने पॅरॅसेल बेटे व्हिएटनामकडून हिसकाऊन घेतली. वूड आयलंड्सवर चीनने सैनिकी ठाणी उभारली विमानतळ बांधले आणि कृत्रिम बेटे उभारली आहेत. या बेटांवर तसेच तैवान आणि व्हिएटनामधील प्रदेशांवरही चीन आपला अधिकार सांगत असतो.

जपान -  पूर्व चिनी समुद्रात सेनकाकू नावाची निर्जन बेटे आहेत. चीनने याच बेटांना दिओयू बेटे अशी नावे दिली आहेत.1890 पासून या बेटांवर जपानचे नियंत्रण आहे.1970 मध्ये या बेटांवर खनीज तेलांचे मोठे  साठे आहेत, हे कळताच चीनने या बेटांवर अधिकार सांगितला. अमेरिका आणि जपानने हा अधिकार नाकारताच चीनने प्रचंड  प्रचार मोहीम राबवून त्यांना विवादित स्वरुप दिले.

 तैवान - चीन तैवानवर आपला अधिकार सांगतो आहे. मॅक्लेसफील्ड बॅंक, पॅरॅसेल बेटे, स्कारबरो शोल, स्पार्टली बेटे यावरही चीन आपला अधिकार सांगतो आहे. या बेटांवर चीन, तैवान, व्हिएटनाम आणि म्यानमार हे देश  आपलाही अधिकार आहे, असे सांगत आहेत.

 फिलिपिन्स - दक्षिण चिनी उपसागरावर फिलिपिन्स आणि चीन दोघेही आपला अधिकार सांगतात. फिलिपिन्सने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे नेला होता. या न्यायालयाने फिलिपिन्सच्या बाजूने निकाल दिला. पण हा निकाल चीनने मानला नाही.

स्कार्बरो शोल हे बेट समुद्रात जेमतेम बाहेर आलेले  बेट आहे. या बेटाबाबत 1997 साली वाद सुरू झाला होता. तो शिगेला पोचला एप्रिल 2012 मध्ये. शेवटी चीनने इथेही आपले बस्तान बसवलेच. शेवटी फिलिपन्सने पीसीए (परमनंट कोर्ट ॲाफ आरबिट्रेशन) कडे दाद मागून निर्णय आपल्या बाजूने मिळवला पण चीनने याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.  चीनची ही चतुराई हाणून पाडण्यासाठी भारतानेही उपाय योजले आहेत. ते आपण पुढच्या भागात पाहू.


Monday, December 23, 2024

 श्रीलंका आणि बारतविरोधी कारवाया 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २४/१२/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     


श्रीलंका आणि भारतविरोधी कारवाया 


वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

श्रीलंकेच्या संसदेत 225 सदस्य असतात. यापैकी 196 सदस्य जिल्हा मतदारसंघातून निवडले जातात. प्रत्येक मतदार संघातून एकापेक्षा जास्त सदस्य (समजा 5) निवडायचे असतात. अशा मतदारसंघांना बहुसदस्यीय मतदार संघ (मल्टिसीट कॅान्स्टिट्युएन्सी) असे नाव आहे.  प्रत्येक पक्षाला (समजा तीन पक्ष आहेत)  एकूण मतदानापैकी (समजा100) प्रत्येक पक्षाला जेवढी मते मिळतील त्या मतांच्या प्रमाणात त्या पक्षाला जागांचे वाटप केले जाते. समजा अ पक्षाला 50% ब पक्षाला 30% आणि क पक्षाला 20% मते मिळाली आणि एकूण जागा 10 आहेत तर  जागा अनुक्रमे 5,3,2 अशाप्रकारे अ ब व क पक्षांना मिळतील. अशीच वाटणी सर्व मतदारसंघांचे बाबतीत होईल. आता उरल्या 29 जागा. यांची वाटणी करण्यासाठी संपूर्ण देशभरात मिळून कोणत्या पक्षाला किती टक्के मते मिळाली हे पाहून त्या टक्केवारीच्या प्रमाणात 29 जागांचे वाटप करण्यात येईल.

 या पद्धतीनुसार हिशोब होऊन निरनिराळ्या पक्षांना मिळालेल्या जागा अशा आहेत. 

अ) जनता विमुक्ती पेरामुनाप्रणीत नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीला एकूण 62% म्हणजेच  68 लाख मते मिळाली. जिल्हा मतदारसंघातून 141 जागा आणि राष्ट्रीय मतदारसंघातून 18 अशा 159 जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 156 जागा जास्त मिळाल्या. 

ब) विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बलावेगया या पक्षाला एकूण 18% मते मिळाली. जिल्हा मतदारसंघातून 35 जागा आणि राष्ट्रीय मतदारसंघातून 5 अशा 40 जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 14 जागा कमी मिळाल्या.  

क)  इलन्काइ तमिळ अरासू कात्ची या सर्वांत मोठ्या तमिळ पक्षाला एकूण 2.3% मते मिळाली. जिल्हा मतदारसंघातून 7 जागा आणि राष्ट्रीय मतदारसंघातून 1 अशा 8 जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 8 जागा जास्त मिळाल्या.  

 ड)  मावळते अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या न्यू डेमोक्रॅटिक फ्रंटला एकूण 4.5 % मते मिळाली. जिल्हा मतदारसंघातून 3 जागा आणि राष्ट्रीय मतदारसंघातून 2 अशा 5 जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 5 जागा जास्त मिळाल्या.  

 इ)  आणि माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या श्रीलंका पाडुजन पेरामुना  पक्षाला एकूण 3.1 % मते मिळाली. जिल्हा मतदारसंघातून 2 जागा आणि राष्ट्रीय मतदारसंघातून 1 अशा 3 जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 97  जागा कमी मिळाल्या.  उरलेल्या जागा डझनावारी पक्ष आणि अपक्षात वाटल्या गेल्या आहेत. 

   या निवडणुकीच्या अगोदर  श्रीलंकेत अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. त्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार, विद्यमान अध्यक्ष राणिल विक्रमसिंघे,  समाजी जन बलवेगया पक्षाचे उमेदवार आणि विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा आणि डावीकडे झुकलेल्या सिंहली वर्चस्ववादी एनपीपीचे चीनसमर्थक मार्क्सवादी  उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके यांच्यात लढत झाली, कुणाही एका उमेदवाराला मतदानाच्या पहिल्या फेरीत 50% चा जादुई आकडा गाठता आलेला नव्हता. पहिल्या फेरीत अनुरा कुमारा दिसानायके  (उर्फ एकेडी)  वय वर्ष 55 यांना 42.36% म्हणजेच सुमारे 56 लाख, साजित प्रेमदासा यांना 32.72% म्हणजेच सुमारे 43 लाख, तर राणिल विक्रमसिंघे यांना 17.25% म्हणजेच सुमारे 23 लाख मते मिळाली व ते तिसरे ठरल्यामुळे बाद झाले. पुढे दिसानायके आणि साजित प्रेमदासा यातच पुढचा पसंतीक्रम वाटला गेला आणि दिसानायके विजयी झाले. अख्खा युरोप आज उजवीकडे वळू पहात असताना श्रीलंकेने स्वीकारलेला हा उरफाटा वाम मार्ग आश्चर्य वाटावा असा आहे.  

नुकत्याच अध्यक्षपदी निवडून आलेल्या अनुराकुमार दिसानायके यांनी अध्यक्षीय निवडणुकीपाठोपाठ आता पार्लमेंटच्या निवडणुकीतही नेत्रदीपक यश मिळवून दाखविले आहे. अशाप्रकारे देशाच्या राजकारणावर त्यांनी आपली पकड चांगलीच पक्की केली आहे. दिसानायके हे मूळचे मार्क्सवादी विचारांचे कट्टर पुरस्कर्ते राहिलेले आहेत.  एकेकाळी त्यांचा जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) हा पक्ष सुद्धा सिंहली वर्चस्ववादी राजकारण करीत असे. पण श्रीलंकेत भडकलेला भयंकर वांशिक हिंसाचार काहीही साध्य करू शकला नाही याची त्यांना जाणीव झाली.  अनेक सिंहली नेत्यांनाही असाच साक्षात्कार झाला. दिसानायके त्यांच्या पक्षाने तर शांततेच्या मार्गाने व लोकशाही पद्धतीने कार्य करण्याची घोषणा करून ती अमलात आणली.

   दिसानायके यांनी स्थापन केलेल्या आघाडीला 2024 च्या निवडणुकीत 159 जागा मिळाल्या. याचा अर्थ असा होतो की तमिळ भाषक मतदारांनीही या आघाडीला समर्थन दिले आहे. डाव्या विचारसरणीच्या एनपीपीने श्रीलंकेतील उत्तरेकडे असलेल्या जाफना जिल्ह्यात विजय मिळवून इतिहास घडवला आहे. कारण जाफना भागात तमिळांची संख्या जास्त आहे. दिसानायके यांचा पक्ष  देशाच्या दक्षिणेकडील भागातील एक प्रमुख सिंहली पक्ष आहे. दक्षिणेकडील सिंहली पक्षाने उत्तरेतील तमिळ बहुल भागात असे यश प्रथमच प्राप्त केले आहे. या पक्षाला एकेकाळी आक्रमक सिंहली-बौद्ध राष्ट्रवादी मानले जायचे. पण श्रीलंकेतील भाषावाद कमी होतो आहे. आता सिंहली आणि तमिळ यातील दुरावा कमी होत गेला आणि सर्वसमावशकतेच्या धोरणाचा अवलंब झाला तर ती फार मोठी सकारात्मक बाब ठरेल. श्रीलंकेच्या नवीन पार्लमेंटमध्ये निर्माण झालेले पक्षांचे बल बघितले की, श्रीलंका डावीकडे वळू पाहते आहे, हे स्पष्ट होते. याला भारताचा आक्षेप असण्याचे कारण नाही. फक्त नवीन राजवट चीनच्या इशाऱ्यावर नाचणारी असू नये, अशी मात्र भारताची अपेक्षा आहे.

  कोविड-१९ आणि राजपक्षे सरकारची चुकीची आर्थिक धोरणे यांमुळे इंधन, अन्न आणि औषधे या जीवनावश्यक घटकांची तीव्र चणचण शेरीलंकेत जाणवू लागली. श्रीलंकेवर आर्थिक अरिष्ट ओढवले आणि ऐषारामी, बेमुर्वतखोर राजपक्षेंविरोधात संतापाचा कडेलोट झाला. जनता थेट अध्यक्षीय प्रासादावरच चालून गेली. त्यामुळे वांशिक किंवा इतर कोणत्याही कारणापेक्षा दिसानायके यांना पाठोपाठच्या निवडणुकांमध्ये लंकेतील सर्व गटांचा भरभरून मिळालेला पाठिंबा हा दारिद्र्य व भ्रष्टाचार निर्मूलन यासाठी आहे. यामुळेच जेव्हीपीसारख्या सिंहली-बुद्धिस्ट पक्षाला जाफना या तमिळबहुल जिल्ह्यामध्ये विजय मिळवता आला आहे. तसे पाहायला गेल्यास जेव्हीपीची चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी वैचारिक बांधिलकी आहे. पण भारताला कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षून चालणार नाही, याचे भान दिसानायके यांना आहे. सिंहला, तमिळ, मुस्लीम यांना एकत्रित घेऊन वाटचाल करू, असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. एकूण असे की, दिसानायके यांनी आर्थिक आणि वांशिक अशा दोन्ही आघाड्यांवर स्थैर्य आणि सामंजस्य निर्माण केले, तरच श्रीलंकेला भवितव्य आहे.

  वर्षभरापूर्वी दिसानायके यांनी भारताला भेट दिली होती. त्यावेळी श्रीलंकेत निवडणुका व्हायच्याच होत्या. या दोन देशात मैत्रीचे संबंध असावेत यावर त्यांनी तेव्हा भर दिला होता. त्यांचा हा मुद्दा शंभर टक्के बरोबर होता आणि आहे.  पण त्यासाठी श्रीलंकेलाच आपले चीनच्या तालावरचे नाचणे थांबवावे लागेल. श्रीलंका भारताचा शेजारी देश आहे. त्याचा उपयोग भारतविरोधी कारवायासाठी होऊ नये हे तेव्हा त्यांना मान्य होते. आता सत्तेवर आल्यावरही आपली  प्रत्यक्षात हीच भूमिका असेल, असे आश्वासन त्यांनी नुकतेच पुन्हा एकदा दिले आहे. 


Monday, December 16, 2024

 सीरियातील मुलखावेगळा संघर्ष


तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक १७/१२/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     


सीरियातील मुलखावेगळा संघर्ष


वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?  

