डोनाल्ड ट्रंप यांचा विजय कसा? निसटता की दणदणीत?
वसंत गणेश काणे
अमेरिकेतील निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले असून ५३८ इलेक्टोरल काॅलेज व्होट्सपैकी(इसीव्ही) डोनाल्ड ट्रंप यांना ३०६ तर हिलरी क्लिंटन यांना २३२ मते मिळाली आहेत . हा डोनाल्ड ट्रंप यांचा ७४ मते अधिक मिळवून संपादन केलेला दणदणीत विजय म्हटला पाहिजे यात शंका नाही.
पण पाॅप्युलर व्होट्सचा विचार केला तर एकूण जवळजवळ १२ कोटी मतदानापैकी हिलरी क्लिंटन यांना ४७.७ टक्के ( ६०.३ दशलक्ष), डोनाल्ड ट्रंप यांना ४७.४ टक्के (५९.९ दशलक्ष), तर इतरांना ४.८ टक्के मिळाली आहेत. म्हणजे हिलरी क्लिंटन यांना ०.३ टक्के मते (२,८०,०००) डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा जास्त मिळाली असून सुद्धा इलेक्टोरल काॅलेज व्होट्स (इसीव्ही) मध्ये ७४ मतांची आघाडी डोनाल्ड ट्रंप यांना मिळाली आहे व ते निवडून आले आहेत.
हा चमत्कार स्विंग स्टेट्सनी घडविला आहे, असे म्हणता येत नाही. कारण ही राज्ये तशी स्विंग स्टेट्स गणली जात असली तरी २००४, २००८, २०१२ या वर्षी झालेल्या तीन चतुर्वार्षिक निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाकडे होती. म्हणजे गेल्या तीन निवडणुकीत यांचा ‘स्विंग’ डेमोक्रॅट पक्षाकडेच असे. म्हणजे या राज्यात डेमोक्रॅट पक्षाला रिपब्लिकन पक्षापेक्षा सलग तीन निवडणुकीत जास्त पाॅप्युलर व्होट्स मिळत होती. अशी ही राज्ये चार असून ती मिशिगन(१६ मते), व्हिसकाॅन्सिन (१० मते), पेन्सिलव्हॅनिया (२० मते) आणि फ्लोरिडा (२९ मते) अशी आहेत.
१. मिशिगनमध्ये डोनाल्ड ट्रंप यांना मिळालेल्या मतांपैकी ५९१९ मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली असती तर त्यांना हे राज्य व १६ इलेक्टोरल काॅलेज व्होट्स मिळाली असती.
२. व्हिसकाॅन्सिनमध्ये डोनाल्ड ट्रंप यांना मिळालेल्या मतांपैकी १३,६२९ मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली असती तर त्यांना हे राज्य व १० इलेक्टोरल काॅलेज व्होट्स मिळाली असती.
३. पेन्सिलव्हॅनियामध्ये डोनाल्ड ट्रंप यांना मिळालेल्या मतांपैकी ३४,११९ मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली असती तर त्यांना हे राज्य व २० इलेक्टोरल काॅलेज व्होट्स मिळाली असती.
४. फ्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रंप यांना मिळालेल्या मतांपैकी ५९,८८६ मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली असती तर त्यांना हे राज्य व २९ इलेक्टोरल काॅलेज व्होट्स मिळाली असती.
याचा अर्थ असा की, ५९१९+ १३,६२९+३४,११९+५९,८८६ = १,१३,५५३ मते रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या मतांमधून डेमोक्रॅट पक्षाकडे गेली असती तर चित्र वेगळे दिसले असते. या निवडणुकीत जवळजवळ १२ कोटी मतदारांनी मतदान केले.
टक्केवारीने हिशोब केला तर पुढीलप्रमाणे चित्र दिसते.
१. मिशिगन(१६ मते) - या राज्यात डेमोक्रॅट पक्षाला ४७.३ टक्के तर रिपब्लिकन पक्षाला ४७.६ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे डेमोक्रॅट पक्षाला फक्त ०.३ टक्के कमी मिळाल्यामुळे गेल्या तीन निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाकडे असलेले राज्य रिपब्लिकन पक्षाकडे गेले.
२. व्हिसकाॅन्सिन - (१० मते) या राज्यात डेमोक्रॅट पक्षाला ४६.९ टक्के तर रिपब्लिकन पक्षाला ४७.९ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे डेमोक्रॅट पक्षाला फक्त १.० टक्के कमी मिळाल्यामुळे गेल्या तीन निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाकडे असलेले राज्य रिपब्लिकन पक्षाकडे गेले.
३. पेन्सिलव्हॅनिया - (२० मते) या राज्यात डेमोक्रॅट पक्षाला ४७.६ टक्के तर रिपब्लिकन पक्षाला ४८.८ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे डेमोक्रॅट पक्षाला फक्त १.२ टक्के कमी मिळाल्यामुळे गेल्या तीन निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाकडे असलेले राज्य रिपब्लिकन पक्षाकडे गेले.
४. फ्लोरिडा - (२९ मते) या राज्यात डेमोक्रॅट पक्षाला ४७.८ टक्के तर रिपब्लिकन पक्षाला ४९.१ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे डेमोक्रॅट पक्षाला फक्त १.३ टक्के कमी मिळाल्यामुळे गेल्या तीन निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाकडे असलेले राज्य रिपब्लिकन पक्षाकडे गेले.
याचा अर्थ असा की, परंपरेने (२००४; २००८; २०१२) डेमोक्रॅट पक्षाकडे असलेली ही चारी राज्ये पाॅप्युलर व्होट्समधील १.५ टक्यापेक्षा कमी मतांच्या फरकामुळे रिपब्लिकन पक्षाकडे गेली व त्यामुळे १६+१०+२०+२९=७५ इलेक्टोरल काॅलेज व्होट्स ची आघाडी घेऊन डोनाल्ड ट्रंप निवडून आले.
याला दणदणीत विजय म्हणायचे की निसटता विजय म्हणायचे?

No comments:
Post a Comment