कहानी मे एक ट्विस्ट के बाद दुसरा ट्विस्ट
अमेरिकेतील निवडणूकीतील बहुदा शेवटचा टप्पा
वसंत गणेश काणे
हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रंप या दोघात आता फक्त केवळ दोन टक्यांचाच फरक उरला असून हिलरी क्लिंटन जरी आजही पुढे असल्या तरी दोनचा फरक डोनाल्ड ट्रंप केव्हाही भरून काढू शकतील, अशी स्थिती आहे. हे निदान एखाद्या कुडबुड्या ज्योतिष्याचे नसून वाॅशिंगटन पोस्ट व एबीसी यांच्या निवडणुकीसंबंधांवर नजर ठेवून असलेल्या चमूचे आहे. निवडणुकीला जेमतेम एक आठवडा असतांना चुरस एकदम वाढली असून आजवर रुसून बसलेले जवळजवळ सर्व प्रमुख रिपब्लिकन गट डोनाल्ड ट्रंप यांच्या तंबूत परतले आहेत. ४७ टक्के हिलरी क्लिंटन यांचे बाजूने तर ४५ टक्के डोनाल्ड ट्रंप यांचे बाजुला, अशी चुरस असून अन्य सर्व अध्यक्षीय उमेदवार (१००-४७-४५=८) उरलेल्या ८ टक्क्यातच गुंडाळले जातांना दिसत आहेत. अमेरिकन राजकारण पुन्हा द्विपक्षीय राजकारणाकडे वळत असून ‘तिसरी आघाडी’ हवेतच विरतांना दिसत आहे. तसे पाहिले तर या दोन उमेदवारात असलेला फरक कमी कमी होत चाललेला दिसत होताच. पण तो इतका कमी होईल असे वाटत नव्हते.
संख्याशास्त्रीय (स्टॅटिस्टिक्स) भाषेत बोलायचे तर आपल्या निदानात +/- तीन टक्के इतका फरक पडू शकतो, असे हा अहवाल म्हणतो आहे. मतदारांचे सगळ्या प्रमुख गटांशी संपर्क करून हा अहवाल बेतलेला आहे. भरीतभर अशी आहे की, हा अहवाल एफ बी आय (फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशन) च्या बाबतीत एक सनसनाटी बातमी यायच्या अगोदरचा आहे.
काय आहे ही बातमी? - हिलरी क्लिंटन या परराष्ट्रमंत्री असतांना खाजगी ईमेल अकाऊंटचा वापर शासकीय कामासाठी करीत असत, हे जेव्हा बाहेर आले, तेव्हाच अमेरिकन जनमत त्यांच्या विरोधात गेले होते, हे आपण जाणतो. हिलरी क्लिंटन सारख्या राजकारणात मुरलेल्या व्यक्तीच्या हातून हे सहज, उगीच, चुकून घडले असेल यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, हेही उघड आहे. ज्यावेळी हे घडले तेव्हा याबाबतचे नियम आजच्या इतके काटेकोर नव्हते, हेही गृहीत धरले तरीही हिलरी क्लिंटन सारखी मुरब्बी राजकारणी महिला अशी ‘चूक’ करील, हे मानायलाही अमेरिकन जनमत तयार नव्हते. त्यातच क्लिंटन फाऊंडेशनच्या देणगीदारांच्या यादीतील संशयास्पद व्यक्ती व देशांची नावेही समोर आली आहेत. हिलरी क्लिंटन व ओसामा - बिन - लादेन यांचे एकत्र छायाचित्र (खरे वा खोटे ते ठरलेले नाही) व्हायरल झालेले दिसत आहे. अर्थात याला तसे महत्त्व नाही. कारण एकेकाळी ओसामा व अमेरिकेचे सूत होतेच. त्यावेळचे हे छायाचित्र असेल तर त्यात गैर काय? क्लिंटन फाऊंडेशनचे काम निखळ मानवतावादी दृष्टिकोनातून चालते, असे गृहीत धरले (तसे ते होते का?) तरी या संशयास्पद घटकांच्या देणग्या स्वीकारणे समर्थनीय ठरत नाही. देणगीदारांना हिलरी क्लिंटन यांची भेट अग्रक्रमाने मिळत असे, एवढाच मुद्दा भ्रष्टाचार झाला, असा निष्कर्ष काढण्यास पुरेसा नाही, हे मत जरी न्यायालयाने व्यक्त केले असले तरी या ईमेल्स काही हिलरी क्लिंटन यांची पाठ सोडण्यास