  बशर अल-असद हे सीरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष, सैन्य दलाचे प्रमुख आणि सत्तारूढ बाथ पार्टीचे जनरल सेक्रेटरी होते. त्यांचे अगोदर बशर यांचे वडील हाफिज अल-असद हेही सलग 30 वर्षे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्यानंतर बशर सीरियाचे सर्वेसर्वा झाले. अशाप्रकारे सीरियावर गेली अनेक वर्षे असद कुटुंबाची सत्ता होती. बंडखोरांनी ही सत्ता दिनांक 8 डिसेंबर 2024 ला उलथून टाकली. यासाठी गेली 13 वर्षे ते संघर्ष करीत होते. आत्ताआत्तातर या संघर्षाला गृहयुद्धाचे स्वरुप आले होते. असद यांनी सहकुटुंबसहपरिवार रशियात पलायन केले आहे. रशियाने मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांना आश्रय दिला आहे. आश्रय घेण्यासाठी असद यांनी रशियाची निवड करावी ही नोंद घ्यावी अशी बाब आहे. इस्लामी बंडखोरांनी रशिया आणि इराण या दोन राष्ट्रांनाही या निमित्ताने दणका दिला आहे, असे राजकीय निरीक्षक  मानतात. याचे कारण हे आहे की, ही दोन राष्ट्रे सीरियातील असद राजवटीला पाठिंबा देत होती. रशियाने 2022 मध्ये युक्रेनवर चढाई केली होती. त्यामुळे रशिया यावेळी असदला फारशी मदत करू शकला नाही. इराण हिजबुल्ला मार्फत असदला मदत करीत असे. पण इस्रायलने हिजबुल्लालाच सद्ध्या सुरू असलेल्या युद्धात पुरते नमोहरम केले आहे. त्यामुळे बंडखोरांना नामी संधी मिळाली आणि ते विजयी झाले असे दिसते. दुसरे असे की, सीरियातील जनतेतही असदविरोधात अगोदरच असलेला असंतोषही वाढीस लागला होता. त्यांची सहानुभूती आता बंडखोरांकडे वळली. अशाप्रकारे बंडखोरांचा उठाव शेवटी गृहयुद्धात परिवर्तित झाला. असद यांची कारकीर्द ही जगातली सर्वात मोठी जुलमी राजवट मानली जाते. ती सर्वात जास्त काळ चालली. त्या मानाने तिचा बोभाटा मात्र फारसा झाला नाही. ती आता संपली. नवीन राजवट कशी येते ते पहायचे.

  सीरिया प्रकरणी रशिया, इराण, तुर्कस्तान, अमेरिका आणि इस्रायल ही राष्ट्रे आपापपले हेतू समोर ठेवून भाग घेत होती. रशियाने असदची सतत पाठराखण केलेली आहे. पण युक्रेनमध्ये रशिया स्वत: जायबंदी झाला नसता तर त्याने सीरियाला आणखी मदत नक्कीच केली असती. इतर आव्हानांचा सामना करण्यात गुंतलेल्या इराणने तर प्रत्यक्ष युद्ध कुणाशीच केले नाही. त्याचे मुख्य वैर इस्रायलशी होते आणि आहे. यासाठी इराणने लेबनॅानमधील हिजबुल्ला गटाला हाताशी धरले होते. पण हिजबुल्ला गट इस्रायलसमोर टिकाव धरू शकला नाही. त्यामुळे इराणला हिजबुल्लाकरवी सीरियात काही करता आले नाही. तुर्कस्तान आणि हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) यांच्यात फारसे सख्य कधीच नव्हते. तुर्कस्तानला कुर्दिशांना ठोकून काढायचे होते. त्याचे हल्ले तेवढ्यापुरतेच मर्यादित असत. अमेरिका सीरियात तळ ठोकून होती ती यासाठी की तिला मुख्यत: आयसिसला पायबंद घालायचा होता. इस्रायलचे हल्ले लेबनॅानमधील हिजबुल्ला गटाच्या विरोधात होते. या हल्ल्यातच हिजबुल्लाला प्रचंड हानी सहन करावी लागली त्यामुळे हिजबुल्लामध्ये असदला मदत करण्याइतके त्राणच उरले नव्हते. अशा या अजब संघर्षाचे जगातले हे पहिलेच उदाहरण असावे.

  या गृहयुद्धाची सुरवात तशी 2011मध्येच झाली असे म्हटले पाहिजे. यात लाखापेक्षा जास्त लोकांचे जीवन उध्वस्त झाले. सीरियातच निदान सहा भागात जणू स्वतंत्र राजवटी सुरू झाल्या होत्या. काहींचे नियंत्रण देशातील प्रभावी गट करीत असत तर काहींचे नियंत्रण देशाबाहेरील सूत्रधारांच्या हाती होते. हे गृहयुद्ध इतके लांबले की शेवटी त्याचा जगाला जणू विसरच पडला होता. 2011 चा उठाव लोकशाहीवादी घटकांचा होता. तो देशव्यापी होता पण असदशी एकनिष्ठ असलेल्या सैन्याने तो चिरडून टाकला. 2012 साली संघर्षाची परिणीती गृहयुद्धात झाली. सरकारी फौजा, फ्री सीरियन आर्मी (एफएसए), जिहादी गट असे तीन गट निरनिराळ्या भागांवर नियंत्रण करू लागले. 2013 मध्ये सीरियायातील कुर्दिश डेमोक्रॅटिक पार्टीने कुर्दबहुल उत्तर भागावर नियंत्रण मिळविले आणि रोजावा या नावाचा स्वायत्त प्रशासकीय प्रदेश स्थापन झाला. 2014 मध्ये इराक लेवंट (आयएसआयएल) यांनी पूर्व सीरियावर नियंत्रण मिळविले आणि खिलापत स्थापन केले. (इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अँड लेव्हंट, किंवा इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अँड सीरिया ही एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना व स्वयंघोषित खिलाफत आहे. इस्लाम धर्मातील सुन्नी पंथाच्या वहाबी/सलाफी विचारांच्या कट्टर अतिरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही संघटना प्रामुख्याने पश्चिम आशियातील इराक व सीरिया ह्या देशांमध्ये कार्यरत आहे.) 2015 मध्ये सीरियन असंतोषाचे आंतरराष्ट्रीयिकरण झाले असे म्हणता येईल. रशियाने असद सरकारची बाजू घेत ठिकठिकाणी  बंडखोरांविरुद्ध मदत म्हणून बॅाम्बहल्ले केले. यामुळे असद शासनाचे बळ वाढले आणि त्याचा हुरूपही वाढला. त्यांनी अलेप्पो शहर जिंकून घेतले. अलेपो हे सीरियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व अलेप्प्पो प्रांताची राजधानी आहे. आशिया व युरोपला जोडणाऱ्या रेशीम मार्गावरील अलेप्पो हे शेवटचे शहर आहे/होते. 2017 मध्ये अमेरिकेने कुर्दिशांच्या सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसना (पार्टीला) पाठिंबा दिला. त्यांनी रक्का हे शहर जिंकून घेतले. रक्का हे अलेप्पोच्या पूर्वेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर युफ्रेटिस नदीच्या उत्तर तीरावरील सीरियामधील एक शहर आहे. 2016 मध्ये असदच्या फौजांनी पूर्वेकडील घौटा आणि दारा हे प्रदेश जिंकून पश्चिम सीरिया आपल्या नियंत्रणाखाली आणला. पूर्वी असद यांच्या सैन्याने 21 ऑगस्ट 2013 च्या पहाटे घौटा  येथे रासायनिक हल्ला केला होता, म्हणून हे शहर जगाला प्रथम माहीत झाले होते. जॉर्डनच्या सीमेच्या उत्तरेस दारा या शहरी हौरान प्रदेशाची राजधानी आहे. 2020 मध्ये तुर्कस्तानने हस्तक्षेप करायला सुरवात केली. तुर्कस्तानचे वैर कुर्दिशांशी होते. तुर्कस्तानचे हल्ले सीरियाच्या कुर्दिशबहुल उत्तर भागापुरतेच मर्यादित होते. तुर्कस्तानमधील कुर्दिश लोकांचा सीरियातील कुर्दिश लोकांशी संपर्क होऊ नये, हा तुर्कस्तानचा हेतू होता. कारण हे दोन्ही प्रदेश एकत्र येऊन स्वतंत्र कुर्दिस्तान निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून होते. 2020 ते 2023 या काळात संघर्षाला काहीसा विराम मिळाला. डिसेंबर 2024 मध्ये बंडखोरांनी एकदम उचल खाल्ली. त्यांना हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) यांचे सक्रीय साह्य मिळाले. हयात तहरीर अल-शाम किंवा तहरीर अल-शाम ही एक सुन्नी इस्लामवादी राजकीय आणि सशस्त्र संघटना आहे. त्यांच्या साह्याने बंडखोरांनी अलेप्पो तर जिंकलेच, शिवाय होम्स आणि दमास्कसही जिंकून असद यांना पलायन करण्यास भाग पाडले. होम्स, हे पश्चिम सीरियामधील एक महत्त्वाचे शहर आहे ओरोंटेस नदीवर स्थित होम्स हे सीरियातील अन्य शहरांना जोडणारे  आणि भूमध्य सागरी किनाऱ्यावरील मध्यवर्ती शहरही आहे. दमास्कस ही सीरिया देशाची राजधानी आहे. दमास्कस हे मानवाने अखंडपणे वसाहत केलेले  जगातील सर्वांत जुने शहर आहे, असे मानतात.

सीरियात जे घडले ते समजून घ्यायचे असेल तर हा सर्व इतिहास समोर ठेऊनच विचार करावा लागतो. म्हणून हा तपशील महत्त्वाचा ठरतो. तो आज जगभर अभ्यासला जातो आहे. कारण सीरियाची कहाणी ही एक मुलखावेगळी कहाणी मानली जाते.


Monday, December 9, 2024

 29 वी हवामान बदल परिषद यशस्वी की अयशस्वी ?

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक १०/१२/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

29 वी हवामान बदल परिषद यशस्वी की अयशस्वी ?

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

  अझरबैजान हा  कॅस्पियन समुद्र आणि कॅाकेशस पर्वतरांगा यात वसलेला देश आहे. अझरबैजानची राजधानी असलेले बाकू हे एक मुलखावेगळेच शहर असून ते समुद्रसपाटीपेक्षा 28 मीटर म्हणजे 92 फूट खाली आहे.  जगातल्या दोनशे देशांची उष्णतामान वाढ आणि हवामानातील बदल या विषयीची 29 वी परिषद बाकू येथे 11नोव्हेंबर ते  22 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू होती. या परिषदेचे पूर्ण नाव ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (कॉप) असे आहे. सद्ध्या हवामान बदल या विषयावर जगभर संशोधन सुरू आहे. जगभरातील शास्त्रज्ञ, सरकारे, राजकीय नेते दरवर्षी एकत्र येऊन दोन आठवडे या प्रश्नावर चर्चा करीत असतात. यावरून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात यावे. हवामानात होत असलेले बदल हे आता केवळ बदल राहिले नसून त्यांना संकटाचे रूप प्राप्त झाले आहे. या संकटाचे निवारण कसे करता येईल यावर या परिषदेत विचारविनीमय केला जात असतो. 27 वी परिषद इजिप्तमधील शर्म-अल-शेख येथे आणि 28 वी परिषद संयुक्त अरब अमिरातीमधील  दुबई येथे पार पडली होती. या परिषदांना हजारोच्या संख्येत प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांचा हा आकडा नोंद घ्यावी, असाच आहे.

   ‘हवामान अर्थपुरवठा’ आणि ‘नुकसान निधी’ हे दोन मुद्दे ‘कॉप २९’ मध्ये अतिशय महत्त्वाचे ठरले आहेत. 2009 साली 

संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद, 7 ते 18 डिसेंबर दरम्यान डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील बेला सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. ही कोपनहेगन समिट म्हणून ओळखली जाते. या परिषदेत विकसित राष्ट्रांनी विकसनशील देशांना हवामान बदलाशी लढण्यासाठी निधी म्हणून दरवर्षी 100 अब्ज डॉलर द्यावेत, असे ठरले होते. 2015 मध्ये पॅरिस करार संमत करण्यात आला. यावेळी या योजनेला 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता 2024 मध्ये बाकू येथील कॅाप 29 मध्ये हवामान बदलावर नव्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. आता हवामान बदलामुळे जे देशांचे नुकसान होते आहे त्याचे निवारण करण्यासाठी नुकसान भरपाई निधीही उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी 661 दशलक्ष  डॅालरचे आश्वासन मिळाले असून ही जमेची बाजू आहे.

    हवामानबदलाबाबत जे काही करायचे ते या शतकाच्या शेवटाच्या आधी करावेच लागणार आहे. कारण 22 व्या शतकाच्या सुरवातीपासूनच हवामान बदलाचे स्वरूप एवढे भयंकर असेल की, परिणामांवर नियंत्रण मिळविणे अशक्यप्राय होईल. 1997 मध्ये कॅापची 3 री परिषद जपानमधील यमाशिरो प्रांतातील  क्योटो या शहरी झाली होती. या परिषदेत सकारात्मक निर्णय झाले होते. म्हणून ही परिषद विशेष महत्त्वाची मानली जाते. फ्रान्समधील पॅरिस येथे पार पडलेली 21वी परिषदही अशीच पथदर्शक मानली जाते. हरित वायूंमुळे तापमान वाढीचे परिणाम नक्की कसे होतील हे या परिषदांमध्ये विशद करण्यात आले होते. अतिपर्जन्यवृष्टी, त्यामुळे महापूर, कधी उष्णतेची लाट तर कधी थंडीचा कडाका, चक्रीवादळे आणि मुख्य म्हणजे समुद्राच्या पातळीत वाढ ही संकटे येतील अशी सावधगिरीची सूचना देण्यात आली होती. हे टाळायचे असेल तर उष्णतामानातील वाढ 1.5 अंश सेलसियसच्या आत राखावीच लागेल. समाधानाची बाब ही आहे की, या संकटाची गंभीर दखल घेण्यात आली आणि पुढे कॅाप 22 ते कॅाप 28 या कालखंडात म्हणजे 2016 ते 2023 या काळात काही भरीव कारवाईही झाली.


