Sunday, March 30, 2014

Congress Manifesto - A critical Study 30.03.2014

काँग्रेसचा जाहीरनामा – एक चिकित्सक अभ्यास
                                    वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
निवडणुकीच्या निमित्ताने सर्व पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करीत असतात. असा जाहीरनामा जेव्हा सत्ताधारी पक्षाचा असतो, तेव्हा त्याचा अधिक सखोल आणि चिकित्सक पद्धतीने   विचार करण्याची आवश्यकता असते. विशेषत: काँग्रेस सारखा सतत दहा वर्षे सत्तेत असलेला पक्ष जेव्हा आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतो यापूर्वी प्रसारित केलेल्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासने दिली होती, त्यानुसार काय आणि कायकाय साध्य झाले हे पाहणे आवश्यक असते. २००४ नंतर २००९ आणि आता २०१४ मध्ये असे एकूण तीन जाहीरनामे काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे कोणकोणती आश्वासने या पक्षाने मतदारांना दिली होती, त्यापैकी किती पूर्ण झाली, किती अपूर्ण राहिली आणि किती नंतरच्या जाहीरनाम्यात अनुल्लेखित राहिली, हे मतदारांना कळणे आवश्यक असते. प्रत्येक जाहीरनामा हा त्यात्या वेळचा वचननामा असतो.
२०१४ चा जाहीरनामा प्रसिद्ध करतांना नेते काय म्हणाले ?
यावेळी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बोलतांना काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री राहुल गांधी यांनी प्रथमच भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार श्री नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख केला. आजपर्यंत ते मोदींवर टीका करीत पण त्यांच्या नावाचा उल्लेख मात्र करीत नसत. ‘मोदी ही एक व्यक्ती असली तरी ते एका विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात आणि ही विचारसरणी देशाला हानिकारक आहे’. टीका करण्यासाठी का होईना राहूल गांधींनी मोदींचे नाव घेतले आणि विरोधाचे कारणही सांगितले, हे बरे झाले. आता दोन पक्षांच्या विचारसराणींचा तुलनात्मक विचार करायला लोक मोकळे झाले आहेत.( या विचारसरणीचा आम्हाला अभिमान वाटतो, असे उत्तर नंतर मोदींनी बागपतच्या भाषणात दिलेले आपल्याला माहित आहे.) अर्थात या दोन विचारसरणी  एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की, भ्रष्टाचारी आणि डागाळलेल्या व्यक्तिमत्वाच्या लोकांना जवळ करणार नाही, असे म्हणणारी काँग्रेस आता लालूप्रसाद यादवांचा उल्लेख आपला एक महत्त्वाचा साथीदार म्हणून करतांना दिसते आहे, हीही एक महत्त्वाची व नोंद घेण्यासारखी बाब आहे. या निमित्ताने बिहारमध्ये कोण कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे, हेही  स्पष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे याचवेळी ‘आदर्श’ प्रकरणी ‘बिचारे अशोक चव्हाण’ यांच्यावर कसा कोणताही आरोप नाही, असे म्हणून त्यांची बाजू उघडपणे श्रीमती सोनिया गांधी यांनी घेतली हेही एकपरीने बरेच झाले.
तिसरे असे की, जाहीरनामा तयार करण्यापूर्वी श्री राहूल गांधी यांनी १० हजार लोकांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली आणि त्यानुसार जाहीरनाम्याची आखणी केली, हेही स्पष्ट केले हेही चांगले झाले त्यामुळे या जाहीरनाम्यात ‘सर्वांसाठी सर्वकाही’ असल्याचे का दिसते, तेही लक्षात येण्यास मदत होते. जनमानसाची नाडी जाणून घेणे आणि सवंग लोकप्रियतेसाठी एका पाठोपाठ एक आश्वासन देत सुटणे, यातील फरकही लोकांच्या लक्षात येण्यास यामुळे मदतच होणार आहे.
या तिन्ही जाहीरनाम्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर एक गोष्ट जाणवते ती ही की, अगोदरच्या जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांच्या पूर्ती बाबतचा ताळेबंद देण्याचे बंधन निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांवर टाकले पाहिजे. यामुळे पक्षाने कोणती धोरणे नव्याने स्वीकारली आहेत, कोणत्या बाबतीत जुन्या घोषणांचीच पुनरावृत्ती आहे, कोणते विषय गाळले आहेत, ते मतदारांना कळेल.  या आधारे ते आपले मत बनवू शकतील.
तीन जाहीरनाम्यांचा तुलनात्मक अभ्यास
काँग्रेसच्या २००४ च्या जाहीरनाम्यात ‘जी डी पी दहा टक्क्यांपर्यंत नेऊ’, असे आश्वासन होते. प्रत्यक्षात तो या दशकातला जी डी पी चा नीचांक ठरला. २००९ मध्येही असेच आश्वासन होते, पण तोही नीचांकच ठरला. आता २०१४ च्या जाहीरनाम्यात जी डी पी त वाढ घडवून आणू, असे आश्वासन दिलेले आहे,जुन्या वचनांचे काय झाले, ते पाहून आता मतदार हे आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता किती आहे, याबाबत नक्कीच  अंदाज बांधू शकतील.
मध्यान्ह भोजन
२००४ मध्ये शाळांमधील मध्यान्ह भोजन योजना सुरु झाली. त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम २००९ मध्येही पूर्ण झाले नाही. त्यामुळे २०१४ नंतरच्या पाच वर्षांच्या काळात ही सुधारित स्वरुपात आकार घेईल, शिक्षक व मुख्याध्यापक यांची या खिचडी संबंधातील  शिक्षणेतर कामातून मुक्तता करा, असे आदेश आता उच्च न्यायालयानेही दिले आहेत. याचा तरी परिणाम होऊन शिक्षक व मुख्याध्यापक या शिक्षणेतर कामातून मुक्त होतील अशी अपेक्षा बाळगायची का?
आरोग्य विमा योजना
