Saturday, May 3, 2014

Outernet to strenhthen Internet 03.05.2014




‘इंटरनेटच्या मदतीला आउटर नेट’
                                वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०
आज इंटरनेट हा शब्द सर्वांच्या परिचयाचा झाला आहे.एखादा शब्द खूप परिचयाचा झाला की, तो जणू घासूनघासून गुळगुळीत होतो.त्याच्या मूळ अर्थाकडे अनेकांचे फारसे लक्ष राहत नाही.अर्थ न समजताच अनेकजण तो सर्रास वापरत असतात. इंटरनेट या शब्दाचा ‘लाँग फाँर्म’ ‘इंटरनॅशनल नेटवर्क असा आहे. ‘संपूर्ण जग एक चिमुकले गाव'(ग्लोबल व्हिलेज) ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची किमया इंटरनेटने साकारली आहे. ‘इंटरनेटच्या मदतीला आता‘वाय फाय’(वायरलेस नेटवर्क) आले आहे. इंटरनेट किंवा संगणकाशी संपर्क साधण्यासाठी किंवा जोडले जाण्यासाठी आता टेलिफोनच्या तारांची आवश्यकता उरलेली नाही. विश्वातील संपूर्ण ज्ञान भांडाराचे दरवाजे ‘इंटरनेट’ आणि ‘वाय फाय’च्या मध्यामामुळे सताड उघडे झाले आहेत. सोशाल मीडिया, टिंग या सारख्या शब्दांना इंटरनेटमुळे नवीन अर्थांचे आणि संदर्भांचे घुमारे फुटले आहेत. या तंत्रामुळे शब्दकोशात दररोज नवनवीन शब्दांची भर पडत आहे.काही दशकांपूर्वी ज्यांची सामान्यजनांनी कल्पनाही केली नसेल अशा परिपूर्ण संकल्पना रोज जन्माला येत आहेत.
इंटरनेटची मर्यादा नैसर्गिक तसेच मानवनिर्मित
जगातील जवळजवळ निम्मे लोक आजही इंटरनेटशी जोडले/जुळले गेलेले नाहीत. ते जुळूही शकत नाहीत हे वास्तव अजूनही अनेकांना माहित नसेल. पृथ्वीवर आजही असे अनेक भाग आहेत की इज्थे इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देता आलेली नाही. या मागे नैसर्गिक करणे आहेत. अशा ठिकाणी इंटरनेटची सुविधा पोचवायची झाली तर फार मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे.
दुसरी समस्या मानव निर्मित आहे. जगातील अनेक देशात हुकुमशाही राजवटी आहेत. या हुकुमशहांनी धसका घेतला आहे तो माहिती तंत्रज्ञानाचा (इन्फर्मेशन टेकनॉलॉजीचा)! अरब देशांमध्ये सुधारणेची आणि ज्ञानाची पहात उगवली ती याच माहिती तंत्रज्ञानामुळे! त्यामुळे त्यांनी इंटरनेटवर/माहिती तंत्रज्ञानावर ‘सेनसॉरशिप’ लादली आहे. अशाप्रकारे निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित अडचणींमुळे आजही जगातील निम्मी जनता इंटरनेटच्या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही, हिक कठोर वास्तव आहे.
काय आहे आउटरनेट?
या समस्येवर मात करण्यासाठी अमेरिकेतील ‘मिडीया डेव्हलपमेंट इंव्हेस्टमेन्ट फंड’ (एम डी आय एफ़) हि कंपनी पुढे सरसावली आहे. तिने ‘आउटरनेट’ उभारण्याचा चंग बांधला आहे. या नुसार भूगोलाभोवती(पृथ्वीभोवती)घनाकार उपग्रहांचे (क्यूब सॅटेलाईटस ) एक वलय  निर्माण करण्याचे ठरविले आहे. हे वलय  ‘इंटरनेट दाटा’आपल्या ग्रहगोलावरच्या(पृथ्वीवरच्या) सर्व भागांकडे प्रक्षेपित (ब्राँडकास्ट) करील. ही सेवा सर्वांना विनामूल्य उपलब्ध असेल तिला ‘सेनसॉरशिप’ची कात्री लावण्याचे सामर्थ्य कोणत्याही हुकुमशहाच्या हाती असणार नाही.
 आउटरनेट ही मानवनिर्मित चिमुकली नक्षत्रमालाच
घनाकार उपग्रहांचे हे वलय म्हणजे एक मानवनिर्मित चिमुकली नक्षत्रमालाच (नस्टेलेशन) असेल. हिच्या सहाय्याने दूरभाषयंत्रणा (मोबाइल डिव्हायसेस) उपग्रहांच्या तकड्या (सॅटेलाईट डिव्हायसेस) यांच्याकडे इंटरनेटवर उपलब्ध असलेली सगळी माहिती/सामग्री प्रक्षेपित होऊ शकेल आन भूतलावरील कोणत्याही व्यक्तीला तिचा लाभ घेता येईल. ही संपूर्ण यंत्रणा वाटते तेवढी सोपी नाही. ती किचकट स्वरुपाची आहे. तिचे वर्णन करण्यासाठी वापरलेली भाषाही किचकट आणि दुर्बोध आहे. तसेच संपूर्ण संकल्पनाही सामान्यांना आश्चर्याने थक्क करायला लावील अशी आहे. जगातील आश्चर्यांची संख्या यापुढे हाताच्या बोटांवर मोजता येणार नाही, हे वास्तवही या निमित्ताने अधोरेखित होत आहे, हे मात्र नक्की.    
      
    


  


      
    




No comments:

Post a Comment