बाकू परिषदेत चर्चिले गेलेले काही मुद्दे असे आहेत. 

  हवामानबदलाचा परिणाम कमी करणे.   या नुसार हरित वायूंची निर्मिती एकदम थांबवता यायची नाही. पण सौर ऊर्जा किंवा वायू उर्जा निर्मितीचे प्रमाण वाढविता येणे सहज शक्य आहे. तसेच यांची कार्यक्षमताही वाढविता येऊ शकते. संयुक्त अरब अमिरातीमधील  दुबई येथे 13 ते 30 डिसेंबर 2023 या काळात पार पडलेल्या 28 व्या परिषदेत या मुद्यावर सहमती झाली होती. बाकू परिषदेत या दिशेने आणखी वेगाने प्रयत्न करण्याचे ठरले. 2100 पर्यंत उष्णतामानवाढ 1.5 अंश सेल्सियसने कमी करायचे ठरले आहे. यासाठी हे प्रयत्न पुरेसे पडणार नाहीत. 2050 पर्यंत ‘नेट झिरो’ हे उद्दिष्ट गाठायचे आहे. नेट झिरो म्हणजे जेवढी हरित वायूंची निर्मिती तेवढेच त्यांचे निरसन होय. तसेच कर्ब आणि खनिज व इतर तेले यांचा वापर कोणी किती कमी करायचा याबाबतही विचारविनीमय झाला.    

 जगात समुद्र किनारा असलेले, महासागरांनी वेढलेले अनेक लहानमोठे देश आहेत. उष्णतावाढीमुळे लहान देशांवर संकटे यायला सुरवातही झाली आहे. यांना आर्थिक मदत व सामना करण्यासंबंधीचे तंत्रज्ञान विकसित देशांनी पुरवावे, यावर बाकू परिषदेत एकमत झाले.

    हे साध्य करायचे तर पैसाच हवाच. पण विकसित देश मदत करायला नाखूष असतात, आज देतो उद्या देतो, असे म्हणत उशीर तरी करतात, नाहीतर पुरेशी मदत न करताच अंग काढून तरी घेतात. हे थांबले पाहिजे. जेमतेम 100 मिलियन डॅालरचा हवामान निधी (क्लायमेट फंड) 2020 मध्ये कसाबसा सुरू झाला. म्हणून एक नवीन फंड उभारण्यात आला. त्याला ‘लॅास अँड डॅमेज फंड’, असे नाव देण्यात आले. त्यात फक्त 800 दशलक्ष डॅालरच गोळा झाले. म्हणून आता 29 व्या बाकू परिषदेत फक्त पैसा गोळा करणे यावरच लक्ष केंद्रित करण्याचे ठरले आणि ‘न्यू कलेक्टिव क्वांटिफाइड गोल’ हा फंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पण हे केवळ शब्दांचे बुडबुडे ठरू नयेत.   

 कॉप परिषदेचा भाग मानली जाणारी संयुक्त राष्ट्रांची जैवविविधता परिषद (बायोडायव्हर्सिटी कॅान्फरन्स) संपन्न होत असते. या वर्षी   ही कोलंबियातील काली या शहरी 21ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2024 या काळात  पार पडली. यात जो विचार विनीमय झाला त्यातील निष्कर्ष चिंताजनक आहेत. यानुसार अ) येत्या काही दशकात दहा लाख प्रजाती नष्ट होतील. ब) कोट्यवधी हेक्टर जंगल दर वर्षी नाहीसे होत जाईल. तसेच 7 व 8 जून 2024 मध्ये महासागर परिषद इटलीतील व्हेनिस येथे पार पडली. 

  कॅाप 27 इजिप्तमध्ये, कॅाप 28 संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणि   कॅाप 29 अझरबैजान आयोजित होती. या तिन्ही देशात लोकशाही नाही, तिथे हुकुमशाही आहे.  संयुक्त अरब अमिरात आणि   अझरबैजान हे खनिज तेल आणि वायूचे उत्पादन करणारे देश आहेत. या दोन देशातच जगातील एकचतुर्थांश तेलाचे उत्पादन होते. तेलाचे उत्पादन कमी करा, असा आग्रह धरणाऱ्या कॅापचे शिखर संमेलन या दोन प्रचंड तेल उत्पादक  देशात संपन्न व्हावे, हा फार मोठा विनोदच म्हटला पाहिजे. तसेच हवामान बदल वगैरे सर्व बकवास आहे, ‘डिग बेबी डिग’ म्हणजे अधिकाधिक तेलविहिरी खोदा म्हणून प्रचार करणारे डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत. अशा परिस्थितीत अझरबैजानमध्ये पार पडलेली बाकू परिषद जेमतेम यशस्वी झाली असेच म्हणावे लागते.


Monday, December 2, 2024

 


कॅनडात खलिस्तान्यांची एवढी वरवर का?

(उत्तरार्ध)

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ०३/१२/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

कॅनडात खलिस्तान्यांची एवढी वरवर का?

(उत्तरार्ध)

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 

022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

कॅनडामध्ये चार भारतीय नागरिकांवर हरदीप सिंग  निज्जरच्या हत्येशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. करण ब्रार, आमंदीप सिंग, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग अशी या चार आरोपींची नावे आहेत. अशा प्रकरणी काही प्राथमिक स्वरुपाचे टप्पे पार पाडायचे असतात. यामुळे आरोपींवर  ठेवण्यात आलेले आरोप ज्या साक्षीदारांच्या कथनावर आधारित असतात त्यांची उलटतपासणी करण्याची संधी  आरोपींच्या वकिलांना मिळत असते. ही संधी न देता एकदम वरिष्ठ न्यायालयातच खटल्यालाच प्रारंभ केला जाणार आहे. हे सर्व खलिस्तान्यांना खूष करण्यासाठी केले जात आहे.

    कॅनडामध्ये खलिस्तान्यांची एवढी वरवर का केली जाते, हा प्रश्न भारतात सर्वसाधारण नागरिकाला पडणे सहाजीक  आहे. याबाबत कॅनेडियन राजकारण्यांचे म्हणणे असे आहे की, ‘वैशाखी’ सारख्या सणासुदीच्या दिवशी जेव्हा आम्ही लाखावर लोक एकत्र आलेले पाहतो तेव्हा त्यांची मते आपल्याला मिळावी म्हणून त्यांच्याशी जवळीक साधावी असाच विचार कोणताही  राजकारणी करील. त्यांना दुखावणे व त्यांची मते गमावणे आमच्यासाठी शहाणपणाचे ठरणार नाही.



  काही शिखांच्या अतिरेकी विचारसरणीची आणि खलिस्तानप्रश्नी त्यांनी केलेल्या कारवायांची माहिती कॅनडाप्रशासनाला नव्हती, असे नाही. सुरवातीच्या शासकीय अहवालात ‘शिखांचा अतिरेकी व्यवहार, ‘खलिस्तानी कारवाया’, असे शब्दप्रयोग असत सुद्धा! 

   पुढेपुढे मात्र हे शब्द वगळले जाऊ लागले. त्यावेळचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या अनुल्लेखावर टीका केली होती, याची आठवण अनेकांना असेलही. याशिवाय अमरिंदर सिंग यांनी स्वत: कॅनडाच्या पंतप्रधानांच्या हाती, म्हणजे खुद्द ट्रुडो यांच्या हाती, कॅनडातील शीख अतिरेक्यांची तपशीलवार यादीही सोपविली होती. मुख्य असे की या यादीत हरदीप सिंग निज्जर याचेही नाव होते.

   कॅनेडियन शासनाच्या आजकालच्या प्रकटनांमध्ये, ‘अतिरेक (एक्स्ट्रिमिझम) हा शब्दप्रयोग एखाद्या समुदायाच्या बाबतीत करणे योग्य ठरणार नाही. ती एक वृत्ती आहे, ते एक तत्त्वज्ञान (आयडिऑलॉजी) आहे. त्या तत्त्वज्ञानाचा विरोध व्हावा, एखाद्या समुदायाचा नाही’, अशी भूमिका घेतली जातांना का दिसते, या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. कॅनडात 13 एप्रिल 2024 ला  ‘खालसा दिन’(खालसा  पंथाचा स्थापना दिवस), साजरा झाला. त्याला पंतप्रधान ट्रुडो आणि विरोधी पक्ष नेतेही उपस्थित होते. याबाबत आक्षेप असण्याचे कारण नाही पण यावेळी त्यांच्या उपस्थितीत खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या होत्या. म्हणून भारतातील कॅनडाच्या डेप्युटी हायकमीश्नरांना बोलवून भारताने याबाबतचा आपला निषेध नोंदवला होता.



 2025 मध्ये कॅनडात सार्वत्रिक निवडणुका आहेत. मात्र, परिस्थिती ट्रुडो यांना अनुकूल नाही. महागाई, बेरोजगारी, आरोग्य यंत्रणेची दुरवस्था आदी अनेक कारणांमुळे मतदार नाराज आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि हुजूर पक्षाचे नेते पियर पॉलिव्हर यांनी कल चाचण्यांत टुडो यांच्यावर आघाडी घेतली आहे. टुडो यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाने निवडणूक लढविल्यास सत्ता मिळणार नाही, असा आरोप करून त्यांच्याच पक्षातील नेते त्यांचा राजीनामा मागत आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रुडो वेगवेगळ्या समाज घटकांना आपल्या बाजूने वळवण्याच्या खटपटीत आहेत. कॅनडात साडेसात लाखांहून अधिक असलेल्या शीख समाजाची एकगठ्ठा मते टिकून राहावीत, यासाठी ट्रुडो यांची धडपड सुरू आहे. त्यातच जगमित सिंग धालीवाल यांच्या 'न्यू डेमोक्रेटिक' पक्षाने टूडो यांच्या लिबरल पक्षाचा पाठिंबा काढून घेतला आहे. भारतात खलिस्तान्यांविरुद्ध सरकारने सुरू केलेल्या मोहिमेनंतर अनेक खलिस्तान्यांनी कॅनडात आश्रय घेतला आहे. त्यातले अनेक जगमीतचे मतदार आहेत. खुद्द टुडो यांच्या मतदारसंघातही अनेक शीख मतदार आहेत. त्यांची मर्जी राखण्यासाठी टूडोंनी त्यांच्या देशात खलिस्तान्यांना मोकाट तर सोडले आहेच, पण ते त्यांच्या वतीने भारतावर आरोप करीत असतात. त्यातूनच निज्जर प्रकरणात ते भारतावर आरोप करीत आहेत. निज्जर हत्या प्रकरणाचा संबंध भारताशी जोडून  टुडो यांनी खलिस्तानवाद्यांना चुचकारण्याचा प्रयत्न चालविला आहे. ट्रुडो यांचे वडील पियर ट्रुडो यांनीही आपल्या कार्यकाळात हेच राजकारण केले होते. खलिस्तानींचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांनी भारताशी वितुष्ट घेतले. त्यानंतर आता पुन्हा दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. ट्रुडो यांना 'जशास तसे' उत्तर तर द्यायलाच हवे. ट्रुडो म्हणजे कॅनडा नाही, हे विसरून चालणार नाही.  

  कॅनडात मारल्या गेलेल्या मूळच्या भारतीय नागरिक असलेल्या हरदीपसिंग निज्जरवर भारतामध्ये 9 खटले प्रलंबित आहेत. भारताच्या नॅशनल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सीने कॅनडा शासनाकडे त्याच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत पाठविण्याची विनंती केली होती. हे प्रमाणपत्र भारततील खटल्यातील पुढील कारवाईसाठी आवश्यक होते. पण ही विनंती मान्य न करता कॅनेडियन अधिकाऱ्यांनी काही प्रतिप्रश्न उपस्थित केले आहेत आणि उलट विचारले आहे की, आमच्या नागरिकाच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राची प्रत भारताने का मागावी?