२००४ मधील राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत नंतरच्या अंमलबजावणीच्या काळात अनेक घोटाळे समोर आले. २००९ च्या अंदाजपत्रकात जिल्हास्तरावरच्या रुग्णालयांचा दर्जा वाढवून सार्वजनिक क्षेत्रातील दवाखान्यात नि:शुल्क औषधे पुरवण्याची योजना निधी अभावी पूर्णत्वाला जाऊ शकली नाही. जाहीरनाम्यात व नंतर अंदाजपत्रकात घोषणा करायची पण प्रत्यक्षात निधीची तरतूदच करायची नाही, असा प्रकार इतर  अनेक योजनांच्या बाबतीतही झालेला आढळतो.  दवाखान्यांमध्ये औषधांचा साठा जवळजवळ संपलेला असतो. आता २०१४ मध्ये आरोग्याचा अधिकार प्रदान करण्याचे आश्वासन दिले आहे. जोपर्यंत यासाठी आवश्यक असलेली तरतूद करण्यात येणार नाही, तोपर्यंत हा एक ‘कागदी अधिकारच’ राहील. असे कागदी अधिकार काय कामाचे?
पी पी पी ची रडकथा
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पी पी पी ) पायाभूत विकास (इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट), रेल्वेचे आधुनिकीकरण आणि प्रत्येक घरी वीज हा संकल्प २००४ च्या जाहीरनाम्यात होता. पण यानंतरच्या पाच वर्षात काहीही प्रगती झाली नाही. २००९ च्या जाहीरनाम्यात याबाबत अधिक गुंतवणूक करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला पण नंतरच्या पाच वर्षातही म्हणावी अशी प्रगती झाली नाही. रेल्वेबाबत असे म्हटले जाते की, ब्रिटिशांनी टाकलेल्या रुळांवर आपण जास्तीतजास्त गाड्या चालवीत असतो. नवे रेल्वेमार्ग टाकण्याचे काम कासवालाही मागे टाकील अशा गतीने सुरु आहे. वीज उत्पादनाच्या बाबतीतली कथाही फारशी वेगळी नाही. २०१४ च्या जाहीरनाम्यात मात्र घरोघरी वीज, गावखेड्यात इंटरनेट, प्रत्येकाला घर, सर्वांना सेवानिवृत्तीवेतन अशी ‘सर्वांना सर्वकाही’ देण्यासाठी कोट्यवधींची तरतूद करू असे आश्वासन दिले आहे. पण ही तरतूद कशी करणार, निधी कसा मिळवणार याबाबत मौन पाळण्यात आले आहे.
योग्य करप्रणाली अभावी तूट वाढतेच आहे
२००४ मधील जाहीरनाम्यात अंदाजपत्रकातील तूट भरून काढू, असे आश्वासन दिले होते. कर आकारणी सुलभ करू, करपात्रतेचा पाया विस्तारित करू, असे आश्वासन दिले होते. २००९ मध्ये हा मुद्दा अनुल्लेखानेच गाळण्यात आला. ‘गुड्स अँड सर्व्हिस ॲक्ट’ नावाच्या नवीन कराचा प्रस्ताव केला पण त्याच्या बाबतीत फारशी प्रगती झाली नाही. २०१४ मधील जाहीरनाम्यात तर ह्याचा उल्लेखच दिसत नाही. याचा अर्थ काय समजायचा? खरेतर हा आधुनिक करप्रणालीत हा एक महत्वाचा करप्रकार मानला गेला आहे.
आयात निर्यातीचा उरफाटा प्रत्यय
२००४ मध्ये कापड उद्योगाला चालना  देण्याचा संकल्प जाहीरनाम्यात होता. आपण निर्यात वाढवणार होतो. प्रत्यक्षात आयातच वाढली. याच काळात बांग्लादेश आणि लंका यांनी आपल्याला मागे टाकले आहे. २००९ च्या जाहीरनाम्यामध्येही   निर्यातीला चालना देण्याचे असेच धोरण जाहीर केले होते. याही काळात निर्यात फारशी वाढली नाही. २०१४ मध्येतर  याबाबत उल्लेखच नाही. ज्या सत्ताधारी पक्षाला सतत तीन जाहीरनामे सादर करण्याची संधी मिळाली ,त्या पक्षाच्या एका पाठोपाठ येणाऱ्या जाहीरनाम्यात एक सातत्य राहील, ही अपेक्षा  मतदारांनी बाळगली तर ते चूक ठरू नये. पण या पक्षाने २०१४ चा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी आपले अगोदरचे जाहीरनामे वाचलेच नाहीत, अशी शंका येते.
कोरड्या आश्वासनाची खैरात
२०१४ च्या जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षात १० कोटी युवकांचे प्रशिक्षण आणि त्यानंतर नोकरी देण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरेल असे वाटत नाही. आजवरच्या जाहीरनाम्यातले संकल्प अंशतः जरी पूर्ण झाले असते, तरी नोकऱ्या जास्त आणि उमेदवार कमी अशी स्थिती निर्माण झाली असती.
उच्च शिक्षणाचा  दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार , त्यासाठी परकीय मदत घेणार असे २०१४ चा जाहीरनामा म्हणतो. प्रत्यक्षात प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंतचा स्तर इतका खालावला आहे की, प्रत्येक क्षेत्राला गुणवत्ताधारकांची कमतरता भासत आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होतो आहे. यामुळेच अपघात, वादग्रस्त प्रकरणे, मुद्दा योग्य प्रकारे न मांडला जाणे हे प्रकार कार्यपालिकेकडून (नोकरशाहीकडून) वाढत्या प्रमाणात होताना दिसताहेत. गुणवत्तावाढीचे स्वप्न साकार होईल अशी चिन्हे दिसत नाहीत.
महिलांना ३३%आरक्षण देण्याबाबतचा प्रश्न गेली अनेक वर्षे लोंबकळत पडला आहे. तो पुढील पाच वर्षात मार्गी लागेल,यावर विश्वास बसत नाही.कारण प्रबळ इच्छाशक्तीच्या अभावी हा प्रश्न आजवर मार्गी लागला  नाही.
‘जातीय संघर्ष’ या संबंधातले विधेयक पारित करण्याचा प्रयत्न आता मागे पडला आहे. त्याची आता आवश्यकता उरलेली  नाही, या मताला बळकटी येत आहे. जातीय सलोखा वाढवण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची आवश्यकता आहे. अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांची भीती आणि धाक दाखवून मतपेटीचे राजकारण न करण्याचा निर्धार कांग्रेस पक्षालाच करण्याची आवश्यकता आहे.
मतपेटीचे राजकारण करण्याच्या उद्देशाने अतिमागास आणि मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्यांसाठी आयोगाचे गठन करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात आहे.
शहरांच्या नियोजनपूर्वक विकासाचे तुणतुणे काँग्रेस पक्ष अनेक वर्षांपासून वाजवीत आहे. पण दरवेळी झोपडपट्ट्याना संरक्षण देण्यासाठी वाढती कालमर्यादा घालून देत आहे.
सैन्यदलाचे आधुनिकीकरणाचा प्रश्न तातडीने हाती घेण्याचा विषय आहे. तो याही जाहीरनाम्यात पुन्हा नव्याने मांडण्यात आला आहे. पण प्रत्यक्ष कृती करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. आजवर फारशी कृती का होऊ शकली नाही, असा प्रश्न मतदारांचे मनात आला तर त्यांचे काय चुकले?