तयार नाहीत. ‘ही माझी चूक झाली, असे मी करावयास नको होते, असे मला वाटते, यापुढे मी असे करणार नाही’, हे बाळबोध समर्थन व खुलासे कुणालाही विश्वास ठेवण्यायोग्य वाटत नव्हते. सीझरच्या पत्नीचे वर्तन संशयापलीकडचे असले पाहिजे ( सीझर्स वाईफ शुड बी अबाव्ह सस्पिशन), असे म्हणतात. त्यातला हा प्रकार आहे. पण हा मुद्दा आता चघळून चघळून बेचव झाला होता. तरीही ही बाब अगोदरच ६२ टक्के अमेरिकनांना आवडली नव्हती व ४८ टक्के लोक तर यामुळे अक्षरश: संतापले होते. या विषयाला आता नवसंजीवनी मिळाली आहे ती अशी की, एफ बी आयच्या हाती हिलरी क्लिंटन यांनी नष्ट केलेल्या आणखी शेकडो ईमेल्स लागल्या असून त्या उलगडण्यात या गुप्तहेर यंत्रणेला यश आले आहे. यातील मजकूर समजावा इतके यश अजून मिळालेले नाही. त्यातील आशय अजूनही बाहेर आलेला नाही.
हीच वेळ का साधली?- तसे पाहिले तर एफ बी आय च्या एजंटांना ही माहिती एक महिना अगोदरच कळली होती. पण ती त्यांनी ती प्रमुखांना - जेम्स काॅमी यांना- आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर कळवली आहे. त्यांनीही गप्प बसावे ना? तर तेही नाही. डायरेक्टर जेम्स काॅमी यांनी सर्व आमदार/खासदारांना दुसऱ्याच दिवशी पत्र लिहून ही बाब कळवली. झाले. एकच भडका उडाला. क्लिंटन समर्थकांनी जेम्स काॅमी यांना बदडायचेच काय ते बाकी ठेवले. ही माहिती मी तशीच जाहीर केली असती तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकेल, असे वाटले म्हणून तसे न करता मी अगोदर त्यासाठी परवानगी मागितली असे म्हणून जेम्स काॅमी यांनी आगीत तेल ओतले. याला आणखीही एक किनार आहे. जेम्स काॅमी एफ बी आयमध्ये येण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षात होते. त्यामुळे हिलरी क्लिंटन अक्षरश: कडाडल्या. डेमोक्रॅट पक्षाने डोनाल्ड ट्रंप यांच्यावर तीन/चार राज्यात निरनिराळ्या आरोपांखाली खटले भरले आहेत. जस्टीस डिपार्टमेंटने ही माहिती संसद सदस्यांना कळवू नका, असे सांगितले होते. तरीही तुम्ही असे का केले, असे विचारल्यावर जेम्स काॅमीचे म्हणणे असे होते की, ही माहिती नव्याने समोर आली होती. याबद्द्ल पुढे शोध घ्यायचा झाला तर संसदेचा नव्याने आदेश लागणार. तसा आदेश मिळावा, म्हणून मी ही माहिती संसद सदस्यांना कळविली व त्याचवेळी न्यायखात्यालाही कळविली.
या बाबतची शोधमोहीम निवडणुकीच्या अगोदर पूर्ण होणार नाही, हे उघड आहे. पण आता त्याची आवश्यकता रिपब्लिकन पक्षाला वाटत नाही. आमचे काहीच महणणे नाही. एफबीआय काय म्हणते आहे, ते पहा. अशा परिस्थितीत काय करायचे? असा प्रश्न शहाजोगपणे डोनाल्ड ट्रंप जेव्हा श्रोत्यांना विचारतात, तेव्हा, ‘अरेस्ट हर, अरेस्ट हर’, अशा आरोळ्या श्रोतृवर्गातून उठतात. वस्तुस्थिती अशी आहे की, त्या ईमेल्समध्ये काय आहे, हे कुणालाच माहिती नाही. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, डेमोक्रॅट पक्षाला हे जनतेला पटवून देता येत नाही आणि रिपब्लिकन पक्षाला तर त्यात काय आहे, हे सांगण्याची गरजच राहिलेली नाही. नव्हे ते गुलदस्तात राहिलेलेच त्यांना हवे आहे.