   प्रत्यार्पणासाठी भारताने पाठवलेल्या 26 पैकी फक्त पाच विनंत्याच कॅनडाने मार्गी लावल्या. बाकीच्या प्रलंबित आहेत,

   भारताच्या नॅशनल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सीने इंटरपोलकडे गुरवंत सिंग पन्नून विरुद्ध रेडकॅार्नर नोटिस जारी करण्याची मागणीही केली आहे. गुरवंत सिंग पन्नून हा खलिस्तानी दहशतवादी अमेरिकेचा नागरिक आहे. नॅशनल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सीला 6 गुन्ह्यांच्या संदर्भात त्याची चौकशी करायची आहे. ह्या प्रश्नीही अजून काहीही घडले नाही. गुरवंत सिंग पन्नूनला न्यूयॅार्क येथे मारण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकणातही भारतीय अधिकाऱ्याचा संबंध आहे, असे अमेरिकन शासनाचे मत आहे. गेल्या आठवड्यात विकास यादव या भारतीय रिसर्च अॅंड अॅनलिसिस विंगच्या माजी अधिकाऱ्याचा हात आहे, असा आरोप अमेरिकेने केला आहे.

  भारताचे अधिकारी कॅनडामध्ये गुन्हेगारी कारवायात गुंतले आहेत, ही माहिती आम्ही अगोदर जनतेला न सांगता  वॅाशिंगटन पोस्टच्या वार्ताहराला दिल्याचे कॅनडाने मान्य केले आहे. दुसऱ्या बाजूकडून (भारताकडून) प्रसारित झालेल्या वृत्ताला उत्तर म्हणून आम्ही असे केले, असेही  लंगडे स्पष्टीकरण कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. कॅनडा जवळचे पुरावे क्षुल्लक, कमकुवत आणि हास्यास्पद आहेत, असे असतांना त्यांनी भारताच्या गृहमंत्र्यांवर आरोप करावेत हा यामागचा अत्यंत नीच हेतू आहे, असे भारतीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

  जोपर्यंत थेट पुरावे मिळत नाहीत (आणि ते नसल्यामुळे मिळणारही नाहीत), तोपर्यंत या प्रकरणात फार काही होणार नाही कॅनडात पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संसदीय निवडणुका आहेत. तोपर्यंत टूडो हे प्रकरण लावून धरतील नंतरचे निवडणूक निकालावर अवलंबून राहील. पन्नू प्रकरणात भारताने चौकशी समिती नेमून अमेरिकेचे काहीसे समाधान केले आहे. अमेरिकेतील निवडणूक झाल्यानंतर नवीन  सरकार आले आहे. त्याच्याशी वाटाघाटी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल. पण एक गोष्ट नक्की की, या प्रकरणांवरून मतपेटीच्या राजकारणासाठी भारताशी संबंध बिघडवणे कॅनडा किंवा अमेरिका यांना परवडणारे नाही. सर्व संबंधितांना काहीना काही मार्ग शोधावाच लागेल.



  2015 पासून ट्रुडो सरकार कॅनडात सत्तेवर आहे. 2025मध्ये कॅनडात सार्वत्रिक निवडणुका आहेत. ट्रुडो यांच्या लिबरल पार्टीला असलेला जनाधार दिवसेदिवस घसरत चालला आहे. शिखांची मनधरणी करूनही त्यांच्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या शिखांची संख्याही रोडावतच चालली आहे. एवढी वरवर करूनही शिखांचा एकमुखी पाठिंबा मिळविण्याचा मूळ हेतू साध्य होईल?



Monday, November 25, 2024

 कॅनडात खलिस्तान्यांचीएवढी वरवर का? (पूर्वार्ध)

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक२६/११/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

कॅनडात खलिस्तान्यांची एवढी वरवर का?  (पूर्वार्ध)


    कॅनडामधील खलिस्तानवादी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या कटाची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना माहिती होती, असा दावा करणारे कॅनडाच्या प्रसारमाध्यमांतील वृत्त म्हणजे मानहननाच्या मोहिमेचा भाग असून यामुळे दोन देशांतील आधीच ताणलेले संबंध अधिकच दुरावतील,' असा इशारा भारताने कॅनडाला दिला आहे. त्यानंतर पंतप्रधान ट्रुडो यांनी असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही असा खुलासा केला आहे.

   कॅनडातील शीख

 कॅनडाची आजची लोकसंख्या सुमारे  3 कोटी 82 लाख असून यात 2 कोटी 74 लाख मतदार आहेत.  कॅनडा मुळात बहुसांस्कृतिक आणि सर्वसमावेशकता असलेला देश आहे. म्हणून लोक या देशात नोकरी, शिक्षण आणि व्यवसाय या निमित्त स्थायिक होण्यास उत्सुक असतात. भारतातील शीख, गुजराथी, पंजाबी आदी भाषक लोक मोठ्या संख्येत कॅनडात स्थायिक झाले आहेत.

  कॅनडात तशी शिखांची  लोकसंख्या  8 लाखच आहे. पण ती तीन प्रांतातच आणि काही विशिष्ट शहरात किंवा मतदारसंघातच केंद्रित झालेली आहे. त्यामुळे त्या त्या ठिकाणी शिखांच्या जबरदस्त मतपेढ्या उभ्या झाल्या आहेत.

  जसे की ऑंटेरिओ प्रांतात 3 लाख, ब्रिटिश कोलंबियामध्ये 2 लाख 90 हजार, शीख वसलेले आहेत. आज कॅनडात 2% शीख राहतात. पण मोजक्या जागी भरपूर शीखसमुदाय हे आजच्या कॅनडाचे स्वरूप आहे, हे लक्षात घेतले की, कॅनडात शिखांचा एवढा प्रभाव का आहे, याचे आश्चर्य वाटणार नाही. 

  कॅनडातील पार्लमेंटमध्ये 338 जागा आहेत. म्हणजे बहुमतासाठी 170 जागा हव्यात. सद्ध्या कॅनडात जस्टिन ट्रुडो यांचा लिबरल पार्टीच्या159 जागा) आणि खलिस्तानचा कट्टर समर्थक असलेल्या जगमीत सिंग यांचा न्यू डेमोक्रॅटिक पार्टीच्या 25 जागा मिळून एकूण 184 जागांसह सत्तेत आहे. पण जगमीत सिंग यांनी न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचा ट्रुडो सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतल्याचे वृत्त आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी कॅनडाची आत्ताची कवायत सुरू आहे, असे मानतात. 

    पक्षीय बलाबल 

   कॅनडातील पार्लमेंटमध्ये पक्षीय बलाबल असे आहे. एकूण जागा 338 आहे.

जस्टिन ट्रुडो यांचा लिबरल पार्टीजवळ  159 जागा व (32.62% मते) आहेत. हा जुना, उदारमतवादी, डावीकडे झुकलेला पक्ष मानला जातो. सद्ध्या हाच प्रमुख शीखधार्जिणा पक्ष आहे.

     2) एरिन ओ टूल यांच्या कॅानझर्व्हेटिव्ह पार्टीजवळ 119 जागा व (33.7%मते) आहेत. हा उजवीकडे झुकलेला  विरोधी पक्ष आहे.

  3) इव-फ्रान्स्वा ब्रॅांकॅाईस ब्लांचेट यांचा ब्लॅाक क्युबेकॅाईस पार्टी हा पक्ष  33 जागा व  7.64% बाळगून आहे. हा एकेकाळी फुटिरतावादी पक्ष होता, आता मात्र याची भूमिका प्रादेशिक स्वायत्ततावादी पक्षाची आहे.

     4) जगमीत सिंग (डाव्या विचारसरणीचे, खलिस्तानवादी व फौजदारी वकिल) यांचा  न्यू डेमोक्रॅटिक पार्टी मुळातला सर्वसमावेशक आणि लिबरल पार्टीला मदत करणारा पक्ष होता, पण सद्ध्या खलिस्तानी शीखांच्या वर्चस्वाखाली असून  25 जागा  17.63 %मते यासह खलिस्तानचा समर्थक आहे.

     5) ॲनॅामी पॅाल/ एलिझाबेथ मे यांचा पर्यावरणवादी ग्रीन पार्टी 2 जागा आणि 2.33% मते मिळवून कसाबसा टिकून आहे.


 भारताने जबरदस्त पाऊल

  भारताने कॅनडाच्या भारतातील 6 अधिकाऱ्यांना (डिप्लोमॅट)  भारत सोडून जाण्याचा आदेश (एक्सपेल) 14 ऑक्टोबर 2024 ला दिला. हे अधिकारी व त्यांची पदे अशी आहेत. 1) स्टीवर्ट रॅास व्हीलर, कार्यवाहक (अॅक्टिंग) हाय कमीश्नर, 2) पॅट्रिक हेबर्ट, डेप्युटी हायकमीश्नर 3) मारी कॅधरिन ज्योली,  फर्स्ट सेक्रेटरी 4) इयान रॅास डेव्हिड ट्राईट, फर्स्ट सेक्रेटरी 5) अॅडम जेम्स च्युइप्का, फर्स्ट सेक्रेटरी 6) पॅाला ओर्ज्युला,  फर्स्ट सेक्रेटरी. यातील पदांचा उल्लेख यासाठी महत्त्वाचा ठरतो की, त्यावरून भारताने केवढे मोठे आणि जबरदस्त पाऊल उचलले आहे, ते जाणवावे. सामान्यत: युद्धजन्य परिस्थितीतच असे पाऊल उचलले जाते.

   या अगोदर कॅनडाने भारतानचे  कॅनडात नेमलेले वरिष्ठ अधिकारी, कॅनडाचा नागरिक असलेल्या एका खलिस्तानवादी कार्यकर्त्याच्या, म्हणजे हरदीपसिंग निज्जर  याच्या, हत्येत सामील असल्याचा आरोप केला होता. हे पाहून भारताने आपले कॅनडातील हायकमीश्नर  संजयकुमार वर्मा यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांना परत बोलवून घेतले आहे आणि उत्तरादाखल कॅनडाच्या 6 अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्यास सांगितले आहे.

   मतपेढीच्या राजकारणाला बळी पडून कॅनडा शासनाने हा हत्येबाबतचा हास्यास्पद आरोप केला आहे. अशाप्रकारचे आरोप करून शिखांची मते मिळविण्याचा हा प्रयत्न आहे, हे स्पष्ट आहे. कॅनडा सरकारचे अस्तित्वच अशा पक्षाच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे की, ज्या पक्षाचे नेते  भारतातील फुटिरतावाद्यांशी संबंध ठेवून आहेत.

    19 व्या शतकाच्या उत्तरार्धात शिखांनी कॅनडामध्ये स्थलांतर करायला सुरवात केली. आज कॅनडात 2% शीख आहेत. खलिस्तान्यांवर भारतात कारवाईला सुरवात करताच त्या शिखांनी कॅनडात जायला वेगाने सुरवात केली. यांनीच खलिस्तानच्या प्रश्नावर जगाचे लक्ष प्रथम वेधून घेण्यास तेव्हाच खऱ्या अर्थाने सुरवात केली होती.

    आज खलिस्तानचा मुद्दा न भारतात महत्त्वाचा आहे न कॅनडात. शिखांची संख्या लक्षात घेऊन ट्रुडो यांच्या पक्षाने त्यांना चुचकारण्यास सुरवात केली व शिखांना खूष करून त्यांची मतपेढी आपल्या पक्षाकडे वळविण्यासाठी त्यांच्या मागण्या एकापाठोपाठ एक  मान्य करण्यास प्रारंभ केला. 2001 ते 2021 या अल्पकालावधीत शिखांची कॅनडातील टक्केवारी 0.9% वरून वाढत 2.1 % पर्यंत पोचली.

  1993 मध्ये पंजाबात जन्मलेला गुरुबक्ष सिंग माल्ही हा पहिला शीख कॅनेडियन नागरिक लिबरल पार्टीच्या तिकिटावर पार्लमेंटवर निवडून आला. तर 2021 मध्ये 21 शीख पार्लमेंटवर निवडून गेलेआहेत.

   आजची न्यू डेमोक्रॅटिक पार्टी 

  आतापर्यंत न्यू डेमोक्रॅटिक पार्टी हा मध्यममार्गी पण डावीकडे झुकलेला पक्ष ट्रुडो सरकारला पाठिंबा देत होता. पुढे या पक्षाचा नेता जगमीत सिंग याने खलिस्तानच्या मागणीला उघड उघड पाठिंबा देणे सुरू केले. 2004 पासून शिखांचा कॅनडाच्या राजकारणात प्रभाव वाढतांना पहिल्यांदा कॅनडाच्या वृत्तसृष्टीला जाणवू लागले. कॅनडातील उदारमतवादी पक्ष स्थलांतरितांच्यांच्या बाजूचे आहेत. त्यांची मते आपल्यालाही मिळावीत या हेतूने उदारमतवादी पक्षांचे अनुकरण करीत कॅनडातील कॅान्झर्व्हेटिव्ह पक्षानेही शिखांना चुचकारण्यास सुरवात केली आहे. सद्ध्या केवळ शीखच नव्हेत तर सर्वच स्थलांतरित कॅनडाच्या राजकारणात सहभागी होऊ लागले आहेत. त्यांचा एक प्रभावी गट निर्माण होत चालला आहे. आपल्यालाही कॅनडाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे असे त्यांनाही वाटू लागले आहे.        

