Thursday, November 10, 2016



अमेरिकेने  आजवरचा सर्वात म्हातारा अध्यक्ष निवडला.
वसंत गणेश काणे
यापूर्वीच्या चाचणीनुसार डेमोक्रॅट पक्षाच्या हुकमी इलेक्टोरल मतांची संख्या २१७ इतकी तर रिपब्लिकन पक्षाच्या हुकमी इलेक्टोरल मतांची संख्या १९१ होती. म्हणजे दोन्ही पक्षांची एकूण हुकमी इलेक्टोरल मते २१७+ १९१ = ३०८ इतकी होतात. याचा अर्थ असा की, १३०  इलेक्टर्स सध्यातरी कुंपणावर होते. या १३० पैकी डेमोक्रॅट पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी ५३ इतकी तर रिपब्लिकन पक्षाला ७९ इतकी इलेक्टोरल मते हवीहोती . ही १३० इलेक्टोरल मते कलाटणी देऊ शकणाऱ्या राज्यातील (स्विंग स्टेट्स) मते होती. अशी जवळपास दहा राज्ये होती. त्यात प्रामुख्याने फ्लोरिडा(२९ मते) हे राज्य आपल्याकडे कायम ठेवण्यात हिलरी क्लिंटन यांना यश मिळाले. , पेन्सिलव्हॅनिया (२० मते) काट्याची क्कर होऊन केवळ ०.१ मताधिक्य घेऊन डोनाल्ड ट्रंप यांनी हिलरी क्लिंटन यांना मात देऊन हे राज्य आपलयाकडे खेचून आणताच निकाल सपष्ट झाला.    ओहायो (१८ मते) व नाॅर्थ करोलिना (१५ मते)ही राज्ये डोनाल्ड ट्रंप यानी आपल्याकडे कायम राखली. तर व्हर्जिनिया(१३ मते)  हिलरी क्लिंटन यांनी आपल्याकडे कायम राखले. व्हिस्काॅन्सिन (१० मते) राज्यातही काट्याची टक्कर झाली. केवळ एक क्याच्या मताधिक्याने हे राज्य डोनाल्ड ट्रंप यांच्या पारड्यात पडले. या राज्यात सर्वसामान्य मतदारांची ५० टक्यापेक्षा जास्त मते आपल्यायला मिळावीत, यासाठीच शेवटच्या टप्यातील प्रचार युद्ध शिगेला पेटले होते. कारण ज्या पक्षाला पन्नास टक्याच्यावर सर्वसामान्य मते मिळतील, त्या राज्याच्या वाट्याचे सर्व इलेक्टर्स निवडून आले असे ठरणार होते. असे २७० इलेक्टर्स ज्या उमेदवाराचे निवडून येतील, तो अमेरिकेचा अध्यक्ष  होणार होता. प्रत्यक्षात शेवटी २९० मते डोनाल्ड ट्रंप यांनी मिळवली  व विजय संपादन केला. जवळ जवळसहा कोट मते प्रत्येक उमेदवाराला मिळाली आहेत. त्यात सध्या उपलब्ध माहितीनुसार फक्त २५ हजारांचाच फरक दिसत असला तरी तो एक लाखाच्या आतच राहील,असे दिसते. अशाप्रकारे पाॅप्युलर व्होट्स(एकूण मते) वगळता, इलेक्टोरल व्होट्स, दोन्ही सभागृहे या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवि ण्याची किमया ट्रंप यांनी दाखविली आहे. ते आजवरचे सर्वात म्हातारे व उद्योजक, टिव्ही स्टार (रिएलिटी शो) असलेले अध्यक्ष असणार आहेत.
 सुरवातीला हिलरी क्लिंटन या आघडीवर होत्या. कॅलिफोर्निया हे सर्वात मोठे राज्य (५५ मते) ६० टक्यापेक्षा जास्त मते घेत त्यांनी आपल्याकडे कायम ठेवताच त्या जिकतील असे वाटू लागले होते. डोनाल्ड ट्रंप छोटी छोटी राज्ये जिंकत चालले होते पण आघाडी हिलरी क्लिंटन यांच्या कडेच होती. असे करता चार मतांच्या आघाडीने पलटी खाल्ली व डोनाल्ड ट्रंप यांना तेवढीच आघाडी मिळाली. पेन्सिलव्हॅनियामध्ये टाय होतांना दिसला. तब्बल वीस मते असलेले हे राज्य केवळ १.१ टक्के अधिक मते मिळवून ट्रंप यांनी जिंकताच हिलरी क्लिंटन यांचे समर्थक रडू लागले. त्यांना शेवटपर्यंत डोळे पुसतच रहावे लागले. हिलरी क्लिंटन यांनी पूर्ण निकालहाती येतो न येतो तोच डोनाल्ड ट्रंप यांचे अभिनंदन करीत खिलाडू वृत्ती प्रगट केली. मतदानावर नजर टाकल्यावर लक्षात येते की डेमोक्रॅट पक्षाचे  व रिपब्लिकन पक्षाचे  बालेकिल्ले मजबूत झाले आहेत. स्विंग स्टेट्स मध्ये अटीतटीची लढाई झाली. निसटते का होईना पण मताधिक्य घेऊन डोनाल्ड ट्रंप यांनी एकतर ही राज्ये कायम राखली किंवा आपल्याकडे जिंकून घेतली.
अध्यक्षपद जिंकून दोन्ही सभागृहात रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे, ही गोष्ट हे दाखवते की अमेरिकन जनतेने सत्तापरिवर्तन एका पक्षाच्या हाती सत्ता सोपवण्याचा मनोमन निर्णय केला होता. पण सभागृहात पक्षाचा आदेश पाळून मतदान करतात, अशीअमेरिकेतील परंपरा,प्रघात व नियम नाही.

No comments:

Post a Comment