इस्लामिक बॅंक व इस्लामिक विंडो
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९/ ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
इस्लामिक बॅंकिंगमध्ये दोन महत्त्वाची तत्त्वे आहेत. पहिले तत्त्व नफा व तोट्याच्या वाटपाशी संबंधित असून दुसरे तत्त्व व्याज देण्याघेण्याच्या बंदी संबंधातले आहे. रुणकोने व्याज देणे व धनकोने व्याज घेणे इस्लामला मान्य नाही.
रिझर्व्ह बॅंकेचा प्रस्ताव - रिझर्व्ह बॅंकेने देशातील प्रत्येक बॅंकेत एक इस्लामिक खिडकी असावी, व मुस्लिमांना त्या बॅंकेत पैसे ठेवता यावेत व हा आर्थिक व्यवहार मुस्लिम परसनल लाॅ नुसार चालावा, अशा आशयाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आपल्या अनुकूल शिफारसीसह पाठवला आहे. याबद्द्ल अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी ही संकल्पना काय आहे व प्रेषित महंमद पैगंबर साहेबांनी याबाबत काय म्हटले आहे, हे समजून घेणे उपयोगाचे ठरणार आहे.
दोन प्रमुख बंधने - यात दोन महत्त्वाची तत्त्वे आहेत. पहिले नफा व तोट्याच्या वाटपाशी संबंधित असून दुसरे व्याज देण्याघेण्याच्या बंदी संबंधातले आहे. रुणकोने व्याज देणे व धनकोने व्याज घेणे इस्लामला मान्य नाही. तसेच दारू, जुगार व डुकराचे मास याबाबतीतले आर्थिक व्यवहार व गुंतवणुकी इस्लामला मान्य नाहीत. त्यावर बंदी आहे.
शरीयत हा आधार - इस्लामिक बॅंक शरीयत कायद्यानुसार चालते. हा कायदा कुराण व हदिद वर आधारित आहे. एखादा नवीन मुद्दा उपस्थित झाला किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता निर्माण झाली तर एकतर विद्वान मंडळींचा सल्ला तरी घेतला जातो किंवा कुराणातील तत्त्वांना किंवा रीतीरिवाजांना अनुसरून स्वतंत्र तर्क करून तो निकालात काढला जातो.
पूर्वेतिहास - इस्लामिक बॅंकिंगचा प्रारंभ सातव्या शतकात म्हणजे इस्लामच्या जन्माबरोबरच झाला आहे. प्रेषित महंमद पैगंबर साहेबांची पहिली पत्नी खादिजा ही व्यापारी होती आणि प्रेषित महंमद पैगंबर साहेब तिचे एजंट म्हणून काम पाहत असत. या व्यवहारात जी तत्त्वे अनुसरली जात ती बहुतेक सर्व इस्लामिक बॅंकिंगची तत्त्वे आहेत.
तत्त्वांचे अनुसरण - मध्यंतरीच्या काळात मुस्लिम जगतातील व्यापार व व्यवसाय करतांना इस्लामिक तत्वे अनुसरली जात. या संकल्पना पुढे हळूहळू स्पेन,भूमध्य समुद्राशी संलग्न प्रदेशात तसेच बाल्टिक राज्यात प्रसारित झाली. १९६० व १९७० या कालखंडाच्या दरम्यान इस्लामिक बॅंकिंगची कल्पना आधुनिक जगतात पुन्हा उदयाला आली. आजचे बॅंकिंग पाश्चात्यांच्या बॅंकिंगच्या तत्त्वांनुसार असून त्याला इस्लामिक बॅंकिंगचाच आधार आहे, असे मानतात.
बॅंक चालते कशी? - व्याज न आकारता या बॅंका पैसा कसा मिळवतात? या तत्त्वाला ‘इक्विटी पार्टिसिपेशन सिस्टीम्स’, असे नाव आहे. समजा या बॅंकेने एखाद्या उद्योगाला कर्ज दिले तर तो उद्योग ते कर्ज व्याज न देता परत करतो, पण असे करत असतांना तो उद्योग बॅंकेला आपल्या नफ्यात भागीदार करतो. म्हणजेच नफ्यातला काही हिस्सा बॅंकेला देतो. जर उद्योगात नफा झाला नाही तर बॅंकेलाही नफ्याचा हिस्सा मिळत नाही.
मध्यंतरीच्या काळात मुस्लिम जगतातील व्यापार व व्यवसाय करतांना इस्लामिक तत्वे अनुसरली जात.या संकल्पना पुढे हळूहळू स्पेन, भूमध्य समुद्राशी संलग्न प्रदेशात तसेच बाल्टिक राज्यात प्रसारित झाली. १९६० व १९७० या कालखंडाच्या दरम्यान इस्लामिक बॅंकिंगची कल्पना आधुनिक जगतात पुन्हा उदयाला आली. आजचे बॅंकिंग पाश्चात्यांच्या बॅंकिंगच्या तत्त्वांनुसार असून त्याला इस्लामिक बॅंकिंगचाच आधार आहे, असे मानतात.
इस्लामिक विंडो एक वेगळी कल्पना - इस्लामिक बॅंकेप्रमाणे इस्लामिक विंडो(खिडकी) अशी वेगळी कल्पना आहे. इस्लामिक बॅंक इस्लामिक बॅंकिंग तत्त्वांचे तंतोतंत पालन करते. जेव्हा सर्वसामान्य बॅंका इस्लामिक तत्त्वांना अनुसरून सेवा पुरविते, तेव्हा तिला इस्लामिक विंडोद्वारे पुरविलेली सेवा असे म्हणतात.
ओमानमध्ये निझ्वा बॅंक व अल इझ इस्लामिक बॅंक अशा दोन इस्लामिक बॅंका आहेत. पण सहा व्यापारी बॅंका असून त्या इस्लामिक बॅंकिंग सेवा इस्लामिक विंडोद्वारे देत असतात.
१९६३ मध्ये इजिप्तमध्ये इस्लामिक बॅंक उभारली गेली. तिने नफ्यातील हिस्सेवारीच्या तत्त्वाला अनुसरून उद्योगांना कर्ज दिले. जोखीम कमी व्हावी म्हणून मागितलेल्या कर्जाच्या ४० टक्के इतकेच कर्ज दिले. बुडिताचे प्रमाण शून्य होते.
भारतात काही आधुनिक मुस्लिम व्यापारी बॅंकेत पैसे ठेवतात हे सोडले तर बाकीचे आपला पैसा स्वत:जवळच ठेवतात, असे मानतात. हा पैसा देशाच्या मुख्य आर्थिक प्रवाहात यावा व अनुदानादी रकमा त्यांच्या खात्यावर जमा करता याव्यात, असा उद्देश समोर ठेवून रिझर्व्ह बॅंकेने ही योजना केंद्र शासनाकडे शिफारसीसह पाठविली असावी.
प्रतिसाद - अनेक मुस्लिम नेत्यांनी या योजनेचे स्वागत केले असून शिवसेनेच्या खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी स्वागत करता करता मुसलमानांना ‘बेवकूफ’ बनविण्याची ही चाल तर नाहीना, अशी संका व्यक्त केली आहे. इस्लामिक बॅंक व इस्लामिक विंडो यांची सर्वसाधारण माहिती वाचकांना असावी, एवढाच मर्यादित हेतू समोर ठेवून हा लेख लिहिला आहे.

No comments:
Post a Comment