Saturday, May 31, 2014

Negative Campaign Backfires

नकारात्मक प्रचार

नको रे बाप्पा!

नकारात्मक प्रचार कसा उलटतो, याचा भारतातील निवडणुकीत चांगलाच अनुभव आल्यामुळे अनेक राजकीय पुढार्‍यांना नकारात्मक प्रचार नको रे बाप्पा!, असे वाटत असावे अशी समजूत होती. पण एवढी जबरदस्त थप्पड खाऊनही अनेकांना शहाणपण आलेले दिसत नाही. मग लक्षात आले की, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हेच खरे. अशी खोड लागूच नये, म्हणून लहानपणापासूनच योग्य संस्कार करण्याचा एक कौतुकास्पद प्रकार नुकताच पाहण्यात/वाचनात आला.
अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील यॉर्क काउंटी मध्ये (काउंटी म्हणजे जिल्हा) वसलेले यॉर्क हे त्याच नावाचे एक टुमदार शहर आहे. या शहरात सेंट्रल यॉर्क हायस्कूल नावाची अठराशे विद्यार्थी असलेली एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. या प्रांतातच नव्हे तर देशभरात एक चांगली शाळा म्हणून तिचा लौकिक आहे. दर महिन्याला या शाळेचे एक मासिक प्रसिद्ध होत असते. द प्राउलर या नावाच्या मासिकात शाळेचे विद्यार्थी निरनिराळ्या विषयावर लेख लिहीत असतात. क्राऊनपेक्षा थोड्यामोठ्या आकाराचे चोवीस पानांचे हे मासिक असून यात एका विद्यार्थिनीने मे महिन्याच्या अंकात ‘निगेटिव्ह कँम्पेन बॅकफायर्स’ या शीर्षकानुसार एक लेख लिहिला आहे.
या लेखाचा हा स्वैर अनुवाद आपल्या देशातील नकारात्मक प्रचार करणार्‍याच्या डोळ्यात चांगलेच अंजन घालेल, असे वाटते. या लेखिकेसमोर आपल्या येथील निवडणुकीतील प्रचारच असावा, असे वाटते. प्रतिस्पर्धी उमेदवाराची सर्व प्रकारची खरीखोटी अंडीपिल्ली काढली की, आपण चांगले उमेदवार आहोत, असे सिद्ध होते, अशी लोकांची समजूत असते. गेल्या मार्चमध्ये अमेरिका देशात अशीच एक निवडणूक पार पडली. पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील गेल्या निवडणुकीत नकारात्मक प्रचाराचा प्रकार अनुभवला आला. एका उमेदवाराने दुसर्‍या विरुद्ध प्रचार करताना त्याची काळी बाजूच समोर यावी, या दृष्टीने प्रचाराचा धुमधडाका सुरू केला. प्रतिस्पर्धी उमेदवार किती आणि कसा वाईट आहे, हेच तो सांगत राहिला. लोक या अपप्रचाराला नुसते कंटाळलेच नाहीत तर त्यांना या अपप्रचाराचा उबग आला. त्यांनी असा प्रचार करणार्‍या उमेदवाराकडे साफ पाठ फिरवली. त्याचा प्रतिस्पर्धी उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आला. परनिंदा करून आपले चांगलेपण सिद्ध होत नाही, हा धडा आपण शिकला पाहिजे.
लेख लिहिणारी मुलगी बारावीची विद्यार्थिनी आहे. तिला ज्या गोष्टी एवढ्या लहान वयात कळल्या त्या आपल्याला मोठेपणी तरी कळतील का?
-  वसंत गणेश काणे
यॉर्क, अमेरिका

Miss America & American Educational Field


मिस अमेरिका आणि अमेरिकन शालेय जगत

अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील यॉर्क नावाच्या शहरात ‘सेंट्रल यॉर्क मिडल स्कूल’ या नावाची तिथल्या शैक्षणिक जिल्ह्यातील (स्कूल डिस्ट्रिक्ट) एक परिसर शाळा (नेबरहुड स्कूल) आहे. अमेरिकेतील माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण तिथल्या जिल्हा परिषदेच्या परिसर शाळांमधून (काऊंटी नेबरहुड स्कूल) मधून दिले जाते. ही या भागातील एक प्रथितयश आणि प्रतिष्ठाप्राप्त शाळा मानली जाते. गेली आठ वर्षे ही शाळा वार्षिक विविधता महोत्सव (डायव्हर्सिटी सेलिब्रेशन) साजरा करीत असते. अमेरिकन समाज हा जगातील विविध देशांतून स्थलांतरित होऊन अमेरिकेत स्थायिक झालेल्या लोकांचा मिळून बनलेला आहे. या प्रत्येक घटकाचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक वारसा वेगवेगळा असतो. अशाप्रकारे तिथल्या बहुतेक भागात अशी संमिश्र प्रजा वसत आहे.
दरवर्षी साजर्‍या होणार्‍या महोत्सवात आपापल्या मूळ संस्कृतीचा परिचय करून देणारे कार्यक्रम त्या त्या संस्कृतीचा वारसा बाळगून असणारे लोक आणि विद्यार्थी सादर करीत असतात. यात खाद्य पदार्थ, वेषभूषा, सण, प्रथा, परंपरा यांचा परिचय एकमेकांना व्हावा, असा प्रमुख उद्देश असतो. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून भविष्यात एकजिनसी अमेरिकन समाज उदयाला येईल, अशी भूमिका असते. यावेळी बक्षिसे/पारितोषिके सुद्धा दिली जातात. आपल्या येथील शालेय स्नेहसंमेलनासारखे या कार्यक्रमाचे स्वरूप असते, असे म्हणता येईल.

काळी सौंदर्यवती

यावर्षी अमेरिकेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात एक विशेष घटना घडली. मूळच्या भारतीय वंशाची- एका कृष्णवर्णीय वंशाची- सौंदर्यवती- नीना दवुलुरी- ही इथल्या सौंदर्यस्पर्धेत ‘मिस अमेरिका’ म्हणून निवडली गेली. अमेरिकेतही ‘गोरा-काळा वाद’ अधूनमधून डोके वर काढीत असतोच. तसेच याही वेळी झाले. नीना दवुलुरी नावाच्या एका ‘काळ्या’ मुलीने ‘मिस अमेरिका स्पर्धा’ जिंकावी, हे तिथल्या ‘गोर्‍या लोकांच्या’ पचनी सहजासहजी पडेना. पण ‘निकाल’ लागल्यानंतर हात चोळीत बसण्याव्यतिरिक्त कुणालाही फारसे काही करता येईना. थोडीफार आरडाओरड, आदळआपट, पत्रकबाजी झाली आणि हे प्रकरण निवळले.

निमंत्रण स्वीकारण्यामागची भूमिका

सेंट्रल यॉर्क मिडल स्कूलने या सौंदर्यवतीला- नीना दवुलुरीला- या वर्षीच्या कार्यक्रमात ‘प्रमुख पाहुणी’ म्हणून पाचारण केले. सामान्यत: ‘मिस अमेरिका’ म्हणून निवड झाल्यानंतर जवळजवळ एक वर्षभर या तरुणींवर विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचे बंधन करार करून टाकलेले असते. नीना दवुलुरीने हे निमंत्रण स्वीकारले.
‘माझ्या मायदेशाच्या संस्कृतीबद्दल अमेरिकन जनमानसात काही ठोकळेबाज ठरावीक (स्टिरिओटाईप) अपसमजुती (मिसकन्सेप्शन्स) आहेत, हा अनुभव घेतघेतच मी लहानाची मोठी झाली आहे. ‘आपण कसे आहोत,’ हे दाखवण्याची ही एक नामी संधी आहे, अशा भूमिकेतून मी हे निमंत्रण स्वीकारले. भाषणातून आणि प्रश्‍नोत्तरातून या समजुतींबाबत बोलत येईल, असे मला वाटत होते. समाजप्रबोधनाची ही संधी आपण साधलीच पाहिजे, असे मला वाटले.

‘आती क्या खंडाला?

या शाळेत बाराव्या वर्गात शिकणारा एक विद्यार्थी (वय वर्षे अठरा) पॅट्रिक फाव याने या कार्यक्र्रमात नीनाला एक फूल भेट दिले आणि नृत्यासाठी (प्रॉम- ‘आती क्या खंडाला?’ टाईप) पाचारण करण्याचे ठरविले. मित्रामित्रात याबाबत पैज लागली होती, असे म्हणतात. पॅट्रिकची ही वृत्ती त्याच्या मित्रमंडळीप्रमाणेच शाळेतही सर्वांच्या चांगलीच परिचयाची होती. त्याच्या ‘या’ बेताची कुणकुण शालेय प्रशासनालाही लागली. प्रशासनाने कार्यक्रम चालू असताना पॅट्रिकने असे काही करू नये, असे त्याला बजावले. हा कार्यक्रम परस्परांच्या सांस्कृतिक परिचयाच्या दृष्टीने आयोजित असल्यामुळे यावेळी असे करणे योग्य नाही, अशी प्रशासनाची भूमिका होती. एरवी असे प्रकार अमेरिकेत आणि तेही ‘मिस अमेरिके’च्या संबंधात होणे, हे स्वाभाविकच मानले जाते. प्रशासनाचेही असेच मत होते. ‘पण ही ती वेळ नव्हती.’
नीनाला कार्यक्रम सुरू असतानाच पॅट्रिकने फूल भेट दिले आणि नृत्यासाठी निमंत्रित (प्रॉमपोजल) केले. नीनाने फूल स्वीकारीत ही बाब हसण्यावारी नेली. पण प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेत पॅट्रिकला तीन दिवसांसाठीची निलंबनाची शिक्षा केली.

