अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक - कहानीमे ट्विस्ट
वसंत गणेश काणे
हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रंप या दोघात आता फक्त केवळ दोन चाच फरक उरला असून हिलरी क्लिंटन जरी आजही पुढे असल्या तरी दोन अंकांचा फरक डोनाल्ड ट्रंप केव्हाही भरून काढू शकतील, अशी स्थिती आहे. हे निदान एखाद्या कुडबुड्या ज्योतिष्याचे नसून वाॅशिंगन पोस्ट व एबीसी यांच्या निवडणुकीसंबंधांवर नजर ठेवून असलेल्या चमूचे आहे. निवडणुकीला जेमतेम एक आठवडा असतांना चुरस एकदम वाढली असून जवळजवळ सर्व प्रमुख रिपब्लिकन गट डोनाल्ड ट्रंप यांच्या तंबूत परतले आहेत. ४७ टक्के हिलरी क्लिंटन यांचे बाजूने तर ४५ टक्के डोनाल्ड ट्रंप यांचे बाजुला, अशी चुरस असून अन्य सर्व अध्यक्षीय उमेदवार (१००-४७-४५=८) उरलेल्या ८ टक्क्यातच गुंडाळले जातांना दिसत आहेत. अमेरिकन राजकारण पुन्हा द्विपक्षीय राजकारणाकडे वळत असून ‘तिसरी आघाडी’ हवेतच विरतांना दिसत आहे. तसे पाहिले तर दोन उमेदवारात असलेला देन अंकी फरक कमी होत चाललेला दिसत होताच. पण तो इतका कमी होईल असे वाटत नव्हते.
संख्याशास्त्रीय (स्टॅटिस्टिक्स) भाषेत बोलायचे तर आपल्या निदानात +/- तीन टक्के इतका फरक पडू शकतो, असे हा अहवाल म्हणतो आहे. मतदारांचे सगळ्या प्रमुख गटांशी संपर्क करून हा अहवाल बेतलेला आहे. भरीतभर अशी आहे की, हा अहवाल एफ बी आय (फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशन) च्या बाबतीत एक सनसनाटी बातमी यायच्या अगोदरची ही बाब आहे.
काय आहे ही बातमी? - हिलरी क्लिंटन या परराष्ट्रमंत्री असतांना खाजगी ईमेल अकाऊंटचा वापर शासकीय आमासाठी करीत असत, हे जेव्हा बाहेर आले, तेव्हाच अमेरिकन जनमत त्यांच्या विरोधात गेले होते, हे आपण जाणतो. हिलरी क्लिंटन सारख्या राजकारणात मुरलेली व्यक्तीच्या हातून हे सहज, उगीच, चुकून घडले असेलयावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, हेही उघड आहे. ज्यावेळी हे घडले तेव्हा याबाबतचे नियम आजच्या इतके काटेकोर नव्हते, हेही गृहीत धरले तरीही हिलरी क्लिंटन सारखी मुरब्बी राजकारणी महिला अशी ‘चूक’ करील, हे मानायलाही अमेरिकन जनमत तयार नव्हते. त्यातच क्लिटन फाऊंडेशनच्या देणगीदारांच्या यादीतील संशयास्पद व्यक्ती व देशांची नावेही समोर आली. या फाऊंडेशनचे काम निखळ मानवतावादी दृष्टिकोनातून चालते, असे गृहीत धरले (तसे ते होते का?) तरी या देणग्या समर्थनीय ठरत नाहीत. देणगीदारांना हिलरी क्लिंटन यांची भेट अग्रक्रमाने मिळत असे, एवढाच मुद्दा भ्रष्टाचार झाला, असा निष्कर्ष काढण्यास पुरेसा नाही, हे मत जरी न्यायालयाने व्यक्त केले असले तरी या ईमेल्स काही हिलरी क्लिंटन यांची पाठ सोडण्यास तयार नाहीत. ‘ही माझी चूक झाली, असे मी करावयास नको होते, असे मला वाटते, यापुढे मी असे करणार नाही’, हे बाळबोध समर्थन व खुलासे कुणालाही विश्वास ठेवण्यायोग्य वाटत नव्हते. सीझरच्या पत्नीचे वर्तन संशयापलीकडचे असले पाहिजे ( सीझर्स वाईफ शुड बी अबाव्ह सस्पिशन), असे म्हणतात. त्यातला हा प्रकार आहे. पण हा मुद्दा आता चघळून चघळून बेचव झाला होता. तरीही ही बाब अगोदरच ६२ टक्के अमेरिकनांना आवडली नव्हती व ४८ टक्के लोक तर यामुळे अक्षरश: संतापले होते. या विषयाला नवसंजीवनी मिळाली आहे ती अशी की, एफ बी आयच्या हाती हिलरी क्लिंटन यांनी नष्ट केलेल्या आणखी पाचशे ईमेल्स लागल्या असून त्या उलगडण्यात या गुप्तहेर यंत्रणेला यश आले आहे. यातील मजकूर अजून बाहेर आलेला नाही.