बातमी फुटण्याचा परिणाम - पण आपण वाॅशिंगटन पोस्ट आणि ए बी सी वाहिनीच्या चमूला काय दिसले/आढळले ते बघू. शोध पथकाला पुढे आणखी चौकशी करा, असा आदेश प्राप्त झाला आहे. क्लिंटनसमर्थक मतदारांपैकी सुमारे साठ टक्के मतदारांवर या रहस्यभेदाचा(?) परिणाम नाही. पण ३२ टक्के म्हणतात की, आम्ही आता हिलरी क्लिंटन यांना मत न देण्याचा विचार करू शकतो. ८ टक्के सध्यातरी प्रतिक्रिया देत नाहीत. साठ टक्के मतदार पक्के आहेत म्हणून आनंद मानायचा की ३२ टक्के मतदार हातचे निसटतात की काय या शक्यतेने घोर लावून घ्यायचा? सध्या डेमोक्रॅट पक्षाचा उद्रेक नुसता उफाळतो आहे. जेम्स काॅमीच्या बेजबाबदारणाचा कळस झाला आहे, या पलीकडे ते काही म्हणूही शकत नाहीत. यापेक्षा जास्त कडक भाषा वापरली तर ती बुमरॅंग होऊन तिचा उलट परिणाम होईल. निवडणुकीनंतर पाहून घेऊ, असेही ते म्हणू शकत नाहीत. निवडणुकीपूर्वी चौकशी पूर्ण करा, असे ते म्हणताहेत, पण हे शक्य नाही हे त्यांच्याप्रमाणे इतर सर्वांनाही कळते आहे. रिपब्लिकन्स मात्र याच्यापुढे वाॅटरगेट प्रकरण काहीच नाही, असे म्हणत टोला हाणीत आहेत. निक्सन अध्यक्ष (रिपब्लिकन पक्ष) असतांना त्यांच्या अनुमतीने/ सूचनेने डेमोक्रॅट पक्षाच्या कार्यालयात (कार्यालयाचे नाव वाॅटरगेट असे आहे) छुपे मायक्रोफोन कार्यालयातील बोलणी कळावीत म्हणून बसवण्यात आले होते.
शोधपत्रकारांनी उडविली धमाल - हे कमी होते म्हणून की काय आणखी एक प्रकरण आता म्हणजे १ नोव्हेंबरला दोन शोधपत्रकारांच्या टिप्पणीसह पुढे आले आहे. रोझॅलिंड हेल्डरमन ही वाॅशिंगटन पोस्टची राजकीय कूटनीती वार्ताहर व शोधपत्रकार आहे तर सारी हाॅर्विझ न्यायक्षेत्राशी संबंधित बातम्यांवर लक्ष ठेवून असते. या दोघींच्या मते, एफबीआय या अमेरिकन गुप्तहेर खात्याचे डायरेक्टर जेम्स काॅमी हे स्वत:सुद्धा काहीसे अडचणीत आले आहेत. अमेरिकेत एफबीआय न्यायखात्याच्या आधिपत्त्याखाली येते. सामान्य दंडक असा आहे की निवडणुकीवर परिणाम होऊ शकेल, अशी वृत्ते एफबीआयने जाहीर करू नयेत. पण अमेरिकेत आपल्यासारखाच किंवा आपल्यापेक्षाही अधिक ‘युजर फ्रेंडली’ माहितीच्या अधिकाराचा कायदा आहे. त्यातही एखादा अहवाल कळवा, अशी विनंती करण्यात आली तर ती माहिती कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय किंवा मध्यस्ती किॅवा अनुमतीशिवाय ‘फर्स्ट इन फर्स्ट आऊट’ या नियमानुसार माहितीपटलावर आपोआप टाकली जाते. हा नियम व खुद्द जेम्स काॅमी यांची चतुराई या दोन्ही बाबींमुळे काय प्रताप घडले असावेत, हे या दोघींनी सविस्तरपणे पुढे ठेवले आहेत.
एक नोव्हेंबर २०१६ ला एफबीआयने ट्विट केले की, बिल क्लिंटन यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात डेमोक्रॅट पक्षाच्या एका फरार कार्यकर्त्याला - मार्क रिच याला - कशी क्षमा केली त्याबद्दलचे १२९ पानांचे दस्तऐवज आता एफबीआयच्या वेबसाटवर उपलब्ध आहेत. त्यातून हा कार्यकर्ता देणगीदार (क्लिंटन फाऊंडेशनचा?) होता.