 धर्मानुसार कॅनडातील लोकसंख्येचे विभाजन असे आहे. ख्रिश्चन 53.3%, कोणताही धर्म न मानणारे 34.6%, मुस्लीम 4.9 %, हिंदू 2.3% , शीख 2.1% , बौद्ध 1% , ज्यू 0.9%, अन्य 0.8%. म्हणजे शीख धर्म हा कॅनडातील चौथा सर्वात मोठा धार्मिक गट आहे. कॅनडातील शीख समुदाय गुरुद्वारांच्या माध्यमातून स्थानिकांना आणि अन्य संघटनांना मदत करू लागले. या विषयाबाबत स्थानिकांसाठीचे कायदे कॅनडात स्थलांतरितांच्या कायद्यांचे तुलनेत अधिक कडक आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणेतर समुदायही सहाजीकच त्यांच्याशी अधिकाधिक जवळीक साधू लागले आहेत.


Monday, November 18, 2024

 अमेरिकेतील एकतर्फी निवडणुकीचे वेगळेपण

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक 19/11/2024 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.  

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?    


   अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीची होईल हा राजकीय निरीक्षकांनी वर्तवलेला अंदाज साफ चुकीचा ठरला.  डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राज्यांमध्ये जोरदार मुसंडी मारली. याला  पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, व्हिस्कॉन्सिन आदी  बेभरवशाची राज्येही (स्विंग स्टेट्स) अपवाद ठरली नाहीत. या राज्यांची इलेक्टोरल मते निर्णायक ठरली. डोनाल्ड ट्रंप यांच्यासारखे पुनरागमन  अमेरिकेत गेल्या अनेक वर्षात पहायला मिळाले नव्हते.

  तिहेरी विजय 

   रिपब्लिकन पक्षाने अध्यक्षपद जिंकले आहे. सिनेटमध्येही 100 पैकी 53 जागा (पण सुपरमेजॅारिटीला 7 कमी) रिपब्लिकन पक्षाकडे आहेत. 435 सदस्य संख्या असलेल्या हाऊसच्या निवडणूकीतही सद्ध्याच 435 पैकी 218 जागा, म्हणजे बहुमत, रिपब्लिकन पक्षाला मिळाले आहे. शिवाय अजून 9 जागांचे निकाल यायचे आहेत.  रिपब्लिकन पक्षाचे हे तिहेरी यश असणार आहे. मात्र सिनेटमध्ये अनेक प्रश्नी सुपरमेजॅारिटी (60% मते) ठरावाच्या बाजूने असेल  तरच तो ठराव पारित होतो. ही उणीव शिल्लक आहे. यापूर्वी रिपब्लिकन पक्षाला 28 जानेवारी 2017 ते 3 जानेवारी 2019 या काळात तिहेरी यश मिळाले होते तर डेमोक्रॅट पक्षाला 20 जानेवारी 2021 ते 3 जानेवारी 2023 या काळात तिहेरी यश मिळाले होते. याही अगोदर डिसेंबर 1932 ते 1946 या काळात तिहेरी यशाचा विक्रम डेमोक्रॅट  फ्रॅंकलीन रुझवेल्ट व हॅरी ट्रुमन यांच्या नावे आहे. तर 1897 ते 1911 या काळात रिपब्लिकन पक्षाचा असाच विक्रम विल्यम मॅकिन्ले, थिओडॅार रुझवेल्ट व विल्यम टॅफ्ट यांच्या नावे होता, अशी नोंद आहे. तिहेरी यश असेल तर त्या पक्षाला निर्वेधपणे आपला कार्यक्रम राबवता येतो. सनातनी विचारांचे 6 न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात आहेत. एकूण  9 तहाहयात न्यायाधीशांपैकी 6 हीही सुपरमेजॅारिटीच आहे. आत्तापर्यंत 14.5 कोटी म्हणजे 93.5 % टक्के मतांची मोजणी झाली आहे. डेमोक्रॅट  पक्षाला 7.1 कोटी म्हणजे 48 टक्के मते मिळाली आहेत आणि रिपब्लिकन पक्षाला 7.5 कोटी म्हणजे 50.5  टक्के मते मिळाली आहेत.

  7 स्विंग स्टेट्समधील एकूण 93 इलेक्टोरल व्होट्स आणि  रिपब्लिकन  पक्षाच्या बढतीची टक्केवारी  अशी  आहे. (1)अॅरिझोना-11जागा बढत 6.2%  (2) जॅार्जिया-16, बढत 2.2% (3)मिशिगन 15जागा, बढत 1.4 % 4) नेवाडा 6 जागा बढत 3.2 % (5) नॅार्थ कॅरोलिना 16 जागा बढत 3.4 %  (6)पेन्सिलव्हॅनिया 19 जागा बढत 2.1%  (7) व्हिस्कॅान्सिन 10 जागा बढत 0.8% . अमेरिकेतील बहुतेक राज्यात 2020 च्या तुलनेत 2024 मध्ये रिपब्लिकन पक्षाला जास्त मते मिळालेली दिसतात. अशाप्रकारे यावेळी संपूर्ण देशातच रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने एक लहर निर्माण झाली होती. 

पत्नी प्रचारापासून दूर का?

  ट्रम्प यांनी स्थलांतरितांच्या मुद्दा अतिशय चतुराईने हाताळला. त्यांची पत्नी स्वत: इटलीतून आलेली स्थलांतरित आहे. ट्रंप यांनी तिला प्रचारात उतरवलेच नाही. तशात हॅरिस यांचे स्वतःचे स्थलांतरित व गौरेतर असणे ही तर  ट्रम्प यांच्यासाठी अतिशय सोयीची बाब ठरली.  ट्रंप यांच्या प्रचाराची दिशा अशी होती. बाहेरून येणारे अमेरिकेत  सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण करीत आहेत, ते ‘इथल्यांचे’ रोजगार घेतात, ‘इथल्यांच्या’ पाळीव  प्राण्यांना मारून खातात, ते कर भरत नाहीत, बेकायदेशीर राहूनही सगळ्या सोयीसुविधांचा लाभ घेतात.  डेमोक्रॅटिक सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास भूमिपुत्रांची गळचेपी होईल, हे ट्रंप यांनी मतदारांच्या मनावर बिंबवले. पण आजचे अमेरिकन गोरे हेही भूमिपुत्र ठरत नाहीत, तेही स्थलांतरीतच आहेत, हा मुद्दा उपस्थित करायला  मूळ भूमिपुत्रांना  आजच्या गोऱ्या अमेरिकनांनी शिल्लकच ठेवलेले नाही. त्यामुळे हा मुद्दा कोण उपस्थित करणार? या मुद्द्यांचा पारपंरिक रिपब्लिकन मतदारांवरच नव्हे, तर तरुण मतदारांवरही परिणाम झाला. 

2024 च्या निवडणुकीतील नोंद घेतलीच पाहिजे, असे मुद्दे 

1) 50 पैकी 31 राज्ये ट्रंप यांच्या बाजूने. 2)  डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने  19 राज्ये. 3) रिपब्लिकन पक्षाला 7 कोटी 46 लाख पॅाप्युलर व्होट्स आणि 312 इलेक्टोरल व्होट्स तर डेमोक्रॅट पक्षाला  7 कोटी 9 लाख पॅाप्युलर व्होट्स  आणि 226 इलेक्टोरल व्होट्स. 4) 24 वर्षानंतर सातही स्विंग स्टेट्स पहिल्यांदाच रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने. 5)  डोनाल्ड ट्रंप यांचा  प्रति मतदार खर्च कमला हॅरिस यांच्या प्रति मतदार खर्चापेक्षा 8 डॅालरने कमी.  6) अध्यक्षपदी आरूढ होताना डोनाल्ड ट्रंप यांचे वय 78 वर्षे 219 दिवस इतके असेल. म्हणजे डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेचे सर्वात ज्येष्ठ अध्यक्ष असतील.7) डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेचे 45 आणि 47 वे अध्यक्ष असतील. कारण 46 वे अध्यक्ष ज्यो बायडेन असणार आहेत. यापूर्वी ग्रोव्हर क्लिनलंड हे 22 वे आणि 24 वे अध्यक्ष 1885 ते 1889 आणि 1893 ते 1897 या काळात होते. 😎 डोनाल्ड ट्रंप एलॅान मस्कवर जाम खूष आहेत, एवढी अभूतपूर्व कामगिरी त्यांनी या निवडणुकीत पार पाडली आहे. 9) ‘मी अमेरिकनांवरील कर्जाबरोबर  करही  कमी करीन’, डोनाल्ड ट्रंप 10) ‘माझे उपाध्यक्षपदाचे साथीदार जे डी व्हान्स आणि त्यांची भारतीय सौंदर्यवती पत्नी उषा’, हे एक अपूर्व जोडपे आहे, इति ट्रंप 11). ‘मी युद्धे थांबवणारा अध्यक्ष सिद्ध होईन’.12) ट्रंप यांना विजयाबद्दल अभिनंदन करणारे संदेश देशभरातून आणि जगभरातून आले आहेत. वैर विसरून शी जिनपिंग यांनी पाठविलेल्या अभिनंदनपर संदेशात ते म्हणतात, ‘दोन्ही देशांनी संवाद करावा, मतभेदाचे योग्य व्यवस्थापन करावे, परस्पर सहकार्य वाढवावे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम केले तर नक्कीच फायदा होईल’.13) अमेरिकेच्या डेमोक्रॅट अध्यक्षांपेक्षा रिपब्लिकन अध्यक्षांचेच भारताशी अधिक स्नेहाचे संबंध राहिलेले आहेत. कमला हॅरिस तशा भारतीय असतीलही पण त्या आपला आफ्रिकन वारसाच अधिक उघडपणे सांगत आल्या आहेत. त्या पाकिस्तानधार्जिण्या असून त्यांची काश्मीरविषयक भूमिका पाकिस्तानला अनुकूल राहिलेली आहे.

डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने अमेरिकेत लहर का निर्माण झाली?

1)  ज्यो बायडेन भडकलेल्या महागाईला आवर घालू शकले नाहीत. 2) अमेरिकेतील  घुसखोरी मी थांबविणारच, ट्रंप यांचा निर्धार. 3) ‘ट्रंप आपला माणूस आहे’, सामान्य अमेरिकन पुरुषांचे मत. 4) ‘अमेरिका हा उजव्या गोऱ्या ख्रिश्चनांचाच देश राहिला पाहिजे’. 5) इव्हॅन्जिअलिस्ट या ख्रिश्चनांमधील सनातनी, कर्मठ, रुढीवादी व परंपरानिष्ठ मतदारांच्या प्रभावी गटाने ट्रंप यांच्या गर्भपात आणि समलिंगीविवाहविरोधी मतामुळे  प्रभावित होऊन दिलेली ‘एक गठ्ठा’ मते. 6) कोण ‘कमला हॅरिस तर ती अर्धी एशियन-आफ्रिकन’, ती आपली नाही, त्यातही ती महिला’, सामान्य गोऱ्या अमेरिकन पुरुषांचे मत! असेच मत अनेक महिलांचेही होते!! आता बोला!!!





Monday, November 11, 2024

 ब्रिक्स शिखर परिषदेने काय साधले? 

(उत्तरार्ध)

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक १२/११/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

   'ब्रिक्स'चे चलन सुरू करण्याबाबतही शिखर परिषदेत चर्चा झाली. रशिया आणि चीन सारख्या देशांनी अमेरिकन डॉलरचे वर्चस्व रोखण्यासाठी पर्यायी जागतिक वित्तीय व तांत्रिक प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न केला  याला डी-डॉलरायझेशन अजेंडा असे म्हटले जाते. त्याचवेळी, अमेरिकन डॉलरला लक्ष्य करणार नसल्याची भारताची भूमिका राहिली आहे. डॉलरवरील अवलंबित्व संपवण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे भारताने स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ब्रिक्स चलनाबद्दल आपली अनुकूलता दर्शविली होती. यामुळे चीन खूष झाला होता.  पण यावेळी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपली भूमिका बदलत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मताशी सहमती दाखविली आणि ब्रिक्स देशांनी स्वत:चे चलन सुरू करण्याची वेळ अद्याप आलेली नाही, असे म्हटले. आतापर्यंत रशिया आणि चीन सारख्या देशांनी अमेरिकन डॉलरचे वर्चस्व रोखण्यासाठी पर्यायी जागतिक वित्तीय व तांत्रिक प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी पुतिन यांनी मोदींच्या सुरात सूर मिळवल्यामुळे चीनसमोर गप्प बसण्यावाचून दुसरा मार्ग उरलेला नाही. 

 यंदापासून म्हणजे 2024 पासून इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचाही 'ब्रिक्स' मध्ये समावेश होतो आहे. यातील बहुतेक देशांशी भारताचे निकटचे संबंध आहेतं. अरब व आफ्रिकी देशांसाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. जागतिक पातळीवर दबावगट म्हणून 'ब्रिक्स'चा प्रभाव या समावेशामुळे वाढण्याची अपेक्षा असून भारतासह अनेक देशांना अभिप्रेत असलेली 'बहुध्रुवीय' रचना साकारण्याच्या दृष्टीने ब्रिक्समध्ये आणखी देश समाविष्ट होण्याची आवश्यकता आहे. अनेक देशांना (36) ब्रिक्समध्ये सहभागी व्हायचेही आहे. पण त्याच्यासाठी सहमतीची आवश्यकता असते.  