अमलात आणता येणार नाहीत अशी आश्वासने देऊ नका असे निवडणूक आयोग आणि न्यायालये सांगू लागली आहेत. जाहीरनाम्यात नुसती पोकळ आश्वासने नसावीत तर सोबत आर्थिक तरतूद कशी करणार ‘ॲक्शन प्लॅन’ असणार हेही नमूद केलेले असावे. यांच्या अभावी जाहीरनाम्यातील आश्वासने ‘लबाडांची निमंत्रणेच’ ठरतील. पण हे दूर कसे होईल? जागरूक मतदारच याल नियंत्रणात ठेवू शकतील.                                                

Wednesday, March 26, 2014

Parrot identifies the murderer 26.03.2014

पोपटाच्या मदतीमुळे खुनाचे रहस्य उलगडले
                                        वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
एका पोपटाने खुन्याला पकडून देण्यात मदत केल्याची घटना एखाद्या रहस्यकथेतली नाही तर प्रत्यक्ष जीवनात घडलेली आहे,हे ऐकून बहुतेकांना आश्चर्य वाटेल.त्याचे असे घडले की, ४५ वर्षाची नीलम शर्मा आणि तिच्या पाळीव कुत्र्याला कुणीतरी  मारले होते. खुनी पसार झाला होता. खुन्याचा तपास लागत नव्हता. पोलीस शोध घेत होते पण त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते.
विजय शर्मा नावाच्या एका पत्रकाराची नीलम ही पत्नी होती. त्याचा पुतण्या घरी आला की,घरातला पोपट अतिशय अस्वस्थ होऊन विचित्र अआवाजात ओरडू लागायचा. एवढेच नव्हे तर बोलताबोलता आशुतोषचे – पुतण्याचे नाव जरी निघाले तरी पोपट ओरडायला लागायचा. हे पाहून विजय श्रमाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्याने ही बाब पोलिसांच्या निदर्शनाला आणली.
पोलीस चौकशीत आशुतोषने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आपल्या एका साथीदारासह तो चोरी करण्याच्या इराद्याने घरात घुसला होता. त्याने मागे ओळख राहू नये म्हणून आपल्या चुलतीचा – नीलमचा - खून केला. कुत्रा भुंकू लागला म्हणून त्याने कुत्र्यालाही तीच वाट दाखविली. पोपट या सर्व घटनेचा मूक साक्षीदार होता. तो बहुदा भेदरून गेला असावा. पण त्याने आपल्या मनात सर्व घटनांची कायम स्वरूपी नोंद घेतली असली पाहिजे. म्हणूनच आशुतोष दिसला किंवा त्याच्या नावाचा उल्लेख जरी झाला तरी तो अस्वस्थ होऊन ओरडायला लागायचा.