बिच्चारा पॅट्रिक!

पॅट्रिकच्या समर्थनार्थ अमेरिकन जनता, सोशल व प्रिंट मीडिया निरनिराळी टीव्ही चॅनेल्स उभी झाली. या प्रश्‍नाला अमेरिकेतच नव्हे, तर जगभर प्रसिद्धी मिळाली. सगळे जण पॅट्रिकच्या बाजूने उभे झाले.
स्वत: नीनाला जेव्हा हे वृत्त कळले, तेव्हा तिनेही प्रशासनाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे सुचविले. देशभरातील विद्यार्थ्यांत मिसळणे, त्यांच्याशी संवाद साधणे, हा ‘मिस अमेरिका’ या नात्याने माझ्यासाठी महत्त्वाचा आणि सन्मानाचा विषय आहे, असे ती म्हणाली. शिक्षणाच्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने साकार करावीत, मेधावी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आकांक्षा यांचा परिचय त्यांच्या भेटीतून मला होत असतो आणि यातून मलाही प्रेरणा मिळत असते. पण माझे कार्यक्रम अगोदरच ठरलेले असल्यामुळे पॅट्रिकच्या निमंत्रणाचा स्वीकार मला करता येत नाही.
पॅट्रिकचे म्हणणे असे आहे की, मी स्वत:ला आवरू शकलो नाही. त्याच्या दुसर्‍या साथीदाराने या संपूर्ण प्रसंगाचे चित्रण केले आहे. नीनाने सुहास्यवदनाने माझी फुलाची भेट स्वीकारली. ‘बघू या पुढे कधी’, असे भाव मला तिच्या चेहर्‍यावर दिसले.
अमेरिकेतील जनमानस, एकजिनसी अमेरिकन समाज निर्माण होण्याच्या दिशेने केले जाणारे प्रयत्न, शालेय कार्यक्रमांचे स्वरूप, सैल स्त्री-पुरुष संबंध, शालेय प्रशासनाची विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याची आग्रही भूमिका, देशोदेशीच्या प्रथा, परंपरा, नैतिकतेच्या कल्पना यांचा परिचय होण्याचे आणि आपल्यालाही अंतर्मुख करण्याचे दृष्टीने हा ‘कथाभाग’ उपयोगी पडेल, असे वाटते.
- वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०


Tuesday, May 27, 2014

Nigeria and terrorists

निर्नायकी नायजेरिया आणि बेमुर्वतखोर बंडखोर  

                                                                                         वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२ 
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हनिया  
नायजेरिया हा आफ्रिका खंडातील एक प्रचंड क्षेत्रफळ असलेला देश आहे. अटलांटिक महासागराचा विस्तीर्ण  समुद्र किनारा या देशाला लाभलेला आहे. अटलांटिक महासागर हा सतत खवळलेला असतो. या महासागराचा गुण आणि वाण हे दोन्ही या देशाची साथ आणि सोबत करीत आहेत, असे वाटते. या देशातील सर्वच लोक कृष्णवर्णीय असले तरी ख्रिश्चन आणि मुस्लीम अशा दोन धर्मांमध्ये विभागलेले आहेत.
देशाचे महाकाय स्वरूप
या खंडप्राय देशाची राजधानी अबुजा असून लोकसंख्या जवळ जवळ १७ कोट इतकी आहे. या देशाची अधिकृत  भाषा इंग्रजी असून अध्यक्षीय प्रणाली असलेले हे एक  छत्तीस राज्यांचे मिळून बनलेले एक खंडप्राय संघराज्य आहे.
बोको हराम ह्या मुस्लिम संघटनेचा प्रमुख अबुबकर शेकाऊ याने चिबक जमातीच्या जवळ जवळ दोनशे ख्रिश्चन धर्मीय मुलींना पळवून नेले असून बोको हराम संघटनेच्या अतिरेकी सदस्यांना कैदेतून सोडविण्यासाठी ओलीस म्हणून ठेवले आहे. या मुलींपैकी काहींनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. म्हणजे कैद्यांची मुक्तता आणि धर्म प्रसार असे दोन्हीही उद्देश या अपहरणाद्वारे साध्य करण्याचा हेतूही साध्य होताना दिसतो आहे. असे म्हणतात की, या पुढचा जागतिक संघर्ष ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये धर्म प्रसाराच्या निमित्ताने होणार आहे. केवळ आपल्या धर्माच्या पालनानेच ईश्वराप्रत जाता येणे शक्य आहे, असा या दोन्ही धर्मियांचा आग्रह असल्यामुळे संघर्षाला पर्याय दिसत नाही, असे मत जगभर व्यक्त केले जात आहे.
सुटकेच्या प्रयत्नांना अतिरेक्यांचे मग्रूर उत्तर  
अर्थात सध्याचा संघर्ष या निमित्ताने नसून या मुलींना शाळेतून  पळवून नेण्यामागचा हेतू त्यांना ओलीस म्हणून ठेवणे हाच प्रामुख्याने आहे. नायजेरियाचे अध्यक्ष गुडलक जोनाथन यांनी या प्रकाराचा निषेध केला असून २०,००० सैनिक शोध मोहिमेसाठी मुक्रर केले आहेत. ब्रिटिश, अमेरिकन आणि इस्रायली फौजा सुद्धा शोध मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. या घटनेने नायजेरियाच्या शासन व्यवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. खरेतर या देशाच्या अर्थव्यवस्थेने कूस बदलली असून ती आफ्रिका खंडातली एक मोठी अर्थव्यवस्था मानली जाते. आसपासची राष्ट्रे या प्रश्नाचा विचारआणि कृती  करण्यासाठी एकत्र आली आहेत हे कळताच बाको हराममच्या नेतृत्वाने कामेरुनाच्या सरहद्दीलगत काम करणाऱ्या चिनी कामगारांचे अपहरण करून उत्तर दिले आहे. बंदी लोक कुठे आहेत, याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करणे मुळातच कठीण मानले जाते. त्यातून या प्रकरणात थोड्याथोडक्या नव्हेत तर दोनशे मुली अडकल्या आहेत. बोलणी चालू असतांना  सर्व प्रसार माध्यमे प्रतिक्षणी साक्षीला असणार आहेत. त्यामुळे गुप्त खलबते अशक्य आहेत.
असे प्रकार का घडतात?
हा पेचप्रसंग असा बिकट होण्यासाठी स्वत: अध्यक्ष जबाबदार आहेत, असे मानतात. त्यांच्या बोटचेप्या  आणि डळमळीत धोरणाचा हा परिणाम आहे, असे मानले जाते आहे. अध्यक्षांची पत्नी स्वत: एक महिला असूनही पुढच्या  वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीवर या घटनेचा काय परिणाम होईल, याचाच विचार करीत आहे, असे म्हणतात. या प्रकरणाचा शेवट सुखद होईल, असे आता वाटेनासे झाले आहे. पण यात बिचाऱ्या मुलींचे नशीब अडकलेले आहे, ही या सर्व प्रकारची भीषण आणि क्लेशदायक शोकांतिका आहे.  बहुदा या मुलींचे वेगवेगळे गट करण्यात आले असावेत. त्यामुळे त्यांचा शोध लावणे आणि आणि त्यांची सुटका करणे या दोन्ही गोष्टी बिकट झाल्या आहेत. अमेरिकेने हवाई सैनिकांची मदत केली आहे, ती याच कारणास्तव. अटकेतील कैदी(अतिरेकी) आणि ओलीस ठेवलेल्या मुली यांची अदलाबदल किंवा भली मोठी रक्कम या दोन्ही शक्यतांचा विचार चालू आहे. अतिरेकी सर्व मुलींना सोडायला तयार होतील असे वाटत नाही. ते काहींना सोडतील आणि मग आपल्या मागण्यात वाढ करतील. बळाचा वापर केला तर सर्वच किंवा निदान काही मुलींची हत्या नक्की होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भ्रष्ट राजवटीत दुसरे काय होणार?

जसजसे दिवस जात आहेत, तसतशी मुलींची शांततामय मार्गाने सुटका होण्याची शक्यता कठीणच नव्हे तर अशक्य होत चालली आहे. नायजेरियाचे स्वरूप आणि महत्व पाहता, त्या देशाचे सैन्यबळ बलशाली आणि कार्यक्षम  असावयास हवे होते. पण प्रत्यक्षात अगदी उलट स्थिती आहे. त्यामुळे केवळ बळाच्या साह्याने हा लढा जिंकता येणार नाही, हेही नक्की आहे. सैन्य आणि देश हे दोन्ही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले आहेत. सैन्यासाठी तरतूद केलेली रक्कम सैन्यापर्यंत पोचतच नाही. केवळ नायजेरीयालाच नव्हे तर आफ्रिकेतल्या केनियालाची सुद्धा हीच स्थिती आहे. अतिरेक्यांच्या मागण्या सर्वथा आयोग्य आहेत, यात शंका नाही ,पण बलशाली आणि मग्रूर अतिरेक्यांपुढे तर्क, न्याय आणि समजूतदारपणाच्या गोष्टी आजवर कुठेही, कधीही टिकू शकल्या नाहीत, नायजेरिया तरी याला अपवाद कसा असणार?        