पाकिस्तानला नकार

 ब्रिक्समध्ये पाकिस्तानला सामील करून घ्यावे, अशी चीनची इच्छा आहे, या प्रस्तावाला रशियाचाही दुजोरा होता तर पाकिस्तानात जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे, तोपर्यंत त्याला ब्रिक्समध्ये प्रवेश नको, अशी भारताची भूमिका होती. यंदाही पाकिस्तानला ब्रिक्समध्ये प्रववेश माळाला नाही. 

 दुसरीकडे, तुर्कस्तानचा मात्र या भागीदार देशांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानने गेल्या वर्षी ब्रिक्स सदस्यत्वासाठी औपचारिक अर्ज केला होता. ब्रिक्समध्ये पाकिस्तानचा समावेश करण्याचे आश्वासन चीनने दिले होते, पण ब्रिक्सच्या भागीदार देशांच्या यादीतही पाकिस्तानला स्थान मिळाले नाही. ब्रिक्समध्ये पाकिस्तानचा समावेश करण्याला चीन आणि रशियाने पाठिंबा दिला होता. पण, पाकिस्तानच्या ब्रिक्समधील प्रवेशावर भारत समाधानी नव्हता, त्यामुळे सहमतीअभावी यंदाही पाकिस्तानचा ब्रिक्समध्ये समावेश करण्यात आलेला नाही. 

सर्वप्रकारचा दहशतवाद संपणे आवश्यक  

  दहशतवादाबाबत सर्वांनी एकमुखी भूमिका घ्यायला हवी, याबाबत दुटप्पीपणा चालणार नाही, अशी ठाम भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. त्यांचा रोख मुख्यत: चीनकडे होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे मसूद पेड़ेश्कियान यांच्यासह ब्रिक्स गटातील इतर देशांचे नेते परिषदेला उपस्थित होते. केवळ दहशतवादविरोधी भूमिका घेऊन चालणार नाही तर युवकांना कट्टरतावादाकडे नेण्याच्या प्रकाराविरोधात सक्रिय पावले उचलणे तेवढेच आवश्यक असल्याचे प्रतिपादनही मोदी यांनी या वेळी केले. दहशतवादाविरोधात स्पष्ट भूमिका मांडताना मोदी म्हणाले की, ‘दहशतवादासारख्या गंभीर प्रश्नावर दुटप्पीपणा करणे योग्य नव्हे. दहशतवाद आणि त्यासाठी पुरविली जाणारी आर्थिक रसदही मोडून काढण्यासाठी सर्वांचे एकमत असले पाहिजे’. पाकिस्तानमध्ये असलेल्या अनेक दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला, चीनने संयुक्त राष्ट्रांमध्ये विरोध केला आहे, याची या निमित्ताने आठवण झाल्यावाचून रहात नाही.

   आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वंकष अधिवेशनाचा मुद्या संयुक्त राष्ट्रसंघात दीर्घकाळ प्रलंबित का असावा, हा मुद्दाही मोदी यांनी जोरकसपणे मांडला. त्याचप्रमाणे सुरक्षित आणि खात्रीशीर एआय, सायबर सिक्युरिटी याबाबत जागतिक पातळीवर नियमनाच्या दृष्टीने काम करणे गरजेचे असल्याचे सांगण्यासही मोदी विसरले नाहीत.  

चीन व भारताच्या संबंधाचे स्वरूप 

   परिषदेला उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. गेल्या काही काळातील दोन्ही देशांमधील वाढलेला तणाव कमी होण्यासाठी या चर्चेचा उपयोग होईल. लडाख सीमाप्रश्नावरील चर्चेतून दोन्ही देशांमध्ये काही प्रमाणात सहमती झाली याचे स्वागत करायलाच हवे पण चीनचा वर्चस्व आणि विस्तारवादी दृष्टीकोण, दोन्ही देशांतील विषम आर्थिक स्पर्धा, चीनचा 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्प’ दडपून पुढे रेटण्याचा प्रयत्न, हे वादाचे मुद्दे कायम आहेत. आतातर भारताप्रमाणे ब्राझीलनेही या प्रकल्पातून अंग काढून घेतले आहे.

    एकीकडे झोपाळ्यावर बसून झोके घ्यायचे आणि हे सुरू असतांनाच चीनने सीमेवर नवीन कुरापत काढण्याचे बेत आखायचे, हा अनुभव भारताला विसरता यायचा नाही, हेही स्पष्टच आहे. विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यासाठी चीनला बरेच काही करावे लागणार आहे. पण चीनच्या भूमिकेत एकदम बदल का झाला? एकतर सद्ध्या चीनच्या आर्थिक परिस्थितीला वाईट दिवस आले आहेत. सीमेवर हजारो सैनिक तैनात करण्याचा खर्च कमी करता आला तर ते चीनला हवे आहे. दुसरे असे की, भारत हा चीनच्या मोठ्या गिऱ्हाइकांमध्ये वरच्या स्थानी आहे. त्याला नाराज करणे हे चीनला परवडणारे नाही. ते काहीका असेना, चीन आपली भूमिका बदलत असेल तर बरेच आहे. पण भारताने 1962 पासून आजवरच्या चिनी दगलबाजीचा चांगलाच अनुभव घेतला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या सावध प्रतिक्रिया हेच दर्शवत आहेत. 

   तरीही मोदी आणि शी जिनपिंग यांनी प्रदीर्घ चर्चेत सहमती झालेल्या मुद्यांवर एक नजर टाकणे आवश्यक आहे. प्रगल्भ आणि परस्पर आदराच्या भावनेवर भारत आणि चीन यांच्यातील संबंध शांततापूर्ण आणि स्थिर राहू शकतात, यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सहमती दर्शविली. उभय नेत्यांत तब्बल पाच वर्षांनी झालेल्या भेटीत पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत नुकत्याच झालेल्या कराराचेही समर्थन करण्यात आले. विशेष प्रतिनिधींच्या बैठका पुन्हा सुरू करण्याचे निर्देशही उभय नेत्यांनी दिले. भारत आणि चीनमध्ये असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सध्या असलेली शांतता आणि स्थैर्य कायम राहावे यासाठी सीमाविषयक मतभेद दूर ठेवण्यावर मोदी यांनी या बैठकीत भर दिला.

   दोन्ही देशांतील सीमेवर शांतता कायम ठेवण्यात विशेष प्रतिनिधींची भूमिका कळीची ठरणार असल्याचे मोदी आणि जिनपिंग यांनी या वेळी स्पष्ट केले. या बैठका दीर्घकाळ न झाल्याने प्रश्न चिघळले म्हणून संवादाची ही पद्धत पुन्हा सुरू व्हावी, यासाठी सीमाप्रश्नी या विशेष प्रतिनिधींनी लवकरात लवकर बैठक घ्यावी, असेही ठरले.  निर्देशही उभय नेत्यांनी दिल्याची माहिती आहे. मोदी आणि जिनपिंग यांनी सामरिक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून द्विपक्षीयसंबंधांच्या स्थितीचा आढावा घेतला. दोन्ही देशांमधील शांततेचा प्रादेशिक आणि जागतिक शांतता व समृद्धीवर सकारात्मक परिणाम होईल, असे मत उभय नेत्यांनी बैठकीत नोंदविले. यातील बहुतेक भाग उभयपक्षी अपेक्षित कृतीशी आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे प्रत्यक्षात काय घडते आहे, ते सर्वांच्या समोर असेल. 



Saturday, November 9, 2024


 अमेरिकेत पुन्हा ट्रंपयुगाची नांदी 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?


वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

   2020 ची अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक ही 59वी चतुर्वार्षिक निवडणूक होती.  ती मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 ला म्हणजे नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतरच्या पहिल्या मंगळवारी कायद्यातील तरतुदीला अनुसरून  पार पडली  माजी उपाध्यक्ष ज्यो बायडेन हे अध्यक्षपदाचे तर कॅलिफोर्नियातील कनिष्ठ सिनेटर कमला हॅरिस यांनी तेव्हाचे  रिपब्लिकन  अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप  आणि उपाध्यक्ष माईक पेन्स  यांचा पराभव केला. तेव्हा जगभर कोविड-स19ची साथ होती. जगावर मंदीचे सावट होते. जागतिक कोविड महामारी  आणि तत्जन्य मंदीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली . तरीही 1900 नंतर या निवडणुकीत टक्केवारीनुसार सर्वाधिक मतदान झाले. याचा अर्थ असा होतो की, या काळात अमेरिकेत प्रस्थापित सरकारबद्दल भरपूर नाराजी होती. बायडेन यांना यांना 81 दशलक्षाहून अधिक मते मिळाली.  अमेरिकेच्या तोपर्यंतच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवाराला एवढी मते यापूर्वी मिळाली नव्हती.  यावरून प्रस्थापित सरकारबद्दलच्या नाराजीच्या प्रमाणाची कल्पना येते.

 बायडेन यांनी पक्षांतर्गत निवडणुकीत अनेक स्पर्धकांना (यात कमला हॅरिस याही होत्या), मागे टाकीत डेमोक्रॅट पक्षाची अध्यक्षपदासाठीची  उमेदवारी मिळवली आणि आपल्याशी स्पर्धा करणाऱ्या  हॅरिस यांनाच आपला उपाध्यक्षपदासाठीचा साथीदार उमेदवार म्हणून निवडले.  त्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन तसेच पहिल्या आशियाई-अमेरिकन आणि तोपर्यंतच्या प्रमुख पक्षाच्या तिकिटावर तिसऱ्या महिला उमेदवार ठरल्या. इकडे रिपब्लिकन पक्षाच्या पक्षांतर्गत स्पर्धेत अमेरिकेच्या तोपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त म्हणजे 2,549 प्रतिनिधी मिळवून विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा नामांकन मिळवले. 

  निवडणुकीतील प्रमुख मुद्द्यांमध्ये कोविड-19 ची हाताळणी, कोविड-19 चा अमेरिकन अर्थकारणावर झालेला परिणाम हे प्रमुख विषय होते. सुरू असलेल्या साथीच्या रोगामुळे, विक्रमी संख्येने मतपत्रिका लवकर आणि मेलद्वारे टाकण्यात आल्या. 38 राज्यांमध्ये या पद्धतींचा वापर करून मतदान झालेल्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक मते होती आणि फक्त तीन राज्यांमध्ये ती 25 % पेक्षा कमी होती. अमेरिकेत नोंदणीकृत मतदार म्हणून नोंदणी करतांनाच आपण कोणत्या पक्षाचे मतदार त्याचीही नोंदणी करता येते. नोंदणीकृत रिपब्लिकनपेक्षा अनेक नोंदणीकृत डेमोक्रॅट्सनी मेलद्वारे मतदान केले. मोठ्या संख्येने मेल-इन मतपत्रिकांचा परिणाम म्हणून, काही स्विंग राज्यात  मतमोजणी करण्यास आणि अहवाल देण्यास विलंब झाला, अशी निवडणूक आयोगाची भूमिका होती, तर याच्या मुळाशी काहीतरी काळेबेरे आहे, असा रिपब्लिकन पक्षीयांना संशय होता. त्यामुळे आरोपांच्या फैरी झडल्या. याची परिणीती 6 जानेवारीच्या कॅपिटॅाल वरील ‘हल्ल्यात’ झाली. बायडेन यांना इलेक्टोरल कॅालेजमध्ये 306 मते मिळाली तर ट्रम्प यांना 232 मते मिळाली. बायडेन जिंकले आणि विद्यमान अध्यक्ष ट्रंप  हरले. विद्यमान अध्यक्ष हरण्याचा असा प्रकार 1992 मध्ये एच डब्ल्यू बुश यांच्या बाबतीत झाला होता. मिशिगन, पेन्सिलव्हॅनिया आणि आणि विस्कॅान्सिन ही राज्ये डेमोक्रॅट पक्षाने आपल्याकडे खेचली, आणि म्हणून हे मुख्यत: घडले. मतमोजणीत हेराफेरी आणि अन्य गैरप्रकार झाले असा आरोप करीत ट्रंप यांनी हा निकाल नाकारला. ट्रंप यांच्यावर निकाल उलथवण्याचा कट रचल्याच्या आरोप ठेवण्यात आला. असा प्रकार अमेरिकेत प्रथमच घडत होता.