अशीच आणखी एक कथा सांगतात. खून झाला तेव्हा घरातले पाळीव कुत्रे भुंकले नव्हते. य घटनेच्या आधाराने पोलिसांनी खुनी माणसाला शोधून काढले होते. कुत्रा खुन्याला ओळखत असला पाहिजे. हा धागा पकडून पोलीस खुन्यापर्यंत पोचले होते.

Tuesday, March 25, 2014

Missing Plane tb 26.03.2014

प्रासंगिक

तारीख: 26 Mar 2014 00:03:26

वेध एका शोध मोहिमेचा

८ मार्च २०१४ ला क्वालालंपूर येथून बीजिंगला जाण्यासाठी प्रवासी घेऊन निघालेले मलेशियाचे बोईंग जेटलायनर विमान निघाल्यानंतर एक तासाच्या आत बेपत्ता झाल्याच्या वार्तेने अख्खे जग हादरले. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात त्याचा शोध घेणे सुरू झाले. स्वर्गाचा उल्लेख करण्याचे कारण असे की, या विमानाचा पत्ता न लागण्याची एक शक्यता अशीही वर्तवण्यात आली आहे की, या मागे परग्रहावरील जीवसृष्टीचा हात असावा. पृथ्वीवरील मानवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी हे विमान गिळंकृत (स्वालो) केले असावे. अखेर, ते बेतत्ता विमान हिंद महासागरात कोसळले आणि २३९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, असे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांनी घोषित केले. असे असले तरी विमानाचा मलबा किंवा कोणत्याही प्रवाशाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. आज विज्ञान खूप पुढे गेले आहे. गुगलवर पृथ्वीचा कोपरा न कोपरा निरखता येतो. अगदी तुमचे स्वत:चे घर आणि त्यासमोर उभी असलेली तुमची किंवा दुसर्‍या कुणाची कार सुद्धा ओळखता येते. असे असून सुद्धा बेपत्ता झालेल्या एम एच ३७० या बोईंग ७७७ प्रकारच्या महाकाय विमानाचा मागमूसही इतके दिवस होऊन गेले तरी लागू नये, याचे आश्‍चर्य वाटते. पण त्याच बरोबर विमानाचा पत्ता लावण्यासाठी जे जंगजंग पछाडले जात आहे, ते पाहूनही माणूस आश्‍चर्यचकित होतो. शोध मोहीम कशी असावी, शोध कसा घ्यावा, कोणकोणत्या शक्यता गृहित धराव्यात, याचे एक नमुनेदार उदाहरण म्हणून या मोहिमेकडे इतिहास पाहील , यात शंका नाही.

तांत्रिक बिघाड

विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा आणि त्यामुळे विमानातील दाब एकदम कमी होऊन विमानातील सर्व व्यक्ती तात्काळ बेशुद्ध झाल्या असाव्यात आणि विमान मात्र उडतच राहिले असावे आणि भरकटले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. विमानाच्या सामान घरातील लिथियम बॅटरींनी पेट घेतला असावा, अशी दुसरी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मानवी चुका किंवा वाईट हेतू वगळून शोध मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या बाबी अपघात या सदरात मोडतात.

घातपाती कृत्य?

कॉकपिटमध्ये घुसलेल्या कुणीतरी किंवा विमान कर्मचारी यांच्यापैकीच कुणीतरी हे घातपाती कृत्य केले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण, असे असले तर बहुदा आततायी गट जबाबदारी स्वीकारतो आणि आपला हेतू जाहीर करतो. आता बरेच दिवस लोटल्यानंतरही असे घडलेले नाही. कर्मचारी किंवा प्रवासी यापैकी कुणीही जगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. ११ सप्टेंबरला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता, तेव्हा असे घडले होते. प्रवाशांनी बाहेरच्या जगाशी संपर्क साधला होता. विमान पस्तीस हजार फूट उंचीवरून जात होते, एवढ्या उंचीवर मोबाईल काम करीत नाहीत, असे काही आहे का?
हे विमान बळजबरीने ताबा घेऊन पळवून नेले असावे, ही शक्यताही नजरेआड करण्यात आलेली नाही. पण मग इतके दिवस होऊनही ही बाब उघडकीला का आली नाही? विमान अज्ञातस्थळी नेऊन लपवून ठेवणे अशक्य नसले तरी खूपच कठीण आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात फ्रान्समध्ये भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांनी जंगलात गुप्तता राखीत रेल्वेचे रूळ टाकले आणि योग्य वेळ साधून मूळ मार्गाशी सांधा जोडणारा भाग पूर्ण करून अख्खी रेल्वे गाडीच वळवून पळवली होती. असाच काहीसा प्रकार या विमानाच्या बाबतीत झालाच नसेल का? विमानात बॉम्बस्फोट करवला असावा, असे मानले तर विमानाचे अवशेष आणि तेलाचे तवंग समुद्रात दिसले असते. किंवा हे अवशेष भूतलावर विखुरलेले आढळले असते. तेलाचे शिंतोडे जागोजागी दिसले असते. विमान पस्तीस हजार फूट उंचीवरून उडत होते त्यामुळे विखुरलेले भाग किंवा उडालेले शिंतोडे फार मोठ्या व विस्तृत भूभागावर आढळले असते. अतिशय बारीक शोध घेऊनही असे दिसत नाही. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अनेक जंगलात विमाने उतरवण्यासाठी धावपट्ट्या (रनवे) बांधण्यात आल्या होत्या. त्या अजूनही तशाच पडून आहेत. त्यांची डागडुजी करून त्या जागी हे विमान उतरवून दडवून ठेवले असावे, अशीही शक्यता तपासली जात आहे. पण अशा ठिकाणी २३९ प्रवाशांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे ही सोपी गोष्ट नाही.

पायलटचे दुष्कृत्य?

मलेशियातील विरोधी पक्षनेत्यावर अनैसर्गिक लैंगिक कृत्य (सोडोमी) केल्याचा आरोप ठेवून त्याला तुरुंगात डांबले होते, असा आरोप केला जातो. विमानाचा पायलट जहरी अहमद शहा हा या विरोधी पक्षनेत्याचा कट्टर समर्थक होता. त्याने सूड घेण्याच्या इराद्याने हे कृत्य केले असावे, असाही संशय व्यक्त केला जातो आहे. पण, मग या पायलटने आपला हेतू स्पष्ट करणारा खुलासा जाहीर करावयास नको होता का? तसेच दोन पायलटमध्ये संगनमत होते, असे गृहित धरायचे का?
विमान नेहमीच्या मार्गावरून जात असताना त्याचा मार्ग अचानक बदलला, हे नक्की. या विमानात लोकेशन टेक्नॉलॉजी (उपग्रहाच्या साह्याने विमानाचा ठावठिकाणा कळवणारी संगणक प्रणित यंत्रणा) वापरली जात होती. हिलाच एसीएआरएस म्हणजेच एअरक्राफ्ट कम्युनिकेशन्स ड्रेसिंग ड रिपोर्टिंग सिस्टीम असे म्हणतात. तसेच, फ्लाईट नॅव्हिगेशन सिस्टीम म्हणजे हवाई मार्गातील एकेका खुणेची नोंद घेत पुढे जाणे शक्य करणारी यंत्रणा सुद्धा कार्यरत होती. यांचे काम कुणातरी जाणकाराने एकदम ठप्प केले असावे. याच सुमारास अमेरिकेतून एक निनावी फोन कॉल आल्याची नोंद आहे. यामागचे रहस्य आजही गुलदस्त्यातच आहे. ते उघड झाले नाही किंवा त्याचा मूळ स्रोत सुद्धा कळलेला नाही. हा कॉल साधा असता तर तो करणारा आतापर्यंत समोर यायला हवा होता. आपल्या सध्या फोन कॉलची ही परिणती झालेली पाहून तो भिऊन दडून बसला आहे/असावा, असे मानले तर त्याचा शोध आतापर्यंत नक्कीच घेता आला असता.
विमानातून विमान अभियांत्रिकीत (एव्हिएशन इंजिनीअरिंग) निष्णात असलेला एक चिनी नागरिक प्रवास करीत होता. हा मोहम्मद खैरुल अर्मी सलामत नावाचा कर्मचारी विमान दुरुस्तीसाठी चीनला जायला निघाला होता. त्याचे विमानविषयक तंत्रज्ञान दुर्लक्षून चालणार नाही, असेही एक मत आहे. कारण एक अत्यंत अप्रामाणिक व्यक्ती म्हणून त्याची ख्याती आहे.