बिल कलिंटन यांच्या कारकिर्दीतील हे एक अतिशय काळे प्रकरण (डार्केस्ट चॅप्टर) मानले जाते. पण हे जुने मढे निवडणूक अगदी तोंडावर आली असतांना उकरून काढण्याची काय आवश्यकता होती, असा संतप्त सवाल डेमोक्रॅट पक्षाने केला. सोबतच खवचटपणे विचारले आहे की, डोनाल्ड ट्रंप यांच्या करबुडवेपणाच्या १९७० सालच्या जुन्या कहाण्या तुम्ही आता वेबसाईटवर टाकणार काय?
हे प्रकरण ईमेल्स प्रकरणानंतरचे असल्यामुळे (१ नोव्हेंबर) डेमोक्रॅट पक्ष खूपच खवळला आहे. एफबीआय ही आता गैरराजकीय यंत्रणा राहिलेली नसून. ती आता राजकारणात रस घेऊ लागली आहे, असे दिसते, अशा शब्दात डेमोक्रॅट पक्षाने आपली भडास ओकली आहे. पण याबाबत जेम्स काॅमी यांची बाजू तगडी आहे. विनंती अर्ज आल्यामुळे मार्क रिच याचे प्रकरण कुणाच्याही हस्तक्षेपाशिवाय आपोआप वेबसाईटवर टाकले गेले. डोनाल्ड ट्रंप यांच्याबद्दल आता कुणी माहिती मागितली तर ती याच नियमानुसार उघड होईल, हे उघड आहे. पण तशी विनंती कुणी आता केल्यास ‘फर्स्ट इन फर्स्ट आऊट’ या नियमानुसार जेव्हा उघड होईल तोपर्यंत निवडणूक आटोपलेली असेल.
डेमोक्रॅट पक्षाचा आक्षेपाचा दुसरा मुद्दा असा आहे की, त्या पक्षाने डोनाल्ड ट्रंप यांचे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी सूत जमले असून डोनाल्ड ट्रंप यांना या निवडणुकीत रशिया मदत करीत आहे, या बाबीची चौकशी मागितली होती. तेव्हा निवडणूक तोंडावर आली असतांना अशी चौकशी करणे संकेतांना व नियमांना धरून होणार नाही, असे उत्तर जेम्स काॅमी यांनी दिले होते. डेमोक्रॅट पक्ष रशियाशी संगनमताचा आरोप आता प्रचारात करीत आहेच. पण एफबीआयने अशी चौकशी सुरू केली असती तर पाहुण्याच्या हातून साप मारला गेला असता व डेमोक्रॅट पक्ष नामानिराळा राहू शकला असता. राजकीय दृष्ट्या हे अधिक सोयीचे झाले असते
डॅम्ड ईमेल्स - पण ईमेल्सचे प्रकरण तसे नाही. दोन बलदंडांच्या गदायुद्धात जेम्स काॅमी नेमके व अगदी मधोमध अडकले आहेत. हे प्रकरण समोर का आले? हिलरी क्लिंटन यांच्याशी प्रत्यक्ष संबंध नसलेली चौकशी सुरू होती. एका संसद सदस्याशी -एॅंथनी वीनर नावाच्या सदस्याशी- संबंधात ही चौकशी होती. या चौकशीत हिलरी क्लिंटन यांनी आपल्या सहाय्यिकेला पाठविलेल्या काहीशे ईमेल्स या एॅंथनी वीनर कडे असल्याचे सत्कृत्दर्शनी दिसते आहे. या ईमेल्सही ‘त्या’ शापित ईमेल्सपैकी तर नाहीत ना, ही चौकशी आता होणार आहे. हिलरी क्लिंटन यांच्या खाजगी सर्व्हरवरून पाठविलेल्या ईमेल्सचा उल्लेख अमेरिकन वृत्तसृष्टी ‘शापित ईमेल्स (डॅम्ड ईमेल्स) या शब्दात करते.