Nigeria and Terrorists 28.05.2014 Lokshahivarta

                                          निर्नायकी  नायजेरिया आणि बेमुर्वतखोर  बंडखोर  
नायजेरिया हा आफ्रिका खंडातील एक प्रचंड क्षेत्रफळ असलेला देश आहे. अटलांटिक महासागराचा विस्तीर्ण समुद्र किनारा या देशाला लाभलेला आहे. अटलांटिक महासागर हा सतत खवळलेला असतो. या महासागराचा गुण आणि वाण हे दोन्ही या देशाची साथ आणि सोबत करीत आहेत, असे वाटते. या देशातील सर्वच लोक कृष्णवर्णीय असले तरी ख्रिश्‍चन आणि मुस्लिम अशा दोन धर्मांमध्ये ते विभागलेले आहेत.
देशाचे महाकाय स्वरूप
या खंडप्राय देशाची राजधानी अबुजा असून लोकसंख्या जवळ जवळ १७ कोटी इतकी आहे. या देशाची अधिकृत भाषा इंग्रजी असून अध्यक्षीय प्रणाली असलेले हे एक छत्तीस राज्यांचे मिळून बनलेले खंडप्राय संघराज्य आहे.
बोको हराम या मुस्लिम संघटनेचा प्रमुख अबुबकर शेकाऊ याने चिबक जमातीच्या जवळ जवळ दोनशे ख्रिश्‍चन धर्मीय मुलींना पळवून नेले असून त्याने बोको हराम संघटनेच्या अतिरेकी सदस्यांना कैदेतून सोडविण्यासाठी मुलींना ओलीस म्हणून ठेवले आहे. या मुलींपैकी काहींनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. म्हणजे कैद्यांची मुक्तता आणि धर्म प्रसार असे दोन्हीही उद्देश या अपहरणाद्वारे साध्य करण्याचा हेतू साध्य होताना दिसतो आहे. असे म्हणतात की, या पुढचा जागतिक संघर्ष ख्रिश्‍चन आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये धर्म प्रसाराच्या निमित्ताने होणार आहे. केवळ आपल्या धर्माच्या पालनानेच ईश्‍वराप्रत जाता येणे शक्य आहे, असा या दोन्ही धर्मियांचा आग्रह असल्यामुळे संघर्षाला पर्याय दिसत नाही, असे मत जगभर व्यक्त केले जात आहे.
सुटकेच्या प्रयत्नांना अतिरेक्यांचे मग्रूर उत्तर 
अर्थात सध्याचा संघर्ष या निमित्ताने नसून या मुलींना शाळेतून पळवून नेण्यामागचा हेतू त्यांना ओलीस म्हणून ठेवणे हाच प्रामुख्याने आहे.नायजेरियाचे अध्यक्ष गुडलक जोनाथन यांनी या प्रकाराचा निषेध केला असून २0,000 सैनिक शोध मोहिमेसाठी मुRर केले आहेत. ब्रिटिश, अमेरिकन आणि इस्रायली फौजा सुद्धा शोध मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. या घटनेने नायजेरियाच्या शासन व्यवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. खरेतर या देशाच्या अर्थव्यवस्थेने कूस बदलली असून ती आफ्रिका खंडातली एक मोठी अर्थव्यवस्था मानली जाते. आसपासची राष्ट्रे या प्रश्नाचा विचारआणि कृती करण्यासाठी एकत्र आली आहेत हे कळताच बाको हरामच्या नेतृत्वाने कामेरुनच्या सरहद्दीलगत काम करणार्‍या चिनी कामगारांचे अपहरण करून उत्तर दिले आहे. बंदी लोक कुठे आहेत, याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करणे मुळातच कठीण मानले जाते. त्यातून या प्रकरणात थोड्याथोडक्या नव्हेत तर दोनशे मुली अडकल्या आहेत. बोलणी चालू असतांना सर्व प्रसार माध्यमे प्रतिक्षणी साक्षीला असणार आहेत. त्यामुळे गुप्त खलबते अशक्य आहेत.
असे प्रकार का घडतात?
हा पेचप्रसंग असा बिकट होण्यासाठी स्वत: अध्यक्ष जबाबदार आहेत, असे मानतात. त्यांच्या बोटचेप्या आणि डळमळीत धोरणाचा हा परिणाम आहे, असे मानले जाते आहे. अध्यक्षांची पत्नी स्वत: एक महिला असूनही पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीवर या घटनेचा काय परिणाम होईल, याचाच विचार करीत आहे, असे म्हणतात. या प्रकरणाचा शेवट सुखद होईल, असे आता वाटेनासे झाले आहे. पण यात बिचार्‍या मुलींचे नशीब अडकलेले आहे, ही या सर्व प्रकारची भीषण आणि क्लेशदायक शोकांतिका आहे. बहुदा या मुलींचे वेगवेगळे गट करण्यात आले असावेत. त्यामुळे त्यांचा शोध लावणे आणि त्यांची सुटका करणे या दोन्ही गोष्टी बिकट झाल्या आहेत.अमेरिकेने हवाई सैनिकांची मदत केली आहे, ती याच कारणास्तव.अटकेतील कैदी(अतिरेकी) आणि ओलीस ठेवलेल्या मुली यांची अदलाबदल किंवा भली मोठी रक्कम या दोन्ही शक्यतांचा विचार चालू आहे. अतिरेकी सर्व मुलींना सोडायला तयार होतील असे वाटत नाही. ते काहींना सोडतील आणि मग आपल्या मागण्यात वाढ करतील. बळाचा वापर केला तर सर्वच किंवा निदान काही मुलींची हत्या नक्की होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भ्रष्ट राजवटीत दुसरे 
काय होणार?
जसजसे दिवस जात आहेत, तसतशी मुलींची शांततामय मार्गाने सुटका होण्याची शक्यता कठीणच नव्हे तर अशक्य होत चालली आहे. नायजेरियाचे स्वरूप आणि महत्व पाहता, त्या देशाचे सैन्यबळ बलशाली आणि कार्यक्षम असावयास हवे होते. पण प्रत्यक्षात अगदी उलट स्थिती आहे. त्यामुळे केवळ बळाच्या साह्याने हा लढा जिंकता येणार नाही, हेही नक्की आहे. सैन्य आणि देश हे दोन्ही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले आहेत.सैन्यासाठी तरतूद केलेली रक्कम सैन्यापर्यंत पोचतच नाही. केवळ नायजेरियातच नव्हे तर आफ्रिकेतल्या केनियात सुद्धा हीच स्थिती आहे. अतिरेक्यांच्या मागण्या सर्वथा अयोग्य आहेत, यात शंका नाही.पण बलशाली आणि मग्रूर अतिरेक्यांपुढे तर्क, न्याय आणि समजूतदारपणाच्या गोष्टी आजवर कुठेही,कधीही टिकू शकल्या नाहीत. नायजेरिया तरी याला अपवाद कसा असणार? ल्ल
९४२२८0४४३0

Saturday, May 24, 2014

My Trip To America 2505.2014 Lokshahivarta


दिनांक १३ मी २0१४ ला युनायटेड एअर लाइन्सच्या विमानाने अमेरिकेतील पेन्सिव्हॅनिया प्रांतातल्या यॉर्क (न्यूयॉर्क नव्हे) या गावी जाण्याचे निश्‍चित झाले होते. हा निर्णय तसा एक वेगळाच निर्णय होता. ही फ्लाईट कुठेही न थांबता सतत १५ तास उड्डाण करीत न्यूयॉर्कला पोचणार होती. ब्रेक जर्नीचा पर्याय होता. पण भाषेची अडचण नको, तसेच काही तास मध्येच कुठेतरी खोळंबून राहण्यापेक्षा सलग १५ तास प्रवासाचा पर्याय निवडला. नागपूर ते पुणे बसने सलग प्रवास करण्याचा अनुभव गाठीशी होता, तसेच २00९ मध्ये असा प्रवास केलेलाही होता. एअर इंडियाने नागपूर ते मुंबई असा प्रवास करून दुपारी ११ चे सुमारास मुंबईच्या डोमेस्टिक एअर पोर्टवर पोचल्यावर पवई येथील श्री विनायक लेले यांच्या गेस्ट हाऊसमध्ये संध्याकाळपयर्ंत विश्रांती घेऊन इंटरनॅशनल एअरपोर्टवर टॅक्सीने दाखल झालो. इथपर्यंत शैलेश आणि संगीता साथ व सोबत म्हणून सोडायला आले होते. 
कडक तपासणी
पासपोर्ट व तिकिटाच्या तपासणीचा सोपस्कार आटोपला आणि समान ढकलत आमची स्वारी बोर्डिंग पास मिळविण्यासाठी रांगेत उभी राहिली. सामानावर लावावयाच्या पट्टया हाती मिळाल्यावर तपशील भरण्यास सुरवात करतो न करतो तोच एक तरूण अधिकारी समोर येऊन उभा राहिला. कोण कुठले, कोणाकडे, कशासाठी जाणार यांची चौकशी झाली. सामानात काय काय आहे, हेही विचारले. तुम्हाला आता इथे कुणी भेटले का, असे कुणी भेटल्यास त्याने तुम्हाला काही वस्तू दिल्या का असे विचारून झाल्यानंतर असे झाल्यास कुणाकडूनही कोणतीही वस्तू घेऊ नका, असे त्या अधिकार्‍याने बजावले. अतिरेक्यांचा उपद्रव सुरू झाल्यापासून विमानतळावर अशाप्रकारची तपासणी सुरू झाली आहे. मला या गोष्टीचे अतिशय समाधान वाटले. पण हे समाधान अल्पकाळ टिकले. ही सर्व तपशीलवार चौकशी झाल्यानंतर बोर्डिग पास मिळाला. ७६ क्रमांकाच्या गेट मधून विमानात बसायला जायचे होते. वेळ होता म्हणून इकडे तिकडे भटकायला सुरवात केली.
अनाहूत पाहुणा
एवढय़ात विमानतळावरच्या एका अधिकार्‍याने एका माणसाला हटकले. त्याच्याजवळ कुठलासा पासपोर्ट होता. पण तो तिथे कशासाठी आणि कसा काय आला होता, ते त्याला सांगता येत नव्हते. माणूस ओशाळल्या सारखा वाटत होता. आपण सहजच तिथे आल्याचे तो सांगत होता. अनाहूतपणे कुणीही प्रवेश करू नये म्हणून केलेली भरभक्कम तटबंदी मोडीत काढून ही व्यक्ती तिथपर्यंत पोहोचलीच कशी, यामुळे सगळे हादरले होते. त्याची आणखी चौकशी करण्यासाठी त्याला तिथून नेण्यात आले. मी आपल्या जागी येऊन बसलो. पण पाहिलेल्या प्रसंगामुळे मनात उठलेले काहूर काही केल्या थांबत नव्हते. माझी तीनदा चौकशी व तपासणी झाली होती. ही सर्व प्रकारची व्यवस्था मोडीत काढून ही व्यक्ती आगदी आतपर्यंत पोचावी याचे आश्‍चर्य वाटत होते. शेवटी एक गोष्ट खरी आहे की, सावापेक्षा चोराची बुद्धी श्रेष्ठ प्रतीची असते. पुढे काय झाले ते कळले नाही. कितीही काळजी घेतली तरी असे प्रकार होणारच हे जाणवले. 'सदा सावधानतेला' पर्याय नाही, हे जाणवले. तसेच सुरक्षा व्यवस्थेची नित्य तपासणी करणे आवश्यक असते आणि सुधारणेला वाव असतोच असतो, हेही लक्षात आले.
विमानात बसता बसता पुन्हा एकदा तपासणी झाली पादत्राणेही तपासली गेली. या निमित्ताने त्रास नक्कीच होतो, पण खबरदारीची आवश्यकताही पटते. मात्र त्या अनाहूत पाहुण्याचा विचार काही मनातून जात नव्हता. विशेष काही नसेलही पण त्याचे तिथे येणे व असणे, ही बाब कडेकोट व्यवस्थेसाठी जबाबदार असणार्‍या यंत्रणेसाठी एक आव्हानच असणार यात शंका नाही.