विमान अमेरिकेने पळवले असण्याचा रशियाचा दावा

रशियाच्या गुप्तहेर खात्याने एक पुडी सोडली आहे. अमेरिकेने या विमानाचा ताबा घेतला आणि विमानाला वळवून आपल्या हिंदी महासागरातील डीयागोग्राशिया या बेटावर गुप्त स्थळी नेऊन ठेवले आहे, पण अमेरिकेने असे का करावे, ही बाब अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे. सध्या रशिया आणि अमेरिका यांचे क्रिमिया प्रकरणामुळे निर्माण झालेले मधुर संबंध पाहता रशियाच्या या रहस्योद्घाटनाची गंभीर दखल घेण्यास कुणीही तयार होईल, असे वाटत नाही. शिवाय, अमेरिकेने असे कोणतेही विमान या बेटावरील आपल्या तळावर आलेले नाही, असा खुलासा केला आहे.

तालिबानी डाव?

हे तालिबानी कृत्य तर नाही ना, अशी शंका मलेशियाने व्यक्त केली आहे. विमान पाच हजार फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीवरून उडत ठेवले तर ते रडारच्या कक्षेत येत नाही. हे विमान नागपूर विमानतळाच्या हद्दीतून अफगाणिस्तानच्या दिशेने गेले असावे, असेही म्हणतात. सध्या हे विमान अतिरेक्यांनी अफगाणिस्थानमधील अतिरेकी प्रभावक्षेत्रात त्यांच्या ताब्यात असावे. ११ सप्टेंबरला विमानाचा बॉम्बसारखा उपयोग करून अतिरेक्यांनी अमेरिकेतील आवळेजावळे उंच मनोरे (वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्वीन टॉवर्स) उद्‌ध्वस्त केले होते. तसाच काहीसा प्रकार भारतात करण्याचा अतिरेक्यांचा डाव असावा, असेही एक वृत्त आहे. पण, आपल्या गुप्तहेर यंत्रणेने ही शक्यता फेटाळून लावली आहे. पण, सामान्य नागरिकांच्या मनातून ही शक्यता दूर होईल, असे वाटत नाही.
ह्या विमानाचे अदृश्य होणे ही जशी एक धक्कान्तिका आहे, तशीच ती एक शोकांतिकाही आहे. या विमानाचा शोध केव्हा लागेल कुणास ठावूक? कदाचित तो कधीच लागणारही नाही. पण, या निमित्ताने जगातील २२ राष्ट्रे आकाश पाताळ एक करीत जी शोध मोहीम राबवत आहेत, तिला तोड नाही. केवळ विमान प्रवाशांनाच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा ही दिलासा देणारी बाब ठरेल आणि वर्षानुवर्षे स्मरणात राहील, यात शंका नाही.
- वसंत गणेश काणे