कालचा नि:पक्षपाती आजचा ढोंगी- वर्षभरापूर्वी दोन्ही पक्ष एफबीआयची पक्षातीत संस्था व जेम्स काॅमीची, एक पक्षातीत भूमिका घेऊन वावराणारी व्यक्ती, म्हणून स्तुती करीत असत. पण जुलै महिन्यात पहिली माशी शिंकली. खाजगी ईमेल सर्व्हरचा वापर हिलरी क्लिंटन यांनी केला ही बाब निष्काळजीपणाची होती असे फारतर म्हणता येईल, अशी भूमिका जेम्स काॅमी यांनी घेतली. कोणताही वाजवी विचार करणारा फिर्याददार (रिझनल प्राॅसिक्युटर) त्यांच्यावर बेजबाबदारपणाचा (मिसहॅंडलिंगचा) आरोप करणार नाही, असे जेम्स काॅमीनी म्हणताच डेमोक्रॅट पक्षाने त्यांच्या हॅटवर नि:पक्षातीतपणाचे मोरपीस खोचून त्यांच्यावर स्तुतीसुमने वाहिली तर डोनाल्ड ट्रंप व रिपब्लिकनांनी त्यांच्यावर पक्षपाती म्हणून ठपका ठेवला. आता दोन्ही पक्षांच्या भूमिका एकदम उलट्या झाल्या आहेत.
डेमोक्रॅट पक्ष जेम्स काॅमीवर ढोंगीपणाचा (हिपोक्रसी) आरोप करीत आहे. तर डोनाल्ड ट्रंप त्यांचे पोवाडे गात आहेत. मार्क रिच ला माफी मिळू नये, अशी भूमिका घेणाऱ्यांचे वकीलपत्र जेम्स काॅमी यांनी एक नवोदित वकील म्हणून २००८ च्या आसपास घेतले होते, ही माहिती आता पुढे येते आहे. त्यामुळे आगीत तेल पडले आहे.
कमीतकमी नको असलेला कोण? - अमेरिकेतील २०१६ च्या निवडणुकीचे एक खास वेगळेपण हे आहे की, मतदारांना हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रंप हे दोनही उमेदवार सारखेच नकोसे झाले आहेत. दर दहापैकी सहा मतदारांचे मत हिलरी क्लिंटन विषयी चांगले नाही.तर निम्मे मतदार दोघांही बद्दल चांगले बोलत नाहीत. त्यामुळे यावेळी जास्तीतजास्त हवा असलेला उमेदवार निवडून येणार नाही तर कमीतकमी नको असलेला उमेदवार निवडून येणार आहे. या आगळ्यावेगळ्या चुरशीत आताआतापर्यंत हिलरी क्लिंटन आघाडीवर होत्या. पण डोनाल्ड ट्रंप दोघांमधला फरक हळूहळू का होईना, पण कमी करत चालले होते. आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत ही स्थिती होती.
कोण चूक, कोण बरोबर? - पण हिलरी क्लिंटन यांनी नष्ट केलेल्या शेकडो ईमेल्स हाती लागल्या आणि लढतीचे स्वरूपच बदलले. याचे कारण असे होते की, दोघांही जवळचा दारूगोळा संपला होता. तेच ते मुद्दे वारंवार उगाळून झाले होते. त्यामुळे एक स्थिरता प्राप्त झाली होती आणि या स्थितीत हिलरी क्लिंटन थोडीशी का असेना पण आघाडी मिळवून होत्या. हीच स्थिती ८ नोव्हेंबरपर्यंत कायम राहिली की अध्यक्षपद आपलेच असणार, असा हिलरी क्लिंटन यांचा व समर्थकांचा होरा होता. कारण आता नवीन मुद्दा समोर येण्याची शक्यता नव्हती. पण नष्ट केलेल्या नवीन ईमेल्सचा गठ्ठा एफबीआयच्या हाती सापडतो काय, जस्टिस डिपार्टमेंट याबाबत बोलण्याची अनुमती देणार नाही, याची कल्पना असल्यामुळे ही बाब संसद सदस्यांच्या नजरेला आणून, पुढील चौकशीसाठी त्यांची अनुमती घेणे आवश्यक असल्याची सबब पुढे करून दोन्ही यंत्रणांना एकाच वेळी कळविण्याची चतुराई रिपब्लिकन पार्श्वभूमी असलेले जेम्स काॅमी हे प्रमुख अधिकारी करतात काय, या सर्व गोष्टी कुणालाही अगोदर सुचणे व प्रतिबंधात्मक कारवाई काळजी म्हणून अगोदर काही पावले उचलण्याची कल्पना हिलरी क्लिंटन व समर्थकांना सुचणे व तशी ती घेता येणे शक्यच नव्हते. आता कितीही जळफळाट झाला, कोण चूक व कोण बरोबर याचा काथ्याकूट होऊन भविष्यात कुणावरही ठपका आला, तरी जे व्हायचे ते होऊन गेले आहे.