सगळे तपशील नोंदवले होते
प्रत्येक प्रवाशाच्या खुर्ची समोरच्या खुर्चीच्या पाठीवर मॉनिटर स्क्रीन होता. त्यावर खेळ खेळता येतात, सर्व प्रकारचे चित्रपट पाहता येतात आणखी खूप काही करता येतं. मला आकर्षण वेगळ्याच गोष्टीचं होतं. विमान प्रवासाचे सगळे तपशील पाहण्याची सोय होती.
मुंबई ते न्यूयॉर्क हे अंतर ८000 मैलांपेक्षा (किलोमीटर नाही) जास्त आहे. म्हणजे १२,000 किलोमीटरपेक्षा जास्त होतं. विमानाने सर्व सोपस्कार आटोपल्यावर आकाशात झेप घेतली. काही वेळातच ३५,000 फुट उंची गाठली. विमानाबाहेरचे उष्णतामान (नव्हे थंडीचे मान) : (उणे) ५0 डिग्री फॅरेनहाईट होते. म्हणजे सुमारे  (उणे) ४ ५   डिग्री सेंटिग्रेड होते. विमानाचा वेग तशी ५00 मैल होता. किती अंतर कापले किती अंतर राहिले, याचा हिशोब मांडला जात होता. आम्ही ओहोटाबादवरून पुढे गेलो. आता पाकिस्तान लागले. मग अफगाणिस्तान, नंतर रशिया दिसू लागला. त्यानंतर नॉर्वे वरून आम्ही उडत चाललो होतो. काळी कुठेतरी डेन्मार्क असावे. दुसर्‍या महायुद्धात याच ठिकाणी हिटलरच्या फौजांनी इंग्लंडच्या आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या फौजांची कोंडी केली होती. सर्व युद्धसामग्री तशीच टाकून सैनिकांना इंग्लंडला परत आणण्यात आले होते. चर्चिलने या माघारीला 'यशस्वी माघार' (सक्सेसफुल रिट्रीट) म्हणून संबोधले होते. शास्त्रे काय पुन्हा तयार करता येतील पण एकेक सैनिक लाखमोलाचा होता. सैन्य वाचले होते. पुन्हा शस्त्रे नव्याने तयार करून काही वर्षांच्या तयारीनंतर जनरल आयसेनहोवरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड आणि मित्र राष्ट्रांच्या फौजा नॉर्मंडी बीचवर उतरल्या आणि युद्धाचे पारडे फिरले. माझी नजर नॉर्मंडी बिचचा शोध घेत होती पण आम्ही त्यापासून खूप दुरून उडत चाललो होतो. एवढय़ात हेलसिंकीची नोंद दिसली. आम्ही निम्मे अंतर पार केले होते. आता बाहेरचे उष्णतामान (थंडीचे मान) उणे एकोणसाठ डिग्री फॅरेनहाईट इतके होते. म्हणजे सुमारे उणे ५ ० डिग्री सेंटिग्रेड होते. आम्ही रात्री अकरा वाजता मुंबईहून निघालो होतो. घड्याळात भारतातले सकाळचे सात वाजले होते. म्हणजे अमेरिकेतले रात्रीचे साडेनऊ वाजले असणार. वेळेचा हिशोब सोपा आहे. आपल्या वेळेत अडीच तास मिळवायचे आणि दिवसाची रात्र करायची किंवा रात्रीचा दिवस करायचा. म्हणजे न्यूयॉर्कमधली वेळ समजते. आता विमान ३६00 फुटावरून उडत चालले होते. आठ तास उडत होतो, आता आणखी सात तास बाकी होते आणि ४000 मैल उड्डाण बाकी होते. कुठल्याही कामाचा निम्मा टप्पा पार पडला की उरलेला टप्पा लवकर पार पडतो आहे, असे वाटू लागते. आमचेही तसेच झाले होते. यावरून एक गोष्ट जाणवली. सर्व जगाने सी जी एस(सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद) सिस्टीम स्वीकारली अमेरिका मात्र अजून एफ पी एस(फुट,पाउंड, सेकंद) सिस्टीमचाच आग्रह धरून आहे.
काय हवे ते सांगा
प्रवासात खाण्यापिण्याची चंगळ होती. याचे पैसे विमान भाड्याबरोबरच घेतलेले होते. बहुतेक प्रवासी शाकाहारी होते. जेवणात बासमती तांदुळाचा भात फुलकोबीची रस्सा भाजी, पालकाची पातळ भाजी, दही, सलाद, बन पाव, असा बेत होता. फ्रु ट ज्यूस, चहा , कॉफी, पेये अधूनमधून विचारली जात होती. मी लिहिण्यसाठी कागद मागितला. तो मात्र नव्हता. मी शेवटी टिशू पेपरवर मुद्दे नोंदविण्यास सुरवात केली. हवाई सुंदर्‍यांना मी बहुदा दुर्वास ऋषी वाटलो असेन. कारण जवळजवळ प्रत्येकाची फर्माईश त्या पूर्ण करीत होत्या. पण मला मात्र त्यांना 'व्हेरी सॉरी' म्हणावे लागले. पण चेहर्‍यावर अपराधी भाव होता. परत वेळेला जाताना त्यांच्या जवळ नक्की एखादी वही किंवा कोरे कागद असतील, याची खात्री वाटते.

पुढची पिढी कशी असेल..
मुंबईलाच एका वृद्ध महिलेशी थोडेसे बोलणे झाले होते. तिचा मुलगा व सून अमेरिकेत एका गावी राहत होते. पण नातवाला सात तासाच्या अंतरावर (विमान सात तासात तशी ५00मैल वेगाने जाईल तेवढय़ा अंतरावर) नोकरी करीत होता. तो आठवड्याचे पाच दिवस नोकरीच्या गावी राहायचा आणि शनिवार रविवारी 'घरी' यायचा. नातसून सासु-सासर्‍यासोबतच राहत होती. मी म्हटले, पुढच्या पिढीत आईबाप पृथ्वीवर, एक मुलगा अमेरिकेत, दुसरा मंगळावर आणि तिसरा चंद्रावर अशी स्थिती असणार बहुतेक! यावर आम्ही दोघेही हसलो. महिलेच्या चेहर्‍यावर विज्ञादाची छटा उमटलेली दिसली. तिला समजावण्याच्या दृष्टीने मी म्हटले, 'आपण आलटून पालटून एकेकाकडे रहावे, म्हणजे झाले.' यावर ती हसली, मीही हसलो. प्रवासात ही गोष्ट अधून मधून आठवत होती. तिने आपल्या सोबत दोन भल्यामोठय़ा पेट्या घेतल्या होत्या. न्यूयॉर्कला उतरल्यावर त्या दिसल्या. 'एवढे काय घेऊन चाललात?', मी विचारले. 'अहो, न्यावे तेवढे हवेच असते, तरी काही जिन्नस वगळून ठेवले आहेत. ते पुढच्या वेळेस नेणार आहे', ती हसत म्हणाली. मीही हसलो. ती पुढे म्हणाली, 'आपल्याला थोडेच वाहून न्यायचे असते?' बाईला उरक खूप होता. तिच्यासाठी 'व्हील चेअरची' आणि 'सामानासाठी पोर्टरची' अशी व्यवस्था करून ठेवलेली होती.
आपल्या सवयी
या प्रवासात एक विचित्र अनुभव आला. विमानातल्या स्वच्छतागृहांमध्ये पाण्याऐवजी कागदाचा उपयोग करायचा असतो. स्वच्छतागृहात गेलो तर सर्वत्र कागदाचे तुकडे पडलेले दिसले. वापर केल्यानंतर ते कुणीतरी ते तिथेच टाकले होते. सर्वत्र दुर्गंध पसरला होता. मी तसाच बाहेर आलो. काय करावे ते कळेना. रागाची जागा उद्विग्नतेने घेतली. मग विचार करीत बसलो. शेवटी महात्मा गांधी आणि गाडगेबाबांचे स्मरण करून पुन्हा स्वच्छतागृहात गेलो. टिश्यू पेपरचा एक लांबलचक तुकडा फाडला आणि सर्व तुकडे काळजीपूर्वक उचलले आणि त्यांची विल्हेवाट लावली. विमानातून उतरायची वेळ झाली तेव्हा पुन्हा स्वच्छ्तागृहात गेलो तो पुन्हा तोच प्रकार दिसला. कुणाला तरी वापर करण्याचे ज्ञान नव्हते हे लक्षात आले. पुन्हा स्वच्छता केली आणि बाहेर आलो. मग विचार मनात आला की, अस्वच्छता कुणालाच आवडत नसते. हे अज्ञानापोटी होत असले पाहिजे. तसेच स्वच्छतेच्या कल्पना वगवेगळ्या असतात. १९७0 सालची गोष्ट आहे. एका कुटुंबात सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी त्रिकाल स्नानाची प्रथा होती. पण घरातल्या लहानग्याला ते दारापुढे बसवत असत. तसलाच काहीसा हा प्रकार असला पाहिजे. असो.