Mystery of the Missing Plane 25.03.2014

                                 वेध एका शोध मोहिमेचा  
वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
८ मार्च २०१४ ला  क्वालालंपूर येथून बेजिंगला जाण्यासाठी २३९ प्रवासी घेऊन निघालेले मलेशियाचे बोईंग जेटलायनर विमान निघाल्यानंतर एक तासाच्या आत बेपत्ता झाल्याच्या वार्तेने अख्खे जग हादरले होते. स्वर्ग,पृथ्वी आणि पाताळात त्याचा शोध घेणे सुरु झाले होते. स्वर्गाचा उल्लेख  करण्याचे कारण असे की, या विमानाचा पत्ता न लगण्याची एक शक्यता अशीही वर्तवण्यात आली होती की, या मागे परग्रहावरील जीवसृष्टीचा हात असावा. पृथ्वीवरील मानवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी हे विमान गिळंकृत (स्वालो ) केले असावे.
आज विज्ञान खूप पुढे गेले आहे. ‘गुगलवर’ पृथ्वीचा कोपरा न कोपरा निरखता येतो. अगदी तुमचे स्वत:चे घर आणि त्यासमोर उभी असलेली तुमची किंवा दुसऱ्या कुणाची ‘कार’ सुद्धा ओळखता येते. असे असून सुद्धा बेपत्ता झालेल्या एम एच ३७० या बोईंग ७७७ प्रकारच्या महाकाय विमानाचा मागमूसही अनेक  दिवस होऊन गेले तरी लागू नये, याचे आश्चर्य वाटत होते . पण त्याच बरोबर विमानाचा पत्ता लावण्यासाठी जे जंगजंग पछाडले जात होते, ते पाहूनही माणसे  आश्चर्यचकित होत होती. शोध मोहीम कशी असावी, शोध कसा घ्यावा, कोणकोणत्या शक्यता गृहीत धराव्यात, याचे एक नमुनेदार उदाहरण म्हणून या मोहिमेकडे इतिहास पाहील , यात शंका नाही.
तांत्रिक बिघाड
विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा आणि त्यामुळे विमानातील दाब एकदम कमी होऊन विमानातील सर्व व्यक्ती तात्काळ बेशुद्ध झाल्या असाव्यात आणि विमान मात्र उडतच राहिले असावे आणि भरकटले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. विमानाच्या सामान घरातील लिथियम बॅटरींनी पेट घेतला असावा, अशी दुसरी शक्यता वर्तवण्यात आली होती. मानवी चुका किंवा वाईट हेतू वगळून शोध मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला होता . या  बाबी अपघात या सदरात मोडतात.
घातपाती कृत्य ?
कॉकपिटमध्ये घुसलेल्या कुणीतरी किंवा विमान कर्मचारी यांच्या पैकीच कुणीतरी हे घातपाती कृत्य केले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला, पण असे असते तर बहुदा आततायी गट जबाबदारी स्वीकारतो आणि आपला हेतू जाहीर करतो. बरेच दिवस लोटल्यानंतरही असे घडले नव्हते. कर्मचारी किंवा उतारू यापैकी कुणीही जगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला दिसला नाही. ११ सप्टेम्बरला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता, तेव्हा असे घडले होते. प्रवाशांनी बाहेरच्या जगाशी संपर्क साधला होता. विमान पस्तीस हजार फूट उंचीवरून जात होते, एवढ्या उंचीवर मोबाईल काम करीत नाहीत, असे तर काही नव्हते ना?
हे विमान बळजबरीने ताबा घेऊन पळवून नेले असावे, ही शक्यताही नजरेआड करण्यात आली नव्हती. पण मग इतके दिवस होऊनही ही बाब उघडकीला का आली नाही? विमान अज्ञातस्थळी नेऊन लपवून ठेवणे अशक्य नसले तरी खूपच कठीण आहे. दुसऱ्या महायुधाच्या काळात फ्रान्समध्ये भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांनी जंगलात गुप्तता राखीत रेल्वेचे रूळ टाकले आणि योग्यवेळ साधून मूळ मार्गाशी सांधा जोडणारा भाग पूर्ण करून अख्खी रेल्वे गाडीच वळवून पळवली होती. असाच काहीसा प्रकार या विमानाच्या बाबतीत झाला नव्हता ना, अशी शंका येणे स्वाभाविकच होते.
विमानात बॉम्बस्फोट करवला असावा, असे मानले तर विमानाचे अवशेष आणि तेलाचे तवंग समुद्रात दिसले असते. किंवा हे अवशेष भूतलावर विखुरले आढळले असते. तेलाचे शिंतोडे जागोजागी दिसले असते. विमान पस्तीस हजार फूट उंचीवरून उडत होते त्यामुळे विखुरलेले भाग किंवा उडालेले शिंतोडे फार मोठ्या व विस्तृत भूभागावर आढळले असते. अतिशय बारीक शोध घेऊनही असे दिसले नाही.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक जंगलात विमाने उतरवण्यासाठी धावपट्ट्या (रनवे ) बांधण्यात आल्या होत्या. त्या अजूनही तशाच पडून  आहेत. त्यांची डागडुजी करून त्या जागी हे विमान उतरवून दडवून ठेवले असावे, अशीही शक्यता तपासली गेली. पण अशा ठिकाणी २३९ उतारूंच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे ही सोपी गोष्ट नव्हती.
पायलटचे  दुष्कृत्य?
मलेशियातील विरोधी पक्षनेत्यावर अनैसर्गिक लैंगिक कृत्य (सोडोमी) केल्याचा आरोप ठेवून त्याला तुरुंगात डांबले होते, असा आरोप केला जात होता. विमानाचा पायलट जहरी अहमद शहा हा या  विरोधी पक्षनेत्याचा कट्टर समर्थक होता. त्याने सूड घेण्याच्या इराद्याने हे कृत्य केले असावे, असाही संशय व्यक्त केला गेला. पण मग या पायलटने आपला हेतू स्पष्ट करणारा खुलासा जाहीर करावयास नको होता का? तसेच दोन पायलट मध्ये संगनमत झाले होते, असे गृहीत धरायचे का?  
विमान नेहमीच्या मार्गावरून जात असतांना त्याचा मार्ग अचानक बदलला गेला होता, हे नक्की. या विमानात ‘लोकेशन टेक्नॉलॉजी’ (उपग्रहाच्या साह्याने विमानाचा ठावठिकाणा कळवणारी संगणकप्रणित यंत्रणा) वापरली जात होती. हिलाच ए सी ए आर एस म्हणजेच एअरक्राफ्ट कम्युनिकेशन्स ॲड्रेसिंग ॲड रिपोर्टिंग सिस्टीम असे म्हणतात. तसेच फ्लाईट नॅव्हिगेशन सिस्टीम म्हणजे हवाई मार्गातील एकेक खुणेची नोंद घेत पुढे जाणे शक्य करणारी यंत्रणा सुद्धा कार्यरत होती. यांचे काम कुणातरी ‘जाणकाराने’ एकदम ठप्प केले असेल का? याच सुमारास अमेरिकेतून एक निनावी ‘फोन कॉल’ आल्याची नोंद आहे. या मागचे रहस्य आजही गुलदस्त्यातच आहे. ते उघड झाले नाही किंवा त्याचा मूळ स्रोत सुद्धा कळलेला नाही. हा कॉल ‘साधा’ असता तर तो करणारा आतापर्यंत समोर यायला हवा होता. आपल्या सध्या फोन कॉल ची ही परिणिती झालेली पाहून तो भिऊन तो दडून बसला आहे/असावा, असे मानले तर त्याचा शोध आतापर्यंत नक्कीच लागायला/घ्यायला हवा होता.
विमानातून विमान अभियांत्रिकीत (एव्हिएशन इंजिनिअरिंग) निष्णात असलेला एक चिनी नागरिक प्रवास करीत होता. हा मोहम्मद खैरुल अर्मी सलामत नावाचा कर्मचारी विमान दुरुस्तीसाठी चीनला जायला निघाला होता. त्याचे विमानविषयक तंत्रज्ञान दुर्लक्षून चालणार नाही, असेही एक मत आहे.कारण एक अत्यंत अप्रामाणिक व्यक्ती म्हणून त्याची ख्याती आहे. त्याचेच  तर हे कृत्य नसेल ना ?
विमान अमेरिकेने पळवले असावे –इति रशिया
रशियाच्या गुप्तहेर खात्याने एक ‘पुडी सोडली’ होती. अमेरिकेने या विमानाचा ‘ताबा घेतला’ आणि विमानाला ‘वळवून’ आपल्या हिंदी महासागरातील ‘डीयागो ग्राशिया’ य बेटावर गुप्त स्थळी नेऊन ठेवले आहे, पण अमेरिकेने असे का करावे, ही बाब ‘अनाकलनीय’ असल्याचे रशियाने म्हटले होते. सध्या रशिया आणि अमेरिका यांचे ‘क्रिमीया  प्रकरणामुळे’ निर्माण झालेले ‘मधुर संबंध’ पाहता रशियाच्या या ‘रहस्योद्घाटनाची’ गंभीर दखल घेण्यास कुणीही तयार झाले नाही, याचे आश्चर्य वाटायला नको. शिवाय अमेरिकेने असे कोणतेही विमान या बेटावरील आपल्या तळावर आलेले नाही, असा खुलासा केला होता.
तालिबानी डाव?
हे तालिबानी कृत्य तर नाहीना अशी शंका मलेशियाने व्यक्त केली आहे.विमान पाच हजार फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीवरून उडत ठेवले तर ते रडारच्या कक्षेत येत नाही. हे विमान नागपूर विमान तळाच्या हद्दीतून अफगाणिस्तानच्या दिशेने गेले असावे, असेही म्हणतात. सध्या हे विमान अतिरेक्यांनी अफगाणीस्थानमधील अतिरेकी प्रभावक्षेत्रात त्यांच्या ताब्यात असावे. असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.                                        
अकरा सप्टेंबरला विमानाचा बॉम्ब सारखा उपयोग करून अतिरेक्यांनी अमेरिकेतील आवळेजावळे उंच मनोरे (वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्वीन टॉवर्स) उध्वस्त केले होते. तसाच काहीसा प्रकार भारतात करण्याचा अतिरेक्यांचा डाव असावा, असेही एक वृत्त होते. पण आपल्या गुप्तहेर यंत्रणेने ही शक्यता फेटाळून लावली होती. पण सामान्य नागरिकांच्या मनातून ही शक्यता सहजासहजी  दूर होणे  शक्य नव्हते, याबद्दल त्यांना दोष देता येईल का?
सिंगापूरहून भारत आणि पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या विमानाच्या अगदी जवळून हे विमान गेले असेल तर, जणू एकाला एक लागूनच अशाप्रकारे ही विमाने गेली असतील. जर ‘या’ विमानाने आपली संपर्क यंत्रणा बंद ठेवली असेल तर रडार यंत्रणेवर एकच विमान जात असल्याचा ब्लीप (प्रकाश स्फुल्लिंग) दिसून आला असेल. अशाप्रकारे हे विमान राजरोसपणे गेले असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अशी शक्यता एका विमानतज्ज्ञाने व्यक्त केली होती.
हिंदी महासागराच्या ऑस्ट्रेलियाला स्पर्श करणाऱ्या भागात २४ मीटर लांबीचे काही अवशेष दिसत आहेत, असे वृत्त झळकले  ते अवशेष या विमानाचे आहेत किंवा कसे याचा शोध घेणे सुरु आहे. पण असे म्हणतात की, आता विमानाचे अवशेष तरंगत असण्याची शक्यता खूपच कमी आहे.
मलेशियाने हे विमान हिंदी महासागरात बुडाल्याची घोषणा केली आहे. विमान प्रवाशांचे नातेवाईक शोकाकुल झाले असले तरी त्यांना विमान नक्की बुडाल्याचा ठोस पुरावा हवा आहे.ह्या विमानाचे अदृश्य होणे ही जशी एक धक्कान्तिका होती. तशीच ती एक शोकांतिकाही आहे. हे विमान बुडाल्याचा नक्की शोध लागेल तेव्हा लागो. हा शोध केव्हा लागेल कुणास ठावूक? कदाचित तो कधीच लागणारही नाही. पण या निमित्ताने जगातील बावीस राष्ट्रे आकाश पाताळ एक करीत जी शोध मोहीम आजही राबवत आहेत, तिला तोड नाही. केवळ विमान प्रवाशांनाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा ही दिलासा देणारी बाब ठरेल आणि वर्षानुवर्षे स्मरणात राहील, यात शंका नाही.
    