  बायडेन यांची अपेक्षाभंग करणारी कारकिर्द 

  2020 मध्ये ट्रम्प यांचा पराभव करून  ज्यो बायडेन अध्यक्षपदी विराजमान झाले होते. पण  त्यांचा गेल्या चार वर्षांतील कारभार अगदीच प्रभावहीन ठरला. देशांतर्गत प्रश्न तर त्यांना नीट हाताळता आले नाहीतच पण जागतिक पातळीवरही त्यांची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची ठरली. आज अमेरिका एकमेव जागतिक महासत्ता आहे. अशा राष्ट्राच्या प्रमुखाचा जगभर दरारा असायला हवा होता. पण या  प्रमुखाला आपल्या देशाच्या सामर्थ्याचा परिचय जगाला करून देता आला नाही, हे एक दारूण सत्य आहे. तसे नसते तर  रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्ध  झालेच नसते, असे परखड मत अनेक जागतिक समीक्षकांनी नोंदविले आहे. बायडेन यांच्या  शेवटच्या  दोन वर्षांच्या कारकिर्दीबद्दल तर न बोललेलेच बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. हा  काळ त्यांच्या  विस्मरणांच्या कथांमुळेच लक्षात राहिला तर राहील. मात्र  हा ‘अवघ्या’ 81 वर्षांचा ‘तरूण’ पुन्हा 2024 मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभा राहिला.  यावेळी त्याच्या फटफजितीची उदाहरणे पाहून डेमोक्रॅट पक्षाच्या जुन्याजाणत्या धुरिणांनी  त्याला महत्प्रयासाने लढतीतून माघार घ्यावयास लावली. अध्यक्षपदाची उमेदवारी विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याकडे चालून आली.  

कमला हॅरिस विरुद्ध  डोनाल्ड ट्रंप 

    अनपेक्षितपणे चालून आलेल्या या संधीचे या बाईंनी सोने केले. चर्चेच्या दोन फेऱ्यांत त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांना चारी मुंड्या चीत केले. पातळी अत्यंत सुमार दर्जाची आहे, असे जनमत निर्माण करण्यात कमला हॅरिस यशस्वी ठरल्या.  पण असे म्हटले जाते की सर्व शक्तिमान आणि प्रगत अमेरिकेचे  जनमत,  अध्यक्षपदी एका महिलेने बसावे हे मान्य करायला फारसे अनुकूल नव्हते. ते काय असेल ते असो. नंतर ट्रंप यांच्यावर एकापाठोपाठ  झालेले  झालेले हल्ल्यांचे प्रयत्न जनमताचे  ध्रुवीकरण होण्यासाठी योगवाही  (कॅटॅलिस्ट) ठरले. खरे तर एक उमेदवार या नात्याने कमला हॅरिस या डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा निश्चितच सरस होत्या. असो.

   ट्रंप यांचा विजय आणि पुरोगामी कंपू 

   आता ट्रंप निवडून आले आहेत. हे अनेक पुरोगाम्यांना आणि बुद्धिमंतांना मुळीच आवडलेले नाही. स्वत:ला प्रागतिक म्हणवणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदावर रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा निवड होणे ही जागतिक समुदायातील या गटाला अशुभ बाब वाटते.  याचे एक कारण असेही असू शकते की, अनेक मुद्द्यांवर ट्रम्प यांची मते टोकाची आणि कालबाह्य आहेत. आणि त्यामुळे अमेरिकेच्या  यापुढील धोरणांवर त्यांचा परिणाम होईल, असे त्यांना वाटते.  जगातील सर्वशक्तिमान देशाच्या  नेत्याने  जागतिक शांततेसाठी आणि पर्यावरणरक्षणासाठी प्रयत्न करायला हवेत. या बाबतीत अमेरिकेची भविष्यातील धोरणे कशी राहतात, हे पहावे लागेल. 

2024 मध्ये रिपब्लिकन पक्षाने राखलेली राज्ये राज्ये व इलेक्टोरल व्होट्स अशी आहेत.(सद्ध्या उपलब्ध माहिती) 

1) अल्बामा 9 मते,2) अर्कान्सास 7 मते, 3)फ्लोरिडा 30 मते, 4) इदाहो 4 मते 5) इंडियाना 6) कन्सस 6 मते 7) केंटुकी 8 मते 8) ल्युसियाना 8 मते 9) मिसिसीपी 6 मते 10) मिसुरी 10 मते 11) मोंटाना 4 मते 12) नॅार्थ डाकोटा 3 मते 13) नेब्रास्का 2 मते 14) ओहायो 16 मते 15) ओल्काहोमा 7 मते 16) साउथ कॅरोलिना 9 मते 1साऊथ डाकोटा 3 मते 17) टेनसी 11 मते 18) टेक्सास 40 मते 19) उटाह 6 मते 20) वेस्ट व्हर्जेनिया 4 मते 21) व्योमिंग 3 मते 22) विस्कॅान्सन 10 मते  

रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅट पक्षाकडून हिस्कावून घेतलेली राज्ये  व इलेक्टोरल व्होट्स अशी आहेत.

१) जॅार्जिया 16 मते, 2) आयोवा 6 मते 3) नॅार्थ कॅरोलिना 16 मते 4) पेन्सिलव्हॅनिया 19 मते

  डेमोक्रॅट पक्षाने राखलेली राज्ये व व इलेक्टोरल व्होट्स अशी आहेत. 

  1. कॅलिफोर्निया 54 मते 2) कोलोराडो 9 मते 3) कनेक्टिकट 7 मते 4)डेलावेअर 3 मते 5) हवाई 4 मते 6) इलिनॅाइस  19 मते 7) मेरी लॅंड 10 मते 8) मिनेसोटा 10 मते 9) मॅसॅच्युसेट्स 11 मते 10) न्यू हॅंपशायर 4मते 11) न्यू जर्सी 14 मते 12) न्यू मेक्सिको 5 मते 13) न्यू यॅार्क 28 मते 14) ओरेगॅान 8 मते15) ऱ्होडआयलंड 4 मते 16) व्हर्मॅांट 3 मते 17) व्हर्जिनिया 13 मते 18)वॅाशिंगटन 12 मते

 (आजची स्थिती रिपब्लिकन 31 राज्ये डेमोक्रॅट 19 राज्ये)

  सत्तांतराचे संबाव्य पडसाद 

 युरोपातील नाटो संघटना, जागतिक व्यापार संघटना, वातावरण बदल करार, रशियाशी मैत्री, इस्रायलचे समर्थन आणि इराणविरोध यांविषयीची डोनाल्ड ट्रंप यांची मते डेमोक्रॅट पक्षाच्या मतांपेक्षा अगदी वेगळी आहेत. त्यामुळे जागतिक राजकारण यापुढे कोणते वळण घेईल, यावर राजकीय निरीक्षक लक्ष ठेवून आहेत. भारतासाठी त्यांची काही मते आणि धोरणे धोकादायक म्हणावी अशीच आहेत. युक्रेनप्रकरणी ट्रंप यांनी अमेरिकेची शस्त्रास्त्रांची मदत बंद केल्यास युक्रेनला रशियाशी तह करण्यावाचून दुसरा उपाय उरणार नाही. इस्रायलने गाझापट्टी व इराणवरील हल्ले पूर्णपणे थांबवावेत यासाठी बायडेन प्रशासन इस्रायलला आग्रह करीत होते. ट्रंप असे काही करणार नाहीत. इस्रायलने इराणच्या तेलविहिरी बॅाम्बहल्ले करून बंद पाडाव्यात आणि अण्वस्त्रे निर्माण करण्यासाठी इराणचे जे प्रयत्न सुरू आहेत असे म्हटले जाते, ती केंद्रे नष्ट करावीत या मताचे ट्रंप आहेत, त्यामुळे हे संघर्ष भविष्यात अधिक गंभीर रूप धारण करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

    नाटो या संघटनेतील युरोपीय देश आपल्या संरक्षणासाठी अमेरिकी शस्त्रास्त्रे, सैनिक आणि निधीवर अवलंबून असतात. भविष्यात पुतिनसारख्यांनी हल्ले केल्यास आपण नाटो सदस्यांच्या मदतीस जाणार नाही, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. नाटोतील सदस्य देशांना अमेरिकेच्या मदतीची अपेक्षा असेल तर त्यांनी  अमेरिकी फौजांचा खर्च उचलावा अशी अट ट्रम्प यांनी घातली होती. नाटोतील सामायिक जबाबदारीचे तत्त्व ट्रंप यांना मान्य नाही. हा पवित्रा त्यांनी प्रत्यक्षात अमलात आणला तर  युरोपातील इतर देशांवर हल्ले करण्यासही  पुतिन कमी करणार नाहीत, अशी भीती राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.

   अमेरिकेने जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन्ही जागतिक वित्तीय संस्थांतून बाहेर पडावे असे मत ट्रंप यांनी व्यक्त केले होते. याऐवजी अमेरिकेने व्यापार आणि वित्त या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करावे, यावर त्यांचा भर आहे. स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ  देशात परत पाठवावे आणि त्यानंतर  आयात कराव्या लागणावर मालावर कर आकारावा या मताचे ते आहेत. या धोरणाचा विकसनशील देशांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होईल. आज अमेरिकन बाजारपेठेत आपला माल करसवलतींमुळे स्वस्तात विकून या देशांना स्पर्धेत टिकून राहणे शक्य होते आहे. 

  पॅरिस वातावरण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने ट्रम्प यांच्याच राजवटीत घेतला होता. पण बायडेन यांनी तो निर्णय फिरवला. ट्रंप यांनी करारातून बाहेर पडण्याचा निर्णय पुन्हा घेतल्यास हवामान बदलामुळे होत असलेली हानी आणखी गंभीर रूप धारण करील. अमेरिकेने अधिकाधिक तेल विहिरी खोदाव्यात व खनिज तेलाचे उत्पन्न वाढवावे या मताचे ते आहेत.  ‘डिग बेबी डिग’ म्हणजे आणखी तेल विहिरी खोदा हा नारा त्यांनी अमेरिकेत प्रचारादरम्यान  दिला होता. विद्युत वाहनांना ट्रम्प सतत विरोध करीत आले आहेत. अशी ट्रंप यांची पर्यावरणविषयक विचारांची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. जागतिक तापमानवाढ रोखण्याच्या लढाईत हे विचार अडथळेच ठरू शकतात.

   अमेरिकन  मतदारांचे दोन प्रकार 

   अमेरिकेचे शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग पडतात. पदवीधर नसलेला तरूण वर्ग, ग्रामीण शेतकरी वर्ग, धार्मिक आणि श्रद्धाळू मतदार ग्रामीण भागात जास्त प्रमाणात असणार हे उघड आहे. हा मतदार वर्ग रिपब्लिकन पक्षाचा पाठिराखा आहे. 1000 ग्रामीण जिल्ह्यात ट्रंप यांनी डेमोक्रॅट पक्षाला तर मागे टाकलेच, त्याशिवाय रिपब्लिकन पक्षाला 2016 आणि 2020 मध्ये जेवढी मते मिळाली होती त्याहीपेक्षा जास्त मते घेऊन स्वत:चाच उचांकही मोडला. मी अवैध स्थलांतराला पायबंध घालीन, हे ट्रंप यांचे नेमके आश्वासन ग्रामीण अमेरिकेतील मतदारांना विशेष आवडले असे दिसते. या तुलनेत हॅरिस यांची आश्वासने मोघम स्वरुपाची असत, असे एक मत आहे.

   अमेरिकेतील रूढी आणि परंपरावादी मतदार अजूनही त्या देशाच्या अध्यक्षपदावर महिलेची निवड करण्यास फारसा अनुकूल  नाही, हेही या निवडणुकीत दिसले.  तसेच अमेरिकेत अध्यक्षपदी महिलेला बसवण्यास विरोध केल्याचे हे दुसरे उदाहरण होय. हिलरी क्लिंटन यांच्याही विरोधात 2016 मध्ये त्यांचे महिला असणे असेच आड आले होते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यातून यावेळची महिला तर कृष्णवर्णीही होतीना!

  एकतर्फी निवडणूक 

   अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीची होईल असा अंदाज राजकीय निरीक्षखांनी वर्तवला होता. तो साफ चुकीचा ठरसा.  प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राज्यांमध्ये जोरदार मुसंडी मारली, असे दृश्य समोर आले आहे. याला  पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, व्हिस्कॉन्सिन ही बेभरवशाची राज्येही (स्विंग स्टेट्स) अपवाद ठरली नाहीत. या राज्यांची एकूण 45 इलेक्टोरल मते निर्णायक ठरली. नॉर्थ कॅरोलिना या आणखी एका निर्णायक राज्यात ट्रम्प यांनी विजय मिळवला. डोनाल्ड ट्रंप यांच्यासारखे पुनरागमन  अमेरिकेत गेल्या अनेक वर्षात पहायला मिळाले नव्हते.

  तिहेरी विजय 

   रिपब्लिकन पक्षाचा हा ट्राय फॅक्टस (तिहेरी) विजयही ठरू शकेल. या पक्षाने अध्यक्षपद जिंकले आहे. या निवडणुकीनंतर सिनेटमध्येही 100 पैकी 51 जागा रिपब्लिकन पक्षाकडे आहेत. 435 सदस्य संख्या असलेल्या हाऊसची द्विवार्षिक  निवडणूकही याचवेळी पार पडली आहे. ते निकालही यथावकाश समोर येतीलच. इथेही 435 पैकी 218 जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाल्या (ताजा आकडा 211) तर तर तिथेही बहुमत रिपब्लिकन पक्षाला मिळेल. सद्ध्याच्या निकालांवरून मतदारांचा जो कल दिसतो आहे, तो तसाच हाऊसचे प्रतिनिधी निवडतांनाही असेल आणि तोही तसात असण्याचीच शक्यता आहे, तर रिपब्लिकन पक्षाचे हे तिहेरी यश असणार आहे. मात्र सिनेटमध्ये अनेक प्रश्नी सुपरमेजॅारिटी (60% मते) ठरावाच्या बाजूने असेल  तरच तो ठराव पारित होतो. अशा प्रसंगी मात्र रिपब्लिकन पक्षाला डेमोक्रॅट पक्षाचे सहकार्य मिळविणे आवश्यक राहील.