कस्टमवाले खरे पारखी
जसजशी अमेरिका जवळ येऊ लागली तसतसा विमानाचा वेग ताशी ५00 मैलापेक्षा जास्त होऊन तो आता ताशी ६00 मैल इतका झाला होता. याचा परिणाम असा झाला की आमची फ्लाईट 'बिफोर टाईम' न्यूयॉर्कला पोहोचली. सामानाची किंचितही तपासणी न होता कस्टम क्लिअर्न्‍स मिळाले. त्या लोकांना निर्ढावलेले आणि बावळट यांच्यातला फरक कळत असावा, असे कुणीतरी म्हणताना मी ऐकले. ते न ऐकलेसे करून आम्ही घराकडे कारमधून कूच केले.

वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४0 0२२

Thursday, May 22, 2014

Emergy in Thailand

वसंत गणेश काणे

तारीख: 23 May 2014 00:12:20

थायलंडमधील आणिबाणी

थायलंड हा देश जगातील एक आश्‍चर्यकारक देश आहे. या देशात बुद्धकालीन अनेक मंदिरे आहेत. या देशाचा बराचसा भाग जंगलमय असून तो प्रदेश वनसंपदा आणि वन्यप्राणिजगत यासाठी प्रसिद्ध आहे. अन्नपदार्थ आणि मसाज यासाठीही हा देश जगभर प्रसिद्ध आहे. या देशाची राजधानी बँकॉक ही जगातील एक अत्यंत आधुनिक नगरी मानली जाते. या देशातील लोक आतिथ्य आणि मैत्रिपूर्ण व्यवहारासाठी प्रसिद्ध असून, स्मितहास्य (करणार्‍यांचा) देश ‘लँड ऑफ स्माईल्स’ म्हणूनही ओळखला जातो.
एक शापित देश : पण, या देशाला एक शापच आहे म्हणा ना. या देशात गेल्या पाऊणशे वर्षांपासून सतत बंड होत आहेत. बहुतेक प्रयत्न अयशस्वी झाले असले, तरी अशा प्रकारांमुळे देशात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते, यात शंका नाही. पण, तरीही या देशाचा हसरा चेहरा कायम आहे. २००४ साली जानेवारी महिन्यात प्रधानमंत्री थकसीन शिनावात्रा यांनी देशाच्या काही भागात मार्शल लॉ जाहीर केला होता. २००६ मध्ये या देशात रक्तहीन, पण सैनिकी क्रांती झाली होती. या क्रांतीचे नेतृत्व जनरल सोंथी बुन्यारातग्लीन यांनी केले होते. या काळात पंतप्रधान शिनावात्रा युनोच्या अधिवेशनाच्या निमित्ताने देशाबाहेर न्यूयॉर्कला गेले होते. माजी सरसेनापती सुरावूड यांच्या स्वाधीन देशाच्या कारभाराची सूत्रे सोपवण्यात आली आणि स्वत: सोंथी बुन्यारातग्लीन यांनी प्रशासकीय सुधारणा प्रमुखाची धुरा सांभाळली होती. २० मे २०१४ रोजी सकाळी ३ वाजता आजी सरसेनापती प्रयुथ चान ओचा यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे निमित्त पुढे करून देशभर मार्शल लॉ पुकारला, पण हे बंड नाही, असेही जाहीर केले. या अगोदर अनेक महिने सरकार आणि विरोधक यांच्यात धुसफूस सुरू होती.
जनरल सोंथी बुन्यारातग्लीन यांनी, सैन्याने घटनेच्या अधीन राहून काम करावे आणि हिंसा होणार नाही असे पाहावे, अशा आशयाच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ऑगस्टमध्ये नव्याने निवडणुका घ्याव्यात, असे सांगितले आहे. विरोधकांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला असून, सरकारविरोधी आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. ही बंडाळी आहे, असे जाणवू लागले तर आज सरकारची बाजू घेणारेदेखील संतापतील अशी चिन्हे दिसताहेत. १९३२ पासून आजवर ११ वेळा बंड झाले आहे. सैन्याने बँकॉक शहरातील रस्त्यांची नाकेबंदी केली असून, टीव्ही आणि रेडिओ केंद्रांचा ताबा घेतला आहे.
मार्शल लॉचा बडगा : सरसेनापती प्रयुथ चान ओचा यांनी, प्रतिस्पर्धी पक्षांनी आपापसात चर्चा करावी आणि हा पेचप्रसंग सोडवावा, असे आवाहन केले आहे. जोपर्यंत शांतता आणि सुरक्षा प्रस्थपित होणार नाही तोपर्यंत मार्शल लॉ कायम राहील, असे बजावले आहे. हिंसक आंदोलकांच्या ताब्यातील शासकीय इमारत सैन्याने ताब्यात घेतली आहे. भ्रष्ट प्रशासनाच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून विरोधकांनी या इमारतीचा ताबा घेतला होता. राष्ट्रीय सुरक्षेचे निमित्त पुढे करून प्रसिद्धिमाध्यमांवरही सैन्याने सेंन्सॉरशिप लादली आहे. संघर्ष टाळण्यासाठी सरकारचे समर्थक आणि विरोधक यापैकी कुणीही मोर्चे काढू नयेत, असे सैनिकी प्रशासनाने बजावले आहे.
हे बंड नाही, असे सैन्याच्या वतीने वारंवार सांगितले जात असून, संपूर्ण घटनेला सौम्यतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासकीय इमारतीचा ताबा घेताना रक्तपात झाला नसला, तरी नंतर विरोधकांनी इमारतीला वेढा घातलेला आहे, असे बीबीसीने सूत्राचा हवाला देऊन म्हटले आहे.
दोन्ही पक्ष तणाव वाढू नये म्हणून प्रयत्नशील असून विरोधकांनी निदर्शने करण्याचा निर्णय रद्द केला आहे. पण, पेचप्रसंग सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. सैन्याचा हस्तक्षेप आणि ढवळाढवळ यामुळे गेली आठ वर्षे थायलंडमधील प्रशासन ढेपाळले असून, त्यात काहीही बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सैन्याची पकड पक्की झाली, तर थायलंडमधील रेड शर्ट चळवळीला बळ प्राप्त होईल, यात कुणालाही शंका वाटत नाही.
मार्शल लॉ जाहीर होताच शेअर बाजार गडगडला आहे. थायलंडमध्ये मार्शल लॉनुसार सैन्यप्रमुखाला पंतप्रधानाच्या संमतीशिवाय पूर्ण सत्ता प्राप्त होते. कुणालाही चौकशीसाठी बोलवता येते. कोणतीही वस्तू जप्त करता येते. कुणालाही अटक करता येते. सैनिकीसेवेची सक्ती करता येते. सभांवर, प्रसारमाध्यमांवर बंदी घालता येते. शत्रूच्या इमारती नष्ट करता येतात. सैन्यासाठी बराकी बांधता येतात. या काळात काळजीवाहू सरकार अस्तित्वात असू शकते. ऑगस्टमध्ये निवडणुका होत आहेत, या घोषणेमुळे सरकारविरोधी निदर्शकांचे समाधान झालेले नाही.
वातावरण निवळण्याची चिन्हे नाहीत : छळवादी शासन आमचा निदर्शने करण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही, असे निदर्शकांचे नेते सुथेप थोउग्सुबन यांनी जाहीर केले आहे. गेल्या वर्षी श्रीमती युन्गलुक यांनी संसद विसर्जित करून फेब्रुवारीमध्ये निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला होता, पण विरोधकांनी मतदान सुरळीत पार पडू दिले नाही. नंतर ही निवडणूक रद्द करण्यात आली आणि श्रीमती युन्गलुक यांच्यावर अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. २००६ मध्ये बडतर्फ करण्यात आलेले थकसीन शिनावात्रा हे श्रीमती युन्गलुक यांचे बंधू आहेत. २००६ पासूनच शासनविरोधी निदर्शने देशभर कमी-अधिक स्वरूपात सुरू आहेत. एका एरवी शांत प्रकृतीच्या देशात शांतता केव्हा प्रस्थापित होईल, याची सर्व पर्यटक आतुरतेने वाट पाहत आहेत.
- वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०