मतदार मतदानाला बाहेर पडले पाहिजेत - सद्य स्थितीत आपले मतदार मतदानासाठी बाहेर निघालेच पाहिजेत, असे डेमोक्रॅट पक्षाला वाटते आहे. ट्रंप : क्लिंटन ४६:४५ असा सध्याचा कल आहे.म्हणजे डोनाल्ड ट्रंप यांना एक टक्याची निसटती का होईना पण बढत आहे. स्विंग स्टेट्स मधील तीनपैकी दोन स्टेट्समध्ये डोनाल्ड ट्रंप यांना आघाडी मिळणार अशी चिन्हे आहेत. तर इकडे डेमोक्रॅट पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह मावळतीकडे झुकला आहे. सर्व गोरे ख्रिश्चनअसले तरी एकाच ख्रिश्चन पंथाचे नाहीत; सनातन्यांमध्येही गट आहेत; त्यात ट्रंप ६० ते ८८ टक्के मते घेतील, उदारमतवादी ख्रिश्चनांमध्ये हिलरी ६५ टक्के मते घेतील पण हे पण संख्येने कमी आहेत. हिलरी क्लिंटन यांचे मतदार सामान्यत: तरूण, उच्चशिक्षित, उदारमतवादी व समतोल, महिला, धर्म न मानणारे, शहरी, काळे व स्पॅनिश गटातील मतदार असतात, असे मानले जाते. मतदार नोंदविण्याची शेवटची तारीख आता आटोपली आहे. मतदार म्हणून नोंदवण्याची शेवटची तारीख राज्यागणिक वेगवेगळी असते. २४ आॅक्टोबरला बहुतेक राज्यांची अखेरची तारीख संपली आहे. व्हिस्काॅन्सिन या राज्यात मात्र मतदानाच्या दिवशीही नोंदणी करून मतदान येते.
मतदानाला प्रारंभ झाला आहे - बहुसंख्य मतदार आठ नोव्हेंबरला मतदान करतील. पण मतदानाला सुरवात झालीही आहे. हे कसे काय?
ॲबसेंटी बॅलट - ३७ राज्ये नोंदणी झालेल्या मतदारांना ८ नोव्हेंबरच्या अगोदर पत्राने मतदान करू देतात. काहीच राज्यात यासाठीचे कारण विचारतात. याची अंतिम तारीख राज्यागणिक वेगवेगळी असते. ती आटोपली आहे किंवा लवकरच आटोपेल.
अर्ली व्होटिंग - नोंदणीकृत मतदार निवडणुकीच्या दिवसाच्या अगोदरही मतदान करू शकतो. पण स्वत:ला जाऊन मतदान करावे लागते. याचे वेळापत्रक राज्यनिहाय वेगळे असते. हा सर्व उल्लेख मुद्दाम अशासाठी करायचा की हा जागृत मतदार असतो. व्यापामुळे, प्रवासात असल्यामुळे किंवा अशाच काही कारणास्तव जे मतदार ८ नोव्हेंबरला मतदान करू शकणार नाहीत. त्यांच्यासाठीची ही खास संधी आहे. हे मतदार मतदानाला जात असतांना एकापाठोपाठएक असे अधिक प्रक्षोभक वृत्त त्यांच्या कानावर पडते आहे. मतदान करून बाहेर येणारे वृत्त वाहिन्यांशी मोकळेपणाने बोलतात. त्यांच्यावर या सर्व घडामोडींचा परिणाम होतो आहे, असे वृत्त आहे.
आता डेमोक्रॅट पक्षाचे अनेक समर्थक मतदार म्हणत आहेत की, आम्ही घरीच बसू. मतदानाला जाणारच नाही कारण डोनाल्ड ट्रंप यांना मत देणे आम्हाला शक्य नाही आणि हिलरी क्लिंटन यांना आता आम्ही मत देणार नाही. फॅक्ट्स आर स्ट्रेंजर दॅन फिक्शन (वस्तुस्थिती कल्पितापेक्षाही चमत्कारिक असते) असे वचन आहे. राजनीती या सर्वावर कडी करणारी ठरणार असे दिसते.

No comments:
Post a Comment