   डोनाल्ड ट्रंप यांची पत्नी प्रचारापासून दूर 

   ट्रम्प यांनी स्थलांतरितांच्या मुद्दा अतिशय चतुराईने हाताळला. त्यांची पत्नी स्वत: इटलीतून आलेली स्थलांतरित आहे. ट्रंप यांनी तिला प्रचारात उतरवलेच नाही. तशात हॅरिस यांचे स्वतःचे स्थलांतरित व गौरेतर असणे ही तर  ट्रम्प यांच्यासाठी अतिशय सोयीची बाब ठरली.  ट्रंप यांच्या प्रचाराची दिशा अशी होती. बाहेरून येणारे अमेरिकेत  सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण करीत आहेत, ते ‘इथल्यांचे’ रोजगार घेतात, ‘इथल्यांच्या’ पाळीव  प्राण्यांना मारून खातात, ते कर भरत नाहीत, बेकायदेशीर राहूनही सगळ्या सोयीसुविधांचा लाभ घेतात.  डेमोक्रॅटिक सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास भूमिपुत्रांची गळचेपी होईल, हे ट्रंप यांनी मतदारांच्या मनावर बिंबवले. पण आजचे अमेरिकन गोरे हेही भूमिपुत्र ठरत नाहीत. हा मुद्दा उपस्थित करायला  मूळ भूमिपुत्रांना  आजच्या गोऱ्या अमेरिकनांनी शिल्लकच ठेवलेले नाही. त्यामुळे हा मुद्दा कोण उपस्थित करणार? या मुद्द्यांचा पारपंरिक रिपब्लिकन मतदारांवरच नव्हे, तर तरुण मतदारांवरही परिणाम झाला. मात्र बेकायदेशीर घुसखोरीला मान्यता  नसावी, हा मुद्दा वाजवी म्हणता येईल.

  ट्रंप यांच्यावरील हल्ले 

  जुलै 2024 मध्ये पेनसिल्व्हॅनियामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका प्रचारसभेदरम्यात प्राणघातक हल्ला झाला. यातून ट्रम्प बालबाल बचावले. बायडेन यांच्या सरकारने ट्रम्प यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली असा संदेश यातून पसरवला गेला. ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडातही हल्ल्याचा प्रयत्न होणार होता. पेनसिल्वेनियात रक्तबंबाळ ट्रम्प यांनी मूठ उगारून दिलेला ‘फाइट’ म्हणजे लढा हा संदेश त्यांच्या समर्थकांना एकवटण्यास कारणीभूत ठरला. हे समर्थक अखेरपर्यंत ट्रम्प यांच्या पाठीशी उभ राहिले.

   ट्रम्प हे हुकूमशाही प्रवृत्तीचे आणि एककल्ली स्वभावाचे भडक माथ्याचे आहेत. पराभव दिसू लागताच त्यांनी निवडणूक निकालच उधळून लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप  डेमोक्रॅटिक पक्षाने केला. पण त्याचा परिणाम झाला नाही.  गर्भपाताच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्या राजवटीत महिलांना न्याय मिळणार नाही, असे हॅरिस प्रचारसभांमध्ये मांडत होत्या. त्यांना शहरी महिला मतदारांकडून मोठा प्रतिसादही मिळाला. पण ग्रामीण भागांमध्ये तो तेवढा प्रभावी ठरला नाही.  

मग कोणते मुद्दे प्रभावी ठरले?

  अमेरिकेच्याही अर्थव्यवस्थेवर आज ताण पडतो आहे.   पण तिची प्रगती थांबलेली नाही. महागाई आणि रोजगारीवर भायडेन प्रशासनाने उपायही केले.  परिणामत: तेथील फेडरल रिझर्व्हने अलीकडेच अमेरिकेतील व्याजदरही कमी केले होते. पण तरीही कनिष्ठ आर्थिक वर्ग, बेरोजगारी, छोटे उद्योजक आणि   नोकरदार यांना महागाईचा सामना करणे जड गेले, हेही खरे आहे. दक्षिणेकडील काही राज्यांना चक्रीवादळांचा तडाखा बसला. बायडेन प्रशासनाने पुरेशा सक्षमपणे हा प्रश्न हाताळला नाही, असा आरोप तेथील जनतेने केला. कोविडनंतर अमेरिकेची अर्थव्यवस्था अजूनही पुरेशी सावरली नाही, असेही मत अनेक नागरिकांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे.  

डोनाल्ड ट्रंप यांचा विजय आणि भारत 

  डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेतील निवडणुकीत जिंकणे हा विषय भारतासाठी काही अंशी आनंदाचा तर काही अशी सावध राहण्यांचा विषय आहे.

 सहकार्य मिळू शकेल अशी क्षेत्रे अशी आहेत. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पांच्यात मैत्रीपूर्ण सबंध राहिले आहेत. मोदींच्या लोकप्रियतेने ते चकित झाले आहेत तसे त्यानी बोलूनही दाखवले आहे.

1 चीनचे आव्हान- ट्रम्प यांनी भारतावा उल्लेख आशियातीत एक मोठी शक्ती म्हणूनच यापूर्वीही केला आहे. विशेषतः चीनच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी त्यांनी भारताकडून सहयोगाची अपेक्षा केली आहे. या मुद्यावर दोन्ही देशांची भूमिका पुष्कळशी सारखी असेल.  

2 शस्त्रास्त्रे करार आणि तंत्रज्ञान देवाणघेवाण : आगामी काळात या दोन्ही क्षेत्रात दोन्ही देशामध्ये सहकार्य वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.  

3 अवैध घुसखोरी: ट्रम्प आणि मोदी यांची मते घुसखोरीसंदर्भात जुळणारी आहे. 

4 दहशतवाद अमेरिकेप्रमाणेच भारतानेही दहशतवादाचा सामना केला आहे. त्यामुळे या मुद्यावर ट्रम्प भारतासोबतच राहतील 

5 कॅनडा आणि खलिस्तान: अमेरिका आणि कॅनडात खलिस्तानी कारवाया वाढल्याने मागील काही दिवसापासून भारताला बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे कॅनडातील भारतीय हिंदूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. ट्रम्प यांच्या येण्याने कॅनडावर दबाव बनवण्यासाठी भारताला मदत मिळू शकेल.

6 सीमा आणि काश्मीर प्रश्नी ट्रंप यांचा भारताला पाठिंबा असेल.

    सावध राहण्याचीही आवश्यकता

1 ट्रंप ही बेभरवशाची लहरी व्यक्ती आहे. त्यांची निर्णय घेण्याची पद्धतही विचित्र आहे, हे लक्षात ठेवून भारताला वागावे लागेल.

2 एच1बी व्हिसा बाबत ट्रंप यांचे धोरण कठोर राहिलेले आहे. पुढील काळात या बाबत अमेरिकेचे धोरण काय राहते, ते डोळ्यात तेल घालूनच पहावे लागेल.

3 ट्रंप वर्णभेदाचे समर्थक नसले तरी त्यांच्या मनात वर्णभेदाची जाणीव मुळीच नाही, असे म्हणता येणार नाही.

4 ट्रंप यांचे करविषयक धोरण भारताला फायद्याचे असेल, असे वाटत नाही.


'

वेचलेले वृत्तकण 

1 यावेळी म्हणजे 2024 मध्ये 50 पैकी 31 राज्यांनी ट्रंप यांच्या बाजूने मतदान केले. 2020 मध्ये यापैकी 6 राज्यांनी बायडेन यांच्या बाजूने मतदान केले होते.

2  डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने  19 राज्यांनी मतदान केले. त्यापैकी 17 राज्यात मतदानाची टक्केवारी 2020 च्या टक्केवारीच्या तुलनेत घसरली होती.

3 रिपब्लिकन पक्षाला 7 कोटी 19 लाख पॅाप्युलर व्होट्स आणि 292 इलेक्टोरल व्होट्स मिळाली तर डेमोक्रॅट पक्षाला  6 कोटी 69 लाख पॅाप्युलर व्होट्स  आणि 224 इलेक्टोरल व्होट्स मिळाली. म्हणजे रिपब्लिकन पक्षाला डेमोक्रॅट पक्षापेक्षा 50 लाख जास्त पॅाप्युलर व्होट्स आणि 68 इलेक्टोरल व्होट्स मिळाली.

4 2024 मध्ये सातही स्विंग स्टेट्सनी रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने मतदान केले असे दिसते. असा प्रकार 24 वर्षानंतर प्रथमच घडतो आहे 

4  डोनाल्ड ट्रंप यांचा  प्रति मतदार खर्च 16.6 डॅालर इतका झाला तर कमला हॅरिस यांचा प्रति मतदार खर्च 24 डॅालर इतका झाला. 

5 अध्यक्षपदी आरूढ होताना डोनाल्ड ट्रंप यांचे वय 78 वर्षे 219 दिवस इतके असेल. ज्यो बायडेन यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांचे वय 78 वर्षे 61 दिवस इतके होते. अशाप्रकारे डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेचे सर्वात ज्येष्ठ अध्यक्ष असतील.

6 डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेचे 45 आणि 47 वे अध्यक्ष असतील. कारण 46 वे अध्यक्ष ज्यो बायडेन असणार आहेत. अमेरिकेत  यापूर्वी पक्त एकदा असा प्रकार घडला होता. ग्रोव्हर क्लिनलंड हे 22 वे आणि 24 वे अध्यक्ष 1885 ते 1889 आणि 1893 ते 1897 या काळात होते. 1889 ते 1893 या मधल्या  चार वर्षासाठी  बेंजामीन हॅरिसन हे अमेरिकेचे अध्यक्ष होते.  

7 डोनाल्ड ट्रंप एलॅान मस्कवर जाम खूष आहेत. त्यांच्यासारखे फक्त तेच असू शकतात, एवढी अभूतपूर्व कामगिरी त्यांनी या निवडणुकीत पार पाडली आहे.

8 ‘मी अमेरिकनांवरील कर्ज आणि कर दोन्हीही कमी करीन’, डोनाल्ड ट्रंप यांचे अमेरिकन जनतेला आश्वासन 

9 ‘माझे उपाध्यक्षपदाचे साथीदार जे डी व्हान्स आणि त्यांची भारतीय सौंदर्यवती पत्नी उषा’, या अभूतपूर्व जोडप्याचे मी हार्दिक अभिनंदन करतो’, डोनाल्ड ट्रंप.

10. ‘मी युद्ध प्रारंभ करणारा नव्हे तर युद्धे थांबवणारा अध्यक्ष अध्यक्ष सिद्ध होईन’, डोनाल्ड ट्रंप.

11. ट्रंप यांना विजयाबद्दल अभिनंदन करणारे संदेश देशभरातून आणि जगभरातून आले. शी जिनपिंग यांनीही अभिनंदनपर संदेश पाठविला आहे. ते म्हणतात, ‘दोन्ही देशांनी संवाद करावा, मतभेदाचे योग्य व्यवस्थापन करावे, परस्पर सहकार्य वाढवावे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम केले तर नक्कीच फायदा होईल’.

12 अमेरिकेच्या डेमोक्रॅट अध्यक्षांपेक्षा रिपब्लिकन अध्यक्षांचेच भारताशी अधिक स्नेहाचे संबंध राहिलेले आहेत. कमला हॅरिस तशा भारतीय असतीलही पण त्या आपला आफ्रिकन वारसाच अधिक उघडपणे सांगत आल्या आहेत. त्या पाकिस्तानधार्जिण्या असून त्यांची काश्मीरविषयक भूमिका पाकिस्तानला अनुकूल राहिलेली आहे.

डोनाल्ड ट्रंप यांच्या यशाला कारणीभूत ठरलेले मुद्दे

  1.  अमेरिकेत ज्यो बायडेन यांच्या कार्यकाळात भडकलेली महागाई.
  2.  ट्रंप यांचा अमेरिकेतील घुसखोरी थांबवण्याचा निर्धार.
  3.  सामान्य अमेरिकन पुरुषाला ट्रंप ‘आपला माणूस’, वाटला.
  4.  ‘अमेरिका हा उजव्या गोऱ्या ख्रिश्चनांचा देश आहे’, ही ट्रंप यांची भूमिकामतदारांना भावली.
  5.  इव्हॅन्जिअलिस्ट या ख्रिश्चनांमधील सनातनी, रुढीवादी, परंपरानिष्ठ मतदारांच्या प्रभावी   गटाने ट्रंप यांना दिलेली ‘एक गठ्ठा’ मते विजयास पुष्कळ प्रमाणात कारणीभूत ठरली.
  6.  ‘कोण, कुठली कमला हॅरिस?’, सामान्य अमेरिकन मतदाराचे कमला हॅरिस यांच्या बद्दलचे मत.