Wednesday, May 21, 2014

Marshal Law in Thyland

              थायलंडमधील अराजक

                                                                                         वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२ 
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हनिया  
थायलंड  हा देश जगातील एक आश्चर्यकारक देश आहे. या देशात अनेक बुद्धकालीन मंदिरे आहेत. या देशाचा बराचसा भाग जंगलमय असून तो प्रदेश वनसंपदा आणि वन्य प्राणीजगत यासाठी प्रसिद्ध आहे. अन्नपदार्थ आणि मसाज यासाठीही हा देश जगभर प्रसिद्ध आहे. या देशाची राजधानी बँक ही जगातील एक अत्यंत आधुनिक नगरी मानली जाते. या देशातील लोक आतिथ्य आणि मैत्रीपूर्ण व्यवहारासाठी प्रसिद्ध असून स्मितहास्य (करणाऱ्यांचा) देश - लँफ स्माईल्स - म्हणूनही ओळखला जातो.
एक शापित देश
पण या देशाला एक शापच आहे म्हणाना. या देशात गेल्या पाऊणशे वर्षांपासून सतत बंडे होत आहेत. बहुतेक बंडे अयशस्वी झाली असली तरी अशा प्रकारांमुळे देशात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते, यात शंका नाही. पण तरीही या देशाचा हसरा चेहरा कायम आहे. २००४ साली जानेवारी महिन्यात प्रधानमंत्री थकसीन शिनावात्रा यांनी देशाच्या काही भागात मार्शल लॉ जाहीर केला होता. २००६ मध्ये या देशात रक्तहीन पण सैनिकी क्रांती झाली होती. या क्रांतीचे नेतृत्व जनरल सोंथी बुन्यारातग्लीन यांनी केले होते. या काळात पंतप्रधान शिनावात्रा युनोच्या अधिवेशनाच्या निमित्ताने देशाबाहेर न्यूयॉर्कला गेले होते. माजी सरसेनापती सुरावूड यांच्या स्वाधीन देशाच्या कारभाराची सूत्रे सोपवण्यात आली आणि स्वत: सोंथी बुन्यारातग्लीन यांनी प्रशासकीय सुधारणा प्रमुखाची धुरा सांभाळली होती. २० मे २०१४ रोजी सकाळी ३ वाजता आजी सरसेनापती प्रयुथ चान ओचा यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे निमित्त पुढे करून देशभर मार्शल लॉ पुकारला पण हे बंड नाही, असेही जाहीर केले. या अगोदर अनेक महिने सरकार आणि विरोधक यांच्यात धुसपुस सुरु होती.
जनरल सोंथी बुन्यारातग्लीन यांनी सैन्याने  ‘घटनेच्या अधीन’ राहून काम करावे आणि ‘हिंसा होणार नाही’, असे पहावे, अशा आशयाच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गस्टमध्ये नव्याने निवडणुका घ्याव्यात  असे सांगितले आहे.
विरोधकांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला असून सरकार विरोधी आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. ही बंडाळी आहे, असे जाणवू लागले तर आज सरकारची बाजू घेणारे देखील संतापतील, अशी चिन्हे दिसताहेत. १९३२ पासून आजवर अकरा वेळा बंड केले आहे. सैन्याने बँक शहरातील रस्त्यांची नाकेबंदी केली असून टी व्ही आणि रेडिओ केंद्रांचा ताबा घेतला आहे.
मार्शल लॉ चा बडगा
सरसेनापती प्रयुथ चान ओचा यांनी प्रतिस्पर्धी पक्षांनी आपापसात चर्चा करावी आणि हा पेचप्रसंग सोडवावा, असे आवाहन केले आहे. जोपर्यंत शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित होणार नाही, तोपर्यंत मार्शल लॉ कायम राहील, असे बजावले आहे. हिंसक आंदोलकांच्या ताब्यातील शासकीय इमारत सैन्याने ताब्यात घेतली आहे. भ्रष्ट प्रशासनाच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून विरोधकांनी ह्या इमारतीचा ताबा घेतला होता. राष्ट्रीय सुरक्षेचे निमित्त पुढे करून प्रसिद्धी माध्यमांवरही सैन्याने सेंसॉरशिप लादली आहे. संघर्ष टाळण्यासाठी सरकारचे समर्थक आणि विरोधक यापैकी कुणीही मोर्चे काढू नयेत, असे सैनिकी प्रशासनाने बजावले आहे.
हे बंड नाही, असे सैन्याच्या वतीने वारंवार सांगितले जात असून संपूर्ण घटनेला सौम्यतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. शासकीय इमारतीचा ताबा घेताना रक्तपात झाला नसला तरी नंतर विरोधकांनी इमारतीला वेढा घातलेला आहे, असे बी बी सी ने सूत्राचा हवाला देऊन म्हटले आहे.
दोन्ही पक्ष तणाव वाढू नये म्हणून प्रयत्नशील असून विरोधकांनी निदर्शने करण्याचा निर्णय रद्द केला आहे. पण पेचप्रसंग सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. सैन्याच्या हस्तक्षेप आणि ढवळाढवळ यामुळे यामुळे गेली आठ वर्षे थायलंड मधील प्रशासन ढेपाळले असून त्यात काहीही बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सैन्याची पकड पक्की झाली तर थायलंड मधील रेड शर्ट चळवळीला बळ प्राप्त होईल, यात कुणालाही शंका वाटत नाही.
मार्शल लॉ जाहीर होताच शेअर बाजार गडगडला आहे. थायलंडमध्ये मार्शल लॉ नुसार सैन्य प्रमुखाला पंतप्रधानांच्या संमतीशिवाय पूर्ण सत्ता प्राप्त होते. कुणालाही चौकशीसाठी बोलवता येते, कोणतीही वस्तू जप्त करता येते, कुणालाही अटक करता येते,सैनिकीसेवेची सक्ती करता येते,सभांवर प्रसार माध्यमांवर बंदी घालता येते , शत्रूच्या इमारती नष्ट करता येतात , सैन्यासाठी बराकी बांधता येतात. या काळात काळजीवाहू सरकार अस्तित्वात असू शकते. गस्टमध्ये निवडणुका होट आहेत, या घोषणेमुळे सरकारविरोधी निदर्शकांचे समाधान झालेले नाही.
वातावरण निवळण्याची चिन्हे नाहीत
छळवादी शासन आमचा निदर्शने करण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही, असे निदर्शकांचे नेते सुथेप थौउग्सुबन यांनी जाहीर केले आहे.
गेल्या वर्षी श्रीमती युन्गलुक संसद विसर्जित करून फेब्रुवारीम मध्ये निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला होता. पण विरोधकांनी मतदान सुरळीत पार पडू दिले नाही. नंतर ही निवडणूक रद्द करण्यात आली आणि श्रीमती युन्गलुक यांच्यावर अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. २००६ मध्ये बडतर्फ करण्यात आलेले थकसीन शिनावात्रा हे श्रीमती युन्गलुक यांचे बंधू आहेत. २००६ पासूनच शासनविरोधी निदर्शने तेव्हापासूनच देशभर कमी अधिक स्वरुपात सुरु आहेत.
एका एरवी शांत प्रकृतीच्या देशात शांतता केव्हा प्रस्थापित, याची सर्व पर्यटक आतुरतेने वाट पाहत आहेत.             

          