             

Sunday, March 23, 2014

Mystery of the Missing Plane 23.03.2014

                                 वेध एका शोध मोहिमेचा  
वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
८ मार्च २०१४ ला  क्वालालंपूर येथून बेजिंगला जाण्यासाठी २३९ प्रवासी घेऊन निघालेले मलेशियाचे बोईंग जेटलायनर विमान निघाल्यानंतर एक तासाच्या आत बेपत्ता झाल्याच्या वार्तेने अख्खे जग हादरले आहे. स्वर्ग,पृथ्वी आणि पाताळात त्याचा शोध घेणे सुरु झाले आहे. स्वर्गाचा उल्लेख  करण्याचे कारण असे की, य विमानाचा पत्ता न लगण्याची एक शक्यता अशीही वर्तवण्यात आली आहे की, या मागे परग्रहावरील जीवसृष्टीचा हात असावा. पृथ्वीवरील मानवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी हे विमान गिळंकृत (स्वालो ) केले असावे.
आज विज्ञान खूप पुढे गेले आहे. ‘गुगलवर’ पृथ्वीचा कोपरा न कोपरा निरखता येतो. अगदी तुमचे स्वत:चे घर आणि त्यासमोर उभी असलेली तुमची किंवा दुसऱ्या कुणाची ‘कार’ सुद्धा ओळखता येते. असे असून सुद्धा बेपत्ता झालेल्या एम एच ३७० या बोईंग ७७७ प्रकारच्या महाकाय विमानाचा मागमूसही इतके दिवस होऊन गेले तरी लागू नये, याचे आश्चर्य वाटते. पण त्याच बरोबर विमानाचा पत्ता लावण्यासाठी जे जंगजंग पछाडले जात आहेत, ते पाहूनही माणूस आश्चर्यचकित होतो. शोध मोहीम कशी असावी, शोध कसा घ्यावा, कोणकोणत्या शक्यता गृहीत धराव्यात, याचे एक नमुनेदार उदाहरण म्हणून या मोहिमेकडे इतिहास पाहील , यात शंका नाही.
तांत्रिक बिघाड
विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा आणि त्यामुळे विमानातील दाब एकदम कमी होऊन विमानातील सर्व व्यक्ती तात्काळ बेशुद्ध झाल्या असाव्यात आणि विमान मात्र उडतच राहिले असावे आणि भरकटले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. विमानाच्या सामान घरातील लिथियम बॅटरींनी पेट घेतला असावा, अशी दुसरी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मानवी चुका किंवा वाईट हेतू वगळून शोध मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या  बाबी अपघात या सदरात मोडतात.
घातपाती कृत्य ?
कॉकपिटमध्ये घुसलेल्या कुणीतरी किंवा विमान कर्मचारी यांच्या पैकीच कुणीतरी हे घातपाती कृत्य केले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, पण असे असले तर बहुदा आततायी गट जबाबदारी स्वीकारतो आणि आपला हेतू जाहीर करतो. आता बरेच दिवस लोटल्यानंतरही असे घडलेले नाही. कर्मचारी किंवा उतारू यापैकी कुणीही जगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. ११ सप्टेम्बरला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला झाला होता, तेव्हा असे घडले होते.प्रवाशांनी बाहेरच्या जगाशी संपर्क साधला होता. विमान पस्तीस हजार फूट उंचीवरून जात होते, एवढ्या उंचीवर मोबाईल काम करीत नाहीत, असे काही आहे का?
हे विमान बळजबरीने ताबा घेऊन पळवून नेले असावे, ही शक्यताही नजरेआड करण्यात आलेली नाही. पण मग इतके दिवस होऊनही ही बाब उघडकीला का आली नाही? विमान अज्ञातस्थळी नेऊन लपवून ठेवणे अशक्य नसले तरी खूपच कठीण आहे. दुसऱ्या महायुधाच्या काळात फ्रान्समध्ये भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांनी जंगलात गुप्तता राखीत रेल्वेचे रूळ टाकले आणि योग्यवेळ साधून मूळ मार्गाशी सांधा जोडणारा भाग पूर्ण करून अख्खी रेल्वे गाडीच वळवून पळवली होती. असाच काहीसा प्रकार या विमानाच्या बाबतीत झालाच नसेल का?
विमानात बॉम्बस्फोट करवला असावा, असे मानले तर विमानाचे अवशेष आणि तेलाचे तवंग समुद्रात दिसले असते. किंवा हे अवशेष भूतलावर विखुरले आढळले असते. तेलाचे शिंतोडे जागोजागी दिसले असते. विमान पस्तीस हजार फूट उंचीवरून उडत होते त्यामुळे विखुरलेले भाग किंवा उडालेले शिंतोडे फार मोठ्या व विस्तृत भूभागावर आढळले असते. अतिशय बारीक शोध घेऊनही असे दिसत नाही.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक जंगलात विमाने उतरवण्यासाठी धावपट्ट्या (रनवे ) बांधण्यात आल्या होत्या. त्या अजूनही तशाच पडून  आहेत. त्यांची डागडुजी करून त्या जागी हे विमान उतरवून दडवून ठेवले असावे, अशीही शक्यता तपासली जात आहे. पण अशा ठिकाणी २३९ उतारूंच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे ही सोपी गोष्ट नाही.
पायलटचे  दुष्कृत्य?
मलेशियातील विरोधी पक्षनेत्यावर अनैसर्गिक लैंगिक कृत्य (सोडोमी) केल्याचा आरोप ठेवून त्याला तुरुंगात डांबले होते, असा आरोप केला जातो. विमानाचा पायलट जहरी अहमद शहा हा या  विरोधी पक्षनेत्याचा कट्टर समर्थक होता. त्याने सूड घेण्याच्या इराद्याने हे कृत्य केले असावे, असाही संशय व्यक्त केला जातो आहे. पण मग या पायलटने आपला हेतू स्पष्ट करणारा खुलासा जाहीर करावयास नको होता का? तसेच दोन पायलट मध्ये संगनमत होते, असे गृहीत धरायचे का?  
विमान नेहमीच्या मार्गावरून जात असतांना त्याचा मार्ग अचानक बदलला, हे नक्की. या विमानात ‘लोकेशन टेक्नॉलॉजी’ (उपग्रहाच्या साह्याने विमानाचा ठावठिकाणा कळवणारी संगणक प्रणित यंत्रणा) वापरली जात होती. हिलाच ए सी ए आर एस म्हणजेच एअरक्राफ्ट कम्युनिकेशन्स ॲड्रेसिंग ॲड रिपोर्टिंग सिस्टीम असे म्हणतात. तसेच फ्लाईट नॅव्हिगेशन सिस्टीम म्हणजे हवाई मार्गातील एकेक खुणेची नोंद घेत पुढे जाणे शक्य करणारी यंत्रणा सुद्धा कार्यरत होती. यांचे काम कुणातरी ‘जाणकाराने’ एकदम ठप्प केले असावे. याच सुमारास अमेरिकेतून एक निनावी ‘फोन कॉल’ आल्याची नोंद आहे. य मागचे रहस्य आजही गुलदस्त्यातच आहे. ते उघड झाले नाही किंवा त्याचा मूळ स्रोत सुद्धा कळलेला नाही. हा कॉल ‘साधा’ असता तर तो करणारा आतापर्यंत समोर यायला हवा होता. आपल्या सध्या फोन कॉल ची ही परिणिती झालेली पाहून तो भिऊन तो दडून बसला आहे/असावा, असे मानले तर त्याचा शोध आतापर्यंत नक्कीच घेता आला असता.
विमानातून विमान अभियांत्रिकीत (एव्हिएशन इंजिनिअरिंग) निष्णात असलेला एक चिनी नागरिक प्रवास करीत होता. हा मोहम्मद खैरुल अर्मी सलामत नावाचा कर्मचारी विमान दुरुस्तीसाठी चीनला जायला निघाला होता. त्याचे विमानविषयक तंत्रज्ञान दुर्लक्षून चालणार नाही, असेही एक मत आहे.कारण एक अत्यंत अप्रामाणिक व्यक्ती म्हणून त्याची ख्याती आहे.
विमान अमेरिकेने पळवले असावे –इति रशिया
रशियाच्या गुप्तहेर खात्याने एक ‘पुडी सोडली’ आहे. अमेरिकेने या विमानाचा ‘ताबा घेतला’ आणि विमानाला ‘वळवून’ आपल्या हिंदी महासागरातील ‘डीयागो ग्राशिया’ य बेटावर गुप्त स्थळी नेऊन ठेवले आहे, पण अमेरिकेने असे का करावे, ही बाब ‘अनाकलनीय’ असल्याचे म्हटले आहे. सध्या रशिया आणि अमेरिका यांचे ‘क्रिमीया  प्रकरणामुळे’ निर्माण झालेले ‘मधुर संबंध’ पाहता रशियाच्या या ‘रहस्योद्घाटनाची’ गंभीर दखल घेण्यास कुणीही तयार होईल, असे वाटत नाही. शिवाय अमेरिकेने असे कोणतेही विमान या बेटावरील आपल्या तळावर आलेले नाही, असा खुलासा केला आहे.
तालिबानी डाव?
हे तालिबानी कृत्य तर नाहीना अशी शंका मलेशियाने व्यक्त केली आहे.विमान पाच हजार फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीवरून उडत ठेवले तर ते रडारच्या कक्षेत येत नाही. हे विमान नागपूर विमान तळाच्या हद्दीतून अफगाणिस्तानच्या दिशेने गेले असावे, असेही म्हणतात. सध्या हे विमान अतिरेक्यांनी अफगाणीस्थानमधील अतिरेकी प्रभावक्षेत्रात त्यांच्या ताब्यात असावे.                                         
अकरा सप्टेंबरला विमानाचा बॉम्ब सारखा उपयोग करून अतिरेक्यांनी अमेरिकेतील आवळेजावळे उंच मनोरे (वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्वीन टॉवर्स) उध्वस्त केले होते. तसाच काहीसा प्रकार भारतात करण्याचा अतिरेक्यांचा डाव असावा, असेही एक वृत्त आहे. पण आपल्या गुप्तहेर यंत्रणेने ही शक्यता फेटाळून लावली आहे. पण सामान्य नागरिकांच्या मनातून ही शक्यता दूर होईल, असे वाटत नाही.
सिंगापूरहून भारत आणि पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या विमानाच्या अगदी जवळून हे विमान गेले असेल तर, जणू एकाला एक लागूनच अशाप्रकारे ही विमाने गेली असतील. जर ‘या’ विमानाने आपली संपर्क यंत्रणा बंद ठेवली असेल तर रडार यंत्रणेवर एकच विमान जात असल्याचा ब्लीप (प्रकाश स्फुल्लिंग) दिसून आला असेल. अशाप्रकारे हे विमान राजरोसपणे गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता एका विमानतज्ज्ञाने व्यक्त केली आहे.
हिंदी महासागराच्या ऑस्ट्रेलियाला स्पर्श करणाऱ्या भागात २४ मीटर लांबीचे काही अवशेष दिस्ताथेत. ते या विमानाचे आहेत किंवा कसे याचा शोध घेणे सुरु आहे. पण असे म्हणतात की, आता विमानाचे अवशेष तरंगत असण्याची शक्यता खूपच कमी आहे.
ह्या विमानाचे अदृश्य होणे ही जशी एक धक्कान्तिका आहे तशीच ती एक शोकांतिकाही आहे. या विमानाचा शोध केव्हा लागेल कुणास ठावूक? कदाचित तो कधीच लागणारही नाही. पण या निमित्ताने जगातील बावीस राष्ट्रे आकाश पाताळ एक करीत जी शोध मोहीम राबवत आहेत, तिला तोड नाही. केवळ  विमान प्रवाशांनाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा ही दिलासा देणारी बाब ठरेल आणि वर्षानुवर्षे स्मरणात राहील, यात शंका नाही.
    