तसे पाहिले तर एफ बी आय च्या एजंटांना ही माहिती एक महिना अगोदरच कळली होती. पण ती त्यांनी ती प्रमुखांना - जेम्स काॅमी यांना- आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर कळवली आहे. त्यांनीही गप्प बसवे ना? तर तेही नाही. जेम्स काॅमी यांनी सर्व आमदार/खासदारांना दुसऱ्याच दिवशी पत्र लिहून ही बाब कळवली. झाले. एकच भडका उडाला. क्लिंटन समर्थकांनी जेम्स काॅमी बदडायचेच काय ते बाकी ठेवले. ही माहिती मी अगोदर जाहीर केली असती तर त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकेल, असे म्हणून जेम्स काॅमी यांनी आगीत तेल ओतले. याला आणखीही एक किनार आहे. जेम्स काॅमी एफ बी आयमध्ये येण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षात होते. त्यामुळे हिलरी क्लिंटन अक्षरश: कडाडल्या. जस्टीस डिपार्टमेंटने ही माहिती संसद सदस्यांना कळवू नका, असे सांगितले होते. तरीही तुम्ही असे का केले, असे विचारल्यावर जेम्स काॅमीचे म्हणणे असे होते की, ही माहिती नव्याने समोर आली होती. याबद्द्ल पुढे शोध घ्यायचा झाला तर संसदेचा नव्याने आदेश लागणार. तसा आदेश मिळावा, म्हणून मी ही माहिती संसद सदस्यांना कळविली.
शोध निवडणुकीच्या अगोदर पूर्ण होणार नाही, हे उघड आहे. पण आता त्याची आवश्यकतारिपब्लिकन पक्षाला वाटत नाही. अशा परिस्थितीत काय करायचे?, असा प्रश्न शहाजोगपणे डोनाल्ड ट्रंप जेव्हा श्रोत्यांना विचारतात, तेव्हा, ‘अरेस्ट हर, अरेस्ट हर’, अशा आरोळ्या श्रोत्रुवर्गातून उठतात. वस्तुस्थिती अशी आहे की, त्या ईमेल्समध्ये काय आहे, हे कुणालाच माहिती नाही. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, डेमोक्रॅट पक्षाला हे जनतेला पटवून देता येत नाही आणि रिपब्लिकन पक्षाला तर त्यात काय आहे, हे सांगण्याची गरजच राहिलेली नाही.
पण आपण वाॅशिंगटन पोस्ट आणि ए बी सी वाहिनीच्या चमूला काय दिसले/आढळले ते बघू. शोध पथकाला पुढे आणखी चौकशी करा, असा आदेश प्राप्त झाला आहे. क्लिंटन समर्थक मतदारांपैकी सुमारे साठ टक्के मतदारांवर या रहस्यभेदाचा(?) परिणाम नाही. ३२ टक्के म्हणतात की, आम्ही आता हिलरी क्लिंटन यांना मत न देण्याचा विचार करू शकतो. ८ टक्के सध्यातरी प्रतिक्रिया देत नाहीत. साठ टक्के मतदार पक्के आहेत म्हणून आनंद मानायचा की ३२ टक्के मतदार हातचे निसटतात की काय या शक्यतेने घोर लावून घ्यायचा? सध्या डेमोक्रॅट पक्षाचा नुसता उद्रेक उफाळतो आहे. जेम्स काॅमीच्या बेजबाबदारणाचा कळस झाला आहे, या पलीकडे ते काही म्हणूही शकता नाहीत. यापेक्षा जास्त कडक भाषा वापरली तर ती बुमरॅंग होऊन तिचा उलट परिणाम होईल. निवडणुकीनंतर पाहून घेऊ, असेही ते म्हणू शकत नाहीत. निवडणुकीपूर्वी चौकशी पूर्ण करा, असे ते महणताहेत, पण हे शक्य नाही हे त्यांच्या प्रमाणे इतर सर्वांनाही कळते आहे. रिपब्लिकन्स मात्र याच्यापुढे वाॅटरगेट प्रकरण काहीच नाही, म्हणून टोला हाणीत आहेत. निक्सन अध्यक्ष (रिपब्लिकन पक्ष) असतांना त्यांच्या अनुमतीने/ सूचनेने डेमोक्रॅट पक्ष पक्षाच्या कार्यालयात (कार्यालयाचे नाव वाॅटर गेट असे आहे) छुपे मायक्रोफोन कार्यालयातील बोलणी कळावीत म्हणून बसवण्यात आले होते.
डेमोक्रॅट पक्षाचे अनेक समर्थक म्हणत आहेत की, आम्ही घरीच बसू. मतदानाला जाणारच नाही डोनाल्ड ट्रंप यांना मत देणे आम्हाला शक्य नाही आणि हिलरी क्लिंटन यांना आता आम्ही मत देणार नाही. फॅक्ट्स आर स्ट्रेंजर दॅन फिक्शन (वस्तुस्थिती कल्पितापेक्षाही चमत्कारिक असते) असे वचन आहे. राजनीती या सर्वावर कडी करणारी ठरणार असे दिसते.
"

No comments:
Post a Comment