Monday, May 19, 2014

Elections in India Lokshahi varta 19.05.2014

न्यूयार्क टाईम्सच्या नजरेतून भारतातील निवडणुका
प्रासंगिक
न्यूयार्क टाईम्स हे अमेरिकेतीलच नव्हे तर संपूर्ण जगातील एक अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त दैनिक आहे. भारतातील निवडणुकीबाबत लिहितांना हे वृत्तपत्न काय लिहिते, हा अर्थातच एक कुतुहलाचा विषय असणार, यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. ते म्हणते 'स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या बहुतेक काळात भारतात काँग्रेस पक्षच सत्तेवर होता. विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याकडून निवडणुकीत सपशेल आपटी खाण्याची चिन्हे दिसू लागताच काँग्रेसने पराभव मान्य केला. ही नामुष्की काँग्रेसवर ओढवली याला कारणीभूत ठरली, देशाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक भ्रष्टाचाराची एकामागून एक उघड होणारी प्रकरणे. खुद्द राहुल गांधी यांचे मताधिक्यही या निवडणुकीत घटले
जवळ जवळ ५५ कोटी लोकांनी या निवडणुकीत मतदान केले. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच पराभवाची चाहूल लागली आणि काँग्रेसने आपला पराभव मान्य केला. भारतातील राजकीय घराण्याचे वारस राहुल गांधी हेच काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. आपल्या मतदारसंघात ते पूर्वीच्या तुलनेत फारच थोड्या मताधिक्याने निवडून आले. २00९ साली हे मताधिक्य जवळ जवळ तीन लक्ष इतके होते. परिणामी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर फलक प्रदर्शित करीत, राहुल गांधीची धाकटी बहीण प्रियंकाला आणा आणि काँग्रेसला वाचवा अशा घोषणा दिल्या. ही राहुल गांधींसाठी अतिशय नामुष्कीची बाब होती. प्रियंका गांधींचा करिश्मा तिच्या भावापेक्षा कितीतरी जास्त आहे, असे यावरून मानले जाते.
पराभवाची चिन्हे दिसू लागताच, आम्ही जनतेचा जनादेश विनम्रपणे स्वीकारतो, असे काँग्रेसने जाहीर केले. पहिल्या काही तासांच्या मतमोजणीनंतरच भारतीय जनता पार्र्टी हा (अमेरिकेत त्याचे वर्णन हिंदू राष्ट्रीय पक्ष असे केले जाते) पक्ष २७२ पेक्षा म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागा जिंकणार हे स्पष्ट झाले आणि आघाडीचे राजकारण आता संपणार याबद्दल समाधान व्यक्त होऊ लागले. प्रादेशिक नेतृत्वाच्या सौदेबाजीचा त्नास नवीन सरकारला होणार नाही, हेही स्पष्ट झाले. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांना जबरदस्त जनादेश (सहानुभूतीच्या लाटेमुळे) मिळाला होता. त्यानंतर प्रथमच एवढा मोठा जनादेश मोदी यांना मिळाला आहे. मतमोजणी अगोदरच चाहत्यांनी एक लक्ष लाडूंची ऑर्डर देऊन ठेवली होती. हा जनादेश प्रागतिक आणि स्थिर सरकारच्या बाजूने आहे, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने नोंदविली आहे.
ही निवडणूक अशा काळात झाली आहे की, ज्या काळात भारतीय समाजामध्ये फार मोठे स्थित्यंतर घडून येत आहे. शहरीकरण आणि आर्थिक विकास यांचा परिणाम मतदान प्रक्रियेच्या स्वरूपावर होत आहे. जुन्या निष्ठा आणि तत्वज्ञान यांचा मतदारांवरचा प्रभाव ओसरत चालला असून नवीन आयाम ९त्यांची जागा घेत आहेत. म्हणूनच एका सामान्य कुटुंबात जन्मलेला नरेंद्र मोदींसारखा एक नेता आपल्या यापूर्र्वीच्या नेत्यांना आव्हान देऊ शकला.
मोदींची काही अतिशय वेगळी वैशिष्ट्ये आहेत. मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत ज्यांचा जन्म स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणजे १९४७ नंतर झाला आहे. मोदी हे असे पहिले पंतप्रधान आहेत की, ज्यांची आई हयात आहे. आतापर्यंतच्या पंतप्रधानांना ते सुख लाभलेले नाही. मोदी हे असे दुसरे प्रादेशिक नेते आहेत की, ज्यानी पंतप्रधानपदावर आपला दावा सांगितला आहे. पहिले नेते देवेगौडा. नोकरशाही आणि राजकीय क्षेत्रावर भरभक्कम पकड सतत तेरा वर्षे असलेले नेते म्हणून त्यांचा लौकिक आहे. एक कडक आणि शिस्तप्रिय नेता म्हणून असलेली त्याची प्रतिमा मतदारांना अतिशय भावली. हाच नेता भ्रष्टाचाराला आवर घालू शकेल, डबघाईला आलेल्या अथर्कारणाला सावरू शकेल आणि रोजगार निर्मिर्तीला चालना देऊ शकेल, असे मतदारांना वाटले.
आता अनेकांना २00२ च्या इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाहीना, अशी भीती वाटते आहे. असे झालेच तर मोदी कठोर पावले उचलतील. आजवर दिल्लीच्या शासनाभोवती कथित उदारमतवादी आणि आंतरराष्ट्रीय भूमिकाधारकांचे वेटोळे होते. त्यांना एक प्रभावी आणि केंद्रीभूत सत्ता असलेला नेता कसा मानवणार?
मोदी हा नेता अक्षरश: शून्यातून प्रगटला आहे. यामुळे परंपरागत नेतृत्वाला कसेसेच वाटते आहे. खरे तर सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने ही एक उपकारक गोष्ट म्हटली पाहिजे. सगळे सामाजिक वातावरण आता ढवळून निघणार आहे, असे अनेक मानतात.
गेल्या वर्षी मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली, तेव्हा भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या २७२ जागा मिळतील, असे कोणालाही वाटले नव्हते. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्र्दीत काँग्रेस शासनाने जनकल्याणाच्या अनेक योजना अमलात आणल्या होत्या. भारतातील बहुसंख्य जनता आजही गरीब असून ती खेड्यात राहते. खेडोपाडी प्रचार करण्याचे तंत्र काँग्रेसला चांगलेच अवगत आहे. याउलट भाजप हा शहरी पक्ष मानला जातो. पण मोदींना नव्याने नोंद झालेल्या १0 कोटी मतदारांपैकी तरुण मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाला. यामुळे मतदानाचे यापूर्र्वीचे सगळे उच्चांक मोडले गेले आणि ६६.४ टक्के मतदानाची नोंद झाली.
या नवीन मतदारांवर गुजरातच्या २00२ च्या दंग्यांचा परिणाम नव्हता. अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारल्याच्या घटनेचाही त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. नेहरू- गांधी घराण्याशी त्यांचे भावनिक बंध नव्हते.याउलट काँग्रेसचा हाच मुख्य आधार होता. तसेच या घराण्यातील दोघांच्या (इंदिरा गांधी आणि राजीव गांधी) बलिदानानेही त्यांचे मन हेलावून जात नव्हते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर हे मतदार जन्माला आले होते. २00२ च्या दंगलींच्या आठवणी यांना अंधुकशाही आठवत नव्हत्या. त्यांना जाणवत होता पाच वर्षांचा कोणत्याही प्रकारच्या प्रशासनाचा अभाव! नोकरीच्या संधी प्रत्येक क्षेत्नात कमी झाल्याचा अनुभव! ज्यांनी ७ टक्क्याचा विकास दर पाहिला होता, त्यांच्यासाठी ४.५ टक्क्याचा विकास दर म्हणजे मंदीचाच प्रकार होता. त्यातून आता काँग्रेस शासन सुकाणू विरहित झाले होते. डॉ. मनमोहन सिंग हे आंतरराष्ट्रीय कीर्र्तीचे अथर्शास्त्नज्ञ होते होते, हे खरे. पण त्यांची बोलती बंद होती. अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हाताखाली पंतप्रधान काम करीत असतात, असे भासत असे. सोनिया गांधी यांचे सर्व लक्ष आपला पुत्न राहुल याला पंतप्रधानपदी बसविण्यावर केंद्रित झाले होते. हा प्रकार नवीन मतदार पाहत होते. दिल्लीचे सामूहिक बलात्कार प्रकरण,भ्रष्टाचार आदी बाबी काँग्रेस शासनाने नीट हाताळल्या नव्हत्या. राहुल गांधींच्या प्रचाराचा परिणाम होतांना दिसत नव्हता. त्यामुळे ऐन वेळी प्रियंका गांधींना प्रचारात उतरवावे लागले. प्रियंका गांधीं यांनी आपले लक्ष अमेठी आणि रायबरेलीपुरते र्मयादित ठेवले. यापेक्षा जास्त प्रचारासाठी त्यांना उतरवणे शक्य नव्हते. तसेच आता खूप उशीरही झाला होता. निवडणुकीतील हा विजय मोदींचा विजय जसा आहे तसाच तो त्यांच्या विरोधकांच्या दुबळेपणाचाही परिणाम आहे. ल्ल
ह्ल्ली मुक्काम पेनसिल्व्हॅनिया,अमेरिका ९४२२८0४४३0वसंत गणेश काणे

