Wednesday, May 7, 2014

Tatya Tope's Last Speech





तात्या टोपे यांच्यावरील खटला
१० एप्रिल १८५९
                                वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०
फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर तात्या टोपे यांनी केलेले भाषण
‘तुम्ही कोण? तुम्ही आमचे नव्हेत. तुमचा मी प्रजनन असणे संभवत नाही. तुम्हाला आमचे राज्य हिसकावून घेण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्ही अन्यायाने बळजबरीने बळकावलेले आमचे राज्य आम्ही परत मिळवू बघितले तर आम्ही अपराधी झालो काय?
माझा जन्म तुमच्या राज्यात झालेला नाही. जो माझा राजा नाही त्याशी राजनिष्ठेची शपथ मी कशी घेईन? मी तुमचा नोकर नाही, सेवक नाही आणि मला बंडखोर म्हणता?
हे राज्य आमचे आहे. हे पेशव्यांचे राज्य आहे. मी एकनिष्ठ सेवक आहे तो त्यांच्याशी. त्यांची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. शीर धडावेगळे झाले तरी शिरोधार्य आहे. मी सेनानी आहे.
दैवाचा फासा उलटा पडला आहे. मी जित आहे. तुम्ही जेते आहात. पण त्यामुळे तुम्ही शूर ठरत नाही. माझी स्वामिनिष्ठा माझ्या राजाशी, माझ्या स्वामीशी.
( १८.०४.१८५९ ला फाशीची शिक्षा सुनावली गेली व त्याच दिवशी अमलात आली.)

No comments:

Post a Comment