             

Wednesday, March 19, 2014

India and China 19.03.2014 Original

चीनचा चढेलपणा आणि भारताचा भोळसटपणा    
                                वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
या भूतलावर अनेक देश आहेत. हे मानवनिर्मित आहेत.देशोदेशींच्या सीमारेषा ईश्वराने आखून दिलेल्या नाहीत, त्या मानवनिर्मित आहेत. याचा प्रत्यय रशियाने नुकताच सर्व जगाला आणून दिला आहे. आता क्रिमीया रशियाचा भाग बनला आहे. अमेरिका आणि युरोपीय देश आरडाओरड करीत आहेत. त्यांची शक्ती वरचढ ठरली तर आणि तरच हा निर्णय उलटेल एरवी नाही. बळी तो कानपिळी!     
कोंबडे झाकले पण ...
       या सत्याची आठवण करून देणारी घटना नुकतीच घडली आहे. चीन बरोबर झालेल्या संघर्षात १९६२ साली आपल्याला याचा चांगलाच परिचय आला. या संघर्षात भारताचा पराभव का झाला, कोणाचे कुठे चुकले याचा आढावा घेण्यासाठी लेफ्टनंट जनरल हेन्डरसन ब्रूक्स यांनी एप्रिल १९६२ मध्ये सादर केलेला अहवाल आजतागायत गोपनीय म्हणून भारत सरकारने जाहीर केला नाही. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार घटना घडून गेल्यानंतर पन्नास वर्षानंतर असे अह्वाल प्रसिद्ध करावेत, असे आहे. असा संकेत असण्याचे कारण असे असते की, पन्नास वर्षानंतर त्या काळातील प्रमुख व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेलेल्या असतात, त्यामुळे वस्तुनिष्ठ विचार करणे शक्य असते. भावनिक बंध बरेचसे सैल झालेले असतात. पण भारत सरकारने हा अहवाल प्रसिद्ध केला नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर हेन्डरसन ब्रूक्स ऑस्ट्रेलियाला निघून गेले आणि १९९९ साली त्यांचा देहांत झाला. ऑस्ट्रेलियातील ८७ वर्षांचे एक पत्रकार नेव्हिल मक्ष्वेल यांनी या अहवालाचा काही अंश आपल्या वेबसाईटवर टाकला यात त्याकाळी भारताकडून  झालेल्या चुकांचा आढावा घेतलेला आढळतो. अहवाल प्रसिद्ध झाला आणि एकच खळबळ उडाली. लगेचच ही वेबसाईट झाकण्यात (बॅलाक) करण्यात आली. यासाठी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी पडद्याआड हालचाली केल्या असून हा अहवाल जगासमोर येऊ नये म्हणून प्रयत्न चालविले असल्याचे बोलले जात आहे.
१९६२ चे गुन्हेगार
१९६२ चे गुन्हेगार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्यात त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि त्यांचे विश्वासू सल्लागार आणि संरक्षण मंत्री व्हि के कृष्ण मेनन यांचा प्रमुखपणे यांचा समावेश आहे. याशिवाय लेफ्टनंट जनरल बी एम कौल (नेहरूंचे दूरचे नातेवाईक आणि संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांच्या खास विश्वासातले) हे उत्तरपूर्व भागात तेजपूर येथे जबाबदारीची कमान सांभाळून होते. यांच्या हिणकस युद्धकौशाल्यावर व योजकतेवर लेफ्टनंट जनरल हेन्डरसन ब्रूक्स यांच्या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे.
समस्येचे स्वरूप
या सीमा प्रश्नाचे स्वरूप समजून घेण्यासाठी १९१४ सालपर्यंत मागे जावे लागते. तिबेट आणि ब्रिटन यांची सिमला येथे झालेल्या परिषदेत आसाम आणि तिबेट यांच्यामधील सीमारेषा आखण्यासाठी एक करार करण्यात आला. ब्रिटनचे प्रतिनिधित्व मॅकमहोन यांनी केले होते. या परिषदेत त्यावेळच्या चीन सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी असा करार करण्याचा तिबेटचा अधिकार आणि आखण्यात आलेली सीमारेषा यावर आक्षेप घेऊन या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. तिबेट चीनचा मांडलिक (सबओरडीनेट) असून असा करार करण्याचा अधिकार तिबेटला नाही ,अशी त्यांची भूमिका होती. चीनची ही भूमिका आजही कायम आहे. ब्रिटनचे म्हणणे असे होते की, त्यांचाही तिबेटवर सुझरेन्टीचा ( एका देशाला  दुसऱ्या देशावर राज्य करण्याचा अधिकार असणे – संबंधित देश पूर्णपणे स्वतंत्र आहे , असे मानले  जात नाही) ) अधिकार आहे. त्यामुळे त्यांना असा करार करण्याचा अधिकार आहे.
याला का म्हणायचे मनाचा उदारपणा?
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा अधिकार वारसा हक्काने भारताकडे आला होता. परंतु पंडित नेहरूंनी साम्राज्यवादाचे प्रतिक असलेला हा अधिकार उदारमनाने आणि लोकशाही मूल्यांची बूज राखण्याची  (पण व्यवहारत: भोळसट) स्वत:हून सोडून दिला आणि तिबेटवर चीनचा अधिकार मान्य केला. आंतराष्ट्रीय राजकारणाचे एक सूत्र असे सांगतात की, दोन मोठ्या व बलाढ्य देशामध्ये एक छोटेसे राज्य असावे बलाढ्य राष्ट्रांच्या सीमा एकमेकांना स्पर्श करणाऱ्या असू नयेत. अशा देशाला ‘बफर स्टेट’ असे म्हणतात. चीनचा तिबेटवरील अधिकार मान्य केल्यामुळे भारत आणि चीन या  दोन मोठ्या राष्ट्रांच्या सीमा एकमेकांना स्पर्श करू लागल्या. ही फार मोठी चूक झाली. लदाख हा जम्मू काश्मीरमधील भाग आहे. या भागातील सीमारेषाही चीनला मान्य नाही. आजघडीला जुन्या सीमा रेषा ओलांडून चीनने आक्साई चीन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागावर कब्जा केला आहे.
दलाई लामांना आश्रय आणि चीनचा भडका
हे सर्व घडत असतांना साम्यवादी चीनला संयुक्त राष्ट्र संघात राष्ट्रीय चीनच्या(चॅनग काई शेखच्या ताब्यात उरलेला शांघायचा भाग) जागी प्रतिनिधित्व मिळावे, म्हणून भारत आघाडीवर होता. हा दुसरा भोळसटपणाचा प्रकार म्हटला पाहिजे.याच काळात चीनचे पंतप्रधान चौ एन लाय यांनी दोनदा भारताला भेटी दिल्या पण सीमारेषा मानण्यास साफ नकार दिला. १९५९ साली चीनमध्ये असुरक्षित वाटल्यामुळे तिबेटमधील धर्मगुरू दलाई लामा यांनी भारतात आश्रय मागितला. आपल्या पूर्वापार उदारमतवादी परंपरेला अनुसरून भारताने त्यांना भारतात आश्रय दिला धार्मिक व्यवहार करण्याची मोकळीक दिली पण राजकीय हालचालींवर बंधने घातली. पण अशी भूमिका घेऊन  सुद्धा चीन अक्षरश: खवळला. त्याने सीमारेषेचे उल्लंघन वाढत्या प्रमाणात सुरु केले.
आय बीचा अनाहुत आणि चुकीचा सल्ला
आपल्या भोळसटपणाची कमाल ही की, आपला पंचशीलचा धोशा आणि हिंदी चिनी भाई भाई हे गुणगान कंठरवाने सुरूच होते. असे म्हणतात की, चीनच्या अनेक हालचाली आणि मनसुबे यांची जाणीव आपल्याला रशियाने करून दिली कारण असे घडले की चीनने रशियाशीही सीमावाद उकरून काढला होता. आता मात्र आपण खडबडून जागे झालो. कहर असा म्हटला पाहिजे की, आय बी ने (इंटेलिजन्स ब्युरोने) अतिशय चुकीची माहिती पुरविली. बी एन मलिक हे डायरेक्टर पंडित नेहरूंच्या विश्वासातले आणि जवळचे मानले जात. यांनी फोरवर्ड पोलीसीचा सल्ला दिला. म्हणजे आपले सैनिक चीनने जी घुसखोरी केली आहे,तिच्या पलीकडे आपले सैनिक घुसखोरीच्या दोन ठिकाणांच्या मधोमध घुसवावेत. यावेळी दोन चुका झाल्या एक म्हणजे असे केल्यास चीन गप्प बसेल हा ब्युरोच कयास चुकीचा ठरला. दुसरे असे की, सैन्याच्या हालचाली कशा , कुठे आणि केव्हा कराव्यात ही बाब ब्युरोच्या अधिकारकक्षेच्या बाहेरची होती.
तयारी नसतांना सैनिकांना आदेश दिल्याने नामुष्की
  पण हा सल्ला प्रमाण मानून पंडित नेहरूंनी सैन्याला या  दृष्टीने आदेश दिले. कृष्ण मेनन यांचीही हीच भूमिका होती. चीन चांगलाच तयारीत होता. त्या तुलनेत आपल्या सैनिकांची संख्या अपुरी होती, शस्त्रे जुनीपुराणी  शिवाय अपुरी, कालबाह्य आणि हिणकस होती. पर्वतीय भागात आणि तेही बर्फाळ क्षेत्रात कसे लढावे याची पुरेशी (नव्हे मुळीच) तयारी नव्हती . असे म्हणतात की या काळात आपल्या शस्त्र कारखान्यात चहा काफी गाळण्याची गाळणी तयार केली जात होती. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. आपला सपशेल पराभव झाला. आंतरराष्ट्रीय राजकारण पंचशीलच्या तत्त्वावर चालत नसते. तिथे कृष्णनीती आणि चाणक्यनीति हवी असते. हे आपल्याला अजूनही कळलेले नाही. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘सद्गुणातिरेक’ (किंवा भोळसट आणि बावळटपणा)  आणि देशांतर्गत मात्र ‘स्वकीयांचे संदर्भात कुटिल नीती’ हेच सत्ताधारी कांग्रेस पक्षाचे प्रारंभापासूनचे धोरण राहिलेले आहे, ही आपल्या देशातील राजकारणामधली एक प्रमुख शोकांतिका आहे.