Sunday, May 18, 2014

Indian Elections Wall Street Journel


 ‘वॉलस्ट्रीट जर्नल’च्या नजरेतून भारतातील निवडणुका  
वसंत गणेश काणे
(एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ नागपूर -४४० ०२२)
ह्ल्ली  मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन, यॉर्क ,पेनसिल्व्हनिया,अमेरिका        
Blog – kasa mee? (07122221689) 9422804430
वॉलस्ट्रीट जर्नल’ हे अमेरिकेतील एक अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त दैनिक आहे. भारतातील निवडणुकीबाबत लिहितांना हे वृत्तपत्र काय लिहिते, हा अर्थातच एक कुतुहलाचा विषय असणार, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. या दैनिकात ‘हिंदू-राष्ट्रवादी (हिंदू–नॅनॅलिस्ट) आणि उद्योजकांशी अनुकूल भूमिका बाळगून असलेले नरेंद्र मोदी हे आता भारताचे पंतप्रधान होणार आहेत’, अशी एका लेखाची सुरवात आहे. लेखात हिंदू आणि राष्ट्रवादी या दोन शब्दात आडवी रेष टाकून हा जोडशब्द तयार केलेला आहे, याची नोंद घ्यावयास हवी. ‘मी हिंदू आहे’ आणि ‘राष्ट्रवादीही आहे’, म्हणून मी हिंदू राष्ट्रवादी आहे, असे नरेंद्र मोदीही मागे एकदा म्हणाले होते, याची या निमित्ताने आठवण होते.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात कांग्रेसच बहुतेक काळ सत्तेवर होती. काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि निवडणूक प्रचार प्रमुख श्री राहुल गांधी यांनी पराभव मान्य केला असून, ‘आम्हाला बऱ्याच गोष्टी विचारात घेण्याची आवश्यकता आहे’, असे म्हटले आहे.
    या निवडणुकीचे वैशिष्ट्य अधोरेखित करतांना या लेखात अशी नोंद घेण्यात आली आहे की, कोणत्याही एका पक्षाने स्वबळावर पूर्ण बहुमत प्राप्त केल्याची घटना जवळ जवळ गेल्या तीस वर्षानंतर प्रथमच घडली आहे.तर काँग्रेसच्या इतिहासात जेमतेम ४६ जागी आघाडी / विजय  मिळवल्याची घटनाही प्रथमच घडत आहे.
‘भारत विजयी झाला आहे आणि आता चांगले दिवस येणार आहेत’ असा संदेश श्री मोदी यांनी ट्वीटरवर देशवासियांना उद्देशून टाकला आहे, याची नोंद लेखात घेण्यात आली आहे.
मतदारांनी प्राधान्य कशाला दिले
भारतात मतदारांमध्ये काँग्रेस विषयी असंतोषाची लाट होती, अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीमुळे सुद्धा नाराजी होती. प्रगतीची धीमी गती आणि कुप्रशासन यामुळेही लोक त्रासले होते. रोजगाराच्या वाढत्या संधी, उच्च प्रतीचे जीवनमान आणि जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर याबद्दल लोक आता अपेक्षा बाळगून आहेत. काँग्रेसची ‘लोक कल्याणकारी धोरणे’ जनतेने अव्हेरली असून सुप्रशासन आणि उद्योगांना चालना देऊन रोजगाराच्या संधी आणि विकास साधण्याच्या धोरणावर जनतेने पसंतीची मोहर उमटवली आहे.
मोदींना क्लीन चीट
एका चहाविक्याचा मुलगा असलेला नरेंद्र मोदी, गुजराथ राज्याचा मुख्यमंत्री होण्या अगोदर हिंदू राष्ट्रवादी (लेखातील हिंदूराष्ट्रवादी  ऐवजी  हिंदू राष्ट्रवादी  ह्या पाठ्भेदाची  नोंद घेण्याची आवश्यकता आहे) संघटनेचा एक कार्यकर्ता होता. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर २००२ साली झालेल्या दंगलीत हजारावर लोक मारले गेले. यापैकी बहुसंख्य मुस्लिम होते. यासाठी टीकाकार मोदींना जबाबदार मानत असले तरी न्यायालयाने यासाठी अभियोग चालविण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे मत नोंदवले आहे.
निवडणुकीत उपस्थित केलेले मुद्दे
प्रचारादरम्यान मोदींनी धार्मिक राजकारण केले नाही. विकासावरच भर दिला. आर्थिक अधोगतीच्या गर्तेतून देशाला बाहेर काढू शकेल अशी क्षमता  असलेला एकमेव नेता असे मानणारे लक्षावधी समर्थक मोदींकडे आकृष्ठ  झाले असून जातीयवादी राजकारण करणारा नेता अशी मोदींची पूर्वीची प्रतिमा आता जवळजवळ लोप पावली आहे.
भारतातला शेअर बाजार अगोदर पासूनच उसळी मारत होताच पण निकालाच्या दिवशी त्याने उच्चांक गाठला. मोदींनी आपल्या आर्थिक धोरणाचे सगळे तपशील मांडलेले नसले तरी शासनाची कमीतकमी दखल, खाजगी उद्योगांना प्रोत्साहन, नोकरशाहीचा प्रभाव कमी करण्याचे धोरण या गोष्टींचा शेअर बाजारावर अनुकूल परिणाम झालेला दिसतो. मोदींचे धोरण उजवीकडे झुकलेले राहणार हे या धोरणविषयक बाबींवरून स्पष्ट होताना दिसते आहे,असे लेखात म्हटले आहे.
असे असले तरी भाजपचा चिल्लर उद्योगात परदेशी गुंतवणुकीला विरोध असेल. तसेच अन्नपदार्थांच्या बाबतीतल्या सवलती (सबसिडीज) परत घेतल्या जातील, असे वाटत नाही.

नवीन धोरण कसे असेल?
हे असे काहीही असले तरी उद्योगांना चालना, आंतरराष्ट्रीय व्यापाराला उत्तेजन, परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन यांच्या साह्याने भारताचे आर्थिक प्रश्न हाताळण्याचा मोदी प्रयत्न करतील, असे संकेत आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्योजकांना ‘रेड टेपचा’ उपद्रव होणार नाही, त्यांच्यासाठी  ‘रेड कार्पेट’ अंथरलेली असेल, असे मोदी म्हणत असत.
आतापर्यंत सर्वच क्षेत्रात धोरणविषयक लकवा अनुभवाला येत होता. तो आता दूर होईल, असे अर्थविषयक तज्ज्ञांना वाटते आहे.
मोदी केवळ विकासाला चालना देऊनच थांबणार नाहीत, तर ते बेकारी कमी करण्यावर भर देतील, भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढतील, एक प्रभावशाली परराष्ट्रीय धोरणाचा अंगीकार करतील आणि भारताला सुवर्णयुगाच्या दिशेने घेऊन जातील, असा लोकांना विश्वास वाटतो आहे.
पण अनेक अर्थतज्ज्ञ सबुरीचा सल्ला देत आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, भारत देश एका महाकाय जहाजासारखा आहे. त्याला एकदम दिशा बदलता येणार नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागेल.
उदाहरण द्यायचे झाले तर, कारखानदारी बद्दल सांगता येईल. यासाठी कामगारविषयक कायदे बदलावे लागतील, भूसंपादनविषयक कायद्यातही बदल करावा लागेल, करप्रणालीही बदलावी लागेल. संसदेत हे कायदे पारित करून घेणे ही सोपी गोष्ट नाही.
हे सर्व निर्णय कठोर राजकीय निर्णय असतील. यासाठी संसदेत सहमती मिळवावी लागेल. सहमतीचे राजकारण हा मोदी यांचा  गुणविशेष नाही. म्हणून  अशा सहाय्यकाची मोदींना आवश्यकता भासेल
मोदींचे प्रतिपक्षी श्री राहुल गांधी आपल्या भाषणांमधून गरिबांना शासकीय सवलतींचे मोहजाल लोकांसमोर ठेवत होते, पण या आश्वासनांवर लोक भाळले नाहीत.
मोदी कसे?, उदारमतवादी की आग्रही?
मोदींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अंकुश असेल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. राम मंदीर बांधण्याबाबत संघ आग्रही असेल, असा काहींचा अंदाज आहे. यामुळे राजकीय अस्वास्थ्य निर्माण होईल. (हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडविला जाईल, असे भाजप च्या जाहीरनाम्यात म्हटले आहे याकडे लेखात दुर्लक्ष करण्यात आले आहे.)
मोदी हे एक उदारमतवादी नेते सिद्ध होतील. देशातल्या अनेक मतदार संघात मुसलमानांनी क्टीकल व्होटिंग केले. जो उमेदवार भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकेल त्या उमेदवाराला मते दिली, असे प्रतिपादन लेखात करण्यात आले आहे.
या निवडणुकीत ‘जात’ पाहून मतदान करण्याचा प्रकार मोडीत निघाला. मध्यमवर्गच नव्हे तर ग्रामीण गरीब या सर्वांशी टीव्ही स्मार्टफोन यांच्या साह्याने संपर्क साधला.
या निवडणुकीत भाजपने स्वबळावर पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. काँग्रेस आता पुन्हा उभी राहू शकेल किंवा नाही याबद्दल लेखात शंका व्यक्त करण्यात आली आहे. श्री राहुल गांधी नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा वीस वर्षांनी लहान आहेत. पण ते भारताच्या तरूण मतदारांवर प्रभाव टाकू शकले नाहीत, या वास्तवाची लेखात नोंद घेण्यात आली आहे.
काँग्रेसचे निवडणूक प्रचार
काँग्रेसने आपल्या दहा वर्षाच्या सत्ताकाळात अनेक ‘लोककल्याणकारी कायदे’ केले. अननसुरक्षा कायद्यानुसार गरीब लोकांना सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्याची सोय होती. तसेच रोजगार हमी योजना होती. या योजनांचा फायदाही दिसत होता. पण आर्थिक बाबतीत घोटाळ्यावर घोटाळे, आर्थिक कुप्रशासन आणि धरसोडीचे धोरण यामुळे या योजनांचा म्हणावा तसा फायदा झाला नाही.
परराष्ट्रीय धोरण
चीन आणि पाकिस्थान यांच्या बाबतीत स्वीकारलेल्या बोटचेप्या धोरणामुळेही जनमत नाराज झाले होते. मोदी कणखर धोरण स्वीकारतील, असे लोकांना वाटते आहे. अनेक लोक मोदींना चढाईखोर मानतात. पण अनेकांना त्फ्यांचा हा स्वभावच सीमा सुरक्षा आणि दहशतवाद हे विषय हाताळण्यासाठी उपयोगाचे ठरतील, असे वाटते. पाकिस्थानमध्ये काम केलेल्या माजी परराष्ट्र वकील श्री पार्थसारथी यांचेही असेच मत आहे. पाकिस्थानातील मूलतत्त्ववादी(धर्मवेडे) मोदींना उचकवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही देशात असलेले संशयाचे वातावरण आणि दोन्ही देशांजवळ अण्वस्त्रे असणे ह्यामुळे परिस्थितीला अनिष्ट वळण लागण्याची भीती अनेकांना वाटते आहे. त्यातून आता अफगाणिस्थानातून अमेरिका आपल्या फौजा काढून घेणार आहे. त्यामुळे निर्माण होणारी स्फोटक परिस्थिती हाताळण्यासाठी मोदींना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे.
अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला होता. (पण आता विजयप्राप्तीनंतर ओबामा यांनी मोदींचे स्वागत केले आहे व्हिसाची अडचण आता आड येणार नाही, हेही त्यांनी आणि अमेरिकन प्राशासानाने स्पष्ट केले आहे.)माजी अमेरिकन परराष्ट्रीय वकील श्रीमती नॅन्सी पावेल यापूर्वीच मोदींची भेट घेऊन परस्पर संबंध सुधारण्याबाबतचे   संकेत दिले आहेत.

मोदींनी विकासाच्या मार्गाने आपली वाटचाल चालू  ठेवली तर भारत आणि अमेरिका यांच्यामधील संबंध वृद्धिंगत होतील, असा विश्वास व्यक्त करून हा लेख आटोपता घेण्यात आला आहे.