Sunday, March 9, 2014

Outer net To Strengthen Internet

इंटरनेटला सक्षम करणार आऊटरनेट 
                                वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
आज ‘इंटरनेट’ हा शब्द सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. ‘संपूर्ण जग एक चिमुकले गाव (ग्लोबल विलेज) ही संकल्पना प्रत्यकक्षात आणण्याची किमया इंटरनेटने साकारली आहे. विश्वातील संपूर्ण ज्ञानभांडाराचे दरवाजे इंटरनेटने सताड उघडे केले आहेत.सोशल मिडिया ,चेटिंग या शब्दांना इंटरनेटमुळे नवीन अर्थाचे आणि संदर्भांचे घुमारे फुटले आहेत.
 परंतू जगातील जवळजवळ निम्मे लोक आजही इंटरनेटशी झुळले नाहीत. ते तसेजुळूही शकत नाहीत,हे वास्तव अनेकांना माहीतही नसेल. इंटरनेटचा ‘फुलफॉर्म’, ‘इंटरनेशनल नेटवर्क’ असा असला तरी पृथ्वीवरच्या अनेक भागात म्हणजे दऱ्याखोऱ्यात तसेच उंच पर्वतावर अनेकदा इंटरनेटची सुविधा अजूनही उपलब्ध करून देता आलेली नाही. हे भाग नैसर्गिक कारणांमुळे अडचणीचे ठरले आहेत.त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा पोचवायची म्हणजे फार मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. एक समस्या मानव निर्मितही आहे.जगातील अनेक देशात हुकुमशाही राजवटीही आहेत.य हुकुमशहांनी इंटरनेटचा धसका घेतला आहे.माहिती तंत्रज्ञानामुळे अरब देशांमध्ये सुधारणेची आणि ज्ञानाची पाहट उगवली आहे, ती याच माहिती तंत्रज्ञानामुळे. जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे आहोत, हे तिथल्या जनतेला विशेषत: तरुणाईला कळले आहे माहिती तंत्रज्ञानामुळे. सहाजीकच या हुकुमशहांनी इंटरनेटवर/ माहिती तंत्रज्ञानावर सेन्सौरशिप लादली आहे. अशाप्रकारे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित कारणांमुळे आजही जगातली निम्मी जनता इंटरनेटच्या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाही, हे एक कठोर वास्तव आहे.
य समस्येवर मत करण्यासाठी अमरिकेतील एम डी आय एफ (मिडिया डेव्ह्लपमेंट इन्व्हेस्टमेंट फंड) ही कंपनी पुढे सरसावली आहे. तिने ‘आऊटरनेट’ उभारण्याचा चंग बांधला आहे. यानुसार भूगोलाभोवती (पृथ्वीभोवती) घनाकार उपग्रहांचे (क्यूब सेटलाईटसचे) एक वलय  निर्माण करण्याचे ठरविले आहे. हे वलय ‘इंटरनेट डाटा’ आपल्या ग्रहगोलावरच्या (पृथ्वीवरच्या)सर्व भागाकडे प्रक्षेपित (ब्रोडकास्ट) करील. ही सेवा सर्वांना विनामूल्य उपलब्ध असेल. तिला कात्री लावण्याचे सामर्थ्य कोणत्याही हुकुमशहाच्या हातात असणार नाही.
घनाकार उपग्रहांचे हे वलय म्हणजे एक मानवनिर्मित चिमुकली नक्षत्रमालाच(कॉन्सस्टेलेशन) असेल. तिच्या सहाय्याने दूरभाषयंत्रणा (मोबाईल डिव्हाईसेस), उपग्रहांच्या तबकड्या (सेतेलाईट डिशेस) यांच्याकडे इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्व ‘मीहिती सामग्री’ प्रक्षेपित होऊ शकेल आणि भूतलावरील कोणत्याही व्यक्तीला तिचा लाभ घेता येईल. ही संपूर्ण यंत्रणा वाटते तेवढी सोपी नाही. ती किचकट स्वरुपाची आहे. तिचे वर्णन करण्यासाठी वापरलेली भाषाही दुर्बोध आहे आणि संपूर्ण संकल्पनाही सामान्यांनाही आश्चर्याने थक्क करायला लावेल अशी आहे. जगातील आश्चर्यांची संख्या यापुढे हाताच्या बोटांवर मोजता येणार नाहीत, हे वास्तवही या निमित्ताने अधोरेखित होत आहे, हे मात्र नक्की.   
    








                


No comments:

Post a Comment